Tuesday, 6 April 2021

पोलीस भरतीला नेहमी प्रश्न येणारे

👉 महाराष्ट्राविषयी माहिती 


•  महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर- कळसुबाई (१६४६ मी.) ता. अकोले, जि. अहमदनगर.


•  महाराष्ट्राला ७२० कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.


• महाराष्ट्राची राजधानी - मुंबई * उपराजधानी  - नागपूर.


• महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या - ३६.


•  महाराष्ट्राने भारताचा ९.७ टक्के भाग व्यापलेला आहे.


•  महाराष्ट्राच्या वायव्य भागात गुजरात राज्य व दादरा-नगर हवेलीच्या सीमारेषा आहे.


•  महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.


• महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे * विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.


• विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.


• महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.


• महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.


• महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.


•  महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.


• महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे


• महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.


• महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.


• महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.


•  महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.


•  महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.


•  भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.


• भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.


•  महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.


• महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.


• भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.


•  महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.


• पंढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.


• गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.


•  प्रवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.


• गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.


•  जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.


•  औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.


•  पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.


•  महाराष्ट्रातील नायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.


°  कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.


•  कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.


• विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.


•  विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.


•  महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.


•  विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.


•  संत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.


• संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.


• राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती येथे आहे.


•  संत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.


•  ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.


•  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.


•  महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.


•  महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.


• पुणे ही पेशव्यांची राजधानी आहे.


•  कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.


•  आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.


• मुंबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात


•  यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.


•  महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.


•  नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.


•  महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.


•  शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.


•  महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.


•  शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.


•  ज्ञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.


• तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.


• भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.


•  महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.


• रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.

महाराष्ट्रातील प्रमुख शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम



कळसूबाई = 1646

साल्हेर = 1567

धोडप =1472

महाबळेश्वर = 1438

तारामती = 1431

हरिश्चंद्र = 1424

सप्तश्रृंगी = 1416

तोरणा = 1404

पुरंदर = 1387

मांगीतुंगी = 1331

अस्तंभा = 1325

राजगड = 1318

सिंहगड = 1312

मुल्हेर = 1306

त्रंबकेश्र्वर = 1304 

ब्रम्हगिरी = 1304

रतनगड = 1297

अंजनेरी = 1280

तौला = 1231

वैराट = 1177 

चिखलदरा = 1115

प्रतापगड = 1080

हनुमान = 1063

कुंभार्ली = 1050

फोंडा = 900

रायगड = 820

आतरराज्यीय जलविवाद न्यायाधिकरणे



💥 (Combine focus)


▪️कष्णा ( 1969) :- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश


▪️गोदावरी (1969):-  महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रधेश, ओरीसा


▪️नर्मदा (1969) :- राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र


▪️रावी व बियास ( 1986) :- पंजाब, हरियाणा, राजस्थान


▪️कावेरी (1990) :- कर्नाटक, केरळ, तामीळनाडू, पाँडेचरी


▪️कष्णा - 2 (2004 ) :- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश


▪️वसंधरा (2010) :- ओडीसा, आंध्रप्रदेश


▪️महादयी (2010):- गोवा, कर्नाटक, माहाराष्ट्र.


▪️महानदी (6 ऑगस्ट 2018 ) :- ओडीसा, छत्तीसगड.

शब्दसिद्धी व त्याचे प्रकार


शब्द कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच

'शब्दसिद्धी' असे म्हणतात.


⭕️शब्दांचे खालील प्रकार पडतात.


◾️ तत्सम शब्द


जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बादल न होता आले आहेत त्यांना 'तत्सम शब्द ' असे म्हणतात.


💠उदा.

