Saturday, 24 July 2021

फ्रान्सवरून आणखी तीन राफेल विमानं भारतात दाखल.



🔰राफेल लढाऊ विमानांच्या सातव्या खेपेत आज आणखी तीन विमानं फ्रान्सवरून थेट भारतात दाखल झाली आहेत. जवळपास ८ हजार किलोमीटरचा प्रवास करून ही विमानं भारतात आली आहेत. या विमानांचा भारतीय वायूसेनेच्या राफेल विमानांच्या दुसऱ्या स्क्वाड्रनमध्ये समावेश केला जाणार आहे.


🔰भारतीय वायू सेनेने ही तीन विमानं भारतात दाखल झाल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे. या विमानांच्या प्रवासा दरम्यान हवाई मार्गात यूएईने त्यांना इंधन उपलब्ध करून दिलं. याबद्दल भारतीय वायू सेनेकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.


🔰फरान्सच्या इस्त्रेस एअर बेसवरून उड्डाण घेऊन न थांबता तीन राफेल विमानं काही वेळापूर्वीच भारतात पोहचली. हवाई मार्गात मदत पुरवल्या बद्दल यूएई वायू सेनेला भारतीय वायू सेना धन्यवाद देते. असं ट्विट वायू सेनेकडून ट्विट करण्यात आलं आहे.


🔰राफेल विमानांची ही खेप भारतात पोहचल्यानंतर आता भारताकडे २४ राफेल विमानं झाली आहेत. राफेल जेटची नवीन स्क्वाड्रन पश्चिम बंगालच्या हासीमारा एअर बेसवर असेल. पहिली राफेल स्क्वाड्रन अंबाला वायू सेना स्टेश

चक दे इंडिया..! मेरी कोम आणि मनप्रीतनं केलं भारतीय पथकाचं नेतृत्व.



🔰जपानची राजधानी टोकियो येथे आजपासून ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली आहे. करोनाव्हायरस साथीच्या आजारामुळे ऑलिम्पिक स्पर्धा एक वर्षासाठी तहकूब करण्यात आल्या. पण एका वर्षानंतर या स्पर्धा खेळल्या जात आहेत.


🔰आज या स्पर्धेचा उद्धाटन सोहळा अतिशय दिमाखात रंगला. टोकियो ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्याच्या मार्चपास्टमध्ये भारतीय तुकडी २१ व्या क्रमांकावर उतरली. यात २२ खेळाडू आणि ६ अधिकारी सहभागी झाले. या मार्चपास्टमध्ये ग्रीकचा पहिला क्रमांक होता.


🔰सहा वेळा विश्वविजेती बॉक्सर एम.सी. मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग यांनी उद्घाटन सोहळ्यात भारतीय पथकाचे नेतृत्व केले. भारतीय पथकाच्या प्रवेशावेळी पंतप्रधान मोदींनी टाळ्या वाजवून संघाला प्रोत्साहन दिले. १२७ खेळाडूंसह २२८ सदस्यीय पथक टोकियो ऑलिम्पिकमध्ये पाठवण्यात आले आहे.

ग्वाल्हेर आणि ओरछा या शहरांचा UNESCO संस्थेच्या 'हिस्टॉरिकल अर्बन लँडस्केप प्रोजेक्ट' अंतर्गत समावेश



🌹21 जुलै 2021 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेच्या (UNESCO) 'हिस्टॉरिकल अर्बन लँडस्केप प्रोजेक्ट' अंतर्गत मध्यप्रदेशातील ग्वाल्हेर (किंवा ग्वालियर) आणि ओरछा या ऐतिहासिक शहरांमध्ये विकास कार्यांचे उद्घाटन झाले.


🌹परकल्पाच्या अंतर्गत चालणारी कार्ये UNESCO संस्थेच्या मार्गदर्शनाखाली भारत सरकार आणि मध्य प्रदेश सरकार संयुक्तपणे चालविणार आहेत.


