Thursday, 1 July 2021
महाराष्ट्र कृषी दिन - 1 जुलै
1 जुलै महाराष्ट्र कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. 1 जुलैपासून सुरू होणारा हा आठवडा बऱ्याच ठिकाणी कृषी सप्ताह म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्र हे कृषीप्रधान राज्य आहे. राज्याची आर्थिक व्यवस्था मुख्यतः कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे.त्यामुळे महाराष्ट्रात कृषी दिनाचे खुप महत्व आहे.
का साजरा केला जातो हा दिवस
• हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 1 जुलै दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.
• कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून महाराष्ट्र सरकारने १ जुलैला कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला.
• महाराष्ट्रामध्ये हरित क्रांती आणण्यामध्ये वसंतराव नाईक यांचा मोलाचा वाटा होता. कृषीविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल, याकडे वसंतराव नाईक यांनी लक्ष दिले होते.
• वसंतराव नाईक यांनी त्यावेळची मर्यादित साधने आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन राज्यात कृषीक्रांती घडवून आणली.त्यांनी राज्यात 'कृषी विद्यापीठा'ची स्थापना केली. शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करुन अन्न-धान्याच्या दुष्काळावर मात केली.
• १९७२ च्या दुष्काळाचे संकट त्यांनी आव्हान म्हणून स्विकारले आणि दुष्काळनिवारणाचा शाश्वत मार्ग दाखवला. राज्यभर हा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जातो.
गगनयान मोहीम डिसेंबरमध्ये
🔰भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोचे मानवरहित गगनयान डिसेंबरमध्ये अवकाशात झेपावणार आहे. मानवी अवकाश मोहिमेची ही पूर्वतयारी असून कोविड १९ टाळेबंदीमुळे ही अवकाश मोहिम मागे पडत चालली होती, त्याला आता गती देण्यात येत आहे.
🔰टाळेबंदीमुळे अवकाशयानासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीची वाहतूक विस्कळीत झाली होती. गगनयान योजनेत एकूण दोन मानवरहित उड्डाणे होणार असून नंतर भारतीय व्यक्तींना अवकाशाची सफर करण्याची संधी मिळणार आहे. करोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेने या मोहिमेला मोठा फटका दिल्याचे बेंगळुरूत मुख्यालय असलेल्या इस्रो या संस्थेने म्हटले आहे.
🔰अवकाशयानासाठी लागणारी यंत्रसामग्री देशाच्या विविध भागातून गोळा करण्यात येत होती, पण कोविड टाळेबंदीमुळे त्यावर विपरित परिणाम झाला होता. यानाची रचना, विश्लेषण व दस्तावेजीकरण इस्रोने केले असून यंत्रसामग्री देशी उद्योग पुरवित आहेत.
🔰कद्रीय अवकाश राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी फेब्रुवारीत म्हटले होते, की यावर्षी डिसेंबरमध्ये पहिले मानवरहित अवकाशयान उड्डाण करेल. दुसरे मानवरहित यान २०२२-२३ मध्ये उड्डाण करील व त्यानंतर मानवी अवकाश मोहीम होईल.
‘एक देश एक शिधापत्रिका’ योजना ३१ जुलैपर्यंत लागू करण्याचे आदेश
एक देश, एक शिधापत्रिका योजना ३१ जुलैपर्यंत देशातील राज्ये व केंद्रशासित प्रदेशात लागू करण्यात यावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला आहे. स्थलांतरित मजुरांना कोविड १९ स्थिती कायम असेपर्यंत कोरडा शिधा स्वस्त धान्य दुकानांमार्फत उपलब्ध करावा, असा आदेशही केंद्र सरकारला देण्यात आला आहे.
🔰नया. अशोक भूषण व न्या. एम.आर शहा यांनी तीन कार्यकर्त्यांच्या विनंतीवर हे आदेश जारी केले असून त्यात केंद्र व राज्य सरकारांना अन्न सुरक्षा, रोख हस्तांतर व इतर कल्याणकारी योजना लागू करण्यास सांगितले आहे. संचारबंदी व टाळेबंदीमुळे स्थलांतरित कामगारांचे रोजगार गेले आहेत. दुसऱ्या लाटेतही मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. एक देश एक शिधापत्रिका योजना गरीब नागरिकांच्या कल्याणासाठी असून त्यांना त्यांच्या इतर राज्यातील कामाच्या ठिकाणी शिधा उपलब्ध करून द्यावा. तिथे त्यांची शिधापत्रिका कुठे नोदली गेली आहे याचा विचार करू नये.
