Monday, 2 August 2021

अस्थाना यांची नियुक्ती ‘घटनाबाह्य’.



🔰राकेश अस्थाना यांची दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी झालेली नियुक्ती ही ‘घटनाबाह्य’ असल्याचा ठराव दिल्ली विधानसभेने गुरुवारी संमत केला. अस्थाना यांची नियुक्ती करण्याचा निर्णय आपल्या पक्षाच्या नेत्यांना ‘त्रास देण्यासाठी’ घेण्यात आला असल्याचा आरोप करून, सत्ताधारी आम आदमी पक्षाने या नियुक्तीवरून केंद्र सरकावर टीका केली.


🔰दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अल्पावधीच्या चर्चेद्वारे हा मुद्दा उपस्थित करताना; अस्थाना यांची नियुक्ती ‘घटनाबाह्य’ आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांविरुद्ध असल्याचे नमूद करणारा ठराव ‘आप’चे आमदार संजय झा यांनी मांडला.


🔰गजरात कॅडरच्या या वादग्रस्त अधिकाऱ्याला पोलीस आयुक्त म्हणून दिल्लीवर ‘थोपवण्यात’ आल्याबाबत या ठरावात नापसंती व्यक्त करण्यात आली. केंद्र सरकारने मंगळवारी अस्थाना यांची दिल्लीचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली आणि निवृत्तीपूर्वी या पदावर त्यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली.

कोव्हॅक्सिन’ आयातीच्या निर्णयाला ब्राझीलची स्थगिती.



🔰भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या करोना प्रतिबंधक लशीच्या प्रस्तावित नैदानिक चाचण्या आणि तिच्या आपत्कालीन वापराच्या परवानगीची विनंती स्थगित केल्यानंतर या लशीच्या ४० लाख मात्रा देशात आयात करण्याचा निर्णयही ब्राझीलने स्थगित केला आहे.


🔰बराझिलियन भागीदारांसोबतचा करार संपवल्याचे भारत बायोटेकने त्या देशाच्या सरकारला कळवल्यानंतर, कोव्हॅक्सिनची आयात आणि वितरण यांसाठी दिलेली तात्पुरती अधिकृत परवानगी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे नॅशनल हेल्थ सव्‍‌र्हेलन्स एजन्सी ऑफ ब्राझीलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.


🔰बराझीलच्या प्रेसिसा मेडिकॅमेंटोस आणि एनव्हिक्झिया फार्मास्युटिकल्स एलएलसीशी केलेला करार आपण संपुष्टात आणला असल्याचे भारत बायोटेकने २३ जुलैला सांगितले होते.

राज्याच्या २५ जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होणार! आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा.



🔰राज्यातील करोनाच्या रुग्णांची कमी होणारी संख्या लक्षात घेता ज्या ठिकाणी रुग्णसंख्येचं प्रमाण घटत आहे, त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात यावेत, अशी मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाच्या झालेल्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.


🔰यानुसार, राज्यातल्या २५ जिल्ह्यांमधले निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. तर उर्वरीत ११ जिल्ह्यांमध्ये कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाहीत. या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढली किंवा परिस्थिती बिघडली, तर स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून तेथील निर्बंध वाढण्यात येतील, असं देखील राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. यासंदर्भात अंतिम प्रस्ताव सहीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवण्यात आला असून मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर त्यावर येत्या १ ते २ दिवसांमध्ये जीआर निघेल असं देखील ते म्हणाले.


🔰कोणत्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल होणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितल्यानुसार, राज्यातील २५ जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये सध्या तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू आहेत. त्यामध्ये शिथिलता दिली जाईल, असं ते म्हणाले.

चांद्रयान ३ मोहीम २०२२ मध्ये तिसऱ्या तिमाहीत - जितेंद्र सिंह.



🔰चांद्रयान ३ मोहीम २०२२ मध्ये तिसऱ्या तिमाहीत होईल, असे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत सांगितले. करोना साथीमुळे या मोहिमेची गती मंदावली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.