प्रकल्पाविषयी


🌹सस्कृती आणि वारसा जपताना वेगाने वाढणाऱ्या ऐतिहासिक शहरांच्या समावेशक व सुनियोजित विकासासाठी 'हिस्टॉरिकल अर्बन लँडस्केप प्रोजेक्ट' या अंतराष्ट्रीय प्रकल्पाचा 10 नोव्हेंबर 2011 रोजी प्रारंभ करण्यात आला आहे.


🌹'हिस्टॉरिकल अर्बन लँडस्केप' दृष्टिकोन मानवी, सामाजिक आणि आर्थिक विकासासाठी मुख्य संपदा म्हणून सांस्कृतिक विविधता आणि सर्जनशीलता लक्षात घेतो आणि भौतिक व सामाजिक परिवर्तनांचे व्यवस्थापन करण्यासाठी साधने प्रदान करतो.


🌹वर्तमानात, UNESCO संस्थेच्या 'हिस्टॉरिकल अर्बन लँडस्केप प्रोजेक्ट' अंतर्गत दक्षिण आशियातील 8 शहरांची निवड केली गेली आहे. 


🌹तयात अजमेर (राजस्थान), वाराणसी (उत्तर प्रदेश), ग्वाल्हेर आणि ओरछा (मध्य प्रदेश) या चार भारतीय शहरांचा समावेश आहे.

अत्यावश्यक संरक्षण सेवा विधेयक-2021



🎗22 जुलै 2021 रोजी लोकसभेत.‘अत्यावश्यक संरक्षण सेवा विधेयक-2021’ चर्चेसाठी मांडण्यात आले.


🎲ठळक बाबी...


🎗दशभरातील सर्व सरकारच्या मालकीच्या आयुध निर्मिती कारखान्यांतील कर्मचाऱ्यांना संपावर जाण्यापासून रोखण्यासाठी या विधेयकाची रचना केली गेली आहे.


🎗विधेयकात असे म्हटले गेले आहे की, निर्बाध पुरवठा, संरक्षणाबाबत सज्जता ही अत्यंत महत्वाची बाब आहे आणि म्हणूनच कर्मचार्‍यांचा संप किंवा कोणत्याही अडथळाविना कारखान्यांची कार्ये सतत चालू ठेवावे.


🎗जन 2021 महिन्यात, केंद्रीय मंत्रिमंडळाने आयुध निर्मिती कारखाने मंडळाला औद्योगिक कंपनीचे स्वरूप देण्याच्या योजनेला मान्यता दिली. योजनेनुसार, देशातील 41 आयुध निर्मिती कारखान्यांचे विलीनीकरण करून 7 नवीन संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (DPSU) तयार केले जातील. त्यांचे 100 टक्के स्वामित्व भारत सरकारकडे असेल.

'रॅमन मॅग्सेसे पुरस्कार'



🔰 पुरस्काराची सुरुवात :- एप्रिल 1957.


🔰 'रॅमन मॅग्सेसे' हे आशियाचे नोबेल पारितोषिक म्हणूनही ओळखले जाते.


🔰 हा पुरस्कार फिलिपिन्सचे माजी अध्यक्ष रॅमन मॅग्सेसे यांच्या स्मरणार्थ देण्यात येतो.


🔰 2009 पासून ह पुरस्कार खालील सहा प्रकारात दिला जातो.


1. Government services (GS)

2. Public services (PS)

3. Community leadership(CL)

4. Journalism, literature & creative communication arts (JLCCA)

5. Peace and International Understanding (PIU)

6. Emergent leadership (EL)


🔰 जर्नलिज्म, लिट्रेचर और क्रिएटिव कम्युनिकेशन आर्ट्स कैटेगरी मध्ये  'रॅमन मॅग्सेसे पुरस्कार' भेटलेले भारतीय व्यक्ती :-


🔸 2019 - रवीश कुमार

🔹 2007 - पालगुम्मी साईनाथ

🔸 1997 - महेश्वेता देवी

🔹 1992 - रवि शंकर

🔸 1991- के वी सुबबना

🔹 1984 - राशीपुरम लक्ष्मण

🔸 1982 - अरुण शौरी

🔹 1981 - गौर किशोर घोष

🔸 1975 - बूबली जॉर्ज वर्गीस

🔹 1967 - सत्यजित राय

🔸 1961 - अमिताभ चौधरी

 

