२१ ऑक्टोबर २०२१

मार्क झुकरबर्ग ‘फेसबुक’चं नाव बदलणार?; ‘या’ कारणामुळे सुरु आहे नामांतरणाचा विचार

🔰जगातील आघाडीची सोशल नेटवर्किंग कंपनी असणाऱ्या फेसबुक आयएनसी आपलं नाव बदलण्याचा विचार करत आहे. रिब्रॅण्डींगच्या उद्देशाने हा बदल करण्याचा विचार सुरु असून पुढील आठवड्यामध्ये यासंदर्भात चर्चा होणार आहे. मेटाव्हर्स पद्दतीने उत्पादने निर्माण करुन वापरकर्त्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हे नाव बदलण्याचा विचार सुरु असल्याचं वृत्त द व्हर्जने मंगळवारी दिलं आहे.

🔰फेसबुक कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग या विषयावर कंपनीच्या वार्षिक सभेमध्ये बोलणार असल्याची माहिती समोर येत आहे. २८ ऑक्टोबर रोजी ही बैठक होणार आहे. मात्र त्याआधीच यासंदर्भातील निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्हर्जच्या वृत्तामध्ये व्यक्त करण्यात आलीय.

🔰मेटाव्हर्स म्हणजेच व्हर्चूअल विश्वाला अधिक प्राधान्य देण्याची भूमिका. इंटरनेटच्या माध्यमातून लोक जेव्हा व्हर्चूअल विश्वामध्ये भ्रमंती करतात त्याला मेटाव्हर्स असं म्हणतात. यामध्ये डिजीटल स्पेसचाही समावेश होतो. डिजीटल स्पेस म्हणजेच व्हर्चूअल रिअॅलिटी आणि ऑगमेन्टेट रिअॅलिटीसारख्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उभं केलेलं आभासी जग. याच आभासी जगाला डिजीटल स्पेस असं म्हटलं जातं.

देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्रातील ‘या’ ३ ठाण्यांचा समावेश, जयंत पाटलांकडून माहिती


🔰देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्रातील ३ पोलीस स्टेशनचा समावेश झाल्याची माहिती राज्याचे जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिलीय. यवतमाळ, चंद्रपूर आणि शिराळा या तीन पोलीस स्टेशनचा या यादीत समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच राज्यात अनेक चांगले पोलीस स्टेशन आहेत.

🔰पहिलाय आणि दुसऱ्या रांगेतील नेत्यांनी कोणतीही केस रदबदली घेऊन न जाता हे काम पाहण्यासाठी जावं, असाही सल्ला त्यांनी दिला. सांगलीमधील विश्रामबाग येथे नतून पोलीस मुख्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पाटील हे बोलत होते.

🔰जयंत पाटील म्हणाले, “महाराष्ट्रातील यवतमाळ, चंद्रपूर आणि शिराळा येथील पोलीस ठाण्यांचा समावेश आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट पोलीस स्टेशनमध्ये झालाय. दीक्षित गेडाम यांनी सर्व पोलीस स्टेशन आयएसओ प्रमाणित करण्याची मोठी मोहीम हाती घेतली. राज्यात अनेक चांगले पोलीस स्टेशन आहेत. माझी पहिल्या आणि दुसऱ्या रांगेत बसलेल्या नेत्यांना विनंती आहे कोणतीही केस रदबदली घेऊन न जाता फक्त चहा घ्यायला जाऊन या.”

भारतीय पाणबुडी रोखल्याचा पाकिस्तानचा दावा

🔰भारताची एक पाणबुडी पाकिस्तानच्या सागरी हद्दीत येत असताना रोखल्याचा दावा पाकिस्तानच्या लष्कराने केला आहे. गेल्या आठवड्यात हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.

🔰ही भारतीय पाणबुडी पाकिस्तानी नौदलाच्या गस्ती विमानाने पाहिली होती, असे पाकिस्तानी लष्कराच्या निवेदनात म्हटले आहे. पाकिस्तानी नौदलाने म्हटले आहे की, १६ ऑक्टोबरला ही पाणबुडी पाकिस्तानी सागरी हद्दीत येताना दिसली.  भारतीय नौदलाकडून हा  प्रकार तिसऱ्या वेळी झाला असून  तीनही वेळा या पाणबुड्या शोधण्यात  पाकिस्तानी नौदलाच्या लांब पल्ल्याच्या गस्ती विमानांनी यश मिळवले आहे. आताच्या घटनेचे चित्रीकरणही पाकिस्तानने प्रसारित केले आहे.

🔰पाकिस्तानी नौदल सतत सज्ज असून व्यावसायिक सतर्कता बाळगून आहे. आम्ही पुन्हा एकदा भारताची पाणबुडी येताना शोधली आहे असे पाकिस्तानी लष्कराने ट्विटरवर म्हटले आहे.

🔰यापूर्वी असा प्रकार मार्च २०१९ मध्ये घडला होता. त्यावेळी पाकिस्तानी नौदलाने भारतीय पाणबुडीचा सागरी हद्दीत प्रवेश रोखला होता. पाकिस्तानी नौदलाने त्यांचे विशेष कौशल्य वापरून भारतीय the पाणबुडीला घुसण्यापासून रोखले असे निवेदनात म्हटले आहे. नोव्हेंबर २०१६ मध्येही भारतीय लष्कराच्या पाणबुडीने पाकिस्तानी सागरी हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे.

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...