राजा, भूगोल, चंचू, पुष्प, परंतु, भगवान, कर, पशु, अंध, जल, दीप, पृथ्वी, तथापि, कवि, वायु, भीती, पुत्र, अधापि, मति, पुरुष, शिशु, गुरु, मधु, गंध, पिता, कन्या, वृक्ष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, विद्वान, संत, निस्तेज, कर, जगन्नाथ, दर्शन, उमेश, स्वामि, मंदिर, तिथी, सूर्य, स्वल्प, घृणा, पिंड, कलश, प्रात:क, दंड, पत्र, ग्रंथ, उत्तम, आकाश पाप, मंत्र, शिखर, सूत्र, कार्य, होम, गणेश, सभ्य, कन्या, देवर्षि, वृद्ध, संसार, प्रीत्यर्थ, कविता, उपकार, परंतु, गायन, अश्रू, प्रसाद, अब्ज, राजा, संमती, घंटा, पुण्य, बुद्धी, अभिषेक, संगती, श्रद्धा, प्रकाश, सत्कार, देवालय, तारा, समर्थन, नयन, उत्सव, दुष्परिणाम, नैवेध.


🌀 तदभव शब्द


जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येतांना त्यांच्या मूळ रूपात काही बदल होतो त्या शब्दांना 'तदभव शब्द' असे म्हणतात.


💠उदा.

घर, पाय, भाऊ, सासू, सासरा, गाव, दूध, घास, कोवळा, ओळ, काम, घाम, घडा, फुल, आसू, धुर, जुना, चाक, आग, धूळ, दिवा, पान, वीज, चामडे, तहान, अंजली, चोच, तण, माकड, अडाणी, उधोग, शेत, पाणी, पेटी, विनंती, ओंजळ, आंधळा, काय, धुर, पंख, ताक, कान, गाय.


🌀दशी/देशीज शब्द


महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोलीभाषेमधील वापरल्या जाणार्या शब्दांना 'देशी शब्द' असे म्हणतात.


💠उदा.

झाड, दगड, धोंडा, घोडा, डोळा, डोके, हाड, पोट, गुडघा, बोका, रेडा, बाजारी, वांगे, लुगडे, झोप, खुळा, चिमणी, ढेकूण, कंबर, पीठ, डोळा, मुलगा, लाजरा, वेढा, गार, लाकूड, ओटी, वेडा, अबोला, लूट, अंघोळ, उडी, शेतकरी, आजार, रोग, ओढा, चोर, वारकरी, मळकट, धड, ओटा, डोंगर.


🌀 परभाषीय शब्द :


संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना ' परभाषीय शब्द' असे म्हणतात.


🌀1) तुर्की शब्द


💠कालगी, बंदूक, कजाग


🌀2) इंग्रजी शब्द


💠टी.व्ही., डॉक्टर, कोर्ट, पेन, पार्सल, सायकल, स्टेशन, हॉस्पिटल, बस, फाईल, रेल्वे, पास, ब्रेक, कप, मास्तर, फी, बॉल, स्टॉप, ऑफिस, एजंट, टेलिफोन, सिनेमा, सर्कस, पॅंट, बॅट, पोस्ट, तिकीट, ड्रायव्हर, मोटर, कंडक्टर, नंबर, टीचर, सर, मॅडम, पेपर, नर्स, पेशंट, इंजेक्शन, बटन ड्रेस, ग्लास, इत्यादी.


🌀 3) पोर्तुगीज शब्द

बटाटा, तंभाखू, पगार, बिजागरी, कोबी, हापूस, फणस, घमेले, पायरी, लोणचे, मेज, चावी, तुरुंग, तिजोरी, काडतुस.


🌀4) फारशी शब्द

💠रवाना, समान, हकीकत, अत्तर, अब्रू, पेशवा, पोशाख, सौदागार, कामगार, गुन्हेगार, फडवणीस, बाम, लेजीम, शाई, गरीब, खानेसुमारी, हजार, शाहीर, मोहोर, सरकार, महिना हप्ता.


🌀 5) अरबी शब्द

अर्ज, इनाम, हुकूम, मेहनत, जाहीर, मंजूर, शाहीर, साहेब, मालक, मौताज, नक्कल, जबाब, उर्फ, पैज, मजबूत, शहर, नजर, खर्च, मनोरा, वाद, मदत, बदल.



🌀6) कानडी शब्द

हंडा, भांडे, अक्का, गाजर, भाकरी, अण्णा, पिशवी, खोली, बांगडी, लवंग, अडकित्ता, चाकरी, पापड, खलबत्ता, किल्ली, तूप, चिंधी, गुढी, विळी, आई, रजई, तंदूर, चिंच, खोबरे, कणीक, चिमटा, नथ, तांब्या, उडीद, पाट, गाल, काका, टाळू, गादी, खिडकी, गच्ची, बांबू, ताई, गुंडी, कांबळे.