🔰नयायालयाने केंद्राला असा आदेश दिला की, नॅशनल इनफॉर्मेटिक सेंटरने असंघटिक कामगारांना लाभ देण्यासाठी त्यांची नोंदणी करण्यात मदत करावी. सर्व कल्याणकारी योजना ३१ जुलैपासून लागू करण्यात याव्यात. राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांनी स्थलांतरित कामगारांसाठी कोविड साथ सुरू असेपर्यंत सामूहिक स्वयंपाक योजना राबवावी , कामगारांना शिधा देण्यासाठी केंद्राने पुरवठा करावा. ३१ जुलैपर्यंत शिधासह सर्व योजना लागू करण्यात याव्यात. आंतरराज्य स्थलांतरित कामगारांसाठीचे कंत्राटदार व आस्थापनांची रोजगार व सेवा नियम कायदा १९७९ अन्वये नोंदणी करण्यात यावी.
महाराष्ट्रातील प्रमुख विद्यापीठे, स्थापना व ठिकाण.
🅾️विद्यापीठ/स्थापना ठिकाण/स्थान
🅾️ मबई विद्यापीठ (१८५७) - मुंबई
🅾️पणे विद्यापीठ (१९४९) - पुणे
🅾️राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (१९२५)- नागपूर
🅾️कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ (१९८३)- अमरावती
🅾️ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ (१९५८)- औरंगाबाद
🅾️शिवाजी विद्यापीठ (१९६३) - कोल्हापूर
🅾️यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ , नाशिक (१९८८)
🅾️ नाशिक महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (१९९८) - नाशिक
🅾️डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ (१९८९)- लोणेरे (रायगड)
🅾️उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ (१९८९) - जळगाव
🅾️कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ (१९९८)- रामटेक (नागपूर)
🅾️सवामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ (१९९४) - नांदेड
चीनची पहिली ‘बुलेट ट्रेन’ भारतीय सीमेलगत सुरू
🔰तिबेट या हिमालयातील भागात चीनने शुक्रवारी संपूर्णपणे विजेवर चालणारी बुलेट ट्रेन सुरू केली असून ती राजधानी ल्हासा व न्यायिंगची यांना जोडणारी आहे. अरुणाचल प्रदेश लगत असलेल्या एका शहराजवळून ही रेल्वे जाते.
🔰लहासा- न्यायिंगची यांना जोडणारा शिचुआन-तिबेट रेल्वेमार्ग तयार करण्यात आला असून त्याचे उद्घाटन १ जुलैला चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दीनिमित्त होणार आहे. तिबेट स्वायत्त प्रदेशात विद्युत बुलेट ट्रेन शुक्रवारी सकाळी सुरू झाली असून तिचा वेग ताशी १६० कि.मी आहे.
🔰एकेरी मार्गावरून ही रेल्वे धावणार असून ती ल्हासा, शन्नान, न्यायिंगची यासह नऊ स्थानकांवर थांबेल. प्रवासी व मालवाहतूक त्यातून केली जाणार असून रस्ता मार्गापेक्षा ल्हासा- न्यायिंगची अंतर ५ तासांवरून ३.५ तासांवर येणार आहे. शन्नान व न्यायिंगची यांच्यातील प्रवासाचा काळ ६ तासांवरून दोन तासांवर येणार आहे.
युरोपियन युनियनच्या ‘ग्रीन पास’ यादीत ‘कोविशिल्ड’ का नाही?; EMA ने सांगितलं कारण :
🔰युरोपमध्ये जाण्याच्या तयारीत असणाऱ्या आणि कोविशिल्ड लस घेतलेल्या भारतीयांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. त्याचं कारण म्हणजे भारतात मोठ्या प्रमाणात लसीकरणासाठी वापरल्या जात असलेल्या कोविशिल्ड लसीला युरोपियन युनियनने मंजुरीच दिलेली नाही.
🔰तयामुळे ग्रीन पास मिळणं कठिण झालं असून, भारतातून युरोपातील देशात जाण्यात समस्या निर्माण होणार आहेत. यासंदर्भात सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पुनावाला यांनी दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. तर तिकडे युरोपियन मेडिसिन एजन्सी अर्थात EMA ने कोविशिल्ड लस ग्रीन पास यादीत नसण्याच्या कारणाचा खुलासा केला आहे.
