Thursday, 26 August 2021

तानाजी मालुसरे

🔺 "गड आला पण सिंह गेला" 🔺

🗓  4 फेब्रुवारी 1670

◾️आपले शौर्य, निष्ठा यांच्यासह आपले बलिदान देऊन स्वराज्याचा पाया बळकट करणारे नरवीर!

◾️सातारा जिल्ह्यातल्या जावळी तालुक्यातील गोडोली गावचे तानाजी मालुसरे. छत्रपती शिवाजी राजांचे बालपणीचे सवंगडी, म्हणूनच महाराजांच्या आत्यंतिक विश्र्वासातले. तानाजी हे स्वराज्य स्थापनेपासूनच प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीत महाराजांबरोबर होते. अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी काही निवडक सरदारांना हजार मावळ्यांचे सैन्य दिले होते. तानाजींनी ह्या सैन्याच्या बरोबरीने खानाच्या फौजेवर तुटून पडून उत्तम कामगिरी बजावली होती.

◾️शत्रूवर आक्रमण करताना बेभान होऊन लढण्याची त्यांची वृत्ती होती. महाराजांनी कोकण स्वारीत संगमेश्वर काबीज करून तानाजी व पिलाजी ह्यांना तेथे ठेवले होते. सुर्व्यांनी अचानकपणे रात्री हल्ला केल्याने पिलाजी पळत होते. परंतु तानाजीने अतिशय शौर्याने सुर्व्यांचा हल्ला मोडून काढून मर्दानीपणा काय असतो ते दाखवून दिले. कोणत्याच गोष्टीसाठी हार मानणे त्यांना मान्य नव्हते.

◾️स्वराज्यातील रायगडाच्या बाजूला, कोकण पट्ट्यात असणार्‍या स्थानिक दंगलखोर जमातींचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महाराजांनी तानाजीवर सोपविली होती. त्यासाठीच या भागातील उमरठे ह्या गावात येऊन ते राहिले. आपलेपणाने वागून ह्या भागातील लोकांना स्वराज्याच्या कार्यात त्यांनी सहभागी करून घेतले. सिंहगडाच्या विजयामध्ये ह्या भागातील लोकांचाच सहभाग होता. कोंढाणा (सिंहगड) स्वराज्यात आणताना तानाजी मालुसरेंनी केलेला पराक्रम महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.

◾️स्वराज्यासाठी, आऊसाहेबांच्या (जिजाबाई) इच्छेखातर; जबरदस्त चौक्या-पहारे व अतिशय कडेकोट बंदोबस्त असलेला आणि उदयभानसारखा पराक्रमी किल्लेदार असलेला कोंढाणा किल्ला ताब्यात घेण्याचा विडा तानाजींनी उचलला होता. एवढे मोठे धाडस तानाजीसारखा निधड्या छातीचा माणूसच करू शकत होता. स्वराज्याच्या सेवेतील कामगिरीपुढे त्यांना आपल्या संसाराचेही भान नव्हते. कामगिरी आपल्या हातून निसटू नये म्हणून मुलाच्या लग्नाची वाच्यताही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसमोर केली नाही. तानाजींचे शौर्य, पराक्रम, नेतृत्व हे शत्रूला आव्हान देणारे होते आणि शाहीरांच्या प्रतिभेलाही प्रेरणा देणारे होते. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानी मनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा. रात्रीच्या वेळी केवळ पाचशे सैनिकांबरोबर हा कडा चढून त्यांनी सिंहगडावर हल्ला केला. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वत:चे प्राण तानाजींनी सोडले. ही घटना 4 फेब्रुवारी 1670 रोजी घडली.

◾️तानाजी मालुसरेंसह मावळ्यांच्या अवर्णनीय आणि विलक्षण अशा पराक्रमामुळे गड ताब्यात आला होता, पण.... सिंह गेल्याचे अतीव दु:ख छत्रपतींना झाले.

◾️शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती,

......लढून मरावं ,मरून जगावं हेच आम्हाला ठाव .

