Tuesday, 23 November 2021

विज्ञान :- आजार आणि त्याचे विषाणू


● *गोवर (मिझल)* : गोवर विषाणू


● *इन्फ्लुएंझा (फ्ल्यू)* : Influenza virus (A,B,C)


● *कावीळ* : Antaro virus (A,B,C,D,E,G)


● *पोलिओ* : पोलिओ विषाणू


● *जापनीज मेंदूज्वर* : Arbo-virus


● *रेबिज* : लासा व्हायरस


● *डेंग्यू* : Arbo-virus


● *चिकुनगुन्या* : Arbo-virus


● *अतिसार* : Rata virus


● *एड्स* : H.I.V(Human, Immuno-defi-ciency Virus)


● *देवी* : Variola Virus


● *कांजण्या* : Varicella zoaster


● *सर्दी* : सर्दीचे विषाणू


● *गालफुगी* : Paramixo virus


● *जर्मन गोवर* : Toza virus


आग्नेय आशियात वर्चस्वाचा चीनचा हेतू नाही- जिनपिंग.

🔰आग्नेय आशिय़ात वर्चस्व प्रस्थापित करण्याचा चीनचा कोणताही हेतू नाही, असे प्रतिपादन चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी सोमवारी आसियान राष्ट्रे आणि चीन यांच्या विशेष बैठकीत केले. आसियान राष्ट्रे आणि चीन यांच्यातील संबंधांना ३० वर्षे झाल्याच्या निमित्ताने ही बैठक आयोजित केली आहे. ती आभासी पद्धतीने सुरू आहे.


🔰दक्षिण चिनी समुद्रात सध्या सुरू असलेल्या संघर्षांच्या पार्श्वभूमीवर जिनपिंग म्हणाले की, आमच्या छोटय़ा शेजारी देशांना त्रास देण्याचाही आमचा हेतू नाही. असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स अर्थात आसियान राष्ट्रांच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना त्यांनी हा निर्वाळा दिला.


🔰राजनैतिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीला म्यानमारचा प्रतिनिधी उपस्थित नाही. त्या देशातील पदच्युत नेत्या आंग सान सू ची यांना भेटण्याची परवानगी आसियानच्या दूताला नाकारण्यात आली होती. त्यामुळे तेथील लष्करशहा जनरल मिंग आंग लेंग यांना या परिषदेत सहभागी करून घेण्यास नकार देण्यात आला आहे.


🔰आग्नेय आशियात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी चीनचे प्रयत्न सुरू असल्याबद्दल जगभरात चिंतेचा सूर व्यक्त होतो.  या आरोपाचे चीनने नेहमी खंडन करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषत: संपूर्ण दक्षिण चिनी समुद्रावर चीनने दावा सांगितला असून तो मलेशिया, व्हिएतनाम, ब्रूनेई आणि फिलिपाईन्स यांसारख्या आसियान देशांना मान्य नाही.

“प्रत्येक महिलेला महिन्याला १,००० रुपये देणार”, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची मोठी घोषणा.

🔰दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंजाबमध्ये मोठी घोषणा केलीय.


🔰पजाबमध्ये आम आदमी पक्षाचं सरकार स्थापन झाल्यास पंजाबमधील १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक महिलेला महिन्याला १,००० रुपये देऊ, असं अरविंद केजरीवाल यांनी जाहीर केलंय. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून आश्वासनांचं पाऊस पडताना दिसत आहे.


🔰अरविंद केजरीवाल म्हणाले, “जर २०२२ च्या विधानसभा निवडणुकीनंतर पंजाबमध्ये आपचं सरकार स्थापन झालं तर आम्ही १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक महिलेला दर महिन्याला १,००० रुपये देऊ. हे पैसे थेट महिलांच्या खात्यावर जमा होतील.


🔰एखाद्या कुटुंबात ३ महिला असतील तरीही प्रत्येक महिलेला १,००० रुपये मिळतील. कोणत्याही सरकारने महिला सबलीकरणासाठी राबवलेला हा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम असेल.”

अभिनंदन वर्धमान यांना ‘वीरचक्र’ प्रदान; पाकिस्तानचं फायटर जेट पाडणाऱ्या अधिकाऱ्याचा सन्मान.

🔰भारतीय हवाई दलातील अधिकारी अभिनंदन वर्धमान यांना संरक्षण दलामध्ये दिल्या जाणाऱ्या सर्वोच्च ‘वीरचक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. भारतीय वायुसेनेचे दिग्गज पायलट विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना नुकतीच ग्रुप कॅप्टन या पदावर बढतीही देण्यात आलीय.


