Tuesday, 26 October 2021
बौद्ध परिषदा
🎯पहिली बौद्ध परिषद
👁🗨काळ:-483 इ स पू
👁🗨अद्यक्ष:-महाकश्यप
👁🗨ठिकाण:-राजगृह
👉राजा:-अजातशत्रू
🎯दुसरी बौद्ध परिषद
🔘काळ:-387 इ स पू
🔘अद्यक्ष:-महास्तवीर रेवत
🔘ठिकाण:-वैशाली
👉राजा:-कालाशोक
🎯तिसरी बौद्ध परिषद
👁🗨काळ:-243 इ स पू
👁🗨अद्यक्ष:-मोगलीपुत्र तिस्स
👁🗨ठिकाण:-पाटलीपुत्र
👉राजा:-अशोक
🎯चौथी बौद्ध परिषद
🔘काळ:-पहिले शतक
🔘अद्यक्ष:-वसुमित्र
🔘ठिकाण:-कुंडलवण
👉राजा :-कनिष्क
जाणून घ्या 1857 च्या उठावाची कारणे
📖 सन 1757 ते 1856 हा भारतातील इंग्रजी सत्तेच्या विस्ताराचा काळ होता. सन 1856 पर्यंत जवळ-जवळ संपूर्ण भारतावर इंग्रजांची सत्ता प्रस्थापित झाली होती.
सन 1857 मध्ये भारतात इंग्रजांविरुध्द मोठा सशस्त्र उठाव झाला. हा राष्ट्रीय उठाव म्हणून प्रसिध्द आहे. 1857 च्या स्वातंत्र्ययुध्दांत देशाच्या विस्तृत भागात लक्षावधी लोकांचा सहभाग असल्यामुळे ब्रिटिश सत्तेला अगदी मुळापासून हादरा बसला. यामागे असणारी कारणे जाणून घेऊयात...
📍 *राजकीय कारणे* :
▪ इ.स.1600 मध्ये ब्रिटीश ईस्ट इंडिया स्थापना झाली.
▪ इ.स.1757 च्या प्लासीच्या लढाईने ब्रिटीश सत्तेचा पाया भारतात रचला गेला.
▪ इ.स.1798 मध्ये वेलस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला.
▪ तैनाती फौजेच्या पद्धतीचा अवलंब करुन साम्राज्य विस्तारावर भर दिला.
▪ वेलस्लीने निजाम मराठ्यांचे शिंदे, होळकर, भोसले इ. सरदार अयोध्येचा नवाब पेशवा दुसरा आविला व अनेक संस्थाने बरखास्त केली.
▪ लॉर्ड क्लाईव्ह, लॉर्ड वॉरन हेस्टिंग, लॉर्ड बेटिंग, लॉर्ड डलहौसी या गव्हर्नर जनरलनी देशभर कंपनीचे वर्चस्व निर्माण केले.
📍 *आर्थिक कारणे* :
▪ ब्रिटिशांनी आर्थिक साम्राज्यावादावर भर दिला होता.
▪ 18 व्या शतकात युरोपात औद्योगिक क्रांती घडून आली.
▪ शेती हा भारतीयांचा प्रमुख व्यवसाय होता. शेतकऱ्यांना उत्पन्नाच्या 2/3 हिस्सा कर म्हणून ब्रिटिश सरकारला द्यावा लागत होता.
📍 *लष्करी कारणे* :
▪ शिपाई बंडास तयार होत नाही, तोपर्यंत उठाव घडून येणे शक्य नव्हते. पण राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक कारणामुळे जनतेत असंतोष निर्माण झाला.
▪ शिपायांनी हाती बंदूक घेतली आणि उठावास सुरुवात झाली.
▪ ब्रिटिशांनी अनेक लष्करी कायदे मंजूर करुन हिंदी शिपायांवर निर्बंध लादले.
▪ इ.स.1806 मध्ये कायदा पास करुन हिंदी शिपायांवर गंध लावण्याची व दाढी करण्याची सक्ती केली.