ह्या गीताच्या ओळी सार्थ ठरवणारे सरदार (किंबहुना हे गीतच ज्यांच्या पराक्रमावर लिहिले गेले ते सरदार) म्हणजे तानाजी मालुसरे होत.  अशा सिंहासारख्या शूरवीर, निष्ठावंत मराठी सरदाराची प्रतिमा प्रत्येक मराठी माणसाच्या मनात रुजली आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

आजचे चालू घडामोडीचे 20 सराव प्रश्न


● कोणते शहर इकॉनॉमिस्ट इंटेलिजन्स युनिट (EIU) या संस्थेच्या “सुरक्षित शहरे निर्देशांक २०२१” याच्या यादीत प्रथम क्रमांकावर आहे?
उत्तर : कोपेनहेगन

● ‘वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (WRI) इंडिया’ आणि कोणी  संयुक्तपणे 'फोरम फॉर डीकार्बोनाइजिंग ट्रान्सपोर्ट' (अकार्बनीकरण परिवहन मंच) यांचा प्रारंभ केला आहे?
उत्तर :  नीती आयोग

● कोणत्या व्यक्तीची भारत सरकारच्या केंद्रीय सहकार्य मंत्रालयात संयुक्त सचिव या पदावर नियुक्ती झाली?
उत्तर : अभय कुमार सिंग

● कोणत्या देशात ‘ARMY-२०२१’ नामक प्रदर्शनीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला?
उत्तर : रशिया

● ‘न्यू इंग्लंड’ला धडकणारे गेल्या ३०  वर्षांतील पहिले चक्रीवादळ कोणते आहे?
उत्तर : ‘हेन्री’ उष्णकटिबंधीय वादळ

●भारताने अफगाणिस्तानातून भारतीयांना देशात परत आणण्यासाठी चालविलेल्या मोहिमेचे नाव काय आहे?
उत्तर : ऑपरेशन देवी शक्ती

● कोणत्या ठिकाणी निकोबार बेटांकडील प्रवासाचा भाग म्हणून ‘स्वर्णिम विजय वर्ष विजयज्योत’ २२ ऑगस्ट २०२१ रोजी नेण्यात आली?
उत्तर : इंदिरा पॉइंट

● कोणते ठिकाण भारतीय नौदलाची एब-इनिशीओ प्रशिक्षण आस्थापना आहे?
उत्तर :  INS चिल्का

● कोणत्या संस्थेने वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी 'हाय-स्पीड डिझेल'चे घरोघरी वितरण करण्यास सुरुवात केली?
उत्तर : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड

● कोणत्या संस्थेने “द हँडबुक फॉर इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्लीमेंटेशन” या शीर्षकाची पत्रिका प्रकाशित केली?
उत्तर : नीती आयोग

●  कोणत्या मंत्रालयाने स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करण्याच्या निमित्ताने “कथा क्रांतिवीरों की” प्रदर्शनी मांडली?
उत्तर : सांस्कृतिक मंत्रालय

● कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीने “बिजू आरोग्य कल्याण योजना”च्या अंतर्गत राज्यातील 3.5 कोटी लोकांना ‘स्मार्ट हेल्थ कार्ड’ वाटप करण्याची घोषणा केली आहे?
उत्तर : ओडिशा

● कोणत्या वर्षापर्यंत भारताला 'ऊर्जा स्वतंत्र' करण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले आहे?
उत्तर : २०४७

● खालीलपैकी कोणत्या कायद्याच्या जागी “आसाम गुरेढोरे संरक्षण विधेयक-२०२१” लागू केला जाईल?
उत्तर : आसाम गुरेढोरे संरक्षण कायदा, १९५०

● हैती या कॅरेबियन बेटराष्ट्रात १४ ऑगस्ट २०२१ रोजी ७.२ तीव्रतेचा भूकंप येवून गेला. कोणत्या खंडात हैती देश वसलेला आहे?
उत्तर : 
उत्तर अमेरीका

● खालीलपैकी कोणता छत्तीसगड राज्यातील नवीन तयार झालेला जिल्हा आहे?
उत्तर : मोहला-मानपूर, सरनगड-बिलाईगड, मनेंद्रगड

सराव प्रश्न

🔹परश्न १:- 'दलितांचा मुक्तीदाता ' या शब्दात डॉ.आंबेडकरांचा गौरव कोणी केला ?

१) शाहू महाराज ✅✅
२) डॉ.बेव्हरेल निकोल्स
३) जोतिबा फुले
४) यापैकी नाही

🔹परश्न २:-  विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ओ.बी.सी समाज बांधवांच्या हक्क अधिकारांसाठी संविधानात कोणत्या कलमाची निर्मिती केली ?

१) कलम ३४०✅✅
२) कलम ३४१
३) कलम ३४२
४) कलम ३४३

🔹परश्न ३:-  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्माची दीक्षा कोणी दिली ?

१) भंते संघरत्न
२) भंते प्रज्ञानंद
३) भंते चंद्रमणी महास्थीर ✅✅
४) भंते सद्दतिस्स

🔹परश्न ४:-  विश्वरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या साली मिळाला ?

