Sunday, 11 July 2021

केरळमध्ये झिका विषाणूचा रुग्ण आढळला



🌼जलै 2021 महिन्यात केरळ राज्यात झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळला. राज्यात एक गर्भवती महिला झिका विषाणू संक्रमित आढळली आहे. याचसोबत, मच्छरांमुळे पसरणाऱ्या झिका विषाणूचे संक्रमण भारतात पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे.


🌼तयानंतर तिरुवनंतपुरम शहरात झिका विषाणूचा संसर्ग झालेले आणखी 13 रुग्ण आढळून आल्यानंतर केरळ आणि तामिळनाडूमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रुग्णांच्या चाचणीसाठी नमुने पुणे शहरातील 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी' या संस्थेकडे पाठविण्यात आले होते.


🌼याआधी भारतात 2016-17 या वर्षात गुजरात राज्यात झिका विषाणूच्या संक्रमणाची प्रकरणे समोर आली होती.


⭕️झिका विषाणू


🌼एडीज प्रकारचा डास चावल्याने हा रोग पसरतो. झिका संक्रमणाची लक्षणे डेंग्यू समान असून त्यामध्ये ताप येणे, त्वचेवर लाल रंगाचे डाग, सांधे दुखी तसेच डोळे लाल होणे अशी अनेक लक्षणे रुग्णांमध्ये दिसून येतात. परंतु हा आजार जीवघेणा नाही.


🌼झिका विषाणू संक्रमित व्यक्ती सात ते आठ दिवस या संक्रमणाच्या प्रभावाखाली राहतो. गर्भवती महिलांना झिका विषाणू संक्रमणाचा अधिक धोका असून त्यामुळे जन्माला येणारे मूल अविकसित मेंदूसहीत जन्माला येण्याचा धोका अधिक असतो. बाळाचे डोकं जन्माच्या वेळी सामान्यतः नेहमीपेक्षा लहान असू शकते.

प्रथम CII हिंद-प्रशांत व्यवसाय शिखर परिषद..



🔑विदेश मंत्रालयाच्या सहकार्याने भारतीय उद्योग महासंघाने (CII) 6 जुलै ते 8 जुलै 2021 या कालावधीत, ‘हिंद-प्रशांत व्यवसाय शिखर परिषद’ची पहिली आवृत्ती आयोजित केली.


🔑कद्रीय वाणिज्य व उद्योग, रेल्वे, ग्राहक कार्य आणि अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पीयूष गोयल यांनी हिंद-प्रशांत प्रदेशातील व्यापारी समुदायाला विकास, व्यापार आणि प्रगतीला उत्तेजन देण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये सक्रीय सहभाग घेण्यासाठी आमंत्रित केले.


🔑“सामायिक समृद्धीसाठीचा आराखडा विकसित करताना” या विषयाखाली ही शिखर परिषद आयोजित करण्यात आली.


🗝भारतीय उद्योग महासंघ (CII) विषयी...


🔑भारतीय उद्योग महासंघ (CII) ही एक अशासकीय, ना-नफा, उद्योग-चालित आणि उद्योग-व्यवस्थापित संस्था आहे, ज्यात खाजगी तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये गुंतलेले 9000 हून अधिक सदस्य आहेत.


🔑भारताच्या विकासास अनुकूल असे वातावरण, भागीदारी करणारे उद्योग, सरकार आणि नागरी समाज यांच्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करणे व ते टिकवून ठेवण्याचे कार्य CII करते.


🔑भारतीय उद्योग महासंघ (CII) याची स्थापना 1895 साली झाली आणि त्याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा पहिल्याच दिवशी मोठा निर्णय.


🥀कद्रीय मंत्रिमंडळात विस्तार करण्यात आल्यानंतर पियुष गोयल यांचे रेल्वे खाते काढून अश्विनी वैष्णव यांच्याकडे देण्यात आलं आहे. माजी आयएएस अधिकारी असणाऱ्या अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला असून कामकाजाला सुरुवात केली.


🥀दरम्यान पहिल्याच दिवशी त्यांनी मोठा निर्णय घेतला असून रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलल्या आहेत. रेल्वे कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करतील असा आदेशच त्यांनी दिला आहे.


