Thursday, 7 October 2021

मोजकेच पण महत्त्वाचे उपयुक्त प्रश्नावली


1) शरीरातील सर्वात व्यस्त भाग ( अवयव ) कोणता ?

:- हृदय


2) जगातील सर्वात मोठे फुल कोणते   ?

:-  रिफ्लेशीया आरनोडाई


3) वनस्पती शास्त्राचे जनक कोण ?

:- थियोफ्रेस्टस


4)  मानवी शरीरातील सर्वात मोठी पेशी  ?

:- ग्लुटीयस मॅक्सीमस


5) कोणते शैवाल हे ' अंतरीक्ष शैवाल ' 

( Space Algae ) म्हणून ओळखले जाते ?

:- क्लोरेल्ला ( Chlorella )


6) व्हिटॅमिन डी ( vit - D ) चा शोध कुणी लावला ?

:- हापकिंस


7) डायनामाइट चा शोध कोणी लावला ?

:- आल्फ्रेड नोबेल


8) ( RDX ) चा full form काय आहे  ?

:- Research and Developed Explosive.


9) कोणत्या वायूला ( हसवणारा वायू ) laughing gas असे म्हटले जाते ?

:- नाइट्रस ऑक्साइड


10) नील हरित शैवाल आता कोणत्या नावाने ओळखले जाते ?

:- Cyanobacteria

( साइनोबॅक्टीरिया )


भौतिकशास्त्रातील महत्वाच्या शास्त्रीय संज्ञा



👉 अम्पिअर :- विद्युत प्रवाह मोजण्याचे परिमाण. एका संकेदाला वाहणारा 6x10 इलेक्ट्रॉनचा प्रवाह म्हणजे एक अॅम्पिअर होय.


👉 बार :- बार (हवेचा दाब) मोजण्याचे परिमाण. एका चौ.से.मी. वर असलेला 10 डाईन एवढा हवेचा भार म्हणजे 1 बार होय. एका बारचा हाजारावा भाग म्हणजे मिलिबार होय. 


👉 कलरी :- उष्णतेचे परिमाण. 1 ग्रॅम वजनाच्या पाण्याचे तापमान 1 सें.ग्रॅ. मे वाढवण्यास जेवढी उष्णता लागते ती एक कॅलरी होय. एखाद्या विशिष्ट अन्नपदार्थापासून शरीरास किती ऊर्जा वा उष्णता मिळेल तेही या परिमाणात व्यक्त करतात. 


👉 ओहम :- विद्युतरोधाचे परिमाण 1 अॅम्पियर वाहकाच्या दोन टोकांमध्ये 1 व्होल्ट विद्युतदाब असताना विद्युतधारा जाऊ दिली असता जितका विद्युत विरोध निर्माण होतो. तो 1 ओहम होय. 1 ओहम = 1 व्होल्ट/ 1 अॅम्पियर 


👉 अश्चशक्ती :- यंत्राची शक्ती मोजण्याचे परिमाण 550 पौंड वजनाची वस्तु सेकंदामध्ये 1 फुट पुढे सरकण्यास लागणारी शक्ती म्हणजे एक अश्वशक्ती होय. एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट होय. 


👉 जयूल :- कार्य किंवा ऊर्जेचे परिमाण 1 व्होल्ट दाबाच्या विद्युत मंडलतून 1 अॅम्पियर शक्तीचा विद्युत प्रवाह 1 सेकंद पाठविल्यास जेवढी ऊर्जा खर्च होईल ती 1 ज्यूल होय. 


👉 वहोल्ट :- विद्युत शक्तीचे परिमाण. एक ओहम विरोध असणार्‍या विद्युत मंडळातून एक अॅम्पियर प्रवाह पाठविण्यासाठी लागणारा एकूण विद्युत दाब म्हणजे एक व्होल्ट होय. 


👉 वट :- विद्युत शक्तीचे परिमाण. एक ओहम 1 अॅम्पियरचा परिवता प्रवाह 1 सेकंदात जेवढी ऊर्जा खर्च करेल ती एक वॅट होय. 1000 वॅट = 1 किलोवॅट. 


