Thursday, 11 March 2021

२१ मार्चला होणार एमपीएससीची परीक्षा

राज्यसेवा परीक्षेच्या केवळ तीन दिवस आधी परीक्षा पुढे ढकलण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयानंतर गुरुवारी राज्यभरात मोठ्या प्रमाणात उद्रेक झाल्याचं पहायला मिळालं. पुण्यासह नागपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक आदी शहरांत परीक्षार्थी रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनांमध्ये विरोधकांनीही उडी घेतली. यानंतर राज्य सरकारला एक पाऊल मागे घ्यावं लागलं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवी तारीख जाहीर करणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यानुसार नवी तारीख जाहीर करण्यात आली असून २१ मार्चला महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे अधिकृत प्रसिद्धीपत्रकातून ही माहिती देण्यात आली आहे. प्रसिद्धीपत्रकात देण्यात आलेल्या माहितीनुसार, १४ मार्च रोजी नियोजित करण्यात आलेल्या परीक्षेकरिता आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे उमेदवारांना वितरित करण्यात आलेल्या प्रवेश प्रमाणपत्रांच्या आधारे नमूद परीक्षा केंद्रांवर उमेदवारांना प्रवेश दिला जाईल.

२७ मार्च आणि ११ एप्रिलची परीक्षा वेळेतच होणार

तसंच याशिवाय इतर परीक्षा ठरलेल्या वेळेतच होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. २७ मार्चला आयोजित महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० तसंच ११ एप्रिलला आयोजित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा २०२० या दोन परीक्षा नियोजित तारखांना घेतल्या जाणार असून यामध्ये कोणताही बदल होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पूर्वपरीक्षा १४ मार्चला घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. आयोगाने परीक्षेची प्रवेशपत्रेही उपलब्ध करून दिली होती. मात्र, करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाच्या निर्देशानुसार नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे गुरुवारी दुपारी जाहीर केले.




करोनाचा प्रादुर्भाव, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आधीच तीन वेळा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याने उमेदवारांमध्ये अस्वस्थता होती. मात्र, गुरुवारच्या निर्णयानंतर संतापलेल्या परीक्षार्थींचा उद्रेक झाला. पुण्यात परीक्षार्थींनी मोठ्या संख्येने एकत्र येत दुपारी शास्त्री रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू के ले. आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राम सातपुते आणि विविध संघटनांनीही या आंदोलनात सहभाग घेऊन राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध केला. राज्य शासनाने परीक्षा घेण्याचे नवे परिपत्रक जाहीर के ल्याशिवाय रस्ता न सोडण्याची भूमिका उमेदवारांनी घेतली. त्यामुळे पुणे पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या फौजफाट्यासह शास्त्री रस्त्यावर दाखल झाले, दंगलविरोधी पथकालाही पाचारण करावे लागले.

करोनाचा प्रादुर्भाव सुरू असतानाच्या काळात अभियांत्रिकी प्रवेशासाठीची जेईई, वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट, केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा यासह विविध परीक्षा झाल्या. या परीक्षांच्या वेळी, राजकीय नेत्यांच्या शक्तिप्रदर्शनावेळी, ग्रामपंचायत निवडणुकांवेळी करोनाची बाधा झाली नाही, पण राज्यसेवा परीक्षेलाच अडथळा करून राज्य शासन परीक्षार्थींच्या भावनांशी आणि भविष्याशी खेळत आहे, असा आरोप परीक्षार्थींनी केला. तीन-चार वर्षांपासून आम्ही परीक्षेची तयारी करत आहोत. त्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येऊन पुण्यात राहात आहोत. २०१९ मध्ये झालेल्या परीक्षेनंतर राज्यसेवेची परीक्षा झाली नाही. आधीच आमची दोन वर्षे वाया गेली आहेत, अशी व्यथाही परीक्षार्थींनी मांडली.

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग



स्थापना : १३ ऑगस्ट १९९३

मुख्यालय : दिल्ली 

रचना : १ अध्यक्ष व ४ सदस्य

कार्यकाळ : ३ वर्षे


अध्यक्ष व सदस्य पात्रता 

अध्यक्ष : सर्वोच्च किंवा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असायला पाहिजे

१ सदस्य सचिव असतील

१ सदस्य समाज शास्त्रज्ञ असतील

२ सदस्य इतर मागासवर्गीय घटकातील विशेष तज्ञ असतील


स्थापना

मंडल आयोगाच्या शिफारसी लागू केल्यानंतर देशभरात याविरोधात आंदोलने झाली. या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात अनेक प्रकरणे दाखल करण्यात आली.



