Monday, 15 November 2021

सर्वाधिक कुपोषित मुले महाराष्ट्रात - बिहार, गुजरातमधील स्थितीही चिंताजनक



🔰देशातील ३३ लाख मुले ही कुपोषित असून त्यातील निम्मी मुले अती कुपोषित गटात असून त्यांचे प्रमाण महाराष्ट्र, बिहार, गुजरात या राज्यांत अधिक आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण मंत्रालयाने  माहिती अधिकाराअंतर्गत उत्तरात दिली आहे.


🔰दशातील सर्वाधिक कुपोषित मुले महाराष्ट्रात असून ही  संख्या ६.१६ लाख आहे. त्यात मध्यम   कुपोषित मुले १.५७ लाख,  तर जास्त कुपोषित मुलांची संख्या ४.७५ लाख आहे.


🔰दसऱ्या क्रमांकावर बिहार असून तेथे ४.७५ लाख कुपोषित मुले आहेत. त्यात  ३ लाख २३ हजार ७४१ मुले मध्यम कुपोषित तर १ लाख ५२ हजार ०८३ मुले जास्त कुपोषित आहेत.


🔰गजरातमध्ये कुपोषित मुलांचे प्रमाण ३.२० लाख असून त्यातील १.५५ लाख मध्यम कुपोषित तर १.६५ लाख जास्त कुपोषित आहेत.

भारतात कधी येणार ५जी सेवा? केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा; म्हणाले



🔰अवघ्या १० वर्षांत भारतात टूजीपासून आता थेट ५जीपर्यंतचा प्रवास पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. कारण सध्या फोर-जी सेवा भारतात उपलब्ध असून लवकर भारतात ५जी सेवा देखील उपलब्ध होणार आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्ण यांनी यांदर्भात मोठी घोषणा केली असून त्यानुसार ५जी सेवेसाठीच्या कंत्राटांची लिलाव प्रक्रिया देखील लवकरच पार पाडली जाणार असल्याचं वैष्णव यांनी जाहीर केलं आङे. टाईम्स नाऊशी बोलताना वैष्णव यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.


🔰अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या ६ महिन्यांमध्ये म्हणजेच, पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यापर्यंत देशभरात ५जी सेवा देण्यासाठीची लिलाव प्रक्रिया राबवली जाईल, असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आहे. “या लिलाव प्रक्रियेसाठीचे नियम आणि इतर बाबी ट्रायकडून निश्चित केल्या जातील. ही प्रक्रिया पुढील वर्षी मार्चपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर लगेचच ५जी साठीची लिलाव प्रक्रिया राबवली जाईल. तांत्रिकदृष्ट्या ही प्रक्रिया तटस्थ होण्यासाठी आम्ही आग्रही आहोत”, असं वैष्णव यांनी सांगितलं.


🔰यावेळी बोलताना अश्विनी वैष्णव यांनी पुढील २-३ वर्षांमध्ये टेलिकॉम विश्वात मोठे बदल होण्याचे संकेत दिले. “येत्या २ ते ३ वर्षांमध्ये टेलिकॉम विश्वातील नियमांमध्ये पूर्णपणे बदल होणार असून ते जागतिक स्तरावरील मानकांनुसार असतील”, असं ते म्हणाले. तसेच, टेलिकॉम क्षेत्राविषयी केंद्र सरकारचा दृष्टीकोन अमूलाग्ररीत्या बदलल्याचं देखील वैष्णव यांनी नमूद केलं. “जागतिक दर्जाची टेलिकॉम व्यवस्था भारातात असावी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न पूर्ण केलं जाईल”, असं देखील ते म्हणाले.

‘स्पेसएक्स’चे आणखी चार अंतराळवीर अवकाशात ; ६० वर्षांत ६०० अंतराळवीराचा प्रवास



🔰अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि स्पेसएक्स यांनी चार अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) पाठवले आहे. खराब हवामानासह अनेक कारणांमुळे दीर्घ विलंबानंतर, स्पेसएक्स रॉकेट अखेर बुधवारी या अंतराळवीरांना घेऊन रवाना झाले. ज्यात ६० वर्षांत अंतराळात पोहोचणाऱ्या ६००व्या अंतराळवीराचा समावेश आहे.


🔰यएस स्पेस एजन्सी नासाने सांगितले की जर्मनीचे मॅथियास मौरर यांचा बुधवारी अंतराळात गेलेल्या चार व्यक्तींमध्ये समावेश होता, जे अंतराळात जाणारे ६००वे व्यक्ती ठरले.  मॅथियास मौरर व्यतिरिक्त, इतर तीन अंतराळवीर २२ तासांच्या उड्डाणानंतर गुरुवारी संध्याकाळी अंतराळ स्थानकावर पोहोचतील. त्याला œc ३ असे नाव देण्यात आले आहे. रॉकेटमध्ये ४४ वर्षीय भारतीय अमेरिकन राजा चारी देखील होते, जे यूएस एअर फोर्स फायटर जेटचा प्रशिक्षित पायलट होते. त्यांना मिशन कमांडर बनवण्यात आले आहे.


🔰खराब हवामानामुळे रॉकेटच्या उड्डाणाला विलंब झाला. बुधवारी रात्री रिमझिम पावसात चार अंतराळवीरांनी आपल्या कुटुंबाचा निरोप घेतला. हवामान तज्ज्ञांनी हवामान स्वच्छ राहण्याचा अंदाज वर्तवला होता आणि त्यात सुधारणाही झाली.


