Sunday, 8 August 2021

जगावर आता ‘डेल्टा’ संकट.



🔰मळ करोना विषाणूपेक्षा घातक आणि अधिक वेगाने प्रादुर्भाव होणाऱ्या ‘डेल्टा’चा अमेरिका, चीनसह १३२ देशांमध्ये फैलाव झाला आहे. सर्वाधिक संसर्गजन्य असलेल्या डेल्टा विषाणूमुळे करोनाविरोधातील लढ्याचे स्वरूप बदलले आहे, असे अमेरिकेच्या ‘सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल’ने (सीडीसी) स्पष्ट केले आहे.


🔰‘डेल्टा’मुळे निर्माण झालेल्या धोक्याच्या अनुषंगाने स्पष्ट संदेश प्रसारित करणे, आरोग्य कर्मचाऱ्यांवर लसीकरणाची सक्ती आणि मुखपट्टीचा वापर या प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब पुन्हा एकदा करण्याची आवश्यकता ‘सीडीसी’ने अधोरेखित केली आहे.


🔰करोना विषाणूचा डेल्टा हा उत्परिवर्तित प्रकार प्रथम भारतात आढळला आणि आता त्याचा फैलाव जगभरात झाल्याचे ‘सीडीसी’च्या अंतर्गत अहवालामध्ये म्हटले आहे. हा विषाणू कांजण्यांच्या विषाणूप्रमाणे वेगाने पसरतो. तसेच सर्दीच्या विषाणूपेक्षाही त्याचा प्रादुर्भाव वेगाने होतो, असेही ‘सीडीसी’ने नमूद केले आहे.


🔰‘इम्प्रुव्हिंग कम्युनिकेशन्स अराऊंड व्हॅक्सिन ब्रेकथ्रू अँड व्हॅक्सिन इफेक्टिव्हनेस’ या अहवालात ‘डेल्टा’च्या धोक्याबद्दल इशारा देण्यात आला आहे. डेल्टाचा सामना करण्यासाठी नव्या योजना आखाव्या लागणार आहेत. त्याचा धोका लोकांना समजून सांगावा लागणार आहे.

१५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर होणार ऑलिम्पिक खेळाडूंचा सत्कार; मोदींचे ‘खास पाहुणे’ म्हणून लावणार उपस्थिती.



🔰पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना भेटणार आहेत. या कार्यक्रमामध्ये ऑलिम्पिक स्पर्धेत १३० कोटी भारतीयांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या १२७ खेळाडूंचा सत्कार केला जाणार आहे.


🔰सवातंत्र्यदिनानिमित्त हे सर्व खेळाडू पंतप्रधान मोदींचे खास पाहुणे म्हणून या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. टोक्योमध्ये भारताचे १२७ खेळाडू १८ क्रीडा प्रकारांत सहभागी झालेत. लाल किल्ल्यावरील कार्यक्रमानंतर या खेळाडूंना पंतप्रधानांच्या निवासस्थानी आमंत्रित केलं जाणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.


🔰समोर आलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी प्रत्येक खेळाडूची भेट घेणार असून त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. “१५ ऑगस्टर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चमूतील सर्व खेळाडूंना लाल किल्ल्यावर विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करणार आहेत. ते प्रत्येक खेळाडूची भेट गेणार आहेत तसेच त्यांच्याशी चर्चा देखील करणार आहेत,” असं एएनआयने म्हटलं आहे.


🔰तसेच लाल किल्ल्यावरील सत्कार सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व खेळाडूंना त्यांच्या शासकीय निवासस्थानी आमंत्रित करणार आहे. या ठिकाणी ते खेळाडूंशी सविस्तर चर्चा करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

४१ वर्षांनी भारतीय हॉकी टीमनं घडवला इतिहास, कांस्यपदकावर कोरलं नाव.



🔰भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. भारतीय संघाने जर्मनीचा पराभव करत कांस्यपदक मिळवलं आहे. तब्बल ४१ वर्षांनंतर भारतीय संघाला हॉकीमध्ये पदक मिळालं आहे.


🔰अत्यंत चुरशीच्या अशा लढतीत भारतीय संघाने जर्मनीचा ५-४ ने पराभव केला. सुरुवातीला पराभवाच्या छायेत असणाऱ्या भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन केलं. भारताचा हा विजय हॉकीच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहिला जाईल असाच आहे.


