Wednesday, 22 September 2021
डिजिटल कृषीव्यवस्था पुढे नेण्यासाठी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे पाच खासगी कंपन्यांसोबत सामंजस्य करार..
🔰14 सप्टेंबर 2021 रोजी नवी दिल्लीत कृषी भवन येथे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने खासगी कंपन्यांसोबत पाच सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.
🔰सिस्को, निंजाकार्ट, जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेड, आयटीसी लिमिटेड आणि एनसीडीईएक्स ई-मार्केट्स लिमिटेड (NeML) या खासगी कंपन्यांसोबत हे करार करण्यात आले आहेत.
🔴ठळक बाबी...
🔰या प्रायोगिक प्रकल्पांनंतर, शेतकऱ्यांना शेतात कुठली पिके लावायची, कोणत्या प्रकारची बियाणे वापरायची, जास्तीत जास्त पीक येण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करायचा, अशा सगळ्या प्रश्नांवर, तंत्रज्ञानाच्या मदतीने माहिती पुरवली जाईल.
🔰पराप्त माहितीच्या आधारे ते अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने निर्णय घेऊ शकतील. कृषी पुरवठा साखळी उद्योगात असलेले लोकही त्यांच्या खरेदीविषयक तसेच मालाच्या दळणवळणासाठीची मालवाहतूक व्यवस्था याविषयी अचूक आणि नेमका निर्णय घेऊ शकतील.
🔰तयाशिवाय, आपल्या पिकांची विक्री करायची की साठा ठेवायचा याचा निर्णय घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधी हवामानाची पूर्वसूचनाही याच तंत्रज्ञानातून मिळू शकेल.
आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती..
🔶 मानवी डोक्याचे वजन ?
→ १४०० ग्रॅम.
🔶 सामान्य रक्तदाब ?
→ १२०/८० मि. मी. पा-याची उंची.
🔶 शरीरातील सर्वात मोठी पेशी ?
→ न्यूरॉन.
🔶 लाल रक्त पेशींची संख्या ?
→ पुरुष : - ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी.
→ स्ञिया : - ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी.
🔶 शरिरातील एकूण रक्त ?
→ ५ ते ६ लीटर.
🔶 सर्वात लहान हाड ?
→ स्टेटस ( कानाचे हाड )
🔶 सर्वात मोठे हाड ?
→ फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड )
🔶 लाल रक्तपेशींचा जीवनकाळ ?
→ १२० दिवस.
🔶 पांढरा-या रक्तपेशींचा संख्या ?
→ ५००० ते १०००० प्रति घ. सेमी.
🔶 पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ ?
→ २ ते ५ दिवस.
🔶 रक्तातील प्लेटलेट्स माऊंट ?
→ २ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी.
🔶 हिमोग्लोबिनचे प्रमाण ?
→ पुरुष - १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी.
→ स्त्रिया - १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी.
🔶 हरदयाचे सामान्य ठोके ?
→ ७२ ते ७५ प्रति मिनिट.
🔶 नाडी दर (पल्स रेट) ?
→ ७२ प्रतिमिनिट.
🔶 सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी ?
→ थायरॉईड ग्रंथी.
🔶 सर्वात मोठा स्नायू ?
→ ग्लुटियस म्याक्सीमस.
🔶 एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या ?
→ ६३९.
🔶 रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या ?
→ मोनोसाईटस - ३ ते ८%.
→ बेसोफिल्स - ०.५%.
→ लिम्फोसाईटस - २० ते २५%.
→ न्यूट्रोफिल्स - ४० ते ७०%.
🔶 शरीराचे तापमान ?
→ ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन.
🔶 परौढांमधील दातांची संख्या ?
→ ३२.
🔶 लहान मुलांमधील दातांची संख्या ?
→ २० दूधाचे दात.
🔶 सर्वात पातळ त्वचा ?
→ पापणी (कंजक्टायव्हा)
SCO देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेची 21 वी बैठक दुशान्बे (ताजिकिस्तान) येथे झाली.