🔹 'रॅमन मॅग्सेसे पुरस्कार' मिळवणारे पाहिले भारतीय. :- विनोबा भावे

🔸 'रॅमन मॅग्सेसे पुरस्कार' मिळवणारी पाहिली भारतीय महिला. :- मदर टेरेसा

🔹 'रॅमन मॅग्सेसे पुरस्कार' मिळवणारे पाहिले भारतीय पत्रकार. :- अमिताभ चौधरी

सोमवारनंतर पायउतार होण्याचे येडियुरप्पांचे संकेत


🔰कर्नाटकमध्ये नेतृत्वबदल होणार असल्याच्या अनेक आठवड्यांच्या अटकळींनंतर, २६ जुलैनंतर पायउतार होण्याचे संकेत मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी गुरुवारी दिले.


🔰‘पुढील घडामोडीबाबत मला २५ जुलैनंतरच कळेल आणि पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाचे मी पालन करीन. पक्ष बळकट करण्यासाठी आपण कर्नाटकात पक्षाला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी मी काम करीन,’ असे मुख्यमंत्रिपदाच्या बाबतीत आतापर्यंत ठाम राहिलेले येडियुरप्पा यांनी बेंगळूरुत पत्रकारांना सांगितले.


🔰यापूर्वी ठरलेल्या कार्यक्रमानुसार, मुख्यमंत्री २६ जुलैला विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला हजर राहणार होते आणि त्याच्या आदल्या दिवशी, २५ जुलैला आमदारांसाठी स्नेहभोजन आयोजित करणार होते, मात्र आता या कार्यक्रमांत बदल करण्यात आला आहे.


🔰यडियुरप्पा यांचे सरकार २६ जुलैला दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, त्या दिवशी ते राजीनामा देऊ शकतात अशा अटकळी होत्या. असे झाल्यास भाजपच्या आणखी एका मुख्यमंत्र्याला दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा होईल.

मंगळवार व बुधवारी निरनिराळ्या मठांच्या साधूंनी येडियुरप्पा यांची त्यांच्या सरकारी निवासस्थानी भेट घेऊन त्यांना त्यांचा उर्वरित कार्यकाळ पूर्ण करण्याचे आवाहन केले.


🔰यडियुरप्पा यांना हटवण्याबाबत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या कुठल्याही हालचालीविरुद्ध त्यांचे समर्थक उघडपणे बोलू लागल्यानंतर, येडियुरप्पा यांनी बुधवारी पक्षाबाबत आपली निष्ठा पुन्हा व्यक्त करण्यासाठी बुधवारी ट्विटरवर एक निवेदन जारी केले. पक्षाला अडचणीचा ठरेल असा कुठलाही विरोध किंवा बेशिस्त कुणीही दर्शवू नये असे आवाहन मी करतो, असे त्यांनी यात सांगितले.

पेगॅसस प्रकरणामुळे फ्रान्सच्या राष्ट्रध्यक्षांनी घेतला मोठा निर्णय



💢सध्या संपूर्ण जगभरात पेगॅसस प्रकरणावरुन खळबळ उडाली आहे. इस्राायलच्या ‘एनएसओ’ संस्थेने तयार केलेल्या पेगॅसस या स्पायवेअरचा वापर करत जगातील एकूण १२ राष्ट्रपमुखांवर पाळत ठेवण्यात आल्याचं समोर आलं आहे. 


💢याशिवाय काही माजी पंतप्रधान आणि एका राजाचाही समावेश आहे. राष्ट्राध्यक्षांच्या यादीत फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांचाही समावेश आहे. एनएसओ समूहाने तयार केलेले हे स्पायवेअर संबंधित व्यक्तीच्या मोबाइलमधील संभाषण, संदेश व इतर सगळी माहिती उघड करत असते.