🔰उपांत्य फेरीमधील निराशाजनक पराभव मागे टाकून ४१ वर्षांचा ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्याचा पराक्रम भारतीय पुरुष संघाने केला आहे. भारताने कांस्यपदकाच्या लढतीमध्ये बलाढय़ जर्मनीला पराभूत केलं. आठ ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱ्या भारताने १९८० च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये अखेरचे पदक जिंकले होते. परंतु बेल्जियमविरुद्धच्या चुका टाळून रिओ ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या जर्मनीला टक्कर देत भारताने पदकाचे स्वप्न ४१ वर्षांनंतर साकारले.

सर्वाधिक उंचीवरचा रस्ता भारतात बांधण्यात आला.



🔰सीमा रस्ते संघटनेने (BRO) भारतीय हद्दीत जगातील सर्वाधिक उंचीवरचा रस्ता बांधला आहे.


🔰पर्व लड्डाखमध्ये “उमलिंग ला पास” या ठिकाणी 19300 फूट उंचीवर हा रस्ता बनविण्यात आला आहे. 52 किलोमीटर लांबीचा हा रस्ता लडाखच्या चुमार सेक्टरच्या महत्वाच्या छोट्या छोट्या शहरांना जोडतो.


🔰याआधी जगात सर्वात उंचीवरचा रस्ता हा बोलिव्हिया देशामध्ये होता. तो रस्ता समुद्रसपाटीपासून 18,953 फूट एवढ्या उंचीवर आहे.


🔴सीमा रस्ते संघटना (BRO) विषयी..


🔰भारत सरकारची सीमा रस्ते संघटना (BRO) ही भारतीय सीमेलगतच्या भागात रस्त्यांचे जाळे उभारण्याचे काम करते. ही संस्था भारतीय लष्कराच्या भूदलाचा एक भाग असलेली संघटना आहे. तसेच लडाख, काश्मीर सारख्या दुर्गम भागात लष्करी दळणवळणासोबत सामान्यांच्या वापरासाठी ही संस्था रस्ते बनविते.

जर्मनी: सुधारित आंतरराष्ट्रीय सौर युती कार्यचौकट करारावर स्वाक्षरी करणारा पाचवा देश..



🔰5 ऑगस्ट 2021 रोजी, जर्मनी हा आंतरराष्ट्रीय सौर युती कार्यचौकट करार (ISF FA) यामधील दुरुस्ती 8 जानेवारी 2021 रोजी लागू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय सौर युती करारावर स्वाक्षरी करणारा पाचवा देश ठरला आहे.


🔴आतरराष्ट्रीय सौर युती विषयी..


🔰2015 साली स्वीकारण्यात आलेल्या पॅरिस हवामान कराराच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) हा सर्वसामन्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि फ्रांस यांच्याकडून सुरू करण्यात आलेला एक जागतिक पुढाकार आहे.


🔰गडगावमधील राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थान (NISE, गवलपहारी) येथे ISA चे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय आहे. ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय व आंतर-शासकीय संस्था आहे.


🔰पतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रांस राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस हॉलंड यांनी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी केली.


🔰आतरराष्ट्रीय सौर युती (ISA) हा सुरुवातीला केवळ 121 सदस्य देशांमधील सौर ऊर्जा प्रकल्पांना उभारण्यासाठी समन्वय साधणारा उपक्रम होता. आंतरराष्ट्रीय सौर युती कार्यचौकट करार (ISF FA) यामधील दुरुस्ती 8 जानेवारी 2021 रोजी लागू झाल्यापासून, आता आंतरराष्ट्रीय सौर युतीचा भाग बनण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्व सदस्य देशांसाठी हा करार खुला करण्यात आला आहे.

उडान योजनेच्या अंतर्गत 780 हवाई मार्गांना मान्यता..



🔰भारताला हवाई मार्गाने देशातील सर्व प्रदेशांशी जोडण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून उडान (UDAN) योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत 780 मार्गांना मान्यता देण्यात आली आहे. त्यापैकी 359 हवाई मार्ग वर्तमानात कार्यरत केले गेले आहेत.


🔴ठळक बाबी...


🔰कोविड महामारीच्या काळात, विमान कंपन्यांद्वारे मालाची हाताळणी 2 टक्क्यांवरून 19 टक्क्यांपर्यंत वाढली.

भारतात हवाई मालवाहतुक करणाऱ्या कंपन्यांची संख्या वाढविण्यात आली असून सध्या 28 संचालक कंपन्या मान्य करण्यात आल्या आहेत.

योजनेच्या अंतर्गत 59 नवीन विमानतळांची स्थापना करण्यात आली आहे.


🔴उडान (उडे देश का आम नागरिक) योजना..


