Thursday, 4 March 2021

मुकेश अंबानी अव्वलच; गौतम अदानींची संपत्ती दुप्पट



करोना-टाळेबंदीने सामान्यांसह देशाचे अर्थकंबरडे मोडले असतानाच वर्ष २०२० मध्ये अब्जाधीशांच्या यादीत ४० नव्या उद्योगपतींची भर पडली आहे. एकूण १७७ जणांच्या याबाबतच्या यादीत रिलायन्सचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे नेहमीप्रमाणे भारतीय अब्जाधीश म्हणून अव्वल राहिले आहेत, तर अदानी समूहाचे चर्चेतील गौतम अदानी यांची संपत्ती या दरम्यान दुप्पट झाली आहे.


प्रसिद्ध हरून या संस्थेने केलेल्या जागतिक श्रीमंतांच्या यादी सर्वेक्षणात १७७ अब्जाधीशांचा समावेश आहे. यामध्ये ऐन करोना-टाळेबंदीच्या वर्षांत ४० अब्जाधीशांचा नव्याने समावेश झाला आहे.


रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे भारतीय अब्जाधीशांच्या यादीत ८३ अब्ज डॉलरसह क्रमांक एकवर आहेत. यंदा त्यांची संपत्ती वार्षिक तुलनेत २४ टक्क्यांनी वाढली आहे. तर जागतिक क्रमवारीत संपत्ती संचयनाबाबत त्यांचे स्थान आठव्या स्थानावर आहे.


अंबानी यांच्या पाठोपाठ अदानी समूहाचे गौतम अदानी यांचे नाव आहे. त्यांचे स्थान यंदा थेट २०ने उंचावले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर ४८वे अब्जाधीश असणाऱ्या अदानी यांची संपत्ती यंदा ३२ अब्ज डॉलर झाली असून वार्षिक तुलनेत ती दुप्पट झाली आहे. गौतम अदानी यांचे बंधू विनोद अदानी यांची संपत्ती १२८ टक्क्यांनी झेपावत ९.८ अब्ज डॉलर झाली आहे.


भारतीय अब्जाधीशांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर एचसीएल टेक्नॉलॉजीजचे शिव नाडर असून त्यांची संपत्ती २७ अब्ज डॉलर आहे. महिंद्र समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्र यांची संपत्ती थेट १०० टक्क्यांनी वाढून ती २.४ अब्ज डॉलर झाली आहे.


पतंजलिच्या बालकृष्णन यांच्या संपत्तीत घसरण

पतंजलि आयुर्वेदचे मुख्याधिकारी आचार्य बालकृष्णन यांच्या संपत्तीत यंदा ३२ टक्के घसरण झाली असून ती ३.६ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे. १७७ अब्जाधीशांच्या यादीत सर्वाधिक, ६० मुंबईतील उद्योगपती आहेत. तर महिलांमध्ये बायोकॉनच्या किरण मजुमदार-शॉ (४१ टक्के वाढ) या अव्वल आहेत. 


शेजारच्या चीनचे सर्वाधिक अब्जाधीश यादीत आले आहेत. तर जागतिक स्तरावर टेस्लाचे एलन मस्क (१९७ अब्ज डॉलर), अ‍ॅमेझॉनचे जेफ बेझोस (१८९ अब्ज डॉलर) हे अव्वल अब्जाधीश आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताच्या लसनिर्मितीची प्रशंसा.



🖼भारताने कोविड १९ विषाणू प्रतिबंधक लशीचा जागतिक दर्जाचा उत्पादक म्हणून मिळवलेली क्षमता व वेळोवेळी नवप्रवर्तनाचे केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत, अशा शब्दांत जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी कोविड काळातील भारताच्या कामगिरीची प्रशंसा केली आहे.


🖼गलोबल बायो इंडिया २०२१ या कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, करोना साथीविरोधातील लढाई आता महत्त्वाच्या टप्प्यात असून अचानक युरोप व अमेरिकेत रुग्ण पुन्हा वाढत आहेत.  अनेक अनिश्चिततांचे सावट असून विषाणूचे वेगवेगळ्या  उत्परिवर्तनाचा समावेश असलेले प्रकार सामोरे येत आहेत. भारताने कोविड १९ विषाणू विरोधात लस निर्मितीत जागतिक दर्जाचा उत्पादक म्हणून नाव कमावले आहे. त्यात नवप्रवर्तनाचेही दर्शन घडवले आहे.