🔰२०१९ साली भारताच्या हद्दीत घुसलेल्या पाकिस्तानी लाडऊ विमानांना पळवून लावताना २७ फेब्रुवारीच्या सकाळी आकाशात जो संघर्ष (डॉगफाइट) झाला त्यामध्ये वर्धमान यांनी पाकिस्तानचे अत्याधुनिक एफ १६ फायटर विमान पाडले होते. त्यांनी दाखवलेल्या या शौर्यासाठी त्यांचा ‘वीरचक्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अभिनंदन यांना सन्मानित करण्यात आलं.


🔰दशाचे रक्षण करताना उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सैन्य दलातील जवानांना परमवीर चक्र, महावीर चक्र आणि वीरचक्र ही पदके देऊन सन्मानित करण्यात येते.


🔰अभिनंदन यांनी पाकिस्तानवरुद्धच्या हवाई संघर्षादरम्यान दाखवलेल्या अतुलनीय शौर्याची दखल घेत त्यांच्या नावाची ‘वीरचक्र’साठी शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार आज म्हणजेच सोमवारी (२२ नोव्हेंबर २०२१ रोजी) राष्ट्रपती भवनामध्ये पार पडलेल्या समारंभामध्ये झाला सन्मान पुलवामात दहशतवाद्यांनी लष्काराच्या ताफ्यावर भयंकर हल्ला केला होता.

विनोद तावडे यांची भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्ती

🔰महाराष्ट्रातील भाजपाचे नेते विनोद तावडे यांना आता पक्षाकडून राष्ट्रीय स्तरावरील महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. विनोद तावडे यांची भाजपाकडून राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्यानंतर या पदावर नियुक्त होणारे विनोद तावडे हे महाराष्ट्रातील दुसरे नेते ठरले आहेत. तर, या अगोदर केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी भाजपा अध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळलेली आहे.


🔰दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या सक्रीय राजकारणातून काहीसे बाहेर पडल्यानतंर, आता विनोद तावडे यांना राष्ट्रीय स्तरावर कार्यकारिणीत महत्वपूर्ण स्थान मिळालेलं आहे. विनोद तावडे हे महाराष्ट्रातील जुने व संघाच्या मुशीत तयार झालेले भाजपाचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात.


🔰२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ज्या दिग्गज नेत्यांचे तिकीट भाजपाने कापलं होतं. त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे व विनोद तावडे यांचा समावेश होता. मात्र आता भाजपाकडून या दोन्ही नेत्यांचे पुर्नवसन केलं जात असल्याचं दिसत आहे. कारण, कालच बावनकुळे यांना विधानपरिषदचे तिकीट देण्यात आलं. त्यानंतर आज विनोद तावडे यांची राष्ट्रीय सस्तरावरील कार्यकारिणीत महत्वाच्या पदावर नियुक्ती केली गेली आहे.

प्रदूषणामुळे दिल्लीतील शाळा बंद

🔰दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता येथील शाळा प्रत्यक्ष उपस्थितीसाठी पुढील आदेशापर्यंत बंद राहतील; तर ऑनलाइन वर्ग आणि बोर्डाच्या परीक्षा सुरू राहतील, असे शिक्षण संचालनालयाने रविवारी जाहीर केले.


🔰हवेचा दर्जा रविवारी सकाळी ‘अतिशय वाईट’ होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सकाळी ९ वाजता हवेच्या दर्जाचा निर्देशांक (एअर क्वालिटी इंडेक्स- एक्यूआय) ३८२ इतका होता. शनिवारी २४ तासांतील सरासरी एक्यूआय ३७३ इतका होता.


🔰‘राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (एनसीआर) आणि आसपासच्या भागांच्या हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगाच्या पुढील आदेशांपर्यंत सर्व शाळा तत्काळ प्रभावाने बंद करण्याचे निर्देश पर्यावरण खात्याने दिले आहेत. त्यामुळे सर्व सरकारी व खासगी शाळा पुढील आदेशांपर्यंत बंद राहतील’, असे शिक्षण विभागाच्या अतिरिक्त संचालक रिता शर्मा यांनी सांगितले.


🔰तथापि, ऑनलाइन अध्यापन वर्ग आणि बोर्डाच्या परीक्षा यापूर्वी जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार घेतल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीतील हवेच्या ढासळत्या गुणवत्तेच्या पार्श्वभूमीवर शाळा व इतर शैक्षणिक संस्था बंद करण्याची घोषणा दिल्ली सरकारने १३ नोव्हेंबरला केली होती. करोना महासाथीमुळे सुमारे १९ महिने बंद राहिल्यानंतर येथील शाळा १ नोव्हेंबरपासून उघडल्या होत्या.