१) १९९२
२) १९८९
३) १९९०✅✅
४) १९९१

🔹परश्न ५:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता ?

१) थॉटस ऑन पाकिस्तान
२) बुद्ध आणि त्यांचा धम्म ✅✅
३) हू  वेअर शुद्राज
४) दि अनटचेबल्स

🔹परश्न ६ :-  १९५२ मध्ये कोलंबिया विद्यापीठाने डॉ.आबेडकरांना कोणती पदवी बहाल केली ?

१) एम.ए
२) पी.एच.डी
३) एल.एल. डी✅✅
४) डी.एस सी

🔹परश्न ७ :-  महाडचा क्रांती स्तंभ किती उंच आहे ?

१) ५१ फूट ✅✅
२) ५५ फूट
३) ५७ फूट
४) ५४ फूट

🔹परश्न ८:- डॉ.आंबेडकर यांनी त्यांच्या तीन गुरू पैकी दुस-या क्रमांकावर कोणाला गुरू मानले ?

१) तथागत गौतम बुद्ध
२) महात्मा ज्योतिबा फुले
३) संत कबीर ✅✅
४) यापैकी नाही

प्रश्र ९ :-  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मातरांची घोषणा कधी केली ?

१) १४ ऑक्टोबर १९३५
२) १३ ऑक्टोबर १९५५
३) १४ ऑक्टोबर १९५५
४) १३ ऑक्टोबर १९३५ ✅✅

प्रश्न १० :-  जगाच्या शिल्पकारामधे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कितवा क्रमांक लागतो ?

१) पहिला
२) दुसरा
३) तिसरा
४) चौथा ✅✅

क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते?

1. बिहार

2. उत्तर प्रदेश

3. राजस्थान🎯

4. महाराष्ट्र

भारतातील सर्वात लांब नदी कोणती?

1. कोयना

2. गोदावरी

3. यमुना

4. गंगा🎯

२०११ ची लोकसंख्या जि किर्वी लोकसंख्या गणना होती?

1. १६ वी

2. १५ वी🎯

3. १८ वी

आशियातील एकमात्र ठिकाण जेथे सौर तलावाचे निर्माण होत आहे, ते कोठे आहे?

1. भूज (गुजरात)🎯

2. कच्छ (गुजरात)

3. मुत्पनडल (तामिळनाडू)

4. मणिकरण (हिमाचल प्रदेश

पवन उर्जा निर्मितीत आघाडीवर असलेले राज्य कोणते?

1. तामिळनाडू🎯
2. उत्तर प्रदेश
3. महाराष्ट्र

सर्वात जास्त कुपोषित बालके असलेले राज्य कोणते?

1. बिहार
2. मध्यप्रदेश🎯
3. राजस्थान
4. महाराष्ट्र

महाराष्ट्र राज्याची निर्मिती होण्यापूर्वी आपले राज्य कोणते प्रांत म्हणून ओळखले जात होते?

1. मुंबई प्रांत🎯
2. मराठवाडा प्रांत
3. कोकण प्रांत
4. विदर्भ प्रांत

विधानसभेच्या सभासदांची संख्या किती असते?

1. २५०
2. २६७
3. २८८🎯
4. २४०

चिखलदरा पर्वत शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?

1. अमरावती🎯
2. अहमदनगर
3. नाशिक
4. सातारा

महादेव डोंगररांगांमुळे भीमा नदीचे खोरे कोणत्या नदीच्या खोऱ्यापासून वेगळे झालेले आहे?

1. गोदावरी
2. गंगा
3. कोयना
4. कृष्णा🎯

माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

1. रायगड🎯
2. पुणे
3. औरंगाबाद
4. सातारा

प्रसिद्ध गुळाची बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे?

1. कोल्हापूर🎯
2. जालना
3. अकोला
4. धर्माबाद

देवगड पवनऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्हात आहे?

1. सातारा
2. सांगली
3. सिंधुदुर्ग🎯
4. बीड

मुंबई विद्यापीठाची स्थापन केव्हा झाली?

1. सन १८५७🎯
2. सन १९४८
3. सन १८६०
4. सन १९२५

खालीलपौकी कोणता गरम पाण्याचा झरा रत्नागिरीत स्थित नाही.

