३० सप्टेंबर २०२१

राज्यात १ ते ३० नोव्हेंबरदरम्यान मतदार नोंदणी मोहीम



🔰स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत मतदार यादी नूतनीकरण मोहीम राबवण्यात येणार असून पात्र नागरिकांना मतदार यादीत नावे नोंदविण्यासाठी तर इतरांना दुरुस्तीसाठी अर्ज करता येणार आहे. त्याबाबत विधानसभा मतदार यादीच्या नूतनीकरणाबाबत जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांनी व्यापक जनजागृती मोहीम राबवावी, असा आदेश राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी दिला आहे.


🔰भारत निवडणूक आयोगातर्फे १ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत विधानसभा मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मतदार जागृती अभियानाच्या तयारीबाबत निवडणूक आयुक्त मदान यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडीओ कॉन्फरन्सिंग) संवाद साधला.


🔰मख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील सल्लागार दिलीप शिंदे आदी या वेळी उपस्थित होते. १ जानेवारी २०२२ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या अधिकाधिक पात्र नागरिकांनी मतदार म्हणून आपली नावे नोंदवावीत.


🔰आवश्यक असल्यास पत्त्यात अथवा नावांत दुरुस्त्याही करता येतील. या कार्यक्रमाची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता मुद्रित, इलेक्ट्रॉनिक व सोशल मीडियाबरोबरच विविध कल्पक बाबींचाही अवलंब करावा, असे मदान यांनी सांगितले.

11 शास्त्रज्ञ ‘शांती स्वरूप भटनागर पुरस्कार 2021’ यांनी सन्मानित..



🔰26 सप्टेंबर 2021 रोजी 11 शास्त्रज्ञांना शांती स्वरूप भटनागर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत -


🔰पथ्वी, वातावरण, महासागर आणि ग्रह विज्ञान श्रेणीतील ‘शांती स्वरूप भटनागर पारितोषिक 2021’ याचा विजेता - डॉ बिनॉय कुमार सैकिया.


🔰जविक विज्ञान श्रेणीतील ‘शांती स्वरूप भटनागर पारितोषिक 2021’ याचा विजेता - डॉ अमित सिंह आणि डॉ अरुण कुमार शुक्ला.


🔰रासायनिक विज्ञान श्रेणीतील ‘शांती स्वरूप भटनागर पारितोषिक 2021’ याचा विजेता - डॉ कनिष्क बिस्वास आणि डॉ टी गोविंदराजू.


🔰अभियांत्रिकी विज्ञान श्रेणीतील ‘शांती स्वरूप भटनागर पारितोषिक 2021’ याचा विजेता - डॉ देबदीप मुखोपाध्याय.

गणित विज्ञान श्रेणीतील ‘शांती स्वरूप भटनागर पारितोषिक 2021’ याचा विजेता - डॉ अनिश घोष आणि डॉ साकेत सौरभ.


🔰वद्यकीय विज्ञान श्रेणीतील ‘शांती स्वरूप भटनागर पारितोषिक 2021’ याचा विजेता - डॉ. जिमोन पनीयामकल आणि डॉ रोहित श्रीवास्तव.

भौतिक विज्ञान श्रेणीतील ‘शांती स्वरूप भटनागर पारितोषिक 2021’ याचा विजेता - डॉ कनक साहा.

कबिनेट भूमीका मते



❇️रमसे मुर:-


🔳कबिनेट हे राज्याच्या नौकेचे सुकाणू आहे.


❇️लॉवेल:-


🔳ही राजकीय कमानीची आधारभूत शिळा होय.


❇️सर जॉन मॅरियॉट:-


🔳कबिनेट हा केंद्रबिंदू असून सर्व राजकीय यंत्रणा त्याभोवती फिरते.


❇️गलाडस्टोन:-


🔳हा सूर्यमालेतील मध्य असून इतर भाग त्याच्या भोवती परिभ्रमण करतात.


❇️बार्कर:-


🔳हा धोरणाचा चुंबक आहे.


❇️बागेहॉट:-


🔳ह जोडणारे एक संयोग चिन्ह आहे आणि कार्यकारी व कायदेविषयक विभाग याना जोडणारा दुवा आहे.


❇️आयव्हर जेंनीग्ज:-


🔳ह ब्रिटनच्या घटनात्मक व्यवस्था चा गाभा असून ते शासनव्यवस्था ला एकसंध बनविते.


❇️एल एस एमरी:-


🔳ह निदेश देणारे सरकारचे मध्यवर्ती केंद्र आहे.

2021 मागणीपत्र


(28 सप्टेंबर पर्यंत )

STI -190
ASO -106
PSI -

Tax Assistant - 117
Clerk - 514
Excise -

📌 राज्यसेवा

DC -12
DySP -17
MFAS -15
Labour Commi- 22
Tahsildar -

SO - 43
DEO - 25
ARTO - 4
SKill officer- 16
Labour officer - 54

( संख्या आणि पदांमध्ये बदल होऊ शकतो पण 90% अचूकता आहे )

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...