युगांडा पॅरा-बॅडिमटन स्पर्धा - सुकांतला सुवर्ण

 🔰पीटीआय, कॅम्पाला भारताच्या सुकांत कदमने युगांडा आंतरराष्ट्रीय पॅरा-बॅडिमटन स्पर्धेत रविवारी सुवर्णपदक पटकावले, तर प्रमोद भगतने तीन रौप्य पदकांची कमाई केली.


🔰परुष एकेरीत जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या कदमने भारताच्या नीलेश गायकवाडचा ३८ मिनिटांत २१-१६, १७-२१, २१-१० असा पराभव केला. क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या भगतला मात्र अंतिम सामन्यांत झगडावे लागले.


🔰परुष एकेरीत भगतला सहकारी मनोज सरकारकडून १९-२१, १६-२१ असा पराभव पत्करावा लागला. मग पुरुष दुहेरीत भगत आणि सरकार जोडीने मोहम्मद अन्सारी आणि दीप बिसोयी जोडीकडून २१-१०, २०-२२, १५-२१ अशी हार पत्करली. त्यानंतर मिश्र दुहेरीत भगत आणि पलक जोशी जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ऋतिक रघुपती आणि मानसी जोशी जोडीने त्यांना २१-१९, २१-१६ असे नामोहरम केले.

तालिबानचे आता नविन फर्मान; महिला अभिनेत्रींसोबतच्या टीव्ही मालिका बंद करण्याच्या सूचना



🔰अफगाणिस्तानच्या तालिबान प्रशासनाने रविवारी नवीन ‘इस्लामिक मार्गदर्शक तत्त्वे’ जारी केली आहेत. त्यानुसार महिला अभिनेत्रींना देशातील टेलिव्हिजन वाहिन्यांवरील मालिकांमध्ये किंवा डेली सोपमध्ये अभिनय करता येणार नाही. तसेच अफगाणिस्तानच्या प्रसारमाध्यमांना दिलेल्या निर्देशात महिला टीव्ही पत्रकार त्यांचे वृत्तांकन करताना हिजाब परिधान करतील, असे म्हटले आहे. त्यामुळे आता तालिबानने नवे महिलांसाठी पुन्हा नविन नियम लागू केले आहेत.


🔰हा आदेश अफगाणिस्तान मंत्रालयाने सद्गुणांच्या प्रचारासाठी आणि दुर्गुणांच्या प्रतिबंधासाठी जारी केला आहे, असे तालिबानचे म्हणणे आहे. मंत्रालयाने टीव्ही चॅनेल्सना प्रेषित मुहम्मद किंवा इतर आदरणीय व्यक्ती दाखवणारे चित्रपट किंवा कार्यक्रम दाखवण्यासही मनाई केली आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते हकीफ मोहाजिर यांनी एएफपी वृत्तसंस्थेला सांगितले की, “हे नियम नसून धार्मिक मार्गदर्शक तत्त्वे आहेत. नवीन मार्गदर्शक तत्त्वे रविवारी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली.


🔰तालिबान सातत्याने दावा करत आहे की आपल्या नवीन राजवटीत महिलांनाही स्थान मिळेल, पण असे असूनही, महिलांवर अनेक निर्बंध जाहीर केले गेले आहेत. याशिवाय वृत्तपत्र स्वातंत्र्यासाठी आंदोलन करणाऱ्या अनेक अफगाण महिला पत्रकारांवर हल्ले आणि शोषण झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

UAE च्या राजकन्येनं ‘दहशतवादी’ म्हणत टीका केल्यानंतर पत्रकार सुधीर चौधरींना वक्त्यांच्या यादीतून वगळलं

🔰संयुक्त अरब अमिरातीमधील एका कार्यक्रमामधून भारतीय पत्रकार सुधीर चौधीर यांना वगळण्यात आलं आहे. देशाच्या राजकुमारी असणाऱ्या हेंड बिंत फैसल अल कासिम यांनी रविवारी सोशल नेटवर्किंगवरुन यासंदर्भातील माहिती दिली आहे.


🔰राजकुमारी यांनी स्वत: शनिवारी सुधीर चौधरी यांना संयुक्त अरब अमिरातीमधील कार्यक्रमासाठी वक्ता म्हणून बोलवण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतलेला. सुधीर चौधरी हे वादग्रस्त व्यक्तीमत्व असून ते असहिष्णु दहशतवादी आहेत, अशा शब्दांमध्ये राजकुमारीने टीका केलेली.


🔰राजकुमारी यांनी ट्विटरवरुन सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, “सुधीर चौधरी यांना आबू-धाबी चार्टर्ड अकाऊंट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातील वक्ता म्हणून वगळण्यात आलं आहे.”


