Tuesday, 19 October 2021

भारताची राज्यघटना

राज्य लोकसेवा आयोगाबद्दल संपूर्ण माहिती

1. लिखित घटना

2. एकेरी नागरिकत्व

3. एकेरी न्यायव्यवस्था

4. धर्मनिरपेक्षता

5. कल्याणकारी राज्य

6. मूलभूत हक्कांचा समावेश

7. मूलभूत कर्तव्यांचा समावेश
घटना समितीतील महत्वाच्या समित्या :

1. मसुदा समिती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

2. संघराज्य राज्यघटना समिती : पं. जवाहरलाल नेहरू

3. घटना समिती : डॉ. राजेंद्र प्रसाद

4. मूलभूत हक्क समिती : सरदार वल्लभभाई पटेल

5. प्रांतीय राज्यघटना समिती : सरदार वल्लभभाई पटेल

6. वित्त व स्टाफ समिती : डॉ. राजेंद्र प्रसाद

7. सुकून समिती : डॉ. के. एक. मुन्शी

भारतीय घटनेत घेतलेल्या गोष्टी :

संसदीय शासन पद्धती : इंग्लंड

मार्गदर्शक तत्वे : आयर्लंड

मूलभूत हक्क : अमेरिका

न्यायमंडळाचे स्वातंत्र्य : अमेरिका

न्यायालय पुनर्विलोकन : अमेरिकाय

कायद्याचे अधिराज्य : इंग्लंड

सामूहिक जबाबदारीची तत्वे : इग्लंड

कायदा निर्मिती : इंग्लंड

लोकसभेचे सभापती पद : इंग्लंड

संसदेच्या दोन्ही सभागृहांचे संयुक्त अधिवेशन : ऑस्ट्रेलिया

संघराज्य पद्धत : कॅनडा

शेष अधिकार : कॅनडा

उद्देश पत्रिका :

1. संविधान निर्मिती मागचा संविधानकर्त्यांचा उद्देश

2. उद्देशाला संविधानमध्ये किती स्थान देण्यात आलेले आहे जर देण्यात आले नसेल तर घटनेतील दुरूस्ती करून त्याची पूर्तता करणे

3. घटनेतील काही अस्पष्ट गोष्टी स्पष्ट करण्यासाठी उद्देशपत्रिकेचा उपयोग होतो.

उद्देश पत्रिका : आम्ही भारतीय जनता, भारताच सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य निर्माण करण्याचे आणि भारताच्या सर्व नागरिकांना
न्याय : सामाजिक, आर्थिक आणि राजकीय
स्वातंत्र्य : विचार, उच्चार, श्रद्धा, धर्म आणि उपासना यांचे
समता : दर्जा आणि संधी याबाबतीत
बंधुता : व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता राखणारी यांची शाश्वती देण्याचे आमच्या या घटना समितीत आज 26 नोव्हेंबर, 1949 रोजी विचारपूर्वक ठरवीत आहोत. व ही घटना आमच्यासाठी तयार, मान्य स्वीकृत करीत आहोत.

राज्य व्यवस्थेचे स्वरूप :

1. सार्वभौम : म्हणजे भारत आता इतर कोणत्याही देशाच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष नियंत्रणाखाली नाही. अंतर्गत आणि बाह्य परदेशी संबंध निर्माण करण्यास भारत स्वातंत्र्य आहे.

2. प्रजासत्ताक : म्हणजे लोकनियुक्त शासन होय. प्रजासत्ताक राज्यामध्ये अंतिम सत्ता लोकांकडे असते.

3. गणराज्य : म्हणजे राजा नसलेले राज्य होय.

राज्य व्यवस्थेची उद्देश : भारतीय घटनेच्या तिसर्‍या भागामध्ये राज्य व्यवस्थेचा उद्देश स्पष्ट करण्यात आला आहे. त्यासाठी भारतीय घटनेत पुढीलपैकी चार उद्देश उद्देशपत्रिकेत सांगितली आहेत.

