Monday, 25 October 2021

संसदेविषयी महत्त्वाची माहीती.


🅾 एका वर्षात संसदेची कमीत कमी तीन अधिवेशने घ्‍यावी लागतात.

🅾संसदेच्‍या दोन अधिवेशनामधील अंतर (कालावधी) जास्‍तीत जास्‍त सहा महिने असू शकतो.

🅾नागरिकत्‍व नियमित करण्‍याचा अधिकार संसदेस आहे.

🅾 राज्‍यघटनेतील तरतुदी बदलण्‍याचा अधिकार केवळ संसदेला आहे.

🅾घटनेच्‍या कलम ३०२ नुसार विविध निर्बंध लादण्‍याचे अधिकार संसद यांना आहेत.

🅾 संरक्षण या विषयावर कायदा करण्‍याचे सर्वस्‍वी अधिकार संसदेस आहेत.

🅾जेव्‍हा राज्‍यात राष्‍ट्रपती-शासन कलम ३५६ अन्‍वये लागू होते, तेव्‍हा राज्‍य यादीतील कर कायदे संमत करण्‍याचे अधिकार संसद अथवा संसदेने विहित केले प्राधिकारी यांना आहेत.

🅾 विधेयकाचे रूपांतर विधिनियमात होण्‍यासाठी त्‍यांला तीन टप्‍प्‍यातून जावे लागते.

🅾करात कपात किंवा कर रद्द करण्‍याविषयी तरतूद असलेले विधेयक राष्‍ट्रपतीच्‍या शिफारशीशिवाय मांडता येतो.

🅾 सामान्‍यत: वित्त विधेयकाची मसंडणी व प्रविष्‍टीकरण राष्‍ट्रपतींची शिफारस असल्‍याशिवाय शक्‍य होत नाही.

🅾वित्त विधेयकाची मांडणी राष्‍ट्रपती यांच्‍या शिफरशीवरून केली जाते.

🅾 विधेयक वित्त विधेयक आहे/नाही असा प्रश्‍न उद्भवचल्‍यास अंतिम निर्णय लोकसभेचे सभापतीचा असतो.

🅾वित्त विधेयक हे कर, कर्जे व खर्च याबाबत असते.

🅾 वित्त-विधेयक प्रथमत: लोकसभेत मांडले जाते.

🅾सर्व वित्त विधेयके (Financial Bills) ही धन विधेयके (Money Bills) असतात.

🅾 राज्‍यघटनेच्‍या कलम ३३० व ३३२ अनुसार लोकसभा व राज्‍याच्‍या विधानसभांनी अनुसूचित जाती व जमातींसाठी खास राखीव जागा ठेवल्‍या आहेत.

🅾लोकसभेमध्‍ये केंद्रशासित प्रदेशांमधून १३ सदस्‍य निवडले जातात.

🅾 लोकसभेच्‍या पहिल्‍या मध्‍यावधी निवडणुका १९७१ मध्‍ये घेण्‍यात आल्‍या.

🅾 आणीबाणीच्‍या काळात लोकसभेचा कार्यकाळ एक वर्ष पर्यंत वाढवता येतो.

🅾राज्‍यसभा कधीच बरखास्‍त केली जात नाही.

🅾 राज्‍यसभेच्‍या सभासदाचा कार्यकाळ ६ वर्षाचा असतो.

🅾लोकसभेने पारित केलेले व राज्‍य सभेकडे शिफारशीकरिता पाठवलेले वित्त विधेयक १४ दिवसात परत पाठवणे हे राज्‍यसभेवर बंधनकारक आहे.  

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

राज्यसभा: संसदेचे वरिष्ठ सभागृह

1952 मध्ये स्थापन झालेल्या राज्यसभेचे सोमवारपासून सुरू झालेले हे 250वे अधिवेशन आहे.

Que: राज्यसभेचे एकूण सदस्य किती?
》राज्यसभेची सदस्यसंख्या सध्या २४५ आहे. पण ही संख्या २५० पर्यंत जाऊ शकते.

Que: महाराष्ट्राचे वरिष्ठ सभागृहातील प्रतिनिधित्व किती?
》राज्यसभेत महाराष्ट्राचे एकूण १९ खासदार निवडून येतात.