🔰राजकुमारींनी आपल्या ट्विटमध्ये एक पत्रही लिहिलं असून ते आयसीएआयच्या आबू-धाबीमधील शाखेच्या सदस्यांनी लिहिलं आहे. या पत्रामध्ये चौधरी यांना वक्ता म्हणून बोलवण्यावर आक्षेप घेण्यात आलाय. चौधरी हे प्रसिद्धी टीव्ही अँकर असले तरी त्यांच्याविरोधात खंडणी मागण्यापासून ते अनेक प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचा उल्लेख पत्रात आहे.

पहिला भारत-किर्गिझस्तान धोरणात्मक संवाद.

🔰26 ऑक्टोबर 2021 रोजी नवी दिल्ली येथे भारत आणि किर्गिझस्तान या देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयांमधील त्यांचा पहिला धोरणात्मक संवाद आयोजित करण्यात आला होता.


🔰या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी केले तर किर्गिझस्तानचे नेतृत्व देशाच्या सुरक्षा परिषदेचे सचिव लेफ्टनंट जनरल मारात इमानकुलोव्ह यांनी केले.


🔰दोनही पक्षांनी देशांसमोरील धोके आणि आव्हाने आणि प्रादेशिक सुरक्षा वातावरण, विशेषतः अफगाणिस्तान देशांमधील परिस्थिती याविषयी चर्चा केली.


🔴किर्गिझस्तान देश..


🔰किर्गिझस्तान (किर्गिझ प्रजासत्ताक) हा मध्य आशियातील एक भूपरिवेष्टित देश आहे. किर्गिझस्तानच्या उत्तरेला कझाकिस्तान, दक्षिणेला ताजिकिस्तान, पश्चिमेला उझबेकिस्तान आणि पूर्वेला चीन आहे. इ.स. 1191 सालापर्यंत किर्गिझस्तान हे सोव्हियत संघाचे एक प्रजासत्ताक होते. बिश्केक हे देशाचे राजधानी शहर आहे. ‘सोम’ हे देशाचे राष्ट्रीय चलन आहे.

भारताची ‘मिसाईल पॉवर’

एकात्मिक मार्गदर्शीत क्षेपणास्त्र विकास (इंटिग्रेटेड गाईडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम -आयजीएमडीपी) हा भारतीय लष्काराचा प्रकल्प आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (डीआरडीओ) या कार्यक्रमाचे व्यवस्थापन करते. बॅलेस्टिक मिसाईलमधील संशोधनास भारताने 1960 च्या दशकात प्रारंभ केला. 


▪️पथ्वी-1


सरकारच्या आयजीएमडीपी कार्यक्रमांतर्गत विकसित करण्यात आलेले पृथ्वी-1 हे भारताचे पहिले क्षेपणास्त्र होय. फेब्रुवारी 1988 साली सादर करण्यात आलेल्या या क्षेत्रपणास्त्राची क्षमता 150 कि.मी. इतकी होती. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे हे क्षेपणास्त्र 1994 साली लष्करात दाखल झाले.


▪️अग्नि-1


अणवस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेले हे बॅलेस्टिक क्षेपणास्त्र. अग्नि मालिकेतील पहिले क्षेपणास्त्र 1983 मध्ये डीआरडीओने सादर केले. याची मारक क्षमता 700 कि.मी. इतकी होती.


▪️आकाश


जमिनीवर आकाशात मारा करणार्‍या आकाशची क्षमता 30 कि.मी. इतकी असून एकाच वेळी अनेक लक्ष्यही भेदता येते. भारतीय लष्कर आणि हवाई दलासाठी याचा वापर केला जातो. 1997 साली याची पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली. हे क्षेपणास्त्र पूर्णपणे रडारद्धारा संचालित केले जाते.


▪️नाग


रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची तिसरी पिढी म्हणजे ‘नाग’ होय. याची क्षमता 3 ते 7 कि.मी. इतकी आहे. रात्रीदेखील अचूक लक्ष्य भेदण्याची क्षमता या ‘नाग’मध्ये आहे. ‘नाग’चा उपयोग हेलिकॉप्टरमध्येही केला जातो. 


▪️तरिशूल


जमिनीवरून आकाशात मारा करणारे ‘त्रिशूल’ एअरक्राप्ट जामरला उद्ध्वस्त करण्याचे काम करते. याची क्षमता 9 कि.मी. असून लढाऊ जहाजावर होणारे हल्ले रोखण्यासाठीही याचा उपयोग होतो.