👉 नॉट :- जहाजाच्या वेगाचे परिमाण. हा वेग दर ताशी साधारणपणे 1,853 मीटर किंवा 6,080 फुट इतका असतो. यालाच नॉटिकल मैल असेही म्हणतात. सागरावरील सर्व अंतरे याच परिमाणात मोजतात. 


👉 सौर-दिन :- दर दिवशी सूर्य मध्यान्हीला डोक्यावर येत असतो. लागोपाठ येणार्‍या दोन मध्यान्हीमधील कालावधीला सौर-दिन असे म्हणतात. सौर-दिनाचा काल ऋतुनुसार बदलत असतो. संपूर्ण वर्षातील सौर-दिनांच्या कलावधीवरुन मध्य सौरदिन ठरवतात. मध्य सौर दिन सर्वसाधारणपणे 24 तासांचा असतो. 


👉 परकाश वर्ष :- प्रकाशवर्ष विश्वातील ग्रह व तारे यातील अंतरे मोजण्याचे परिमाण आहे. प्रकाशाचा वेग दर सेकंदाला (3x10)8 मी./सेकंद इतका आहे. या वेगाने प्रकाश किरणाने वर्षभरात तोडलेले अंतर म्हणजे एक प्रकाश वर्ष होय. 1 प्रकाश वर्ष = (9.46x10)12 किमी . 


परश्न मंजुषा



Q.1..... बँक राष्ट्रीयीकरण दिवस म्हणून ओळखला जातो.

1 १९ जुलै √√√√

2 ३१ आॅक्टोबर

3  २३ एप्रिल

4 १ व ३


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.2 NRHM ची सुरुवात .......या वर्षी करण्यात आली.

1  २००७

2  २००४

3  २००५√√√√√√

4  २०१३


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.3  भारतातील बेकारीसाठी खालीलपैकी कोणते कारण महत्त्वाचे नाही 

1  कामगारांची वाढती संख्या

2  अयोग्य तंत्रज्ञान 

3  प्रभावी मागणीची      

कमतरता 

4  कामगारांसाठी संरक्षित कायदा√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.4...... मध्ये सर्वप्रथम वैज्ञानिक पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न गणना करण्यात आली?

1  १९४८-४९

2  १९३१-३२√√√√

3  १९११-१२

4  १८६७-६८


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.5  खालीलपैकी कोणती घटना पंचवार्षिक योजना चालु असताना घडली नाही?

1   चलन निश्चलीकरन 

2   रुपयाचे अवमूल्यन√√√√

3   १ व २  दोन्ही घडले 

4  १ व २ दोन्ही घडले नाही


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.6  रिझर्व्ह बँकेच्या पत नियंत्रणाचे दैनंदीन वापराचे साधन कोणते?

1   बँकदर

2  रोख राखीव प्रमाण

3  वैधानिक रोखता प्रमाण

4  रेपो आणि रेव्हर्स रेपो व्यवहार√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.7  खाद्याबाबतच्या आवडी व अग्रक्रम स्थिर असताना उत्पन्न वाढत असताना अन्नावरील प्रत्यक्ष खर्च जरी वाढत असला तरी उत्पन्नापैकी अन्नावर केलेल्या खर्चाचे प्रमाण कमी होते हे सांगणारा नियम म्हणजे......... होय.

1  "से" चा बाजार विषयक नियम

2  उपभोगाचा मानसशास्त्रीय नियम

3  एंजल चा नियम√√√√√

4  फिलिप्स वक्ररेषा


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.8  १८६७ मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न.... तर दरडोई उत्पन्न..... इतके होते.

1  २० कोटी व ३४० रुपये वार्षिक

2  २४० कोटी व २० रुपये वार्षिक

3  ३४० कोटी व २० रुपये वार्षिक √√√√√√

4  ३४० कोटी वार्षिक व २०  रुपये मासिक


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.9 पहिल्या पंचवार्षिक योजने दरम्यान खालीलपैकी....... मध्ये वाढ झाली नाही?