💢दरम्यान पेगॅसस प्रकरणामुळे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी मोठा निर्णय घेतला आहे. इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी आपला मोबाइल आणि मोबाइल क्रमांक बदलला आहे. इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. पेगॅसस प्रकरणविरोधात फ्रान्स सरकारकडून घेण्यात आलेला हा पहिला मोठा निर्णय आहे.


💢"त्यांच्याकडे अनेक मोबाइल नंबर आहेत. याचा अर्थ त्यांच्यावर पाळत ठेवली नाही असा नाही. हा फक्त अतिरिक्त सुरक्षेचा भाग आहे," असं अधिकाऱ्यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितलं आहे. 


💢सरकारचे प्रवक्ते गॅब्रियल यांनी पेगॅसस प्रकरण उजेडात आल्यानंतर राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात असल्याचं म्हटलं आहे.

मॅक्रॉन यांच्यासह १४ जणांचे मोबाइल फोन हॅक करण्यात आले होते. अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलचे सरचिटणीस अ‍ॅग्नेस कॉलामार्ड यांनी सांगितले, की ही अतिशय धक्कादायक बाब असून त्यामुळे जागतिक नेत्यांना धक्का बसला आहे. पन्नास हजार फोनमधील माहिती या स्पायवेअरच्या मदतीने उघड करण्यात आली आहे. 


💢परिस येथील ‘फॉरबिडन स्टोरीज’ या संस्थेने हा प्रकार उघडकीस आणला असून त्यांनी म्हटले आहे, की दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरील रामफोसा, इराकचे बरहाम सलिह, मोरोक्कोचे राजे महंमद-सहावे, पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान, इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मदबोली, मोरोक्कोचे पंतप्रधान साद एडिन ओथमानी यांचाही यादीत समावेश आहे, असे ‘दी वॉशिंग्टन पोस्ट’ने म्हटले आहे. या राष्ट्रप्रमुखांनी त्यांचे मोबाइल फोन तपासणीसाठी दिलेले नाहीत.


💢पगॅसस अशा पद्धतीने फोन हॅक करतं की वापरणाऱ्यालाही ते कळत नाही. हॅकरला एकदा जो फोन हॅक करायचा आहे त्याची माहिती मिळाली की त्याला एका वेबसाईटची लिंक पाठली जातो. जर युजरने त्या लिंकवर क्लिक केलं तर मोबाइलमध्ये पेगॅसस इन्स्टॉल होतं. ऑडिओ कॉल्स तसंच व्हॉट्सअॅपसारख्या अॅपमधील सुरक्षेच्या त्रुटींमधूनही हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल होतं. पेगॅससची पद्धत इतकी गुप्त आहे की, युजरला मिस कॉल देऊनही हॅकिंग केलं जाऊ शकतं. 


💢सॉफ्टवेअर इन्स्टॉल झाल्यानंतर तुमच्या मोबाइलमधील आलेल्या फोन क्रमाकांची यादीही ते डिलीट करु शकतात. यामुळे युजरला मिस कॉल आल्याचीही माहिती मिळत नाही.

एकदा पेगॅससने तुमच्या मोबाइलमध्ये शिरकाव केला की ते सतत पाळत ठेवू शकतं.


💢 वहॉट्सअॅपसारख्या अॅपमधून करण्यात आलेले चॅटही ते पाहू शकतात. सुरक्षा तज्ज्ञांनुसार, पेगॅसस मेसेज वाचू शकतं तसंत कॉलही ट्रॅक करु शकतं. याशिवाय अॅप्सचा वापर, त्यात होणाऱ्या घडामोडी, लोकेशन डेटा, व्हिडीओ कॅमेराचा ताबा मिळवणे, मायक्रोफोनच्या सहाय्याने संभाषण ऐकणं या गोष्टीही शक्य आहेत.


💢दहशतवादावर नियंत्रणासाठी वापर करत असल्याचा कंपनीचा दावा

हे स्पायवेअर फक्त सरकारी एजन्सीना विकण्यात आलं आहे. त्याचा उद्देश केवळ दहशतवादाविरोधात लढणे हाच आहे असा इस्त्राईलच्या कंपनीचा दावा आहे.

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...