🖼लशींच्या परिणामांचा साकल्याने अभ्यास करण्याचीही गरज आहे.  किमान ३० कोविड १९ प्रतिबंधक लशी सध्या भारतात विविध टप्प्यावर असून कोव्हॅक्सिन ही स्वदेशी बनावटीची लस बायोटेकची आहे तर ऑक्सफर्ड अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस सीरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या पुण्यातील कंपनीने कोव्हिशिल्ड नावाने तयार केली आहे. झायडस कॅडिलाची एक लस असून रशियाच्या स्पुटनिक ५ लशीच्या चाचण्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. ही लस रेड्डीज लॅबोरेटरी तयार करीत आहे. त्यांनी आपत्कालीन परवान्यासाठी भारताच्या महा औषध नियंत्रकांकडे अर्ज केला आहे.


🖼भारताने वेगवेगळ्या देशांना लशीचा पुरवठा केला असून नीती आयोगाचे आरोग्य सदस्य विनोद पॉल यांनी वैज्ञानिक समुदायाने केलेल्या कामगिरीची प्रशंसा केली आहे. करोना विषाणूवर लशी तयार करण्यात भारताने तत्परता दाखवली असे त्यांनी म्हटले आहे.  आपण वेगाने लशी तयार करू शकतो व त्याचे वितरणही करू शकतो हे यातून स्पष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यावरण विषयक महत्वाच्या परिषदा



🌀 रामसर परिषद = 1971रामसर-इराण 

 👉खारफुटीचे  संवर्धन व व्यवस्थापण करण्यासाठी. Effective1975


🌀 सटोकहोम डिक्लेरेशन = 1972 पर्यावरण संवर्धनासाठी 

👉याद्वारे UNEP ची स्थापना करण्यात आली


🌀मॉट्रीयल प्रोटोकॉल=1987 मॉन्ट्रीयल-कॅनडा

👉ओजोन च्या संवर्धनासाठी. Effective 1989


🌀बसल करार= 1989 बेसल-स्वित्झर्लंड

👉 घातक कचरा संबंधी. Effective1992


🌀 CBD जैवविविधता करार= 1992 रिओ

👉 जवविविधता संवर्धन, याअंतर्गत दोन प्रोटोकॉल आहेत 1)कर्ताजिना 2000 2) नागोया 2010. Effective 1993


🌀 कयोटो प्रोटोकॉल = 1997 क्योटो-जपान

👉 जागतिक तापमानवाढ रोखणे त्यासाठी ग्रीनहाऊस कमी करणे. Effective 2005


🌀रॉटरडॅम परिषद= 1998 रॉटरडॅम-नेदरलँड

👉हानिकारक रसायनांबाबत. Effective 2004


🌀कार्टजिना प्रोटोकॉल = 2000 मोन्ट्रीयल-कॅनडा 

👉GM बायोसेफ्टी च्या नियमनासाठी. Effective 2003


🌀सटॉकहोम परिषद = 2001 स्तोमहोम -स्वीडन

👉दिर्घस्तायी जैविक प्रदूषक नियमन बाबत. Effective 2004


🌀 मीनामाटा करार=2013 कुमोमाटा-जपान

👉 मानवी पर्यावरणास मर्क्युरी पासून संरक्षणासाठी. Effective 2017

 

🌀 परिस करार= 2015 पॅरिस- फ्रान्स

👉 जागतिक तापमानवाढ कमी करणे. Effective 04 नोव्हेंबर 2016

इस्रोची २०२१ मधली पहिली कामगिरी यशस्वी.



🔰भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने २०२१ मधले पहिले प्रक्षेपण यशस्वीरित्या केले आहे. रविवारी सकाळी १०.२४ वाजता श्रीहरीकोटा, सतीश धवन स्पेस सेंटर (एसडीएससी) येथून हे प्रक्षेपण झाले. चेन्नईपासून १०० कि.मी. अंतरावर असलेल्या आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा स्पेसपोर्टच्या प्रक्षेपण पॅडमधून प्रथमच भारतीय रॉकेट ब्राझीलच्या ६३७ किलो वजनाच्या अमेझोनिया -१ उपग्रहाचे प्रक्षेपण करत आहे.