1  अन्नधान्य उत्पादन

2  राष्ट्रीय उत्पन्न 

3  दरडोई उत्पन्न

4  किमतीचा निर्देशांक√√√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.10  भारत निर्माण योजनेमध्ये पुढील पैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होत नाही?

अ. ग्रामीण शिक्षण

ब. ग्रामीण आरोग्य

क. ग्रामीण पाणीपुरवठा

ड. ग्रामीण रस्ते

1   अ आणि ब  √√√√√

2   ब आणि क

3   क आणि ड

4  अ आणि ड


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.11  खालीलपैकी कोणते घटक १९६६-१९६९ दरम्यान भारतातील नियोजन खंडित होण्यास कारणीभूत होते? 

1  चीन -भारत युध्द

2  भारत पाकिस्तान संघर्ष 

3  आर्थिक मंदी

4  राजकीय अस्थिरता √√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.12  तीव्र मंदी दूर करण्यासाठी सरकारने मुद्दाम घडवून आणलेली तेजीची/ चलन वाढची परिस्थिती म्हणजे ....... होय.

1  मुद्रा अवपात

2  मुद्रा संस्फीती√√√√√

3  स्टगफ्लेशन

4  स्टगनेशन


📖📖📖📖📖📖📖📖📖


[Q.13  भारत सर्वाधिक निर्यात कोणत्या राष्ट्राला करतो?

1  यु एस ए √√√√√√  

2  यु के  

3  चीन   

4  सिंगापूर


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.14 १९६९ च्या १४ बँकांच्या राष्ट्रीयीकरणाला खालीलपैकी कोणाचा विरोध होता?

अ इंदिरा गांधी 

ब  मोरारजी देसाई

क जयप्रकाश नारायण

ड  रिझर्व्ह बँक 

1  अ आणि क 

2  ब आणि  ड√√√√√√

3  ब आणि  क

4  क आणि ड


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.15  तिसऱ्या पंचवार्षिक योजने दरम्यान खालीलपैकी...... मध्ये घट झाली नाही.

1  अन्नधान्य उत्पादन

2  राष्ट्रीय उत्पन्न

3  परकीय चलन साठा

4  किमतीचा निर्देशांक√√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.16  भारतात मध्यवर्ती   बँकेची शिफारस कोणी केली नव्हती? 

1   हिल्टन यंग आयोग

2   चेंबर्लिन आयोग

3   फौलर समिती

4   मॅकलेगन समित✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.17  ........ ही कंपनी 'मोती' या नावाने युरिया उत्पादन करते.

1  राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर ली.

2  मद्रास फर्टिलायझर ली.

3  हिंदुस्थान फर्टिलायझर ली.√√√√√√√

4  वरील सर्व


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.18 राष्ट्रसभेकडून कोणत्या वर्षी राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली होती?

1  १९४६

2  १९३८√√√√√

3  १९२९

4  १९२५


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.19 सरकारच्या तुटीच्या अर्थभरणाचा खालीलपैकी कोणता स्रोत नाही?

1  रिझर्व्ह बँकेकडून व व्यापारी बँकेकडून कर्ज घेणे

2  नवीन चलन निर्मिती

3  स्वतःच्या रोख रकमेतून पैसे काढणे

4  जमा झालेले महसूल√√√√√


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.20 प्रत्येक कार्यक्रमाचे ज्यामध्ये मूल्यमापन केले जाते ते..... अंदाजपत्रक होय.

1  रोख

2  बहुआयामी

3  शून्याधारीत√√√√√

4  यापैकी नाही


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.21 सार्वजनिक खर्चाचा आधुनिक सिध्दांत कोणी मांडला?

1 प्रो पिकॉक व प्रो वाईजमन√√√√√√

2 प्रो पिगु

3 डॉ मार्शल

4 वरील पैकी नाही


📖📖📖📖📖📖📖📖📖


Q.22 अप्रत्यक्ष करांचा समाजावर... परिणाम होत?