Que: दर दोन वर्षांनी राज्यातील किती सदस्य निवृत्त होतात?
》लागोपाठ दोनदा दर दोन वर्षांनी सहा सदस्य निवृत्त होतात. तिसऱ्या वर्षी सात सदस्य निवृत्त होतात. पुढील वर्षांच्या सुरुवातीला सात सदस्य निवृत्त होतील.

Que: अन्य राज्यांचे राज्यसभेतील प्रतिनिधित्व किती?
》उत्तर प्रदेशातील सर्वाधिक ३१ सदस्य राज्यसभेवर निवडून येतात. यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. राज्यातून १९ सदस्य वरिष्ठ सभागृहात निवडून येतात. तमिळनाडू (१८), बिहार (१६), पश्चिम बंगाल (१६), आंध्र प्रदेश (११).

Que: राज्यातून सध्या राज्यसभेवर कोण सदस्य आहेत?
》पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले आणि व्ही. मुरलीधरन हे राज्यातील चार राज्यसभा सदस्य केंद्रीय मंत्रिमंडळात सदस्य आहेत. शरद पवार, संजय राऊत, विनय सहस्रबुद्धे, वंदना चव्हाण, हुसेन दलवाई आदी सदस्य आहेत.

Que: राज्यसभेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीच्या किती मतांची आवश्यकता असते?
》राज्यातून राज्यसभेवर निवडून जाण्याकरिता सरासरी ४२ मतांची आवश्यकता असते.

Que: महाराष्ट्रातील कोणत्या सदस्याने सर्वाधिक काळ राज्यसभेत प्रतिनिधित्व केले
》काँग्रेसच्या सरोजताई खापर्डे यांनी सर्वाधिक पाच वेळा राज्यातून राज्यसभेत प्रतिनिधित्व केले. त्यांनी १९७२ ते ७४, १९७६ ते १९८२, १९८२ ते १९८८, १९८८ ते १९९४, १९९४ ते २००० या काळात खापर्डे या राज्यसभा सदस्या होत्या.
- प्रमोद महाजन, आबासाहेब कुलकर्णी आणि सुरेश कलमाडी यांनी प्रत्येकी चार वेळा राज्यातून राज्यसभेत सदस्यत्व भूषविले.
- राज्यसभेचे सर्वाधिक काळ म्हणजे सहा वेळा सदस्यत्व नजमा हेपतुल्ला आणि राम जेठमलानी यांनी भूषविले. यापैकी हेपतुल्ला या चार वेळा महाराष्ट्रातून निवडून गेल्या होत्या. भाजपमध्ये प्रवेश केल्यावर मध्य प्रदेश आणि राजस्थानमधून त्यांनी प्रतिनिधित्व केले.
- राम जेठमलानी यांनी १९९४ ते २००६ अशी १२ वर्षे राज्यातून प्रतिनिधित्व केले होते.

थोडक्यात लोकपाल विषयी


................................................................
▪️पहिले लोकपाल:-पिनाकी चंद्र घोष
▪️गैर न्यायिक सदस्य:- अर्चना रामसुंदर, दिनेश कुमार जैन, महेंद्रसिंग, इंद्रजित प्रसाद गौतम
▪️न्यायिक सदस्य:- दिलीप भोसले, प्रदीप कुमार मोहंती, अजयकुमार त्रिपाठी, अभिलाषा कुमारी
................................................................
🚦लोकपाल निवड समिती:-
1)पंतप्रधान
2)सरन्यायाधीश
3)लोकसभा सभापती
4)लोकसभा विरोधी पक्षनेते
5)कायदेतज्ज्ञ
................................................................
🚦लोकपाल पात्रता

📗 सर्वोच्च न्यायालयचे निवृत्त मुख्य सरन्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीश
📕भ्रष्टाचार विरोधी धोरण,सार्वजनिक प्रशासन,दक्षता,विमा बँकिंग याबाबत किमान 25 वर्षे अनुभव

🚦अध्यक्ष अपात्रता
- 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेली व्यक्ती
- लाभाचे पद धारण करणारी व्यक्ती
- संसद व विधिमंडळ सदस्य
- अपराधी दोषी

🚦कार्यकाल
5 वर्ष किंवा वयाच्या 70 वर्ष पर्यंत जो अगोदर  संपेल तो

🚦पगार
अध्यक्षाला सरन्यायाधीश प्रमाणे
सदस्य ला न्यायाधीश प्रमाणे
................................................................
🚦लोकपाल कायदा 2013

▪️राज्यसभा:-17 डिसेंबर 2013
▪️लोकसभा:-18 डिसेंबर 2013
▪️राष्ट्रपती:-1 जानेवारी 2014
▪️अंमल:-16 जानेवारी 2014

🚦रचना:

▪️1 अध्यक्ष व
▪️जास्तीत जास्त 8 सदस्य

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महाराष्ट्रातील पंचायत राज

आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.