▪️अग्नि 2


एप्रिल 1999 साली अग्नि-2 ची पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली. जमिनीवरून जमिनीवर मारा करणार्‍या ‘अग्नि’ ची क्षमता 2000 ते 2500 कि.मी. इतकी आहे. पारंपरिक आणि आधुनिक शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता यात आहे.


▪️पथ्वी 3


नौसेनेसाठी तयार करण्यात आलेले हे क्षेपणास्त्र 350 कि.मी.पर्यंत मारा करू शकते. याची चाचणी 2000 साली घेण्यात आली होती.


▪️बराह्मोस


भारत आणि रशियाद्धारे विकसित करण्यात आलेले हे आतापर्यंतचे सर्वात आधुनिक क्षेपणास्त्र आहे. ब्राह्मोसने भारताला क्षेपणास्त्र तंत्राज्ञाता अग्रेसर देश म्हणून ओळख मिळवून दिली. या सुपरसोनिक क्षेपणास्त्रात गती आणि अचूकतेचा जबरदस्त संगम आहे. भारताची ब्रह्मपुत्रा नदी आणि रशियाची मस्कवा यांच्या नावावरून ‘ब्राह्मोस’ हे नाव त्याला देण्यात आले आहे. 300 कि.मी.पर्यंतचे लक्ष्य भेदण्याची क्षमता ब्राह्मोसमध्ये आहे.


▪️सागरिका


समुद्रातून लाँच करता येणारे पहिले बॅलेस्टिक क्षेपणास्त्र असून 750 कि.मी. पर्यंत लक्ष्य भेदता येते. 2008 साली याची पहिली चाचणी घेण्यात आली. अरिहंत या पाणबुडीसाठी हे खास तयार करण्यात आले.


▪️धनुष


पृथ्वी-2 या क्षेपणास्त्राचे हे छोटे रूप. समुद्रातील मार्‍यासाठी हे खास तयार करण्यात आले. मार्च 2011 साली लढाऊ जहाजांवरून याची यशस्वी चाचणी घेण्यात आली.


▪️अग्नि-3


अग्नि-2 ची ही सुधारित आवृत्ती असून मारक क्षमता 3500 ते 5000 कि.मी. इतकी मोठी आहे. शेजारील देशांमध्ये आतपर्यंत मारा अग्नि-3 करू शकते. 2011 साली लष्करात हे दाखल झाले.


▪️अग्नि-4


पहिल्या दोन अग्निची आणखी सुधारित आवृत्ती. पहिल्या दोन्ही क्षेपणास्त्रांपेक्षा वजनाने हलके, पण वाहक आणि मारक क्षमता जास्त.


▪️अग्नि-5


भारताचे पहिले आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र. 5000 कि. मी. पर्यंत क्षमता.


▪️निर्भया


जमीन, समुद्र आणि आकाश अशा तिन्ही ठिकाणहून हे क्षेपणास्त्र सोडता येते. ब्राह्मोसला सहाय्य म्हणूनही या क्षेपणास्त्राची ओळख आहे.


▪️परहार


जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे 150 कि.मी. क्षमता असलेल्या ‘प्रहार’ची 2011 साली पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली. रोड मोबाईल लाँचरच्या मदतीने याचा मारा करता येतो. लष्कराला युद्धाच्या वेळी ‘प्रहार’चा चांगला उपयोग होतो.

रेझांग ला येथील युद्ध स्मारकाचे नूतनीकरण

🔰संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी पूर्व लडाखच्या रेझांग ला येथे नूतनीकरण केलेल्या युद्ध स्मारकाचे उद्घाटन केले. याच ठिकाणी १९६२ मध्ये भारतीय जवानांनी चिनी सैन्याशी शौर्याने मुकाबला केला होता.  


🔰ह युद्ध स्मारक १३ कुमाऊँ  रेजिमेंटच्या शूर भारतीय सैनिकांना समर्पित आहे, ज्यांनी रेझांग लाच्या युद्धात चीनचा पराभव करताना आपल्या प्राणांची आहुती दिली.


🔰  ह स्मारक म्हणजे भारतीय सैन्याने दाखविलेल्या दृढनिश्चयाचे आणि अतीव धैर्याचे उदाहरण आहे, अशा शब्दांत सिंह यांनी स्मारकाचे वर्णन केले. ‘केवळ इतिहासाच्या पानांमध्ये अमर नाही, तर आपल्या हृदयातही कयम अमर राहील,’ असेही संरक्षणमंत्री म्हणाले.