📍 *धार्मिक कारणे* :
▪ ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने धार्मिक साम्राज्यवादाचा पुरस्कार केला.
▪ इ.स.1813 च्या चार्टर अॅक्टनुसार धर्मप्रसारासाठी कंपनीची मदत मिळू लागली.
▪ अनेक धर्म प्रसारक ख्रिश्चन धर्मप्रसारासाठी भारतात येऊ लागले.
▪ कंपनी सरकारने अनेक हिंदू मंदिरांची व मुस्लीम मशिदीची वतने काढून घेतला
अंधार कोठडीची घटना
◆ कलकत्ता (विद्यमान कोलकाता) येथील फोर्ट विल्यम किल्ल्यातील कैद्यांना ठेवण्याची एक खोली.
◆ १७५६ मधील एका घटनेमुळे ती अंधारकोठडी म्हणून इतिहासात महत्त्व पावली.
◆ सिराजउद्दोला बंगालचा नबाब असताना बंगालचा इंग्रज गव्हर्नर ड्रेक याने नबाबाच्या शत्रूंना आश्रय दिला.
◆ इंग्रजांनी नबाबाची परवानगी न घेता कलकत्त्यात तटबंदी बांधण्याचे काम सुरू केले.
◆ नबाबाने हरकत घेऊनही ड्रेकने बांधकाम थांबविले नाही. त्या वेळी नबाबाने फोर्ट विल्यमवर हल्ला करून इंग्रजांकडून किल्ला घेतला.
◆ गव्हर्नर ड्रेक बायकामुलांसह पळाला. सिराजउद्दोला याने सेनाधिकारी हालविले व आणखी १४५ इंग्रजांना किल्ल्याच्या पूर्व दरवाज्याच्या दक्षिणेस तीस मी. अंतरावर असलेल्या ५·५ × ४·२५ × ३ घ.मी. च्या खोलीत डांबले.
◆ खोली कोंदट होती व तीत हवा येण्यास दोनच लहान झरोके होते. अशा ह्या कोठडीत १४५ माणसे दहा तास होती. त्यांपैकी १२३ गुदमरून मृत्यूमुखी पडली.
◆ काही इतिहासकार अंधारकोठडीची कथा कपोलकल्पित समजतात, तर काहींच्या मते ती मुळात सत्यच आहे; फक्त अतिरंजित करून वर्णिली गेली आहे.
नागपूर अधिवेशन २६ डिसेंबर १९२०
असहकाराचा ठराव वित्तरंजन दास यांनी मांडला.
असहकाराच्या कार्यक्रमाअंतर्गत अनेक बाबी स्वीकारल्या.
(৭) सरकारी पदव्यांचा त्याग करणे.
(२) सरकारी शाळा कॉलेजांवर बहिष्कार टाकणे.
(३) राष्ट्रीय शाळांची स्थापना करणे.
(४) सरकारी कार्यालयांवर बहिष्कार टाकणे,
(५) परकीय मालावर बहिष्कार.
(६) भांडण-तंटे पंचायतींमार्फत सोडवणे.
(७) सुतकताई व कापड विणण्यास प्रोत्साहन देणे.
(8)हिंदू-मुस्लिमांमधील ऐक्य वाढवणे.
(९) अस्पृश्यता न पाळणे.
(१०) संपूर्ण आंदोलनात अहिंसेचे पालन करणे.
(৭৭) मेसोपोटेमियात पाठवण्यासाठी केल्या जाणाऱ्या
मुलकी, लष्करी नोकर भरतीवर बहिष्कार घालावा.
आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव घटना
🖌गांधीजींनी भारतातील पहिला सविनय कायदेभंगाचा प्रयोग कोठे केला?
- चंपारण्य
🖌गांधीजींनी भारतातील पहिले उपोषण कोठे केले?
