Thursday, 2 December 2021

जिल्हे निर्मिती

रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)-1 मे 1981

औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा)

उस्मानाबादपासून – लातूर (29 वा जिल्हा),-16 ऑगस्ट 1982

चंद्रपूरपासून – गडचिरोली (30 वा जिल्हा)-26 ऑगस्ट 1982

मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)-1990

धुळेपासून – नंदुरबार (32 वा जिल्हा)1 जुलै 1998

अकोल्यापासून – वाशिम (33 वाशिम जिल्हा)
 
परभणीपासून – हिंगोली (34 वा जिल्हा)-
1 मे 1999

भंडारा  – गोंदिया (35 वा जिल्हा)

ठाण्यापासून – पालघर (36 वा जिल्हा-1 ऑगस्ट 2014 )

सोलापूर जिल्हा - महत्त्वाची माहिती

भौगोलिक माहिती :-
सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १४,८४४.६ चौरस किलोमीटर आहे.सोलापुरातील सरासरी पर्जन्यमान ५४५.४ मिलिमीटर (महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्याचा ) आहे. जिल्ह्याची लोकसंख्या ३८,४९,५४३(इ.स. २००१) आहे. भीमा नदीजिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. जिल्ह्यात डोंगराळ भाग जवळजवळ नाही.

सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेस  अहमदनगर  व  उस्मानाबाद पूर्वेला उस्मानाबाद, दक्षिणेस सांगली व विजापूर जिल्हा व (कर्नाटक) तर पश्र्चिमेस सांगली, सातारा व पुणे हे जिल्हे आहेत. जिल्ह्याच्या उत्तर, ईशान्य व पूर्व भागात बालाघाटच्या डोंगररांगा आहेत. तसेच पश्र्चिम व नैर्ऋत्य या भागांत महादेवाचे डोंगर आहेत. जिल्ह्याचा इतर भाग सपाट, पठारी आहे. या जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे, तसेच थोडे विषमही आहे. काही भागांत उन्हाळ्यात कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाते.

जिल्ह्यात वायव्येकडून आग्नेयेकडे वाहणारी भीमा जिल्ह्याचे दोन भाग करते. भीमेची जिल्ह्यातील लांबी सुमारे २९० कि.मी. आहे. भीमा पंढरपूर येथे चंद्रभागा या नावाने ओळखली जाते. नीरा-भीमासंगम माळशिरस तालुक्यात, तर भीमा-सीना संगम दक्षिण सोलापूर तालुक्यात हत्तरसंग-कुडल येथे होतो. जिल्ह्यातून सीना, नीरा, भोगावती, हरणी, बोटी, माण या छोट्या-मोठ्या नद्या वाहतात.

सोलापूर-पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर माढा तालुक्यात उजनी(१२१ टी. एम. सी ) येथे भीमा नदीवर धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या पश्र्चिम व मध्य भागांत पाणीपुरवठा सुलभतेने होतो. १९८० मध्ये बांधून पूर्ण झालेल्या उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंतसागर असे म्हटले जाते. शेतीसाठी सिंचन, पिण्यासाठी पाणी, उद्योगांना पाणी, साखर कारखान्यांना पाणी, विद्युतनिर्मिती असे अनेक उद्देश साध्य करणारा हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या धरणाच्या परिसरात फ्लेमिंगो(हा स्थलांतरित पक्षी ) (रोहित) पक्षी आढळतात. भीमा-सीना जोडकालव्यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यांना लाभ होतो. भीमा-सीना बोगदा हा आशिया खंडातील सर्वांत मोठा(?) बोगदा आहे. उजनी धरणातून या बोगद्याद्वारे सीना नदीत पाणी सोडले जाते. याचबरोबर जिल्ह्यात सहा (६) मध्यम प्रकल्प आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यात एकरूखे (हिप्परगी) तलाव आहे. याचाही फायदा आसपासच्या भागांतील लोकांना होतो.