🔰दोन दिवसांपूर्वी, स्पेसएक्स स्पेसक्राफ्ट यानातून नासाचे अंतराळवीर शेन किमब्रो आणि मेगन मॅकआर्थर, जपानचे अकिहितो होशिडे आणि फ्रान्सचे थॉमस पेस्केट हे पृथ्वीवर परतले. अंतराळ केंद्रात त्यांनी २०० दिवस व्यतीत केले आहेत.

कळसुबाई बियाणे संवर्धन समितीचा राष्ट्रीय पुरस्काराने गौरव



🔰कृषी मंत्रालय भारत सरकार संचलित ‘प्रोटेक्शन ऑफ प्लांट्स व्हरायटिज अँड फार्मर्स राइट्स अथॉरिटी’ मार्फत पिकांच्या स्थानिक वाण संवर्धन आणि शाश्वात वापर यासाठी दिला जाणारा राष्ट्रीय ‘जीनोम सेव्हियर कम्युनिटी’ पुरस्कार या वर्षी तालुक्यातील कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन समितीला मिळाला आहे. दहा लाख रुपयांचा हा पुरस्कार आहे.


🔰नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान येथील मुख्यालयात ११ नोव्हेंबर रोजी भारताचे कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मण डगळे, तसेच बीज माता पद्माश्री राहीबाई पोपेरे, अन्नमाता ममताबाई भांगरे, बायफ संस्थेचे विषय तज्ज्ञ डॉक्टर विठ्ठल कौठाळे, जैव विविधता तज्ज्ञ संजय पाटील, विभाग प्रमुख जितीन साठे, प्रकल्प समन्वयक योगेश नवले यांनी  हा पुरस्कार व स्वीकारला.


🔰सथानिक वाण संवर्धन करण्यासाठी राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमांतून गेली आठ वर्ष तालुक्यात कार्यक्रम सुरू आहे. त्याचबरोबर शबरी आदिवासी महामंडळ नाशिक यांचे आर्थिक सहकार्याने हा उपक्रम राबवला जात आहे. 


🔰अकोले तालुक्यात ‘बायफ’ संस्थेच्या माध्यमाने सुरू असलेल्या स्थानिक जैवविविधता संवर्धन वृद्धी व प्रसार उपक्रमांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या कळसुबाई परिसर स्थानिक बियाणे संवर्धन सामाजिक संस्थेमार्फत येथील जैवविविधता अबाधित राखून तिचे संवर्धन करण्यावर भर दिला जात आहे. वातावरण बदल आणि पोषण सुरक्षा यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या सुमारे ११४ वाणांचे संवर्धन संस्थेने केले आहे.

प्रा. बिमल पटेल यांची आंतरराष्ट्रीय विधि आयोगावर निवड



🔰राष्ट्रीय रक्षा विद्यापीठाचे कुलगुरू व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मंडळाचे सदस्य प्रा. बिमल पटेल यांची आंतरराष्ट्रीय विधि आयोगावर पाच वर्षांसाठी निवड झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या या संस्थेतील निवडणुकीत त्यांना हे यश मिळाले आहे.


🔰सयुक्त राष्ट्रातील राजदूत टी.एस तिरूमूर्ती यांनी प्रा. बिमल पटेल यांचे अभिनंदन केले असून त्यांना या निवडीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. पटेल (वय ५१) यांना १९२ सदस्य देशांपैकी १६३ मते मिळाली. त्यात त्यांनी आशिया- पॅसिफक गटातील चीन, दक्षिण कोरिया व  जपान या देशांवर मात केली आहे.


🔰परा. बिमल पटेल यांची आंतरराष्ट्रीय विधि आयोगावर निवड झाली असून आमचे या संस्थेतील योगदान व आंतरराष्ट्रीय व्यवस्था राखण्याचे प्रयत्न महत्त्वाचे राहतील असे संयुक्त राष्ट्रातील भारतीय दूतावासाने म्हटले आहे. चीनच्या दंडेलीविरोधात अप्रत्यक्षपणे भारताने आंतरराष्ट्रीय व्यवस्था राखण्याचा इरादा व्यक्त करून इशारा दिला आहे. ज्या देशांनी भारताला मतदान केले त्यांचे दूतावासाने आभार मानले आहेत.


🔰भारताचे पटेल यांना १६३ मते मिळाली. थायलंडला १६२, जपानला १५४, व्हिएतनामला १४५ मते मिळाली आहेत. चीनला १४२ मतांवर समाधान मानावे लागले. दक्षिण कोरियाला १४०, सायप्रसला १३९ तर मंगोलियाला १२३ मते मिळाली.

२०३० पर्यंत चीनकडे असतील तब्बल एक हजार अण्वस्त्र, अमेरिकेने सादर केला अहवाल



🔰जपानला मागे टाकत चीन जगातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था असलेला देश झाला आहे. आता जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेशी टक्कर देण्याचा प्रयत्न चीन करत आहे. व्यापार, उद्योग, अवकाश तंत्रज्ञान, खेळ, संशोधन, विज्ञान, वहातुक अशा विविध क्षेत्रात चीन अमेरिकेवर कुरघोडी करत जगावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये संरक्षण क्षेत्रही मागे नाहीये. चीन गेल्या दोन दशकांपासून वेगाने संरक्षण क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.