- अहमदाबाद गिरणी लढा
🖌गांधीजींनी भारतातील पहिला असहकाराचा प्रयोग कोठे केला?
- खेडा सत्याग्रह
🖌गांधीजींनी आपल्या कोणत्या पहिल्या जनव्यापक चळवळीत पहिल्यांदाच सत्याग्रह या तत्वाचा वापर केला?
- असहकार चळवळ
🖌गांधीजींनी अन्यायाचा विरुद्ध त्यांचा जीवनातील पहिला सत्याग्रह हा कोठे केला?
- 1906 रोजी नाताळ येथे
🖌गांधीजींनी सर्वप्रथम राष्टध्वजाबाबत त्यांची कल्पना ही कोणत्या पेपरमध्ये लेख लिहुन मांडली?
- यंग इंडिया
🖌गांधीजींनी भारतात सत्याग्रह आश्रम हा कोठे स्थापन केला?
- साबरमती
🖌गांधीजी राष्ट्रीय कांग्रेस चे अध्यक्ष असलेले प्रथम व एकमेव अधिवेशन कोणते?
- 1924 चे बेळगाव अधिवेशन
🖌गांधीजींनी स्त्रियांना सर्वप्रथम संपुर्ण भारतीय स्वातंत्र्य संग्रामात कोणत्या चळवळीने आणले?
- सविनय कायदेभंग चळवळ
🖌गांधीजींचे भारतातील पहिले चरित्र हे कोणी लिहिले?
- अवंतिकाबाई
जालियनवाला बाग हत्याकांड
👉दिनांक 13 एप्रिल 1919 रोजी ब्रिटिश-भारतात ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर ह्याने अमृतसर (पंजाब) येथील जालियनवाला बाग ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले. या घटनेला यावर्षी 100 वर्षे पूर्ण होत आहेत.
👉इतिहास👈
👉सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलू या दोन स्वातंत्र्यवीरांच्या सुटकेची मागणी करण्यासाठी एक घोळका दिनांक 10 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमध्ये जात होता.
👉 त्यावेळी त्यांच्यावर गोळीबार केला गेला आणि परिणामी तेव्हापासून हिंसक घटनांना सुरुवात झाली.
👉दोन्ही बाजूंच्या प्रतिकारात्मक कारवायांच्या पार्श्वभूमीवर अखेर 13 एप्रिल रोजी पंजाबमध्ये मार्शल लॉ लागू करण्यात आला. त्याचदिवशी ’बैसाखी’ हा पंजाबी सण देखील होता.
👉हा सण साजरा करण्यासाठी प्रचंड जनसमुदाय जालीयानवाला बागेत जमला होता, जे की मार्शल लॉ लागू असल्याने नियमबाह्य होते.
👉जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर गोळीबार केला.
👉या सभेत स्त्रिया आणि पुरूषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. या घटनेत 379 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
पृथ्वीची अक्षीय गती
◆ पृथ्वीच्या मध्यातून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला तिचा अक्ष व ज्या अक्षाभोवती पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरत असते, त्याला भ्रमणाक्ष म्हणतात.
◆ भ्रमणाभोवती एक फेरी पूर्ण करण्यास पृथ्वीला जो कालावधी लागतो, त्याला दिवस म्हणतात.
◆ अक्षीय गती ही पृथ्वीची दैनिक गती असून तिच्यामुळेच दिवस व रात्र होत असतात.
◆अक्षीय गतीमुळे विषुववृत्तावरील प्रत्येक बिंदू ताशी सु. १,६०० किमी. गतीने फिरत असतो आणि जसजसे ध्रुवावरील बिंदूची गती शून्य असते.
◆ अक्षीय गतीमुळे उत्तर गोलार्धामधील गतिशील वस्तू उजवीकडे विचलित होते; अशा प्रकारे चक्रवात हा अक्षीय गतीचा पुरावा आहे. मात्र फूको लंबक (जे. बी. एल्. फूको या फ्रेंच भौतिकीविज्ञांनी शोधून काढलेला लंबक) हा अक्षीय गतीचा पहिला दृश्य पुरावा आहे.