न्याय : सामाजिक, आर्थिक, राजकीय

स्वातंत्र्य : विचार, उच्चार, श्रद्धा, धर्म आणि उपासना

समता : दर्जा आणि संधी याबाबतीत

बंधुता : व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता

41 व्या घटना दुरूस्तीनुसार उद्देशपत्रिकेत केलेला बदल :

समाजवादी : हा शब्द या दुरुस्तीनुसार उद्देशपत्रिकेत नमूद करण्यात आला आहे.

धर्मनिरपेक्ष : कोणत्याही धर्माला अनुसरून राज्यकारभार केला जाणार नाही.

अखंडता : भारतातून कोणतेही राज्य निघून जाणार नाही. भारतातील अखंडता टिकून राहील.

राज्यघटना टेस्ट क्र १

1. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे?
१. ४४✅
२. ४८
३. ४६
४. ५०

2. घटनाकारांच्या मते भारतीय राज्यघटनेची गुरुकिल्ली म्हणजे.... हे होय.
१. घटनेचा मसुदा
२. मूलभूत अधिकार
३. घटनेचा सरनामा ✅
४. मार्गदर्शक तत्त्वे

3. ११० वे घटनादुरुस्ती विधेयक कशाबाबत आहे?
१. संसद विधिमंडळात महिलांना 33 टक्के आरक्षण ✅
२. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण
३. लोकपाल
४. लोकायुक्त

4. विधान परिषद सदस्यांशी संबंधित योग्य बाब खालीलपैकी कोणती?
१. विधान परिषदेतील काही सदस्य विधानसभा सदस्यांनी निवडलेले असतात✅
२. विधानपरिषदेतील प्रत्येक सभासद दर दोन वर्षांनी निवृत्त होतो
३. विधान परिषदेतील काही सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती मार्फत होते
४. विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो

5. राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख कोण असतो?
१. गृहमंत्री
२. पंतप्रधान✅
३. राष्ट्रपती
४. उपराष्ट्रपती

5. भारतीय संसद महाराष्ट्र राज्य  विधिमंडळ यांची सभागृहे आणि त्यातील सदस्य संख्या यांच्या जोडीला योग्य पर्याय कोणता?
१. महाराष्ट्र विधानसभा - 278
२. महाराष्ट्र विधानपरिषद- 88
३. लोकसभा - 543
४.राज्यसभा - 250✅

6. खालीलपैकी घटनेत नमूद असलेले मूलभूत कर्तव्य ओळखा.
१. वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे✅
२. हुंडा पद्धती बंद करणे
३. निरक्षरता दूर करणे
४.राष्ट्रीय नेत्यांचे मन राखणे

7. भारतीय घटनेचा सरनामा हा राज्यघटनेचा एक भाग आहे अशा स्वरूपाचा निर्णय.. ....या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे?
१. गोलकनाथ विरुद्ध पंजाब
२. मिनर्वा मिल्स लिमिटेड विरुद्ध भारत सरकार
३.केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार ✅
४. विद्यावती विरुद्ध राजस्थान सरकार

8. राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यासाठी बंदी करण्यात आली आहे?
१. कलम 21
२. कलम 23
३. कलम 24 ✅
४. कलम 28

9. कोणत्या कलमानुसार संसद घटना दुरुस्ती करू शकते?
१. कलम 350
२. कलम 368✅
३. कलम 370
४. कलम 360

10. खालील पैकी कोणत्या राज्याने नव्याने विधान परिषदेची स्थापना केली आहे?
१. महाराष्ट्र
२. राजस्थान
३. जम्मू कश्मीर
४. आंध्र प्रदेश✅


1. भारतासाठी संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम कोणी मांडली?
१. महात्मा गांधी
२. मानवेंद्र नाथ रॉय✅
३. डॉ बाबासाहेब आंबेडकर
४. जवाहरलाल नेहरू