🔰असं असतांना अमेरिकेच्या संरक्षण विभागाने चीनच्या लष्करी तयारीबाबत खास करुन अण्वस्त्र क्षमतेबाबत एक अहवाल तयार केला आहे. यानुसार चीनकडे २०३० पर्यंत एक हजार अण्वस्त्र असतील असं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे. याआधी चीनकडे सुमारे ३५० अण्वस्त्रे असावीत असा एक अंदाज होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून चीनचे लष्करी सामर्थ्य वाढत असून २०३० पर्यंत एक हजार अणु बॉम्ब तयार करण्याची क्षमता चीनकडे झालेली असेल असं या अहवालात म्हंटलं आहे.


🔰चीनकडे जमिनवरुन जमिनीवर मारा करणारी, पाण्याखालून पाणबुडीतून जमिनीवर मारा करणारी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आहेत. तसंच दीर्घ पल्ला असलेली बॉम्बफेकी विमानेही चीनकडे तयार होत आहेत.


🔰एवढंच नाही तर लष्कर, लढाऊ विमाने, युद्धनौका, पाणबुडी यांमध्ये लक्षणीय वाढ चीन दरवर्षी करत आहे. यामुळेच जास्तीत जास्त अण्वस्त्र वाहून नेता येतील, वेळप्रसंगी हल्ला करता येईल अशी क्षमता चीनची तयार होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अण्वस्त्रासाठी आवश्यक असलेल्या प्लुटोनियमच्या निर्मितीकडे चीनकडे अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. यासाठी आवश्यक असलेल्या ‘फास्ट ब्रीडर रिएक्टर’ प्रकारातील अणुभट्टीबाबत मोठी गुंतवणूक चीन करत आहे.

शास्त्रीय उपकरणे व त्यांचा वापर

♻️ डायनामोमीटर : इंजिनाची विशिष्ट शक्ती मोजण्याचे उपकरणे

♻️ हॉट एअर ओव्हम : अधिक तापमान वाढविणारे उपकरणकॉम्युटरक्षणात प्रचंड आकडेमोड करणारे यंत्र

♻️ रेफ्रीजरेटर : तापमान 4 से. पेक्षा कमी राखणारे उपकरण

♻️ स्पिडोमीटर : गोलकार चाके असलेल्या वाहनाने काटलेले अंतर मोजण्याचे उपकरण

♻️ हायड्रोफोन : पाण्याखाली ध्वनीचे आंदोलन मोजणारे उपकरण

♻️ टेलेस्टार : तारांच्या सहाय्याशिवाय अवकाशातून ध्वनीलहरी प्रक्षेपीत करणारे उपकरण.

♻️ टाईपराईटर : टंकलेखनाच्या सहाय्याने कागदावर मजकूर लिहणारे उपकरण

♻️ टेलीग्राफ : सूर्य किरणांच्या आरशातील प्रतिबिंबाच्या सहाय्याने संदेश वाहनासाठी वापरले जाणारे उपकरण.

♻️ अल्टीमीटर : समुद्रसपाटीपासून उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.

♻️ ऑक्टोक्लेव्ह : दाब देऊन वस्तू निर्जंतुक करण्याचे उपकरण.

♻️ सिस्मोग्राफ : भूकंपाच्या धक्क्याचे मापन करणारे यंत्र

♻️ अॅमीटर : अॅम्पीयरमध्ये विद्युतप्रवाह मोजण्यासाठी.

♻️ अॅनिमोमीटर : वार्‍याचा वेग व दाब मोजण्यासाठी

♻️ गायग्रोस्कोप : वर्तुळाकार भ्रमण करणार्‍या वस्तूची गती मोजणारे उपकरण.

♻️ पायरोमीटर : उच्च तापमान मोजण्यासाठीचे उपकरण

♻️ बॅरोमीटर : हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण

♻️ टेलिप्रिंटर : तारायंत्राने पाठविलेला मजकूर आपोआप छापणारे उपकरण.

♻️ मायक्रोस्कोप : सुक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.

♻️ क्रोनीमीटर : जहाजात वापरण्यात येणारे अचूक मापनाचे घडयाळ.

♻️ लॅक्टोमीटर : दुधाची शुद्धता मोजण्याचे उपकरण.

♻️ कार्डिओग्राफ : हृदयाची स्पंदने मोजण्यासाठीचे उपकरण.

♻️ सायक्लोस्टायलिंग : छापील कागदाच्या अनेक प्रती काढण्याचे उपकरण.

♻️ कार्बोरेटर : पेट्रोल आणि हवा अंतर्गत ज्वलन इंजिनात सोडण्यासाठी.

♻️ मॅनोमीटर : वायुचा दाब मोजणारे उपकरण

♻️ ऑडिओमीटर : ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी

♻️ मायक्रोफोन : ध्वनीलहरीचे विद्युतलहरीत रूपांतर करणारे उपकरण.

♻️ रडार : रेडिओ सुक्ष्म लहरीच्या साह्याने अवकाशातील वस्तूचे स्थान, दिशा व वेग दाखविणारे उपकरण.

♻️ हायड्रोमीटर : द्रव्य पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.