1) वज्रेश्वरी🎯
2) राजवाडी
3) आसवली
4) उन्हेरे

१.संविधानावर अशी एकमेव स्त्री आहे जिने सही केलेली आहे?
१)विजयालक्ष्मी पंडित
२)हंसाबेन मेहता✅✅✅
३)सरोजिनी नायडू
4)वरीलपैकी यात ती स्त्री नाही

२.भारतीय संविधान कोणत्या दिवस स्वीकारले?
१)२६जानेवारी१९५०
२)२६जानेवारी१९४९
३)२६नोव्हेंबर१९४९✅✅✅
५)२६नोव्हेंबर १९५०

३.भारतीय राज्यघटनेचे स्थायी अध्यक्ष कोण होते?
१)डॉ बाबासाहेब आंबेडकर
२)डॉ राजेंद्र प्रसाद✅✅
३)पंडित नेहरू
४)वरीलपैकी एकही स्थायी अध्यक्ष नव्हते

४.मार्गदर्शक तत्व .......या देशाकडून घेतले आहे?
१)दक्षिण आफ्रिका
२)अमेरिका
३)आयर्लंड ✅✅✅
४)वरीलपैकी एकही नाही

५.राज्य घटनेत एकूण २५भाग आहेत,त्यात कितव्या भागामध्ये पंचायत राज ची तरतूद केली आहे?
१)सहावा
२)नववा✅✅✅
३) पाचवा
४)वरीलपैकी नाही

६.मूलभूत कर्तव्ये कुठल्या कलमा मध्ये आहे?
१)कलम ५१ब
२)कलम५१अ✅✅✅
३)कलम ५१क
४)वरील कलमांचा काहीही संबंध नाही

७.१२४हे कलम खालील पैकी कशाशी निगडित आहे?
१)उच्च न्यायालय
२)सर्वोच्च न्यायालय✅✅✅
३)जिल्हा न्यायालय
४)कुटुंब न्यायालय

८.खालील पैकी संसद बरोबर काय?
१)लोकसभा+राज्यसभा+विधानसभा
२)लोकसभा +विधानसभा+राज्यपाल
३)लोकसभा+राज्यसभा+राष्ट्रपती✅✅✅
४)मुळात अस काही नसतं

९.पक्षांतर केल्यास कुठल्या परिशिष्ट नुसार  सदस्याचे सदस्यत्व रद्द होते?
१)९
२)१०✅✅✅
३)११
४)यापैकी नाही

१०.कलम .......नुसार कोणतेही धन विधेयक प्रथम लोकसभेत मांडावे लागते?
१)१०९✅✅✅
२)१०८
३)१०७
४)१०६

११.तिन्ही सेनादलाचे सर सेनापती हे असतात?
१)सवरक्षण मंत्री
२)गृहमंत्री
३)पंतप्रधान
४)राष्ट्रपती✅✅✅

१२.संसदेचे अधिवेशन चालू असताना वटहुकूम काढता येत नाही?
१)हे विधान असत्य आहे
२)हे विधान सत्य आहे✅✅✅कलम 123 नुसार  (राष्ट्रपती काढता)
३)वरीलपैकी दोन्ही बरोबर
४)वरीलपैकी दोन्ही चूक

१३.उच्च न्यायालयाच्या न्यायधीशांना कोण शपथ देतात?
१)राष्ट्रपती
२)उपराष्ट्रपती
३)राज्यपाल✅✅✅
४)सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश

१४.भारताचा नियंत्रक आणि महालेखापरिक्षक (CAG)ची नियुक्ती राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार करता?
१)१४७
२)१४८✅✅✅(केंद्राचे व राज्याचे जमाखर्च लेखे तपासणे
३)१४९
४)१५१

१५.सुचीमधील विषययाची क्रमानुसार योग्य पर्याय निवडा?
1.केंद्र सूची
2.राज्य सूची
3.समवर्ती सूची
१)५२,६१,१००
२)१००,६१,५२✅✅✅
३)६१,५२,१००
४)५२,१००,६१

१६.राज्यसभेच्या सभासदांना सभापती निवडण्याचा अधिकार नसतो.
हे विधान चूक की बरोबर
१)चूक
२)बरोबर✅✅✅कारण उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात
३)काही अंशी चूक
४)वरील वाक्याचा खालील उत्तराशी तिळमात्र सम्बध  नाही

१७.खालील पैकी कोणाचा उल्लेख 'ग्रह मालिकेतील सूर्य 'असा केला जातो?
१)राज्यपाल
२)राष्ट्रपती
३)पंतप्रधान✅✅✅
४)उपराष्ट्रपती

१८.भारत हे खालील पैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही?
१)धर्मनिरपेक्ष
२) गणराज्य
३)समाजवादी
४)साम्यवादी✅✅✅

१९.भारतीय घटनादुरुस्ती चे अधिकार कोणास आहे?
१)सर्वोच्च न्यायालय
२)राष्ट्रपती
३)भारतीय जनता
४)कायदेमंडळ✅✅✅

२०.मतदानासाठी आवश्यक पात्राता वय २१वरून१८वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले?
१)६२
२)६१✅✅✅
३)७१
४)८९

1) खालीलपैकी बरोबर जोडी ओळखा ?