भारताचे विविध देशासोबत चालणारे युद्ध सराव

◆युद्ध अभ्यास:- भारत आणि अमेरिका

◆ मैत्री :- पाकिस्तान आणि रशिया

◆प्रबल दोस्त्यांक :- भारत आणि कझाकिस्तान

◆मलबार:- भारत , जपान आणि अमेरिका

◆सहयोग कायजीन - भारत व जपान तटरक्षक दल

◆शक्ती :- भारत आणि फ्रान्स लष्करी

◆Lamitye :-भारत आणि सेशल्स

◆इंद्र :- भारत आणि रशिया

◆गरुडशक्ती:- भारत आणि ईडोनीशीया

◆सूर्यकिरण:- भारत आणि नेपाळ

◆कोब्रा गोल्ड:- थायलंड, भारत ,जपान आणि मलेशिया

◆वरूण:- भारत आणि फ्रान्स नौदल

◆Ekuverin:- भारत आणि मालदीव

◆मित्रशक्ती - भारत आणि श्रीलंका

◆समप्रिती- भारत आणि बांगलादेश

◆सिमबेक्स- भारत आणि सिंगापूर नौदल

◆Ausindex - भारत आणि ऑस्ट्रेलिया

◆गरुडा - भारत आणि फ्रान्स वायुदल सराव.

आरोग्यविषयक सरकारच्या महत्त्वाच्या योजना

1.जीवनदायी आरोग्य योजना :-

दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबांसाठी 
१९९७-९८ पासून राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत रुग्णांना मेंदूरोग, मूत्रविकार तसेच मज्जारज्जू यांसाठी आíथक साहाय्य दिले जाते.

योजनेअंतर्गत प्रतिरुग्णास ५० हजार इतके अर्थ साहाय्य दिले जात असे.मात्र ही रक्कम आता २००६-०७ पासून एक लाख ५० हजार इतकी करण्यात आली आहे.

राज्य सरकारने सध्या अस्तित्वात असलेल्या जीवनदायी रचनेचे पुनर्रचना करून सर्वसमावेशक राजीव गांधी जीवनदायी योजना तयार केली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

2.राजीव गांधी जीवनदायी योजना :-

ही योजना महाराष्ट्र सरकारने २ जुलै २०१२ पासून सुरू केली..

राज्यातील आíथक दुर्बल घटकांना दुर्धर व गंभीर आजारावरील उपचार व शस्त्रक्रिया करणे शक्य व्हावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली.

या योजनेअंतर्गत पिवळेकार्डधारक म्हणजे दारिद्रय़्ररेषेखालील व केशरी शिधापत्रधारक जे दारिद्रय़रेषेच्या वर आहेत, मात्र ज्यांचे वार्षकि उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे, त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थीक दीड लाखांपर्यंत वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे.

या योजनेत पात्र लाभार्थीना हेल्थ कार्ड दिले जाईल.ज्यात कुटुंबप्रमुख व सदस्यांची नावे व फोटो असतील.

राज्य सरकार लाभार्थीच्या नावे विमा काढणार असून त्या विम्याचा हप्ता राज्य सरकार भरणार आहे.लाभार्थी कुटुंबाकडून कोणतीही रक्कम स्वीकारली जाणार नाही.

या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीशी करार करण्यात आला आहे.

ही योजना संपूर्णत: कॅशलेश असून रग्णाला या योजनेअंतर्गत कोणताही खर्च करावा लागणार नाही.

या योजनेअंतर्गत रग्णालयातील उपचार, निदान, आवश्यक औषधोपचार, शुश्रूषा, भोजन तसेच एक वेळचा परतीचा खर्च यांचा समावेश आहे.

या योजनेअंतर्गत रुग्णाला रुग्णालयातून मुक्त केल्यानंतर दहा दिवसांपर्यंतचा फेरतपासणीचा समावेश आहे.

या योजनेच्या पहिल्या टप्प्यात गडचिरोली, अमरावती, नांदेड, सोलापूर, धुळे, रायगड, मुंबई व मुंबई उपनगर या आठ जिल्ह्य़ांचा समावेश आहे.

राज्यातील शासकीय व खाजगी अशी जवळ जवळ १२० रग्णालये यात समाविष्ट झाली आहेत.

या योजनेत रुग्णाला रुग्णालयात भरती करताना मदत व्हावी यासाठी आरोग्यमित्र यांची नेमणूक करण्यात आली आहे. 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

3.जननी बाल ( शिशू) सुरक्षा योजना :-

राष्ट्रीय आरोग्य मोहिमेचा एक महत्त्वाचा घटक म्हणून बालसुरक्षा योजना राबविली जाते.

महाराष्ट्राची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यात याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

ही योजना ०१ जून २०११ रोजी सुरू करण्यात आली.

भारतात प्रथमच अशा एखाद्या योजनेद्वारे पुढील वैधानिक अधिकार देण्यात आले आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📗 मातांचे वैधानिक अधिकार :-

सर्व शासकीय रग्णालयांत मोफत बाळंतपण सुविधा, सिझेरिअन ऑपरेशनसहित पुरवली जाईल.

