२९ ऑगस्ट २०२१

चार्टर अ‍ॅक्ट १८३३

🍀  ह्या कायद्यान्वये कंपनीचा कारभार हळूहळू आटोपता घेण्याच्या दृष्टीने पाऊल टाकले गेले. कंपनीचे चीनबरोबर व्यापाराचे सर्वाधिकार काढून घेण्यात आले.

🍀  कंपनीच्या प्रमुखाला गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल ऐवजी गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया हा हुद्दा देण्यात आला. कायद्याची अंमलबजावणी संपूर्ण हिंदुस्थानभर करण्याचा अधिकार सरकारला देण्यात आला.

🍀   गव्हर्नर जनरलच्या समितीमध्ये चौथ्या सभासदाची भर घालण्यात आली. त्यासाठी पहिली नेमणूक लॉर्ड मेकॉले या अधिकाऱ्याची करण्यात आली.

🍀   मद्रास आणि मुंबई राज्य गव्हर्नर जनरलच्या अखत्यारीखाली आले. याच कायद्याने आग्रा हा नवीन विभाग अस्तित्वात आला.

🍀  कोणाही भारतीयाला त्याच्या धर्म, जन्मस्थान, वर्ण वा वंश ह्या कारणावरून नोकरीची संधी नाकारण्यात येऊ नये असा नियम जाहीर झाला.

🍀   ब्रिटिश नागरिकांना भारतात मालमत्ता खरेदी करण्याचे व कायम नागरिकत्वाचे अधिकार मिळाले.

चार्टर अ‍ॅक्ट १७९३

🍀  चार्टर अ‍ॅक्ट १७९३ हा ब्रिटिश संसदेने १७९३मध्ये पारित केलेला कायदा होता.

🍀   या कायद्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीला भारतात राज्यकारभारासाठी २० वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. समिती सदस्यांनी दिलेल्या सूचना नाकारण्याचा अधिकार गव्हर्नरला मिळाला.

                    🍃🍃🍃🍃🍃

रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट १७७३

🍀  रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट १७७३ हा ब्रिटिश भारतातील एक कायदा असून तो इ.स. १७७४ ते इ.स. १७८४ अशी दहा वर्षे कार्यान्वित होता. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने ब्रिटिश पार्लमेंटकडे कर्ज मिळण्यासाठी विनंती केली.

🍀   लॉर्ड नॉर्थ हा त्यावेळी इंग्लंडचा मुख्य प्रधान होता. त्याने पार्लमेंटमध्ये एक ठराव करून कंपनीने हिंदुस्थानातील व्यापारामुळे जो फायदा झाला असेल त्यावर पार्लमेंटची सत्ता आहे असे ठरवले व कंपनीला कर्जबाजारीपणातून मुक्त करण्यासाठी पार्लमेंटमध्ये एक कायदा पास करून घेतला.

🍀   इ.स. १७७३ सालीं नॉर्थने कंपनीच्या राज्यकारभारासंबंधी जो कायदा केला त्याला रेग्युलेटिंग अ‍ॅक्ट १७७३ असे म्हणतात.

🍀   ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या व्यवहारांवर अंकुश ठेवण्यासाठी हा कायदा करण्यात आला. 

🍀  बंगालच्या राज्यपालांना गव्हर्नर जनरल ऑफ कलकत्ता हा दर्जा देण्यात आला. मद्रास व मुंबईचे राज्यपाल त्यांच्या अमलाखाली आले.

🍀   कंपनीवर देखरेख ठेवण्याच्या कामात मदत करण्यासाठी गव्हर्नर जनरलच्या हाताखाली चार सभासदांची एक समिती नेमण्यात आली. कलकत्याला सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली.

🍀  तिथे मुख्य न्यायाधीश आणि अन्य तीन न्यायाधीशांची नेमणूक झाली. हे न्यायाधीश गव्हर्नर जनरलच्या अधिकाराखाली येत नसत. हा कायदा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठीच बनवलेला होता. परंतु ह्या कायद्यामध्ये अनेक त्रुटी होत्या.