A  भाई कोतवाल - आझाद दस्ता

B  जनरल आवारी - लाल सेना

C  उषा मेहता - आझाद रेडिओ

D  इंदिरा गांधी - वानर सेना

1️⃣ A  B  C बरोबर

2️⃣ A  B बरोबर

3️⃣ C  D  बरोबर

4️⃣ सर्व बरोबर

Ans    -  4

2) १७ ऑक्टोबर १९४० रोजी विनोबा भावे यांनी...............येथे युध्दविरोधी भाषण केल्यामुळे ते पहिले वैयक्तिक सत्याग्रही ठरले.

1️⃣ मबई

2️⃣ वर्धा

3️⃣ पवनार

4️⃣ दांडी

Ans    -  3

3) -------- यांच्या पुढाकाराने 1918 साली उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांनी  'किसान सभा ' ही संघटना स्थापन केली.

1️⃣ एन. जी. रंगा

2️⃣ दीनबंधू

3️⃣ मा. गांधी

4️⃣ बाबा रामचंद्र

Ans   -  4

4)  1936 साली अखिल भारतीय किसान सभा  एन. जी. रंगा यांच्या पुढाकाराने स्थापन झाली.खालील पैकी -------------- हे सभेचे अध्यक्ष होते.

1️⃣   एन. माधव

2️⃣ सवामी सहजानंद सरस्वती

3️⃣ पडित नेहरू

4️⃣ बाबा रामचंद्र

Ans -   2

5) भारताची सागरी सीमा किती देशांशी संलग्न आहे?

1️⃣ 5

2️⃣ 6

3️⃣ 7

4️⃣ 8

Ans-2 ( पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, बांग्लादेश, म्यानमार, इंडोनेशिया.)

6)  ------------ हा मासा फुफ्फुसाद्वारे श्वसन करतो.

1️⃣ लगफिश

2️⃣ ईल

3️⃣ दवमासा

4️⃣ कोणताही मासा फुफ्फुसाद्वारे श्वसन करत नाही.

Ans- 1

7) रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील होऊ घातलेला
"नाणार प्रकल्प" कोणत्या देशाच्या संयुक्त विद्यमाने होणार आहे?

1️⃣ इराक

2️⃣ इराण

3️⃣ सौदी अरेबिया

4️⃣ फरान्स

Ans -  3

8) सुभाषचंद्र बोस यांच्या the Indian struggle या पुस्तकाचा पहिला भाग खालीलपैकी कोणत्या देशात प्रथम प्रकाशित झाला.

1️⃣ अमेरिका

2️⃣ इग्लंड

3️⃣ फरान्स

4️⃣ जर्मनी

Ans -   2

9)  ---------- या व्यवसायाला भारत सरकारने NKM 16  या कार्यक्रमाद्वारे उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन दिले आहे.

1️⃣ शती व्यवसाय

2️⃣ कक्कुटपालन

3️⃣ मत्स्यव्यवसाय

4️⃣ शळीपालन

Ans  -     3

प्रसिद्ध व्यक्तींचे मृत्यू महत्वाचे प्रश्न

❇️परश्न 1️⃣:- सुशांतसिंग राजपुतने अभिनयाची सुरुवात खालीलपैकी कोणत्या मालिकेतून केली?

१) किस देश मे है मेरा दिल✅✅
२)पवित्र रिस्ता
३) जरा जिके दिखा
४) यापैकी नाही

❇️परश्न 2️⃣:-अभिनेता इरफान खान यांचा पहिला चित्रपट कोणता?

१)हासिल
२) चाणक्य
३) सलाम बॉम्बे✅✅
४) बनगी आपनी बात

❇️परश्न 3️⃣:- रत्नाकर मतकरी यांनी खालीलपैकी कोणत्या बँक मध्ये काम केले होते?

१) बँक ऑफ बडोदा
२) बँक ऑफ महाराष्ट्र
३) बँक ऑफ इंडिया ✅✅
४) स्टेट बँक ऑफ इंडिया

❇️परश्न 4️⃣:-आत्मनेपदी हे मनोगत खालीलपैकी कोणाचे आहे?