●1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
स्थानिक स्वराज्य संस्था

●2.  राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
2 ऑक्टोबर 1953

●3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
16 जानेवारी 1957

●4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
वसंतराव नाईक समिती

●5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
27 जून 1960

●6.  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
महसूल मंत्री

●7.  वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
226

●8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
जिल्हा परिषद

●9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)

●10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
1  मे 1962

●11. ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966

●12. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
7 ते 17

●13.  ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
जिल्हाधिकारी

●14. ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?
जिल्हाधिकारी

●15. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ? 5 वर्षे

●16. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?
पहिल्या सभेपासून

●17. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
तहसीलदार

●18. सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
विभागीय आयुक्त

●19. उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
सरपंच

●20. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
पंचायत समिती सभापती

●21. पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
दोन तृतीयांश (2/3)

●22. महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
तीन चतुर्थांश (3/4)

●23. पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
पंचायत समिती सभापती

●24. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
जिल्हा परिषद अध्यक्ष

●25. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
संबंधित विषय समिती सभापती

●26. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
जिल्हा परिषद अध्यक्ष

●27. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
विभागीय आयुक्त

●28. कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
ग्रामसेवक

●29. ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
जिल्हा परिषदेचा

●30.  ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून

●31. ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
ग्रामसेवक

●32. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)

33. ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
राज्यशासनाला

●34.  सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
विस्तार अधिकारी

●35.  गटविकास  अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे  ?
ग्रामविकास खाते

●36. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
जिल्ह्याचे पालकमंत्री

●37. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
जिल्हाधिकारी

●38. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
दहा (स्थायी+9 विषय समित्या)

●39. जिल्हा परिषदेच्या  समित्या  कोणत्या आहेत ?
स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा

●40. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष  कोण असतात ?
जिल्हा परिषद अध्यक्ष

●महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
वसंतराव नाईक

सामान्य विज्ञान (इयत्ता 5 वी).

शरीराच्या आतील भागात असलेल्या इंद्रियांना आंतरिंद्रिये म्हणतात.

 मेंदू, फुफ्फुसे, हृदय, इ. आंतरिंद्रियांची उदाहरणे आहेत.

 अन्नाचे पचन अन्न नलिकेमध्ये होते.

 अन्न पचनास मदत करणार्‍या रसास पाचकरस असे म्हणतात.

 तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यामध्ये पिष्टमय पदार्थाचे प्रमाण अधिक असते.

 डाळी, मांस, दूध यामध्ये प्रथिने अधिक असतात.

 भुईमुंग, करडई यांसारख्या तेलबियात स्निग्धाचे प्रमाण अधिक असते.

 पालेभाज्यांपासून क्षार व जीवनसत्वे मिळतात.

 मोड येताना धान्यातील जीवनसत्वाचे प्रमाण वाढते.

 आंबवल्यामुळे अन्नपदार्थातील जीवनसत्वात वाढ होऊन पौष्टिकता वाढते.

 ओ.आर.एस म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन. याचा उपयोग शरीरातील पाणी आणि क्षार यांची कमतरता भरून काढण्यासाठी होतो.

 पोटॅशिअम परमॅगनेटच्या द्रावणाने जखम धुतात आणि त्याचे स्फटिक जखमेवर दाबून बसवतात.

 खडकापासून मातीचा 2.5 सेमी पातळ थर तयार होण्यासाठी सुमारे 800 ते 1000 वर्ष लागतात.

 डोंगर उतारावर घातलेल्या बांध्ंणा ताली किंवा ओटे म्हणतात.

 पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात हे मत कणाद महर्षींनी मांडले.

 कणाद महर्षींचा जन्म इसवी सनापूर्वी 6 व्या शतकात प्रभास क्षेत्र म्हणजेच गुजराथ राज्यातील सोरटी सोमनाथ जवळच्या प्रभासपट्टम येथे झाला.