🔰या उपग्रहाला सतीश धवन उपग्रह किंवा एसडी सॅट असे नाव देण्यात आले असून ते २५,००० लोकांची नावे अंतराळात पाठवणार आहे. नॅनो सॅटेलाइटमध्ये भगवतगीतेची एक प्रत एसडी कार्डच्या रूपात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र वरच्या पॅनेलवर कोरले असून हा त्यांच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमासाठी आणि अवकाश खासगीकरणासाठीच्या योजनेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा प्रयत्न आहे.


🔰इस्रोचे अध्यक्ष डॉ. के शिवन आणि वैज्ञानिक सचिव डॉ. आर उमामहेश्वरन यांची नावे तळावरील पॅनेलवर कोरलेली आहेत. पीएसएलव्ही-सी ५१ रॉकेट हे पीएसएलव्ही (ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन) चे ५३ वे मिशन आहे, यात ब्राझीलचा अॅमेझोनिया -१ हा प्राथमिक उपग्रह आहे आणि इतर १८ पेलोड आहेत. आंध्र प्रदेशातील नेल्लूर जिल्ह्यातील श्रीहरिकोटा स्पेसपोर्टच्या पहिल्या लॉन्चपॅडवरून हे प्रक्षेपित करण्यात

लिगिया नोरोन्हा (भारतीय): संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) याच्या नव्या सहाय्यक सरचिटणीस



🌻सयुक्त राष्ट्रसंघाचे (UN) प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी भारतीय अर्थशास्त्रज्ञ लिगिया नोरोन्हा यांची संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) याच्या सहाय्यक सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे.


🌻तयामुळे लिगिया नोरोन्हा भारतीय सहकारी आणि अर्थशास्त्रज्ञ सत्या त्रिपाठी यांची जागा घेणार आहेत.


🌻लिगिया नोरोन्हा ह्या एक अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याचा 30 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 2014 सालापासून नैरोबी येथून UNEP च्या आर्थिक विभागात संचालिक म्हणून काम पाहिले आहे. UNEP मध्ये दाखल होण्यापूर्वी त्यांनी नवी दिल्लीतील 'द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट (TERI) या संस्थेमध्ये कार्यकारी संचालिका म्हणून काम केले आहे.


🌻 तसेच त्यांनी संसाधन, नियमन आणि ग्लोबल सिक्युरिटी सेक्शनच्या संचालिका म्हणूनही काम पाहिलेले आहे.


🌻गल्याच आठवड्यात गुटेरेस यांनी गुंतवणूकविषयक तज्ज्ञ असणाऱ्या उषा राव मोनारी यांची संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रमाच्या (UNDP) सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे.


संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) विषयी


🌻हा संयुक्त राष्ट्रसंघाचा एक अंग असून ते प्रमुख जागतिक पर्यावरण प्राधिकरण आहे. ही संस्था जागतिक पर्यावरण संरक्षणासाठी जागतिक पातळीवर कार्य करते. संस्थेची 5 जून 1972 रोजी स्थापना झाली. संस्थेचे मुख्यालय नैरोबी (केनिया) येथे आहे.

भारतातील शाळकरी विद्यार्थ्यांकडून १८ लघुग्रहांचा शोध.



⛰भारतीय विद्यार्थ्यांच्या चमूने एका वैज्ञानिक प्रकल्पात अठरा नवीन लघुग्रहांचा शोध लावला असल्याचे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेने (आयएयू) म्हटले आहे.


⛰भारतातील विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध प्रकल्पात भाग घेतला होता. स्टेम व स्पेस या संस्थांनी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संशोधन आघाडीच्या मदतीने नासा नागरी विज्ञान प्रकल्पाचा भाग म्हणून ही मोहीम हाती घेतली होती. गेल्या दोन वर्षांत भारतातील दीडशे विद्यार्थी यात सहभागी झाले. त्यात एकूण १८ नवे लघुग्रह शोधण्यात आले आहेत.