🔰यरोपियन युनियनने ग्रीन पास पद्धती सुरू केली आहे. यात युरोपियन मेडिसिन एजन्सीने (EMA) काही लसींना मंजुरी दिलेली आहे. मंजुरी दिलेली लस घेतलेल्या परदेशी प्रवाशांनाच युरोपमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असणारा ग्रीन पास दिला जाणार आहे. हा ग्रीन पास मिळाल्यानंतर ती व्यक्ती युरोपातील २७ देशांमध्ये जाऊ शकते.
🔰ही ग्रीन पास पद्धती १ जुलैपासून संपूर्ण युरोपात लागू केली जाणार आहे. तर स्पेन, जर्मनी, ग्रीस, पोलंड आदी देशांनी याची अमलबजाणी सुरू केली आहे. दरम्यान, ग्रीन पास मिळवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लसीच्या यादीत भारतातील कोविशिल्ड लसीचा समावेशच केलेला नसल्यानं समस्या निर्माण झाली आहे.
महत्त्वाचे प्रश्न
1) प्रश्न :- भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर :- रामनाथ कोविंद (14 वे)
2) प्रश्न :- भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर :- वैकय्या नायडू (13 वे)
3) प्रश्न :- भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?
उत्तर :- नरेंद्र दामोदरदास मोदी (15 वे)
4) प्रश्न :- भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?
उत्तर :- अमित शहा (29 वे)
5) प्रश्न :- भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?
उत्तर :- राजनाथ सिंग (27 वे)
6) प्रश्न :- सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- ओम बिर्ला (18 वे)
7) प्रश्न :- भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत?
उत्तर :- निर्मला सीतारमन (23 वे)
8) प्रश्न :- सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायधिश कोण आहेत?
उत्तर :- शरद बोबडे (47 वे)
9) प्रश्न :- रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?
उत्तर :- शक्तीकांत दास (25 वे)
10) प्रश्न :- भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत?
उत्तर :- जनरल बिपीन रावत
11) प्रश्न :- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?
उत्तर :- अजित डोवाल
12) प्रश्न :- भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?
उत्तर :- दत्ता पडसलगीकर
13) प्रश्न :- सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत?
उत्तर :- पियुष गोयल
14) प्रश्न :- भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?
उत्तर :- राज्य 28 केंद्रशासित प्रदेश 8
15) प्रश्न :- सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर :- राजीव कुमार ( 1 सप्टेंबर 2020 )
16) प्रश्न :- महाराष्ट्रा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर :- यु.पी.एस.मदान
17) प्रश्न :- सध्या भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
उत्तर :- लेह ( लदाख )
18) प्रश्न :- भारताचे थालसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- मनोज मुकुंद नरवाने
19) प्रश्न :- भारताचे वायुसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- आर.के.एस.भदौरिया
20) प्रश्न :- भारताच्या नौसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- एडमिरल कर्मबिर सिंह
जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
💐 गौतम बुद्धांना कोणत्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली ?
🎈गया.( बोधगया )
💐गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती कोणत्या पौर्णिमेला झाली ?
🎈वशाख पौर्णिमा.
💐 गौतम बुद्धांचे पहिले प्रवचन कोठे झाले ?
🎈सारनाथ.
💐 गौतम बुद्धांनी प्रथम किती लोकांना दीक्षा दिली ?
🎈पाच.
💐 बौद्ध धम्मातील त्रिरत्ने कोणती ?
🎈बद्ध,धम्म,संघ.
💐 तरिपिटक या बौद्ध धम्मग्रंथाचे किती भाग पाडण्यात आले आहे ?
🎈तीन.
💐जगामध्ये दु:ख आहे हे कोणी सांगितले ?
🎈गौतम बुद्ध.
💐 गौतम बुद्धांचे पत्नीचे नाव काय होते ?
🎈यशोधरा.
💐 गौतम बुद्धांचे मुलाचे नाव काय होते ?
🎈राहूल.
💐 'लाईट ऑफ एशिया' म्हणून कोणाला ओळखले जाते ?
🎈तथागत गौतम बुद्ध.
