Monday, 22 November 2021

भारत-चीन संबंधांत सध्या सर्वाधिक कटूता - परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची कबुली



भारत आणि चीन यांच्या संबंधांचा सध्या सर्वात कटुकाळ आहे. चीनने करारांचे उल्लंघन करणाऱ्या काही कृती केल्या आहेत, ज्यासाठी त्याच्याकडे कुठलेही विश्वासार्ह स्पष्टीकरण नाही. आपल्याला द्विपक्षीय संबंध कुठे न्यायचे आहेत याचे उत्तर आता चिनी नेतृत्वालाच द्यायचे आहे, असे परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी सांगितले.


शांतता राखण्यासाठी पूर्व लडाखमधील सैन्यमाघारीच्या प्रक्रियेची प्रगती आवश्यक असून, सर्वंकष द्विपक्षीय संबंधांच्या विकासाचा तो आधार आहे, असे भारताने चीनला सांगितले आहे.


पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवरील उर्वरित मुद्द्यांवर लवकर तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी द्विपक्षीय करारांचे पूर्णपणे पालन करून काम करायला हवे, यावर जयशंकर यांनी १६ सप्टेंबरला ताजिकिस्तानची राजधानी दुशान्बेमध्ये आपले चिनी समपदस्थ वांग यी यांच्यासोबत झालेल्या यापूर्वीच्या बैठकीत भर दिला होता.


‘आपले संबंध नक्की कसे आहेत आणि त्यात काय योग्य घडलेले नाही याबद्दल चीनला काही शंका असेल असे मला वाटत नाही. माझे समपदस्थ वांग यी यांना मी अनेकदा भेटलो आहे. तुम्ही अनुभव घेतलाच असेल, की मी पुरेसा स्पष्ट बोलतो आणि त्यात काही संदिग्धता नसते.


त्यामुळे त्यांना ऐकायची इच्छा असेल तर त्यांनी ते ऐकले असेल याची मला खात्री आहे,’ असे ‘ग्रेटर पॉवर कॉम्पिटिशन : दि इमर्जिंग वर्ल्ड ऑर्डर’ या विषयावर सिंगापूरमधील ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमिक फोरम येथे आयोजित करण्यात आलेल्या गटचर्चेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाच्या उत्तरात जयशंकर यांनी सांगितले.

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे



21) भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे?

उत्तर : जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड


22) जिम कार्बेटचे जुने नाव काय होते?

उत्तर : हेली नॅशनल पार्क


23) भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कोठे आहेत?

उत्तर : मध्यप्रदेश


24) भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?

उत्तर : हिमिस (3568 किलोमीटर, जम्मू आणि काश्मीर)


25) मेळघाट अभयारण्य ची स्थापना केव्हा झाली होती?

उत्तर : 1973


26) नागार्जुन सागर या वाघ अभयारण्याची स्थापना केव्हा झाली होती?

उत्तर : 1982


27) राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे पहिले विजेते कोण आहेत?

उत्तर : विश्वनाथन आनंद


28) राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार याची पहिली महिला विजेती कोण आहे?

उत्तर : कर्णम मल्लेश्वरी


29) राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे स्वरूप काय आहे?

उत्तर : 25 लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र


30) हरितक्रांती कशासाठी करण्यात आली होती?

उत्तर : अन्नधान्य उत्पादनात वाढ करण्यासाठी.


31) टीझर गनचा (Tasar Gun) वापर करणारे पहिले पोलीस राज्य कोणते?

उत्तर : गुजरात


32) वाचन यादीमध्ये (Reading List) व्हिडिओ गेम जोडणारा पहिला देश कोणता?

उत्तर : पोलंड


33) अरब देशातील पहिली अणुभट्टी कोणती?

उत्तर : संयुक्त अरब अमिरात


34) भारतातील पहिले ड्रॅगन हे रक्ताळणारे झाड (blood-oozing tree) कोणते?

उत्तर : आसाम


35) तीन राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते?

उत्तर : आंध्रप्रदेश


36) रेल्वेने थेट ओव्हरहेड लाइन उर्जा देण्यासाठी जगातील पहिला सौर उर्जा प्रकल्प तयार करणारा प्रकल्प कोणता?

