Tuesday, 24 August 2021

General Knowledge Questions and Answers- 2021

Q : दरवर्षी 24 मार्च हा दिवस ___________ म्हणून सर्वत्र साजरा केला जातो?

(अ) जागतिक क्षयरोग दिन✔️✔️

(ब) जागतिक पर्यावरण दिन

(क) जागतिक जल दिन

(ड) जागतिक वसुंधरा दिन


Q:   इ.स.1882 साली _______ यांनी क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावला?

(अ) एडिसन

(ब) डॉ.रॉबर्ट कॉक✔️✔️

(क) जॉन डाल्टन

(ड) यापैकी नाही

उत्तर:- DOTS उपचार पद्धती यात वापरली जाते


Q : __________ हा रोग प्लाझमोडियम व्हायरस नावाच्या आदिजीवांमुळे होतो?

(अ) क्षयरोग

(ब) हिवताप✔️✔️

(क) कावीळ

(ड) स्वाईन फ्ल्यू


Q:  ___________ने गरोदर स्त्रियांसाठी क्विनाईन आणि क्लिंडामायसिन ही औषधे सुचविली आहे?

(अ) WHO✔️✔️

(ब) UNHCR

(क) युनिसेफ

(ड)  यापैकी नाही


Q  : क्षयरोगाबद्दल खालील विधानांचा विचार करा:

(अ)  हा एक जिवाणुजन्य आजार आहे. 

(ब)  सामान्यतः या आजाराला टीबी (ट्युुबरक्युलॉसिस) म्हणून ओळखले जाते. 

(क) हा आजार 'मायकोबॅक्टेरिया' या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो. 

(ड) वरील सर्व बरोबर✔️✔️


Q : प्रकाश तरंग कोणत्या प्रकारचे आहे

(अ) अनुप्रस्थ तरंग✅✅

(ब) अनुदैर्घ्य तरंग

(क) वरील दोन्ही 

(ड) यापैकी नाही 


Q : प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात?

(अ) इलेक्ट्रॉन

(ब) पॉझीट्रोन

(क) फोटॉन✅✅

(ड) प्रोटॉन


Q : वेगळा घटक ओळखा.


(अ) खडबडीत

(ब) लाकूड

(क) प्लायवूड

(ड) सपाट आरसा✅✅

 

Q :  लाकडाच्या पृष्ठभागावरून होणारे प्रकाशाचे परावर्तन हे .......... परावर्तन असते? 

(अ) लंबाकार

(ब) सरळ

(क) अनियमित

(ड) नियमित✅✅


Q :  सपाट आरशावर आपतन बिंदूला लंब असलेल्या रेषेला ........... म्हणतात.

(अ) आपाती किरण

(ब) आपतन कोन

(क) स्तंभिका✅✅

(ड) यापैकी नाही 


 

Q :  कॅलिडोस्कोपमधील आरसे परस्परांशी चा कोन करतात?

(अ) 45°

(ब) 65°

(क) 50°

(ड) 60°✅✅



Q : आपतन कोन 20° असल्यास, परावर्तित किरणाने स्तंभिकेशी केलेला कोन ........असला पाहिजे?

(अ) 20°✅✅

(ब) 45°

(क) 50°

(ड) 60°


Q : आपाती किरणाने सपाट आरशाच्या पृष्ठभागाशी केलेला कोन 30° असल्यास, परावर्तन कोन ...........असला पाहिजे? 

(अ) 20°

(ब) 65°

(क) 50° 

(ड) 60°✅✅


Q :  आपतन कोन 40° असल्यास, परावर्तित किरणाने आरशाच्या पृष्ठभागाशी केलेला कोन ....... असला पाहिजे? 

(अ) 20°

(ब) 65°

(क) 50°✅✅

(ड) 60°

अफगाणिस्तानवर जी ७ देशांची तातडीची बैठक!; ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची माहिती.



🔰अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवल्यानंतर जागतिक स्तरावर पडसाद उमटू लागले आहेत. तालिबान दहशतवाद्याला खतपाणी घालत असल्याचा अनुभव असल्याने अनेक देशांचे धाबे दणाणले आहेत. अफगाणिस्तानातील घडामोडींवर सर्वांच्या नजरा लागून आहेत. यासाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी जी ७ देशांची तातडीची बैठक बोलवली आहे.


🔰गल्या आठवड्यात बायडेन आणि जॉन्सन यांची अफगाणिस्तानातील परिस्थितीवर दोन्ही नेत्यांनी दूरध्वनीवर चर्चा केली होती. संयुक्त धोरण ठरवण्यासाठी २४ ऑगस्टला या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. जी ७ देशात कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन व अमेरिका यांचा समावेश आहे.


🔰“अफगाणिस्तानातील परिस्थितीवर तातडीने येत्या २४ ऑगस्टला जी ७ देशातील नेत्यांची बैठक बोलवली आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाने एकत्र काम करणं गरजेचं आहे. सुरक्षित स्थलांतर सुनिश्चित करणे, मानवतावादी संकट टाळणे, तसेच अफगाणिस्तानातील नागरिकांचं गेल्या २० वर्षातील जीवनमान सुरक्षित करण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.”, असं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ट्वीट केलं आहे.

Online Test Series

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...