◆ पृथ्वीच्या अक्षीय गतीत पुढील तीन प्रकारचे बदल होत असतात व त्यांच्यामुळे दिवसाचा (दिवस व रात्र यांचा मिळून) कालावधीही बदलत असतो.
प्रश्न मंजुषा
१) महाराष्ट्रातील क्षेऋफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा ?
१) पुणे
२)नागपूर
३)मुंबई
४)अहमदनगर ✅
२) २०११ च्या घनातेनुसार महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठा जिल्हा हा आहे ?
१)नाशिक
२)पुणे
३)मुंबई उपनगर ✅
४)मुंबई शहर
३) हिंगोली जिल्ह्याची निर्मिती कोणत्या जिल्ह्यातून विभाजन होऊन झाली आहे..?
१)ठाणे जिल्हा
२)पुणे जिल्हा
३) वाशिम जिल्हा
४)परभणी जिल्हा ✅
४) नांदेड जिल्ह्यात एकूण तालुके किती आहेत ?
१)१६ ✅
२)०९
३)१३
४)१०
५) अमरावती जिल्हास कोणत्या राज्याची सीमा लागून आहे.?
१) आंध्र प्रदेश
२)तेलंगणा
३)मध्य प्रदेश ✅
४)कर्नाटक
६) अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला स्थित आहे ?
१) पूर्व - पश्चिम
२) पश्चिम - उत्तर
३)उत्तर - पूर्व ✅
४) दक्षिण - पूर्व
७ ) बुलढाणा जिल्ह्याचे पूर्वीचे नाव काय ?
१)भिलेवडा
२) भिल्लेश्र्वर
३) भिवटेकडी
४) भिलठाण ✅
८ ) लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) अमरावती
२) लात्तुर
३) सोलापूर
४)बुलढाणा ✅
९) सहस्त्रकुंड धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) चंद्रपूर
२) नागपूर
३) भंडारा
४) यवतमाळ ✅
१० ) कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) सांगली
२)सातारा ✅
३)धुळे
४) औरंगाबाद
११) धुळे जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत ?
१)४ ✅
२)१०
३)१४
४)१६
१२) तोरणमाळ डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) जळगाव जिल्हा
२) बुलढाणा जिल्हा
३)नाशिक जिल्हा
४) नंदुरबार जिल्हा ✅
१३) खान्देशी जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रख्यात आहे ?
१) वाशिम जिल्हा
२) धुळे जिल्हा
३) जळगांव जिल्हा ✅
४)हिंगोली जिल्हा
१४) गौताळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
१) जालना जिल्हा
२)परभणी जिल्हा
३) सातारा जिल्हा
४) औरंगाबाद जिल्हा ✅
१४) भारतातील सर्वात पहिली सूतगिरणी कुठे सुरू झाली ?
👉 ११ jully १८५१ रोजी भारतातील पहिली सूतगिरणी मुंबईत सुरु झाली.येथून मुंबईमध्ये अनेक सूतगिरण्यासह औधोगिक वाढीस सुरुवात झाली.
१५) महाराष्ट्रातील सर्वात जास्त साक्षरता जिल्हा कोणता व त्याचे प्रमाण किती टक्के आहे.?
Ans.मुबंई उपनगर जिल्हा त्याचे प्रमाण 89.9% इतके आहे.
राज्यसभा
● राज्यसभा
राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह असून ते व्दितीय सभागृह आहे असे म्हटले जाते तर लोकसभा कनिष्ठ सभागृह असून प्रथम सभागृह मानले जाते.
■ सभासदांची संख्या :
घटनेच्या 80 व्या कलमामध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की, राज्यसभेची सभासद संख्या 250 इतकी असेल त्यातील 238 निर्वाचित असतील तर 12 सदस्य भारताच्या राष्ट्रपतींकडून नियुक्त केलेले असतील यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ञ असतील.
