Friday, 25 June 2021

भारताच्या शाश्वत विकास उद्दिष्टांचा तिसरा निर्देशांक नीति आयोगाद्वारे जाहीर.

✔️ भारताच्या शाश्वत विकास उद्दिष्टांचा तिसरा निर्देशांक, आज नीति आयोगामार्फत जाहीर करण्यात आले.

✔️ या अहवालानुसार देशाचा निर्देशांक ६ अंकांनी वाढला आहे. २०१९ मध्ये तो ६० वर होता, तो आता २०२०-२१ मध्ये ६६ इतका  आहे.

✔️ पिण्याच्या पाण्याची स्वच्छता, सांडपाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था, रास्ते आणि स्वच्छ ऊर्जा या गोष्टींवर देशभरात झालेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे हा निर्देशांक वाढला आहे.

✔️महाराष्ट्रासह केरळ, हिमाचल प्रदेश, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, गोवा, कर्नाटक, उत्तराखंड आणि सिक्कीम या नऊ राज्यांनी सर्वाधिक समाधानकारक कामगिरी केली आहे.

✔️ २०१९ मध्ये सर्वाधिक चुरस असलेली १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश होते. ती संख्या २०२०-२१ मध्ये १२ वर गेली आहे.  

✔️ प्रत्येक राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश यांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांच्या अंमलबजावणीनुसार भारताचा निर्देशांक तयार केला जातो.

✔️डिसेंबर २०१८ पासून सुरू करण्यात आलेला हा निर्देशांक उपक्रम, देशातील शाश्वत विकास उद्दिष्टांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठीचं एक मूलभूत साधन ठरले आहे.

✔️ यामुळे जागतिक शाश्वत विकास उद्दिष्टांमध्ये आपलं स्थान मिळवण्यासाठी विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील स्पर्धा वाढली आहे.

✔️राज्य आणि केंद्रशासित प्रदेश तसेच संयुक्त राष्ट्र संघटना, भारतातील सांख्यिकी आणि. कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय आणि मुख्य केंद्रीय मंत्रालयांशी विस्तृत चर्चा करून नीती आयोगाने हे निर्देशांक तयार केले आहेत.

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...