Thursday, 8 July 2021

ध्वनी:



🅾️'ध्वनी म्हणजे ऐकण्याची संवेदना'.

ध्वनीचे स्वरूप :'ध्वनी ही एक प्रकारची ऊर्जा असून ती आपल्या कानात ऐकण्याची संवेदना निर्माण करते'.


🅾️धवनीची निर्मिती आघाताने, छेडल्याने, हवा फुंकल्याने, ओरखडल्याने, विविध वस्तु हालल्याने अशा अनेक कारणाने होवू शकते.


🅾️परत्येक उदाहरणात कंपन ध्वनीच्या निर्मितीस कारणीभूत ठरतात.


🅾️कपन : वस्तूची जलद गतीने पुढे-मागे होणारी हालचाल म्हणजे कंपन होय.


उदा. तंतुवाद्यातील तारेची कंपने




🅾️धवनी हे तरंगाच्या स्वरुपात प्रसारित होतो.


🅾️वस्तु विक्षोभित होते आणि कंप पावते तेव्हा ध्वनी निर्माण होतो.


🅾️धवनी भौतिक वस्तूतून किंवा पदार्थातून प्रसारित होतो त्याला माध्यम म्हणतात. ते घन, द्रव किंवा वायु असू शकते.


🅾️धवनी निर्वात पोकळीतून प्रवास करू शकत नाही.


🅾️परत्येक्षात कंपित वस्तूपासून ऐकणार्‍यापर्यंत कण प्रवास करीत नाहीत.

ध्वनी तरंगाची वैशिष्ट्ये :


🅾️जव्हा ध्वनी तरंग माध्यमातून प्रवास करतात तेव्हा माध्यमाची घनता व दाब यामध्ये बदल होतो.


🅾️सपीडने : कणांची एकत्रित गर्दी असणारे भाग म्हणजे संपीडने होय.


🅾️सपीडनांपाशी घनता तसेच दाब उच्च असतो.


🅾️विरलने : कमी दाबाचे असे भाग की जेथे कण विखुरलेले असतात त्याला विरलने म्हणतात.


🅾️विरलनापाशी घनता तसेच दाब कमी असतो.


🅾️दोन लगतच्या संपीडनातील किंवा दोन लगतच्या विरलनातील अंतरास तरंगलांबी म्हणतात.


🅾️तयाचे SI पद्धतीत एकक मीटर तर तरंगलांबी ग्रीक अक्षर लॅम्डा ने दर्शवतात.


🧩वारंवारता :


🅾️घनतेचे उच्चतम किंमतीपासून कमीत कमी किंमतीपर्यंत आणि पुन्हा उच्चतम किंमतीपर्यंत होणारा बदल एक आंदोलन घडवितो.


🅾️एकक कालावधीत होणारी आंदोलनाची संख्या म्हणजे तरंगाची वारंवारता होय.


🅾️धवनी तरंगाची वारंवारता ग्रीक अक्षर न्यू ने दर्शवितात.


🅾️तयाचे SI पद्धतीत एकक हर्टझ असून ते Hz ने दर्शवितात.


🅾️(note- हर्टंझ (1857-1894) जर्मन भौतिकशास्त्रज्ञ. सर्वप्रथम त्यांनी बिनतारी संदेशवहनाचे प्रसारण व तरंगांची स्वीकृत केली. )

तरंगकाल :


🅾️लगतची दोन संपीडणे किंवा विरलने यांना ठराविक बिंदु पार करून जाण्यास लागणारा वेळ म्हणजे 'तरंगकाल' होय.


🅾️माध्यमाच्या घनतेमध्ये एक संपूर्ण आंदोलन होण्यास लागणारा वेळ हा ध्वनी लहरीचा तरंगकाल असतो.


तो 'T'ने दर्शविला जातो.


SI पद्धतीत तरंगकालाचे एकक सेकंद आहे.


u=1/t



🧩धवनीचा वेग :


🅾️तरंगावरील संपीडन किंवा विरलनासारख्या एखाद्या बिंदुने एकक कालावधीत कापलेले अंतर म्हणजे ध्वनीचा वेग होय.


