Tuesday, 20 July 2021

सर्वोच्च न्यायालय सर्वात मोठ्या लोकशाहीचे संरक्षक



🔰सर्वोच्च न्यायालयाचे वर्णन ‘सर्वात मोठ्या लोकशाहीचे संरक्षक’ असे करतानाच, ‘काही चुकीचे घडेल, तेव्हा न्यायपालिका नागरिकांच्या पाठीशी उभी राहील’ हे भारताच्या लोकांना ठाऊक आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांनी शनिवारी केले.


🔰कवळ लिखित घटना असणे एवढेच भारतीय न्यायपालिकेचे वेगळेपण नाही; तर लोकांची या यंत्रणेवर प्रचंड श्रद्धा आहे, यामुळेही ती वेगळी आहे, असे भारत-सिंगापूर मध्यस्थी परिषदेत बोलताना सरन्यायाधीश म्हणाले. या परिषदेत त्यांच्यासोबत सिंगापूरचे मुख्य न्यायाधीश सुंदरेश मेनन हे प्रमुख वक्ते होते.


🔰‘आपल्याला न्यायपालिकेकडून दिलासा व न्याय मिळेल याचा लोकांना विश्वास आहे. चुकीच्या गोष्टी घडतील तेव्हा न्यायपालिका आपल्यामागे उभी राहील हे त्यांना माहीत आहे. भारताचे सर्वोच्च न्यायालय हे सर्वात मोठ्या लोकशाहीचे संरक्षक आहे,’ असे न्या. रमण म्हणाले.


🔰‘यतो धर्मस्ततो जया’ या भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या बोधवाक्याला अर्थ प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने, पक्षकारांना संपूर्ण न्याय देण्याकरिता घटना आम्हाला व्यापक अधिकार आणि अधिकारक्षेत्र देते, याचा सरन्यायाधीशांनी आवर्जून उल्लेख केला.

Gk Question



Question: रणथम्भौर का युद्ध किसके मध्य हुआ ?

A: अलाउद्दीन खिलजी और राणा हमीर✔️

B: बाबर और राणा सांगा

C: अलाउद्दीन खिलजी और राणा रतन सिंह

D: मुहम्मद गौरी और पृथ्वीराज चौहान


Question: मोहम्म्द गौरी ने पृथ्वीराज चौहान को कब पराजित किया ?

A: तराइन के प्रथम युद्ध मे

B: तराइन के द्वितीय युद्ध मे✔️

C: पानीपत के प्रथम युद्ध मे

D: पानीपत के द्वितीय युद्ध मे


Question: पृथ्वीराज रासो के अनुसार राजपूतो की उत्पत्ति कहां से हुई है ?

A: अग्निकुंड़ से✔️

B: सूर्य से

C: आकाश से

D: चन्द्रमा से


Question: चौहानो का मूल स्थान माना किसे जाता है ?

A: अजमेर

B: नागौर

C: सपादलक्ष✔️

D: जालौर


Question: सातवी शताब्दी मे अजमेर दुर्ग की स्थापना किसने की?

A: अजयपाल ने✔️

B: कीर्तिपाल ने

C: अर्णोराज ने

D: वासुदेव ने


Question: पृथ्वीराज तृतीय का जन्म कहॉ हुआ ?

A: अन्हिलपाटन✔️

B: जालौर

C: सॉंभर

D: अजमेर


Question: अलाउद्दीन खिलजी ने किस दुर्ग को जीतकर उसका नाम खैराबाद रखा ?

A: सिवाना दुर्ग✔️

B: जोधपुर दुर्ग

C: रणथम्भौर दुर्ग

D: िचतौड़ दुर्ग


Question: सिरोही के किस शासक ने ईस्ट इंडिया कम्पनी से संधि की ?

A: सहासमल

B: लक्ष्मण

C: शिवसिंह✔️

D: इनमें से कोई नहीं


Question: तराइन का मैदान कहां है?

A: पंजाब

B: राजस्थान

C: हरियाणा✔️

D: उत्तर प्रदेश


Question: तराइन के प्रथम युद्ध मे किसकी विजय हुई ?