🌀7) गुजराती शब्द

सदरा, दलाल, ढोकळा, घी, डबा, दादर, रिकामटेकडा, इजा, शेट.


🌀8) हिन्दी शब्द

बच्चा, बात, भाई, दिल, दाम, करोड, बेटा, मिलाप, तपास, और, नानी, मंजूर, इमली.


🌀 9) तेलगू शब्द

ताळा, अनरसा, किडूकमिडूक, शिकेकाई, बंडी, डबी.


🌀10) तामिळ शब्द

चिल्ली, पिल्ली, सार, मठ्ठा.


लिंगभाव समानता निर्देशांकात भारत १४० व्या क्रमांकावर.

🔰जागतिक आर्थिक मंचाच्या लिंगभाव समानता २०२१ अहवालात भारत १५६ देशात १४० क्रमांकावर राहिला असून भारताचे स्थान २८ क्रमांकांनी घसरले आहे. दक्षिण आशियात वाईट कामगिरी असलेला भारत हा तिसरा देश ठरला आहे. या अहवालानुसार लिंगभाव समानतेत भारताची टक्केवारी ६२.५ टक्के राहिली असून २०२० मध्ये भारत १५३ देशात ११२ व्या क्रमांकावर होता. आता तो १४० व्या क्रमांकावर फेकला गेला आहे.

🔰आर्थिक सहभाग व संधी उपनिर्देशांकात भारताची घसरण झाली असून या वर्षी या काही पैलूत भारतातील लिंगभाव समानतेतील दरी ३ टक्क््यांनी वाढली असून ती ३२.६ टक्के आहे. राजकीय सक्षमीकरणात भारताला मोठा फटका बसला असून त्यात १३.५ टक्के नोंद आहे. २०१९ मध्ये भारताची टक्केवारी २३.१ होती ती २०२१ मध्ये ९.१ टक्के झाली आहे.

🔰कामगार- कर्मचारी यात महिलांचा घटता सहभाग हे याचे प्रमुख कारण ठरले असून हा सहभाग २४.८ टक्क््यांवरून २२.३ टक्के झाला आहे. याशिवाय व्यावसायिक व तंत्रज्ञानात्मक भूमिकात महिलांचा सहभाग कमी होऊन तो २९.२ टक्के राहिला आहे. वरिष्ठ व व्यवस्थापकीय पातळीवर महिलांचा सहभाग कमीच असून १४.६ टक्के वरिष्ठ पदांवर महिला आहेत. व्यवस्थापकीय पदांवर महिलांचे प्रमाण ८.९ टक्के आहे. पुरुषांच्या तुलनेत महिलांचे उत्पन्न भारतात एक पंचमांश आहे. त्यामुळे भारत खालच्या दहा देशात गेला आहे.

🔰महिलांविरोधातील भेदभाव जास्त असून आरोग्य व जीवन संघर्षात टिकून राहण्याच्या निर्देशांकात भारताने खराब कामगिरी केली आहे. भारत त्यामुळे यात घटक निर्देशांकात खालच्या पाच देशात आहे.

हॅट-ट्रिक घेणारे भारतीय गोलंदाज

🏏 एकदिवसीय

1️⃣ १९८७ : चेतन शर्मा
✅ विरुद्ध : न्युझीलंड

2️⃣ १९९१ : कपिल देव
✅ विरुद्ध : श्रीलंका

3️⃣ २०१७ : कुलदीप यादव
✅ विरुद्ध : ऑस्ट्रेलिया

4️⃣ २०१९ : मोहम्मद शमी
✅ विरुद्ध : अफगाणिस्तान

5️⃣ २०१९ : कुलदीप यादव
✅ विरुद्ध : वेस्ट इंडिज

🏏 कसोटी

1️⃣ २००१ : हरभजन सिंह
✅ विरुद्ध : ऑस्ट्रेलिया

2️⃣ २००६ : इरफान पठाण
✅ विरुद्ध : पाकिस्तान

3️⃣ २०१९ : जसप्रीत बुमराह
✅ विरुद्ध : वेस्ट इंडिज

🏏 टी-ट्वेटी आंतरराष्ट्रीय

1️⃣ २०१२ : एकता बिश्त  (पहिली महिला)
✅ विरुद्ध : श्रीलंका

2️⃣ २०१९ : दिपक चहर (पहिला पुरुष)
✅ विरुद्ध : बांग्लादेश .