🔰भारत सरकारची उडान (उडे देश का आम नागरिक) या नावाची प्रादेशिक जोडणी योजना (RCS) एप्रिल 2017 मध्ये सुरू करण्यात आली. भारतातील सामान्य नागरिकांना विमान प्रवास व्यापक आणि स्वस्त करण्याच्या उद्देशाने या योजनेची रचना करण्यात आली आहे.


🔰या योजनेच्या अंतर्गत पहिल्या फेरीत 5 हवाईसेवा कंपनींना 128 मार्गिका प्रदान करण्यात आल्या आहेत. योजनेच्या अंतर्गत निवडलेल्या विमान कंपन्यांना त्यांच्या एकूण प्रवासभाड्यापैकी 50 टक्के भाडे केंद्र आणि राज्य सरकाराकडून अनुदान किंवा व्यवहार्यता तूट निधीदान (VGF) स्वरुपात मिळण्याचे प्रस्तावित आहे.

नीरज चोप्रा



 🔷 खळ: ट्रॅक आणि फील्ड


 🔷EVENT: भाला फेकणे


 🔷 परशिक्षक:  Uwe Hohn



✔️ जन्म :- खांद्रा गाव, पानिपत जिल्हा, हरियाणा 


🟢 नीरज चोप्रा ची कामगिरी :- 


 🏆 सवर्णपदक - 2020 टोकियो ऑलिम्पिक


 🏆 सवर्णपदक - आशियाई खेळ 2018 जकार्ता, इंडोनेशिया


 🏆 सवर्ण पदक - राष्ट्रकुल खेळ 2018 गोल्ड कोस्ट, ऑस्ट्रेलिया


 🏆 सवर्णपदक - आशियाई चॅम्पियनशिप 2017 भुवनेश्वर, ओडिशा


 🏆 सवर्ण पदक - दक्षिण आशियाई खेळ 2016 गुवाहाटी/शिलाँग


 🏆 सवर्णपदक - वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप 2016 बायडगोस्झक, पोलंड


 💠 नीरज चोप्राला 2018 मध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.


 ☑️ नीरज चोप्राने पोर्तुगालमध्ये लिस्बन athalatics  संमेलनात पुरुषांच्या भालाफेकमध्ये सुवर्ण जिंकले.

पंजाबमध्ये सर्व शाळा सुरू.



पंजाबमध्ये सोमवारी सर्व वर्गाच्या शाळा काही महिन्यांच्या खंडानंतर पुन्हा सुरू झाल्या असून ग्रामीण भागात विद्यार्थ्यांची उपस्थिती जास्त होती. खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी होती. राज्य सरकारने शनिवारी २ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यास परवानगी दिली होती.   रुग्णांची संख्या कमी होत असल्याने करोना निर्बंध शिथिल केले होते.


करोनाबाबत सर्व प्रतिबंधात्मक उपायांचे पालन केले जाणार असून मुलांना शाळेत पाठवण्याबाबत पालकांकडून लेखी संमती घेतली जाणार आहे. शाळांची वेळ ही सकाळी ८ ते दुपारी २ अशी असणार आहे.  


सोमवारी राज्यातील सर्व शाळा सुरू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.पूर्व प्राथमिक शाळा व पहिली दुसरीचे वर्ग मार्च २०२० नंतर १० महिन्यांनी सुरू झाले आहेत. सर्व शाळा दोन ऑगस्टपासून सुरू करण्याच्या आदेशापूर्वी २६ जुलैला दहावी व बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. जी मुले शाळेत येऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ऑनलाईन वर्ग उपलब्ध असणार आहेत.


डॉक्टर्स व शिक्षण तज्ज्ञ यांच्या कोणत्या अहवालानुसार सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असा प्रश्न पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते व आप नेते हरपाल सिंह चिमा यांनी केला आहे.  राज्यात ६०.५ लाख विद्यार्थी असून एकूण २० टक्के लोकसंख्येचा जीव धोक्यात टाकला जात आहे असे त्यांनी सांगितले.

टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने एका सुवर्ण पदाकासह एकूण सात पदकं जिकली आहेत. त्यामुळे लंडन ऑलिम्पिकमधील पदकांचा विक्रम मोडला आहे.

 टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने एका सुवर्ण पदाकासह एकूण सात पदकं जिकली आहेत. त्यामुळे लंडन ऑलिम्पिकमधील पदकांचा विक्रम मोडला आहे.


२०१२ मध्ये लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सर्वात चांगली कामगिरी करत ६ पदकं जिंकली होती.