A: पृथ्वीराज चौहान तृतीय✔️

B: मोहम्म्द गौरी

C: मोहम्म्द गजनवी

D: गोविंदराज


Question: चंपानेर की संधि मालवा और गुजरात के शासको ने सयुक्त रूप से मेवाड़ के किस शासक के विरूद्ध की ?

A: महाराणा कुम्भा✔️

B: महाराणा रायवमल

C: राव चूड़ा

D: महाराणा सांगा


Question: एकलिंग महात्म्य ग्रंथ का लेखन कार्य किस शासक द्वारा पूरा किया गया था?

A: महाराणा रायमल

B: महाराणा सांगा

C: महाराणा कुम्भा✔️

D: राणा लाखा


Question: किस शासक के शासनकाल मे पिछोला झील का निर्माण एक बन्जारे द्वारा किया गया था ?

A: महाराणा रायमल

B: महाराणा सांगा

C: महाराणा कुम्भा

D: राणा लाखा✔️


Question: किस शासक को मानवो का खन्डहर व सैनिको का भग्नावशेष कहा जाता है ?

A: महाराणा कुम्भा

B: महाराणा रायवमल

C: महाराणा सांगा✔️

D: मोकल


Question: अलाउद्दीन खिलजी ने चितौड विजय के उपरान्त चितौडगढ का नाम बदलकर क्या रख दिया था ?

A: मालवा

B: ममूदाबाद

C: खिज्राबाद✔️

D: जलालाबाद


Question: मेवाड का प्रथ्म साका किस शासक शासनकाल मे घटित हुआ था ?

A: रत्नसिंह✔️

B: महाराणा रायवमल

C: राव चूडा

D: महाराणा सांगा


Question: मेवाड का भीष्म पितामह किस शासक को कहा जाता है ?

A: महाराणा कुम्भा

B: महाराणा रायवमल

C: राव चूडा✔️

D: महाराणा सांगा


Question: राणा सांगा का सम्बन्ध कहां से है ?

A: मालवा

B: खजुराहो

C: मांडू

D: मेवाड✔️


Question: गुहिल वंश की प्रारंभिक राजधानी क्या थी ?

A: मालवा

B: चितौडगढ

C: आहड़

D: नागदा✔️


Question: मेवाड का मेराथन युद्ध किसे कहा गया है ?

A: हल्दीघाटी युद्ध

B: दिवेर युद्ध✔️

C: माहोली युद्ध

D: इनमें से कोई नहीं


Question: वह राजपूत रानी कौन थी, जिसने अपने सैकडो अनुयायियो के साथ अलाउद्‌दीन खिलजी के 1303 ई. पू. मे चितौडगढ पर कब्जा करने पर जौहर कर लिया था ?

A: पदमावती

B: पदमिनी✔️

C: कर्मावती

D: रूपमती


Question: कुशाल माता का वह भव्य मंदिर जिसका निर्माण महाराणा कुम्भा ने करवाया था, कहां स्थित है ?

A: ओसियॉ

B: बदनोर✔️

C: कुम्भलगढ

D: उदयपुर


ब्रिटिशांचे लष्करी धोरण



०१. कंपनी शासनाचा शक्तिशाली आधार म्हणजे लष्कर होय. लष्करी शक्तीवर त्यांनी अंतर्गत व बाह्य शत्रूंचा बिमोड करुन भारतावर राज्य स्थापन केले. राजकीय सत्तेला उद्भवणाऱ्या धोक्याचा शेवट करण्याच्या हेतुने अनेक ठिकाणी लष्करी ठाणी उभारुन सरकारला मदत केली.


०२. ब्रिटिश प्रदेशातील व भारतीय संस्थानातील जनतेने उठाव केल्यास ते दडपण्यासाठी संस्थानिकांना मदत करणे. चोर, लुटारु, दरोडेखोर, इ. रस्ते सुरक्षित ठेवणे. व्यापार्यांना रक्षण देणे. भारतीय राज्यकर्त्यानी कमी केलेल्या सैनिकांनी ब्रिटिश सैन्यात सामावून घेणे. हा भारतातील ब्रिटीश लष्कराचा उद्देश होता.