⛰सटेम अँड स्पेसच्या प्रमुख मिला मित्रा यांनी सांगितले की, हा सर्वात मोठा प्रकल्प होता.  या प्रकल्पात भारतातील तसेच जगातील विद्यार्थ्यांनी खगोलशास्त्रीय माहितीचा अभ्यास केला. ही माहिती आंतरराष्ट्रीय खगोल संशोधन आघाडीने पुरवली होती. त्यात विद्यार्थ्यांनी लघुग्रह व पृथ्वी निकटचे घटक शोधून काढणे अपेक्षित होते. पृथ्वी निकटचे घटक हे मंगळ ते गुरू या पट्टय़ात फिरत असतात, पण ते काही वेळा पृथ्वीवर आदळण्याचा धोका असतो.


⛰मित्रा व त्यांच्या पथकाने म्हटले आहे की, विद्यार्थ्यांनी सॉफ्टवेअर व खगोलीय माहिती विश्लेषण यातून रोज दोन-तीन तास काम करून लघुग्रह शोधले आहेत. सुरुवातीला प्राथमिक निरीक्षणात ३७२ लघुग्रह ओळखण्यात आले. त्यानंतर १८ हंगामी लघुग्रह म्हणून मान्य करण्यात 

जयदीप भटनागर: पत्र सूचना कार्यालय (PIB) याचे नवीन प्रधान महासंचालक.



🔰जयदीप भटनागर यांनी 01 मार्च 2021 रोजी पत्र सूचना कार्यालय (PIB) याच्या प्रधान महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला. भटनागर यांनी 28 फेब्रुवारी 2021 रोजी कुलदीप सिंग धतवालिया यांच्याकडून पदभार स्वीकारला.


🔰जयदीप भटनागर हे भारतीय माहिती सेवेच्या 1986 च्या तुकडीचे अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी दूरदर्शनच्या वाणिज्यिक, विक्री आणि विपणन विभागाचे प्रमुख म्हणून दूरदर्शनच्या वृत्तविभागात काम केले आहे. त्यांनी पश्चिम आशियाच्या वीस देशांसाठी प्रसार भारतीचे विशेष प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. त्यांनी आकाशवाणी, वृत्तसेवा विभागाचे प्रमुख म्हणून देखील काम पाहिले आहे.


🔴पत्र सूचना कार्यालय (PIB) विषयी....


🔰वत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांना भारत सरकारची धोरणे, कार्यक्रम, उपक्रम आणि त्यांची साध्यता याबद्दल माहिती देणारी ही प्रमुख संस्था आहे.


🔰ही संस्था केंद्रीय सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते.

जून 1919 मध्ये ब्रिटिश सरकारच्या अंतर्गत एक जाहिरात कक्ष म्हणून संस्थेची स्थापना झाली. 1946 साली संस्थेला वर्तमान नाव देण्यात आले.


🔰बरिटिश काळात संस्थेचे पहिले प्रमुख डॉ एल. एफ. रशब्रुक विल्यम्स हे होते. 1941 साली पहिले भारतीय प्रधान माहिती अधिकारी म्हणून जे. नटराजन यांची संस्थेच्या प्रमुखपदी निवड झाली.

धोरणात्मक उपक्रम, स्टार्टअपचे सादरीकरण.



🎪जव तंत्रज्ञानासाठी प्रकल्प विकास कक्षाची घोषणा.


🎪‘एबीएल’ चा ‘इंडियन बायो इकॉनॉमी रिपोर्ट’, आणि आयएफसीचा ‘बायोटेक इनवेस्टमेंट पोटेन्शियल फॉर इंडियन स्टेटस रिपोर्ट’ सादर केला.

 

🎪जागतिक जैव-अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये जैव तंत्रज्ञान नवोन्मेश परिसंस्थे (बायोटेक इनोव्हेशन इकोसिस्टम) ची संभाव्यता आणि तिची वेगवान वाढ ही महत्त्वपूर्ण योगदान देते. 