🔰‘१८ हजार फूट उंचीवर लढलेल्या रेझांग लाच्या ऐतिहासिक युद्धाची आजही कल्पना करणे कठीण आहे. जगातील दहा सर्वात मोठय़ा आणि अतिशय आव्हानात्मक लष्करी संघर्षांपैकी एक रेझांग लाची लढाई मानली जाते. मेजर शैतान सिंग


🔰आणि त्यांचे सहकारी सैनिक ‘शेवटची गोळी आणि शेवटच्या श्वासापर्यंत’ लढले आणि शौर्य आणि बलिदानाचा नवा अध्याय लिहिला’, असे गौरवोद्गार सिंह यांनी काढले.

आता भारतातही करोना लसीचा तिसरा डोस दिला जाणार?; पुढील आठवड्यात तज्ज्ञांच्या समितीची बैठक

🔰करोना लसीचे बूस्टर शॉट्स देण्याची प्रक्रिया अनेक देशांमध्ये सुरू झाली आहे तर अजूनही अनेक देशांमध्ये यावर विचार केला जात आहे. आता भारतातही दोन डोसनंतर तिसरा डोस देण्यात येण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पुढील आठवड्यात बैठक होणार असून त्यात हा निर्णय घेतला जाणार आहे. भारतातील करोना लसीच्या तिसऱ्या डोसबाबत प्रशासन धोरण ठरवू शकते. भारतात, ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे अशा लोकांना अतिरिक्त शॉट म्हणून करोनाचा तिसरा डोस देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.


🔰यासंदर्भात एका अधिकाऱ्याने सीएनएन-न्यूज१८ ला दिलेल्या माहितीमध्ये देशातील लसीच्या तिसऱ्या डोसवर धोरणात्मक दस्तऐवज तयार करण्यासाठी तज्ञ गट काम करत आहे. तिसऱ्या लसीच्या डोसची सुरुवातीला बूस्टर डोसऐवजी अतिरिक्त डोस म्हणून शिफारस केली जाईल.


🔰नयूज१८ नुसार, ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत झाली आहे अशा लोकांना अतिरिक्त डोस दिले जातात, तर निरोगी लोकांना दुसरा डोस घेतल्यानंतर काही महिन्यांनंतर बूस्टर शॉट दिला जातो. कोणत्याही रोगामुळे कमी प्रतिकारशक्ती असलेले लोक सामान्य दोन-डोस कार्यक्रमाद्वारे पूर्णपणे संरक्षित नाहीत. त्यामुळे अशा लोकांना अतिरिक्त डोस देण्याची तयारी सुरू आहे. ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कर्करोगासारख्या रोगामुळे खराब झाली आहे ते दोन डोसच्या लसीकरणातून संरक्षित नाहीत. अशावेळी तिसरा डोस देणे महत्त्वाचे असते.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचा ‘लाल सलाम’; पहिल्या पुस्तकाची केली घोषणा

🔰केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी दंतेवाडामध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यावर पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. स्मृती इराणी यांनी या पुस्तकाला ‘लाल सलाम’ असे नाव दिले आहे. स्मृती इराणी यांनी ट्विटरवर या पुस्तकाची घोषणा केली आहे. तसचे हे पुस्तक अॅमेझॉनवरून प्री-ऑर्डर केले जाऊ शकते, असं त्यांनी ट्विटमध्ये सांगितलंय. स्मृती इराणी यांचे हे पुस्तक वेस्टलँड या प्रकाशन संस्थेने आणले आहे.


🔰समृती इराणी यांचे हे पुस्तक एप्रिल २०१० मध्ये दंतेवाडा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यापासून प्रेरित आहे. या हल्ल्यात ७६ जवान शहीद झाले होते. स्मृती इराणी म्हणाल्या की, “ही गोष्ट त्यांच्या मनात अनेक वर्षांपासून सुरू होती. मग मी ही कथा कागदावर उतरवण्याच्या इच्छेकडे दुर्लक्ष न करता लिहायला घेतली. मला आशा आहे की हे पुस्तक वाचणारे लोक पुस्तकाचा आनंद घेतील.”


🔰लाल सलाम हे पुस्तक विक्रम प्रताप सिंग नावाच्या तरुण अधिकाऱ्याच्या जीवनावर आहे. त्यात विक्रम प्रताप सिंग यांना राजकारण आणि भ्रष्टाचाराने ग्रासलेल्या व्यवस्थेचा कसा सामना करावा लागतो हे सांगितले आहे. प्रकाशनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात या पुस्तकाची माहिती देताना, नक्षलवादी आणि माओवादी बंडखोर भागात आव्हानांचा सामना करणाऱ्या अधिकाऱ्यांना या पुस्तकाच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली आहे. हे पुस्तक २९ नोव्हेंबरपासून वाचकांना उपलब्ध होणार आहे.