🔰लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात अवकाश खात्याचे राज्यमंत्री असलेल्या सिंह यांनी म्हटले आहे की, चांद्रयान ३ मोहिमेचे वेळापत्रक बदलावे लागत आहे. चांद्रयान ३ मोहिमेत अनेक प्रक्रिया असून त्यात अनेक उपप्रणाली, त्यांची जोडणी व तपासणी असे अनेक मुद्दे आहेत. या प्रकल्पाची प्रक्रिया करोनामुळे लांबली असून घरून जे काम करता येणे शक्य आहे तेवढे टाळेबंदीच्या काळात पूर्ण झाले आहे.


🔰चांद्रयान ३ मोहीम अमलात आणण्यासाठी टाळेबंदी उठल्यानंतर पुन्हा काम सुरू होईल व ही मोहीम तरीही प्रगतिपथावर आहे. यापूर्वी भारताने २२ जुलै २०१९ रोजी चांद्रयान २ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सोडले होते. जिथे कुठल्याही देशाने तोपर्यंत यान पाठवले नव्हते. भारताच्या शक्तिशाली प्रक्षेपकाच्या मदतीने ते यान सोडण्यात आले होते. त्या वेळी ७ सप्टेंबर २०१९ रोजी विक्रम या लँडरचे आघाती अवतरण झाल्याने भारताला चंद्रावर गाडी उतरवण्यात अपयश आले होते.


🔰अन्यथा पहिल्याच प्रयत्नात गाडी तेथे उतरवणारा भारत हा पहिला देश ठरला असता. चांद्रयान ३ मोहीम भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोसाठी महत्त्वाची असून त्यात आंतरग्रहीय मोहिमांमध्ये भारताच्या कामगिरीस बळ मिळणार आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी बोम्मई यांचा शपथविधी



🔰कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी बसवराज बोम्मई यांचा शपथविधी बुधवारी येथे झाला असून तेथील राजकीय अस्थिरतेला तूर्त पूर्णविराम मिळाला आहे. येडियुरप्पा पक्षाच्या आदेशानुसार पायउतार झाल्यानंतर बोम्मई यांच्या नावाची घोषणा भाजपच्या केंद्रातील वरिष्ठ नेत्यांनी केली होती. त्यानुसार बोम्मई यांनी बुधवारी मंत्रिपदाची शपथ घेतली.


🔰कर्नाटक भाजप विधिमंडळ पक्षाच्या आमदारांनी मंगळवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत बोम्मई यांची नेतेपदी निवड केली होती. बोम्मई हे उत्तर कर्नाटकातील लिंगायत नेते असून येडियुरप्पा यांचे विश्वासू मानले जातात, त्यामुळे यापुढेही कर्नाटकच्या राजकारणावर येडियुरप्पा यांचा प्रभाव राहील असे सांगण्यात येते. बोम्मई हे माजी मुख्यमंत्री दिवंगत एस.आर बोम्मई यांचे पुत्र असून येडियुरप्पा यांच्या मंत्रिमंडळात ते गृह कामकाज, कायदा, विधिमंडळ कामकाज या खात्याचे मंत्री होते. आता येडियुरप्पा यांचे मंत्रिमंडळ विसर्जित झाले असून बोम्मई यांच्या नेतृत्वाखाली नवे मंत्रिमंडळ सत्तारुढ होत आहे.


🔰कर्नाटकात पिता-पुत्र जोडीने मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी एच.डी. देवेगौडा तसेच एच.डी. कुमार स्वामी या पिता-पुत्रांनी मुख्यमंत्री पद सांभाळले होते. बोम्मई हे तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. हावेरी जिल्ह्य़ातील शिगाव मतदार संघाचे प्रतिनिधित्व ते करतात.

राकेश अस्थाना दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त



🔰गुजरात कॅडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना यांनी बुधवारी दिल्लीच्या पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला.


🔰अस्थाना हे येथील जयसिंह मार्गावरील दिल्ली पोलीस मुख्यालयात पोहोचले, त्या वेळी त्यांना पोलीस दलातर्फे मानवंदना देण्यात आली.


🔰‘दिल्ली पोलीस आयुक्त म्हणून मी आज पदभार स्वीकारला. कायदा व सुव्यवस्था राखणे आणि गुन्हे रोखणे या पोलीस सेवेच्या प्राथमिक संकल्पनांवर माझा विश्वास असून आम्ही त्याच करणे अपेक्षित आहे. या गोष्टी योग्य रीतीने करण्यात आल्यास समाजात शांतता नांदेल’, असे अस्थाना यांनी पत्रकारांना सांगितले.