राज्यातील पहिली ते आठवीचे विद्यार्थी विनापरीक्षा पास; शिक्षणमंत्र्यांची घोषणा


🔶राज्यातील शालेय शिक्षण विभागाने मोठी घोषणा केली आहे. राज्यातील करोना स्थिती पाहता, राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेशिवाय पुढील वर्गात प्रमोट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

🔶करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाचे शालेय शिक्षण विभागाचे शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने सुरू झाले. त्यानुसार इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देण्यात आले. मात्र, इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या आणि ऑनलाइन शिक्षणासाठी पुरेशा प्रमाणात साधनांची उपलब्धता नसल्याने, विद्यार्थ्यांना शिकण्यात अडचणी आल्या.

🔶शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात या अडचणी अधिक होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अपेक्षित अभ्यासक्रम पूर्ण झाला नसल्याने, त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. इयत्ता पहिली ते आठवीचा निकाल सर्वंकष मूल्यमापन पद्धतीद्वारे जाहीर केला जातो. मात्र, यंदा जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद, महापालिका अशा सरकारी शाळांमध्ये दोन चाचण्या आणि दोन संकलित मूल्यमापन योग्य पद्धतीने होऊ शकले नाही, अशी माहिती शिक्षकांनी दिली आहे. शहरी भागातील अनुदानित शाळांनी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेतल्या असून, निकाल तयार केला आहे.

🔶मात्र, शैक्षणिक वर्ष संपत असून, आता गुणपत्रके तयार करून निकाल जाहीर करण्याची वेळ आली होती.त्यासाठी कोणती कार्यपद्धती अवलंबण्यात यावी, याबाबत शालेय शिक्षण विभागाकडून मार्गदर्शन सूचना मिळाल्या नव्हत्या. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय जाहीर केला. या सर्व पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट पुढील वर्गात प्रमोट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पुतीन यांची लोकप्रियता कायम; रशियामधील ‘सर्वात देखणा पुरुष’ होण्याचा मिळवला मान

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे देशातील सर्वात सुंदर पुरुष असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळेच रशियातील सर्वात देखणा पुरुष अशी नवी ओळख पुतीन यांना मिळाली आहे. हजारो जणांचा समावेश असणाऱ्या या सर्वेक्षणामध्ये ६८ वर्षीय अविवाहित पुतीन हे सर्वात सुंदर पुरुष ठरलेत.

सुपरजॉब डॉय आरयू नावाच्या वेबसाईट रशियन जनतेला देशातील कोणती व्यक्ती सर्वात सुंदर वाटते यासंदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये अनेकांनी पुतीन यांच्या नावाची निवड केल्याचं पहायला मिळालं. सर्वेक्षणातील १८ टक्के पुरुषांनी तर १७ टक्के महिलांनी पुतीन यांची निवड केली. रशियन जनतेच्या मनात आजही पुतीन हेच देशातील सर्वात सुंदर व्यक्ती असल्याचं चित्र या सर्वेक्षणातून दिसून आल्याचं वेबसाईटने सर्वेक्षण अहवालात म्हटलं आहे.

मॉस्को टाइम्सने सुपरजॉबच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार या सर्वेक्षणामध्ये पुतीन यांच्या लोकप्रियतेसमोर सर्वच रशियन कलाकार, नेते आणि खेळाडून फिके पडल्याचं पहायला मिळालं. मासे पकडताना, घोड्यावर स्वार झालेले पुतीन यांचे अनेक फोटो वेळोवेळी समोर आलेत. या फोटोंमध्ये पुतीन हे शर्टलेसच दिसून येतात. एका मुलाखतीमध्ये पुतीन यांनी आपल्याला या शर्टलेस फोटोंबद्दल लज्जास्पद असं काही वाटतं नाही, असं एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं. या फोटोंमध्ये पुतीन यांना एक शक्तीशाली व्यक्ती दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला.