एसटीचे खासगीकरण - चाचपणीसाठी महामंडळाकडून खासगी संस्थेची नियुक्ती



🔰संपाचा तिढा कायम आता असताना एसटीचा खासगीकरणाकडे प्रवास सुरू असल्याचे संकेत आहेत. गेल्या काही वर्षांपासून तोटय़ात गेलेली एसटी नफ्यात आणण्यासाठी एसटीच्या खासगीकरणाचा पर्याय पुढे आला असून, याबाबत अभ्यास करण्यासाठी ‘केपीएमजी’ या खासगी संस्थेची सल्लागार म्हणून निवड करण्यात आली आहे. परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब आणि एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या गुरुवारच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


🔰करोनाची साथ आणि निर्बंधांमुळे गेल्या वर्षांपासून प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवली. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर देणेही मंडळासाठी अवघड बनले. सणासुदीच्या काळात तरी उत्पन्न मिळेल, या आशेवर महामंडळ असतानाच ऐन दिवाळीत विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला. त्यामुळे महामंडळाला प्रवासी उत्पन्नावर पाणी सोडावे लागले.


🔰गल्या चार वर्षांत घटलेली प्रवासी संख्या, करोनाच्या साथीचा फटका, संप आदींमुळे एसटीचे आर्थिक चाक आणखी खोलात रुतले. एसटीचे वार्षिक प्रवासी उत्पन्न सात ते आठ हजार कोटी रुपयांपर्यंत आहे. मात्र, त्या तुलनेने खर्च अधिक असल्यामुळे एसटीची आर्थिक स्थिती खालावत गेलीे. या पार्श्वभूमीवर एसटीला तोटय़ातून नफ्यात आणण्यासाठी महामंडळ पर्याय शोधू लागले असून, आता खासगीकरणाचा विचार करण्यात येत आहे.

गांधी-बोस स्वातंत्र्य लढय़ातील महान नायक ; नेताजींच्या कन्या अनिता बोस यांच्याकडून कंगनाला कानपिचक्या



🔰अभिनेत्री कंगना राणावत हिने महात्मा गांधी आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्यावर टिप्पणी करून नवा वाद निर्माण केला आहे. स्वातंत्र्य लढय़ातील नेत्यांबद्दल अनादर दाखवणाऱ्या बेताल विधानांवर नेताजी बोस यांच्या कन्या अनिता बोस यांनी कंगनाला कानपिचक्या दिल्या.


🔰‘महात्मा गांधी आणि माझे वडील नेताजी बोस हे दोघेही देशाच्या स्वातंत्र्य लढय़ातील महान नायक होते’, असे मत अनिता बोस यांनी व्यक्त केले.कंगना राणावत हिने वृत्तपत्राच्या कात्रणाचा आधार घेत दावा केला की, नेताजी देशात परतले असते तर त्यांना ब्रिटिशांच्या ताब्यात देण्याची तयारी महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि महमद अली जिन्ना यांनी एका ब्रिटिश न्यायाधीशाकडे दाखवली होती.. भगत सिंह यांना फाशी दिली पाहिजे असेही गांधीजींचे मत होते व त्यासंबंधी पुरावेही उपलब्ध असल्याचा दावा कंगनाने केला आहे. गांधीजी व नेताजी यांच्यावरील या दाव्यांना अनिता बोस यांनी कोणताही दुजोरा दिला नाही.


🔰महात्मा गांधी आणि सुभाषचंद्र बोस यांचे नाते गुंतागुंतीचे होते. नेताजींचे व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावी असल्यामुळे नेताजींना आपल्या नियंत्रणात ठेवता येणार नाही, असे गांधीजींना वाटत होते. पण, हे लक्षात घेतले पाहिजे की, माझे वडील नेहमीच गांधीजींचे प्रशंसक राहिले.


🔰तयांनी गांधीजींचा आदर केला. स्वातंत्र्य लढय़ासाठी आपण करत असलेल्या कामाबद्दल गांधींजी काय म्हणत आहेत, हे नेताजी नेहमी जाणून घेण्यास उत्सुक असत. गांधीजी आणि नेताजी यांचे उद्दिष्ट एकच होते पण, त्यांचे मार्ग वेगवेगळे होते. त्यांच्यातील या मतभेदात पंडित नेहरूंना कोणाची बाजू घ्यायची नव्हती. पण, नंतर नेहरू गांधीवादी समर्थकांमध्ये सामील झाले, असे अनित बोस यांनी ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