2. संविधान सभेच्या तात्पुरत्या अध्यक्ष पदी कोणाची निवड केली होती?
१. डॉ राजेंद्र प्रसाद
२. एच सी मुखर्जी
३. डॉ सच्चीदानंद सिन्हा✅
४. पं मोतीलाल नेहरू

3. मूलभूत उप हक्क समिती चे अध्यक्ष कोण होते?
१. एच सी मुखर्जी
२. के एम मुन्शी 
३. वल्लभभाई पटेल
४. जे बी कृपलानी✅

4. कलम नं.....मध्ये भारताचे वर्णन 'राज्यांचा संघ' असे करण्यात आले आहे.
१. कलम न 1✅
२. कलम न 2
३. कलम न 3
४. कलम न 4

5. 'एकेरी नागरिकत्व' ची पद्धत भारताने कोणत्या घटने कडुन स्वीकारली आहे?
१. यु एस ए 
२. जपान
३.जर्मनी
४. ब्रिटिश✅

6. संविधान सभेचे उपअध्यक्ष म्हणून कोणाची निवड केली?
. बी एन राव
२. जवाहरलाल नेहरू
३. के एम मुन्शी
४. एच सी मुखर्जी✅

7..... रोजी संविधान सभेने भारताचा राष्ट्रध्वज स्वीकृत केला.
१. २२ जुलै १९४७✅
२. १७ नोव्हेंबर १९४७
३. २४ जानेवारी १९५०
४. ४ नोव्हेंबर१९४८

8. 'उद्देश पत्रिका' ही कोणी मंडली होती?
१. डॉ बाबासाहेब आंबेडकर
२. पं मोतीलाल नेहरू
३. डॉ राजेंद्र प्रसाद
४. जवाहरलाल नेहरू✅

9. घटनेचा आमल.....पासून सुरू झाला.
१. २६/०१/१९५०✅
२. २६/११/१९४९
३. २६/०८/१९४७
४. ०४/११/१९४८

10. मसुदा समिती मध्ये खालीलपैकी कोण नव्हते?
१. डॉ के एम मुन्शी
२. एन गोपालस्वामी अय्यंगार
३. अल्लादि कृष्णस्वामी अय्यर
४. बी एन राव✅

11. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे?
१. ४४✅
२. ४८
३. ४६
४. ५०

12. घटनाकारांच्या मते भारतीय राज्यघटनेची गुरुकिल्ली म्हणजे.... हे होय.
१. घटनेचा मसुदा
२. मूलभूत अधिकार 
३. घटनेचा सरनामा ✅
४. मार्गदर्शक तत्त्वे

13. ११० वे घटनादुरुस्ती विधेयक कशाबाबत आहे?
१. संसद विधिमंडळात महिलांना 33 टक्के आरक्षण ✅
२. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण
३. लोकपाल 
४. लोकायुक्त

14. विधान परिषद सदस्यांशी संबंधित योग्य बाब खालीलपैकी कोणती?
१. विधान परिषदेतील काही सदस्य विधानसभा सदस्यांनी निवडलेले असतात✅
२. विधानपरिषदेतील प्रत्येक सभासद दर दोन वर्षांनी निवृत्त होतो 
३. विधान परिषदेतील काही सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती मार्फत होते
४. विधान परिषद सदस्यांचा कार्यकाल पाच वर्षांचा असतो

15. राष्ट्रीय सुरक्षा समितीचा प्रमुख कोण असतो?
१. गृहमंत्री
२. पंतप्रधान✅
३. राष्ट्रपती
४. उपराष्ट्रपती

15. भारतीय संसद महाराष्ट्र राज्य  विधिमंडळ यांची सभागृहे आणि त्यातील सदस्य संख्या यांच्या जोडीला योग्य पर्याय कोणता?
१. महाराष्ट्र विधानसभा - 278
२. महाराष्ट्र विधानपरिषद- 88
३. लोकसभा - 543
४.राज्यसभा - 250✅