🎪भारतीय जैव तंत्रज्ञान परीसंस्थेला चालना देणाऱ्या स्टार्ट-अप्स, उद्योजक, शैक्षणिक संस्था आणि उद्योगांच्या  वाढीस प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक पातळीवर मोठा जोर देण्यात आला आहे. 


🎪डीबीटी-बीआयआरएसी द्वारे 1 ते 3 मार्च 2021 दरम्यान ग्लोबल बायो-इंडियाचे आयोजन करण्यात आले आहे आणि काल स्टार्टअप कॉन्क्लेव्ह-इनोव्हेशन ड्राईव्हन बायो-इकॉनॉमी या विषयावरील सत्रामध्ये 50 देशांमधील 6000 पेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी झाले होते. 


🎪परमुख पाहुणे, केंद्रीय रेल्वे, वाणिज्य व उद्योग मंत्री आणि ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री, पियुष गोयल यांनी 5 स्टार्टअप्सची उत्पादनांचे उद्घाटन केले.  


🎪कलाम इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ टेक्नॉलॉजीने (केआयएचटी) डिझाइन केलेल्या टेक-ओलाचा देखील मंत्र्यांनी शुभारंभ केला. टेक-ओला हे एक एकल खिडकी ई-बाजार (सिंगल विंडो ई-मार्केट प्लेस) अ‍ॅप आहे, जे सर्व सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील प्रयोगशाळा, फॅब्रिकेशन आणि प्रोटोटाइप केंद्रांना एकत्रित आणते. 


🎪 यामुळे नव-निर्मात्यांना चाचणी, मशीनिंग, प्रोटोटाइपिंग, फॅब्रिकेशन, 3-डी प्रिंटिंग, प्रमाणीकरण, साहित्य वैशिष्ट्यीकरण, विद्युत, इलेक्ट्रॉनिक्स आणि लेसर सेवा आणि बॅच उत्पादन यासारख्या सुलभ पद्धतीने प्राप्त होण्यास मदत मिळेल.


🎪मत्र्यांनी निवड केलेल्या 5 स्टार्टअप्सचे अभिनंदन केले आणि  हे स्टार्ट अप भारताच्या आत्मनिर्भर भारत मोहिमेच्या समकालीन विचारांचे प्रतिबिंब असल्याचे सांगितले. जैवअर्थव्यवस्था आणि डिजिटल व माहिती अर्थव्यवस्था एकत्रित आल्या तर जैव तंत्रज्ञान अधिक विकसित होईल यावर पीयुष गोयल यांनी भर दिला. 


🎪नवोन्मेश , शोध आणि संशोधनाचे उर्जास्थान बनण्यासाठी देशाच्या क्षमता दर्शविण्यातील भारताच्या भविष्यातील आर्थिक वाढीसाठी हा एक निर्णायक क्षण आहे.


🎪मत्र्यांनी जैव तंत्रज्ञानासाठी प्रकल्प विकास कक्षाची औपचारिक घोषणा केली आणि  ‘एबीएल’ चा ‘इंडियन बायो इकॉनॉमी रिपोर्ट’, आणि आयएफसीचा ‘बायोटेक इनवेस्टमेंट पोटेन्शियल फॉर इंडियन स्टेटस  रिपोर्ट’ सादर केला.


🎪एकत्रित भारतीय जैव-अर्थव्यवस्था अहवाल हा जैव-अर्थव्यवस्थेमध्ये जैव तंत्रज्ञान क्षेत्राच्या नवीन आकडेवारीवर आधारित आहे. या अहवालानंतर 2024-25 पर्यंत नियमित अद्यतने व भारतीय जैव तंत्रज्ञान उद्योगाच्या रोडमॅपचा आढावा घेण्यात येईल.


🎪वर्ष 2020 हे आव्हानांचे वर्ष तर होतेच परंतु ते त्यासोबत संधींचे वर्ष देखील होते असे जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिव डॉ. रेणु स्वरूप यांनी नमूद केले.

UPSC मार्फत नागरी सेवा पूर्व परीक्षा 2021 [712 जागा]



शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. 