प्रश्नमंजुषा
1 '' स्मार्ट ब्लँक बोर्ड '' योजना राज्यात लागु केली गेली आहे ?
1) अरूणाचल प्रदेश
2)महाराष्ट्र
3)तामिळनाडू✅✅
4)गुजरात
2. कोणत्या देशाने २०२६ पर्यंत चंद्रावर अणुभट्टी स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे ?
भारत
चीन
अमेरिका ✔️✔️
इस्त्राईल
3. जायकवाडी प्रकल्प तयार करण्यासाठी भारताला कोणत्या देशाने मदत केली ?
अमेरिका
फ्रान्स
रशिया
जपान✔️✔️
4. कोणत्या राज्य सरकारने "एक मास्क अनेक जिंदगी " मोहिम राबविण्यास सुरूवात केली?
राजस्थान
मध्यप्रदेश✔️✔️
महाराष्ट्र
5. आशियातील एकमात्र ठिकाण जेथे सौर तलावाचे निर्माण होत आहे , ते कोठे आहे ?
भूज ( गुजरात )
कच्छ ( गुजरात )✔️✔️
मुत्पनडल ( तामिळनाडू )
मनिकरण ( हिमाचल प्रदेश )
6. GSTला मान्यता देणारे पहिले राज्य कोणते?
छत्तीसगड़
आसाम✅✅
बिहार
झारखंड
7. भारतीय कृषी अनुसंधान संस्था कोठे आहे ?
कानपूर
मुंबई
नवी दिल्ली✔️✔️
कर्नाल
8.सरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोणत्या शहरात भारताच्या पहिल्या प्रगत ' हायपरसॉनिक विंड टनेल ' चे उद्घाटन केले ?
दिल्ली
तिरुअनंतपुरम
हैदराबाद ✔️✔️
इंदौर
9. भारताचे प्रथम लिंग डेटा केंद्र ...... मध्ये स्थापित केले जाईल ?
मुंबई
केरळ ✔️✔️
दिल्ली
हैदराबाद
10. '' बँक टू व्हिलेज '' कार्यक्रमाचा तिसरा टप्पा कोणत्या राज्यात वा केंद्रशासित प्रदेशात राबविण्यात येणार आहे ?
1) दिल्ली
2) गोवा
3) जम्मु काश्मिर✅✅
4) दमण - दीव
कोणत्या राज्य सरकारकडून नुकतेच वर्ष 2021-2022 च्या अर्थसंकल्पात कोणत्या ठिकाणी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर म्युझियम आणि मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट स्थापन करण्यास मंजूरी दिली.
पंजाब सरकारकडून
● कोणत्या देशात सर्वात प्राचीन मानवी थडगे सापडले?
उत्तर: केनिया.
● 'चेकमेट कोविड इनिशिएटीव्ह' चा प्रारंभ कोणत्या संस्थेने केला?
उत्तर: अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघ.
● आरबीआय मान्य कर्ज देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या 'एसएलटीआरओ' संज्ञेचे पूर्ण नाव काय?
उत्तर: स्पेशल लाँग टॉम रेपो ऑपरेशन्स.
● '2021 ग्लोबल रिपोर्ट ऑन फूड क्रायसेस' हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला?
उत्तर: ग्लोबल नेटवर्क अगेन्स्ट फूड क्रायसेस.
● भारताच्या ईशान्य भागाला कोणत्या श्रेणीचे भूकंप क्षेत्र म्हणून दर्शविले गेले आहे?
उत्तर: भूकंप क्षेत्र V.
● सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागास वर्ग यांची ओळख पटवण्याचे व सूचित करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत?
उत्तर: राष्ट्रपती.
● आयडीबीआय बँकेच्या प्रवर्तक, व्यवस्थापन नियंत्रणाचा अधिकार कोणत्या संस्थेला आहे?
उत्तर: एलआयसी.
● ऑफिस ऑफ फॉरेन ॲसेटस कंट्रोल ही संस्था कोणत्या देशात आहे?
उत्तर: संयुक्त राज्य अमेरिका.
1) कोणाच्या शिफारशी शिवाय धन विधेयक विधानसभेत मांडता येत नाही.
A) मुख्यमंत्री
B) राज्यपाल✔️✔️
C) राष्ट्रपती
D) विधानसभा अध्यक्ष
2) भारतीय रेल्वे संदर्भात कोणते विधान सत्य आहे.
