Monday, 18 October 2021
महात्मा गांधी NREGA योजनेसाठी ‘हवामान लवचिकता माहिती प्रणाली आणि नियोजन’ (CRISP-M) टूल विकसित.
🔰महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (NREGA) अंतर्गत ‘हवामान लवचिकता माहिती प्रणाली आणि नियोजन (CRISP-M / Climate Resilience Information System and Planning) टूलचे अनावरण केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायतराज मंत्री श्री गिरिराज सिंह यांनी 13 ऑक्टोबर 2021 रोजी केले.
🔴ठळक बाबी..
🔰महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (NREGA) अंतर्गत भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) आधारित पाणलोट नियोजनामध्ये हवामान माहिती एकत्रित करण्यासाठी हे डिजिटल साधन विकसित करण्यात आले आहे.ते ब्रिटन देशाच्या मदतीने विकसित करण्यात आले आहे.
🔰ह साधन सात राज्यांमध्ये वापरले जाईल जिथे ब्रिटन सरकारचे फॉरेन कॉमनवेल्थ अँड डेव्हलपमेंट ऑफिस (FCDO) आणि भारताचे ग्रामीण विकास मंत्रालय संयुक्तपणे हवामान लवचिकतेच्या दिशेने काम करीत आहेत.
🔰बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि राजस्थान ही ती राज्ये आहेत.
🔰CRISP-M मनरेगा योजनेच्या GIS आधारित नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये हवामानविषयक माहिती जोडण्यास मदत करेल. त्यामुळे ग्रामीण समुदायासाठी हवामान बदलांसंबंधीच्या समस्यांना सामोरे जाण्यासाठी नवीन शक्यता खुल्या होतील.
बंगालमध्ये र्लॉड क्लाईव्ह पुरस्कृत दुहेरी राज्यव्यवस्था -
🔸बंगालच्या नबाबने फेब्रुवारी 1765 मध्ये निजामतीचे (लष्करी, फौजदारी, न्यायनिवाडा) अधिकार कंपनीकडे दिले.
🔹16 ऑगस्ट 1765 मध्ये अलाहाबादच्या तहानुसार सम्राट शहाआलमने बंगाल, बिहार, ओरिसाचे दिवाणीचे (कर, वसूल, करणे) अधिकार कंपनीला दिले.
🔸त्यामुळे कंपनीच्या हाती निजामती आणि दिवाणीचे आकार केंदि्रत झाले. पंरतू प्रत्यक्षात सुपूर्ण राजकीय सज्ञ्ल्त्;ाा कंपनीने स्वत:कडे घेतली नाही कारण ब्रिटिश संसदेचे कंपनीवरील नियंत्रण व हस्तक्षेपाची आणि अंतर्गत बाहय शत्रु यांची कंपनीला भीती वाटत होती.
🔸भारतीय शासनपध्दतीची माहिती असणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग नव्हता, म्हणून र्लॉड क्लाईव्हने दुहेरी राज्यव्यवस्था सुरु केली कंपनीने दिवाणी करवसुली व न्यायदान अधिकार नबाबाकडे ठेवला व्यापार सैन्य, परराष्ट्र, व्यवहार आणि खजिना इ. महत्वाची कार्ये कंपनीने स्वत:कडे ठेवली अशा प्रकारे नबाब आणि कंपनी यांच्यात सज्ञ्ल्त्;ाा विभागली गेली म्हणूनच तिला दुहेरी राज्यव्यस्था असे म्हणतात.
🔹या कार्यासाठी बंगालच्या नबाबला 53 लाख रुपयांची पेन्शन देण्यात आली. 1765-1772 या काळात बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात होती.
🔹या व्यवस्थेमुळे गोंधळ व भाषांतरांवरूनरष्टाचार निर्माण झाल्याने 1772 मध्ये वॉरन हेस्टिंग्जने बंद केली.