वयाची अट: 01 ऑगस्ट 2021 रोजी 21 ते 32 वर्षे  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत


Fee: General/OBC: ₹100/-     [SC/ST/PWD/महिला:फी नाही]


परीक्षा:

पूर्व परीक्षा:  27 जून 2021 

मुख्य परीक्षा: 17-22 सप्टेंबर 2021


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मार्च 2020  (06:00 PM)


ऑनलाइन लिंक

https://upsconline.nic.in/mainmenu2.php

सीबीआयचे आतापर्यंतचे सर्व संचालक



👤 डी पी कोहली : १९६३ ते १९६८

👤 एफ वी अरुल : १९६८ ते १९७१

👤 डी सेन : १९७१ ते १९७७

👤 एस एन माथुर : १९७७ ते १९७७

👤 सी वी नरसिंहन : १९७७ ते १९७७

👤 जॉन लोबो : १९७७ ते १९७९

👤 आर डी सिंह : १९७९ ते १९८०

👤 ज एस बाजवा : १९८० ते १९८५

👤 एम जी कत्रे : १९८५ ते १९८९

👤 ए पी मुखर्जी : १९८९ ते १९९०

👤 आर शेखर : १९९० ते १९९०

👤 विजय करण : १९९० ते १९९०

👤 एस के दत्ता : १९९० ते १९९३

👤 क वी आर राव : १९९३ ते १९९६

👤 जोगिंदर सिंह : १९९६ ते १९९७

👤 आर सी शर्मा : १९९७ ते १९९८

👤 डी आर कार्तिकेयन : १९९८ ते १९९८ 

👤 टी एन मिश्रा : १९९८ ते १९९९

👤 आर के राघवन : १९९९ ते २००१

👤 पी सी शर्मा : २००१ ते २००३

👤 य एस मिश्रा : २००३ ते २००५

👤 वी एस तिवारी : २००५ ते २००८

👤 अश्वनी कुमार : २००८ ते २०१०

👤 ए पी सिंह : २०१० ते २०१२

👤 रणजित सिन्हा : २०१२ ते २०१४

👤 अनिल सिन्हा : २०१४ ते २०१६

👤 राकेश अस्थाना : २०१६

👤 आलोक वर्मा : २०१७

👤 एम नागेश्वर राव : २०१८ ते २०१९

👤 आर के शुक्ला : २०१९ ते २०२१

👤 परविण सिन्हा : २०२१ पासून

ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले उठाव :



◼️संन्याशाचा उठाव :  1765-1800 - बंगाल शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक

 

◼️चुआरांचा उठाव : 1768 - बंगाल-मिजापूर जिल्हा जगन्नाथ घाला

 

◼️हो जमातीचे बंड : 1820 - छोटा नागपूर व सिंगभूम

 

◼️जमिनदारांचा उठाव : 1803 - ओडिशा जगबंधू

 

◼️खोंडांचा उठाव : 1836 - पर्वतीय प्रदेश दोरा बिसाई

 

◼️संथाळांचा उठाव : 1855 - कान्हू व सिंधू

 

◼️खासींचा उठाव : 1824 - आसाम निरतसिंग

 

◼️कुंकिंचा उठाव : 1826 - मणिपूर

 -----------------------------------------------

दक्षिण भारतातील उठाव  -


⚫️पाळेगारांचा उठाव : 1790 - मद्रास

 

⚫️म्हैसूरमधील शेतकर्‍यांचा उठाव : 1830 - म्हैसूर

 

⚫️विजयनगरचा उठाव : 1765 - विजयनगर

 

⚫️गोरखपूरच्या जमिनदारांचा उठाव : 1870 - गोरखपूर

 

⚫️रोहिलखंडातील उठाव : 1801 - रोहिलखंड

 

⚫️रामोश्यांचा उठाव : 1826 - महाराष्ट्र उमाजी नाईक व बापू त्र्यंबकजी सावंत

 

⚫️भिल्ल व कोळ्यांचा उठाव : 1824

 

⚫️केतूरच्या देसाईचा उठाव : 1824 - केतूर

 

⚫️फोंडा सावंतचा उठाव : 1838


⚫️भिल्लाचा उठाव : 1825- खानदेश

 

⚫️दख्खनचे दंगे : 1875- पुणे,सातारा,महाराष्ट्र शेतकरी


भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टात असलेल्या २२ भाषा व मान्यता प्राप्त वर्ष