वेग=अंतर/काल


एका तरंगकालात कापलेले अंतर,


वेग= तरंगलांबी/तरंगकाल


वेग= वारंवारता*तरंगलांबी


🧩मानवी श्रवण मर्यादा :


🅾️मानवी कानांची ध्वनी ऐकण्याची मर्यादा सुमारे 20 हर्टझ ते 20,000 हर्टझ आहे.


🅾️पाच वर्षाच्या आतील मुले आणि कुत्र्यांसारखे काही प्राणी 25000 हर्टझ पर्यंत ध्वनी एकू शकतात.



🧩शरव्यातील ध्वनी :


🅾️20000 हर्टझ पेक्षा अधिक वारंवारता असणार्‍या ध्वनीला श्रव्यातील ध्वनी असे म्हणतात.


🅾️निसर्गात डॉल्फिन्स, वटवाघुळे, उंदीर वगैरे तो निर्माण करू शकतात.


🧩उपयोग :


🅾️जहाजावरून जहाजावर संपर्क साधण्यासाठी श्रव्यातील ध्वनी उपयोगी ठरते.


🧩धवनीचे परिवर्तन :


🅾️धवनी तरंगांचे घन किंवा द्रव पृष्ठभागावरून परावर्तन होते.


🅾️धवनीच्या परावर्तनासाठी फक्त मोठ्या आकाराचा खडबडीत किंवा चकचकीत पृष्ठभागाच्या अडथळ्याची आवश्यकता असते.


🧩परतिध्वनी :


🅾️मल ध्वनीची कोणत्याही पृष्ठभागावरून परावर्तनामुळे होणारी पुनरावृत्ती म्हणजे प्रतिध्वनी होय.


अंतर= वेग*काल


🧩निनाद :


🅾️एखाद्या ठिकाणाहून ध्वनी तरंगांचे पुन्हा पुन्हा परावर्तन होऊन, ध्वनीतरंग एकत्र येऊन सतत जाणवेल असा ध्वनी तयार होतो.त्याचा परिणाम ध्वनीचे सातत्य राहण्यात होतो त्यालाच निनाद म्हणतात.



🧩सोनार (SONAR):


🅾️Sound Navigation And Ranging याचे लघुरूप म्हणजे SONAR होय.


🅾️पाण्याखालील वस्तूचे अंतर, दिशा आणि वेग श्रव्यातील ध्वनी तरंगाच्या उपयोग करून SONAR मोजते.

आरोग्यशास्ञ


🅾️ हत्तीरोगाचा रक्त नमुना कधी घेतात - राञी


🅾️ लाल रक्तपेशी तयार होण्याकरीता कोणता घटक आवश्यक असतो - फॉलिक अँसिड


🅾️ जन्मताच ह्रदयात दोष असणार्या मुलांना ब्लू बेबी म्हणतात


🅾️ करडई तेलातील - लिनोलिक हे मेदाम्ल रक्तात्ल कोलेस्टेरॉलची माञा कमी राखते


🅾️ सोयाबिन मध्ये - ४०% प्रथिन असतात


🅾️ परुषांमधिल कुटूंबनियोजन शस्ञक्रियेस - व्हँसेक्टॉमि म्हणतात


🅾️ सञियांमधिल कुटूंबनियाेजन शस्ञक्रियेस - ट्युबोक्टोमी म्हणतात


🅾️ आयुर्वेदाची निर्मिती अथर्ववेदा पासुन झाली आहे


🅾️ शरीराच्या एकुन वजनाच्या सुमारे २\३ भाग स्नायुंनी बनलेला असतो 


🅾️ हरदयास ऑक्सिजन चे प्रमाण कमि पडल्यास - हायपरटेंशन हा आजार होतो


🅾️ हरदयाचा एक ठोका पडन्यास - ०.८ सेतंद लागतात 


🅾️ शरीरातील पाण्याचे प्रमाण आणि आरबीसीचे प्रमाण मोजण्यासाठी - फॉस्फरस ३२ वापरतात.