Mpsc Notes
►1904 ~ भारतीय विश्वविद्यालय अधिनियम पारित
►1905 ~ बंगाल का विभाजन
►1906 ~ मुस्लिम लीग की स्थापना
►1907 ~ सूरत अधिवेशन, कांग्रेस में फूट
►1909 ~ मार्ले-मिंटो सुधार
►1911 ~ ब्रिटिश सम्राट का दिल्ली दरबार
►1916 ~ होमरूल लीग का निर्माण
►1916 ~ मुस्लिम लीग-कांग्रेस समझौता (लखनऊ पैक्ट)
►1917 ~ महात्मा गाँधी द्वारा चंपारण में आंदोलन
► 1918 ~ खेड़ा सत्याग्रह
►1919 ~ रौलेट अधिनियम
►1919 ~ जलियाँवाला बाग हत्याकांड
►1919 ~ मांटेग्यू-चेम्सफोर्ड सुधार
►1920 ~ खिलाफत आंदोलन
►1920 ~ असहयोग आंदोलन
► 1921 ~ एका आंदोलन
►1922 ~ चौरी-चौरा कांड
►1927 ~ साइमन कमीशन की नियुक्ति
►1928 ~ साइमन कमीशन का भारत आगमन
► 1928 ~ बारडोली सत्याग्रह
►1929 ~ भगतसिंह द्वारा केन्द्रीय असेंबली में बम विस्फोट
►1929 ~ कांग्रेस द्वारा पूर्ण स्वतंत्रता की माँग
►1930 ~ सविनय अवज्ञा आंदोलन
►1930 ~ प्रथम गोलमेज सम्मेलन
►1931 ~ द्वितीय गोलमेज सम्मेलन
►1932 ~ तृतीय गोलमेज सम्मेलन
►1932 ~ सांप्रदायिक निर्वाचक प्रणाली की घोषणा
►1932 ~ पूना पैक्ट
►1942 ~ भारत छोड़ो आंदोलन
►1942 ~ क्रिप्स मिशन का आगमन
►1943 ~ आजाद हिन्द फौज की स्थापना
► 1946 ~ तेभागा आंदोलन
►1946 ~ कैबिनेट मिशन का आगमन
►1946 ~ भारतीय संविधान सभा का निर्वाचन
►1946 ~ अंतरिम सरकार की स्थापना
►1947 ~ भारत के विभाजन की माउंटबेटन योजना
►1947 ~ भारतीय स्वतंत्रता प्राप्ति
► 1948-50 ~ देशी रियासतों का विलय
► 26 जन. 1950 ~ भारतीय गणराज्य का गठन
महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे.
🧩अमरावती जिल्हा:
🅾ऊर्ध्व वर्धा धरण
🧩अहमदनगर जिल्हा :
🅾 आढळा प्रकल्प,ढोकी धरण, तिरखोल धरण, निळवंडे धरण, पळशी धरण, भंडारदरा धरण,मांडओहळ धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण, रुई छत्रपती धरण,लोणीमावळा धरण, विसापूर तलाव,सीना धरण, हंगा धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण)
🧩औरंगाबाद जिल्हा :
🅾 गराडा तळे,गौताळा तलाव, जायकवाडी धरण,नागद तलाव, निर्भोर तळे
🧩 उस्मानाबाद जिल्हा :
🅾तेरणा धरण
🧩कोल्हापूर जिल्हा :
🅾 रंकाळा तलाव
🧩गडचिरोली जिल्हा :
🅾दिना
🧩 गोंदिया जिल्हा :
🅾इटियाडोह
🧩चंद्रपूर जिल्हा :
🅾पेंच आसोलामेंढा
🧩जळगाव जिल्हा :
🅾अग्नावती धरण,अंजनी धरण, अभोरा धरण,काळा बंधारा, कृष्णपुरी बंधारा, गाळण पाझर तलाव, गिरणा धरण,जामदा बंधारा, तोंडापुरा धरण,दहीगाव बंधारा, धामणगाव बंधारा,पांझण उजवा कालवा,पिंपरी बंधारा,बहुळा धरण, बळाड बंधारा, बुधगाव बंधारा, बोरी धरण,भोकरबारी प्रकल्प, मंगरूळ धरण,मन्याड धरण, महरून तलाव, मोर धरण,म्हसवा बंधारा, वडगाव बंधारा, वाघूर धरण, वाडी पाझर तलाव, सातगाव डोंगरी, सार्वेपिंप्री बंधारा,सुकी धरण, हतनूर धरण, हिवरा धरण, होळ बंधारा (एकूण ३२)
🧩ठाणे जिल्हा :
🅾भातसा धरण, बरवी,सूर्या धामणी, सूर्या कवडासे
🧩धुळे जिल्हा :
🅾अक्कलपाडा धरण,अंचोळे, कानोली, गोंदूर तलाव,डेडरगाव तलाव, देवभाने, नकाणे तलाव,पुरमेपाडा, मांडळ, राक्षी, हरणमाळ तलाव
🧩नंदुरबार जिल्हा :
🅾यशवंत तलाव,
🧩 नागपूर जिल्हा :
🅾उमरी कान्होजी,कामठी खैरी , कोलार, निम्न वेणा (वाडेगाव), निम्न वेणा (नांद) ,पेंच तोतलाडोह , पेंच रामटेक ,पेंढारी धरण, मनोरी धरण,रोढोरी धरण, साईकी धरण.