 पदार्थाच्या सूक्ष्मतिसूक्ष्म कणाला महर्षीनी 'पीलव' म्हटले आहे.

 उष्णता वाहून नेण्याची क्षमता असणार्‍या पदार्थांना उष्णतेचे सुवाहक असे म्हणतात.
 उष्णता वाहून नेण्याची क्षमता नसणार्‍या पदार्थांना उष्णतेचे दुर्वाहक असे म्हणतात.

 लोखंडाप्रमाणेच कोबाल्ट व निकेल हे धातूही चुंबकाकडे आकर्षिले जातात.

 पुन्हा पुन्हा उलट सुलट क्रमाने होऊ शकणार्‍या बदलांना परिवर्तनीय बदल असे म्हणतात.

 बाष्पीभवन, सांद्रीभवन, विरघळणे, उत्कलन आणि विलयन हे भौतिक बदलाचे प्रकार आहेत.

 लोखंडी पत्रे, नळ इ. वस्तूवर जस्ताचा पातळ लेप लावतात.

 तांब्या-पितळेच्या भांड्यांना काथिलाचा लेप देऊन कल्हई करतात.

मराठी व्याकरण - वर्णविचार

* आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीना वर्ण असे म्हणतात. उदा क, ख, घ, ग

* मराठी भाषेत एकूण ४८ वर्ण आहेत.

* एकूण स्वर १२ आहेत.

* स्वरादी २ आहेत.

* मराठी भाषेत एकूण व्यंजने ३४ आहेत.

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

स्वर 
* ऱ्हस्व - अ इ उ ॠ ऌ
* दीर्घ - आ ई ऊ
* संयुक्त - ए [अ +ई ] ऐ ओ औ

व्यंजने 
* कठोर - क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ,
* मृदू - ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब, भ,
* अनुनासिक - ड़, न, ण, म,
* अर्धस्वर - य, र, ल, व,
*  उष्मा - श, ष, स,
* महाप्राण -  ह,
* स्वतंत्र - ळ,
* क्ष व ज्ञ हि दोन जोडव्यंजने आहे.
* क्ष = क + ष,  ज्ञ = द + न + य
* कंठ्य - क, ख, ग, घ, ड़, ह, - अ, आ.
* तालव्य - च, छ, ज, ज्ञ, य, श, - इ, ई
* मृधन्य - ट, ठ, ड, ढ, ण,
* दंत्य - त, थ, द, ध, न, ल, स, - ऌ
* औष्ठय - प, फ, ब, भ, म, - उ, ऊ,
* कंठ  तालव्य - ए, ऐ
* कंठोष्ट्य - ओ, औ,
* दंतोष्ठ्य - व,
* दंत तालव्य - च, छ, झ,

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

संयुक्त स्वर 
ए = अ + इ किंवा औ = आ +उ = उ
* सजातीय स्वर - एकाच उच्चारस्थानापासून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. उदा - अ - आ

* विजातीय स्वर - भिन्न उच्चार स्थानापासून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. उदा - अ - उ

* अनुनासिके - ड़, न, ण, आणि म, या वर्णाचा ऊच्चार हा त्या वर्णाच्या उच्चारस्थानाबरोबर नासिकेतून होतो. म्हणून त्यांना अनुनासिके असे म्हणतात.

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

भाषा वाक्यांनी बनते, वाक्ये शब्दांनी बनतात आणि शब्द वर्णांनी बनतात. त्यामुळे व्याकरणाचे वर्णविचार, शब्दविचार आणि वाक्यविचार असे तीन घटक पडतात.

या लेखामध्ये आपण वर्णविचार या घटकातील काही महत्त्वाचे मुद्दे पाहू. मागील लेखात लिहिल्याप्रमाणे व्याकरणाच्या संकल्पना, नियम किंवा व्याख्या व या संदर्भात विधाने यावर गुंतागुंतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे व्याख्या समजून घेणे व लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.

वाक्य, पद, शब्द, मूलध्वनी, वर्ण, अक्षर या संकल्पना समजून घेऊन व्याख्या लक्षात ठेवायला हव्यात.

