🔰संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलै ते १३ ऑगस्ट या कालावधीत होणार असल्याचे लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. १९ सत्रांचे हे अधिवेशन पूर्णवेळ चालणे अपेक्षित असून, लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज नेहमीप्रमाणे एकाच वेळी सकाळी अकरा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहील.
🔰करोनाची दुसरी लाट ओसरू लागली असली तरी, करोनासंदर्भातील नियमांचे पालन करूनच संसदेचे कामकाज होईल, असे बिर्ला यांनी सांगितले. लशीची किमान एक मात्रा घेतलेल्या खासदारांना ‘आरटी-पीसीआर’ चाचणीची सक्ती केली जाणार नाही. मात्र, लसीकरण न झालेल्यांनी नमुना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन बिर्ला यांनी केले.
🔰गल्या वेळी अर्थसंकल्पीय अधिवेशात संसदेच्या आवारात प्रवेश करण्यासाठी सर्वाना चाचणी सक्तीची होती. संसदेच्या आवारात नमुना चाचणीची सुविधा २४ तास उपलब्ध असून, सदस्यांच्या साहाय्यकांच्या लसीकरणाचीही व्यवस्था करण्यात आल्याची माहिती बिर्ला यांनी दिली