अ) रेल्वे वाहतुकीचा बाजार हिस्सा थोडाच वाढला आहे
ब) अपुरे क्षमता जाळे आणि पायाभूत सुविधा या समस्यांचा रेल्वे सामना करावा लागतो.
पर्याय:-
A) अ, ब दोन्ही बरोबर
B) अ , ब दोन्हीं चुक
C) अ बरोबर
D) ब बरोबर✔️✔️
3) सर्व शिक्षा अभियान यांच्याकडून राबविले जाते.
A) केंद्र शासन
B) राज्य शासन
C) केंद्र आणि राज्य शासन दोन्ही✔️✔️
D) वरीलपैकी नाही.
4 ) सन 2011 मध्ये साक्षरता दरासंदर्भात खालील राज्यांची घटत्या क्रमाने मांडणी करा.
अ) पश्चिम बंगाल
ब) महाराष्ट्र
क) हिमाचल प्रदेश
A) अ, ब,क
B) क, ब, अ✔️✔️
C) ब, क, अ
D) ब , अ, क
5) कोणते विधान बरोबर आहे.
अ) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिम 2015 मध्ये सुरू करण्यात आली.
ब) राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहिमेचा हेतू आणि कुटुंबकल्याण कार्यक्रमाना बळकटी देणे हा आहे.
A) अ बरोबर
B) ब बरोबर ✔️✔️
C) अ ,ब दोन्ही बरोबर
D) अ, ब दोन्ही चूक
6) पुढील दोन विधानापैकी कोणते योग्य आहे.
अ) भारतातील सर्व खेडी सर्व हवामान रस्त्यांनी जोडण्याचे उद्दिष्ट दहाव्या पंचवार्षिक योजनेत होते.
ब) राष्ट्रीय व राज्य रस्ते किमान दुमार्गी श्रेणीचे करायचे हे 12 व्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट आहे.
A) अ
B) ब
C) अ , ब दोन्ही बरोबर✔️✔️
D) एक ही नाही
7) भारत निर्माण कार्यक्रम 2005 या ग्रामीण भागात पायाभूत सुविधा कोणत्या आहेत.
अ) जलसिंचन व ग्रामीण रस्ते
ब) ग्रामीण निवारा
क) ग्रामीण पाणीपुरवठा
ड) ग्रामीण विद्युतीकरण
इ) ग्रामीण दूरध्वनी
A) ब ,क, ड
B) अ, ब, क, ड
C) अ, क, ड, इ
D) अ, ब, क, ड, इ✔️✔️
8) सन 2009 साठी आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट परिषदे ने 5-15 दशलक्ष प्रवासी वाहतूक हाताळणाऱ्या विमानतळा मध्ये कोणत्या विमानतळा जगातील उत्कृष्ट म्हणून गौरविले आहे.
A) एअरपोर्ट नवी दिल्ली
B) एअरपोर्ट मुंबई
C) एअरपोर्ट शमशाबाद हैदराबाद
D) एअरपोर्ट बेंगलोर
9 ) सार्वजनिक क्षेत्रातील वीज निर्मितीत खालीलपैकी कोणत्या प्रकारचे वीजनिर्मितीचा वाटत सर्वाधिक आहे.
अ) जलविद्युत
ब) औण्विक विद्युत
क) अनुउर्जा
ड) पवन ऊर्जा
A) फक्त अ
B) फक्त ब✔️
C) अ आणि ब
D) अ, ब, ड, क
10) ग्रामीण भागात शहरी सुखसोयी चे प्रावधान हे पुढील पैकी कोणाचे ग्रामीण भारताच्या प्रवक्ता त्यांचे स्वप्न आहे.
A) डॉ. मनमोहन सिंग
B) डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम✔️
C) सी रंगराजन
D) डॉ. अमर्त्य सेन
Jp) स्वामी विवेकानंदांचे स्मारक कोठे स्थित आहे.
उत्तर::- कन्याकुमारी
चालू घडामोडीचे प्रश्न व उत्तरे
Q1) कोणती आदिवासी जात ‘अनामलाई व्याघ्र प्रकल्प’ येथे वास्तव्यास आहे?
उत्तर :- पुलियार
Q2) कोणत्या संस्थेने ‘ग्लोबल टास्क फोर्स ऑन पॅनडेमीक रिस्पॉन्स’ याची स्थापना केली?