नीरज चोप्रा - सुवर्णपदक


टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्ण पदक पटकावत इतिहास रचला आहे. नीरजने पहिली फेक ८७.०३ मीटर, दुसरी फेक ८७.५८ मीटर, तिसरी फेक ७६.७९ मीटर लांब केली. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये नीरज आघाडीवर होता. सुवर्ण पदक मिळवून स्पर्धेचा शेवट गोड केला आहे.


मीराबाई चानू - रौप्यपदक


टोक्यो ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी भारताला पदक मिळाले. वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या ४९ किलो वजनी गटात भारताच्या मीराबाई चानूने देशाला पहिले पदक मिळून दिले.

भारतीय वेटलिफ्टिंगच्या इतिहासातील ऑलिम्पिकमधील हे भारताचे दुसरे पदक आहे. याआधी सिडनी ऑलिम्पिक (२०००) मध्ये भारताने यापूर्वी वेटलिफ्टिंगमध्ये पदक जिंकले होते.


पीव्ही सिंधू - कांस्यपदक


टोक्यो ऑलिम्पिकमध्ये दिमाखात वाटचाल करणाऱ्या पी. व्ही. सिंधूने कांस्यपदक नावावर करत इतिहास रचला आहे. कांस्यपदकाच्या लढतीत सिंधूने चीनच्या ही बिंग जिआओचा २१-१३, २१-१५ असा पाडाव केला.


या विजयासह, ती ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी पहिली भारतीय बॅडमिंटनपटू ठरली आहे. सिंधूने २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले.


लव्हलिना बोर्गोहेन - कांस्यपदक


टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदकनिश्चिती केलेल्या भारताची बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहाइन हिच्याकडून भारतीयांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, महिलांच्या ६९ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत लव्हलिनाला पराभवाचा सामना करावा लागला.


उपांत्य फेरीत लव्हलिनाचा जगज्जेत्या बुसेनाझ सुर्मीनेलीने पराभव केला. लव्हलिना तिन्ही फेऱ्यांमध्ये ०-५ ने पराभूत झाली. या पराभवामुळे लव्हलिनाला कांस्य पदकावरच समाधान मानावं लागलं आहे.


रवी दहिया - रौप्यपदक


टोक्यो ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू रवी दहियाने रौप्यपदकाची कामगिरी केली आहे. मात्र ५७ किलो वजनी गटामध्ये रवी कुमार दहियाला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

फायनलमध्ये रशियन ऑलिम्पिक कमिटीच्या जावूर युगुयेवशीने दहियाचा पराभव केला. युगुयेवने आपला सर्व अनुभव पणाला लावत सामना ७-४ ने जिंकला. त्यामुळे रवीला रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.


पुरुष हॉकी संघ - कांस्यपदक


तब्बल ४१ वर्षांनी भारतीय पुरुष हॉकी संघाने इतिहास रचत ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. भारताने बलाढ्य जर्मनीचा ५-४ ने पराभव केला.


बजरंग पुनिया - कांस्यपदक


टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकापासून वंचित राहिल्यानंतर भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाने आज फ्रीस्टाईल कुस्तीच्या ६५ किलो गटात कांस्यपदक पटकावले आहे. त्याने कझाकिस्तानचा पैलवान दौलत नियाजबेकोवचा एकतर्फी ८-० असा पराभव करत ऑलिम्पिक पदकावर नाव कोरल . 

सुवर्णपदक जिंकल्यानंतर ‘हा’ देश देतो सर्वाधिक पैसा, तीन देश करतात आयुष्यभर मदत.



🗿जगातील २००हून अधिक देशांचे खेळाडू टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भाग घेत आहेत. ११ हजार खेळाडू सुवर्णपदकासाठी लढत आहेत. अमेरिकेने ऑलिम्पिकच्या इतिहासात सर्वाधिक पदके जिंकली आहेत. सुवर्ण जिंकल्यावर अमेरिका खेळाडूंना सुमारे २८ लाख रुपये देईल. सिंगापूरसारख्या छोट्या देशात उपलब्ध असलेल्या बक्षिसाच्या रकमेपेक्षा ही रक्कम खूपच कमी आहे. तीन मोठे देश ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकलेल्या खेळाडूंना आजीवन मदत करतात. त्याचबरोबर युरोपमधील काही मोठे देश कोणत्याही प्रकारची बक्षीस रक्कम देत नाहीत.


