Thursday, 22 July 2021

चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे


प्रश्न71) भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) हे ___ याच्या अखत्यारीत कार्य करते.

उत्तर :- आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय


प्रश्न72) कोणत्या भारतीय राज्याने येत्या तीन वर्षात ‘ॲगार’च्या लागवडीपासून 2000 कोटी रुपयांचा व्यवसाय साध्य करण्याचे लक्ष्य ठेवले आहे?

उत्तर :-  त्रिपुरा


प्रश्न73) ‘अर्थ नेटवर्क’ या संस्थेच्या ‘2020 इंडिया लाइटनिंग रिपोर्ट’ या अहवालानुसार, कोणते राज्य सर्वाधिक वीजा पडल्याची नोंद करण्यात आलेल्या पहिल्या पाच राज्यांपैकी एक आहे?

उत्तर :- आंध्र प्रदेश व कर्नाटक


प्रश्न74) कोणत्या कंपनीला भारतात मोटार इंधन विक्री करण्यासाठी अधिकृत परवानगी देण्यात आली?

उत्तर :-  रिलायन्स इंडस्ट्रीज,आरबीएमएल सोल्युशन्स, मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज


प्रश्न75) एका बातमीनुसार, ‘झुरोंग’ रोव्हरने आतापर्यंत _ ग्रहाच्या पृष्ठभागावर 509 मीटर एवढ्या अंतरचा प्रवास पूर्ण केला आहे.

उत्तर :- मंगळ


प्रश्न76) ‘हिंदु विवाह कायदा-1955’ यामधील कोणते कलम ‘दांपत्य अधिकारांचे प्रत्यास्थापन’ या मुद्याच्या संदर्भात आहे?

उत्तर :- कलम 9


प्रश्न77) खालीलपैकी कोणते विधान “मूब वोबल’ (MOON WOBBLE) याची व्याख्या स्पष्ट करते?

उत्तर :- दर 18.6 वर्षांनी चंद्राच्या कक्षामध्ये होणारे चक्रीय स्थलांतर


प्रश्न78) कोणत्या संस्थेने कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्राचा वापर करणारे ‘एनबीड्रायव्हर / NBDriver’ (नेबरहूड ड्राइव्हर) नामक एक डिजिटल साधन तयार केले?

उत्तर :- IIT मद्रास


प्रश्न79) कोणत्या शहरात ‘भारतीय वारसा संस्था (अर्थात इंडियन इंस्टिट्यूट ऑफ हेरिटेज)’ याची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे?

उत्तर :- नोएडा


प्रश्न80) कोणत्या देशाने सागरी सुरक्षेच्या संदर्भात ‘TTX-2021’ या आभासी त्रिपक्षीय बैठकीचे आयोजन केले?

उत्तर :- भारत,श्रीलंका,मालदीव


प्रश्न81) कोणत्या दिवशी “आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ दिवस” साजरा करतात?

उत्तर :-  20 जुलै


प्रश्न82) कोणत्या व्यक्तीची पेरू देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली?

उत्तर :- पेद्रो कॅस्टिलो


प्रश्न83) कोणते राज्य ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून शैक्षणिक कागदपत्रे वितरित करणारे देशातील पहिले राज्य ठरले?

उत्तर :- महाराष्ट्र


प्रश्न84) कोणत्या गावात गुजरातमधील बालिका पंचायतची पहिली निवडणूक यशस्वीरित्या पार पडली?

उत्तर :- कुनारिया खेडे ( गुजरात )


प्रश्न85) ____ अंतर्गत, केंद्रीय सरकारने 6 पारंपारिक डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्या तयार करण्यासाठी 50,000 कोटी रुपयांची निविदा काढली आहे.

उत्तर :- प्रोजेक्ट 75-इंडिया


प्रश्न86) आशियाई विकास बँकेने चालू आर्थिक वर्षासाठी भारताच्या आर्थिक विकास दराचा अंदाज कमी करीत _ एवढा वर्तविला आहे.

उत्तर :- 10 टक्के


प्रश्न87) कोणत्या शहरात IOC कंपनी भारताचा पहिला ‘ग्रीन हायड्रोजन’ प्रकल्प उभारणार आहे?