उत्तर :- यूएस चेंबर ऑफ कॉमर्स
Q3) कोण ‘मॅड्रिड ओपन 2021’ या टेनिस स्पर्धेत महिला एकेरी गटाची विजेती ठरली?
उत्तर :- आर्यना सबलेन्का
Q4) कोणत्या संस्थेने ‘ई-संजीवनी ओपीडी’ उपक्रमाचा प्रारंभ केला?
उत्तर :- आर्म्ड फोर्स वेटेरन डॉक्टर्स
Q5) कोणत्या शहराने ‘नाइट फ्रँक प्राइम ग्लोबल सिटीझ इंडेक्स Q1 2021’ या यादीत प्रथम क्रमांक पटकावला?
उत्तर :- शेन्झेन
Q6) कोणत्या संकल्पनेखाली 2021 या वर्षी ‘जागतिक रेडक्रॉस व रेड क्रिसेंट दिवस’ साजरा करण्यात आला?
उत्तर :- अनस्टॉपेबल
Q7) ‘द बेंच’ या बाल पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर :- मेघन मर्केल
Q8) कोणत्या दिवशी सीमा रस्ते संघटना (BRO) याचा स्थापना दिवस साजरा केला जातो?
उत्तर :- 7 मे
Q9) कोणत्या राज्यात लसींच्या दृष्टीपलीकडील वितरणासाठी प्रायोगिक तत्वावर ड्रोन यंत्राचा वापर करण्याची सशर्त परवानगी मिळाली?
उत्तर :- तेलंगणा
Q10) शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींना प्रमाणपत्राचे वाटप करण्याकरिता शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींचे सशक्तीकरण विभागाकडून वापरल्या जाणाऱ्या संकेतस्थळाचे नाव काय आहे?
उत्तर :- युनिक डिसेबिलिटी आयडी
Q11) ऑक्सिजनचे वाटप सुरळीत करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या राष्ट्रीय कृती दलात किती सदस्य आहेत?
उत्तर :- 12
Q12) कोणत्या देशाने तिसरी आर्क्टिक विज्ञान मंत्रीस्तरीय बैठक आयोजित केली?
उत्तर :- जपान
Q13) कोणत्या संस्थेने "2-डीऑक्सी-डी-ग्लूकोज (2-DG)" नामक कोविड-19 प्रतिबंधक औषध विकसित केले?
उत्तर :- संरक्षण संशोधन व विकास संघटना
Q14) कोणत्या रोग वा संसर्गाला ‘म्यूकोरमायकोसिस’ असे देखील म्हणतात?
उत्तर :- ब्लॅक फंगस
Q15) कोण द्वितीय नियामक पुनरावलोकन प्राधिकरण (RRA 2.0) याला सहाय्य करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने नेमलेल्या सल्लागार गटाचे अध्यक्ष आहेत?
उत्तर :- एस. जानकीरमन
Q16) कोणती 2021 साली ‘जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस’ याची संकल्पना आहे?
उत्तर :- सिंग, फ्लाय, सोअर – लाइक ए बर्ड!
Q17) कोणत्या संस्थेने ‘ग्लोबल मिथेन असेसमेंट’ या शीर्षकाचा एक अहवाल प्रसिद्ध केला?
उत्तर :- क्लायमेट अँड क्लीन एअर कोएलिशन
Q18) ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य हे कोणत्या प्रकाराचे अभयारण्य आहे?
उत्तर :- सागरी अभयारण्य
Q19) कोणत्या संस्थेने लेखा आणि लेखापरीक्षण मानदंडांचे पालन करण्यासंबंधी कंपन्या व लेखा परीक्षकांचा तात्पुरता माहितीसंग्रह तयार केला?
उत्तर :- राष्ट्रीय आर्थिक अहवाल प्राधिकरण
Q20)कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या ‘ड्राइव्ह-इन लसीकरण केंद्र’ याचे उद्घाटन झाले?
उत्तर:- मुंबई
प्रश्न१०१) कोणत्या व्यक्तीला मध्यम व दीर्घ अंतर शर्यतीसाठी भारतीय धावपटूंच्या संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली?
उत्तर :- निकोलाई स्नेसारेव
प्रश्न१०२) कोणती व्यक्ती वर्तमानात भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) आहे?