16. खालीलपैकी घटनेत नमूद असलेले मूलभूत कर्तव्य ओळखा.
१. वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारणे✅
२. हुंडा पद्धती बंद करणे
३. निरक्षरता दूर करणे 
४.राष्ट्रीय नेत्यांचे मन राखणे

17. भारतीय घटनेचा सरनामा हा राज्यघटनेचा एक भाग आहे अशा स्वरूपाचा निर्णय.. ....या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे?
१. गोलकनाथ विरुद्ध पंजाब
२. मिनर्वा मिल्स लिमिटेड विरुद्ध भारत सरकार 
३.केशवानंद भारती विरुद्ध भारत सरकार ✅
४. विद्यावती विरुद्ध राजस्थान सरकार

18. राज्य घटनेच्या कोणत्या कलमानुसार बालकामगार ठेवण्यासाठी बंदी करण्यात आली आहे?
१. कलम 21 
२. कलम 23 
३. कलम 24 ✅
४. कलम 28

19. कोणत्या कलमानुसार संसद घटना दुरुस्ती करू शकते?
१. कलम 350
२. कलम 368✅
३. कलम 370 
४. कलम 360

20. खालील पैकी कोणत्या राज्याने नव्याने विधान परिषदेची स्थापना केली आहे?
१. महाराष्ट्र 
२. राजस्थान 
३. जम्मू कश्मीर 
४. आंध्र प्रदेश✅

पंचायत राज

महानगरपालिकांच्या संख्येनुसार राज्यांचा क्रम खालीलप्रमाणे

१.  महाराष्ट्र              27
२.  उत्तरप्रदेश           16
३.  आंध्रप्रदेश           14
४.  मध्यप्रदेश            14
५.  बिहार                 13
६.  छत्तीसगड           13
७.  तमिळनाडू           13
८.  कर्नाटक              11
९.  गुजरात                08
१०.हिमाचलप्रदेश       02

महाराष्ट्रातील महानगरपालिकांच्या संख्येनुसार जिल्ह्यांचा क्रम खालीलप्रमाणे-

(१) ठाणे ०६
(२) पुणे ०२
(३) नाशिक ०२
- पनवेल-रायगड ही शेवटची महानगरपालिका आहे.

भारतील महानगरपालिका आकारमानानुसार उतरता क्रम-

(१) मुंबई
(२) दिल्ली
(३) कलकत्ता
(४) बंगलोर
(५) चेन्नई
(६) हैदराबाद
(७) अहमदाबाद
(८) सुरत
(९) पुणे

राज्यघटना प्रश्नपत्रिका

1)शोषणाविरुद्धच्या मूलभूत अधिकारामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो ?

अ) माणसाचा अपव्यापार
ब)  वेठबिगारी
क).कारखाने इ मध्ये बालकांना कामावर
       ठेवणे
ड) धार्मिक स्थळाच्या ठिकाणी
      शोषणाबाबत

1) अ, ब,क।            2) फक्त अ आणि क
3) फक्त ब,क,ड       4) वरील सर्व

2) सद्सदविवेक बुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण,आचरण व प्रसार इ घटनेद्वारे पुढीलपैकी कोणत्या तरतुदींच्या अधीन राहून प्राप्त होते ?

अ) सार्वजनिक सुव्यवस्था

ब) नितीमत्ता

क) आरोग्य

ड) संबंधित भागातील विशिष्ट तरतुदी

1) फक्त अ                      2)  अ,ब,क
3) वरील सर्व.                  4) एकही नाही

3) कृपान धारण करणे व स्वतः बरोबर बाळगणे हे शीख धर्माच्या प्रगटीकरणा बाबत समाविष्ट असल्याचे मानले जाईल अशी घटनेत कोठे तरतूद आहे ?