१)रत्नाकर मतकरी✅✅
२) जयराम कुलकर्णी
३) पाटील संजय
४) यापैकी नाही

❇️परश्न 5️⃣:- चल रे लक्ष्या मुंबई ला हे नाटक कोणाचे आहे ?

१) रत्नाकर मत्कारी
२) जयराम कुलकर्णी ✅✅
३) अर्जुन गाडगीळ
४) उत्तम तुपे

❇️परश्न 6️⃣:-  ऋषी कपूर यांचा शेवटचा चित्रपट कोणता?

१) शर्माजी नमकीन
२) सलामत
३) अग्निपथ
४) द बॉडी✅✅

❇️परश्न 7️⃣ :- रणजी स्पर्धा मध्ये सर्वाधिक बळी कोनि मिळवले आहेत?

१) राजेंद्र गोयल✅✅
२) रणजित गोयल
३) जितेंद्र गोयल
४) यापैकी नाही

❇️परश्न 8️⃣:- प्रसिद्ध संगीतकार वाजीद खान यांचे शेवटचे गाणे कोणते?

१) तुमको चाहते है
२) हम आपके है
३) भाई भाई✅✅
४) यापैकी नाही

❇️परश्र 9️⃣ :- इरफान खान यांनी खालीलपैकी कोणत्या मालिकेतून सिनेसृष्टीत प्रवेश केला?

१) सलामत
२) भारत एक खोज
३) जय हनुमान
४) चाणक्य ✅✅

❇️परश्न १० :- अरुण जेटली यांनी खालीलपैकी कोणते पद भूषवले नाही?

१) कायदा व न्याय मंत्री
२) वित्त मंत्री
३) संरक्षण मंत्री
४) गृह मंत्री ✅✅

वहाइसरॉय घटकांवरील सराव प्रश्न

♦️परश्न 1️⃣: कोणाच्या काळात भारतीय परिषद कायदा 1861 पारित करण्यात आला-?

१) लॉर्ड कॅनिंग✅✅
२)लॉर्ड मिंटो
३) लॉर्ड डफरीन
४) यापैकी नाही

♦️परश्न 2️⃣:कॅम्पबेल यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ कमिटी कोणाच्या काळात स्थापन केली?

१)लॉर्ड कॅनिंग
२) लॉर्ड रिपन
३) लॉर्ड जॉन लॉरेन्स ✅✅
४) लॉर्ड लिटन

♦️परश्न 3️⃣:- "रॉयल टायटल ऍक्ट" कोणाच्या काळात संमत करण्यात आला?

१) लॉर्ड रिपन
२) लॉर्ड हेस्टिंग
३) लॉर्ड लिटन ✅✅
४) यापैकी नाही

♦️परश्न 4️⃣:-पहिला फॅक्ट्री ऍक्ट कोणाच्या काळात झाला?

१)लॉर्ड रिपन ✅✅
२) लॉर्ड लान्सडाऊन
३) लॉर्ड चेम्सफर्ड
४) यापैकी नाही

♦️परश्न 5️⃣:-पंजाब टेंनसी ऍक्ट कोणाच्या काळात झाला?

१) लॉर्ड वेलस्ली
२) लॉर्ड डफरिन ✅✅
३) लॉर्ड कानींग
४) लॉर्ड मेयो

♦️परश्न 6️⃣:- मणिपूर राज्यच्या कारभारात कोणी हस्तक्षेप केला?

१) लॉर्ड वेलस्ली
२) लॉर्ड मिंटो
३) लॉर्ड लिटन
४) लॉर्ड लान्सडाऊन✅✅

♦️परश्न 7️⃣ :-भारतीय नाणी व चलन कायदा कोणी केला?

१) लॉर्ड कर्झन✅✅
२) लॉर्ड कॉर्नवॉलिस
३) लॉर्ड मेयो
४) लॉर्ड रिपन

♦️परश्न 8️⃣:-भारतीय विद्यापीठ कायदा कोणाच्या काळात झाला?

१) लॉर्ड लिटन
२) लॉर्ड चेम्सफर्ड
३) लॉर्ड कर्झन ✅✅
४) यापैकी नाही

♦️परश्र 9️⃣ :- कोणच्या काळात वंगभंग चळवळ घडून आली?

१) लॉर्ड मिंटो
२) लॉर्ड हार्डिंग
३)लॉर्ड कर्झन
४) लॉर्ड मिंटो II ✅✅

♦️परश्न १०:- असहकार चळवळ कोणच्या काळात सुरू झाली?