🧩नांदेड जिल्हा :
🅾 इसापूर धरण, निम्न दुधना धरण, विष्णुपुरी धरण
🧩 नाशिक जिल्हा :
🅾अर्जुनसागर,केल्झार धरण, गंगापूर धरण,गिरणा धरण, चणकापूर धरण,,लोहशिंगवे धरण, हरणबारी धरण, पुणे गाव, कारजवन, तिसगाव, ओझरखेड,वाघाड, पालखेड, भावली धरण, मुकणे धरण, कडवा, दारणा धरण
🧩 परभणी जिल्हा :
🅾कर्परा धरण, लोअर दुधना धरण, पूर्णा येलावारी,पूर्णासिद्धेश्वर, येलदरी धरण
🧩 पुणे जिल्हा :
🅾आंध्रा धरण, उरवडे बंधारा, खडकवासला धरण, घोड धरण,चपेटधरण, चासकमान धरण, चंचवड बंधारा, टेमघर धरण, डिंभे धरण,तुंगार्ली धरण, देवघर धरण,पवना प्रकल्प, पानशेत धरण,पिंपळगावधरण, पिंपोळी बंधारा, भाटघर धरण,भुशी धरण, भूगाव बंधारा, माणिकडोह धरण, मारणेव्बाडी बंधारा,मुळशी धरण, येडगाव धरण, रिहे बंधारा,लवळे बंधारा, लोणावळा तलाव, वडज धरण, वरसगाव धरण, वळवण धरण, वाळेण बंधारा, वीर धरण, शिरवटा धरण,आयएनएस शिवाजी तलाव, हाडशी बंधारा १, हाडशी बंधारा २ (एकूण ३४)
🧩 बुलढाणा जिल्हा :
🅾खडकपूर्णा धरणनळगंगा धरण वाण,पेंटाळी
🧩बीड जिल्हा :
🅾माजलगाव धरण,मांजरा धरण
🧩भंडारा जिल्हा :
🅾इंदिरासागरप्रकलप, कऱ्हाडा तलाव प्रकलप, खांब तलाव प्रकलप, चांदपूर तलाव प्रकलप,बहुळा धरणप्रकलप, बालसमुद्र प्रकलप,इतीयाडोह प्रकलप , बाघ शिरपूरप्रकलप, बाघ पुजारीटोला प्रकलप,बाघ कालीसरार प्रकलप , गोसीखुर्दप्रकलप
🧩मुंबई जिल्हा :
🅾मोडक सागर, तानसा,विहार, तुळशी
🧩यवतमाळ जिल्हा:
🅾पूस ,अरुणावती ,बेंबळा
🧩वर्धा जिल्हा :
🅾ऊर्ध्व वर्धा धरण,डोंगरगाव प्रकल्प, धाम धरण(महाकालीजलाशय), नांद प्रकल्प,निम्न वर्धा धरण, पंचधारा प्रकल्प,पोथरा प्रकल्प, बेंबळा प्रकल्प, बोरप्रकल्प, मदन उन्न,ई प्रकल्प, लाल नाला प्रकल्प, वडगाव प्रकल्प,वर्धा कार नदी प्रकल्प, सुकळी लघुप्रकल्प (एकूण १४)
🧩 सातारा जिल्हा :
🅾उरमोडी धरण,कण्हेर धरण, कास तलाव,कोयना धरण(शिवसागर), जांभळी जंगल तलाव,तापोळा तलाव, तारळी धरण, धोम धरण, बलकवडी धरण, बामणोली तलाव,मोती तलाव, मोरणा धरण, वेण्णा तलाव (एकूण १२)
🧩सिंधुदुर्ग जिल्हा :
🅾तिलारी धरण,देवधर धरण
🧩सोलापूर जिल्हा :
🅾आष्टी तलाव,उजनी धरण , एकरुख तलाव, कंबर तलाव,गिरणीतलाव,पाथरी तलाव, भीमा-सीना नद्यांना जोडणारा भूमिगत कालवा , बुद्धिहाळ तलाव,यशवंतसागर (उजनी) तलाव,संभाजी तलाव,सिद्धेश्वर तलाव, हिप्परगी तलाव,एकरुखे तलाव, होटगी तलाव (एकूण ११)
🧩हिंगोली जिल्हा :
🅾येलदरी धरण,सिद्धेश्वर धरण.
🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋
पृथ्वीवरील भूस्वरुपाचे प्रकार
🌿1. व्दिपकल्प - एखाद्या भूभागाच्या तीन भागास पाणी व एका भागास जमीन असेल तर त्यास व्दिपकल्प असे म्हणतात. भारताचा दक्षिणेकडील भाग हा व्दिपकल्प म्हणून ओळखला जातो.
🌿2. भूशीर - व्दिपकल्पाचे अत्यंत निमुळते टोक समुद्रात खोलवर गेले असेल तर ते टोक भूशीर म्हणून ओळखले जाते. आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील टोक केप ऑफ गुड होप जगातील सर्वात मोठे भूशीर ओळखले जाते.
🌿3. खंडांतर्गत समुद्र - मध्यभागी समुद्र व भोवताली जमीन असल्यास त्या समुद्राला खंडातर्गत समुद असे म्हणतात.
🌿4. बेट - एखाद्या भूखंडाच्या सभोवताली सर्वच बाजूने पाणीच असेल तर, असा भूखंड बेट म्हणून ओळखला जातो.
🌿5. समुद्रधुनी - काही ठिकाणी पाण्याचा चिंचोळा भाग दोन भूखंडाच्यामध्ये पसरलेला असतो. ही चिंचोळी पाण्याची पट्टी सागराच्या दोन्ही भागाला जोडली जाते. त्याला समुद्रधुनी असे म्हणतात.
🌿6. संयोगभूमी - दोन खंडांना जो डणारा जमिनीचा चिंचोळा भाग म्हणजे संयोगभूमी होय.
. 🌿आखात - उपसागरांहूनही निमुळता असा समुद्राचा भाग तीन बाजूंनी जमिनीचे वेढला जातो तेव्हा त्यास आखात असे म्हणतात.
🌿8. खाडी - आखातापेक्षाही चिंचोळा जमिनीत घुसलेला समुद्राचा पट्टा म्हणजे खाडी होय.
🌿9. समुद्र किंवा सागर - महासागरापेक्षा आकाराने लहान असणार्या खार्या पाण्याच्या साठयाला समुद्र किंवा सागर असे म्हणतात. सागर हे महासागराचाच भाग असतो तर, काही समुद्र हे भुवेष्टित असतात.
उदा. अरबी समुद्र, भूमध्यसमुद्र, कॅस्पियन समुद्र
🌿10. उपसागर - खार्या पाण्याच्या ज्या जलाशयाला तीनही बाजूंनी जमिनीने वेढलेले असते त्या जलाशयाला उपसागर असे म्हणतात. उपसागर हा सागरापेक्षा लहान असतो. उदा. बंगालचा उपसागर
🔹भारतातील प्रमुख आदिवासीजमाती
आपातनी अरुणाचल प्रदेश
आओ नागाल्यांड
अंगामी नागाल्यांड
कोल छत्तीसगढ
कोटा तामिळनाडू
मुंडा झारखंड
कोलाम आंध्र प्रदेश
छुतीया आसाम
चेंचू आंध्र प्रदेश
गारो मेघालय, आसाम, नागाल्यांड
बैगा छत्तीसगढ,झारखंड
भिल्ल राजस्थान, छत्तीसगढ
बदगा निलगिरी पर्वत तामिळनाडू
भोट हिमाचल प्रदेश
लेपचा सिक्कीम
वारली महाराष्ट्र
चकमा त्रिपुरा
गड्डी हिमाचल प्रदेश
जयंती मेघालय
बोदो आसाम
खासी आसाम, मेघालय, नागाल्यांड
गोंड महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ
लुशिया त्रिपुरा
मोपला केरळ
भुतिया उत्तरांचल
जारवा छोटे अंदमान
कुकी मणिपूर
कुरुख झारखंड, ओरीसा
अका,मिश्मी, अरुणाचल प्रदेश
डाफला अरुणाचल प्रदेश
कोरबा छत्तीसगड, महारष्ट्र
हो छोटा नागपूर
मुरीया बस्तर छोटा नागपूर
संथाल वीरभूम,झारखंड
गुज्जर हिमाचल प्रदेश
खोंड ओरिसा
मिकिर आसाम
उरली केरळ
मीना राजस्थान
ओरेओन पश्चिम बंगाल, झारखंड
तोडा निलगिरी पर्वत तामिळनाडू
RBI ची कार्ये
🟣 परंपरागत कार्ये
१) चलननिर्मितीची मक्तेदारी