उत्तर : भारत


37) वनविभागाचा पहिले लायकेन पार्क कोणते?

उत्तर : उत्तराखंड


38) मंगळ मोहीम आखणारा पहिला अरब देश कोणता?

उत्तर : संयुक्त अरब अमिराती


39) जगातील पहिले गोल्ड प्लेटेड (सोन्याचा मुलामा) हॉटेल कोणते?

उत्तर :- हनोई, व्हिएतनाम


40) आशियातील पहिले अखंड गॅल्वनाइज्ड रेबर उत्पादन सुविधा कोठे आहे?

उत्तर : गोविंदगड, भुतान

Daily Question


कोणत्या दिवशी “जागतिक विकास माहिती दिवस” साजरा करतात?


(A) 22 ऑक्टोबर

(B) 23 ऑक्टोबर

(C) 24 ऑक्टोबर ✅✅

(D) 25 ऑक्टोबर


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणत्या संस्थेने “गरुड” अॅप तयार केले?


(A) राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग

(B) राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग

(C) संघ लोकसेवा आयोग

(D) भारतीय निवडणूक आयोग ✅✅


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणती व्यक्ती "द ऑरिजिन स्टोरी ऑफ इंडियाज स्टेट्स" हे शीर्षक असलेल्या पुस्तकाचे लेखक आहे?


(A) झुम्पा लाहिरी

(B) वेंकटराघवन सुभा श्रीनिवासन ✅✅

(C) चेतन भगत

(D) यापैकी नाही


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणत्या दिवशी “आंतरराष्ट्रीय मुत्सद्दी दिवस” साजरा करतात?


(A) 24 ऑक्टोबर ✅✅

(B) 23 ऑक्टोबर

(C) 22 ऑक्टोबर

(D) 21 ऑक्टोबर


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


गुजरातच्या कोणत्या जिल्ह्यात 'बन्नी' नावाच्या म्हैस-जातीच्या भारतातील पहिल्या IVF रेडकूचा जन्म झाला?


(A) जुनागड

(B) जामनगर

(C) गीर सोमनाथ ✅✅

(D) राजकोट


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणत्या संस्थेने बिगर-बँकिंग वित्तीय कंपन्यांसाठी (NBFCs) सुधारित स्तरनिहाय नियमन (SBR) कार्यचौकट निश्चित केली?


(A) IBPS

(B) SEBI

(C) NABARD

(D) RBI ✅✅


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणत्या देशाने दहाव्या ‘जागतिक माध्यम आणि माहिती साक्षरता सप्ताह’ निमित्त जागतिक कार्यक्रमाचे आयोजन केले?


(A) दक्षिण आफ्रिका ✅✅

(B) दक्षिण कोरिया

(C) जपान

(D) भारत

चालू घडामोडी

 1. खालीलपैकी योग्य विधान ओळखा.

अ.  केंद्र सरकारने लदाखसाठी नवीन राज्य सैनिक बोर्डाला मान्यता दिली आहे.

ब.  माजी सैनिक, युद्ध विधवा, विधवा, सेवारत कर्मचारी, केंद्रशासित प्रदेशातील त्यांचे आश्रित लोक यांच्या कल्याण आणि पुनर्वसनासाठी राज्य सैनिक मंडळ असेल.


1. फक्त अ

2. फक्त ब

3. अ आणि ब

4. यापैकी नाही


उत्तर-3


------------------------------------------------------------


2. कोणत्या राज्यसरकारने कैसर-ए-हिंद फुलपाखरू राज्य फुलपाखरू म्हणून घोषित केले आहे?


1. आसाम

2. नागालँड

3. मिझोराम

4. अरुणाचल  प्रदेश


उत्तर- 4


------------------------------------------------------------


3. राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ, पोलाद (NMDC) ने आपला 64 वा स्थापना दिवस कोणत्या ठिकाणी साजरा केला?


1. दिल्ली

2. कोलकत्ता

3. हैदराबाद

4. रांची


उत्तर-3


------------------------------------------------------------


4.