०३. राजाचे लष्कर व हिंदी लष्कर असे ब्रिटीश लष्कराचे दोन प्रमुख विभाग होते. राजाचे लष्कर यामधील अधिकारी स्वत:ला श्रेष्ठ समजत असत. त्यांना पगारही जादा असे यामध्ये युरोपीय सैनिक असे हिंदी लष्करातील सैनिकांना दुय्यम स्थान असून पगारही कमी होता. १८५६ मध्ये कंपनीकडेही २,७५,००० हिंदी लष्करात ३००रु पगाराचे फक्त ३ अधिकारी होते. १८५७ च्या उठावाच्यावेळी कंपनीकडे ३,११,३७४ लष्करामध्ये फक्त ४५,५२२ एवढेच युरोपिय होते.


०४. कंपनीच्या सेवेसाठी मोठे लष्कर इंग्लंडमधून आणणे शक्य नव्हते. युरोपियन फौजांचा खर्चही फार मोठा होता. नेपोलियनमुळे युरोपमध्ये युध्द सुरु असल्याने इंग्लंडच्या सुरक्षिततेसाठी मोठया लष्कराची गरज होती. भारतात चांगल्या दर्जाचे सैनिक मोठया संख्येने उपलब्ध होते. अनेक जातींच्या व टोळयांचा मुख्य व्यवसाय सैनिकांचा हता. शिस्त, प्रशिक्षण, शूर असे भारतीय राज्यकर्त्याच्या विसर्जित करण्यात आलेल्या लष्करातील लोक मोठया प्रमाणात होते. या कारणामुळे ब्रिटिशांनी हिंदी लोकांना लष्करात प्रवेश दिला.

महालवारी पद्धती



०१. जमीनदारी व रयतवारी पद्धतीच्या अपयशामुळे ही तिसरी पद्धत लागू केली गेली. यानुसार एक महाल अथवा एक विभाग यातील जमीनमालकांना त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नासाठी सरकारच्या महसुलाकरिता संयुक्तपणे व व्यक्तिशः जबाबदार धरले जात असे. ही पद्धत आग्रा, अवध आणि उत्तर प्रदेशातील नंतरच्या काळात ब्रिटीश राज्यास जोडल्या गेलेल्या प्रदेशांसाठी लागू करण्यात आली.


०२. जर महाल मोठा असेल तर त्यातील काही निवडक मालकांवर महालातील महसूल वसुलीची जबाबदारी सोपविण्यात येत असे. प्रत्यक्षात एखाद्या गावातील समस्त गावकऱ्यांशी संयुक्तपणे व व्यक्तिशः ही महालवारी पद्धत लागू करण्यात आली.


०३. या पद्धतीनुसार जमिनीची मालकी व भोगवटा एकाच मालकाकडे असे व त्यानेच ती जमीन कसावयाची होती. सर्व शेतकरी जमीन मालकांनी संयुक्तपणे महसूल सरकारकडे जमा करावयाचा होता. गावप्रमुखाकरवी किंवा इतर मध्यस्थाकरवी सर्व महसूल सरकारी खजिन्यात जमा केला जात असे.

रयतवारी पद्धती



०१. थॉमस मनरो व कॅप्टन रीड यांनी ही पद्धती १८२२ मध्ये मद्रास, मुंबई, पूर्व बंगाल, आसामचा काही भाग व कुर्ग या प्रांतात लागू केली.


०२. या पद्धतनुसार शेतकऱ्यांना जमिनीची मालकी व भोगवट्याचे अधिकार देण्यात आले.त्यांनी जमीन महसूल थेट सरकारकडे जमा करावा असे ठरविण्यात आले. यामुळे सरकार व रयत यांच्यात थेट संबंध प्रस्थापित झाला.


०३. या पद्धतीत प्रत्यक्ष जमीन कसणाऱ्याच्या कुवतीनुसार महसूल आकारणी ठरविण्यात आली. जमिनीची मोजणी आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पादनाचा अंदाज करण्यात आला. जमिनीच्या उत्पादनाच्या ५५ टक्के महसुलाची सरकारची मागणी कायम करण्यात आली.