२) सरकारची बँक
३) बँकांची बँक
४) अंतिम ऋणदाता / अंतिम त्राता
५) निरसन गृह
६) पतनियंत्रण/किंमत स्थैर्य
७) परकीय चलन साठ्याचा सांभाळ
८) विनिमय दर स्थैर्य राखणे
९) अर्थविषयक आकडेवारी प्रसिद्ध करणे
🟠 पर्यवेक्षणात्मक कार्य
1) बँकांना परवाना देणे
२) शाखा परवाना पद्धती
३) बँकांची तपासणी
४) बँकांच्या कार्यपद्धतीचे नियंत्रण
५) बँकांच्या व्यवस्थापनावरील नियंत्रण
६) बँकांच्या विलीनीकरणवर नियंत्रण
७) वित्तीय पर्यवेक्षण मंडळ
तसेच, पर्यवेक्षण विभागाची स्थापना
🟢 प्रवर्तनात्मक कार्ये
१) व्यापारी बँकव्यवसायाचे प्रवर्तन
२) सहकारी बँकव्यवसायाचे प्रवर्तन
३) कृषी व ग्रामीण पतपुरवठ्याचे प्रवर्तन
४) औद्योगिक वित्तपुरवठ्याचे प्रवर्तन
५)निर्यात वित्तपुरवठ्याचे प्रवर्तन
चलनाचे अवमूल्यन
🅾अवमूल्यन - चलनाचे अवमूल्यन म्हणजे एखाद्या चलनाची विदेशी चलनाच्या परिमाणात निर्धारित केलेली चालू किंमत कमी करणे. अवमूल्यन झालेल्या चलनाची अंतर्गत (स्वदेशातील) क्रयशक्ती कमी होत नाही, हे महत्त्वाचे. रु. ६८ ला एक डॉलर या दराऐवजी रु. ७० ला एक डॉलर मिळू लागला, असे धोरण सरकारने जाहीर केले म्हणजे 'रुपयाचे डॉलर-चलनात अवमूल्यन झाले', असे म्हणता येईल.
🅾आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदातील मूलभूत असमतोल नाहीसा करण्यासाठी निर्यातीत वाढ व आयातीत घट करणे आवश्यक ठरते. त्यासाठी योजण्यात येणार्या अनेक उपायांपैकी अवमूल्यन हा दीर्घ-परिणाम उपाय मानतात. हा असमतोल तात्पुरता नसून दीर्घकाळ चालू राहिला आणि आयातनिर्यातीमधील तूट भरून काढण्यासाठी परदेशी मदत व कर्जे यांवर बराच काळ विसंबून राहावे लागले, की अवमूल्यनाचा अवलंब केला जातो. चलनवाढही मूलभूत असमतोलास कारणीभूत ठरते. चलनाचे अवमूल्यन झाले म्हणजे आयात महाग होते व निर्यात स्वस्त होते.
🧩उदा., एका डॉलरची वस्तू आयात करण्यास पूर्वी रु. ६८ द्यावे लागत असल्यास, अवमूल्यनानंतर त्यासाठी रु. ७० द्यावे लागतात. उलट अमेरिकेतील आयातदारास एका डॉलरमध्ये रु. ६८ च्या वस्तूऐवजी रु.७० किंमतीच्या वस्तू मिळतात. साहजिकच, भारताची आयात कमी होण्यास व निर्यातीस चालना मिळण्यास मदत होते.
🅾चलनाचे अंतर्गत मूल्य कमी झालेले असताना विनिमय-दर पूर्वीचाच राहिला, तर त्या चलनाचे अधिमूल्यन झाले, असे मानतात.
🅾आयात मालाची अंतर्गत आणि निर्यात मालाची परदेशातील मागणी लवचिक असेल, तरच अवमूल्यनाचे उद्दिष्ट साध्य होते. अवमूल्यन यशस्वी होण्या-साठी सरकारी खर्चात काटकसर, करांमध्ये वाढ, खाजगी खर्चांवर नियंत्रण, वस्तूंचे नियंत्रित दर कमी करणे, हे व भावपातळी खाली आणण्यासाठी आवश्यक ते अन्य उपाय योजणे आवश्यक असते. एका देशाने अवमूल्यन केल्यानंतर त्या देशाशी व्यापारसंबंध असणाऱ्या अनेक देशांनी लागोपाठ आपल्या चलनांचे अवमूल्यन केले, तर मात्र त्यापासून कोणासच फायदा मिळत नाही; उलटपक्षी व्यापार-संकोच होतो.