🔰सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक म्हणून काम पाहणारे राकेश अस्थाना हे तत्काळ प्रभावाने दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी रुजू होतील, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने मंगळवारी जारी केलेल्या आदेशात सांगितले. अस्थाना हे ३१ जुलैला निवृत्त होणार असताना काही दिवसांपूर्वी ही नियुक्ती करण्यात आली. त्यांचा कार्यकाळ १ वर्षांचा राहणार आहे.

आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस: 29 जुलै


🔰दरवर्षी 29 जुलै या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस’ साजरा करतात. 2021 साली हा दिवस “त्यांचे अस्तित्व आपल्या हातात आहे” (Their Survival is in our hands) या संकल्पनेखाली पाळण्यात आला.


🔰यानिमित्ताने व्याघ्र संवर्धनाविषयी जनजागृती करण्यासाठी जगभरात अनेक उपक्रम राबवले जातात.


⭕️काही ठळक बाबी


🔰भारत जगातल्या 70 टक्के वाघांचे निवासस्थान आहे. भारत 18 राज्यांत पसरलेल्या 51 व्याघ्र राखीव क्षेत्रांची भूमी आहे. 2018 साली झालेल्या व्याघ्र गणनेत वाघांच्या संख्येत वाढ झाल्याचे आढळले आहे. भारताने व्याघ्र संवर्धनाबाबत सेंट पिट्सबर्ग घोषणापत्रानुसार, निश्चित करण्यात आलेले उद्दिष्ट चार वर्षे आधीच पूर्ण केले आहे.

जगभरात, मुख्यत: आशिया खंडात, वाघांच्या केवळ काही हजार प्रजाती आढळून येतात. फक्त शंभर वर्षांत जगभरातून 90 टक्के वन्य वाघ लोप पावले आहेत. आता जवळपास 3,000 पेक्षा जास्त वाघ जंगलांत राहतात आणि बर्‍याच वाघांच्या प्रजाती आधीच नामशेष झालेल्या आहेत. 


🔰अनेक देशात खिताब आणि औषधी उद्देशाने वाघाच्या शारीरिक अवयवांची मागणी वाढली असल्याने त्यांची तस्करी केली जाते.

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) दुरुस्ती विधेयक-2021” याला मंजूरी..



🔰“बाल न्याय कायदा-2015” यामध्ये दुरुस्ती सुचवणारे “बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) दुरुस्ती विधेयक-2021” 28 जुलै 2021 रोजी राज्यसभेत मंजूर झाले. विधेयक लोकसभेत मंजूर झाले आहे.


🔴विधेयकातील दुरुस्ती...


🔰परकरणांचा त्वरित निपटारा करण्यासाठी आणि जबाबदारी वृद्धिंगत करण्यासाठी या सुधारणांमध्ये अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांसह जिल्हाधिकाऱ्याना बाल न्याय कायद्याच्या कलम 61 अंतर्गत दत्तक आदेश जारी करण्यास अधिकृत मान्यता समाविष्ट आहे. याची अंमलबजावणी सुरळीत पार पाडण्यासाठी तसेच कठीण परिस्थितीत मुलांच्या बाजूने प्रयत्न करण्यासाठी जिल्हा दंडाधिकाऱ्यांना कायद्याअंतर्गत अधिक अधिकार देण्यात आले आहेत.


🔰कायद्याच्या सुधारित तरतुदींनुसार कोणत्याही बाल-देखभाल संस्थेची नोंदणी जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या शिफारसींचा विचार करून केली जाईल. जिल्हा दंडाधिकारी स्वतंत्रपणे जिल्हा बाल संरक्षण विभाग, बालकल्याण समित्या, बाल न्याय मंडळे, विशेष बालकांसाठी पोलिस विभाग, बाल देखभाल संस्था इत्यादींच्या कार्याचे मूल्यांकन करतील.