1) अनुच्छेद 25

2)अनुच्छेद 26

3) अनुच्छेद 27

4) घटनेत नमूद नाही

4) राज्यघटनेत एकमेव अशा कोणत्या
      ठिकाणी " हिंदू " शब्द नमूद आहे ?

1) अनुच्छेद 25 (1)

2) अनुच्छेद 25 (2)

3) अनुच्छेद 26 (1)

4) अनुच्छेद 26 (2)

5) राज्यघटनेत " हिंदू धर्म " या एकमेव धर्माचा उल्लेख मूलभूत अधिकारात आढळतो तर या शब्दातच पुढीलपैकी कोणत्या धर्माचा ही समावेश होतो ?

अ) बौद्ध

ब) जैन

क) शीख

ड) ख्रिशन

1) फक्त अ                   2) अ आणि ब
3) अ,ब,क                   4) एकही नाही

6) अनुच्छेद 26 अंतर्गत धार्मिक व्यवहाराची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य नमूद आहे त्यामध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश होतो ?

अ) धार्मिक,धर्मादायी संस्था स्थापन करून स्वखर्चाणे चालवण्याचा

ब) धार्मिक बाबीमध्ये आपल्या व्यवहाराची  व्यवस्था पाहण्याचा

क) जंगम,स्थावर मालमत्ता मालकीची असण्याचा व संपादन करण्याचा

ड) कायद्यानुसार अशा मालमत्तेचे प्रशासन करण्याचा

1) अ,ब,क                        2 ) ब,क
3) ब,क,ड                         4) वरील सर्व

7) ज्याचे उत्पन्न एखाद्या विशिष्ट धर्माचे अथवा धार्मिक संप्रदायाचे संवर्धन करण्यासाठी नियोजित केलेले असे कोणतेही कर देण्याची कोणत्याही व्यक्तीवर सक्ती केली जाणार नाही  अशी तरतूद कोणत्या अनुच्छेदात आहे ?

1) अनुच्छेद 25

2) अनुच्छेद 26

3)अनुच्छेद 27

4) अनुच्छेद 28

8)  भारतात सद्या पुढीलपैकी कोणते धर्म
      हे अल्पसंख्यांक धर्म म्हणून
     ओळखले जातात ?

अ) मुस्लिम

ब) बौद्ध

क) जैन

ड) शीख

इ) ख्रिशन

1) ब,क,ड                     2)अ,ब,क,ड
3) ब,क,ड,इ।                 4) वरील सर्व

9) अचूक विधान शोधा
     (सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार )

अ) भारतात कोणालाही " धर्म " बदलता
       येतो परंतु " जात " बदलता येत नाही

ब) हिंदू हा फक्त " धर्म "  नसून ही एक  "
      संसकृती " आहे

1) फक्त अ                      2) फक्त ब
3) दोन्ही.                        4)एकही नाही

10) अनुच्छेद 25 मध्ये नमूद असलेल्या " धर्म स्वातंत्र्य " या शब्दामध्ये पुढीलपैकी कोणता अर्थ नमूद होतो असा  निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे ?

अ) धर्म स्वीकारणे

ब)  धर्म नाकारणे

क) धर्म निरपेक्ष राहणे

ड) धर्माला विरोध करणे

1)अ,ब,क               2) फक्त अ आणि ब
3) वरील सर्व           4) एकही नाही

आजचा संपूर्ण पेपर धार स्वातंत्र्याच्या  अनुच्छेद 25,26,27,28 यावर काढलेला आहे घटनेतील बारकावे कव्हर केलेले आहेत..सर्वनी पेपर सोडवावा.