🍀   या कायद्यामुळे गव्हर्नर जनरलला संपूर्णत: समितीच्या सदस्यांवर अवलंबून रहावे लागे. त्याला प्रत्यक्षात निर्णय घ्यायचे काहीही अधिकार नव्हते.

🍀  अमेंडिंग अ‍ॅक्ट १७८१द्वारे यात काही सुधारणा करण्यात आल्या

विविध उत्पादन क्षेत्रातील क्रांतीसाठी संज्ञा:

1. हरित क्रांती :- अन्नधान्य उत्पादन
2. निल क्रांती :- मत्स्य उत्पादन
3. पीत क्रांती :- तेलबिया उत्पादन
4. सुवर्ण क्रांती :- फळे उत्पादनात वाढ
5. सुवर्ण तंतू क्रांती :- ताग उत्पादन
6. कृष्ण क्रांती :- पेट्रोलियम क्षेत्र
7. करडी क्रांती :- खत उत्पादन
8. धवल क्रांती :- दुग्ध उत्पादन
9. गुलाबी क्रांती :- कोळंबी/कांदा/औषध/झिंगे उत्पादन
10. चंदेरी क्रांती:- अंडी
11. चंदेरी तंतू :- कापूस
12. अमृत क्रांती :- नद्या जोड प्रकल्प
13. लाल क्रांती :- टोमॅटो/मांस
14. तपकिरी क्रांती :- कोको
15. गोल क्रांती :- बटाटे
16. नारंगी :- युक्रेन मधील क्रांती
17. इंद्रधनुष्य :- कृषी क्षेत्रातील सर्वंकष विकास.

मार्गदर्शक तत्वांची उपयुक्ततता :

📌डॉ. आंबेडकर - राजकीय लोकशाहीपासून वेगळी असलेली आर्थिक लोकशाही. घटनेचे आगळेवेगळे व नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये. ही तत्वे अमलात न आणणाऱ्या सरकारला न्यायालयांमध्ये नसला तरी जनतेच्या दरबारात जाब द्यावाच लागेल.

📌B.N. राव - राज्यसंस्थेच्या प्राधिकारांसाठी नैतिक तत्वे, त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे.

.📌N.M. सिंघवी - घटनेला जीवन प्रदान करणाऱ्या तरतूदी.

📌M.C. छगला (माजी सरन्यायाधीश) - मार्गदर्शक तत्त्वांची पूर्ण अंमलबजावणी झाल्यास देश पृथ्वी वरील स्वर्ग बनेल. त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे.

📌M.C. सेटलवाड - न्यायालयास उपयुक्त beacon-light व प्रस्ताविकेचे विस्तारण करणारी तत्वे.

📌ग्रॅनव्हिल ऑस्टिन - मार्गदर्शक तत्वाच्या अंमलबजावणीद्वारे देशातील सामाजिक क्रांती ची उद्दिष्टे साध्य होतील.

📌ईवोर जेनिंग्ज - Pious aspiration.

📌अनंत नारायण - अ-वादयोग्य आणि अमूर्त.

📌 ग्लॅडहिल - "इतर काही गोष्टी करण्यासाठी शासनाला दिलेल्या विधायक सूचना.'

📌K.V.राव - “या मागील खरा हेतू भारताला पोलिस राज्य नव्हे तर कल्याणकारी राज्य बनविण्याचा आहे."

🎯मार्गदर्शक तत्वांवरील टिका :

📌K.T. शहा - Pious Superfluities, बँकेच्या सोयीनुसार वटविता येणारा चेक.

📌नसिरोद्दीन - नववर्षाचा निश्चय जो 2 जानेवारीला मोडला जातो.

📌T.T. कृष्णमाचारी - भावनांची खरी केराची टोपली.

📌K.C. व्हेअर - कंटाळवाणा नैतिक उपदेश, जरी या घोषणांना कितीही प्रमाणात वचन मानावयाचे ठरले तरीही
त्यांच्यामुळे राज्यघटनेला अपकिर्ती प्राप्त होईल.

📌K. संथानम - या तत्वांनी केंद्र विरुद्ध राज्य, राष्ट्रपती विरुद्ध पंतप्रधान, राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री असा घटनात्मक संघर्ष निर्माण केला.