♻️ मायक्रोमीटर : अतिशय सुक्ष्ममाप मोजण्यासाठी बी.ओ.डी. इंक्यूबेटर – 20° सेंटीग्रेड तापमान राखणारे उपकरण

♻️ थर्मोस्टेट : ठराविक तापमानपर्यंत नियंत्रण करू शकणारे उपकरण.

♻️ थिअडोलाईट : उभ्या आणि आडव्या पातळीतील कोन मोजण्यासाठी व मोजणी करण्यासाठी.

फुल व त्याची अंगके

◾️ निदलपुंज (Calyx) :
_____________
कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेल्या असतात. हे आवरण म्हणजे निदलपुंज होय.

◾️ दलपुंज (Corolla) :
_____________
दलपुंज पाकळ्यांनी (Petals) बनलेला असतो.

◾️ पुमंग (Androecium) :
_____________
फुलाचा हा पुल्लिंगी भाग असून तो पुंकेसराचा (Stamen) बनलेला असतो. त्यात परागकोष व वृंत असतात.

◾️ जायांग : (Gynoecium) :
_____________
फुलाचा हा स्त्रीलिंगी भाग असून तो स्त्रीकेसराचा (Carpel) बनलेला असतो त्यात कुक्षी, कुक्षीवृंत व अंडाशय असते.

◾️ परागीभवन
_____________
परागकोष पक्व झाल्यावर फुटतो आणि त्यातील परागकण हे कुक्षीवर जाऊन पडतात. या क्रियेला परागीभवन (Pollination) असे म्हणतात. या परागीभवनापासन पढे अंडाशयातील बीजांडांचे फलन होऊन त्याचे रूपांतर बीमध्ये होते, तर अंडाशयाचे रूपांतर फळात होते.

__________________________

दाब बद्दल संपूर्ण माहिती

· अणकुचीदार खिळा हातोडीने लाकडामध्ये ठोकल्यास सहज ठोकला जातो. परंतु खिळा बोथट असेल तर तो लाकडात सहज जात नाही.

· खिळ्याच्या डोक्यावर हतोड्याच्या सहाय्याने लावलेले बल खिळ्याच्या टोकाकडे संक्रमित होते. अणकुचीदार खिळ्याच्या टोकाजवळचे क्षेत्रफळ किमान असल्यामुळे टोकाकडे बलाचा परिणाम सर्वाधिक होते व खिळा लवकर लाकडात ठोकला जातो.

· बोथट खिळ्याच्या टोकाकडील क्षेत्रफळ विभागले जाऊन त्याचा टोकाकडील परिणाम कमी होतो. म्हणून तो लवकर लाकडात जात नाही.

· यावरून दोन्ही खिळ्यावरचे बल समान असले तरीही त्याचा परिणाम टोकाकडील क्षेत्रफळानुसार भिन्न असतो.

· लाकडी चौकटीमध्ये स्क्रू बसवताना पेचकस स्क्रुला लंब ठेवून पेचकसवर बल लावले जाते. पेचकस स्क्रुला लंब नसल्यास लावलेल्या बलाच्या मानाने कमी परिणाम दिसतो.

· पेचकस स्क्रुला लंब असल्यास लावलेले बल स्क्रुच्या टोकाकडे सर्वाधिक संक्रमित होते.

· यावरून असे स्पष्ट होते की वस्तूवर लावलेल्या बलाची दिशा वस्तूच्या पृष्ठभागाला लंब असेल तर त्या बलाचा वस्तूवर होणारा परिणाम सर्वाधिक असतो.

· एखाधा पृष्ठभागावर लावलेल्या बलाचा परिणाम किती होतो हे लावलेल्या बलाचे परिमाण, बलाची दिशा आणि बल लावलेल्या पृष्ठभागाचे क्षेत्रफळ यावर अवलंबून असते. बलाच्या अशा एकत्रित परिणामाला दाब म्हणतात.

· दाब म्हणजेच एकक क्षेत्रफळावर असणारे लंबरूप बल होय.

· दाब = लंबरूप बल / क्षेत्रफळ

· लंब दिशेने प्रयुक्त झालेल्या बलास उत्प्लाविता (thrust) असे म्हणतात. एकक पृष्ठभागावर प्रयुक्त झालेली उत्प्लाविता म्हणजे दाब होय.

· दाब = उत्प्लाविता / क्षेत्रफळ

· SI पद्धतीमध्ये दाब N/m२ मध्ये मोजतात. त्यालाच ब्लेस पास्कल या शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ ‘पास्कल’ (Pa) असेही म्हणतात.

· बल वाढल्यास दाब वाढतो.

· बल ग्रहण करणारे क्षेत्रफळ कमी झाल्यास दाब वाढतो.

· फळे कापायच्या सुरीला धार लावल्यामुळे सूरीवर लावलेले बल किमान क्षेत्रफळावर कार्य करते अन फळ चटकन कापले जाते.

गोपाल गणेश आगरकर.

🅾जन्म : 14 जुलै 1856, करहाड तालुक्यातील टेंभू.

🅾मृत्यू : 17 जून 1895,पुणे
1 जानेवारी 1880 – चिपळूणकर, टिळक व अगरकर ‘न्यू इंग्लिश स्कूल ’ची स्थापना केली.

🅾1884 – डेक्कन एजुकेशन सोसायटी ची स्थापना.बुद्धीप्रामान्यवाद, वैज्ञानिक द्रुष्टिकोण, एहिक जीवनाची स्मृधता यावर भर .