* शासन निर्णय २००९नुसार वर्णमालेमध्ये ‘अ‍ॅ’ आणि ‘ऑ’ या स्वरांचा समावेश. यामुळे आधुनिक वर्णमालेमध्ये १४ स्वर आणि ५० वर्ण.

* ‘क्ष्’ आणि ‘ज्ञ्’ ही विशेष संयुक्त व्यंजने, तर ‘क्ष’ आणि ‘ज्ञ’ ही जोडाक्षरे.

🌿संधी - महत्त्वाचे मुद्दे🌿

वर्णविचारातील संधी हा एक महत्त्वाचा घटक आहे.

* संधी हा विषय संस्कृत व्याकरणातून मराठीत आल्यामुळे संधी झालेल्या शब्दाचा विग्रह व एकत्र येणारे वर्ण यामधील ऱ्हस्व - दीर्घ बारकाईने लक्षात ठेवावे लागतात.

* स्वरसंधी, व्यंजनसंधी आणि विसर्गसंधी असे संधींचे मुख्य तीन प्रकार, त्यांचे उपप्रकार आणि मराठीचे विशेष संधी यांचा अभ्यास या घटकामध्ये आहे.
* संधींचे नियम लक्षात ठेवून त्यानुसार तयार होणारे शब्द लक्षात ठेवणे आणि उलट पद्धतीने प्रत्येक शब्द विचारात घेऊन तो कोणत्या संधिनियमाने तयार झाला असेल, याचा सराव करणे ही पद्धत जास्त उपयुक्त ठरेल.

* जास्तीत जास्त संधियुक्त शब्दांच्या विग्रहाचा सराव करणे आवश्यक आहे.
* मराठीचे विशेष संधियुक्त शब्द वगळता इतर सर्व संधियुक्त शब्द आणि त्यांच्या विग्रहातील शब्द मूळ संस्कृत असल्याने मराठीत तत्सम शब्द म्हणून गणले जातात हेही लक्षात घ्या.

* संधी घटकाचा अभ्यास उत्तमप्रकारे केला की ‘नियमानुसार शब्दलेखन’ या घटकाचाही बहुतांश अभ्यास होऊन जातो. अशा प्रकारे मुख्यत: वस्तुनिष्ठ माहितीवर आधारित वर्णविचार हा घटक तुम्हाला संपूर्ण गुण मिळवून देऊ शकतो

समानार्थी शब्द:

बदल = फेरफार, कलाटणी 
बर्फ = हिम  
बहीण = भगिनी
बक्षीस = पारितोषिक, पुरस्कार 
बाग = बगीचा, उद्यान, वाटिका 
बासरी = पावा
बेत = योजना
बाळ = बालक 
बाप = पिता, वडील, जनक 
बादशाहा = सम्राट
बुद्धी = मती 
ब्रीद = बाणा   
भरवसा = विश्वास 
भरारी = झेप, उड्डाण 
भव्य = टोलेजंग
भुंगा = भ्रमर, भृंग, मिलिंद, मधुकर
भाट = स्तुतिपाठक 
भारती = भाषा, वैखरी
भांडण = तंटा  
भाळ = कपाळ 
भाऊ = बंधू, सहोदर, भ्राता
भेसळ = मिलावट
भेदभाव = फरक
भोजन = जेवण   
भोंग = खोपटे, झोपडी
मदत = साहाय्य 
ममता = माया, जिव्हाळा, वात्सल्य 
मन = चित्त, अंतःकरण
मजूर = कामगार 
महिना = मास
महिला = स्त्री, बाई, ललना 
मजूर = कामगार
मस्तक = डोके, शीर, माथा  
मानवता = माणुसकी 
मान = गळा  
माणूस = मानव
मंगल = पवित्र 
मंदिर = देऊळ, देवालय
मंदपणा = मंडपाच्या
मंडपामां = मंडपामध्ये
मार्ग = रस्ता, वाट
म्होरक्या = पुढारी, नेता 
मोहाची फुले = मोवा
मित्र = दोस्त, सोबती, सखा, सवंगडी
मिष्टान्न = गोडधोड
मुलगा = पुत्र, सुत, तनय, नंदन, तनुत 
मुलगी = कन्या, तनया, दुहिता, नंदिनी, आत्मजा  
मुद्रा = चेहरा, मुख, तोंड, वदन 
मुख = तोंड, चेहरा 
मुलुख = प्रदेश, प्रांत, परगणा 
मेहनत = कष्ट, श्रम, परिश्रम
मैत्री = दोस्ती
मौज = मजा, गंमत
यश = सफलता 
युक्ती = विचार, शक्कल 
युद्ध = लढाई, संग्राम, लढा, समर 
येतवरी = येईपर्यंत
योद्धा = लढवय्या 
रक्त = रुधिर 
रणांगण = रणभूमी, समरांगण 
र्हास = हानी    
राग = क्रोध, संताप, चीड 
राजा = नरेश, नृप, भूपाल, राणा, राया 
राष्ट्र = देश 
रांग = ओळ 
रात्र = निशा, रजनी, यामिनी
रान = वन, जंगल, अरण्य, कानन
रूप = सौंदर्य
रुबाब = ऐट, तोरा  
रेखीव = सुंदर, सुबक 
लग्न = विवाह, परिणय  
लाट = लहर 
लाज = शरम, 
लोभ = हाव
लोटके = मडके
वरचा = वद्राचा
वडील = पिता
वस्त्र = कपडा 
वद्रा = वर
वारा = वात, पवन, अनिल, मारुत, समीर, वायू 
वाट = मार्ग, रस्ता 
वाद्य = वाजप 
वातावरण = रागरंग
वेग = गती
वेळ = समय, प्रहर
वेळू = बांबू 
वेश = सोशाख
वेदना = यातना  
विश्रांती = विसावा, आराम
वितरण = वाटप, वाटणी 
विद्या = ज्ञान 
विनंती = विनवणी 