हेलिअम



🅾️१८ ऑगस्ट १८६८ या दिवशी फ्रेंच खगोल शास्त्रज्ञ ‘पीअर जॅनसन’ हे खग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी भारतात आले. सूर्यग्रहण पाहताना सूर्याच्या वर्णपटात (सूर्यकिरण लोलकातून जाऊ दिले असता, बाहेर पडताना सप्तरंगी वर्णपट पाहायला मिळतो) एक पिवळ्या रंगाची रेषा त्यांना आढळली. सूर्यग्रहण नसतानाही निरीक्षण केले असता सूर्याच्या वर्णपटात पिवळ्या रंगाचा प्रकाश दिसला. सोडिअम या मूलद्रव्याचे ज्वलन झाले असता, त्याची ज्वाला पिवळ्या रंगाची दिसते. पण ‘पीअर जॅनसन’ यांना सूर्याच्या वर्णपटात दिसलेला पिवळा रंग सोडिअम या मूलद्रव्याच्या पिवळ्या रंगापेक्षा वेगळा आढळला. त्याच वर्षी जोसेफ नॉर्मन लॉकयेर आणि एडवर्ड फ्रँकलँड यांनाही सूर्याच्या वर्णपटात हा पिवळा रंग आढळला. आणि तो सूर्यात असणाऱ्या मूलद्रव्याचा आहे असा शोध लागला. या रंगाची तरंगलांबी ५८७.४९ नॅनोमीटर म्हणजेच ०.००००००५८७४९ मीटर होती. जोसेफ नॉर्मन लॉकयेर आणि एडवर्ड फ्रँकलँड या दोघांनीही या मूलद्रव्यास सूर्याला ग्रीक भाषेत असलेल्या हेलिओज (helios) या नावावरून हेलिअम असे नाव दिले. पृथ्वीवर सापडण्याआधी पृथ्वीबाहेर सापडलेले हे पहिलेच मूलद्रव्य. भारतीयांच्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे हेलिअमचा शोध ‘पीअर जॅनसन’ यांना भारतातून लागला.


🅾️सर्यावर आढळलेले हे मूलद्रव्य दोन वर्षांनंतर, लुईंगी पामित्री या भौतिकतज्ज्ञाला इटली देशातील ‘व्हेसुव्हिअस’ पर्वताच्या ज्वालारसात आढळले. १८९५ मध्ये रसायन शास्त्रज्ञ सर विल्यम रामसे यांनाही पृथ्वीवर हेलिअमच्या अस्तित्वाचा शोध लागला.


🅾️यरेनियम या किरणोत्सारी असलेल्या मूलद्रव्याचा ऱ्हास होत असताना हेलिअम तयार होते. वातावरणात अत्यल्प प्रमाणात असल्याने वातावरणातून हेलिअम मोठय़ा प्रमाणात मिळविणे फार खर्चीक आहे त्यामुळे नैसर्गिक वायूंच्या साठय़ातून मिळत असलेला हेलिअम साठवला जातो. लष्करी आणि अन्य प्रकारच्या फुग्यांमध्ये वापर होत असल्याने, भविष्यातील वापराच्या दृष्टीने यू.एस.ए.मधील टेक्सास येथे हेलिअम तयार करून साठवला जातो.


🅾️रॉकेट्समध्ये इंधन म्हणून हायड्रोजन आणि ऑक्सिजन बरोबर – निष्क्रिय आणि न जळणारा असल्याने – हेलिअमचा उपयोग केला जातो. तांबे, अ‍ॅल्युमिनियम, मॅग्नेशियम यांची संमिश्रे जी उष्णतेचे सुवाहक आहेत 

विज्ञान विषयातील महत्वाची सूत्रे.



1. सरासरी चाल = कापलेले एकूण अंतर (s) / लागलेला एकूण वेळ (t) 


2. त्वरण = अंतिम वेग (v) - सुरवातीचा वेग (u) / लागलेला वेळ (t)


3. बल = वस्तुमान * त्वरण 


4. गतिज ऊर्जा = 1/2mv2


5. स्थितीज ऊर्जा = mgh


6. आरशाचे सूत्र = 1/आरशापासून वस्तूचे अंतर(u) + 1/आरशापासून प्रतिमेचे अंतर(v) = 1/नाभीय अंतर (f) = 2/ वक्रता त्रिजा 