यातील इंदिरा साहनी विरुद्ध भारत सरकार या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय मागास वर्ग आयोग स्थापन करण्याचा निर्णय दिला. त्यांनतर भारत सरकारने १९९३ साली राष्ट्रीय मागास वर्ग आयोग स्थापन केला.


कार्य

OBC घटकांच्या तक्रारी सोडविणे, एखाद्या जातीला OBC घटकांमध्ये समावेश करण्याची शिफारस करणे. तसेच एखाद्या जातीला OBC घटकांमधून काढून टाकण्याची शिफारस करणे.

‘आयपीएल’ आयोजनासाठी मुंबईबाबत प्रश्नचिन्ह



🥇इडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १४व्या पर्वाच्या आयोजनासाठी मुंबई सज्ज झाले असतानाच करोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येमुळे आता आर्थिक राजधानीतील सामन्यांच्या आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुंबईलगत असलेल्या ठाणे शहरात करोनाचे रुग्ण झपाटय़ाने वाढत आहेत. तेथील काही भागांमध्ये करोनाचे नियम कडक करण्यात आले आहेत. अशातच ‘आयपीएल’चे वेळापत्रक रविवारी सादर केले जाणार असून त्यात मुंबईला स्थान न देण्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) दबाव वाढू लागला आहे.


🥇मबईत यंदाच्या मोसमातील १० सामने आयोजित केले जाण्याची शक्यता आहे. पण करोनाच्या वाढत्या प्रभावामुळे मुंबईला लाल कंदील दाखवण्यात येण्याची शक्यता आहे. ‘आयपीएल’चे आयोजन सहा शहरांमध्ये केले जाणार असल्याचे ‘बीसीसीआय’ने जाहीर केले होते. पण कोलकाता, बेंगळूरु, अहमदाबाद, चेन्नई आणि दिल्ली या अन्य शहरांपेक्षा मुंबईतील करोनाबाबतची परिस्थिती अधिकच बिघडली आहे. मुंबई आणि महानगरांमध्ये दिवसेंदिवस करोनारुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. ठाणे आणि नाशिक या शहरांमधील काही भागांमध्ये टाळेबंदी करण्यात आली आहे.


🥇‘आयपीएल’च्या यंदाच्या मोसमाला प्रारंभ होण्यापूर्वी परिस्थिती सुधारलेली असेल, अशी आशा ‘आयपीएल’ प्रशासकीय समितीचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी व्यक्त केली. ‘‘परिस्थिती हाताबाहेर गेल्यास, अन्य पर्यायांची चाचपणी आम्ही आधीच केली आहे,’’ असे पटेल यांनी सांगितले. त्यामुळे प्रशासकीय समितीच्या पुढील बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचे सुरुवातीचे सामने मुंबईत होणार आहेत. त्यामुळे मुंबईतील स्टेडियमजवळ सराव करण्याचे या दोन्ही संघांनी ठरवले आहे.

चॅम्पियन्स लीग फुटबॉल - रोनाल्डोच्या युव्हेंटसला विजय अनिवार्य



🍇खरिस्तियानो रोनाल्डोच्या युव्हेंटसला चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या मंगळवारी मध्यरात्री होणाऱ्या पोटरेविरुद्धच्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यात विजय अनिवार्य आहे.


🍇फब्रुवारीत झालेल्या पहिल्या टप्प्यातील सामन्यात युव्हेंटसला १-२ असा पराभव पत्करावा लागला. परंतु प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर गोल केल्याचा त्यांना लाभ होऊ शकतो. त्यामुळे युव्हेंटसने १-० अशा फरकाने सामना जिंकला तरी ते उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के करू शकतात.


🍇मगळवारीच होणाऱ्या अन्य लढतीत सेव्हिया आणि बोरुशिआ डॉर्टमंड यांची गाठ पडणार असून पहिल्या टप्प्यातील सामन्यात डॉर्टमंडने ३-२ असा विजय मिळवला आहे.

पृथ्वी निरीक्षणासाठी इस्रोकडून रडारनिर्मिती



🔰भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोने अमेरिकेच्या नासा या संस्थेसमवेत उपग्रहामार्फत संयुक्त पृथ्वी निरीक्षण करण्यासाठी एका उच्च विवर्तनक्षम रडारची निर्मिती केली आहे. त्याच्या मदतीने पृथ्वीच्या अधिक स्पष्ट प्रतिमा घेता येणार आहेत.