🧩संस्थात्मिक योगदान :

🅾1881 – लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या केसरीचे संपदकत्व .
15 आक्टोंबर 1888 – ‘सुधारक ’ साप्ताहिक.

🅾गुलामांचे राष्ट्र या पुस्तकात हिन्दी लोकांचा आळशी वृत्तीची टीका.
स्त्रियांनी जकिते घातलीच पाहिजेत याविषयावर निबंध.

🅾अकोल्यातल्या वर्हाघड समाचार या वर्तमान पत्रातून लेखन.शेक्सपिअरच्या हॅल्मेट या नाटकाचे विकारविलासित या नावाने मराठी रूपांतर.'डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस' हेपुस्तक.हिंदुस्थानाचे राज्य कोणासाठी या निबंधात ब्रिटीशांच्या स्वार्थी वृत्तीवर टीका.
वैशिष्टे :

🅾इष्ट असेल ते बोलणार......
राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्यला अधिक महत्व.हर्बर्ट स्पेन्सरच्या सोशॉलॉजी व एथिक्स आणि जॉन मिलच्या ऑन लिबर्टी व सब्जेक्शन ऑफ वुमन या ग्रंथाचा प्रभाव.बुध्दिप्रामाण्यवाद व व्यक्तीस्वातंत्र्य या दोन तत्वांना महत्व.

🅾ऐहिक जीवन समृद्ध करावे, पारलौकिक जीवनाचा विचार करणे व्यर्थ, असे मत.जिवंतपणी स्वतः ची प्रेतयात्रा पहावी लागलेले समाजसुधारक.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

सायमन कमिशन (1927-28)

👉 अध्यक्ष :-जॉन सायमन

    🔹Member 👇

Clement Attlee

Harry Levy-Lawson

Edward Cadogan

Vernon Hartshorn

George Lane-Fox

Donald Howard

🔻 8 नोव्हेंबर 1927 इंग्लंड येथे स्थापना

🔻 8 फेब 1928 मुंबईत दाखल
🔻 7 सदस्य सर्व इंग्रज

🔻भारतात दोनदा आले

🔻फेब्रुवारी 1928
🔻ऑक्टोंबर 1928

🔻अहवास सादर मे 1930

🔻शिफारस :- गोलमेज परिषद

💐 नेहरु रिपोर्ट 1928💐

🔻 सायमन कमिशनला विरोध केल्यामुळे

🔻 भारतमंत्री लॉर्ड बर्केनहेड ने आव्हान दिले की तुम्ही संविेधानासाठी प्रयत्न करा

🔻सचिव् जवाहर लाल नेहरु, अन्य 9 सदस्य होते पैकी एक सुभाष चन्द्र बोस 

🔺समिति ने रिपोर्ट 28-30 अगस्त, 1928 सादर केला

🔻 पहिल्या दोन बैठका M A अन्सारींच्या अध्यक्षतेखाली झाल्या

🔻 तिसरी बैठक मोतीलाल नेहरुंच्या अध्यक्षतेखाली झाली

🔻29 राजनीतिक संगठनांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले

🔻यात प्रथम वसाहतीअंतर्गत स्वराज्य मागितले व

🔻 ज. नेहरु व सुभाषचंद्र बोस यांनी संपूर्ण स्वातंत्र मागितले

रँडच्या जाचाला वैतागून टिळकांनी पुण्यात वेगळं प्लेग हॉस्पिटल सुरु केलं होतं.

सध्या पुण्यातल्या कोरोनाच्या महामारीने राज्यातील मुंबई व इतर शहरांना मागे टाकलं आहे. अजूनही हा रोग ठोस उपाय न सापडल्यामुळे नियंत्रणात येऊ शकलेला नाही. सरकारी व वैद्यकीय यंत्रणा यांना रोजच्या लढाईला सामोरे जावे लागत आहे.

असेच महाभयंकर संकट पुण्यावर १८९७ साली कोसळले होते. ब्युबोनिक प्लेग.
कलकत्ता, मुंबईच्या पाठोपाठ हा संसर्गजन्य रोग पुण्यात देखील दाखल झाला. उंदीर मेल्याप्रमाणे पटापट लोक मरु लागले. तेव्हाच्या ब्रिटीश सरकारने युद्धपातळीवर तयारी सुरु केली. केवळ अलंकारिक अर्थाने नव्हे तर पुण्याच्या कलेक्टरला लष्करी अधिकार दिले.

तसेच सातारचा कडक शिस्तीचा लष्करी अधिकारी वाल्टर रँड याची प्लेग कमिशनर म्हणून केली. ही घटना साधारण फेब्रुवारी १८९७ मधली आहे.
रँडने तातडीने पुण्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. गावाबाहेर मुळामुठाच्या संगमाजवळ एक प्लेगचे इस्पितळ उघडण्यात आले. शिवाय विलीगीकरणासाठी वेगळी छावणी उघडण्यात आली. लेफ्टनंट ओवेन याला रुग्ण छावणीची जबाबदारी देण्यात आली.