१) लॉर्ड रिडींग ✅✅
२) लॉर्ड होर्डिंग
३) लॉर्ड चेम्सफर्ड
४) यापैकी नाही

लिंगगुणोत्तर भारत 2011



✔️परौढ लिंगगुणोत्तर 943


सर्वाधिक - केरळ

सर्वात कमी - हरियाणा


0-6 वयोगटातील- 919


सर्वाधिक - अरुणाचल प्रदेश

सर्वात कमी - हरियाणा


 

🔴 0-6 वयोगटातील लिंग गुणोत्तर 🔴 MH894

🔹पाहिले 3 जिल्हे - 🔹


1 गडचिरोली

2 गोंदिया

3 चंद्रपूर


🟢 Tricks-0 ते 6 वयोगटातील मुलींची संख्या खूप जास्त असलेलं एक गाव-"गगोची"



🔸शवटचे 3 जिल्हे🔸


1 बीड

2 जळगाव

3 अहमदनगर

4 औरंगाबाद

5 कोल्हापूर


🟢Tricks-बीड जवळील नगरात आठ कोल्हे राहत होते



  🔸सत्री पुरुष प्रमाण(2011)🔸MH 929

🔹परौढ वयोगट पाहिले 4 जिल्हे🔹


1)रत्नागिरी  1122

2)सिंधुदुर्ग    1036

3)गोंदिया     999

4)सातारा     988


🟢Tricks-महाराष्ट्रात सर्वाधिक मुलींचे प्रमाण  असलेल एकं गाव आहे त्याच नाव " रसिगोतारा"



🔹परौढ वयोगट शेवटचे 3 जिल्हे🔹


1)मुंबई शहर   832

2)मुंबई उपनगर  860

3)ठाणे   886


🟢Tricks - महाराष्ट्रात मुलींचं प्रमाण कमी झाल्याने (शहर नगर ठप्प) झाले आहेत

---------------------------------------------------

राष्ट्रीय चलनीकरण रुपरेषा’: पायाभूत सुविधांच्या मालमत्तांसाठी वित्त मंत्रालयाची योजना..



🔰23 ऑगस्ट 2021 रोजी भारताच्या वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी ‘राष्ट्रीय चलनीकरण रुपरेषा’ (नॅशनल मोनेटाइझेशन पाईपलाईन) याच्या पुस्तिकेचे प्रकाशन केले.


🔴ठळक बाबी...


🔰योजनेत केंद्रीय सरकारच्या ब्राउनफिल्ड पायाभूत सुविधांच्या मालमत्तांसाठीची आर्थिक वर्ष 2022 ते 2025 या चार वर्षांची रुपरेषा समाविष्ट आहे.

नियोजित चार वर्षाच्या कालावधीत केंद्रीय सरकारच्या मिळकतीच्या मुद्रीकरणातून 6 लक्ष कोटी रुपयांच्या भांडवलाची उभारणी होऊ शकेल.


🔰गतवणूकदारांसाठी दृश्यमानता प्रदान करण्याव्यतिरिक्त ते सरकारच्या मालमत्ता चलनीकरण उपक्रमासाठी मध्यम मुदतीची रुपरेषा म्हणून देखील कार्य करेल.


🔰तयाच्यानुसार केंद्रीय मंत्रालय आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या मालमत्तांचे मुद्रीकरण केले जाईल.

मुद्रीकरणातून निर्मिती या तत्वावर आधारित मालमत्ता मुद्रीकरणाचे उद्दिष्ट, नवीन पायाभूत सुविधा निर्मितीसाठी खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीला आमंत्रित करणे हे आहे.


🔰रोजगार संधींची निर्मिती आणि त्याद्वारे आर्थिक विकास साध्य करून ग्रामीण आणि शहरी भाग अशा सर्वच भागांच्या सार्वजनिक कल्याणाचे उद्दिष्ट गाठता येईल.


🔰यामध्ये 'भांडवली खर्चातून राज्यांना आर्थिक मदतीची योजना' या उपक्रमातून राज्य सरकारांच्या मालकीच्या मालमत्तांच्या पुनर्वापरातून पायाभूत सुविधांना वेग देणाऱ्या योजनेचाही समावेश आहे.

पायाभूत सुविधांचे परिचालन, व्यवस्थापन खासगी क्षेत्रांकडे.