1  पुरोगामी

2  न्याय्य 

3  प्रतिगामी√√√√√√

4  प्रमाणशीर


चालू घडामोडी प्रश्नसंच



१) बस चालकाचा परवाना मिळवणारी देशातील पहिलीच इंजिनिअर महिला कोण ठरली आहे ?

अ) प्रतिक्षा दास ✅✅

ब) भक्ती दास

क) प्रिया राव

ड) प्रिया दास


२) डॉ. श्रीराम लागू आणि दिपा लागू यांच्या दिवंगत मुलाच्या नावाने कोणता पुरस्कार दिला जातो ?

अ) तन्वीर सन्मान ✅✅

ब) बालगंधर्व पुरस्कार

क) प्रभात पुरस्कार

ड) नाट्य सेवा पुरस्कार


३) नुकतेच प्रकाशित करण्यात आलेले ' अर्थसंकल्प सोप्या भाषेत ' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

अ) उद्धव ठाकरे

ब) देवेंद्र फडणवीस ✅✅

क) अजित पवार

ड) शरद पवार


४) पहिल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रिडा स्पर्धा २०२० मध्ये कोणत्या विद्यापीठाने सर्वाधिक पदक जिंकून प्रथम स्थान पटकावले ?

अ) सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे

ब) पंजाब विद्यापीठ चंदिगड ✅✅

क) जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली

ड) कोल्हापूर विद्यापीठ कोल्हापूर


५) नुकतेच मध्यप्रदेशातील कोणते अभयारण्य इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केले आहे ?

अ) सरदारपुर अभयारण्य

ब) राष्ट्रीय चंबळ अभयारण्य ✅✅

क) फेन अभयारण्य

ड) केन अभयारण्य


 खालीलपैकी कोणते ‘२०२० टोकियो ऑलिम्पिक’ खेळांचे घोषवाक्य आहे?

उत्तर : फास्टर, हायर, स्ट्रॉंगर – टुगेदर


● कोणत्या व्यक्तीची हैती देशाच्या पंतप्रधान पदावर नियुक्ती झाली?

उत्तर : एरियल हेन्री


● कोणत्या संस्थेत ऑक्सिजन वायुचा नियंत्रित पुरवठा करणारे ‘AMLEX’ नामक उपकरण विकसित करण्यात आले?

उत्तर : आयआयटी रोपार


● “फार्मास्युटिकल उत्पादनाचे प्रमाणपत्र” कोणती संस्था देते?

उत्तर : जागतिक आरोग्य संघटना


● कोणत्या देशाने ताशी ६०० किलोमीटर या गतीने धावणारी जगातील पहिली हाय-स्पीड मॅगलेव्ह परिवहन व्यवस्था’ कार्यरत केली आहे?

उत्तर : चीन


● कोणत्या शहरात ‘२०३२ ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक’ आयोजित केले जाईल?

उत्तर : ब्रिस्बेन


● खालीलपैकी कोणते विधान ‘मंकीपॉक्स’ या आजाराच्या संदर्भात चुकीचे आहे?

उत्तर : मानवामध्ये मंकीपॉक्सच्या संक्रमनाची पहिली नोंद १९४५ साली झाली होती.


● २१ जुलै २०२१ रोजी, कोणत्या  स्थळाला युनेस्को संस्थेच्या जागतिक वारसा यादीतून हटविण्यात आले.


प्र.1. हिमालयामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे आढळणार्‍या खिंडीचा योग्य क्रम लावा.

1) कालापाणी, बुर्झिल, बनिहाल, पीर-पांजाल 

2) कालापाणी बुर्झिल, पीरपंजाल, बनिहाल.  √

3) पीरपंजाल, बनिहाल, बुर्झिल, कालापाणी 

4) बुर्झिल, कालापाणी, पीरपंजाल, बनिहाल


प्र.2. खालीलपैकी कोणते घटक ऋतूनिर्मितीस कारणीभूत आहेत.

