२७ फेब्रुवारी २०२१

रिअर ऍडमिरल एस. व्यंकटरमण यांनी गोव्याच्या नौदल युद्ध महाविद्यालयाचा कार्यभार स्वीकारला.



🔰रिअर ऍडमिरल एस. व्यंकटरमण, विशिष्ट सेवा पदक यांनी शुक्रवारी गोव्यात, भारतीय नौदलाच्या प्रतिष्ठित नौदल युद्ध महाविद्यालयाच्या प्रमुख म्हणून  कार्यभार स्वीकारला. रिअर ऍडमिरल संजय जसजीत सिंह , अति विशिष्ट सेवा पदक,एनएम यांच्याकडून ऍडमिरल यांनी नौदलाच्या सर्वोच्च प्रशिक्षण संस्थेचा कार्यभार स्वीकारला.

 

🔰रणनितीक आणि कार्यात्मक विचारांच्या संस्कृतीला चालना देण्याच्या दृष्टीने,संरक्षण नियोजन, सामरिक आणि  कार्यात्मक विषयांवर परदेशी सहभागींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी हे  नौदल युद्ध  महाविद्यालय  प्रशिक्षण आयोजित करते.


🔰रियर ऍडमिरल व्यंकटरमण हे राष्ट्रीय संरक्षण अकादमी खडकवासलाचे माजी विद्यार्थी आहेत. ते कम्युनिकेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स युद्ध पद्धतीत तज्ञ आहेत.1 जानेवारी 1990 रोजी सेवेत रुजू झालेल्या व्यंकटरमण यांची भारतीय नौदलाच्या आघाडीच्या युद्धनौकांवर विविध ठिकाणी नियुक्ती झाली आहे.


🔰तयांच्या समुद्रातील कार्यकाळात आय एन एस तबार या विनाशिकेवर त्यांनी काम केले आहे. गोव्यात कार्यभार स्वीकारण्यापूर्वी ते नौदल मुख्यालयातील नौदल गुप्तहेर संचालनालयाचे प्रमुख होते.


🔰सरक्षण व्यवस्थापन महाविद्यालयातून व्यवस्थापन अभ्यासक्रमात संरक्षण आणि रणनितिक अभ्यासक्रमात  पदव्युत्तर पदवीसह अनेक पदव्युत्तर अभ्यासक्रम कार्यक्रम त्यांनी पूर्ण केले आहेत.

ग्रीन कार्ड’वरील बंदीचा निर्णय बायडेन यांच्याकडून रद्द.



🔰अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना साथीच्या काळात अनेक ग्रीन कार्ड अर्जदारांचा अमेरिकेतील प्रवेश रोखला होता, मात्र नवे अध्यक्ष जो बायडेन यांनी ट्रम्प यांचा हा धोरणात्मक निर्णय रद्द केल्याने आता अमेरिकेत एच-१बी व्हिसावर काम करणाऱ्या अनेक भारतीयांना बायडेन यांच्या निर्णयामुळे लाभ होणार आहे.


🔰गरीन कार्ड हे अमेरिकेत कायमस्वरूपी वास्तव्यास मुभा असलेले अधिकृत कार्ड म्हणून ओळखले जाते. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील भारतीय व्यावसायिक मुख्यत्वे एच-१बी व्हिसा घेऊन अमेरिकेत येतात. मात्र सध्याच्या इमिग्रेशन पद्धतीचा त्यांना मोठा फटका बसत होता.


🔰गरीन कार्ड अर्जदारांना देशात पुन्हा प्रवेश खुला करताना जो बायडेन यांनी म्हटले आहे की, माजी अध्यक्ष ट्रम्प यांच्या धोरणामुळे अमेरिकेच्या हिताची जपणूक होत नव्हती. ट्रम्प यांच्या निर्णयामुळे अमेरिकेतील जे उद्योगसमूह जगभरातील गुणवत्तेचा वापर करून घेत होते त्यांचीही हानी होत होती, असेही बायडेन यांनी म्हटले आहे.

लव्ह जिहाद’ विरुद्ध गुजरातमध्ये लवकरच कायदा.