उदा. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक इ.
■ उमेदवारांची पात्रता :
घटनेच्या 84 व्या कलमात सभासदांची पात्रता सांगितली आहे ती पुढीलप्रमाणे:
1. तो भारताचा नागरिक असावा.
2. त्याच्या वयाची 30 वर्ष पूर्ण झालेली असावी.
3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.
■ निवडणूक पद्धत :
राज्यसभेच्या सदस्यांची निवड भारतीय नागरिकांकडून न करता प्रत्येक घटक राज्याच्या विधानसभेत निवडून आलेल्या उमेदवारांकडून केली जाते व ही निवडणूक पद्धत प्रत्यक्ष नसून अप्रत्यक्ष आहे.
■ राज्यसभेचा कार्यकाल :
राज्यसभा हे स्थायी सभागृह असून दर दोन वर्षानी 1/3 सभासद निवृत्त होतात. तेवढेच त्याच्या जागी नव्याने निवडतात.
■ सभासदांचा कार्यकाल :
प्रत्येक सभासदाचा कार्यकाल हा 6 वर्ष इतका असतो परंतु कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी तो आपला राजीनामा राज्यसभेच्या अध्यक्षाकडे देऊ शकतो.
■ पदमुक्तता :
कोणत्याही सभागृहाची परवानगी न घेता एखादा सदस्य सतत 60 दिवस सभागृहात गैरहजर राहिल्यास त्याचे सभासदत्व आपोआप रद्द होते. परंतु (60 दिवसात संबंधित सभागृहाला लागोपाठ चार दिवस सुट्ट्या आल्या असतील तर सभासदत्व रद्द होत नाही.)
■ बैठक किंवा आधिवेशन :
घटनेच्या 85/1 कलमामध्ये सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक सभागृहाची योग्य वाटेल त्यावेळी अधिवेशन बोलवितो परंतु या अधिवेशनामध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे.
■ गणसंख्या :
कोणतेही सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी आवश्यक असलेली सभासद संख्या म्हणजेच गणसंख्या होय. ती 1/10 इतकी निर्धारित करण्यात आली आहे.
■ राज्यसभेचा सभापती :
घटनेच्या 89व्या कलमानुसार भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. तो राज्यसभेचा सभासद नसल्यामुळे त्याला सभागृहात मतदान करण्याचा अधिकार नाही परंतु 100 व्या कलमानुसार समान मते पडल्यास तो आपले निर्णायक मत देऊ शकतो.
■ उपाध्यक्ष :
राज्यसभेतील निवडून आलेल्या एका सदस्याची उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाते.
_______________________________
आचारसंहिता म्हणजे काय ?
महाराष्ट्रासह हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. शनिवारी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महासंग्रामाची घोषणा केली. २१ सप्टेंबरपासून महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. पण, आचारसंहिता म्हणजे काय? आचारसंहितामध्ये काय करू नये? असे बरेच प्रश्न तुम्हाला पडले असतील. या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला देणार आहोत.
निवडणुकीत भाग घेणारे राजकीय पक्ष व उमेदवार यासाठी निवडणूक आयोग एक आदर्श आचारसंहिता तयार करत असतो, तिचे पालन करणे प्रत्येक राजकीय पक्षासाठी व उमेदवारांसाठी बंधनकारक असते. भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२४ नुसार निवडणूक आयोगाकडे निवडणुकीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकार, सर्व उमेदवार आणि पक्षावर देखरेख करण्याचा अधिकार आहे. आचारसंहितेचं मॅन्युएल निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. या तत्त्वांना आदर्श आचारसंहिता असं म्हटलं जाऊ लागलं आणि निवडणुकांच्या काळात त्यांचा वापर होऊ लागला.
🔷 कोणत्या गोष्टींचं पालन होणं आवश्यक आहे?