प्लेगचे रुग्ण शोधून काढणे हेच सरकारपुढे मोठे आव्हान होते. यासाठी पोलिसांनी स्थानिक नेत्यांच्या मदतीने सर्चपार्टी बनवली.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे तेव्हा मुंबई कायदेमंडळाचे सदस्य होते. पुण्यातील लोकांचा पुढारी व एक जबाबदार पत्रकार या नात्याने टिळकांनी प्लेग विरुद्धच्या लढाईत उडी घेतली. आपल्या वर्तमानपत्रातून रोगासंबंधी लोकशिक्षण देण्यास सुरवात केली.

टिळकांनी प्लेग दुःख निवारण समितीची स्थापना केली होती.
हा रोग, त्याची लक्षणे, त्यावरील उपाययोजना याविषयीचे लेख त्यांनी आपल्या पत्रातून छाप्ले परंतु सार्वजनिक आरोग्याचे नियम ण पाळणाऱ्या अनाठायी भीतीपोटी  शहर सोडून जाऊ इच्छिनाऱ्या सरकारी आरोग्य सेवकांशी योग्य सहकार्य न करणाऱ्या नागरिकांची त्यांनी कानउघडणी केली.

निदान सुरवातीला तरी रँडच्या पथकातील सोजिरांनी कोणाच्याही घरात तपासणीसाठी जाताना स्थानिक स्वयंसेवकांना सोबत नेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सुरवातीला लोकमान्य टिळक देखील जातीने या पथकाबरोबर काही घरांमध्ये गेले होते.

पण नंतर नंतर प्लेगची परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. तसे लोकांमध्ये घबराटीचे प्रमाण वाढले व सरकारी यंत्रणा देखील दबावाखाली आल्या.
दुष्काळाची आपत्ती अस्मानी असेल तर ही आपत्ती सुलतानी आहे म्हणजेच हा रोग सरकारने पसरवला आहे असं पुणेकरांनी समजूत करून घेतली.
एकोणिसाव्या शतकातला तो काळ. शिक्षणाचा अभाव व जातीपात, अंधश्रद्धा यांची जबरदस्त पकड  यामुळे लोक प्लेगचे रुंग शोधायला येणाऱ्या सैनिकांना सहकार्य करेनासे झाले.

cचे सोजीर संशयाच्या आधारे कोणाच्याही घरी घुसत होते. अगदी देवघरापर्यंत बूट घालून वावरत होते, स्त्रियांचीही असभ्यपणे तपासणी करत होते हे कर्मठ पुण्याच्या लोकांना आवडले नाही. हे सैनिक घरातील सामान रस्त्यावर फेकतात, नासधूस करतात अशा विविध कारणांनी असंतोष निर्माण होऊ लागला.

विटंबनेपेक्षा रोग बरा असंच लोकांना वाटू लागल.

टिळक व इतर नेत्यांनी जनतेला विश्वासात घेऊन त्यांच्या कलाने तपासणी करायचा आग्रह धरला पण वाढत्या रुग्णसंख्येने दबावात आलेल्या रँडने याकडे साफ दुर्लक्ष केले.

याच बरोबर प्लेग रुग्णालयातही रोग्याची व्यवस्था नीट होत नाही अशा तक्रारी येऊ लागल्या. तिथे देखील रुग्णसंख्या प्रचंड वाढली होती. काही रुग्ण इतर जातीच्या रुग्णासोबत आपल्याला ठेवू नका असा विचित्र आग्रह धरताना सुद्धा दिसत होते. भारतीय समाजव्यवस्थेचे हे कांगोरे इंग्रज अधिकाऱ्यांच्या आकलनाबाहेरचे होते.

अखेर प्रत्येक धर्मासाठी त्यांच्या खर्चाने प्लेग रूग्णालये उघडण्यास परवानगी देण्यात आली. हिंदू मुस्लीम पारसी व युरोपीय रुग्णांसाठी ससून, याच बरोबर संगमावरचे जनरल प्लेग हॉस्पिटल असे एकूण पाच प्लेग रुग्णालये पुण्यात सुरु झाली.

हिंदू प्लेग हॉस्पिटलची जबाबदारी लोकमान्य टिळकांनी स्वतःच्या शिरावर घेतली.
त्यांनी या हॉस्पिटलबरोबर एक विलगीकरण छावणी देखील सुरु केली. अतिशय शिस्तबद्ध रीतीने हे रुग्णालय त्यांनी चालवून दाखवले.

इतर पुण्यातील इतर नेते प्लेगच्या भयाने शहर सोडून जात होते तेव्हा लोकमान्य टिळक रुग्णांच्या शुश्रूषेत व मृतांच्या अंत्यक्रियेत मग्न होते.
रँडच्या दडपशाहीविरुद्ध टिळकांनी आपल्या वर्तमानपत्रातून जोरदार टीकास्त्र सोडल होत. नुकताच येऊन गेलेला दुष्काळ, त्यात रोगराई असतानाही ब्रिटीश अधिकारी व्हिक्टोरिया राणीच्या राज्यरोहनाच्या ज्युबली निमित्ताने जंगी कार्यक्रम आयोजित करत आहेत, मोठमोठ्या पार्ट्या झोडत आहेत यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरलं.