उत्तर :- अजित डोवाल
प्रश्न१०३) कोणत्या देशात लेणीमध्ये चित्रित केलेले जगातले सर्वात प्राचीन ज्ञात भित्तिचित्र शोधले गेले?
उत्तर :- इंडोनेशिया
प्रश्न१०४) कोणत्या अंतराळ संस्थेने ‘पार्कर’ नामक सौरयान तयार केले आहे?
उत्तर :- नासा
प्रश्न१०५) कोणत्या मंत्रालयाला ‘स्कॉच चॅलेंजर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर :- आदिवासी विकास मंत्रालय
प्रश्न१०६) कोणत्या व्यक्तीने सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन (SCBA) याच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला?
उत्तर :- दुष्यंत दवे
प्रश्न१०७) कोणत्या सॉफ्टवेअर कंपनीने आर्थिक समावेशाला प्रोत्साहन देण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेसोबत करार केला?
उत्तर :- फायनॅनष्यल सॉफ्टवेअर अँड सिस्टीम्स
प्रश्न१०८) कोणत्या व्यक्तीची इंटेल कंपनीचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक झाली?
उत्तर :- पॅट जेलसिंगर
प्रश्न१०९) भारतीय संविधानातल्या कोणत्या कलमान्वये ‘सुओ मोतू’च्या अधिकाराची तरतूद आहे?
उत्तर :- कलम 32 आणि कलम 226
प्रश्न११०) कोणत्या देशात ‘सुलावेसी बेट’ आहे?
उत्तर :- इंडोनेशिया
1) कोणत्या देशाने चंद्रावरून नमुने पृथ्वीवर आणले नाही❓
1 संयुक्त संस्थाने
2 रशिया
3 चीन
4 जपान✅
2) प्रोजेक्ट 17 ए अंतर्गत गार्डन रीच शिपबिलडस अॅड इंजिनियर्स लिमिटेड (𝙂𝙍𝙎𝙀) निर्मित हिमगिरी कोणत्या प्रकारचे जहाज आहे❓
1 युद्ध नौका✅
2 विनाशिका
3 कार्वट
4 कूझर
3) कोणत्या शहरात भारतीय रिझर्व्ह बँक एक स्वयंचलित बॅक नोट प्रोसेसिंग सेंटर ( 𝘼𝘽𝙋𝘾 ) यांची स्थापना करणार आहे❓
1 अहमदाबाद
2 मुंबई
3 जयपुर ✅
4 बंगळुरू
4) कोणते वर्ष शाश्वत विकासासाठी रचनात्मक अर्थव्यवस्थेचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून पाळला जाणार आहे❓
1 2020
2 2021 ✅
3 2022
4 2019
5) खालील पैकी कोणते विधान मिथुन उल्का वर्षावाच्या संदर्भात चुकीचे आहे❓
अ ) उल्का वर्षाव सामान्यपणे डिसेंबर महिन्यात होतो.
*ब) उल्का वर्षावाचे नाव मिथुन राशी वरून ठेवण्यात आले आहे
*क ) मिथुन उल्का वर्षावाच्या उत्पत्तीचे नाव फेथॉन असे आहे
*ड ) मिथुन उल्का वर्षाव धूमकेतू मुळे होतो ✅
6) 2021 प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे कोण असणार आहेत❓
1 थेरेसामि
2 निकेल स्टर्जन
3 बेरिस जॉन्सन ✅
4 निगल फॅरेज
7) इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅकेच्या डिजिटल पेमेंट अँपचे नाव काय ❓
1 इंडिया पोस्ट पेमेंट्स बॅक
2 डाकपे ✅
3 डॉकपे
4 यापैकी नाही
8) कोणत्या संस्थेची विज्ञान यात्रा कार्यक्रम आयोजित केला❓
अ इंडिया असोसिएशन ऑफ कल्टीवेशन ऑफ सायन्स ✅
ब पृथ्वी विज्ञान मंत्रालय
क सामाजिक न्याय व सशक्ती करण मंत्रालय
ड शिक्षण मंत्रालय
9) कोणत्या राज्यात जगातल्या सर्वात मोठा सौर व पवन ऊर्जा प्रकल्प उभारला जात आहे❓
1 केरळ
2 महाराष्ट्र
3 आंध्र प्रदेश
4 गुजरात ✅
10) पुढील वाक्पचाराचा अर्थ सांगा
पाचावर धारण बसणे
१ मनात स़ख्या मोजणे
२. पंचप्रमाण धारण करणे
३. खूप भयभीत होते ✅
४. ऐसपैस बसणे
चालू घडामोडी प्रश्नसंच
१) संपुर्ण सौरऊर्जेवर चालणाऱ्या भारतातील पहिल्या गावाचा मान कोणाला मिळाला ?