अ. पृथ्वीचे परीभ्रमण 

ब. पृथ्वीचे परिवलन

क.पृथ्वी अक्षाकडे झुकलेली असणे    

ड. पृथ्वीच्या अंडाकृती आकारामुळे


1) अ,ब 

2) ब, क, ड

3) सर्व कारणीभुत घटक   √

4) अ,ब व क


प्र.3. खालीलपैकी कोणते उष्णप्रवाह आहेत.

अ.उत्तर विषवृत्तीय प्रवाह ब.कॅरीबियन प्रवाह क.कॅलीफोर्निया प्रवाह ड. क्यरोसिवा प्रवाह


1) अ,ब, क 

2) अ, ब, ड 

3) अ,ब,ड √

4) वरील सर्व


प्र.4. खालीलपैकी कोणते विधाने -प्रावरण/मध्यावरण- विषयी बरोबर आहे.

अ. प्रावरणचा विस्तार खालच्या कवचा पासून गाभा पर्यंत आहे.

ब. प्रावरणाची जाडी सुमारे 2900 किमी आहे.

क. पृथ्वीच्या एकूण घनफ ळापैकी प्रावरणाने 83 टक्के भाग व्यापलेला आहे. व पृथ्वीच्या एकूण वस्तूमानापैकी प्रावरणाने वस्तूमान 68 टक्के आहे.


1) अ,क

2) अ 

3) अ,ब 

4) वरील सर्व. √


प्र.5. वार्‍याच्या अपरक्षण/खननकार्यामुळे निर्मित भुरूपे संबंधी कोणता पर्याय अयोग्य आहे.

अ.इयूजेन ब.यारदांग क.भुछत्र खडक ड.द्विपगिरी

इ.कंकतगिरी/केम्स ई तरंग घर्षितमंच 

उ. भुस्तंभ


1) सर्व योग्य 

2) सर्व अयोग्य 

3) क, ड, इ, ई, उ 

4) इ, ई.  √


प्र.6. बिटुमिनस कोळशाच्या प्रकारासंबंधी असत्य विधान ओळखा.

अ. बिटुमिनस कोळशात डांबराचा व वायूचा अंश जास्त असतो.

ब. बिटुमिनस कोळसा जळताना धुराचे प्रमाण कमी असून राखही कमी पडते.

क. बिटुमिनस कोळसा लवकर पेटतो व लवकर विझतो.


1) अ 

2) ब 

3) क 

4) यापैकी नाही.  √


प्र.7. पुढीलपैकी कोणत्या देशातून मकरवृत्त जाते?

अ. ऑस्टे्रलिया 

ब. नामिबिया 

क. ब्राझिल 

ड. चिली


1) अ,ब,क 

2) ब व क 

3) अ,ब, क 

4) सर्व योग्य.  √


प्र.8. पुढील पठार पश्‍चिमेकडून पूर्वेकडे क्रमाने लावा.

अ. छोटा नागपूर 

ब.माळवा 

क. बुंदेलखंड 

ड. बाघेलखंड


1) ब,क,ड,अ.  √

2) क,ब,ड,अ 

3) अ,क,ड,ब 

4) ब,क,अ,ड


प्र.9. जनगणना 2011 वरून योग्य ओळखा. (महाराष्ट्राबाबत)

अ. महाराष्ट्राची लोकसंख्या घनता 365 आहे.

ब. सर्वात कमी स्त्री-पुरूष (लिंग गुणोत्तर) मुंबई शहरमध्ये आहे.

क. सर्वाधिक साक्षरतमुंबई उपनगर या जिल्हयाची

आहे.


1) अ व ब 

2) ब व क 

3) अ व क 

4) सर्व योग्य.  √


प्र.10. अ,ब,क व ड यासाठी योग्य टेकडया/डोंगर ओळखा.