२२ मार्च ते एक एप्रिल दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणामध्ये प्रत्येकाला एका प्रश्नांची यादी देण्यात आली होती. या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या १९ टक्के पुरुषांनी स्वत:लाच रशियामधील सर्वात सुंदर पुरुष असल्याचं मत दिलं होतं. तर १८ टक्के महिलांनी रशियामध्ये सुंदर पुरुषच नाहीयत असं मत दिलं होतं.

भारतातील मान्यताप्राप्त राष्ट्रीय पक्ष

🔶 पक्ष : ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस
⏳ स्थापना : १ जानेवारी , १९९८

🔶 पक्ष : बहुजन समाज पार्टी
⏳ स्थापना : १४ एप्रिल , १९८४

🔶 पक्ष : भारतीय जनता पार्टी
⏳ स्थापना : ०६ एप्रिल , १९८०

🔶 पक्ष : कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया
⏳ स्थापना : २६ डिसेंबर , १९२५

🔶 पक्ष : कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (म.)
⏳ स्थापना : ०७ नोव्हेंबर , १९६४

🔶 पक्ष : इंडियन नॅशनल काँग्रेस
⏳ स्थापना : २८ डिसेंबर , १८८५

🔶 पक्ष : नॅशनालिस्ट कॉंग्रेस पार्टी
⏳ स्थापना : १० जून , १९९९

🔶 पक्ष : नॅशनल पीपल्स पार्टी
⏳ स्थापना : ०६ जानेवारी , २०१३ ‌.

उत्तर प्रदेश: जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले राज्य


उत्तर प्रदेश लवकरच देशातील जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय विमानतळांसह असे एक राज्य होईल.
राज्यात लवकरच पाच आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार आहेत.

जेव्हर आंतरराष्ट्रीय विमानतळ एनसीआर प्रदेशात येत आहे, 2023 पर्यंत ते तयार होईल.

अयोध्या मधील आंतरराष्ट्रीय विमानतळ 2023 च्या सुरूवातीला सुरू होण्याची शक्यता आहे.

आगामी कुशीनगर विमानतळ हे यूपी मधील तिसरे परवानाधारक आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल.

महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत निर्बंध; अशी आहे नियमावली

🌼राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली कठोर करण्यात आली आहे. राज्य सरकारने गर्दी टाळण्यासाठी दिवसा जमावबंदी, तर रात्री संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील आदेश आणि नियमावली उद्या सरकारकडून काढण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

🌼राज्य मंत्रिमंडळाने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार ५ एप्रिल रात्री ८ पासून ३० एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाणार आहे. या आदेशांना मिशन बिगीन अगेन ऐवजी ‘ब्रेक दि चेन’ असे संबोधण्यात येणार.

🌼हे निर्बंध लावतांना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून, लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. शेतीविषयक कामे , सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील.

🌼आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय झाला. या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्बंधांचे काटेकोर पालन करण्यात सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करताना आपण विरोधी पक्षांशी देखील बोललो असून त्यांनी देखील याबाबत सहकार्य करण्याची तयारी दर्शविल्याचे सांगितले.

भारतातील दुहेरी उत्परिवर्तनाचा विषाणू अमेरिकेतही

🔶भारतातील दुहेरी उत्परिवर्तनाचा विषाणू आता अमेरिकेतील एका रुग्णातही सापडला असून स्टॅनफर्ड हेल्थ केअरच्या दी क्लिनिकल व्हायरॉलॉजी लॅबमधील नमुन्यांच्या तपासणीत तो आढळून आला आहे. दुहेरी उत्परिवर्तन असलेला विषाणू भारतात पहिल्यांदा आढळून आला होता. त्यामुळे करोनाचा प्रसार जास्त वेगाने वाढत आहे.

🔶स्टॅनफर्ड रुग्णालयाच्या वेगवेगळ्या तपासणी केंद्रात सॅनफ्रान्सिस्को बे या भागात हा विषाणू सात रुग्णांत सापडला असण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे पण त्याला अजून दुजोरा मिळालेला नाही. एका रुग्णात मात्र तो सापडला आहे.