प्राण्यांच्या वर्गीकरणाबद्दल

🛑 असमपृष्ठरज्जू प्राणी 🛑

🔶प्रोटोझुआ- अमिबा , प्लाझामोडीयम, पॅरामेशियम इ.

🔶पोरीफेरा - सायकॉन , बाथस्पंज , हयलोनिमा

🔶 सिलेंटराटा - हायड्रा, फायसेलिया, सी-अनिमोन

🔶 प्लॅटीहेल्मिन्थीस - प्लॅनेरीया , लिव्हरफ्ल्युक , टेपवर्म

🔶 नेमॅटहेल्मिन्थीस - अॅस्कॅरिस , फायलेरीया , हुकवर्म

🔶 अॅनिलीडा- गांडूळ , लीच , नेरीस

🔶 आथ्रोपोडा - खेकडा , झुरळ , कोळी

🔶 मोलुस्का - शंख , शिंपला , गोगलगाय

🔶 इकायानोडर्माटा - तारामासा , सी - अर्चीन , सि - ककुंबर

🔶हेमिकॉर्डाटा - बेलॅनोग्लॉसस , सॅकोग्लॉसस

आपल्या शरीरा विषयक महत्वाची माहीती...

🔶 मानवी डोक्याचे वजन ?
→   १४०० ग्रॅम.
 
🔶 सामान्य रक्तदाब ?
→   १२०/८० मि. मी. पा-याची उंची.

🔶 शरीरातील सर्वात मोठी पेशी ?
→   न्यूरॉन.

🔶 लाल रक्त पेशींची संख्या ?
→   पुरुष : - ५ ते ५.५ मिलियन/क्युबीक सेमी.
→   स्ञिया : - ४.५ ते ५ मिलियन/क्युबीक सेमी.

🔶 शरिरातील एकूण रक्त ?
→   ५ ते ६ लीटर.
 
🔶सर्वात लहान हाड ?
→   स्टेटस ( कानाचे हाड )

🔶 सर्वात मोठे हाड ?
→   फिमर / थाय बोन ( मांडीचे हाड )

🔶 लाल रक्तपेशींचा जीवनकाळ ?
→   १२० दिवस.

🔶 पांढरा-या रक्तपेशींचा संख्या ?
→   ५००० ते १०००० प्रति घ. सेमी.

🔶पांढरा-या रक्तपेशींचा जीवनकाळ ?
→   २ ते ५ दिवस.

🔶 रक्तातील प्लेटलेट्स माऊंट ?
→   २ लाख ते ४ लाख क्युबीक सेमी.

🔶हिमोग्लोबिनचे प्रमाण ?
→   पुरुष - १४ ते १६ ग्रॅम/१०० घसेमी.
→   स्त्रिया - १२ ते १४ ग्रॅम/१०० घसेमी.

🔶 ह्रदयाचे सामान्य ठोके ?
→   ७२ ते ७५ प्रति मिनिट.

🔶 नाडी दर (पल्स रेट) ?
→   ७२ प्रतिमिनिट.

🔶 सर्वात मोठी अंत: स्ञाव ग्रंथी ?
→   थायरॉईड ग्रंथी.

🔶 सर्वात मोठा स्नायू ?
→   ग्लुटियस म्याक्सीमस.

🔶एकूण पेशींच्या प्रकारांची संख्या ?
→   ६३९.

🔶 रक्तातील विविध श्वेपेशींची संख्या ?
→   मोनोसाईटस - ३ ते ८%.
→   बेसोफिल्स - ०.५%.
→   लिम्फोसाईटस - २० ते २५%.
→   न्यूट्रोफिल्स - ४० ते ७०%.

🔶शरीराचे तापमान ?
→   ९८.४ डिग्री फॅरनहीट = ३१० केल्वीन = ३६.९ डिग्री सेल्सियस =६६.४ डिग्री रँकिन.

🔶प्रौढांमधील दातांची संख्या ?
→   ३२.

🔶लहान मुलांमधील दातांची संख्या ?
→   २० दूधाचे दात.

🔶 सर्वात पातळ त्वचा ?
→   पापणी (कंजक्टायव्हा)

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...