समाजसुधारक व त्यांचे जन्मस्थळ


🌷 डॉ. बाबासाहेब आंबेडकर- महू (मध्यप्रदेश)


🌷 राजर्षी शाहू महाराज- कोल्हापूर


🌷 नाना शंकरशेठ- मुरबाड (ठाणे)


🌷 कर्मवीर भाऊराव पाटील- कुंभोज(कोल्हापूर)


🌷 बाळशास्त्री जांभेकर- पोंभुर्ले (रत्नागिरी)


🌷 महात्मा फुले- पुणे


🌷 महर्षी धोंडो केशव कर्वे- शेरवली (रत्नागिरी)


🌷 गोपाळ गणेश आगरकर- टेंभू (सातारा)


🌷 गोपाळ हरी देशमुख- पुणे


🌷 नया. महादेव गोविंद रानडे- निफाड (नाशिक)


🌷 सयाजीराव गायकवाड- कवळाणे (नाशिक)


🌷 बाळ गंगाधर टिळक- (रत्नागिरी)


🌷 आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके-

शिरढोण (रायगड)


🌷 आचार्य विनोबा भावे- गागोदे (रायगड)


🌷 सवा. विनायक दामोदर सावरकर- भगूर (नाशिक)


🌷 सावित्रीबाई फुले- नायगांव (सातारा)


🌷 विठ्ठल रामजी शिंदे- जमखिंडी (कर्नाटक राज्य)


🌷 गोपाळ कृष्ण गोखले- कातलुक (रत्नागिरी)


🌷 विष्णू भिकाजी गोखले- बावधन (सातारा)


🌷 डॉ. पंजाबराव देशमुख- पापळ (अमरावती)


🌷 साने गुरुजी- पालघर (रायगड)


🌷 सत गाडगेबाबा- शेणगांव (अमरावती)


🌷 सनापती बापट- पारनेर (अहमदनगर)


🌷 सत ज्ञानेश्वर- आपेगाव


🌷 सत एकनाथ- पैठण-


🌷 समर्थ रामदास स्वामी- जांब (जालना )

आत्तापर्यंतचे महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी



१९९६  पु. ल. देशपांडे : साहित्य


१९९७  लता मंगेशकर : कला, संगीत


१९९९  विजय भटकर : विज्ञान


२०००  सुनील गावसकर  : क्रीडा


२००१  सचिन तेंडुलकर : क्रीडा


२००२   भीमसेन जोशी : कला,संगीत 


२००३   अभय बंग आणि राणी बंग  : समाजसेवा व आरोग्यसेवा


२००४  बाबा आमटे : समाज सेवा


२००५  रघुनाथ अनंत माशेलकर  : विज्ञान


२००६  रतन टाटा  : उद्योग


२००७   रा.कृ. पाटील : समाज सेवा


२००८   नानासाहेब धर्माधिकारी : समाज सेवा


२००८   मंगेश पाडगावकर : साहित्य


२००९   सुलोचना लाटकर : कला, सिनेमा


२०१०   जयंत नारळीकर : विज्ञान


२०११  अनिल काकोडकर : विज्ञान


२०१५  बाबासाहेब पुरंदरे : इतिहासलेखन


२०१९  राम सुतार : शिल्पकला


२०२०  आशा भोसले : गायन


ऑस्ट्रेलियाच्या एम्मा मॅकेन यांनी टोकियो ऑलिंपिकमध्ये ०७ पदके जिंकली आहेत



📌 एम्मा मॅकेन टोकियो ऑलिंपिकमध्ये ०४ सुवर्ण व ०३ कांस्य पदकांची कमाई केली आहे


👩‍🦰 अशी कामगिरी करणाऱ्या पहिल्या जलतरणपटू व २ऱ्या महिला खेळाडू ठरल्या आहेत


🤸‍♀️ यापुर्वी १९५२ मध्ये सोविएत युनियनच्या 

जिम्नॅस्ट मारीया यांनी ०७ पदके जिंकली होती


🏅 एम्मा मॅकेन यांनी २०१६ रिओ ऑलिंपिकमध्ये ०४ पदके जिंकली होती (🥇१🥈२🥉१)


🏅 तया ऑलिंपिकमध्ये ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक 

११ पदके जिंकणाऱ्या खेळाडू ठरल्या आहेत


🥇 एका ऑलिंपिकमध्ये सर्वाधिक ०८ पदके जिंकण्याचा (सर्व सुवर्ण) विक्रम : मायकेल फेल्प्स


📌 २००८ बिजिंग ऑलिंपिकमध्ये अमेरिकेच्या मायकल फेल्प्सने ०८ सुवर्ण पदके जिंकली होती


Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...