🅾अवमूल्यनामुळे अंतर्गत भाववाढ होण्याची संभाव्यता दृष्टिआढ करून चालणार नाही. निर्यातदारांचे वाढते उत्पन्न, निर्यात वाढल्याने व आयात कमी झाल्याने वस्तूंचा कमी झालेल पुरवठा, रोजगारीतील वाढ इ. कारणांमुळे तत्काळ भाववाढ होण्याची शक्यता असते. शिवाय अवमूल्यनाचा खरा अर्थ न समजल्यामुळे आणि स्वार्थ साधण्यासाठी व्यापारी, चलनाचे अंतर्गत मूल्य कमी झाले आहे असा भ्रम निर्माण करून, भाव वाढवितात असा सर्वसाधारण अनुभव आहे. म्हणूनच भाववाढ रोधण्याचे उपाय महत्त्वाचे ठरतात. देशात गुंतलेले परकीय भांडवल परत बाहेर जाऊ नये, हादेखील अवमूल्यनाचा एक हेतू असतो.
🅾भाववाढ, युद्धकाळात वाढलेले परकीय कर्जांचे ओझे व आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदातील असमतोल ह्यांतून बाहेर पडण्यासाठी १८ सप्टेंबर १९४० रोजी इंग्लंडने आंतरराष्ट्रीय चलननिधीच्या परवानगीने पौंडाचे ३०.५ टक्के अवमूल्यन केले. यामुळे पौंडाचे किंमत ४.०३ डॉलर होती, ती २.८० डॉलर झाली. भारताची आयतनिर्यात बव्हंशी इंग्लंडवर व अन्य राष्ट्रकुल देशांवर अवलंबून असल्याने व पौंडाच्या अवमूल्यनाने भारताच्या निर्यातीत फार मोठी घट होणे अटळ ठरल्याने, भारताला पौंड-अवमूल्यनानंतर लगोलग रुपयाचे तितक्याच प्रमाणात अवमूल्यन करावे लागले. रुपया व पौंड यांमधील विनिमय-दर पूर्वीइतकाच म्हणजे एक शिलिंग सहा पेन्स राहिला, पण डॉलरची रुपयातील किंमत ३.३१ वरून ४.७६ वर गेली. भारताला १९४९ च्या अवमूल्यनामुळे फायदा झाला नाही; पण तत्कालीन अर्थमंत्री डॉ. जॉन मथाई यांनी म्हटल्याप्रमाणे तो केवळ संरक्षणात्मक पवित्रा होता.
🅾तिसर्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरीच्या काळात भारताच्या आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदातील तूट वाढत गेली. परदेशी हुंडणावळीची चणचण, अंतर्गत भाववाढ, रुपयाचे ढासळलेले मूल्य यांमुळे आंतरराष्ट्रीय चलननिधीच्या सल्ल्यानुसार भारताने ६ जून १९६६ रोजी रुपयाचे ३६.५ टक्क्यांनी अवमूल्यन केले. डॉलरची किंमत रु. ४.७६ होती ती रु. ७.५० झाली व पौंडाची किंमत रु. १३.३३ होती ती रु. २१ झाली. निर्यातवाढ व्हावी, परकीय भांडवल-गुंतवणुकीस उत्तेजन मिळावे, आणि भारत साहाय्य-मंडळ (एड इंडिया क्लब) आणि जागतिक बँक यांसारख्या आंतर-राष्ट्रीय संघटनांकडून भारताच्या चौथ्या पंचवार्षिक योजनेस अधिक मदत मिळविता यावी हे अवमूल्यनाचे उद्देश होते. भारताच्या आंतरराष्ट्रीय देवघेवींच्या ताळेबंदातील असमतोलाचा ताण बराच काळ असह्य होत चालला असूनही या वेळी हे अवमूल्यन अनपेक्षित होते. परकीय दडपणामुळे ते केले असावे, असा आरोप काहींनी केला.
🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋
🏦 बँक शीर्ष वाक्य 🏦
◼️भारतीय स्टेट बैंक - With you all the way, Pure Banking Nothing Else, The Nation banks on us
◼️भारतीय महिला बैंक – Empowering Women
◼️बैंक ऑफ बड़ौदा - India’s International Bank
◼️इलाहाबाद बैंक - A Tradition of Trust
◼️केनरा बैंक – Together We Can
◼️ बैंक ऑफ महाराष्ट्र - One family one bank
◼️ IDBI Bank – Banking For All, “Aao Sochein Bada”
◼️सेंट्रल बैंक – “Central To you Since 1911”, Build A Better Life Around Us
◼️ आंध्रा बैंक – Where India Banks, For all your needs
◼️देना बैंक - Trusted Family Bank
◼️ECGC Bank – You focus on exports. We cover the risks
◼️बैंक ऑफ इंडिया - Relationship beyond banking
◼️यस बैंक – Experience our Expertise
◼️इंडियन ओवरसीज बैंक – Good people to grow with
◼️पंजाब नेशनल बैंक - The name you can bank upon
◼️यूनियन बैंक – Good People to Bank with
◼️ओरिएंटल बैंक – Where every individual is committed
◼️यूको बैंक – Honours Your Trust, Owners your trust
◼️इंडियन बैंक – Your Tech- Friendly Bank, Taking Banking Technology to Common Man
◼️यूनाइटेड बैंक – The Bank that begins with “U”
◼️कॉर्पोरेशन बैंक – A Premier Public Sector Bank
◼️फेडरल बैंक : Your Perfect Banking Partner
◼️एक्सिस बैंक – Badhti Ka naam Zindagi
◼️ICICI Bank – Hum Hai Na, Khyal Apka
◼️HDFC Bank - We understand your world indeed
◼️विजया बैंक - A friend you can bank upon
◼️HSBC - The world’s local bank, We Understand Your World
◼️सिंडिकेट बैंक : Your Faithful And Friendly Financial Partner
◼️पंजाब एंड सिंध बैंक – Where service is a way of life
◼️जम्मू काश्मीर बँक : Serving to Empower
थोडक्यात महत्वाचे
*सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड
*देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य - महाराष्ट्र
*देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा
*देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत
*देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश
*देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य - तामिळनाडू
*देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक - बंगळूर
*देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य - आंध्रप्रदेश
*देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र
*देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प - कांडला (गुजरात)
*देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल
*देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश
*देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ -राज्यस्थान
*देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर (पुणे)
*देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा
*देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)
*देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र
*देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र
*देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली
*देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)
*देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र
*देशातील पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)
*देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले - दिल्ली
*देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी (गुजरात)
*देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड
*देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क -भुवनेश्वर
*देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंध्रप्रदेश
*देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी
*देशातील पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश)
*देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी
*देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र
*देशातील पहिला निर्मल जिल्हा - कोल्हापूर
*देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली - भुसावळ - आजदपूर
*देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी - मुंबई
*देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संख्येत मतदान अनिवार्य करणारे राज्य - गुजरात
*देशातील पहिली संत्रा वायनरी - सावरगाव (नागपूर)
*देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन -पुणे
*देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात -अरुणाचल प्रदेश
*देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ - नागपूर
*देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र
*देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र
*देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी - चैन्नई
*देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय - ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)
*देशातील पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली
*देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र - पुणे
*देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य - कर्नाटक
*देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प - ताडोबा (चंद्रपूर)
देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य -हिमाचलप्रदेश
*देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली - बंगलोर
*देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य - महाराष्ट्र
*देशातील पहिला घन कचर्यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे - पुणे
*देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य - सिक्किम
*देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य - महाराष्ट्र
*देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे
*देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव - गरिफेमा (नागालँड)
भौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा
अॅम्पिअर :- विद्युत प्रवाह मोजण्याचे परिमाण. एका सेकंदाला वाहणारा 6×10 इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे एक अॅम्पिअर होय.
बार :- बार (हवेचा दाब) मोजण्याचे परिमाण. एका चौ.से.मी. वर असलेला 10 डाईन एवढा हवेचा भार म्हणजे 1 बार होय. एका बारचा हाजारावा भाग म्हणजे मिलिबार होय.
कॅलरी :- उष्णतेचे परिमाण. 1 ग्रॅम वजनाच्या पाण्याचे तापमान 1 सें.ग्रॅ. ने वाढवण्यास जेवढी उष्णता लागते ती एक कॅलरी होय. एखाद्या विशिष्ट अन्नपदार्थापासून शरीरास किती ऊर्जा वा उष्णता मिळेल तेही या परिमाणात व्यक्त करतात.
ओहम :- विद्युतरोधाचे परिमाण 1 अॅम्पियर वाहकाच्या दोन टोकांमध्ये 1 व्होल्ट विद्युतदाब असताना विद्युतधारा जाऊ दिली असता जितका विद्युत विरोध निर्माण होतो. तो 1 ओहम होय. 1 ओहम = 1 व्होल्ट/ 1 अॅम्पियर
अश्चशक्ती :- यंत्राची शक्ती मोजण्याचे परिमाण 550 पौंड वजनाची वस्तु सेकंदामध्ये 1 फुट पुढे सरकण्यास लागणारी शक्ती म्हणजे एक अश्वशक्ती होय. एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट होय.