अ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक्सप्रेस वे चे उद्घाटन करण्यात आले.

ब. पूर्वांचल एक्सप्रेस वे हा सुमारे 341 किमी लांबीचा आहे,6 लेन रुंद,प्रवेश नियंत्रित एक्सप्रेस वे आहे.

वारीलपैकी अचूक विधान निवडा.


1. फक्त अ

2. फक्त ब

3. अ आणि ब

4. यापैकी नाही


उत्तर-3

------------------------------------------------------------


5. 16 नोव्हेंबर रोजी युनायटेड  नेशन्स एज्युकेशनल,सायंटिफिक आणि कल्चरल ऑर्गनायझेशन (युनेस्को) ने ........वा  वर्धापन दिन साजरा केला.


1. 70

2. 75

3. 77

4. 80


उत्तर-2


------------------------------------------------------------


6. खालीलपैकी कोणाची संयुक्त राष्ट्र संघाने भारतातील निवासी समन्वयक म्हणून नियुक्ती केली आहे.


1. टी. एस. तिरुमुर्ती

2. अंटॉनियो गुटेरस

3. शोंबी शार्प

4. एकही नाही


उत्तर-3


------------------------------------------------------------


7. आरबीआय ने ठेवी घेणाऱ्या NBFCs ला .......किंवा अधिक शाखांसह सहा महिन्यात अंतर्गत लोकपाल नियुक्त करणे अनिवार्य केले आहे.


1. 5

2. 8

3. 10

4. 15


उत्तर-10


------------------------------------------------------------


8. नोव्हेंबर 2021 दरम्यान SITMEX-21  च्या तिसऱ्या आवृत्तीत कोणत्या देशाच्या सैन्याने भाग घेतला आहे.?


1. सिंगापूर, भारत

2. थायलंड, सिंगापूर

3. थायलंड,सिंगापूर, भारत

4. भारत,सिंगापूर


उत्तर-3


------------------------------------------------------------


9. पृथ्वीच्या कक्षेतील उपग्रहांशी  जोडण्यासाठी कोणत्या  कंपनीने एक नवीन लहान डिश लॉन्च केली आहे?


1. अमेझॉन

2. इस्रो

3. नासा

4. स्पेसएक्स


उत्तर-4


------------------------------------------------------------


10. नोव्हेंबर 2021 मधील 44 वा बांग्ला उत्सव कोणत्या राज्यात सुरू झाला?


1. मेघालय

2. आसाम

3. नागालँड

4. बांग्लादेश


उत्तर-1


जगातील देश व खंड यांचे टोपण नाव..



🔹आफ्रिका -- काळे खंड..


🔹ऑस्ट्रेलिया -- कांगारूंचा देश व खंडद्वीप..


🔹बहरीन -- मोत्यांची बेटे..


🔹बल्जीयम -- युरोपची रणभूमी..


🔹कनडा -- मॅपल वृक्षांचा देश, लिलीचा देश..


🔹कयुबा -- अँटिलिसचा मोती, साखरेचे कोठार..


🔹इजिप्त -- नाईलची देणगी..


🔹नॉर्वे -- मध्यरात्रीच्या सूर्याचा देश..


🔹फिनलँड -- सरोवराचा देश..


🔹मयानमार -- पॅगोडाचा देश..


🔹जपान -- उगवत्या सूर्याचा देश..


🔹झांझिबार -- लवंगाचे बेट..


🔹नयूझीलंड -- दक्षिण गोलार्धातील इंगलंड..


🔹पलेस्टाईन -- पवित्र भूमी..


🔹आयरलँड व श्रीलंका -- पांचूची बेटे..


🔹रवांडा -- आफ्रिकेचे स्वित्झर्लंड..


🔹सवित्झर्लंड -- युरोपचे क्रीडांगण..


🔹थायलंड -- पांढऱ्या हत्तीचा देश..


🔹बाल्कन देश -- युरोपचा सुरुंग..


🔹तरिस्तन डा कन्हा -- जगातील एकाकी बेट..


🔹अमेरिका -- सूर्यास्ताचा देश..