दवाखान्याच्या कालावधीतील साधारणत: बाळंतपणाच्या वेळेस तीन दिवस व सिझेरिअनच्या वेळेस सात दिवसांपर्यंतचा आहार मोफत देण्यात येईल.

सर्व प्रकारची औषधे, फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या, सर्व प्रकारच्या चाचण्या- उदा. रक्त तपासणी, मूत्र तपासणी तसेच सोनोग्राफी मोफत केली जाईल, तसेच अडचणींच्या वेळेस मोफत रक्तपुरवठय़ाची सोय केली जाईल.

आजारी नवजात बालकाचे वैधानिक अधिकार.

आजारी नवजात शिशूला- म्हणजे ३० दिवसांच्या आतील शिशूला आवश्यक ते सर्व उपचार, औषधे, आहार, तपासण्या सर्व मोफत दिल्या जातील. त्याचबरोबर मोफत वाहतूक सुविधादेखील उपलब्ध होतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे प्रमुख

- पंजाब आणि सिंध बॅंक
मुख्यालय: नवी दिल्ली
प्रमुख: एस. हरीशंकर

- बॅक ऑफ महाराष्ट्र
मुख्यालय: पुणे
प्रमुख: ए. एस. राजीव

- युको बॅंक
मुख्यालय: कोलकाता
प्रमुख: अतुल कुमार गोयल

- इंडियन ओव्हरसिज बॅंक
मुख्यालय: चेन्नई
प्रमुख: कमाम सेकर

- सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया
मुख्यालय: मुंबई
प्रमुख: पल्लव मोहापात्रा

- इंडियन बॅंक
मुख्यालय: चेन्नई
प्रमुख: पद्मजा चुनदूरू

- बॅंक ऑफ इंडिया
मुख्यालय: मुंबई
प्रमुख: दीनबंधू मोहापात्रा

- युनियन बॅंक ऑफ इंडिया
मुख्यालय: मुंबई
प्रमुख: राजकीरण राय जी.

- कॅनरा बॅंक
मुख्यालय: बेंगलोर
प्रमुख: आर. ए. शंकर नारायणन

- बॅंक ऑफ बडोदा
मुख्यालय: वडोदरा
प्रमुख: पी. एस. जयकुमार

- पंजाब नॅशनल बॅंक
मुख्यालय: नवी दिल्ली
प्रमुख: सुनिल मेहता

- स्टेट बँक ऑफ इंडिया
मुख्यालय: मुंबई
प्रमुख: रजनिश कुमार

भारत केंद्रीय अर्थसंकल्प.

🅾  तसेच संदर्भित वार्षिक वित्तीय स्टेटमेन्ट लेख 112 मध्ये भारतीय राज्यघटना ,  वार्षिक बजेट आहे भारत प्रजासत्ताक . सरकार फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी सादर करते जेणेकरून एप्रिलमध्ये नवीन आर्थिक वर्षाच्या सुरूवातीस आधी ते पूर्ण केले जाऊ शकेल. 2016 पर्यंत तो फेब्रुवारीच्या शेवटच्या काम दिवशी सादर करण्यात आला अर्थमंत्री मध्ये संसदेत . वित्त विधेयक आणि विनियोजन विधेयक सादर करून अर्थसंकल्प १ एप्रिल रोजी लागू होण्यापूर्वीच लोकसभेने मंजूर केले पाहिजे, म्हणजे भारताच्या आर्थिक वर्षाची सुरुवात .

🅾एक अंतरिम बजेट हे 'व्होट ऑन अकाउंट' सारखे नसते. 'व्हॉट ऑन अकाउंट' हा सरकारच्या बजेटच्या खर्चाच्या बाजूनेच आहे. अंतरिम बजेट हा खर्च आणि पावती या दोन्ही खात्यांचा एक संपूर्ण संच आहे. एक अंतरिम बजेट संपूर्ण बजेट प्रमाणेच संपूर्ण आर्थिक विधान देते. कायदा केंद्र सरकारला कर बदल लागू करण्यास अपात्र ठरवित नाही, सामान्यत: निवडणुकीच्या वर्षात, सलग सरकारांनी अंतरिम अर्थसंकल्पात आयकर कायद्यात कोणतेही मोठे बदल करणे टाळले आहे. 