🔰केंद्र सरकारच्या मालकीच्या पायाभूत मालमत्तांच्या सुविधांचे परिचालन आणि व्यवस्थापन खासगी क्षेत्राच्या हाती देऊन त्यायोगे पुढील पाच वर्षांत सहा लाख कोटी रुपये उभारण्याचा महत्त्वाकांक्षी ‘नॅशनल मॉनेटायझेशन पाइपलाइन’ (एनएमपी)कार्यक्रम अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी जाहीर केला.


🔰कद्र सरकारच्या आठ मंत्रालयांच्या अखत्यारीतील रस्ते, रेल्वे, वीज आदी क्षेत्रांतील चलनीकरण होऊ घातलेले प्रकल्प निश्चित करण्यात आले आहेत. चालू स्थितीत असलेल्या या पायाभूत प्रकल्पांद्वारे ‘जास्तीतजास्त मूल्यप्राप्ती’ असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. सरसकट जमिनीची विक्री यातून केली जाणार नाही, अशी पुस्तीही अर्थमंत्र्यांनी खुलासेवार निवेदन करताना (पान २ वर)


🔰जोडली. या सर्व मालमत्तांची मालकी सरकारकडे राहणार असून, त्या ठरावीक कालावधीसाठी खासगी क्षेत्रामार्फत चालविल्या जातील आणि पुन्हा सरकारकडे येतील, असेही सीतारामन यांनी स्पष्ट केले.


🔰निती आयोगाने केंद्रातील पायाभूत क्षेत्रांशी संलग्न वेगवेगळ्या मंत्रालयांशी सल्लामसलत करून ‘एनएमपी’चा अहवाल तयार केला आहे. या योजनेतून उभा राहणारा निधी ‘नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाइपलाइन’ (एनआयपी) या अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेल्या ४३ लाख कोटी रुपये खर्चाच्या नवीन पायाभूत सोयीसुविधा विकासाच्या कार्यक्रमासाठी १४ टक्के हातभार लावणार आहे.

२०३६, २०४०च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारत उत्सुक



ऑलिम्पिक स्पर्धांचे यजमानपद मिळवण्यासाठी जगभरातील देशांमध्ये कमालीची चुरस पाहायला मिळते. यामध्ये आता भारताचीसुद्धा भर पडली असून २०३६ आणि २०४० पैकी एका ऑलिम्पिकचे यजमानपद मिळवण्यासाठी भारताने उत्सुकता दर्शवली असल्याची माहिती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) यांनी मंगळवारी दिली.


करोनाच्या सावटादरम्यानही ऑलिम्पिकचे यशस्वी आयोजन केल्यामुळे ‘आयओसी’वर कौतुकाचा वर्षाव होत आहे. २०२४ ते २०३२ पर्यंतच्या तीन ऑलिम्पिक स्पर्धा अनुक्रमे पॅरिस, लॉस अँजेलिस आणि ब्रिस्बेन येथे होणार आहे. मात्र २०३६, २०४०च्या स्पर्धेच्या आयोजनासाठी आतापासून अनेक राष्ट्रे पुढे येत आहेत, असे बाख यांनी सांगितले.


‘‘२०३६ आणि २०४०च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारत, इंडोनेशिया, जर्मनी आणि कतार या चार देशांनी उत्सुकता दाखवली आहे,’’ असे बाख म्हणाले. भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) सरचिटणीस राजीव मेहता यांनी बाख यांच्या मताला दुजोरा देत भारत ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी तयारी करत असल्याचे सांगितले. 

नदी आणि त्यांची उगमस्थान



🔸 गगा → गंगोत्री (उत्तराखंड)


🔹यमुना → यमुनोत्री (उत्तराखंड)


🔸सिंधू → मानसरोवर (तिबेट)


🔹नर्मदा → मैकल टेकडया , अमरकंटक (मध्यप्रदेश)


🔸तापी → सातपुडा पर्वत , बैतुल (मध्यप्रदेश)


🔹महानदी → नागरी शहर (छत्तीसगड)


🔸बरम्हपुत्रा → चेमायुंगडुंग (तिबेट)


🔹सतलज → कैलास पर्वत(तिबेट)


🔸बियास → रोहतंग खिंड (हिमाचल प्रदेश)


🔹गोदावरी → त्र्यंबकेश्वर, नाशिक


🔸कष्णा → महाबळेश्वर.


🔹कावेरी → ब्रम्हगिरी टेकड्या, कूर्ग (कर्नाटक)


🔸साबरमती → उदयपूर, अरावली टेकड्या (राजस्थान)


🔹रावी → चंबा (हिमाचल प्रदेश)


🔸पन्नर → नंदी टेकड्या, चिकबल्लापूर (कर्नाटक).

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...