🔹जपान -- पॅसिफिक महासागरातील इंग्लंड..


🔹परेअरी प्रदेश -- जगाचे धान्याचे कोठार..


🔹यक्रेन -- युरोपचे गव्हाचे कोठार..


Online Test Series

संपूर्ण मराठी व्याकरण महत्त्वाचे विरुद्धार्थी शब्द:

उदय × अस्त
आदी × अनादी
किंकर,चाकर × मालक,धनी
मर्त्य × अमर
सकाम × निकाम
धुरीण × अनुयायी
रंक × राव,धनाढ्य
दीप्ती × अंधःकार
दुभती × भाकड
दैववाद × प्रयत्नवाद
तम,तिमिर × प्रकाश,उजेड
विनंती × ताकीद
जागृत × निद्रिस्त
तृप्त × अतृप्त
तजेलदार × कोमेजलेले
झकास × निकृष्ट
औत्सुक्य × औदासीन्य
आसक्ती × विरक्ती
औधत्य × नम्रता
कुकर्म × सत्कर्म
साव × चोर
अशांत × प्रशांत
दुष्ट × सुष्ट
सधवा × विधवा
सुलभ × दुर्लभ
सुवर्णयुग × तमोयुग
गद्य × पद्य
सक्षम × अक्षम
राजमार्ग × आडमार्ग
खोल × उथळ
आपुलकी × परकेपणा
आहेरे × नाहिरे
कुलटा × घरंदाज
कृपा × अवकृपा
प्रशंसा × कुचाळी
खम्बीर × डळमळीत
औरस × अनौरस
श्राव्य × अश्राव्य
नीटनेटका × गबाळयंत्री
टंचाई × रेलचेल
इष्टाग्रह × दुराग्रह
साकल्य × वैफल्य
साकार × निराकार
तारतम्य × अविवेक
आठवण × विसर, विस्मरण
उघड × गुप्त
सुविचार × अविचार
उद्योगी × आळशी
एकमत × दुमत
आक्षेप × निरसन
गुंता × उकल
संक्षिप्त,त्रोटक × इत्यंभूत
विन्मुख × उन्मुखी
खंडन × मंडन
सामूहिक × वैयक्तिक
वस्तुस्थिती × आभास
क्षणभंगुर × चिरकलीन
माजी × आजी,विद्यमान
श्रमजीवी × बुद्धिजीवी
स्वस्ताई × महागाई
गर्विष्ठ × निगर्वी
विधायक × विध्वंसक
भरती × ओहोटी
हर्ष × खेद
साकार × निराकार
सकाम × निष्काम
चढाई × माघार
खंडित × अव्याहत
परिक्ष × अपरिक्ष
आडकाठी × मोकळी
सत्य × मिथ्या, मिथ्य
छाया × पडछाया
ग्राह्य × त्याज्य
हीन × दर्जेदार
राग × अनुराग
आमंत्रित × अनाहूत,आंगतूक
सह्य × असह्य
बंडखोर × शांत
कीर्ती × अपकीर्ती
इच्छा × अनिच्छा
सदाचरण × दुराचरण
उपलब्ध × अनुपलब्ध
इप्सित × अवांच्छित
उत्तेजन × खच्चीकरण
प्रसन्न × उद्विग्न
उल्लड × पोक्त
कृष्ण × धवल
अर्थ × अर्थहीन
अंतरंग × बहिरंग
इहलोक × परलोक
उदार × अनुदार
तन्मय × द्विधा
समदर्शी × पक्षपाती
कळस × पाया, पायरी
ओवळा × सोहळा
गच्च × सैल,विरळ
उपाय × निरुपाय
गतकाल × भविष्यकाळ
शंका × कुशंका
विवाद × निर्विवाद
वेध × निर्वेध
सुबोध ×  दुर्बोध
वियोग × संयोग,मिलन
सन्मार्ग × कुमार्ग
लौकिक × दुलौकीक
रुकार × नकार
ऐलतीर × पैलतीर
भोग × त्याग
आवक × जावक
हलकी × अवजड
कुचकामी × फलदाई
उदंड × कमी
स्वार्थ × परमार्थ
क्षम्य × अक्षम्य
संकुचित × व्यापक
श्रुत × अश्रुत
स्मृती × विस्मृती
सनातनी × सुधारक
सक्ती × खुषी
क्षेम × धोका
क्षर × अक्षर
स्वतंत्र × परतंत्र्य
स्वातंत्र्य × पारतंत्र्य
सुरस × नीरस
स्थूल × सूक्ष्म,कृश
पौर्वात्य × पाश्चात्य, पाश्चिमात्य
तारक × मारक
अवधान × अनावधान
अजस्त्र × चिमुकले
स्वीकार × अव्हेर
याचित × आयाचित
उत्कर्ष × अपकर्ष
कला × पांढरा, गोरा
नक्कल × अस्सल
गंभीर × अवखळ
प्रगती × अधोगती
उताणा × पालथा
उंच × ठेंगणा, बुटका,सखल
कोवळे × जून,राठ, निबर
अब्रू × बेअब्रू
उतार × चढाव
एकमत × दुमत
उन्नत × अवनत
उदार × कंजूस, अनुदार
उच्च × नीच
अंध × डोळस
अर्वाचीन × प्राचीन
उष्ण × थंड,गार, शीतल
एक × अनेक
ओली × कोरडी,सुकी
उन्नती × अवनती,अधोगती
आधुनिक × सनातनी
अकलवन्त × अकलशून्य,अकलमंद
अमृत,सुधा × विष,जहर,गरळ
आय × व्यय
इमानी × बेइमानी
आरोहण × अवरोहण
अभिमान × दुराभिमान
घट्ट × सैल,भोंगळ
कोवळा × जून,कडक,निबर
गती × अधोगती,परागती
जनता × नेणता
जेता × जित
जाड्या × रोड्या
चवदार × सपक
चेतन × जड
जणता × अजाण,अडाणी
आमंत्रित × आंगतुक
कालिक × कालातीत
कृतज्ञ × कृतघ्न
मोद × खन्त
रनशूर × रनभीरु
रुचकर × बेचव,सपक,रुचीहीन
राव × रंक
लठ्ठ × कृश
वंद्य × निंद्य
शाश्वत × अशाश्वत,क्षणभंगूर
शंका × खात्री