7. विशालन (m) = प्रतिमेचा आकार (q) / वस्तूचा आकार (p) = -v/u


8. सममूल्यभार = रेणूवस्तूमान / आम्लारिधर्मता


9. प्रसामान्यता (N) = द्रव्याचे ग्रॅम मधील वजन / ग्रॅम सममूल्यभार * लीटरमधील आकारमान 


10. रेणुता (M) = द्रव्याचे ग्रॅम मधील वजन / द्राव्याचे रेणूवस्तूमान * लीटरमधील आकारमान 


11. प्रसामान्यता समीकरण = आम्लद्रावणाची प्रसामान्यता * आकारमान = आम्लरी द्रावणाची प्रसामान्यता * आकारमान


12. द्राव्याचे एक लीटर मधील वजन = प्रसामान्यता * ग्रॅम सममूल्यभार 


13. दोन बिंदूमधील विभवांतर = कार्य / प्रभार 


14. विद्युतधारा = विद्युतप्रभार / काळ


15. वाहनाचा रोध (R) = विभवांतर (V) / विद्युतधारा (I)


16. समुद्राची खोली = ध्वनीचा पाण्यातील वेग * कालावधी / 2


17. ध्वनीचा वेग = अंतर / वेळ 


18. पदार्थाने शोषलेली उष्णता = पदार्थाचे वस्तुमान * विशिष्ट उष्माधारकता * तापमानातील वाढ 


19. पदार्थाने गमावलेली उष्णता = पदार्थाचे वस्तुमान * विशिष्ट उष्माधारकता * तापमानातील घट


20. उष्णता विनिमयाचे तत्व = उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता = थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता


21. ओहमचा नियम = I = V / R


22. विद्युतप्रभार = विद्युतधारा * काल


भारताच्या अध्यक्षतेखाली ‘BRICS संस्कृती मंत्र्यांची सहावी बैठक’ संपन्न



🔰भारताचे केंद्रीय संस्कृती व पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र व प्रभार) प्रह्लादसिंग पटेल यांच्या अध्यक्षतेखाली 2 जुलै 2021 रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे BRICS देशांच्या संस्कृती मंत्र्यांची सहावी बैठक आयोजित करण्यात आली होती.


🔰बराझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांच्या संस्कृती मंत्रालयांच्या प्रतिनिधींनी या बैठकीत भाग घेतला होता. बैठकीत BRICS देशांतील मूर्त आणि अमूर्त वारशाच्या ज्ञानावर सांस्कृतिक अनुभवांची ऑनलाइन देवाणघेवाण करण्याच्या क्षेत्रामधील सहकार्यांवर मंत्र्यांनी भर दिला.


⭕️ठळक बाबी


🔰“संबंध आणि सुसंवाद सांस्कृतिक समन्वय” या संकल्पनेच्या अंतर्गत BRICS देशांमधील सांस्कृतिक उपक्रमांच्या प्रगतीसाठी आणि विस्तारासाठी चर्चा झाली.


🔰समतोल आंतरराष्ट्रीय मानवतावादी संवाद स्थापित करण्यासाठी संस्कृतीच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले गेले. देशांकडील हस्तलिखितांमध्ये असलेल्या माहितीच्या अमूल्य खजिन्याचा उपयोग करण्याच्या उद्देशाने, प्राचीन हस्तलिखितांचे जतन, संवर्धन आणि डिजिटलीकरण क्षेत्रात BRICS आघाडी स्थापनेचा प्रस्ताव मांडण्यात आला.

मेरी कोम, मनप्रीत सिंग भारताचे ध्वजवाहक



🔰महान बॉक्सर एम. सी. मेरी कोम आणि पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग हे टोक्यो ऑलिम्पिकच्या  उद्घाटन सोहळ्यासाठी भारताचे ध्वजवाहक असतील. ८ ऑगस्ट रोजी रंगणाऱ्या समारोप सोहळ्यासाठी बजरंग पुनिया याच्याकडे ध्वजवाहकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.


🔰भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) टोक्यो स्पर्धा संयोजन समितीशी चर्चा करून ध्वजवाहकांची निवड केली आहे. लैंगिक समानतेला महत्त्व देत भारताने पुरुष आणि महिलांमधून प्रत्येकी एक असे दोन ध्वजवाहक निवडण्याचे ठरवले होते.