🔰 आसामी : १९५० 

🔰 बगाली : १९५०

🔰 गजराती : १९५०

🔰 हिंदी : १९५०

🔰 काश्मिरी : १९५० 

🔰 कन्नड : १९५०

🔰 मल्याळम : १९५०

🔰 मराठी : १९५०

🔰 ओडिया : १९५०

🔰 पजाबी : १९५०

🔰 सस्कृत : १९५०

🔰 तमिळ : १९५०

🔰 तलुगु : १९५०

🔰 उर्दू : १९५०

🔰 सिंधी : १९६७

🔰 मणिपुरी : १९९२

🔰 कोंकणी : १९९२

🔰 नपाळी : १९९२

🔰 बोडो : २००३

🔰 डोंगरी : २००३

🔰 मथिली : २००३

अंदमान आणि निकोबार बेटे बनली कोरोनामुक्त होणारा पहिला केंद्र शासित प्रदेश



✔️अदमान आणि निकोबार बेटे देशातील पहिले कोविड - १९ मुक्त राज्य किंवा केंद्र शासित प्रदेश बनली आहेत.

✔️आरोग्य मंत्रालयाच्या संकेतस्थळाद्वारे अंदमान आणि निकोबार बेटांवरील शेवटचे ४ संसर्गग्रस्त लोक बरे झाले असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

✔️सदर केंद्रशासित प्रदेशात कोरोनामुळे एकूण ४९३२ रुग्ण तसेच ६२ मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.


⚜️अंदमान आणि निकोबार बाबत महत्वपूर्ण माहिती⚜️

✔️१ नोव्हेंबर १९५६ रोजी अंदमान आणि निकोबारची स्थापना करण्यात आली होती.

✔️पोर्ट ब्लेअर ही अंदमान आणि निकोबारची राजधानी आहे.

✔️अ‍ॅडमिरल (निवृत्त) देवेंद्रकुमार जोशी हे सध्या लेफ्टनंट गव्हर्नर पदावर कार्यरत आहेत.

तिसरी पंचवार्षिक योजना



🍀कालावधी:1 एप्रिल 1961 ते 31 मार्च 1966


🍀भर:-कृषी व मूलभूत उद्योग


1962 ला संरक्षण व विकास केला


🍀परतिमान:-महालनोबिस व सुखमाय चक्रवर्ती


🌹राजकीय घडामोडी:-


1962 भारत चीन युद्ध


1962 गोवा मुक्त


1963 नागालँड


योजना


🌹1964-65:-सघन कृषी क्षेत्र कार्यक्रम


🌹1965:-कृषी मूल्य आयोग स्थापन


अद्यक्ष:-प्रो.दांतवाला


शिफारस:-एल के झा समिती


1965 भारतीय अन्न महामंडळ


1964 IDBI स्थापन


1964 UTI स्थापन


सर्वाधिक अपयशी योजना

महाराष्ट्रातील विद्युत प्रकल्प आणि जिल्हे



महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प  


▪️ तर्भ-मुंबई, खापरखेडा : नागपूर.

▪️बल्लारपूर : चंद्रपूर.

▪️ चोला : ठाणे.

▪️ परळी बैजनाथ : बीड.

▪️ पारस : अकोला.

▪️ एकलहरे : नाशिक.

▪️ फकरी : जळगाव.


महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प


▪️ खोपोली : रायगड.

▪️ भिरा अवजल प्रवाह : रायगड.

▪️ कोयना : सातारा.

▪️ तिल्लारी : कोल्हापूर.

▪️ पच : नागपूर.

▪️ जायकवाडी . औरंगाबाद.


महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प 


▪️ तारापुर : ठाणे.

▪️ जतापुर : रत्नागिरी.

▪️ उमरेड : नागपूर.


महाराष्ट्रातील पवनविद्युत प्रकल्प 


▪️ जमसांडे : सिंधुदुर्ग.

▪️ चाळकेवाडी : सातारा.

▪️ ठोसेघर : सातारा.

▪️ वनकुसवडे : सातारा.

▪️ बरह्मनवेल : धुळे.

▪️ शाहजापूर : अहमदनगर.

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...