🔰हिंदू मुलींचे अपहरण आणि धर्मातर थांबवण्यासाठी आपले सरकार ‘लव्ह जिहाद’ विरुद्ध कायदा करेल, असे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी गुरुवारी एका निवडणूक प्रचार सभेत सांगितले.


🔰राज्य विधानसभेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतचे विधेयक मांडण्याच्या इराद्याचा रुपाणी यांनी पंचमहाल जिल्ह्य़ातील गोध्रा येथे पुनरुच्चार केला. ‘लव्ह जिहाद’ म्हणजे हिंदू महिलांचे विवाहाच्या माध्यमातून धर्मातर करण्याच्या कथित कारस्थानाविरोधात मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशातील भाजप सरकारांनी यापूर्वी कायदे केले आहेत.


🔰‘विधानसभेचे अधिवेशन १ मार्चपासून सुरू होत असून, लव्ह जिहादच्या विरोधात कठोर कायदा करण्याची माझ्या सरकारची इच्छा आहे. हिंदू मुलींच्या अपहरणाचे प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. महिलांना प्रलोभन दाखवून त्यांचे धर्मातर करण्यात येते. असे प्रकार थांबवणे हा या नव्या कायद्याचा उद्देश आहे’, असे रुपाणी म्हणाले.


🔰राज्यात २८ फेब्रुवारीला होत असलेल्या नगरपालिका, तालुका व जिल्हा पंचायत निवडणुकांसाठी रुपाणी सध्या प्रचार करत आहेत. राज्यातील भाजप सरकार अशा प्रकारचा कायदा करणार असल्याचे त्यांनी १५ फेब्रुवारीला सर्वप्रथम जाहीर केले होते. भाजपचे आमदार शैलेश मेहता व पक्षाचे बडोद्याच्या खासदार रंजनाबेन भट्ट यांनी यापूर्वी उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशच्या धर्तीवर असा कायदा करण्याची मागणी केली होती.

इंधन दरवाढ हे धर्मसंकट; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य.



🔰केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी एका कार्यक्रमामध्ये इंधन दरवाढीसंदर्भात एक भाष्य केलं आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती कधी कमी होतील हे आपल्याला सांगता येणार नाही असं सीतारामन यांनी म्हटलं आहे. तसेच पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या किंमती या धर्मसंकट असल्याचेही निर्मला यांनी म्हटलं आहे.


🔰अहमदाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये पेट्रोल, डिझेलच्या किंमती कधी कमी होणार यासंदर्भातील प्रश्नावर, “मला नाही संगता येणार ‘कधी’.. हे धर्मसंकट आहे,” असं उत्तर दिलं.


🔰“यावर केवळ उपकर आकारला जातो असं नाही. केंद्राकडून आकरले जाणारे उत्पादन शुल्क तसेच राज्यांकडून आकारला जाणारा व्हॅटही यामध्ये असतो. त्यामुळे यामधून महसूल मिळतो हे काही लपवण्यासारखी गोष्ट नाही. केवळ मलाच नाही तुम्ही कोणत्याही राज्याला विचारलं तरी यात महसूल आहे असं ते सांगतील,” असंही निर्मला यांनी म्हटलं.


🔰या इंधन दरवाढीवर मार्ग काढण्याचा एकमेव उपाय म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारांनी चर्चा करावी हा आहे, असंही निर्मला यांनी म्हटलं. “यासंदर्भात काहीतरी करणं गरजेचे आहे हे मला मान्य आहे. आम्हाला काय करणं शक्य आहे पाहुयात,” असंही निर्मला यांनी ग्राहकांना अधिक पैसे द्यावे लागू नयेत असं मत मांडताना म्हटलं आहे.

नेपाळचे पंतप्रधान ओली राजीनामा देण्यास अनुत्सुक.



🔰नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली हे लगेच राजीनामा देणार नाहीत, तर येत्या दोन आठवडय़ांत संसदेला सामोरे जाऊन सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करतील, असे ओली यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका अधिकाऱ्याने बुधवारी सांगितले.