🔰‘‘ही अखेरची ऑलिम्पिक स्पर्धा असल्याने माझ्यासाठी सर्वात आनंदाचा दिवस म्हणता येईल. भारतीय पथकाचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याचा अभिमान वाटत आहे. याबद्दल मी क्रीडा मंत्रालय आणि ‘आयओए’ची ऋणी आहे. यामुळे मला प्रेरणा मिळाली असून देशाला पदक मिळवून देण्याचे आश्वासन मी देते,’’ असे सहा वेळा जगज्जेती ठरलेल्या मेरी कोमने सांगितले.

भारत सरकारचे नवीन 'सहकार मंत्रालय'.



🔰'सहकारातून समृद्धी' हा विकासात्मक दृष्टिकोन वास्तवात उतरवण्यासाठी, भारत सरकारने पूर्णपणे वेगळ्या 'सहकार मंत्रालयाची' स्थापना करण्याचे ऐतिहासिक पाऊल उचलले आहे.


🔰सहकारी संस्थांसाठी 'व्यवसाय सुलभीकरण' प्रक्रिया सुरळीत करण्याचे आणि बहुराज्यीय सहकारी संस्थांच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचे काम, सहकार मंत्रालयाद्वारे होऊ शकेल.


🔰दशातील सहकार चळवळ बळकट करण्यासाठी हे मंत्रालय एक प्रशासकीय, वैधानिक आणि धोरणात्मक चौकट नव्याने निर्माण करू शकेल. त्यामुळे सहकारी संस्थांची मुळे घट्ट रुजून सहकार चळवळीला खऱ्या अर्थाने जनाधार मिळू शकेल.


🅾️‘सहकार’ या संज्ञेची व्याख्या...


🔰मानवप्राणी जातीतील समूहजीवन जगण्याची उपजत असणारी सहजप्रवृत्ती तसेच पारस्परिक सहकार्य करण्याची पद्धत म्हणजे सहकार होय. तांत्रिकदृष्टया सहकार म्हणजे विशेष पद्धतीने व्यवसाय करण्याचा प्रकार होय. सहकार हा को-ऑपरेशन या इंग्रजी शब्दाचा मराठी पारिभाषिक शब्द आहे.


🔰रॉबर्ट ओएन हे आधुनिक सहकारी चळवळीचे जनक होय. वयाच्या एकविसाव्या वर्षी स्कॉटलंडमधील गिरणीत ते भागीदार बनले. अमेरिकेतील इंडियाना येथे त्याने ‘ न्यू हार्मनी कॉलनी’ ही सहकारी वसाहत स्थापन केली. 


🔰गरेट ब्रिटनमधील रॉचडेल या सुती कापड गिरण्यांच्या छोटया गावातील 28 कामगारांनी 21 डिसेंबर 1844 रोजी इक्विटेबल पायोनिअर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी नावाच्या सहकारी भांडाराची स्थापना केली. त्यांनी स्वीकारलेली तत्त्वे सहकार चळवळीला मार्गदर्शक ठरली. सहकारी चळवळीतील उपक्रम सहकारी पद्धतीने, स्वेच्छेने व लोकशाही पद्धतीने चालविले जातात.

न्याय विभागाचा ‘टेली-लॉ’ कार्यक्रम.



🔰भारत सरकारच्या न्याय विभागाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘टेली-लॉ’.कार्यक्रमाच्या अंतर्गत 9 लक्ष लाभार्थ्यांचा महत्वपूर्ण टप्पा गाठण्यात आला आहे. हे यश साजरे करण्यासाठी आणि “आझादी का अमृत महोत्सव”चा प्रारंभ करण्यासाठी न्याय विभागाने 6 जुलै 2021 रोजी नवी दिल्लीत एक कार्यक्रम आयोजित केला होता.


🅾️ठळक बाबी...


🔰सामान्य नागरिकांच्या दैनंदिन सामाजिक समस्या / संघर्षाचे निराकरण करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी सुरु केलेल्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यात नागरिकांना मदत करण्यासाठी VLE, PLV, राज्य समन्वयक आणि पॅनेल वकिलांची मदत होते.