🔰SCO (शांघाय सहकार्य संघटना) गटाच्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या परिषदेची 21 वी बैठक संमिश्र स्वरुपात 17 सप्टेंबर 2021 रोजी दुशान्बे (ताजिकिस्तान) येथे पार पडली.
🔴ठळक बाबी...
🔰ही बैठक ताजिकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष इमोमाली रहमोन यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
🔰शिखर परिषदे नंतर शांघाय सहकार्य संघटना आणि सामुहिक सुरक्षा करार संघटना यांच्यात अफगाणिस्तानसंदर्भात सत्र झाले.
🔰पतप्रधान नरेंद्र मोदी बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे आणि अफगाणीस्तानसंदर्भातल्या SCO-CSTO संयुक्त सत्रात व्हिडीओ संदेशाद्वारे सहभागी झाले.
🔰भारताच्या विकास कार्यक्रमात डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याच्या भारताचे अनुभव पंतप्रधानांनी बैठकीत सांगितले आणि ते ओपन सोर्स उपाय शांघाय सहकार्य संघटनेच्या इतर देशांसमवेत सामायिक करण्याची तयारी दर्शवली.
ब्रिगेडियर एस. व्ही. सरस्वती यांना ‘राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2020’
💫भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी भारतीय लष्करात कार्यरत असलेल्या परिचारिका सेवेचे उपमहासंचालिका ब्रिगेडियर एस. व्ही. सरस्वती यांना ‘राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2020’ देवून सन्मानित केले.
💫राष्ट्रपती श्री राम नाथ कोविंद यांनी एका आभासी समारंभात ब्रिगेडियर एस. व्ही. सरस्वती सहीत एकूण 51 परिचारिकांना ‘राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2020’ प्रदान केला आहे.
☄️पार्श्वभूमी..
💫1854 साली झालेल्या क्रिमियन युद्धातल्या जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत फिरणाऱ्या आणि आधुनिक परिचर्येचा पाया घालणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल (जन्म 12 मे 1820) यांचा जन्मदिवस ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ म्हणून साजरा केला जातो. ब्रिटिश वंशाच्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना आधुनिक शु्श्रूषा शास्त्राची संस्थापिका मानले जाते.
💫फलोरेन्स नायटिंगेल या धनाढ्य कुटुंबातून आल्या होत्या. अनेक आधुनिक सुश्रुषा पद्धती त्यांनी विकसित केल्या. नायटिंगल रात्री जागून तासनतास रुग्णांची सेवा करीत असत. रात्री हातात दिवा घेऊन प्रत्येक रुग्णाची काळजी घेत असल्यामुळे त्यांना “लॅम्प लेडी” असेही म्हटले जात असे.
💫1965 साली आंतरराष्ट्रीय परिचारिका परिषद (इंटरनॅशनल काउंसिल ऑफ नर्सेस -ICN) तर्फे पहिल्यांदा हा दिवस साजरा केला गेला होता. 1974 साली 12 मे रोजी ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ पाळण्याची घोषणा केली गेली.
Latest post
आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024
🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे 🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...
-
संपूर्ण महाराष्ट्राला सोपा जाणारा Geography हा विषय आहे....मग नेमकं या मधील कोणते घटक व्यवस्थित अभ्यासले पाहिजेत. खालील प्रत्येक Points एकदम...
-
🎯टाइम मॅगझिन एथिलिट ऑफ द इयर 2023 :- लिओनेल मेस्सी 🎯टाइम पर्सन ऑफ द इयर 2023 टेलर स्विफ्ट 🎯पाहिला वणभुषण 2024 चैत्राम पवार 🎯महाराष्ट्र भ...
-
विज्ञान विषयाची तयारी करताना लक्षात घ्यायला हवे की हा सर्वात जास्त input द्यावा लागणारा आणि सर्वात कमी output असणार विषय आहे. Combine पूर्व ...