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

✅  राज्यघटना उत्तरे  ✅

1)- 1

2)- 3

3)- 1 ( अनुच्छेद 25 (1) मध्ये तरतूद
           आहे )

4)- 2 ( अनुच्छेद 25 (2) मध्ये हिंदू
          हा शब्द नमूद आहे या शब्दाच्या
           अंतर्गतच इतर धर्माचा अर्थही
           समाविष्ट आहे असे सर्वोच्च
            न्यायालयाने स्पष्ट केले आहे

5)- 3 ( अनुच्छेद 25(2) नुसार तरतूद
         आहे परंतु या हिंदू शब्दामध्ये
         मुस्लिम आणि ख्रिशन धर्माचा
           समावेश नाही
6)- 4

7)- 3

8)- 4

9)- 3

10)- 1  ( धर्माला विरोध करण्याचा
        अधिकार राज्यघटना कोणत्याही
         ठिकाणी देत नाही )

💐💐💐💐💐💐

रोग व रोगप्रसार - रोगजंतू

🔺रोगाचा प्रसार होण्यास हवा, पाणी, अन्न, काही, कीटक, कारणीभूत, ठरतात.

* पाण्यामार्फत रोगप्रसार - टायफाईड, कॉलरा, जुलाब, आतड्याचे रोग, कावीळ, पोलिओ, हगवण अशा रोगांचा प्रसार पाण्यावाटे होऊ शकतो.

* अन्नामार्फत प्रसार - आतळ्याचे रोग, मळमळ, उलटी, ताप,

* हवेमार्फत प्रसार - क्षयरोग, घटसर्प, घशाचा रोग, ग्रस्टो,

* किटकामार्फत प्रसार - खरुज, नायटा, हिवताप या रोगाची लागण अनॉफेलीस जातीच्या मादी डसल्यामुळे होते.

रोगप्रतीबंध

* Hepatitis B बी हा काविळीचा प्रकार टाळण्यासाठीही लस टोचली जाते.

* BCG ही लस जन्माला आल्यावर पहिला डोस

* त्रिगुणी - घटसर्प, डांग्याखोकला, धनुर्वात. जन्माला आल्यवर दीड महिने, अडीच महिने, साडेतीन महिने,

* पोलिओ - पहिला डोस दीड महिने, अडीच महिने, साडेतीन महिने, बुस्टर डोस सोळा महिने.

* गोवरची लस - नऊ महिन्यानंतर एक डोस,

* द्विगुणि - घटसर्प धनुर्वात यासाठी - पाच वर्षांनी एक डोस

* धनुर्वात लस - १० वर्षांनी एक डोस.

           गुणसूत्रे

गुणसूत्राचा शोध हा विसाव्या शतकामधील महत्त्वपूर्ण शोध मानला जातो. सन 1869 मध्ये फेड्रिक मिशर या जीवशास्त्रज्ञाने डी.एन.ए. या आम्लाचा शोध लावला.

↪ इ.स. 1953 मध्ये वॉट्सन व क्रिक या शास्त्रज्ञांनी डी.एन.ए.च्या रेणूची प्रतिकृती तयार केली.

↪गुणसूत्रे ही डी.एन.ए.ची बनलेली असतात.

↪डी.एन.ए. म्हणजे डिऑक्सिरायबो न्यूक्लिक अँसिड होय.

↪डी.एन.ए.च्या रेणूची रचना सर्व सजीवांमध्ये सारखीच असते.

↪डी.एन.ए.च्या रेणूखंडांना ‘जीन्स’ असे म्हणतात. हे जीन्स डी.एन.ए.च्या रेणूमधील नायट्रोजनयुक्त पदार्थांच्या निरनिराळ्या रचनेमुळे तयार होतात.

↪जीन्स पेशीच्या आणि शरीराच्या रचनेवर व कार्यांवर नियंत्रण ठेवतात. तसेच ते अनुवंशिक लक्षणे मातापित्यांकडून त्यांच्या संततीमध्ये संक्रमित करतात.