🅾सप्टेंबर 2017 पर्यंत म्हणून , मोरारजी देसाई 10 सर्वाधिक संख्या आहे व त्यानंतर जे खर्चाचे अंदाजपत्रक सादर केले पी चिदंबरम यांनी च्या 9 आणि प्रणव मुखर्जी यांनी 'चे 8 यशवंत सिन्हा , यशवंतराव चव्हाण आणि चिंतामणराव देशमुख यांनी सादर केले आहेत प्रत्येकी 7 खर्चाचे अंदाजपत्रक मनमोहन सिंग आणि टीम कृष्णम्माचारी आहे 6 अर्थसंकल्प सादर केले.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

जाणून घ्या :- भारत सरकारच्या योजना

1. नीति आयोग - 1 जनवरी 2015

2. ह्रदय योजना -21 जनवरी 2015

3. बेटी बचाओ बेटी पढ़ाओं -22 जनवरी 2015

4. सुकन्या समृद्धि योजना -22 जनवरी 2015

5. मुद्रा बैंक योजना -8 अप्रैल 2015

6. प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना -9 मई 2015

7. अटल पेंशन योजना -9 मई 2015

8. प्रधानमंत्री जीवन ज्योति योजना -9 मई 2015

9. उस्ताद योजना (USTAD) -14 मई 2015

10. प्रधानमंत्री आवास योजना -25 जून 2015

11. अमरुत योजना(AMRUT) -25 जून 2015

12. स्मार्ट सिटी योजना -25 जून 2015

13. डिजिटल इंडिया मिशन -1 जुलाई 2015

14. स्किल इंडिया मिशन -15 जुलाई 2015

15. दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योति योजना -25 जुलाई 2015

16. नई मंजिल -8 अगस्त 2015

17. सहज योजना -30 अगस्त 2015

18. स्वावलंबन स्वास्थ्य योजना - 21 सितंबर 2015

19. मेक इन इंडिया -25 सितंबर 2015

20. इमप्रिण्ट इंडिया योजना - 5 नवंबर 2015

21. स्वर्ण मौद्रीकरण योजना -5 नवंबर 2015

22. उदय योजना (UDAY) -5 नवंबर 2015

23. वन रैंक वन पेंशन योजना -7 नवंबर 2015

24. ज्ञान योजना -30 नवंबर 2015

25. किलकारी योजना -25 दिसंबर 2015

26. नगामि गंगे, अभियान का पहला चरण आरंभ -5जनवरी 2016

27. स्टार्ट अप इंडिया -16 जनवरी 2016

28. प्रधानमंत्री फसल बीमा योजना -18 फरवरी 2016

29. सेतु भारतम परियोजना -4 मार्च 2016

30. स्टैंड अप इंडिया योजना - 5 अप्रैल 2016

31. ग्रामोदय से भारत उदय अभियान -14अप्रैल 2016

32. प्रधानमंत्री अज्वला योजना - 1 मई 2016

33. प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना - 31 मई 2016

34. राष्ट्रीय आपदा प्रबंधन योजना -1 जून 2016

35. नगामी गंगे कार्यक्रम -7 जुलाई 2016

36. गैस फॉर इंडिया -6 सितंबर 2016

37. उड़ान योजना -21 अक्टूबर 2016

38. सौर सुजला योजना -1 नवंबर 2016

39. प्रधानमंत्री युवा योजना -9 नवंबर 2016

40. भीम एप - 30 दिसंबर 2016

41. भारतनेट परियोजना फेज - 2 -19 जुलाई 2017

42. प्रधानमंत्री वय वंदना योजना -21 जुलाई 2017

43. आजीविका ग्रामीण एक्सप्रेस योजना -21 अगस्त 2017

44. प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना- सौभाग्य -25 सितंबर 2017

45. साथी अभियान -24 अक्टूबर 2017

46. दीनदयाल स्पर्श योजना- 3 नवंबर 2017

स्पर्धा परीक्षा साठी महत्त्वाचे प्रश्नसंच

1) 100 अंश सेल्सिअस तापमानाला वाफेमुळे भाजण्याची तीव्रता वाढते याचे कारण काय ?

👉 उच्च अप्रकट ऊष्मा

2)रमण परिणाम कशाशी संबंधित आहे ?

👉 फोटॉन

3)हालचाल वाहतूक पोलीस वाहनाचा वेग तात्काळ मोजण्यासाठी जी उपकरण वापरतात त्यातून  काय प्रक्षेपित होते ?

👉रेडिओ लहरी

4)एक टॉर म्हणजे...... मिलिमीटर चा पारा.

👉 1 मिलीमीटर

5) पृथ्वीवरील येणाऱ्या वैश्विक किरणांच्या जवळजवळ 90 टक्के...... आहेत .