अ) चारगाव ( महाराष्ट्र )
ब) पुरूलिया गाव ( पश्चिम बंगाल ) ✅✅
क) लेंट ( दिल्ली )
ड) दांडी ( गुजरात )
२) महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प २०२०-२१ वर्षांकरिता विधानसभेत कोणी मांडला ?
अ) अजित पवार ✅✅
ब) उद्धव ठाकरे
क) दीपक केसरकर
ड) सुभाष देसाई
३) महाविकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प २०२०-२१ वर्षांकरिता विधानसभेत कधी मांडला गेला ?
अ) ५ मार्च २०२०
ब) ७ मार्च २०२०
क) ६ मार्च २०२० ✅✅
ड) यापैकी नाही
४) भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने कोणत्या ठिकाणी गिडी रडार प्रणालीची स्थापना केली ?
अ) महेंद्रगिरी
ब) तिरूपती ✅✅
क) श्रीहरिकोटा
ड) बद्रीनाथ
५) भारतीय नौदलात कोणती गस्ती नौका २८ फेब्रुवारी २०२० मध्ये सामील करण्यात आली ?
अ) INS विराट
ब) वरद ✅✅
क) निलगिरी
ड) सिंधुरक्षक
१) पहिल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रिडा स्पर्धा २०२० मध्ये किती वर्षांखालील खेळाडूंना स्थान देण्यात आले होते ?
अ) २५ वर्षांखालील ✅✅
ब) १७ वर्षांखालील
क) २३ वर्षांखालील
ड) २१ वर्षांखालील
२) शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला जातो ?
अ) ५ मार्च
ब) १ मार्च ✅✅
क) ६ मार्च
ड) २ मार्च
३) खालीलपैकी कोणाची केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे ?
अ) डॉ. राजीव कुमार
ब) सुनील अरोरा
क) सामंत गोयल
ड) विमल जुल्का ✅✅
४) मिताग नावाचे चक्रीवादळ आॅक्टोबर २०१९ मध्ये कोणत्या देशात आले होते ?
अ) तैवान ✅✅
ब) चीन
क) जपान
ड) रशिया
५) मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
अ) जलसंवर्धन
ब) जलसिंचन
क) लसीकरण ✅✅
ड) कृत्रिम पाऊस
२०१९-२० मध्ये देशात निर्माण झालेले नवीन जिल्हे
🔱 जिल्हा : बाजली
✅ राज्य : आसाम
🔱 जिल्हा : गौरेला पेंद्रा मरवाही
✅ राज्य : छत्तीसगड
🔱 जिल्हा : विजयनगरा
✅ राज्य : कर्नाटक
🔱 जिल्हा : चेंगालपट्टु
✅ राज्य : तमिळनाडू
🔱 जिल्हा : कल्लाकुरुची
✅ राज्य : तमिळनाडू
🔱 जिल्हा : मयिलादूथुराई
✅ राज्य : तमिळनाडू
🔱 जिल्हा : रानिपेट
✅ राज्य : तमिळनाडू
🔱 जिल्हा : टेंकासी
✅ राज्य : तमिळनाडू
🔱 जिल्हा : तिरुपत्तूर
✅ राज्य : तमिळनाडू
Latest post
आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024
🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे 🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...
-
संपूर्ण महाराष्ट्राला सोपा जाणारा Geography हा विषय आहे....मग नेमकं या मधील कोणते घटक व्यवस्थित अभ्यासले पाहिजेत. खालील प्रत्येक Points एकदम...
-
🎯टाइम मॅगझिन एथिलिट ऑफ द इयर 2023 :- लिओनेल मेस्सी 🎯टाइम पर्सन ऑफ द इयर 2023 टेलर स्विफ्ट 🎯पाहिला वणभुषण 2024 चैत्राम पवार 🎯महाराष्ट्र भ...
-
विज्ञान विषयाची तयारी करताना लक्षात घ्यायला हवे की हा सर्वात जास्त input द्यावा लागणारा आणि सर्वात कमी output असणार विषय आहे. Combine पूर्व ...