🔰नासा आणि इस्रो यांच्या (निसार) या संयुक्त प्रकल्पात दुहेरी कंप्रता एल व एस बँड असलेले रडार पृथ्वी निरीक्षणासाठी वापरले जाणार आहे. ‘निसार’ ही दोन वेगेवगेळ्या कंप्रता ए बँड व एस बँडसाठी असणारी पहिलीच मोहीम आहे. त्यात पृथ्वीचे निरीक्षण काही सेंटीमीटर विवर्तनापर्यंत शक्य होणार आहे, अशी माहिती नॅशनल एरोनॉटिक्स अँड  स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन म्हणजे नासाने दिली आहे.


🔰नासा व बेंगळुरू येथील भारतीय अवकाश संशोधन संस्था यांनी याबाबतचा भागीदारी करार  ३० सप्टेंबर २०१४ रोजी केला होता. ही मोहीम २०२२ मध्ये सुरू होणार असून इस्रोच्या श्रीहरीकोटा येथील नेल्लोर जिल्ह्यत श्रीहरीकोटा येथून हा उपग्रह रडारसह पाठवला जाणार आहे. नासाने यात एल बँड एसएआरची  व्यवस्था केली असून वैज्ञानिक माहिती व जीपीएस सव्‍‌र्हर्स उपलब्ध केले आहेत.


🔰तयात सॉलिड स्टेट रेकॉर्डरचा समावेश असून इस्रो यात एस बँड रडार उपलब्ध करीत असून पृथ्वीवरील पृष्ठभागाचे चित्रण यात केले जाणार आहे. एस बँड एसएआर पेलोड निसार उपग्रह मोहिमेचा भाग असून त्याला अवकाश खात्याने आधीच मंजुरी दिली आहे.  इस्रोच्या अहमदाबाद येथील अवकाश उपयोजन केंद्रातून पेलोड श्रीहरीकोटा येथे पाठवण्यात येत असून नासाच्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीने एल बँड एसएआर पेलोड तयार केला आहे.

भारतातील रामसर स्थळांची यादी


🔰 अष्टमुडी वेटलँड : केरळ 

🔰 बीस कंझरवेशन रीजर्व : पंजाब

🔰 भितरकर्णिका खारफुटी : ओडिशा

🔰 भोज वेटलँडस् : मध्य प्रदेश 

🔰 चद्र तलाव : हिमाचल प्रदेश

🔰 चिलका सरोवर : ओडिशा

🔰 दिपोर सरोवर : आसाम

🔰 पर्व कोलकाता वेटलँड : पश्चिम बंगाल

🔰 हरिके वेटलँड : पंजाब

🔰 होकेरा वेटलँड : जम्मू व कश्मीर

🔰 कांजलि वेटलँड : पंजाब

🔰 कवलादेव राष्ट्रीय उद्यान : राजस्थान

🔰 कशोपुर-मियानी कम्यूनिटी रिजर्व : पंजाब

🔰 कोल्लेरु सरोवर : आंध्रप्रदेश

🔰 लोकटक सरोवर : मणिपूर

🔰 नलसरोवर पक्षी अभयारण्य : गुजरात

🔰 नांदूर मध्यमेश्वर : महाराष्ट्र 

🔰 लोणार सरोवर : महाराष्ट्र

🔰 नांगल वन्यजीव अभयारण्य : पंजाब 

🔰 सर सरोवर : उत्तर प्रदेश

🔰 साण्डी पक्षी अभयारण्य : उत्तर प्रदेश 

🔰 समसपुर पक्षी अभयारण्य : उत्तर प्रदेश

🔰 नवाबगंज पक्षी अभयारण्य : उत्तर प्रदेश

🔰 समन पक्षी अभयारण्य : उत्तर प्रदेश 

🔰 पार्वती अरगा पक्षी : अभयारण्य उत्तर प्रदेश

🔰 सरसई नावर झील : उत्तर प्रदेश

🔰 अप्पर गंगा नदी : उत्तर प्रदेश

🔰 पॉईंट कैलिमेरे वन्यजीव व पक्षी अभयारण्य : तमिळनाडू

🔰 पौंग सरोवर : हिमाचल प्रदेश

🔰 रणुका वेटलँड : हिमाचल प्रदेश

🔰 रोपर वेटलँड : पंजाब

🔰 रद्रसागर सरोवर : त्रिपुरा

🔰 सांभर सरोवर : राजस्थान

🔰 सस्थमकोट्टा सरोवर : केरळ

🔰 सरिंसार-मानसर सरोवर : जम्मू व कश्मीर

🔰 तसो-मोरीरी : लदाख

🔰 तसो कर : लदाख (४२वे)

🔰 वम्बनाड-कोल वेटलँड : केरळ

🔰 वलर सरोवर : जम्मू व कश्मीर 

🔰 सदर वन वेटलँड : पश्चिम बंगाल

🔰 कावर सरोवर : बिहार

🔰 आसन वेटलँड : उत्तराखंड

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...