1. चिरोली   

2. गरमसूर 

3. गाळणा 

4. मुदखेड


.      अ     ब      क    ड

1)    3     4      2     1.  √

2)    3     4      1     2

3)    1     2      3     4

4)    1     2      4     3

महाराष्ट्रातील सात आश्चर्ये


जगात जशी सात आश्चर्ये आहेत त्याचप्रमाणे महाराष्ट्रात राज्यातील काही अद्भुत आणि सुंदर स्थळांना जून २०१३ रोजी आश्चर्यांचा दर्जा दिला आहे. जगभरातून साधारणपणे २२ लाख मतांच्या आधारे ही सात आश्चर्ये निवडण्यात आलेली आहेत. चला तर बघूया कोणती आहेत ती आश्चर्ये :


१) विश्व विपश्यना पॅगोडा(स्तूप) :


हा पॅगोडा जगातील सर्वात मोठा खांब-विरहित पॅगोडा आहे, जो मुंबईतील गोराई येथे उभारण्यात आलेला आहे. गौतम बुद्धांच्या स्मृतींची जपणूक करण्यासाठी हा पॅगोडा बांधण्यात आलेला आहे. या पॅगोडाचे उद्घाटन माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पती यांच्या हस्ते ८ फेब्रुवारी २००९ साली करण्यात आले. हा पॅगोडा शांती आणि ऐक्याचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. दररोज येथे दीड ते दोन हजार पर्यटक भेट देत असतात. स्तूपाच्या कळसाची उंची २९ मी. असून भूकंपरोधक आहे. एकावेळी ८ ते १० हजार लोक बसू शकतील अशी व्यवस्था केली आहे.


२) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) :


हे रेल्वे स्थानक व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त १८८७ मध्ये बांधले गेले आहे. मुंबई शहरातील ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक व मध्य रेल्वेचे मुख्यालय अशी याची ओळख आहे. सर्वात व्यस्त व गजबजलेले स्थानक अशीही याची ख्याती आहे. या स्थानकावर एकूण १८ फलाट आहेत. २००८ साली अतिरेक्यांनी याच स्थानकावर अतिरेकी हल्ला केला होता.


३) अजिंठा लेणी :


इसवी सन पूर्व दुसरे शतक ते इसवी सन चौथे शतक या काळात या बौद्धलेण्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण २९ लेणी आहेत. औरंगाबाद जिल्ह्याच्या वाघुर नदीच्या परिसरात ही लेणी अस्तित्वात आहेत. ही लेणी नदीपात्रापासून ४० ते १०० फुट उंचीवर डोंगररांगांमध्ये कोरलेली आहेत. या लेण्यांत गौतम बुद्धांच्या विविध भावमुद्र तसेच बौद्ध तत्वज्ञान चित्रशिल्प रुपात तयार केले आहे. 


४) *कास पठार* :


या पठारावर पावसाळ्यात असंख्य रानफुले फुलतात. या फुलांमध्ये अनेक दुर्मिळ प्रकारची फुले आढळून येतात. हे पठार विविध प्रकारची फुले आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. पठाराचे क्षेत्रफळ १० चौ.कि.मी. असून पठारावर २८० फुलांच्या जाती व वनस्पती, वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात. रंगीबेरंगी फुले व फुलपाखरे पाहण्यासाठी पर्यटकांची येथे तुडुंब गर्दी असते.


५) रायगड किल्ला :


स्वराज्याची राजधानी असलेला किल्ला म्हणजे रायगड होय. या डोंगरी किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची ८२० मीटर आहे. या किल्ल्याला अजून १५ नावानी संबोधले जाते. गडाला १४३५ पायऱ्या आहेत. अवघड व दुर्गम भागातील भागातील हा गड एक पर्यटनस्थळ म्हणून नावाजलेला आहे. गडावर एकूण २५ हून अधिक ठिकाणे पाहण्यासारखी आहेत.