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) मुसळधार पाऊस पडला – उद्देश्यविस्तार ओळखा.

   1) मुसळधार    2) पाऊस   
   3) पडला    4) पाऊस पडला

उत्तर :- 1

2) खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.
     ‘सहलीस जाताना कात्रजजवळ उजाडले’

   1) कर्मभाव संकर प्रयोग    2) मिश्र किंवा संकर प्रयोग
   3) भावकर्तरी प्रयोग    4) कर्म – कर्त प्रयोग

उत्तर :- 3

3) पहिले पद संख्यावाचक असून त्यावरून समूहाचा बोध होत असेल तर तो ................... समास होतो.

   1) बहुव्रीही    2) कर्मधारय   
   3) व्दिगू    4) व्दंव्द

उत्तर :- 3

4) कंसातील विरामचिन्हे ओळखा. (;)

   1) अपूर्ण विराम    2) स्वल्प विराम   
   3) अर्धविराम    4) यापैकी नाही

उत्तर :- 3

5) पुढीलपैकी कोणता शब्द फार्सीतून मराठीत आला आहे ?

   1) आसू    2) खर्च     
   3) आंबा    4) परशू

उत्तर :- 2

6) ‘व्यंगार्थ’ वाक्य कोणते ते पर्यायी उत्तरातून अचूक शोधा.

   1) आम्ही  फक्त बाजरीच खातो.
   2) देविकाबाई सुनेला म्हणाल्या, ‘सूर्य अस्ताला गेला.’
   3) घराच्या भिंतीवरून सरपटणारा एक प्राणी म्हणजे पाल.
   4) त्याच्या घरावरून गेले, की मंदिर येते.

उत्तर :- 2

7) खालीलपैकी कोणता शब्द ‘किंमत’ या अर्थाचा नाही ?

   1) मूल      2) दर्जा     
   3) भाव    4) दर

उत्तर :- 2

8) दिलेल्या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द निवडा. – कृश

   1) स्थूल    2) नैसर्गिक   
   3) गोरा    4) दोष

उत्तर :- 1

9) ‘हाजीर तो वजीर’ या म्हणीचा अचूक पर्याय पुढीलपैकी कोणता  ?

   1) बुध्दिबळाच्या खेळात ‘वजिराला’ महत्त्व असते    2) जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो
   3) ‘वजीर’ छान चित्रपट असतो        4) हजेरी बुकात नाव नोंदवणे

उत्तर :- 2

10) ‘तोंडात बोट घालणे’ – या वाक्प्रचाराच अर्थ ओळखा.

   1) भूक लागणे      2) शरण येणे   
   3) नवा हरूप येणे    4) आश्चर्यचकीत होणे

उत्तर :- 4

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...