🔶स्टॅनफर्ड हेल्थ केअर स्कूल ऑफ मेडिसीन या संस्थेच्या प्रवक्त्या लिसा किम यांनी सांगितले की, अमेरिकेत भारतातील दुहेरी उत्पर्वितनाचा विषाणू पहिल्यांदाच सापडला आहे. भारतातील उत्परिवर्तित विषाणूत एल ४५२आर हे उत्परिवर्तन दिसून आले आहे, दुसरे उत्परिवर्तन इ ४८४ क्यू हे आहे. एकाच ठिकाणी अमायनो आम्लांमध्ये दोन उत्परिवर्तने झाली असून ती पहिल्यांदा दक्षिण आफ्रिका व नंतर ब्राझीलमध्ये दिसून आली होती.

🔶सध्या अमेरिकेत हा विषाणू सापडला आहे तो विमानाने आलेल्या एखाद्या प्रवाशातून पसरला असावा. डॉ. बेन पिन्स्की यांनी सांगितले की, हा विषाणू वेगाने पसरतो. लसीकरणामुळे सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यानंतर विषाणूचा धोका कमी होत जाईल. दरम्यान, ब्रिटनमध्ये सापडलेल्या बी ११७ उत्परिवर्तनाचा समावेश असलेल्या विषाणूचे ३० टक्के कोविड रुग्ण अमेरिकेत सापडले आहेत, असे ब्राउन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे अधिष्ठाता आशिष झा यांनी सांगितले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्वपरीक्षा रविवारी (ता. 11) होणार आहे.



सोलापूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्वपरीक्षा रविवारी (ता. 11) होणार आहे. राज्यभरातील चार लाख 23 हजार विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. कोरोनामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. परंतु, परीक्षा ठरलेल्या दिवशीच होईल, असे आयोगाच्या सहसचिवांनी स्पष्ट केले आहे. 

श्रीगोंदा येथील वैभव शितोळे हा पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न घेऊन पुण्यातील सदाशिव पेठेत स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. तर दुसरीकडे प्रीतम कांबळे हा विद्यार्थीही कोरोनाचा बळी ठरला. दोन विद्यार्थ्यांचा दोन दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह तर काही विद्यार्थी क्‍वारंटाइन आहेत. दुसरीकडे राज्यात पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने लागू केलेल्या कडक निर्बंधानुसार शनिवार, रविवारी कडक संचारबंदी असणार आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थाही बंद ठेवली जाईल आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेत पोचता येणार नाही. कडक संचारबंदी असल्याने परजिल्ह्यातील मुलांना त्या ठिकाणी राहण्यासाठी अडचणी येणार आहेत. अशी परिस्थिती असतानाही परीक्षा घेतल्यास बहुतांश विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही. त्यामुळे आयोगाने ही परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन सर्व्हेदेखील केला असून त्यात 79 टक्‍के विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलावी, असा अभिप्राय नोंदविला आहे. 

दरम्यान, सरकारच्या निर्णयानुसार आयोगाने परीक्षेचे नियोजन केल्याचेही सहसचिवांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन नियोजित वेळेत परीक्षा होईल, असेही आयोगाचे सहसचिव सुनील आवताडे यांनी सांगितले. 

परीक्षेची स्थिती... 

गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा : 11 एप्रिल 


परीक्षेला बसणारे विद्यार्थी : 4.23 लाख 


परीक्षा केंद्रे : 1500 


ठळक बाबी... 

परीक्षेसाठी एका वर्गखोलीत असतील 24 विद्यार्थी 


विद्यार्थ्यांना परीक्षा देताना घालावे लागणार कोव्हिड केअर किट 


पेपर सुरू होण्यापूर्वी दीड तास अगोदर परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांनी राहावे उपस्थित 


थर्मल स्क्रीनिंग गनद्वारे घेतली जाईल विद्यार्थ्यांच्या तापमानाची नोंद 


पर्यवेक्षकांना कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक; लसीकरण करून घेण्याचेही आवाहन 




Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...