२४ सप्टेंबर २०२१

आरोग्य विभागाची 25, 26 सप्टेंबरला होणारी परीक्षा रद्द : राजेश टोपे


मुंबई: आरोग्य विभागाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट क आणि ड प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत आहे.

यासाठी उद्या शनिवार (ता. २५) आणि रविवार (ता. २६) लेखी परीक्षा आयोजित करण्यात आली होती. मात्र, या परीक्षेसाठी उमेदवारांच्या प्रवेश पत्राबाबत प्रचंड गोंधळ होता, त्यामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. ती पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. याबाबत न्यासा नावाच्या कंपनीकडे राज्य सरकारने भरती प्रक्रियेचे काम दिले होते.

उमेदवारांच्या अडचणी

- परीक्षा चार दिवसांवर असताना अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांना कल्पना नाही

- अनेकांचे प्रवेशपत्र अजूनही मिळाले नाही

- प्रवेशपत्रावर फोटो, केंद्र आणि वेळ नाही

- दोन पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना दोन ठिकाणी एकाच दिवशी परीक्षा देणे अशक्य

- संकेतस्थळ अनेकदा हँग होते

आरोग्य विभागातील पदे

१) गट क : रासायनिक सहायक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, रक्तपेढी तंत्रज्ञ, आहार तज्ज्ञ, अधिपरीचारिका, वरिष्ठ तंत्रज्ञ, सुतार, वाहन चालक

२) गट ड : शिपाई, कक्षसेवक, बाह्यरुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक, प्रयोगशाळा सेवक, रक्तपेढी परिचर, दंतसहाय्यक, पुरुष/स्त्री परिचर, अकुशल कारागीर, मदतनीस... आदी

सार्वजनिक आरोग्य विभाग भरती २०२१ :

संवर्ग : पदांची संख्या : आलेले अर्ज

गट क : २७२५ : ४,०५,०००

वस्तुनिष्ठ महाराष्ट्र :


महाराष्ट्रातील :अष्टविनायक
-----------------------------------------------------:
०१) महागणपती रांजणगांव (पुणे)
०२) चिंतामणी थेऊर. (पुणे)
०३) मोरेश्वर. मोरगांव. (पुणे)
०४) विघ्नहर. ओझर. (पुणे)
०५) गिरिजात्मक. लेण्याद्री (पुणे)
०६) बल्लाळेश्वर. पाली (रायगड)
०७) वरद विनायक. महाड. (रायगड)
०८) सिध्दी विनायक. सिध्दटेक (अहमदनगर)
------------------------------------------------------------
-----------------------
महाराष्ट्र : औष्णिक विद्युत प्रकल्प
------------------------------------------------------------
-----------------------
०१) कोराडी, खापरखेडा नागपुर.
०२) दुर्गापूर. बल्लारपूर (चंद्रपुर)
०३) डहाणू, चोला ठाणे.
०४) एकलहरे नाशिक.
०५) बीड. परळी वैजनाथ.
०६) फेकरी भुसावळ.
०७) पारस. अकोला.
०८) ऊरण. रायगड.
------------------------------------------------------------
-----------------------
🐆🐅🐿🐇 महाराष्ट्र : अभयारण्ये.🐇🐿🐅🐆
------------------------------------------------------------
-----------------------
कोकण प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) कर्नाळा, फनसाड रायगड.
०२) तुंगारेश्वर, तानसा ठाणे.
०३) मालवण. सिंधुदुर्ग.
------------------------------------------------------------
-----------------------
पुणे प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) भिमाशंकर अभयारण्य. पुणे व ठाणे.
०२) कोयना अभयारण्य. सातारा.
०३) सागरेश्वर अभयारण्य. सांगली.
०४) राधानगरी अभयारण्य. कोल्हापुर.
०५) मयुरेश्वर सूपे अभयारण्य. पुणे
------------------------------------------------------------
-----------------------
नाशिक प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) रेहेकुरी अभयारण्य. अहमदनगर.
०२) माळढोक पक्षी अभयारण्य. सोलापुर &
अहमदनगर.
०३) कळसुबाई व हरिश्चंद्र अभयारण्य. अहमदनगर.
०४) यावल अभयारण्य. जळगांव.
०५) अनेर धरण अभयारण्य. नंदुरबार.
------------------------------------------------------------
-----------------------
औरंगाबाद प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) जायकवाडी पक्षी अभयारण्य. औरंगाबाद
व नगर.
०२) नायगांव मयुर अभयारण्य बीड.
०३) येडशी रामलिंग घाट अभयारण्य.
उस्मानाबाद.
०४) गवताळा औटरम घाट अभयारण्य. औरंगाबाद
व जळगांव.
------------------------------------------------------------
-----------------------
अमरावती प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) ढाळकोळकाज/मेळघाट, वाणअभयारण्य.
अमरावती.
०२) काटेपूर्णा अभयारण्य. वाशिम.
०३) पैनगंगा अभयारण्य. नांदेड व यवतमाळ.
०४) अंबाबर्वा, ज्ञानगंगा, लोणार अभयारण्य
बुलढाणा.
०५) नर्नाळा अभयारण्य. अकोला.
०६) टिपेश्वर अभयारण्य. यवतमाळ.
नागपुर प्रशासकीय विभागातील अभयारण्ये
०१) नागनागझिरा गोंदिया
०२) बोर. वर्घा व नागपुर
०३) अंधारी चंद्रपुर
०४) चपराळा, भांबरागड.  गडचिरोली....

पुणे करार :- 24 सप्टेंबर 1932

◾️डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी

◾️पुणे करार हा महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राजकीय नेत्यांमध्ये 24 सप्टेंबर 1932 रोजी झाला.

◾️ दलितांना स्वतंत्र मतदारसंघाऐवजी सर्व प्रांतांमध्ये सर्वसाधारण मतदारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात जागा द्याव्यात हा त्याचा मुख्य मुद्दा होता.

◾️ त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित मदनमोहन मालवीय, मुकुंद रामराव जयकर, सी. राजगोपालाचारी आदींच्या सह्या आहेत. हा करार "आंबेडकर-गांधी करार", "गांधी-आंबेडकर करार", "येरवडा करार" या नावांनीही ओळखला जातो.

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...