२५ ऑगस्ट २०२१

भारतीय रिझर्व बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर सी. डी. देशमुख यांच्याबद्दल



▪️पर्ण नांव - चिंतामण द्वारकानाथ देशमुख 

▪️कालावधी - (जानेवारी १४, इ.स. १८९६ - ऑक्टोबर २, इ.स. १९८२) 


सी. डी. देशमुख हे मराठी अर्थशास्त्रज्ञ होते. ते भारतीय रिझर्व बँकेचे तिसरे आणि मूळ भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर होते. सामाजिक कार्यकर्त्या दुर्गाबाई देशमुख या चिंतामणराव देशमुखांच्या पत्‍नी होत्या. भारत सरकारातील पंतप्रधान नेहरू यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते.


सी.डी. देशमुख हे एक सनदी अधिकारी होते. ते इ.स. १९३९ साली भारतीय रिझर्व बँकेच्या सेवेत अधिकारी म्हणून रुजू झाले. गव्हर्नर पदावर नियुक्ती होण्यापूर्वी ते रिझर्व बँकेतच आधी सचिव म्हणून आणि पुढे डेप्युटी गव्हर्नर (इ.स. १९४१-४३) म्हणून कार्यरत होते. त्यांच्या योगदानाबद्दल ब्रिटिश भारताच्या शासनाने इ.स. १९४४ साली त्यांना सर (नाइटहूड) हा किताब बहाल केला होता.पुढे इ.स. १९४३-४९ या काळात चिंतामणराव भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर होते.


१ जानेवारी, इ.स. १९४९ रोजी रिझर्व बँकेचे राष्ट्रीयीकरण त्यांच्याच कार्यकाळात झाले. इ.स. १९५० ते इ.स. १९५६ या काळात चिंतामणराव स्वतंत्र सार्वभौम भारताचे पहिले अर्थमंत्री होते. भाषावार प्रांतरचना करताना भारत सरकारने बेळगांव व कारवार महाराष्ट्राला न दिल्याचा निषेध म्हणून चिंतामणराव देशमुखांनी अर्थमंत्रिपदाचा आणि लोकसभेचा राजीनामा दिला. त्यानंतर लगेचच जागतिक बँकेने त्यांना गव्हर्नर होण्याची विनंती केली असताना ते पद स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला.


ते संस्कृतचे पंडित होते. त्यांनी केलेला कालिदासाच्या मेघदूताचा समवृत्त व सयमक काव्यानुवाद मेघदूतांच्या उत्कृष्ट अनुवादांपैकी एक आहे.

भारताचे जनक/शिल्पकार



1. आधुनिक भारताचे जनक- राजा राममोहन रॉय

2. आधुनिक भारताचे शिल्पकार - पंडित जवाहरलाल नेहरू.

3. भारतीय अर्थशास्त्राचे जनक - दादाभाई नौरोजी.

4. भारतीय राष्ट्रवादाचे जनक - सुरेंद्रनाथ चटर्जी

5. भारतीय असंतोषाचे जनक - लोकमान्य टिळक.

6. भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार – सरदार वल्लभभाई पटेल.

7. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक - आचार्य बाळशास्त्री जांभेकर.

8. भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक - दादासाहेब फाळके.

9. भारताच्या अनुविज्ञानाचे जनक - डॉ.होमी भाभा.

10. आधुनिक मराठी कादंबरीचे जनक - ह.ना.आपटे.

11. आधुनिक मराठी कवितेचे जनक - केशवसुत.

12. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक - लॉर्ड रिपन.

13. भारताच्या हरितक्रांतीचे जनक - डॉ.एम.एस.स्वामिनाथन.

14. भारताच्या धवलक्रांतीचे जनक - डॉ.व्हार्गीस कुरियन.

15. भारतीय भूदान चळवळीचे जनक - आचार्य विनोबा भावे.

16. भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार - विक्रम साराभाई.

17. भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक - सॅम पित्रोदा.

Online Test Series

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...