शेवटच्या ४८ तासांदरम्यान प्रचारावर प्रतिबंध- निवडणूक संपण्याची वेळ निश्चित झाल्यापासून त्याआधीच्या ४८ तासांच्या दरम्यान कोणत्याही मार्गाने व कोणत्याही प्रकारे निवडणुकीविषयी कार्यवाही करण्यास लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१, कलम १२५ अंतर्गत प्रतिबंध करण्यात आला आहे.
मतदारांना आमिष देणं किंवा धमकावणं, हे आदर्श आचारसंहितेचा भंग करणारं ठरू शकतं.
राजकीय धोरणावर टीका करण्याची मुभा असते. पण मतं मिळवण्यासाठी ते एकमेकांची जात किंवा धर्म काढू शकत नाहीत.
बैठका किंवा रॅली घेण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घेणं आवश्यक असतं.
एखाद्या सभेत विरोधकांचा पुतळा जाळणं, हेही नियमात बसत नाही.
आचारसंहितेच्या काळात मंत्र्यांना किंवा सरकारला नव्या घोषणा करता येत नाहीत. त्यासाठी निधी जाहीर करता येत नाहीत.
मतदान केंद्रात कर्मचारी, अधिकारी आणि मतदारांव्यतिरिक्त कुणालाच जाण्याची परवानगी नसते.
मतदान केंद्रापासून १०० मीटर अंतरापर्यंत कार्यकर्ते आपल्या पक्षाचा प्रचार करू शकत नाहीत.
जर एखाद्या उमेदवाराने आचारसंहितेचा भंग केला तर त्याची तक्रार निवडणूक आयोगाला नियुक्त केलेल्या निरीक्षकाकडे करता येते.
पक्षाच्या कामासाठी सरकारी यंत्रणेचा वापर करणं म्हणजे आचारसंहितेचा भंग ठरतं. सरकारी माध्यमांचा वापर करून पक्षाची जाहिरात करता येत नाही.
प्रश्न मंजुषा
१. पचलेल्या अन्नाचे रक्तात अवशोषन होऊन त्याचा ऊपयोग उर्जा निर्मीतीसाठी केला जातो.
या क्रियेला काय म्हणतात?
1)पचन
2)अवशोषण (absorption)
3)सात्मिकरन (Assimilation)✅
4)उत्सर्जन (Excretion)
👉5 steps of Digestion
Ingestion ➡️Digestion➡️Absorption➡️Assimilation➡️Egestion
२. आधुनिक आवर्तसारणीचे मांडणी कोणी केली?
1)डोबेरायनर
2)न्यूलँडस
3)मेंडेलिव
4)हेन्री मोस्ले✅
३. पुढीलपैकी कोणते व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मध्ये नाही?
1)थायमिन
2)रायबोफ्लेविन
3)फॉलिक ऍसिड
4)एस्कॉर्बिक ऍसिड✅
5)वरीलपैकी सर्व येतात.
👉व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्समध्ये खालील 8 जीवनसत्त्वे असतात.
व्हिटॅमिन बी 1 थायामिन
बी 2 रिबोफ्लेविन
बी 3 नियासिन
बी 5 पँटोथेनिक ऍसिड
बी 6 पायरिडॉक्साइन
बी 7 बायोटिन
बी 9 फॉलिक ऍसिड
बी 12 सायनोकोबालामिन
👉एस्कॉर्बिक ऍसिड =व्हिटामीन C
४. मुलद्रव्याच्या अणूमध्ये बाहेरच्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन असतात तेव्हा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत नाही?
1)12
2)6
3)7
4)8✅
५.खालील विधानांचा विचार करा.व योग्य विधाने निवडा
1)अणुमधील प्रोटोन्स व न्युट्रोन्स ची संख्या म्हणजे अणु अंक होय.
2)कोणत्याही मुलद्रव्याचे रासायनिक गुणधर्म अणुअंकानुसार नियंत्रीत होतात.