🥀“रेल्वेमंत्र्यांनी सर्व कार्यालयं आणि मंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करतील असा आदेश दिला आहे. पहिली शिफ्ट सकाळी ७ ते ४ आणि दुसरी शिफ्ट दुपारी ३ ते १२ असेल. आजपासून या आदेशाची अमलबजावणी सुरु झाली आहे,” अशी माहिती रेल्वे मंत्रालयाचे एडीजी पीआर डी जे नारायण यांनी दिली आहे.

पश्चिम बंगालमध्ये विधानपरिषद निर्माण करण्यास मंजुरी.


🎯पश्चिम बंगालच्या विधानसभेत संविधानातील कलम 169 अन्वये राज्यात विधानपरिषद निर्माण करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.


♟बगाल विधानपरिषदेची रचना...


🎯बगाल विधानसभेच्या एकूण 294 जागा आहेत. विधानपरिषदेची स्थापना झाल्यावर विधानपरिषदेत एकूण 98 सदस्य असतील. भारतीय संविधानानुसार विधानसभेच्या जागेच्या एक तृतियांश जागांपेक्षा विधानपरिषदेच्या जागा अधिक असता कामा नये.


🎯राज्यातील विधानसभेने विशेष बहुमताने विधानपरिषदेच्या संदर्भात कोणताही ठराव संमत केल्यास भारतीय संविधानातील कलम 169 अन्वये संसद कायद्याने राज्यातील द्वितीय सभागृह बनवू किंवा रद्द करू शकते.


♟इतिहास...


🎯पश्चिम बंगालमध्ये पाच दशकांपूर्वी विधानपरिषदेची व्यवस्था होती. नंतर विधानपरिषद विसर्जित करण्यात आली. 21 मार्च 1969 रोजी 51 सदस्य असलेली विधानपरिषद विसर्जित करण्यात आली होती.


🎯वर्तमानात उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगना, महाराष्ट्र आणि बिहारमध्ये विधानपरिषद अस्तित्वात आहेत.


♟विधानसभा आणि विधानपरिषद...


🎯भारत सरकारच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या घटकराज्याच्या प्रमुखपदी राज्यपाल असतात. राज्यपालांची नेमणूक राष्ट्रपती करतात आणि राष्ट्रपतींच्या मर्जीनुसार ती नेमणूक रद्द होऊ शकते. राज्यपाल हे जरी राज्याचा घटनात्मक प्रमुख असले, तरी ते केंद्रीय सरकारचे प्रतिनिधित्व करतात. राज्यात संविधानाप्रमाणे राज्य चालते किंवा नाही हे ते पाहतात आणि तसे नसल्यास राष्ट्रपतींकडे अहवाल सादर करतात.

ऑलिम्पिकसाठी प्रेक्षकांना बंदी.



🖲टोक्योमधील करोनारुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी आणीबाणीमध्ये वाढ केली आहे. या पार्श्वभूमीवर ऑलिम्पिकसाठी स्टेडियमवरील प्रेक्षकांना बंदी घालण्यात आली आहे, असे ऑलिम्पिकमंत्री तामायो मारूकावा यांनी सांगितले.


🖲सध्याची आणीबाणी रविवारी संपल्यानंतर लगेच सोमवारपासून लागू होणारी आणीबाणी २२ ऑगस्टपर्यंत लागू असेल. त्यामुळे ऑलिम्पिकचा २३ जुलैला होणारा उद्घाटन सोहळा आणि ८ ऑगस्टचा समारोप सोहळा यांच्यापुढे आणीबाणीचे आव्हान असेल. दूरचित्रवाणीनुरूप ऑलिम्पिकसाठी प्रेक्षकांवर बंदी असेल, असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक परिषद (आयओसी) आणि ऑलिम्पिक संयोजन समितीने जाहीर केले.


🖲‘‘करोनाच्या डेल्टा उत्परिवर्तनाचा धोका लक्षात घेऊन महत्त्वाच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना ऑलिम्पिक पाहण्यासाठी स्टेडियमला हजर राहता येण्याची शक्यता कमी आहे,’’ असे पंतप्रधानांनी आणीबाणी जाहीर करताना म्हटले होते. आणीबाणीच्या कालावधीत मद्यपींचा वावर असलेले बार, रेस्टॉरंट आणि कराओके पार्लर्सवर बंदी घालण्यात आली आहे. टोक्योमधील रहिवाशांकडून घरी थांबून दूरचित्रवाणीवर ऑलिम्पिकचा आस्वाद घेण्याचे आव्हान करण्यात येत आहे. गुरुवारी टोक्यो शहरात ८९६ करोनारुग्णांची नोंद झाली आहे.