६) लोणार सरोवर :


एका उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून हे सरोवर पूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. या सरोवराचे  पाणी अल्कधर्मी आहे. सरोवराच्या जतनासाठी व संवर्धनासाठी लोणार सरोवर हे वन्यजीव अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. या परिसारत बाराशे वर्षांपूर्वीची १५ मंदिरे अस्तित्वात आहेत. या सरोवराचे क्षेत्रफळ १.१३ चौ.कि.मी. इतके असून सरासरी खोली १३७ मीटर आहे. अमेरिकेतील अनेक संस्थांनी येथे येऊन संशोधन केलेले आहे.


७) दौलताबादचा किल्ला :


हा गड यादवकालीन ऐतिहासिक किल्ला आहे. देवगिरी किल्ल्याला २८ नोव्हेंबर १९५१ रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. या किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे मेंढातोफ होय. या तोफेत एकाच माऱ्यात पूर्ण गड उध्वस्त करण्याची क्षमता होती. ती तोफ पंचधातूंपासून बनवलेली आहे. प्राचीन काळातील गड म्हणून हा गड प्रेक्षणीय स्थळ म्हणून नावाजला गेला आहे. या गडावर लोक भरपूर प्रमाणात भेट देतात.


General Knowledge



● पर्यटनासंबंधी दिल्ली सरकारने कोणते मोबाईल ॲप तयार केले?

उत्तर : देखो मेरी दिल्ली


●  कोणत्या अंतराळ संशोधन संस्थेने गुरु ग्रहाच्या सभोवताली फिरणाऱ्या ‘ट्रोजन’ नामक लघुग्रहांचा अभ्यास करण्यासाठी ‘ल्युसी’ नामक पहिले अंतराळयान तयार केले?

उत्तर : NASA


● कोणती व्यक्ती ट्युनिशिया देशाची पहिली महिला पंतप्रधान ठरली?

उत्तर : नजला बौडेन रोमधाने


● कोणत्या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस’ साजरा करतात?

उत्तर : ०१ ऑक्टोबर


●  कोणत्या व्यक्तीने २९ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या ३८ व्या प्रगती बैठकीचे अध्यक्षपद भूषविले?

उत्तर :  पंतप्रधान नरेंद्र मोदी


● कोण IFSC येथे ‘सस्टेनेबल फायनॅन्स हब’च्या स्थापनेसंदर्भात शिफारस प्राप्त करण्यासाठी नेमेलेल्या तज्ञ समितीचे अध्यक्ष असतील?

उत्तर : सी. के. मिश्रा


● कोणत्या व्यक्तीची नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (NSDL) याच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती झाली?

उत्तर : पद्मजा चुंडुरू


●  खालीलपैकी कोण "क्रॉनिकल्स फ्रॉम द लँड ऑफ द हॅप्पीएस्ट पीपल ऑन अर्थ" हे शीर्षक दिलेल्या कादंबरीचे लेखक आहे?

उत्तर : वोले सोयिंका

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

1. आहारात —– जीवनसत्वाच्या आधीक्यामुळे मुलांमध्ये चिडचिडेपणा येतो.

 अ जीवनसत्व
 ब जीवनसत्व
 क जीवनसत्व
 ड जीवनसत्व
उत्तर : अ जीवनसत्व

2. एका प्राणी संग्रहालयात मोर व हरणे यांची एकूण संख्या 50 असून, त्यांच्या पायांची संख्या 144 आहेत तर त्यापैकी मोर व हरणे यांची संख्या अनुक्रमे किती?

 28, 22
 24, 26
 22, 28
 26, 24
उत्तर : 28, 22

3. संपृक्त मेदघटकांच्या अतिसेवनाची परिणती म्हणजे —– होय.

 अशक्तता
 लठ्ठपणा
 ताजेपणा
 वजन कमी होणे
उत्तर : लठ्ठपणा

4. 0.0049 या संख्येचा वर्गमुळाचा घन किती?

 0.000343
 0.00343
 0.0343
 0.343
उत्तर : 0.000343

5. एक नैसर्गिक संख्या आणि तिची गुणाकार व्यस्त संख्या यांची बेरीज 50/7 असेल, तर ती संख्या कोणती?

 3
 6
 7
 14
उत्तर : 7

6. शुद्ध लोखंडाचा प्रकार म्हणजे —– होय.