3)अणुअन्काला मुलद्रव्याचे रासायनिक ओळख म्हणतात.
A)1 व 2
B)2 व 3✅
C) फक्त 1
D)1,2 व 3
👉अणुमधील प्रोटोन्स व न्युट्रोन्स ची संख्या म्हणजे अणु वस्तुमान अंक(Mass Number)होय.
अणुमधील प्रोटोन्स ची संख्या म्हणजे अणुअंक होय.
६. 1803 मध्ये कोणत्या शास्त्रज्ञाने अणुसिध्दंत मांडला ?
1)चांडविक
2)रुदरफोर्ड
3)डाल्टन✅
4)थॉमसन
७. 1911 मध्ये कोणत्या शास्त्रज्ञाने सोन्याच्या पत्र्याचा वापर केला आणी अणुमध्ये एक अतिशय लहान भरीव असे अणुकेंद्रक असते हे सिध्द केले?
1)चांडविक
2)रुदरफोर्ड✅
3)डाल्टन
4)थॉमसन
८. न्युट्रोन चा शोध कोणी लावला?
1)चांडविक✅
2)रुदरफोर्ड
3)कणाद
4)थॉमसन
👉इलेक्ट्रॉन=थॉमसन
प्रॉटोन=गोल्डस्टीन
९. खालील विधाने पाहा..
1)पाणी हे मिश्रण आहे.
2)हायड्रोजन व ओक्सिजन चे 1:2 प्रमाणात संयोग होऊन पाणी बनते
A)दोन्ही विधाने चूक✅
B)दोन्ही विधाने अचुक
C)फक्त विधान 1 चूक
D )फक्त विधान 2 चूक
👉पाणी हे संयुग आहे.
हायड्रोजन व ओक्सिजन चे 2:1 प्रमाणात संयोग होऊन पाणी बनते
१०. खालीलपैकी संप्लवनशील पदार्थ कोणते?
1)नवसागर व कापूर
2)कोळसा व शिसे
3)हिरा व चुना
A)1 व 2
B)2 व 3
C) फक्त 1✅
D)1,2 व 3
११.अर्सेनीक ,सिलिकॉन व सेलेनियम ही कोणती उदाहरणे आहेत?
1)धातू
2)अधातू
3)धातूसदृश्य ✅
4)वरीलपैकी सर्व
१२. पाणी किती फरनहेट( °f) ला गोठते?
1)31°f
2)0°f
3)32°f✅
4]37°f
१३. खालीलपैकी सत्य विधान ओळखा.
1)इलेक्ट्रॉन धन प्रभारित असतात.
2)न्युट्रोन ऋन प्रभारित असतात.
3)प्रोटोन्स प्रभार रहित असतात.
A)1 व 2
B)1,2 व 3
C) फक्त 1
D)यापैकी एकही नाही✅
👉1)इलेक्ट्रॉन ~धन~ ऋण प्रभारित असतात.
2)न्युट्रोन ~ऋन~ प्रभार रहित असतात.
3)प्रोटोन्स ~प्रभार रहित~ धन प्रभारित असतात.
१४. पित्त शरीरातील कोणत्या अवयवाद्वारे स्त्रवले जाते?
पित्त हे यकृत (Liver) या अवयवाद्वारे स्त्रवले जाते
यकृत पित्त गॉल ब्लँडर मध्ये स्त्रवतो.
यकृत = वजन 1500 ग्राम
१५. डिग्री सेल्सियस तापमानाचे डिग्री फैरनहेट( °f) मध्ये रुपांतरण कसे करतात?
(X °C × 9/5) + 32 = °F
मूलद्रव्ये व संज्ञा
अॅल्युमिनियम - Al
बेरीअम - Ba
कोबाल्ट - Co
आयोडीन - I
मॅग्नेशिअम - Mg
मॅग्नीज - Mn
निकेल - Ni
फॉस्फरस - P
रेडीअम - Ra
सल्फर - S
युरेनिअम - U
झिंक - Zn
चांदी - Ag
सोने - Au
तांबे - Cu
लोखंड - Fe
पारा - Hg
शिसे - Pb
कथिल - Sn
टंगस्टन - W
तरंगण्याचा नियम :
· पाण्याहून कमी घनता असलेला पदार्थ पाण्यावर तरंगतो.