🗿फोर्ब्सच्या बातमीनुसार, एस्टोनियामध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूला दरवर्षी सुमारे ४ लाख रुपये मिळतील. याशिवाय निवृत्तीवर अधिक भत्ता मिळतो. जर एखादा खेळाडू २९ वर्षात सुवर्ण जिंकतो आणि ७८ वर्षे जगतो, तर त्याला सुमारे २.२५ कोटी मिळतील. इंडोनेशिया आणि मलेशियामध्येही दरमहा भत्ता दिला जातो. ब्रिटन, न्यूझीलंड आणि स्वीडनमध्ये पदक जिंकण्यासाठी बक्षिसाची रक्कम दिली जात नाही. सुवर्णपदकांसाठी सर्वाधिक पैसे देणारे देश कोणते आहेत, ते जाणून घेऊया.


🗿सिंगापूर – सुवर्णपदक जिंकल्यावर जास्तीत जास्त बक्षीस रक्कम सिंगापूरमध्ये दिली जाईल. येथे सुवर्णपदक जिंकल्यावर तुम्हाला सुमारे ५.५० कोटी रुपये मिळतील. त्याचबरोबर रौप्यपदक विजेत्याला २.७५ कोटी तर कांस्यपदक मिळवणाऱ्याला १.३७ कोटी मिळतील. मात्र आतापर्यंत सिंगापूरला एकही पदक मिळालेले नाही. त्यांचे खेळाडू पुढील आठवड्यात महिलांच्या टेबल टेनिसमध्ये पदके जिंकू शकतात.

जलदगती विशेष न्यायालयांसाठीची योजना आणखी दोन वर्षे सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी..



🧩पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र-पुरस्कृत योजना म्हणून 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2023 पर्यंत 389 विशेष POCSO (Protection Of Children from Sexual Offences) न्यायालयांसह 1023 जलदगती विशेष न्यायालये सुरू ठेवण्यास मंजुरी देण्यात आली.


🧩तयासाठी 1572.86 कोटी रुपये (971.70 कोटी रुपये केंद्राचा वाटा आणि 601.16 कोटी रुपये राज्याचा वाटा) खर्च अपेक्षित आहे. निर्भया निधीमधून केंद्रीय सरकारचा वाटा देण्यात येईल.


☘️पार्श्वभूमी..


🧩महिला आणि बालकांची सुरक्षा आणि सुरक्षिततेला सरकारने नेहमीच सर्वोच्च महत्त्व दिले आहे. 12 वर्षांखालील मुलगी आणि 16 वर्षांखालील महिलांवर होणाऱ्या बलात्काराच्या घटनांमुळे संपूर्ण देशाच्या सद्सदविवेकबुद्धीला मोठा धक्का पोहोचला आहे. अशा प्रकारच्या घटना घडणे आणि त्यांचे खटले प्रदीर्घ काळ चालणे यामुळे असे खटले जलदगतीने चालवणारी आणि लैंगिक अत्याचार पीडितांना तातडीने दिलासा देणारी एक समर्पित यंत्रणा स्थापन करण्याची गरज निर्माण झाली होती.


🧩अधिक कठोर तरतुदी करण्यासाठी आणि अशा प्रकरणांचे खटले जलदगतीने चालावेत आणि त्यांचा तातडीने निपटारा व्हावा यासाठी केंद्रीय सरकारने “गुन्हेगारी (दुरुस्ती) कायदा-2018” लागू केला आणि बलात्कार करणाऱ्यांना मृत्युदंडासहित कठोर शिक्षांची तरतूद केली. त्यामुळे जलदगती विशेष न्यायालयांची स्थापना होऊ लागली.


☘️योजनेविषयी . 


🧩2 ऑक्टोबर 2019 रोजी जलदगती विशेष न्यायालय योजना सुरू करण्यात आली. जलदगती विशेष न्यायालये सहजतेने न्याय देणारी समर्पित न्यायालये आहेत. असहाय्य पीडितांना त्वरेने न्याय मिळवून देण्याबरोबरच लैंगिक अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांवर अंकुश ठेवणाऱ्या यंत्रणेला देखील ती बळकट करत आहेत.


🧩सध्या 28 राज्यांमध्ये व्याप्ती असलेल्या या योजनेचा विस्तार पात्र असलेल्या सर्व 31 राज्यांमध्ये करण्याचे प्रस्तावित आहे. देशातील दुर्गम भागासह सर्वत्र लैंगिक अत्याचार पीडितांना कालबद्ध पद्धतीने न्याय देण्याच्या राज्ये / केंद्रशासित प्रदेशांच्या सरकारांच्या प्रयत्नांना त्यामुळे पाठबळ मिळत आहे.