०४. प्रत्यक्षात रयतवारी पद्धत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणारी पद्धत ठरली. कारण सरकारने मुळात महसूल खूपच जास्त ठरविला होता. या पद्धतीत शेतकरी मालक झाला तरी त्याची परिस्थिती सुधारली नाही.

बहमनी साम्राज्य 1347- 1538



 ◾️3 ऑगस्ट 1347 रोजी बहमानी राज्याची स्थापना केली


◾️जफरखान ऊर्फ ⇨हसन गंगू (कार. १३४७-५८) याला दोलताबाद येथे राज्याभिषेक केला (1347). 


◾️तयाने अबुल मुझफ्फर अलाउद्दीन बहमनशाह हे नाव धारण 


◾️फिरिश्ताच्या मते बहमन हा इराणचा प्राचीन राजा असून त्याच्या वंशातील हसन गंगू होता. 


◾️काहींच्या मते हसन गंगूचा मालक ब्राह्मण होता, म्हणून त्याने बहमन हे नाव धारण केले असावे.


◾️चौदाव्या शतकात द. भारतावर दिल्लीच्या मुहंमद तुघलकाचा अमंल होता


◾️हसन गंगूने आपली राजधानी दौलताबादहून गुलबर्ग्यास नेली. 


◾️हसन गंगूने प्रशासकीय व्यवस्थेसाठी राज्याची चार सुभ्यांत विभागणी करून प्रत्येकावर एकेक राज्यपाल नेमला.


🟣अखेर 1538 मध्ये ⇨ बरीदशाही, ⇨ इमादशाही, ⇨निजामशाही, ⇨आदिलशाही आणि ⇨कुतुबशाही


◾️या पाच स्वतंत्र शाह्या निर्माण होऊन बहमनी सत्ता संपुष्टात आली.


◾️अहमदनगर व वऱ्हाड येथील शाह्यांचे संस्थापक मूळचे हिंदू होते.


◾️बहमनी राजांनी तात्त्विक दृष्टया अब्बासो खलीफांचे [→ अब्बासी खिलाफत] वर्चस्व मानले होते.


◾️अथानाशिअस निकीतीन हा रशियन प्रवासी काही वर्षे (1469-74) बीदरला होता. त्याने तेथील वास्तूंबरोबरच दैंनदिन जीवनाची माहितीही लिहिली आहे.


◾️सय्यद अली तबातबा, निजामुद्दीन, फिरिश्ता, अँथानाशिअस न्यिक्यितीन (रशियन प्रवासी), खाफीखान इत्यादींच्या लेखनांतून मिळते.


◾️बहमनी काळात दौलताबाद, गुलबर्गा व बीदर अशा तीन राजधान्या आलटून पालटून होत्या


◾️फारशी भाषेला त्यांच्या दरबारात प्राधान्य मिळाले.


◾️तयांच्या तख्तावर काळी छत्री आणि टक्का या नाण्यांवर खलिफांचा उजवा हात असे

असहकार चळवळ



◾️ 1920 सालच्या नागपूर अधिवेशनात राष्ट्रीय सभेने गांधीजींच्या असहकाराच्या चळवळीच्या कार्यक्रमास मान्यता दिली.


➡️ तयात पुढील बाबींचा समावेश होता.


1) सरकारी नोकर्‍या व पदव्या यांचा त्याग करणे.


2) सरकारी सभा समारंभावर बहिष्कार टाकणे.


3) सरकारी शाळा- महाविदयांलयातून मुलांना काढून घेऊन त्यांना राष्ट्रीय शिक्षण संस्थांत दाखल करणे


4) सरकारी कोर्ट्सकचेर्‍यांवर बहिष्कार घालणे.


5) प्रांतिक निवडणुकांवर बहिष्कार टाकणे.


6) परदेशी मालावर बहिष्कार टाकणे व स्वदेशी मालाचा वापर करणे.


7) दारूबंदीचा प्रचार व दारूच्या दुकानांसमोर निदर्शने करणे.


◾️ असहकार आंदोलनास भारतीय जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.