· लाकडाचा ठोकळा पाण्यावर तरंगतो. पाण्यात जातांना तो पाणी बाजूला सारतो. सारलेल्या पाण्याचे वजन ठोकळ्याच्या वजनाएवढे होते.
या वेळी ठोकळ्याचे वजन आणि ठोकळ्यावर कार्य करणारे प्लावी बल समान असते.
· एक लोखंडी जाड पत्रा पाण्यात पडला की तो बुडतो. तथापि तोच पत्रा ठोकून घमेले केले तर ते पाण्यात तरंगते.
· अॅल्युमिनियमची फॉईल पाण्यावर तरंगते पण त्याचीच चुरगळून बनविलेली गोळी मात्र पाण्यात बुडते आणि पार्यांवर तरंगते. यांचे कारण घनतेतील बदल होय.
· पदार्थाची घनता म्हणजे त्याचे वस्तुमान व आकारमान यांचे गुणोत्तर होय. त्याचे SI पद्धतीतील एकक किलोग्रॅम/मीटर3 असे आहे.
· जर वस्तूची घनता द्रवाच्या घनतेपेक्षा अधिक असेल तर ती पाण्यात बुडते. मात्र जर वस्तूची घनता द्रवाच्या घनतेपेक्षा कमी असेल तर ती पाण्यावर तरंगते.
· पदार्थाची सापेक्षा घनता म्हणजे त्याच्या घनतेचे पाण्याच्या घनतेशी असणारे गुणोत्तर होय.
· सापेक्ष घनता = पदार्थाची घनता / पाण्याची घनता
· यालाच पदार्थाचे 'विशिष्ट गुरुत्व' म्हणतात.
अणूंची संरचना
🔰 इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्युट्रॉन हे अणूतील मूलकण आहेत.
🔰 अणूच्या केंद्रकात प्रोटॉन आणि न्युट्रॉन असतात. अणूच्या केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन परिभ्रमण करतात.
🔰 प्रोटॉन धनप्रभारीत, इलेक्ट्रॉन ऋण प्रभारीत तर न्युट्रॉनवर कोणताच प्रभार नसतो.
·🔰 अणुक्रमांक (Z) म्हणजेच अणुतील इलेक्ट्रॉन किंवा प्रोटॉनची संख्या.
🔰 अनुवस्तुमानांक म्हणजे अणुतील प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्या संख्याची बेरीज.
🔰 मूलद्रव्याच्या संस्थानिकात अणुक्रमांक सारखाच असून अणूवस्तुमानांक भिन्न असतो.
🔰 मूलद्रव्याच्या इतर मूलद्रव्यांशी संयोग पावण्याचा क्षमतेला 'संयुजा' म्हणतात.
〰〰〰〰〰〰〰
Latest post
आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024
🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे 🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...
-
संपूर्ण महाराष्ट्राला सोपा जाणारा Geography हा विषय आहे....मग नेमकं या मधील कोणते घटक व्यवस्थित अभ्यासले पाहिजेत. खालील प्रत्येक Points एकदम...
-
🎯टाइम मॅगझिन एथिलिट ऑफ द इयर 2023 :- लिओनेल मेस्सी 🎯टाइम पर्सन ऑफ द इयर 2023 टेलर स्विफ्ट 🎯पाहिला वणभुषण 2024 चैत्राम पवार 🎯महाराष्ट्र भ...
-
विज्ञान विषयाची तयारी करताना लक्षात घ्यायला हवे की हा सर्वात जास्त input द्यावा लागणारा आणि सर्वात कमी output असणार विषय आहे. Combine पूर्व ...