Friday, 3 September 2021

उद्या आपली पूर्व परीक्षा:-

मित्रांनो उद्या तुम्हासर्वांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. तुम्ही वर्षभर जी मेहनत केली त्याची कसोटी उद्या लागणार आहे. काही महत्वाच्या बाबी तुम्हाला सांगतो.

1. आज रात्री जरा हलके जेवण करा. थोडा भात खाल्ला तर छान झोप येईल.नॉनव्हेज शक्यतो टाळा.

2. रात्री उगाच जगण्याचा प्रयत्न करू नका. झोप येत नसेल तर आपल्या श्वासावर लक्ष द्या. श्वास कसा जातोय व कसा बाहेर येतोय हे बघा झोप लागेल.

3. झोपताना आपल्या आई बाबा ना भाऊ बहीण यान समवेत बोलून घ्या हलके वाटेल.

4. सर्व कागदपत्रे , पेन, पेन्सिल, एक पाणी बॉटल, दोन रूमाल वगैरे सर्व बाबी बघून घ्या.

5. सकाळी जाताना परत आपली बॅग बघून घ्या. सर्व सामान त्यात नीट ठेवले आहेत का? एखादं आवडीचं चॉकलेट जवळ ठेवा आणि पेपर सुरू होण्यापूर्वी खावा. थोडं डोकं जोरात चालेल आणि अस्वस्थ वाटणार नाही.

6. परीक्षा केंद्र जवळ 1 ते 1.30 तास आधी पोहचाल असेल निघा. आज आणि उद्या शक्यतो गाणी ऐकायचं टाळा. डोकं शांत राहू द्या.

7. परीक्षा केंद्रावर गेल्यावर नेहमी प्रमाणे आपले no. बघून घ्या.आणि निश्चिती करून घ्या आपण बरोबर त्याच ठिकाणी आहोत का म्हणून.

8. परीक्षा केंद्रावर गेल्यावर अथवा जाताना काहीही आठवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला ते आठवणार नाही हे मला माहीत आहे. आणि काळजी करायचं देखील कारण नाही आहे कारण आपली परीक्षा objective आहे. पर्याय पाहिले की आठवतं सगळं. वाटल्यास चालू घडामोडीच पुस्तक वाचत बसा.

9. पेपर ला गेल्यावर सीट no बघून नीट बसा. उत्तरतालिका हातात आल्यावर  आपला सीट no. नीट भरून गोल करून घ्या. 3 वेळेस परत चेक करून घ्या.

10. पेपर कोणत्या क्रमाने सोडविणार आहे हे निश्चित करून घ्या. गणित बुध्दिमत्ता आधी की नंतर हे ठरवून घ्या आत्ताच. तसंच गोल रंगवण्याबाबतही आताच धोरण ठरवून घ्या. पुन्हा गैरसोय नको.

11. सर्वात महत्त्वाचे टीप:-
    पेपर च्या ठिकाणी पोहोचल्यानंतर कोणाशीही काहीही बडबड करू नका. केलीत तर तुमचे apti reasoning चे मार्क कमी झाले म्हणून समजा😅. शक्यतो एकटे राहा आणि वर्गात गेले असाल तर त्या बेंच वर  डोकं टेकवून पडून राहा. मात्र हलकं काही तरी एकटे जाऊन खाऊन घ्या. उपाशी राहू नका.

12. मनातील भीतीही तेव्हाच नाहीशी होते जेव्हा आपल्या क्षमतांची आपल्याला जाणीव असते. आलेल्या संकटांना घाबरायचं नसतं त्यांना  हरवण्यासाठी नेहमी तयार राहायचं असतं. जन्म सगळ्यांचा जिंकण्यासाठीच झालेला असतो. फक्त जिकायचं कसं? हे ज्याचं तो ठरवतो.

तुम्हा सर्वांना उद्याच्या पेपर साठी खूप खूप शुभेच्छा... तुमचे प्रामाणिक प्रयत्न नक्की कामाला येतील स्वतःवर विश्वास ठेवा. नकारार्थी विचार करू नका.

परत एकदा मनःपूर्वक सर्वाना शुभेच्छा!!💐💐💐💐

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...