०३ ऑक्टोबर २०२१

इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्रे



१) तत्त्वबोधिनी - पत्रिका रविंद्रनाथ टागोर

२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी

३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी

४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल

५) न्यू इंडिया - अ‍ॅनी बेझंट

६) यंग इंडिया - महात्मा गांधी

७) इंडियन मिरर - डी. डी. सेन

८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो

९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी

१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू

११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू

१२) अल-हिलाल - मौलाना आझाद

१३) अल-बलाघ - मौलाना आझाद

१४) कॉन विल - अ‍ॅनी बेझंट

१५) भारतमाता - अजित सिंग

१६) हिंदू सी. - सुब्रण्यम अय्यर

१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद

१८) सोप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर

१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय

२०) विहारी - वि. दा. सावरकर

२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय

२२) बॉम्बे - क्रॉनिकल फिरोजशहा मेहता

२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी

२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय

२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा

२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल

२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा

२८) कॉ्रेड - मोहम्मद अली

२९) हमदर्द - मोहम्मद अली

३०) गदर - लाला हरदयाल

३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय

३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय

३३) उद्बोधन - स्वामी विवेकानंद

३४) प्रबुद्ध  - भारत डॉ. आंबेडकर

३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल

३६) किर्ती - संतोषसिह

३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त

३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन

३९) बांग्लारकथा - सुभाषचंद्र बोस

४०) इंडिया - सुब्रण्यम भारती

४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी

४२) इंडियन - फिल्ड किशोरीचंद मित्र

४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली

४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास

४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल

४६) जन्मभूी - पट्टाभि सितारामय्या

४७) मुंबई समाचार - फरदुनजी मर्झबान

४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय

४९) लीडर पं. मदन - मोहन मालवीय

५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान

५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)

५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)

५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)

५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)

५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)

५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)

५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष

५८) संध्या - भूपेंद्र दत्त आणि ब्रह्मबांधव बंडोपाध्याय

५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष

६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू

६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे

६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)

नोव्हेंबरमध्ये 19 हजार पदांची भरती! आठवड्यात 'MPSC'ला मागणीपत्र

नोव्हेंबरमध्ये भरती प्रक्रिया राबविली जाईल, अशी माहिती सामान्य प्रशासनाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.



सोलापूर: राज्य सरकारच्या महसूल, कृषी, पशु संवर्धन, शालेय शिक्षण व क्रिडा, मराठी भाषा, सार्वजनिक आरोग्य, मेडिकल, जलसंपदा, अन्न व नागरी पुरवठा यासह एकूण 43 विभागांमधील जवळपास 18 हजार 743 पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पुढील आठवड्यात पाठविली जातील. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये भरती प्रक्रिया राबविली जाईल, अशी माहिती सामान्य प्रशासनाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

राज्य शासनाच्या गृह विभागात जवळपास 29 हजार, आरोग्य विभागात 20 हजार 594, जलसंपदा विभागात 21 हजार, कृषी विभागात साडेचौदा हजार, महसूल विभागात 13 हजार तर शालेय शिक्षण व क्रिडा विभागात 8 ते 10 हजार, सार्वजनिक बांधकाम विभागात अंदाजित नऊ हजार पदे रिक्‍त आहेत. सद्यस्थितीत जवळपास अडीच लाख पदे रिक्‍त असून मागील काही वर्षांत त्याची भरतीच झालेली नाही. तत्कालीन फडणवीस सरकारने 70 हजार पदांची मेगाभरतीची घोषणा केली, परंतु पुढे काहीच झाले नाही. महाविकास आघाडी सरकारने जवळपास एक लाख पदांच्या भरतीची घोषणा केली, परंतु कोरोनामुळे ती होऊ शकली नाही.

दरम्यान, स्पर्धा परीक्षा निकालाच्या प्रतीक्षेतील पुण्यातील स्वप्नील लोणकर याने आत्महत्या केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून जवळपास 15 हजार पदांची भरती होईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. त्यानंतर 30 सप्टेंबरपर्यंत सर्वच विभागांनी आयोगाला मागणीपत्र सादर करावीत, असा शासन निर्णय निघाला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही सप्टेंबरमध्ये तशा सूचना सर्वच विभागांना दिल्या. मात्र, अजूनपर्यंत मागणीपत्र न पाठविल्याने विद्यार्थी आक्रमक झाल्याचे चित्र आहे. त्यावर राज्यमंत्री भरणे म्हणाले, उच्चस्तरीय समितीमार्फत रिक्‍त पदांच्या आरक्षणाची पडताळणी केली जात असून पुढील आठवड्यात मागणीपत्र आयोगाला जातील.

राज्य शासनाच्या विविध विभागांमधील रिक्‍त पदांचे मागणीपत्र आयोगाला पुढील आठवड्यात सादर होतील. जवळपास 18 ते 19 हजार पदांची भरती आयोगामार्फत लगेचच राबविली जाईल. जेणेकरून सुशिक्षित तरुणांना नोकरी मिळेल.

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...