🔰टली-लॉ उपक्रमाने 2017 साली 1800 CSC केंद्रांच्या माध्यमातून 11 राज्यातील 170 जिल्ह्यांमधून प्रवास सुरु केला. 2019 साली CSC केंद्रांची संख्या 29,860 पर्यंत नेताना 115 महत्वाकांक्षी जिल्हे जोडले गेले. आज 50,000 CSC व्यापलेल्या 34 राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील 633 जिल्ह्यात टेली-लॉ कार्यरत आहे.


🔰गल्या एका वर्षात टेली-लॉ उपक्रमाने लाभार्थींच्या संख्येत 369 टक्के वाढ नोंदवली. जून 2021 महिन्यात टेली-लॉ उपक्रमाद्वारे 9.5 लक्षाहून अधिक नागरिकांना लाभ मिळाला आहे.

क्लिनिकल ट्रायल रेजिस्ट्री ऑफ इंडिया.



🔰(CTRI) संकेतस्थळावरील आयुर्वेद-विषयक माहितीसंग्रह

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (CCRAS) या संस्थांच्या मदतीने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने क्लिनिकल ट्रायल रेजिस्ट्री ऑफ इंडिया (CTRI) संकेतस्थळावरील आयुर्वेदाच्या विषयाशी संबंधित माहितीसंग्रह तयार केला आहे.


🔰5 जुलै 2021 रोजी आयुष मंत्रालयाकडून CTRI याचा भाग असलेल्या अमर (AMAR), RMIS, SAHI आणि ई-मेधा (e-MEDHA) या चार महत्त्वाच्या संकेतस्थळांचे उद्घाटन करण्यात आले. ही संकेतस्थळे केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (CCRAS) याने तयार केली आहेत.


🔰अमर / AMAR (Ayush Manuscripts Advanced Repository) हे आयुर्वेद, योग, युनानी, सिद्ध आणि सोवा-रिग्पा यांच्या संदर्भात हस्तलिखिते व सूचिपत्रे यांसाठी डिजिटल भांडार आहे.


🔰CCRAS-संशोधन व्यवस्थापन माहिती प्रणाली (RMIS) हे संकेतस्थळ आयुर्वेद आधारित अभ्यासाच्या संशोधन आणि विकासासाठी एक-स्थळ उपाय असेल.


🔰ई-मेधा (इलेक्ट्रॉनिक मेडिकल हेरिटेज अॅक्सेशन) संकेतस्थळावर NIC याच्या ई-ग्रंथालय मंचाच्या माध्यमातून 12 हजारपेक्षा जास्त भारतीय वैद्यकीयशास्त

शालेय शिक्षण व साक्षरता विभागाचा “निपुण भारत” उपक्रम..


⏹कद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने 5 जुलै 2021 रोजी “निपुण भारत (समजून घेत वाचनातील प्राविण्य मिळवणे आणि संख्यावाचन यासाठी राष्ट्रीय उपक्रम - NIPUN)” उपक्रमाचा प्रारंभ केला.


⏹या उपक्रमाचे पायाभूत साक्षरता आणि अंक साक्षरतेचे सार्वभौम अधिग्रहण सुनिश्चित करण्यासाठी सक्षम वातावरण निर्माण करणे हे लक्ष्य आहे, जेणेकरुन प्रत्येक मुलाला वर्ष 2026-27 पर्यंत त्याच्या तिसऱ्या इयत्तेपर्यंत वाचन, लेखन आणि अंकलेखन या विषयात आवश्यक शैक्षणिक क्षमता प्राप्त होईल.


⏹हा उपक्रम शालेय शिक्षण व साक्षरता विभाग राबविणार असून “समग्र शिक्षा” या नावाने या केंद्र-पुरस्कृत योजनेच्या अंतर्गत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रीय-राज्य-जिल्हा-गट-शाळा पातळीवर योजनेची पाच स्तरीय अंमलबजावणी करणारी यंत्रणा कार्यरत करण्यात येईल.