जर्मनी: सुधारित आंतरराष्ट्रीय सौर युती कार्यचौकट करारावर स्वाक्षरी करणारा पाचवा देश..



☑️5 ऑगस्ट 2021 रोजी, जर्मनी हा आंतरराष्ट्रीय सौर युती कार्यचौकट करार (ISF FA) यामधील दुरुस्ती 8 जानेवारी 2021 रोजी लागू झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय सौर युती करारावर स्वाक्षरी करणारा पाचवा देश ठरला आहे.


☄️आतरराष्ट्रीय सौर युती विषयी..


☑️2015 साली स्वीकारण्यात आलेल्या पॅरिस हवामान कराराच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) हा सर्वसामन्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि फ्रांस यांच्याकडून सुरू करण्यात आलेला एक जागतिक पुढाकार आहे.


☑️गडगावमधील राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्थान (NISE, गवलपहारी) येथे ISA चे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय आहे. ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय व आंतर-शासकीय संस्था आहे.


☑️पतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रांस राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस हॉलंड यांनी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी केली.


☑️आतरराष्ट्रीय सौर युती (ISA) हा सुरुवातीला केवळ 121 सदस्य देशांमधील सौर ऊर्जा प्रकल्पांना उभारण्यासाठी समन्वय साधणारा उपक्रम होता. आंतरराष्ट्रीय सौर युती कार्यचौकट करार (ISF FA) यामधील दुरुस्ती 8 जानेवारी 2021 रोजी लागू झाल्यापासून, आता आंतरराष्ट्रीय सौर युतीचा भाग बनण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्व सदस्य देशांसाठी हा करार खुला करण्यात आला आहे.

वांशिक भेदभावाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाचा “आफ्रिका वंश असलेल्या लोकांचा स्थायी मंच”..



👍सयुक्त राष्ट्रसंघ महासभेने (UNGA) वंशभेद, असहिष्णुता, परदेशांबददल वाटणारा तिरस्कार आणि वांशिक भेदभावाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तज्ञांचा सल्ला मिळवण्यासाठी एक मंच स्थापन करण्यासाठी एका ठरावाला 2 ऑगस्ट 2021 रोजी मान्यता दिली.


👍तया मंचाचे “आफ्रिका वंश असलेल्या लोकांचा स्थायी मंच” (Permanent Forum of People of African Descent) हे नाव असेल. ती 10 सदस्य असलेली एक सल्लागार संस्था असेल, जी जिनेव्हा मानवी हक्क परिषदेसोबत कार्य करेल. एकूण सदस्यांपैकी 5 जणांना सदस्य देशांच्या सरकारांनी नामांकन दिलेल्या व्यक्तींमधून निवडले जाणार तर इतर पाच जणांची नियुक्ती संयुक्त राष्ट्रसंघ मानवी हक्क परिषद करणार.


🔴सयुक्त राष्ट्रसंघ (UN) विषयी...


👍आतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) या आंतरसरकारी संघटनेची स्थापना दुसर्‍या महायुद्धानंतर 24 ऑक्टोबर 1945 रोजी करण्यात आली. त्याचे मुख्यालय मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका) येथे आहे.


👍1945 साली UN सनद (UNO च्या स्थापनेचे दस्तऐवज) प्रभावी येऊन दिनांक 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) अस्तित्वात आले. त्याला संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे (UNSC) पाच कायमस्वरूपी सदस्य - चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका - आणि इतर सदस्यांनी मान्यता दिली. आज संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य राष्ट्रांची संख्या 193 एवढी आहे.


👍सघटनेच्या उद्दिष्टांमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे, मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे, सामाजिक आणि आर्थिक विकासाचे वृद्धीकरण, पर्यावरणाचे संरक्षण आणि दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, आणि सशस्त्र संघर्ष अश्या घटनांमध्ये मानवतावादी मदत प्रदान करणे या बाबींचा समावेश आहे.

संयुक्त राष्ट्रसंघ महासभा (UNGA) हे संयुक्त राष्ट्रसंघामधील सहा प्रमुख अंगांपैकी एक आहे, ज्यामध्ये सर्व सदस्य राष्ट्रांना समान प्रतिनिधित्व बहाल केले गेले आहे आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्य धोरणात्मक, धोरणनिर्धारक आणि प्रतिनिधींचे अंग आहे.


👍सयुक्त राष्ट्रसंघाच्या सनदने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेला (UNSC) आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी सामूहिक कृती करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे आणि अधिकार दिला आहे.


