Saturday, 4 December 2021

MPSC: एमपीएससीने जाहीर केले 2022 चे अंदाजित वेळापत्रक


महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगातर्फे शनिवारी दुपारी प्रसिद्ध करण्यात आले आहे. सन २०२२ या वर्षात येत्या ७ मे पासून ते ३० एप्रिल २०२३ पर्यंत होणाऱ्या विविध परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.


राज्यसेवा परीक्षा 2019 ,महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त व मुख्य परीक्षा, महाराष्ट्र वनसेवा मुख्‍य परीक्षा, कृषी सेवा परीक्षा, विद्युत अभियांत्रिकी सेवा परीक्षा, राज्यसेवा परीक्षा २०२२ आदी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.






भूकंप लहरींचे प्रकार


■ प्राथमिक लहरी (P waves) :
» प्राथमिक लहरींचा वेग इतर सर्व लहरींपेक्षा जास्त असतो.
» प्राथमिक लहरी या स्थायुरूप व द्रव्यरूप पदार्थावरून प्रवेश करू शकतात.
» प्राथमिक लहरी या ध्वनी लहरींप्रमाणे असतात.
» यात कणांचे कंपन लहरींच्या संचरण दिशेने घडून येते.

■ दुय्यम लहरी (S waves) :
» दुय्यम लहरी या प्रकाश लहरींप्रमाणे असून यात कणांचे कंपन संचरण दिशेशी समलंब दिशेने घडून येते.
» दुय्यम लहरी या घनपदार्थापासून जाऊ शकतात; परंतु द्रवरूप पदार्थातून त्या जाऊ शकत नाहीत.
» सर्व साधारणपणे त्यांचा वेग प्राथमिक लहरींच्या वेगापेक्षा निम्मा असतो.

■ भूपृष्ठ लहरी (L waves) :
» भूपृष्ठ लहरी या भूपृष्ठांवरूनच सागरी लहरींप्रमाणे प्रवाहित होतात.
» सर्व भूकंप लहरींमध्ये भूपृष्ठ लहरी या अधिक विनाशक असतात.
» भूपृष्ठांवरून अधिक खोलवर या लहरी प्रवास करू शकत नाही.
» भूपृष्ठ लहरी पृथ्वीपासून आरपार न जाता पृथ्वीगोलाला फेरी मारतात.
» भूकंप अभिलेखावर या लहरींची नोंद सर्वात शेवटी होते.
_____________
■ रिश्टर स्केल (Richter Scale) :
» अमेरिकन भूकंप शास्त्रज्ञ चार्ल्स रिश्टर यांनी १९३५ साली भूकंपाच्या लहरींची तीव्रता मोजण्यासांठी रिश्टर प्रमाण शोधून काढले. याच्या साह्य़ाने भूकंपाच्या तीव्रतेची सातत्याने नोंद केली जाते. याच्या कक्षा एक ते नऊ या दरम्यान असतात.

महाराष्ट्रातील अभयारण्ये

🍀   अनेर - धुळे
🍀 अंधेरी - चंद्रपूर
🍀 औट्रमघाट - जळगांव
🍀 कर्नाळा - रायगड
🍀 कळसूबाई - अहमदनगर
🍀 काटेपूर्णा - अकोला
🍀 किनवट - यवतमाळ
🍀 कोयना - सातारा
🍀 कोळकाज - अमरावती
🍀 गौताळा औट्रमघाट - औरंगाबाद, जळगांव
🍀 चांदोली - सांगली, कोल्हापूर
🍀 चापराला - गडचिरोली
🍀 जायकवाडी - औरंगाबाद
🍀 ढाकणा कोळकाज - अमरावती
🍀 ताडोबा - चंद्रपूर
🍀 तानसा - ठाणे
🍀 देऊळगांव रेहेकुरी - अहमदनगर
🍀 नवेगांव - भंडारा
🍀 नागझिरा - भंडारा
🍀 नांदूर मध्यमेश्वर - नाशिक
🍀 नानज - सोलापूर
🍀 पेंच - नागपूर
🍀 पैनगंगा - यवतमाळ, नांदेड
🍀 फणसाड - रायगड
🍀 बोर - वर्धा
🍀 बोरीवली(संजय गांधी) - मुंबई
🍀 भिमाशंकर - पुणे, ठाणे
🍀 मधमेश्वर - चंद्रपूर
🍀 मालवण - सिंधुदुर्ग
🍀 माळढोक - अहमदनगर, सोलापूर
🍀 माहीम - मुंबई
🍀 मुळा-मुठा - पुणे
🍀 मेळघाट - अमरावती
🍀 यावल - जळगांव
🍀 राधानगरी - कोल्हापूर
🍀 रेहेकुरी - अहमदनगर
🍀 सागरेश्वर – सांगली

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...