मराठी व्याकरण : अर्थावरून पडणारे वाक्याचे प्रकार

1. विधानार्थी वाक्य : ज्या वाक्यात कर्त्यांने केवळ विधान केलेले असते. त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात.

2. प्रश्नार्थी वाक्य : ज्या वाक्यात कर्त्यांने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला प्रश्नार्थी वाक्य असे म्हणतात.

3. उद्गारार्थी वाक्य : ज्या वाक्यामध्ये कर्त्याने आपल्या मनात निर्माण झालेल्या भावनेचा उद्गार काढलेला असतो. त्या वाक्याला उद्गारार्थी वाक्य असे म्हणतात.

4. होकारार्थी वाक्य : ज्या वाक्यामधून होकार दर्शविला जातो त्यास होकारार्थी वाक्य किवा करणरूपी वाक्य म्हणतात .

5. नकारार्थी वाक्य : ज्या वाक्यामधून नकार दर्शविला जातो त्यास नकारार्थी वाक्य असे म्हणतात.

6. स्वार्थी वाक्य : जेव्हा वाक्यातील क्रियापदावरून फक्त काळाचा बोध होतो त्या वाक्यास स्वार्थी वाक्य असे म्हणतात.

7. आज्ञार्थी वाक्य : ज्या वाक्यामधून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थन ई. गोष्टींचा बोध होतो अशा वाक्यास आज्ञार्थी वाक्य असे म्हणतात.

8. विध्यर्थी वाक्य : जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरुन तर्क, कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा इत्यादी गोष्टीचा बोध होत असेल तर त्यास विध्यर्थी वाक्य असे म्हणतात.

9. संकेतार्थी वाक्य : जेव्हा वाक्यात एक गोष्ट केली असती तर दुसरी गोष्ट घडली असती असा संकेत दिला जातो तेव्हा त्या वाक्यास संकेतार्थी वाक्य असे म्हणतात.

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...