🔰ससदेचे २७५ सदस्यांचे कनिष्ठ सभागृह विसर्जित करण्याचा ओली सरकारचा निर्णय ‘घटनाविरोधी’ असल्याचा निर्णय सरन्यायाधीश चोलेंद्र शमशेर यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यांच्या घटनापीठाने मंगळवारी दिला होता. येत्या १३ दिवसांच्या आत सभागृहाचे अधिवेशन बोलवावे, असाही आदेश न्यायालयाने ओली यांना दिला होता.


🔰सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षात (एनसीपी) सत्तासंघर्ष सुरू असतानाच, पंतप्रधान ओली यांच्या शिफारशीवरून राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी २० डिसेंबरला ‘प्रतिनिधी सभा’ हे संसदेचे कनिष्ठ सभागृह विसर्जित करून ३० एप्रिल व १० मे रोजी नव्याने निवडणुका घेण्याची घोषणा केली होती. यामुळे देशात राजकीय संकट उद्भवले.


🔰दोन आठवडय़ांच्या आत अधिवेशन होणार असलेल्या संसदेला सामोरे जाऊन, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचा ओली यांचा मनोदय आहे, अशी माहिती त्यांचे माध्यम सल्लागार सूर्य थापा यांनी दिली.

जागतिक स्पर्धेची अंतिम फेरी महत्त्वाची.



🔰महान अष्टपैलू कपिलदेव यांच्या १३१ कसोटींचा विक्रम मोडण्याचा अद्याप विचारही केला नसून सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताला पोहोचविण्याचे एकमेव ध्येय माझ्यासमोर आहे, अशी प्रतिक्रिया अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माने व्यक्त केली.


🔰मोटेरा येथील सरदार पटेल स्टेडियमवर भारत-इंग्लंड यांच्यातील गुलाबी चेंडूने खेळल्या जाणाऱ्या प्रकाशझोतातील तिसऱ्या कसोटीला बुधवारपासून प्रारंभ होणार आहे. इशांतच्या कारकीर्दीतील हा १००वा कसोटी सामना असणार आहे.


🔰कपिल यांच्यानंतर १०० कसोटी खेळणारा इशांत हा भारताचा दुसराच वेगवान गोलंदाज ठरणार आहे. त्याशिवाय कपिल यांच्या १३१ कसोटींचा विक्रम मोडण्याचीही संधी इशांतला आहे. याविषयी इशांत म्हणाला, ‘‘कपिल यांच्या विक्रमाविषयी मी अद्याप विचारही केलेला नाही. भारतासाठी १००वी कसोटी खेळण्याची संधी मिळणे, हीच माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. सध्या मी ३२ वर्षांचा असून एकाच प्रकारात भारतासाठी खेळत असल्याने तंदुरुस्ती टिकवण्याबरोबरच जोपर्यंत स्वत:चे १०० टक्के योगदान देऊ शकेन, तोपर्यंत निवृत्तीचाही विचार करणार नाही.’’


🔰‘‘जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने ही मालिका फार महत्त्वपूर्ण असल्याने मी सध्या भारताला कशाप्रकारे जिंकवता येईल, याचाच विचार करत आहे. कारकीर्दीत मी एकदाही विश्वचषक खेळलो नाही. त्यामुळे आम्ही जर जागतिक स्पर्धा जिंकली, तर अन्य खेळाडू ज्याप्रमाणे विश्वचषक विजयाचा जल्लोष करतात त्याचप्रमाणे मीसुद्धा या जेतेपदाचा आनंद साजरा करेन,’’ असेही इशांतने सांगितले.

संरक्षण उत्पादन क्षमता वाढवण्यास भारत वचनबद्ध.


🔰भारताला पूर्वीच्या काळापासून शस्त्रे व लष्करी साधने बनवण्याचा अनुभव होता. स्वातंत्र्यानंतर देशाला ही क्षमता वाढवता आली नाही. परंतु आता आम्ही संरक्षण उत्पादन क्षमता वाढवण्यास वचनबद्ध आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.


🔰कद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदींची योग्य अंमलबजावणी करण्याबाबतच्या एका वेबिनारमध्ये ते बोलत होते. सरकारला देश संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर होण्याची अपेक्षा आहे. स्वातंत्र्यापूर्वी आपल्याकडे शस्त्रे व लष्करी सामग्री निर्मितीच्या क्षमता होत्या.