पर्यावरण आणीबाणी घोषित करणारे देश



🇬🇧 बरिटन : ०१ मे २०१९

🇮🇪 आयर्लंड : ०९ मे २०१९

🇵🇹 पोर्तुगाल : ०७ जून २०१९

🇨🇦 कनडा : १७ जून २०१९ 

🇫🇷 फरान्स : २७ जून २०१९

🇦🇷 अर्जेंटिना : १७ जुलै २०१९

🇪🇸 सपेन : १७ सप्टेंबर २०१९

🇦🇹 ऑस्ट्रीया : २५ सप्टेंबर २०१९

🇧🇩 बांग्लादेश : १३ नोव्हेंबर २०१९

🇪🇺 यरोपियन युनियन : २८ नोव्हेंबर

🇮🇹 इटली : १२ डिसेंबर २०१९

🇦🇩 अडोरा : २३ जानेवारी २०२०

🇲🇻 मालदीव : १२ फेब्रुवारी २०२०

🇰🇷 दक्षिण कोरिया : २४ सप्टेंबर २०२०

🇯🇵 जपान : २० नोव्हेंबर २०२०

🇳🇿 नयुझीलंड : ०२ डिसेंबर २०२०

🇸🇬 सिंगापूर : ०१ फेब्रुवारी २०२१ .

वेगवेगळ्या क्षेत्रातील पहिल्या भारतीय महिला



1] अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग: भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच फायटर पायलट ‘सुपरसॉनिक फायटर जेट’ विमानं उडवणाऱ्या महिला


2] इंदिरा गांधी: देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान


3] कल्पना चावला: अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला


4] दुर्गाबाई कामत: दुर्गाबाई कामत या पहिल्या भारतीय महिला अभिनेत्री होत्या.


5] प्रिया जिंघन: भारतीय सैन्यात भरती होणाऱ्या पहिल्या महिला


6] पी.व्ही.सिंधू: रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही.सिंधूने रौप्य पदकाची कमाई केली. ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई करणारी पहिली महिला ठरली


7] आनंदीबाई गोपाळ जोशी: भारतातील पहिल्या महिला डॉक्टर. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वेळप्रसंगी समाजाचा रोष पत्करून आनंदीबाई शिकल्या, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान त्यांनी मिळवला.


8] अदिती पंत: अंटार्टिकावर जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला


9] बचेंद्री पाल: या एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. १९९४ साली त्यांनी जगातील सर्वात उंच शिखर सर केले. भारत सरकारने २०१९ साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.


10] रिटा फेरिया पॉल: मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी पहिली भारतीय महिला


11] हिना सिंधू: वर्ल्डकप शुटिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला.


12] मिताली राज: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६००० धावांचा टप्पा पार करणारी पहिली भारतीय महिला. एकदिवसीय सामन्यात २०० एकदिवसीय सामने खेळणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू आहे


13] होमी वरारावाला: छायाचित्रकार म्हणून प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या (फोटो जर्नालिस्ट) पहिल्या भारतीय महिला साडी नेसून खांद्यावर कॅमेरा घेतलेला त्यांचा फोटो त्या काळाची प्रचिती देतो.


14] सायना नेहवाल: ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू


15] फातिमा बेवी: सर्वोच्च न्यायलयातील पहिल्या महिला न्यायाधीश


16] दीपा मलिक: २०१६ साली रिओ येथे झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला


17] पी. टी. उषा: ऑलिम्पिक खेळांच्या अंतिम फेरीपर्यंत पोहचणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खेळाडू

QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी :- आशिया 2020



◆ 27 नोव्हेंबर 2019 रोजी जाहीर

◆ जाहीर करणारी संस्था :- Quacquarelli Symonds(QS)

◆ पहिल्यांदा जाहीर :- 2014

◆ 96 भारतीय विद्यापीठांचा समावेश

◆ सिंगापूर विद्यापीठ सलग दुसऱ्या वर्षी पहिल्या स्थानी.

◆ भारतीय विद्यापीठांमध्ये IIT मुंबई (34) पहिल्या स्थानी.


■ पहिले तीन विद्यापीठ :- 

1) नॅशनल युनिव्हर्सिटी सिंगापूर

2) नानयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (सिंगापूर)

3) युनिव्हर्सिटी ऑफ हॉंगकॉंग


■ भारतीय विद्यापीठांची क्रमवारी :- 

1) IIT मुंबई (34)

2) IIT दिल्ली (43)

3) IIT मद्रास (50)

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...