◾️  शासनाने दडपशाहीचे धोरण स्वीकांरताच गांधीजींनी सविनय कायदेभंगाचे आंदोलन सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला.


◾️ चौरीचौरा येथे चळवळीला हिंसक वळण लागल्याने ऐन जोमात आलेली असहकारची चळवळ मागे घेण्याचा निर्णय गांधीजीनी 5 फेब्रुवारी, 1922 रोजी घेतला.


🟢 विधायक कार्यक्रम :-


◾️ गांधीजीनी असहकाराच्या चळवळीला विधायक कार्यक्रमाची जोड दिली.


◾️ तयामुळे राष्ट्रीय चळवळ ग्रामीण भागात पोचली व तिला जनाधार प्राप्त झाला.

वातावरणीय दाब.



🅾️ पथ्वीभोवती हवेचे एक जाड आवरण आहे. त्यालाच वातावरण असे म्हणतात. 


🅾️ पथ्वीवर आणि पृथ्वीवरील सर्व पदार्थांवर हवेचा दाब असतो. त्याला 'वातावरणीय दाब' असे म्हणतात. 


🅾️ पथ्वीच्या एकक क्षेत्रफळावर पडणार्यार हवेच्या स्तंभाच्या वजनाला त्या ठिकाणचा वातावरणीय दाब म्हणतात.


🅾️ हवेचा दाब दर्शविणार्याव उपकरणाला साधा हवा दाबमापी म्हणतात.


🅾️समुद्रसपाटीवर हवादाबमापीच्या नळीमधील पार्या ची उंची 760 मीमी. असते. म्हणजेच समुद्रसपाटीवर हवेचा दाब 760 मीमी. 


🅾️ समुद्रसपाटीवरील हवेचा दाब प्रमाणदाब मानला जातो. तो 1 वातावरणदाब म्हणून गणला जातो.


🅾️ 760 मी मी. पार्यारच्या स्तंभाच्या वजनावरून समुद्रसपाटीवरील हवेचा दाब 101400 N/m2 एवढा भरतो.


🅾️ समुद्रसपाटीवरून जसजसे वर जावे तसतसे त्या जागेवरील हवेच्या स्तंभाची उंची कमी होते. त्यामुळे हवेचा दाब कमी होतो.


🅾️खप उंचावर गेले की हवेचा दाब कमी झाल्याने दोन दाबातील फरक वाढतो. त्यामुळे नाकातील रक्तवाहिन्या फुटून रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते.


🅾️ढोबळमानाने पाहिल्यास समुद्रसपाटीवरील हवेत समान दाबाचे आडवे पट्टेच तयार झाल्याचे दिसून येते.


🅾️ समुद्रसपाटीवर विषुववृत्ताजवळचा प्रदेश हा कमी वातावरणीय दाबाचा पट्टा आहे. 


🅾️ 300 उत्तर आणि 300 दक्षिण या अक्षवृत्ताजवळ अधिक दाबाचे, तर आर्क्टिक आणि अंटार्क्टिक ध्रुवाजवळ कमी दाबाचे पट्टे आहेत.


🅾️ उत्तर दक्षिण ध्रुवाजवळ अधिक दाबाचे प्रदेश आहेत.


🅾️ तापमान बदलाबरोबरच हवेचा दाबही कमी जास्त होतो. जमीन सूर्याच्या उष्णतेने तापली की तेथील हवा तापून प्रसरण पावते. ती वरवर जाते. आजूबाजूला पसरते. तेथे हवेचा दाब कमी होतो. याउलट रात्री जमीन थंड झाल्यावर हवेचा दाब पारत वाढतो.


🅾️ दपारी जमीनीवरील हवेचा दाब पाण्यावरच्या हवेच्या दाबापेक्षा कमी होतो. त्यामुळे समुद्राकडून जमिनीकडे खारे वारे वाहतात.


🅾️ सर्यास्तानंतर जमीन लवकर थंड होतो. त्यामानाने समुद्रावरील हवा उष्ण राहते. म्हणून रात्री जमीनीवरील हवेचा दाब अधिक होतो. त्यामुळे मतलई वारे जमीनिकडून समुद्राकडे वाहतात.

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...