अशातच चाफेकर बंधूनी गणेशखिंडीत रँडचा खून केला.
रँडने केलेल्या प्लेगच्या साथीत केलेल्या अत्याचारामुळे चिडलेल्या चाफेकर बंधूनी हे कृत्य केले होते. अनेकांचा दावा होता की लोकमान्य टिळकांची त्यांना आशीर्वाद होता. त्यांच्या आ

सह्याद्री किंवा पश्चिम घाट


◾️सह्याद्री हा प्रमुख जलविभाजक असून त्यामुळे

📌अरबी समुद्राला मिळणाऱ्या
पश्चिम वाहिनी नद्या व 🔙🔙
📌बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या पूर्ववाहिनी नद्या🔜🔜 असे त्यांचे विभाजन झालेले आहे

◾️ सह्याद्रीची निर्मिती प्रस्तरभंगामुळे झाली आहे

◾️महाराष्ट्राच्या क्षेत्रफळात पश्चिम घाटाचा वाटा 12.2 % इतका आहे

◾️सह्याद्रीची सरासरी उंची 915 मिटर ते 1220 मीटर आहे

◾️भारतातील लांबी 1600 किलोमीटर इतकी आहे तर महाराष्ट्रातील लांबी 750 किलोमीटर इतकी आहे

◾️  महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसूबाई हे नाशिक व नगर जिल्ह्यातदरम्यान आहे

◾️  कळसुबाई ची उंची 1646 मीटर🏔 इतकी आहे कळसुबाईला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असे म्हणतात

◾️सह्याद्रीच्या मुख्य दक्षिण-उत्तर रांगेपासून पूर्वेकडे अनेक डोंगररांगा फुटलेले आहेत

महाराष्ट्र जिल्हे निर्मिती :

1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)
औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा)

16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून – लातूर (29 वा जिल्हा),

26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली (30 वा जिल्हा)

1990 : मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)

1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार (32 वा जिल्हा)
अकोल्यापासून – वाशिम (33 वा जिल्हा)

1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली (34 वा जिल्हा)
भंडारा  – गोंदिया (35 वा जिल्हा)

1 ऑगस्ट 2014 : ठाण्यापासून – पालघर (36 वा जिल्हा)

तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता

क्रम
1. औरंगाबाद - 8 जिल्हे , 76 तालुके
2. नागपूर - 6 जिल्हे , 64 तालुके
3. पुणे - 5 जिल्हे , 58 तालुके
4. अमरावती - 5 जिल्हे , 56 तालुके
5. नाशिक - 5 जिल्हे , 54 तालुके
6. कोकण - 7 जिल्हे , 50 तालुके

⭕️ महाराष्ट्रातील सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे

1. यवतमाळ , नांदेड - 16 तालुके

2. रायगड , नाशिक , जळगाव , चंद्रपूर - 15 तालुके

3.पुणे , अहमदनगर , अमरावती , नागपूर - 15 तालुके

🎾 कोकणातील प्रमुख नद्या (उत्तरेकडून दक्षिणेकडे)

1. पालघर जिल्हा - दमणगंगा , सुर्या , वैतरणा , तानसा

2. ठाणे जिल्हा - भातसई , काळू , उल्हास

3. रायगड जिल्हा - पाताळगंगा , अंबा , कुंडलिका , काल

4. रत्नागिरी जिल्हा - सावित्री , जोग , जगबुडी , वाशिष्ठी , शास्त्री , बाव

5. सिंधुदुर्ग जिल्हा - काजवी , मुचकुंदी , शुक , गड , वाघोटन , कर्ली , तेरेखोल

⭕️ महाराष्ट्रातील नद्यांची माहिती(उतरत्या क्रमाने)

👉 नदीखोऱ्यांच्या क्षेत्रफळानुसार(चौ.किमी)

1.गोदावरी - 69000
2. भीमा - 46184
3. वर्धा - 46182
4. वैनगंगा - 38000
5. तापी - 31200
6. कृष्णा - 28700

👉 लांबीनुसार(किमी)
1. गोदावरी - 668
2. पैनगंगा - 495
3. वर्धा - 455
4. भीमा - 451
5. वैनगंगा - 295
6. कृष्णा - 282
7. तापी - 208

⭕️ पाणी उपलब्धतेनुसार(टी एम सी)
1. कृष्णा - 769
2. वैनगंगा - 719
3. गोदावरी - 404
4. भीमा - 309
5. तापी - 229

जगातील भौगोलिक उपनाव व त्यांची टोपण नावे


_______________________________
  🔸भौगोलिक उपनाव  -     🔸टोपणनाव
_______________________________
1) ऑड्रियाटिकची राणी - व्हेनिस (इटली)

2) उगवत्या सूर्याचा प्रदेश - जपान

3) काळे खंड - आफ्रिका

4) कांगारूची भूमी - ऑस्ट्रेलिया

5) गगनचुंबी इमारताचे शहर - न्यूयॉर्क

6) चीनचे अश्रू - व्हंग हो नदी

7) गोर्‍या माणसाचे कबरस्तान - गिनीचा किनारा

8) जगाचे छप्पर - पामिराचे पठार

9) दक्षिणेकडील इंग्लंड - न्यूझीलंड

10) नाईलची देणगी - इजिप्त

11) पवित्र भूमी - पॅलेस्टाईन

12) पाचुचे बेट - श्रीलंका

13) पूर्वेकडील ब्रिटन - जपान

14) भूमध्य सागराची किल्ली - जिब्राल्टर

15) मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश - नॉर्वे

16) गव्हाचे कोठार - युक्रेन
_______________________________

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे प्रमुख

- पंजाब आणि सिंध बॅंक
मुख्यालय: नवी दिल्ली
प्रमुख: एस. हरीशंकर

- बॅक ऑफ महाराष्ट्र
मुख्यालय: पुणे
प्रमुख: ए. एस. राजीव

- युको बॅंक
मुख्यालय: कोलकाता
प्रमुख: अतुल कुमार गोयल

- इंडियन ओव्हरसिज बॅंक
मुख्यालय: चेन्नई
प्रमुख: कमाम सेकर

- सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया
मुख्यालय: मुंबई
प्रमुख: पल्लव मोहापात्रा