चंद्राभोवती फिरणाऱ्या चांद्रयान २ ची टक्कर टळली


🔰इस्त्रोचे चांद्रयान २ हा उपग्रह ऑगस्ट २०१९ पासून सुमारे १०० किलोमीटर उंचीवरुन चंद्राभोवती प्रदक्षिणा घालत आहे. चांद्रयान २ वर असलेल्या विविध उपकरणांच्या माध्यमातून चंद्राबद्दलची विविध माहिती ही गोळा केली जात आहे. तर नासाचा Lunar Reconnaissance Orbiter (LRO) हा उपग्रह जून २००९ पासून चंद्राभोवती २० किलोमीटर ते १८०० किलोमीटर अशा लंब वर्तुळाकार कक्षेत फिरत चंद्राचा अभ्यास करत आहे. हे दोन्ही उपग्रह चंद्राच्या उत्तर ध्रुवावरुन जात असतात. मात्र या दोन्ही उपग्रहांची टक्कर होणार होती.


🔰चद्राभोवती फिरणाऱ्या नासाच्या आणि इस्त्रोच्या या उपग्रहांची टक्कर ही २० ऑक्टोबरला भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ११ वाजुन १५ मिनीटांनी होणार होती. यावेळी या दोन्ही उपग्रहांच्या कक्षेमध्ये १०० मीटरपेक्षा कमी अंतर असणार होते. या उपग्रहांचा आकार आणि सोलर पॅनेलचा विस्तार बघता ही टक्कर अटळ होती.


🔰अर्थात नासा आणि इस्त्रो या अवकाश संस्थांना हा संभाव्य धोका काही दिवस आधीच लक्षात आला. दोन्ही संस्थांनी चर्चा केल्यावर इस्त्रोने चांद्रयान २ ची कक्षा बदलण्याचा निर्णय घेतला. तेव्हा १८ ऑक्टोबरला म्हणजे संभाव्य टक्कर होण्याच्या दोन दिवस आधीच इस्त्रोने चांद्रयान २ च्या कक्षेत बदल केला आणि चंद्राच्या भोवती उपग्रहांची होणारी टक्कर ही टाळण्यात आली.


🔰पथ्वीभोवती काही हजार उपग्रह हे फिरत आहेत. तेव्हा उपग्रहांवर सातत्याने नजर ठेवावीच लागते. अनेकदा दोन उपग्रहांमध्ये टक्कर होऊ नयेत म्हणून उपग्रहांच्या कक्षेत बदल केला जातो. मात्र पहिल्यांदाच अशा प्रकारे उपग्रहाच्या कक्षेत तेही चंद्राभोवती फिरणाऱ्या उपग्रहाबाबत बदल करण्याची वेळ इस्त्रोवर आली.

GENERAL KNOWLEDGE

महाराष्ट्रातील कांही वैशिष्टय़े असलेल्या जिल्ह्यांची नावे

🔶भारताचे प्रवेशद्वार
मुंबई

🔶भारताची आर्थिक राजधानी
मुंबई

🔶महाराष्ट्रातील घनदाट लोकवस्तीचा जिल्हा
मुंबई शहर

🔶महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार
रायगड

🔶महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा
रायगड

🔶मुंबईची परसबाग
नाशिक

🔶महाराष्ट्रातील देशभक्त व समाजसेवकांचा जिल्हा
रत्नागिरी

🔶मुंबईचा गवळीवाडा
नाशिक

🔶द्राक्षांचा जिल्हा
नाशिक

🔶आदिवासींचा जिल्हा
नंदूरबार

🔶महाराष्ट्रातील कापसाचे शेत
जळगाव

🔶महाराष्ट्रातील कापसाचा जिल्हा
यवतमाळ

🔶संत्र्याचा जिल्हा
नागपूर

🔶महाराष्ट्रातील कापसाची बाजारपेठ
अमरावती

🔶जंगलांचा जिल्हा
गडचिरोली

🔶महाराष्ट्रातील केळीच्या बागा
जळगाव

🔶साखर कारखान्यांचा जिल्हा
अहमदनगर

🔶महाराष्ट्रातील ज्वारीचे कोठार
सोलापूर

🔶महाराष्ट्रातील गुळाचा जिल्हा
कोल्हापूर

🔶कुस्तीगिरांचा जिल्हा
कोल्हापूर

🔶लेण्यांचा जिल्हा
औरंगाबाद

🔶महाराष्ट्रातील बावन्न दरवाजांचे शहर
औरंगाबाद

🔶महाराष्ट्रातील जुन्या मराठी कवींचा जिल्हा
बीड

🔶महाराष्ट्रातील भवानी मातेचा जिल्हा
उस्मानाबाद

🔶महाराष्ट्रातील संस्कृत कवींचा जिल्हा
नांदेड

🔶देवी रुक्मिणी व दमयंतीचा जिल्हा
अमरावती.

--------------------------------------