 ओतिव लोखंड
 बीड लोखंड
 घडीव लोखंड
 वितळलेले लोखंड
उत्तर : घडीव लोखंड

7. एका 8 सें.मी. त्रिज्या असलेल्या शिशाच्या गोळ्यास वितळवून 1 सें.मी. त्रिज्या असलेले लहान लहान गोल तयार केल्यास असे किती गोल तयार होतील?

 256
 64
 712
 512
उत्तर : 512

8. महितीचा अधिकार महाराष्ट्रातील नागरिकांना —— यांनी केलेल्या आंदोलनामुळे मिळाला.

 विवेक पंडित
 डॉ. बाबा आढाव
 अण्णा हजारे
 कुमार केतकर
उत्तर : अण्णा हजारे

9. लाल बहादुर शास्त्री अवार्ड फॉर एक्सलन्स इन पब्लिक अॅडमिनिश्ट्रेशन (Lal Bahadur Shastri Award For Excellence in Public Administration) हा पुरस्कार कुणाला मिळाला?

 जुईली रफिक
 इला भट
 शिवानी ठाकूर
 योगिता शिवा
उत्तर : इला भट

10. महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ कोणत्या शहरात आहे?

 पुणे
 नाशिक
 नागपुर
 मुंबई
उत्तर : नाशिक

11. राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिवस (26 जुलै) —— या नावाने साजरा करण्यात येतो.

 राष्ट्रीय एकात्मता दिन
 महराष्ट्र दिन
 सामाजिक न्याय दिन
 कामगार दिन
उत्तर : सामाजिक न्याय दिन

12. संसदेने नुकत्याच मंजूर केलेल्या घटनादूरस्ती विधेयकानुसार किती देशातील भारतीय वंशाच्या नागरिकांना दुहेरी नागरिकत्वचा फायदा मिळणार आहे?

 4
 16
 12
 5
उत्तर : 16

13. देशातील पहिली 540 मेगावॉट वीजनिर्मिती करणारी अनुभट्टी कोठे सुरू करण्यात आली?

 रावतभाटा
 तारापुर
 काक्रापार
 श्रीहरीकोटा
उत्तर : तारापुर

14. दक्षिण महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात —– प्रकारची मृदा आढळते.

 क्षारयुक्त व अल्कली
 रेगुर
 जांभी
 दलदलयुक्त
उत्तर : जांभी

15. इ.स. 1919 च्या कायद्यानुसार घेतलेल्या निवडणुकीत केंद्रीय कायदेमंडळातील सर्वात मोठा पक्ष कोणता होता?

 उदारमतवादी पक्ष
 स्वराज्य पक्ष
 काँग्रेस पक्ष
 मुस्लिम लीग
उत्तर : स्वराज्य पक्ष

16. ‘सेंट्रल हिंदू कॉलेज’ ची स्थापना कोणी केली?

 स्वामी दयानंद
 स्वामी विवेकानंद
 अॅनी बेझंट
 केशवचंद्र सेन
उत्तर : अॅनी बेझंट

17. मुस्लीम लीगची स्थापना कोठे झाली?

 इस्लामाबाद
 ढाका
 अलाहाबाद
 अलिगड
उत्तर : ढाका

18. स्वामी विवेकानंद यांनी ‘रामकृष्ण मिशनची’ स्थापना कोणत्या वर्षी केली?

 1895
 1896
 1897
 1898
उत्तर : 1897

19. ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

 डॉ. बी.आर. आंबेडकर
 वि.रा. शिंदे
 महात्मा जोतिबा फुले
 भास्करराव जाधव
उत्तर : वि.रा. शिंदे

20. हिमालय हा —– आहे.

 अर्वाचीन वलीपर्वत (घडीचा पर्वत)
 अवशिष्ट पर्वत
 ठोकळ्यांचा पर्वत
 ज्वालामुखीय पर्वत
उत्तर : अर्वाचीन वलीपर्वत (घडीचा पर्वत)

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...