Monday, 24 May 2021

"एमपीएससी'ची सप्टेंबरमध्ये संयुक्‍त पूर्व परीक्षा?

आयोगाने जिल्हानिहाय कोरोना परिस्थितीचा आढावा घ्यायला सुरवात केली आहे. लॉकडाउन संपल्यानंतर आयोगाकडून परीक्षेसंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाला विचारणा केली जाईल.


राज्यातील सुमारे तीन लाख विद्यार्थ्यांना "एमपीएससी'च्या (MPSC) संयुक्‍त पूर्व परीक्षेबाबत उत्सुकता लागली आहे. मात्र, राज्यातील 14 जिल्ह्यांमधील कोरोनाची (Covid-19) स्थिती अजूनही सुधारली नसल्याने ही परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. तरीही, सध्याचा लॉकडाउन संपल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या (Disaster Management Department) परवानगीने 18 जुलैला परीक्षा होऊ शकते, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

जूननंतर राज्यात पावसाला सुरवात होते आणि जुलै-ऑगस्टमध्ये मुंबई, रत्नागिरीसह अन्य जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. त्यामुळे या काळात परीक्षा घेणे अशक्‍य आहे. तर ऑक्‍टोबरमध्ये यूपीएससीच्या परीक्षा होणार आहेत. त्यामुळे 18 जुलैपर्यंत परीक्षा न झाल्यास संयुक्‍त पूर्व परीक्षा सप्टेंबरमध्येच होईल, असे आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. आता आयोगाने जिल्हानिहाय कोरोना परिस्थितीचा आढावा घ्यायला सुरवात केली आहे. लॉकडाउन संपल्यानंतर आयोगाकडून परीक्षेसंदर्भात आपत्ती व्यवस्थापन विभागाला विचारणा केली जाईल. त्यानंतर परीक्षेसाठी पोषक वातावरण असल्यास जुलैच्या मध्यावधीत परीक्षा घेण्याचे नियोजन होईल. परीक्षेचे वेळापत्रक परीक्षेच्या एक महिना अगोदर जाहीर करावे लागते, असेही आयोगातील सूत्रांनी या वेळी सांगितले.

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...