पचन संस्था (Digestive System)

मानवी शरीरात अन्न पचनासाठी विविध अवयव मिळून पचनसंस्था तयार झालेली आहे. खालेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि ते रक्तात मिसळणे या क्रियेला अन्नपचन असे म्हणतात.
पचन संस्थेमध्ये अन्ननलिका (Alimentary Canal) व पाचकग्रंथी (Digestive Glands) यांचा समावेश होतो.
अन्ननलिका एक लांब, स्नायुमय नलिका असून ती मुखापासून गुदद्वारापर्यंत असते.
अन्ननलिकेची लांबी 9 meter (950cm, 32 Ft.) असते.
मानवी शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी अन्ननलिकेचा व्यास वेगवेगळा असतो.

🔳अन्ननलिकेत प्रामुख्याने पुढील भागांचा समावेश होतो.

▫️मुख/ तोंड (Mouth/ Buccal Cavity)

▫️ग्रसनी (Pharynx)

▫️ग्रसिका (Esophagus)

▫️जठर/ आमाशय (Stomach)

▫️लहान आतडे (Small Intestine)

▫️मोठे आतडे (Large Intestine)

▫️मलाशय (Rectum) आणि

▫️गुदद्वार (Anus) यांचा समावेश होतो.

◾️लाळग्रंथी, यकृत, स्वादुपिंड या काही पाचकग्रंथी अन्ननलिकेशी ठराविक ठिकाणी जोडलेल्या असतात.

◾️पचनसंस्थेतील वेगवेगळी इंद्रिये अन्नपचनाचे काम पद्धतशीरपणे करत असतात.

◾️अन्नपचनाच्या क्रियांचे वेगवेगळे टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यावर काम करणारे पचनेंद्रिये वेगळे आहे आणि विशिष्ट टप्प्यावरील ती ती इंद्रिये त्यांचे काम सुरळीतपणे पार पाडतात.

◾️मुख/ तोंड (Mouth/ Buccal Cavity)
 
◾️तोंडात अन्नाचा घास घेतल्यापासून त्याच्या पचनक्रियेला सुरुवात होते तोंडातील अन्न दातांनी चावले जाते. त्याचे बारीक बारीक तुकडे होतात.
आपण जे अन्न खातो ते जटील स्वरूपात असते. त्या अन्नाचे अमायलेज/ टायलिन या जैविक उत्प्रेरकांच्या म्हणजेच विकरांच्या साहाय्याने सध्या पदार्थांमध्ये रूपांतर केले जाते. त्यामुळेच पचनाची सुरुवात मुखापासून होते असे म्हणतात.

◾️ग्रासिका  (Pharynx)

अन्ननलिकेचे व श्वसननलिकेचे तोंड म्हणजेच ग्रसनीमध्ये उघडते.
श्वसननलिकेच्या तोंडावर एपीग्लॉटिस (Epiglottus) नावाचा पडदा असतो त्यामुळे गिळलेले अन्न श्वसननलिकेत.

◾️ जठर/अमाशय (Stomach)

जठरातील जाठरग्रंथींमधून जाठररस स्रवताे. जठरात आलेले हे अन्न घुसळले जाते.
हायड्रोक्लोरिक आम्ल (HCL), पेप्सिन(Pepsin), म्यूकस (श्लेष्म)(Mucous) हे जाठररसाचे तीन घटक मिसळून अन्न आम्लधर्मी होते.
जठरात मुख्यतः प्रथिनांचे विघटन होते. खाल्लेल्या अन्नात जठरातील पाचकरस मिसळून तयार झालेले पातळ मिश्रण लहान आतड्यात हळूहळू पुढे ढकलले

◾️लहान आतडे (Small Intestine)

लहान आतडे सुमारे 6 मीटर लांब (20-25 फूट) असते व तो अन्ननलिकेचा सर्वात मोठा भाग आहे.
अन्नाचे मुख्यत्वे पचन इथे होते.

जठरात पचलेल्या अन्नाचे शोषण इथे होते.
लहान आतड्यात अन्नामध्ये तीन पाचकरस मिसळतात. अन्नपचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम लहान आतड्यामध्ये होते.

लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला आद्यांत्र (Duodenum) असे म्हणतात. आद्यांत्र्यामध्ये स्वादुपिंड रस (Pancreatic Juice) आणि पित्तरस (Bile) मिसळले जातात.

◾️स्वादुपिंड रस (Pancreatic Juice)

स्वादुपिंडातून स्त्रवतो व तो आद्यांत्रात येऊन मिसळतो. यामध्ये Trypsin, Amylase व Lypase अशी ३ विकरे असतात.

◾️पित्तरस (Bile)◾️

पित्तरस यकृतातून स्त्रवतो व तो आद्यांत्रात येऊन मिळतो.

स्निग्ध पदार्थांचे Emulsification घडवून आणण्यात पित्तरस (Bile Juice) मदत करतो.

लहान आतडे सुमारे 6 मीटर लांब (20-25 फूट) असते व तो अन्ननलिकेचा सर्वात मोठा भाग आहे.

अन्नाचे मुख्यत्वे पचन इथे होते.
जठरात पचलेल्या अन्नाचे शोषण इथे होते.
लहान आतड्यात अन्नामध्ये तीन पाचकरस मिसळतात. अन्नपचनातून मिळालेले पोषक पदार्थ रक्तात शोषण्याचे काम लहान आतड्यामध्ये होते.

लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला आद्यांत्र (Duodenum) असे . आद्यांत्र्यामध्ये स्वादुपिंड रस (Pancreatic Juice) आणि पित्तरस (Bile) मिसळले जातात.


◾️मोठे आतडे (Large Intestine)◾️

 मोठ्या आतड्याची लांबी सुमारे 1.5 मीटर असते.

येथे फक्त पाण्याचे शोषण होते.

मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला ‘ॲपेंडिक्स’ हा छोटा भाग जोडलेला असतो.

लहान आतड्यात अन्नाचे पचन झाल्यानंतर न पचलेले अन्न आणि पचलेल्या अन्नातील उर्वरित घन भाग मोठ्या आतड्यात येतो.

पचनक्रियेनंतर उरलेले पदार्थ गुदद्वारामार्फत शरीराबाहेर टाकले जातात.

◾️यकृत

यकृत ही शरीरातील सर्वांत मोठी ग्रंथी आहे.
यकृताला भरपूर रक्तपुरवठा हाेत असतो.
यकृताचे मुख्य कार्य म्हणजे ग्लुकोजचा साठा करणे.
यकृताच्या खालच्या बाजूस पित्ताशय असते. यामध्ये यकृताने स्रवलेला पित्तरस साठवला जातो.
हा पित्तरस लहान आतड्यात पाेहोचला, की तेथील अन्नात मिसळतो व पचन सुलभ होते.
स्निग्धपदार्थांच्या पचनास पित्तरसामुळे मदत होते. पित्तरसात क्षार असतात.

प्रथिनांचे स्रोत

प्राणीज साधने
- दूध, अंडी, मांस, मासे.

वनस्पतीज साधने
- डाळी-तूर, मूग, हरभरा, उडीद, मसूर, सोयाबीन
- धान्ये – ज्वारी, बाजारी, नाचणी, गहू.
- तेलबिया – शेंगदाणे, तीळ, बदाम, करडई.

- डाळींमध्ये प्रथिनांचे प्रमाण - 20-25% असते.
- सोयबींमध्ये प्रथिनांचे प्रमाण - 43.2% (सर्वाधिक)
- दुधामध्ये प्रथिनांचे प्रमाण- 3.2-4.3%
- अंडी प्रथिनांचे प्रमाण - 13%
- मासे प्रथिनांचे प्रमाण - 15-23%
- मांस प्रथिनांचे प्रमाण - 18-26%

- प्राणीज प्रथिने ही वनस्पतीज प्रथिनांपेक्षा 'उच्च दर्जाचे'असतात. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. कारण त्यांच्यामध्ये सर्व आवश्यक अमिनो आम्ले उपलब्ध असतात.

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...