- इंडियन बॅंक
मुख्यालय: चेन्नई
प्रमुख: पद्मजा चुनदूरू

- बॅंक ऑफ इंडिया
मुख्यालय: मुंबई
प्रमुख: दीनबंधू मोहापात्रा

- युनियन बॅंक ऑफ इंडिया
मुख्यालय: मुंबई
प्रमुख: राजकीरण राय जी.

- कॅनरा बॅंक
मुख्यालय: बेंगलोर
प्रमुख: आर. ए. शंकर नारायणन

- बॅंक ऑफ बडोदा
मुख्यालय: वडोदरा
प्रमुख: पी. एस. जयकुमार

- पंजाब नॅशनल बॅंक
मुख्यालय: नवी दिल्ली
प्रमुख: सुनिल मेहता

- स्टेट बँक ऑफ इंडिया
मुख्यालय: मुंबई
प्रमुख: रजनिश कुमार------------------------------------
----------------------------------------
*भारतीय घटनेची वैशिष्ट्ये प्रश्नसंच*

1) भारताची घटना प्रामुख्याने कोणत्या प्रकारचे आहे?
लिखित👈
अलिखित
दोन्ही
यापैकी नाही
-------------------------_--------------
2)ब्रिटनची घटना कोणत्या प्रकारची घटना आहे?
लिखित
अलिखित 👈
दोन्ही
यापैकी नाही
---------------------------_------------
3)भारताची घटना जगातील सर्व लिखित घटनापैकी  कोणत्या प्रकारची घटना आहे?
सर्वात मोठी👈
सर्वात लहान
मध्यम
यापैकी नाही
----------------------------------------
4)1949 च्या मूळ घटनेत एक प्रस्ताविका 22 भाग 395 कलम आणि किती अनुसूची होत्या?
पाच 5
सहा 6
सात 7
आठ 8आ
---------------------------_------------
5)2013 मध्ये भारताच्या घटनेत 25 भाग 459 करणे आणि किती अनुसूची आहेत?
आठ
दहा
अकरा
बारा👈
----------------------------------------
6)अमेरिकेच्या घटनेत केवळ किती कलम आहेत?
पाच
सहा
सात 👈
आठ
----------------------------------------
7)जम्मू-काश्मीर या राजासाठी विशेष कलम कोणते होते जे सध्या रद्द झालेले आहे?
370👈
371
372
373
----------------------------------------
8)भारतीय घटना तयार करण्यासाठी किती देशाच्या घटनेचा विचार करण्यात आला होता?
60 👈
50
70
80
----------------------------------------
9)भारतीय घटनेतील मूलभूत हक्क व मार्गदर्शक तत्वे अनुक्रमे कोणत्या देशाच्या घटनेवर घेण्यात आलेली आहेत?
चीन व अमेरिका
अमेरिका व आयरिश 👈
अमेरिका व रशिया
रशिया व चीन
----------------------------------------
10)भारतातील संसदीय शासन व्यवस्था कोणत्या देशाच्या घटनेवर आधारलेली आहे?
चीन
रशिया
ब्रिटन 👈
अमेरिका
----------------------------------------
11)घटनेत संघराज्य योजना, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी, राज्यपालाचे पद ,प्रशासकीय तपशील, हे घटक हे तत्व कोणत्या कायद्यानुसार घेण्यात आले आहेत?
भारतीय शासन कायदा 1948
भारतीय शासन कायदा 1935 👈
भारतीय शासन कायदा 1919
भारतीय शासन कायदा 1905
----------------------------------------
12) संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट व्यवस्था, कायदा करण्याची पद्धत, कायद्याचे राज्य, एकच नागरिकत्व, संसदीय विशेषाधिकार, हे घटक भारतीय घटना मध्ये कोणत्या देशाच्या घटनेवर आधारित आहेत?
रशिया
ब्रिटन 👈
चीन
अमेरिका
----------------------------------------
13) मूलभूत हक्क,उपराष्ट्रपती हे पद, न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन,राष्ट्रपति वर महाभियोगाची पद्धत,हे तत्व घटनेत कोणत्या देशाच्या घटनेवर आधारित आहे
यूएसए 👈
रशिया
चीन
ब्रिटन
----------------------------------------
14)प्रभावी केंद्र असलेले संघराज्य,केंद्रा करिष शेषाधिकार,राज्यपालाची केंद्राचे प्रतिनिधी,म्हणून हे तत्व कोणत्या देशाच्या घटनेवर घेण्यात आलेल्या आहेत?
कॅनडा 👈
अमेरिका
चीन
रशिया
----------------------------------------
15)राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, राष्ट्रपतीच्या निवडणुकीत ही पद्धत, राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन,हे तत्व कोणत्या देशाच्या घटनेवर आधारित आहेत?
अमेरिका
चीन
आयरिश 👈
रशिया