👍सयुक्त राष्ट्रसंघाच्या 5 अधिकृत भाषा आहेत, त्या म्हणजे - अरबी, चीनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश.

संयुक्त राष्ट्रसंघाचे सहा प्रमुख स्तंभ पुढीलप्रमाणे आहेत -


👍सयुक्त राष्ट्रसंघ महासभा (General Assembly)

👍सयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषद (Security Council)

👍सयुक्त राष्ट्रसंघ आर्थिक आणि सामाजिक परिषद (Economic and Social Council / ­ECOSOC)

👍सयुक्त राष्ट्रसंघ सचिवालय

आंतरराष्ट्रीय न्यायालय (International Court of Justice)

👍सयुक्त राष्ट्रसंघ विश्वस्त परिषद (United Nations Trusteeship Council) (1994 सालापासून निष्क्रिय आहे).


🔴सयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रणालीमध्ये समाविष्ट असलेल्या संस्था पुढीलप्रमाणे आहेत -


👍जागतिक बँक समूह

जागतिक आरोग्य संघटना (WHO)

जागतिक अन्न कार्यक्रम (World Food Program)

संयुक्त राष्ट्रसंघ शिक्षण, वैज्ञानिक आणि सांस्कृतीक संघटना (United Nations Educational, Scientific and Cultural Organization / UNESCO)

संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (United Nations Children's Fund / UNICEF)

झिका विषाणूच्या स्थितीचे आकलन करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची चमू महाराष्ट्रात दाखल



🌼महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे ‘झिका’ विषाणूचा रुग्ण आढळून आला आहे. एका 50 वर्षीय महिलेला या विषाणूची लागण झाल्याचे राष्ट्रीय विषाणू संस्थेने केलेल्या तपासण्यांमध्ये निष्पन्न झाले आहे.


🌼या पार्श्वभूमीवर, झिका विषाणूच्या स्थितीचे आकलन करण्यासाठी आणि रोगाच्या व्यवस्थापनामध्ये राज्य सरकारला पाठिंबा देण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक चमू महाराष्ट्रात पाठवली आहे. या चमूत तीन सदस्य असून त्यात पुण्यातील प्रादेशिक संचालक कार्यालयातील सार्वजनिक आरोग्य तज्ञ, नवी दिल्लीतील लेडी हार्डिंग वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मलेरिया रिसर्च (ICMR-NIMR) या संस्थेचे कीटकशास्त्रज्ञ यांचा समावेश आहे.


🌼काही दिवसांपूर्वी केरळमध्ये झिका विषाणूचा संसर्ग झालेले 14 रुग्ण आढळून आले होते.


💢झिका विषाणूविषयी


🌼डग्यू आणि चिकनगुनिया या आजारांचे वाहक असलेल्या एडीस डासांमुळे झिका विषाणूचा संसर्ग पसरतो.


🌼झिका विषाणू संसर्गाची काही सामान्य लक्षणे - ताप, शरीर दुखणे, पुरळ, नेत्रश्लेष्मलाशोथ, स्नायू आणि सांधेदुखी, अस्वस्थता किंवा डोकेदुखी

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते लक्षणे साधारणपणे 2-7 दिवस टिकतात आणि संक्रमित बहुतेक लोकांना लक्षणे दिसत नाहीत.


🌼तीन महिन्यांच्या गरोदर महिलेस हा संसर्ग झाल्यास बाळामध्ये व्यंग येण्याची शक्यता असते. अश्या बाळांचे डोकं जन्माच्या वेळी नेहमीपेक्षा लहान असू शकते. यास्थितीला मायक्रोसेफली असे म्हणतात. त्यामुळे लहान मुलांच्या मेंदूवर परिणाम होतो. तसेच गुलियन-बॅरे सिंड्रोम नावाचा दुर्मिळ आजारही यामुळे पसरण्याची शक्यता असते.

आतापर्यंत या विषाणूवर ना कोणती लस उपलब्ध नाही, ना कोणते ठराविक औषध उपलब्ध आहे.

भारतातील 14 व्याघ्र प्रकल्पांना “जागतिक संवर्धन निश्चिती / व्याघ्र दर्जा (CA|TS)” याची मान्यता..



🐅वाघांचे उत्तमप्रकारे संरक्षण आणि संवर्धन केल्याबद्दल, देशातील 14 व्याघ्र प्रकल्पांना “जागतिक संवर्धन निश्चिती / व्याघ्र दर्जा (CA|TS)” (Global Conservation Assured | Tiger Standards) अशी मान्यता मिळाली आहे.