उत्तर :-  मथुरा


प्रश्न88) खालीलपैकी कोणते ‘नौकानयनासाठी सागरी साधने विधेयक-2021’ याचे उद्दीष्ट आहे?

उत्तर :-  ‘भारतीय बंदरे कायदा-1908’ रद्द करण्यासाठी


प्रश्न89) 20 जुलै 2021 रोजी _ देशाने घोषणा केली की, त्याने ‘एस-500’ नामक नवीन हवाई संरक्षण क्षेपणास्त्र यंत्रणेची चाचणी यशस्वीपणे पार पाडली.

उत्तर :- रशिया


प्रश्न90) कोणत्या देशाने 16 जुलै 2021 रोजी पहिले दोन MH-60R मल्टी-रोल हेलिकॉप्टर भारतीय नौदलाला सुपूर्द केलेत?

उत्तर :- अमेरिका

ऑक्सिजनचा नियंत्रित पुरवठा करणारे ‘AMLEX’ नामक उपकरण IIT रोपार या संस्थेत विकसित .



🔥वद्यकीय ऑक्सिजनच्या सिलिंडरचे आयुष्य तीन पटीने वाढविण्याच्या दृष्टीने, ऑक्सिजनचा नियंत्रित पुरवठा करणारे ‘AMLEX’ नामक नवीन उपकरण रोपार (पंजाब) येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेच्या संशोधकांनी विकसित केले आहे.


🔥सस्थेतील जैववैद्यकीय अभियांत्रिकी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. आशिष सहानी यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपकरण तयार करण्यात आले.


🦋ठळक बाबी..


🔥रग्णांना श्वास घेताना आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन पुरवणारे आणि उश्वासाद्वारे कार्बन डाय-ऑक्साईड बाहेर सोडत असताना ऑक्सिजन पुरवठा रोखणारे हे नवीन उपकरण ऑक्सिजनची बचत करण्यात मदत करते.


🔥आतापर्यंत, श्वासोच्छ्वासाच्या दरम्यान, ऑक्सिजन सिलेंडर / पाईपमधील ऑक्सिजन वापरकरता श्वास सोडत असताना कार्बन डाय-ऑक्साईड सोबत बाहेर ढकलला जात असे. त्यामुळे दीर्घ कालावधीत मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा अपव्यय होत असे. नवीन उपकरणामुळे ऑक्सिजनचा अपव्यय टाळता येतो.


🔥AMLEX सहजपणे ऑक्सिजन पुरवठ्याची लाइन आणि रूग्णाच्या तोंडावरील मास्क याच्याशी जोडले जाऊ शकते. त्यात सेन्सरचा वापर करण्यात आला असून तो सेन्सर कोणत्याही पर्यावरणीय स्थितीत वापरकर्त्याचा श्वास आणि उच्छ्वास यातील फरक यशस्वीरित्या ओळखू शकते. हे साधन व्यावसायिकरित्या उपलब्ध कोणत्याही ऑक्सिजन थेरपी आणि मास्क यांच्या बरोबर कार्य करू शकते.

सयुक्त पूर्व परीक्षा गट - ब च्या बाबत..



नमस्कार,

   राज्यात सद्या आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्यामुळे एमपीएससी परीक्षा घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून परवानगी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी १२ जुलै २०२१ रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पत्र पाठवून परीक्षा घेण्याबाबत विचारणा केली होती. सर्व सध्याची परिस्थिती पाहता 

आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सकारात्मक पत्र पाठविण्यात आले असून आरोग्य विभाग आणि मुख्यसचिव यांच्या कडून देखील फाईल positive करून पुढे पाठविण्यात आली आहे. आता ही फाईल मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे सहीसाठी पाठविली आहे. पुढील २-३ दिवसात त्यावर स्वाक्षरी होऊन ती फाईल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविली जाणार आहे. त्यानंतर MPSC कडून सर्व त्या नियोजनाची तयारी करून संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख लवकरात लवकर घोषित केली जाईल....

 त्यामुळे आता विद्यार्थ्यानी   आपला अभ्यास सुरूच ठेवावा.


🔴परीक्षेची नियोजित तारीख लवकरात लवकर घोषित होण्याची शक्यता आहे....

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...