👉प्रोटॉन

6)एखादे वाहन वर्तुळाकार वळण घेत असताना कुठल्या प्रकारच्या शक्तीचा अनुभव वाहनचालकाला येतो ?

👉सेंट्रीपेटल फॉर्स

7)अल्बर्ट आईन्स्टाईन यांना दिले गेलेले नोबेल पारितोषिक ......या क्षेत्रातील संशोधन आणि निर्मितीसाठी होते.

👉 फोटोईलेक्ट्रिक प्रभाव

8) प्रतिसेकंद न्यूटन मीटर चे प्रतिनिधीत्व हे .......आहे

👉वॅट

9)समुद्राच्या पाण्याचे रंग निळा असण्याचे कारण काय ?

👉पाण्यामुळे निळा रंग सर्वाधिक विखुरला जातो .

10)हेलियम च्या अणुतील दोन इलेक्ट्रॉन्स निघून गेल्यास त्याला काय म्हणता येईल ?

👉अल्फा किरण

11) चंद्रशेखर वेंकट रमण यांना रमान इफेक्ट साठी नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला ?

👉1930

11)अलीकडे शोधलेले इंटरस्टीटीयम ला ...... हे नाव दिले आहे ?

👉मानवी शरीरातील अवयव

12) कोणत्या वस्तूवर त्याचे जडत्व अवलंबून असते?

👉 वस्तुमान

13) गतीमान वस्तूचा वेग दुप्पटीने वाढला असता गतिज ऊर्जेवर काय परिणाम होईल ?

👉 चौपटीने वाढेल

14)तापमान व दाब स्थिर असताना समान आकारमानाचा वायू तील रेणूंची संख्या समान असते हे कोणत्या नियमानुसार सांगितले आहे ?

👉अंहोगँड्रॉ चा नियम

15) पदार्थाचे स्थायुरूप आतून एकदम वायुरूपात अवस्थांतर होण्याच्या क्रियेला काय म्हणतात ?

👉 संप्लवन

पोलीस भरती - सराव प्रश्नसंच विषय - अंकगणित

१) १ ते १७ या संख्याची बेरीज किती ?

अ ) १४४ ब ) १६२ क ) १७१ ड ) १५३ 


२)मोठ्यात मोठी ५ अंकी संख्या व लहानात लहान ४ अंकी संख्या यातील फरक किती ?

अ ) ९०,०००  ब ) ९८, ९९९  क) ९,००० ड ) ९०,००१ 

३)  राहुल शंभर पायऱ्या चढून एका मंदिरात जातो . वर जाताना त्याने प्रत्येक  पायरीवर  तिच्या क्रमांकाएवढी फुले ठेवल्यास त्यास किती फुले सोबत न्यावी लागतील ?

अ ) ४,५००  ब ) ५,००० क ) ५०५० ड ) ५,५००


४) १०.५ + १.०५ + १०५ = ?

अ ) ११६.५५ ब ) ३१५ क ) ११७ ड ) ११६.५


५) अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला ८ ने भागल्यास बाकी ४ उरते , १२ ने भागल्यास बाकी ८ उरते व १५ ने भागल्यावर बाकी ११ उरते ? 


अ ) ११६ ब  ) ५६  क ) १७६ ड ) २३६ 


६) खालील दिलेल्या कोणत्या अपूर्णांकाची किंमत सर्वात जास्त आहे ? 

अ ) २     ब )  ५     क ) ९      ड ) १५

     ---          ---          ---           ---

      ७           ८           १२           १८

७) एका नावेत सरासरी ३० Kg वजनाची मुले बसली आहेत . नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन ३१ Kg आहे . तर नावाड्याचे वजन किती ? 

अ ) ६१ ब ) ६२ क ) ५९ ड ) ५१


८) एका वस्तूची किंमत २५% ने कमी झाल्याने ती वस्तू आता २७० रुपयास मिळते तर त्या वस्तूची मूळ किंमत किती ?

अ ) ३६० ब ) ४८० क ) ५४० ड ) ४००


९) एकाच प्रकारचे २५ टेबल काही रकमेस विकल्यामुळे ४०% नफा झाला , तर प्रत्येक टेबलवर शेकडा नफा किती ?

अ ) २०% ब ) ४०% क ) ५/६ % ड ) सांगता येत नाही 


१०) साडेचार किलो ग्रॅम बेसनाच्या दीडशे ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील ?

अ ) २५ ब ) ३० क ) ३५ ड ) २० 


उत्तर : १- ड  २- ब ३- क ४-अ  ५- अ  ६-ड  ७-अ  ८- अ  ९- ब  १०-ब


Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...