🐅मानस, काझीरंगा आणि ओरांग (आसाम)

🐅सातपुडा, कान्हा आणि पन्ना (मध्यप्रदेश)

🐅पच (महाराष्ट्र)

🐅वाल्मिकी व्याघ्र प्रकल्प (बिहार)

🐅दधवा (उत्तरप्रदेश)

🐅सदरबन (पश्चिम बंगाल)

🐅पारंबीकुलम (केरळ)

🐅बदिपूर व्याघ्र प्रकल्प (कर्नाटक)

🐅मदुमलाई आणि अन्नामलाई (तामीळनाडू)

🐅“जागतिक संवर्धन निश्चिती / व्याघ्र दर्जा

 

🌸(CA|TS)” विषयी...


🐅CA|TS या संज्ञा ‘मान्यता’ अथवा दर्जा निश्चित करण्यासाठीचे साधन म्हणून वापरण्यास ‘व्याघ्र अस्तित्व असलेल्या देशांच्या जागतिक संघटनेने (TRCs) मंजूरी दिली असून ते निकष व्याघ्र तसेच संरक्षित प्रदेशाच्या तज्ञांनी ठरवले आहेत.


🐅2013 साली या दर्जाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार, व्याघ्र प्रजाती (मार्जार कूळ) याच्या प्रभावी व्यवस्थापनासाठीचा किमान दर्जा निश्चित करण्यात आला आहे. तसेच, त्या संबंधित संवर्धन क्षेत्रात, हा दर्जा सांभाळला जातो आहे की नाही, याचे मूल्यांकन केले जाते. यामध्ये असे निकष आहे, ज्याअंतर्गत व्याघ्र प्रकल्पांमध्ये होणारे व्यवस्थापन संवर्धनासाठी पूरक आहे की नाही हे तपासले जाते.


🌸पार्श्वभूमी...


🐅दरवर्षी 29 जुलै या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस’ साजरा करतात. 2021 साली हा दिवस “त्यांचे अस्तित्व आपल्या हातात आहे” (Their Survival is in our hands) या संकल्पनेखाली पाळण्यात आला.

Filmfare Awards 2021


• सर्वोत्कृष्ट चित्रपट: थप्पड

• सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक:  ओम राऊत  (चित्रपट:-'तान्हाजी: द अनसंग हीरो')

• सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष): इरफान खान ( चित्रपट:- 'इंग्लिश मीडियम')

• सर्वोत्कृष्ट अभिनेता (महिला): तापसी पन्नू ( चित्रपट:-'थप्पड')

• सर्वोत्कृष्ट अभिनेता, सहायकअभिनेता (पुरुष): सैफ अली खान (चित्रपट- तान्हाजी: द अनसंग हीरो)

• सहाय्यक भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता (महिला): फारुख जाफर - ( चित्रपट:-गुलाबो सीताभो)

• सर्वोत्कृष्ट पदार्पण महिला: आलाया फर्निचरवाला - जवानी जानमन

•सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक: राजेश कृष्णन (चित्रपट- लूटकेस)

• सर्वोत्कृष्ट संगीत: प्रीतम (चित्रपट:-लुडो)

• सर्वोत्कृष्ट गायक (पुरुष): राघव चैतन्य  (चित्रपट:-एक तुकडा धूप - चापट)

• सर्वोत्कृष्ट गायक (महिला): असीस कौर - (चित्रपट:-मलंग 


● समीक्षक पुरस्कार:-

---------------------------------------------------

• सर्वोत्कृष्ट चित्रपट: ऐब आले ऊ

• सर्वोत्कृष्ट अभिनेता : अमिताभ बच्चन -  ( चित्रपट:-गुलाबो सीताबो)

• सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : तिलोटामा शोम (चित्रपट:- सर )


● फिल्मफेअर शॉर्ट फिल्म पुरस्कार:-

--------------------------------------------------

•सर्वोत्कृष्ट चित्रपट (पॉप्युलर चॉईस): देवी

• सर्वोत्कृष्ट चित्रपट (फिक्शन): अर्जुन

• सर्वोत्कृष्ट चित्रपट (नॉन-फिक्शन): बॅकयार्ड वाईल्ड लाईफ सेंचुरी

• सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : प्रुती सावर्दकर 

• सर्वोत्कृष्ट अभिनेता : अर्णव अब्दगिरे


● विशेष पुरस्कार:-

---------------------------------------------------

• आरडी बर्मन पुरस्कार: गुलजार

• लाइफटाइम अचिव्हमेंट अवॉर्ड: इरफान खान