ज्यूल :- कार्य किंवा ऊर्जेचे परिमाण 1 व्होल्ट दाबाच्या विद्युत मंडलातून 1 अॅम्पियर शक्तीचा विद्युत प्रवाह 1 सेकंद पाठविल्यास जेवढी ऊर्जा खर्च होईल ती 1 ज्यूल होय.
व्होल्ट :– विद्युत शक्तीचे परिमाण. एक ओहम विरोध असणार्या विद्युत मंडळातून एक अॅम्पियर प्रवाह पाठविण्यासाठी लागणारा एकूण विद्युत दाब म्हणजे एक व्होल्ट होय.
वॅट :- विद्युत शक्तीचे परिमाण. एक ओहम 1 अॅम्पियरचा परिवता प्रवाह 1 सेकंदात जेवढी ऊर्जा खर्च करेल ती एक वॅट होय. 1000 वॅट = 1 किलोवॅट.
नॉट :- जहाजाच्या वेगाचे परिमाण. हा वेग दर ताशी साधारणपणे 1,853 मीटर किंवा 6,080 फुट इतका असतो. यालाच नॉटिकल मैल असेही म्हणतात. सागरावरील सर्व अंतरे याच परिमाणात मोजतात.
सौर-दिन :- दर दिवशी सूर्य मध्यान्हीला डोक्यावर येत असतो. लागोपाठ येणार्या दोन मध्यान्हीमधील कालावधीला सौर-दिन असे म्हणतात. सौर-दिनाचा काल ऋतुनुसार बदलत असतो. संपूर्ण वर्षातील सौर-दिनांच्या कालावधीवरुन मध्य सौरदिन ठरवतात. मध्य सौर दिन सर्वसाधारणपणे 24 तासांचा असतो.
प्रकाश वर्ष :– प्रकाशवर्ष विश्वातील ग्रह व तारे यातील अंतरे मोजण्याचे परिमाण आहे. प्रकाशाचा वेग दर सेकंदाला (3×10)8 मी./सेकंद इतका आहे. या वेगाने प्रकाश किरणाने वर्षभरात तोडलेले अंतर म्हणजे एक प्रकाश वर्ष होय. 1 प्रकाश वर्ष = (9.46×10)12 किमी
विस्थापन :- एखाद्या वस्तूने आपल्या स्थानात केलेल्या बदलाला विस्थापन असे म्हणतात.
गती/चाल :- एकक काळात वस्तूने आक्रमिलेल्या अंतराला त्या वस्तूची गती/चाल असे म्हणतात.
वेग :- एकक काळात एखाद्या वस्तूने विशिष्ट दिशेने कापलेले अंतर म्हणजे वेग होय. वेगाचे एकक मीटर/सेकंद हे आहे.
त्वरण :- एकक काळामध्ये वस्तूच्या वेगांत झालेल्या बदलास त्वरण असे म्हणतात.
संवेग :- संवेग अक्षय्यतेच्या नियमानुसार आघातापूर्वी व नंतर संवेग समान असतो. अनेक वस्तूंचा वेग कायम असेल आणि वस्तुमान भिन्न असेल तर संवेग कायम नसतो. वस्तुमान = वेग x संवेग
कार्य :– वस्तूवर बलाची क्रिया केली असता त्या वस्तूचे बलाच्या रेषेत विस्थापन होते याला कार्य असे म्हणतात. कार्य ही सादिश राशी असून कार्य = बल x वस्तूने आक्रमिलेले अंतर
Latest post
आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024
🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे 🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...
-
संपूर्ण महाराष्ट्राला सोपा जाणारा Geography हा विषय आहे....मग नेमकं या मधील कोणते घटक व्यवस्थित अभ्यासले पाहिजेत. खालील प्रत्येक Points एकदम...
-
🎯टाइम मॅगझिन एथिलिट ऑफ द इयर 2023 :- लिओनेल मेस्सी 🎯टाइम पर्सन ऑफ द इयर 2023 टेलर स्विफ्ट 🎯पाहिला वणभुषण 2024 चैत्राम पवार 🎯महाराष्ट्र भ...
-
विज्ञान विषयाची तयारी करताना लक्षात घ्यायला हवे की हा सर्वात जास्त input द्यावा लागणारा आणि सर्वात कमी output असणार विषय आहे. Combine पूर्व ...