🔰जागतिक महायुद्धांमध्येही भारताने मोठय़ा प्रमाणात शस्त्रांची निर्यात केली होती, पण स्वातंत्र्यानंतर अनेक कारणांनी संरक्षण उत्पादन क्षमतेत भारत मागे पडत गेला. आपल्याला अगदी लहान शस्त्रेही परदेशांकडून विकत घेण्याची वेळ आली. भारत हा शस्त्रांचा मोठा आयातदार देश बनला, पण ही अभिमानाची बाब नाही. भारतातील लोकांकडे संरक्षण उत्पादनाची क्षमता नाही असा भाग नाही, ते वाढवता येऊ शकते पण आधीच्या काळात शस्त्रांची आयात करण्यात आली.


🔰भारतात आता परिस्थिती बदलत असून संरक्षण सामग्री उत्पादन वाढवण्यास सरकार वचनबद्ध आहे. निर्यात उत्तेजन, परदेशी गुंतवणूक उदारीकरण याच्या माध्यमातून सरकारने संरक्षण उत्पादन वाढीस चालना दिली आहे. संरक्षणप्रमुख पद निर्माण करून भारताने संरक्षण उत्पादन खरेदी प्रक्रियेत समन्वय साधला आहे. त्यामुळे आता नवीन संरक्षण शस्त्र सामुग्रीची निर्मिती शक्य झाली आहे.

ब्रिक्स’ यजमानपदासाठी भारताला चीनचा पाठिंबा.



🔰ब्रिक्स शिखर परिषदेचे या वर्षीचे यजमानपद भारताने स्वीकारण्यास चीनने पाठिंबा दर्शविला असून पाच सदस्य असलेल्या देशांमधील सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी भारतासमवेत काम करण्याची तयारीही दर्शविली आहे. पूर्व लडाखमधून भारत आणि चीन यांनी आपले सैन्य मागे घेण्यास सुरुवात केल्यानंतर चीनने भारताला पाठिंबा दर्शविला आहे.


🔰भारताने २०२१ च्या ब्रिक्स शिखर परिषदेचे (ब्राझील, रशिया, भारत, चीन, दक्षिण आफ्रिका) अध्यक्षपद स्वीकारण्याचे गृहीत धरले असून त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी १९ फेब्रुवारी रोजी दिल्लीच्या सुषमा स्वराज भवनातील ब्रिक्स सचिवालयात भारताचे ब्रिक्स २०२१ संकेतस्थळ सुरू केले.


🔰यावर्षीच्या ब्रिक्स परिषदेचे यजमानपद भारताने स्वीकारण्याचे ठरविले आहे त्या बाबत विचारले असता चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी, भारताने ब्रिक्सचे यजमानपद स्वीकारण्यास चीनचा पाठिंबा असल्याचे, सांगितले.


🔰बरिक्स हा आता आंतरराष्ट्रीय व्यवहारांमध्ये सकारात्मक, स्थिर आणि रचनात्मक शक्ती आहे, असे ते म्हणाले. मात्र, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग शिखर परिषदेला उपस्थिती राहणार आहेत का, त्याबाबत वांग यांनी कोणतेही भाष्य केले नाही.

सर्वच भरती प्रक्रिया लोकसेवा आयोगामार्फत राबविण्याचा सरकारचा विचार



महाराष्ट्रातील विविध विभागातील रखडलेल्या नोकरभरती संदर्भात मोठी अपडेट समोर आली असून केवळ क्लासवन अधिकारीच नाही तर चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांच्या नोकरभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्यामार्फत मार्फत घेण्याचा विचार राज्य सरकार करत असून यासाठी राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी यासंदर्भात विविध विभागांच्या सचिवांची बैठक बोलविली आहे.


सध्या आयोगामार्फत वर्ग एक आणि वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांचीच निवड केली जाते तर अराजपत्रित ब, क आणि ड संवर्गातील पदांची भरती दुय्यम सेवा निवड मंडळांमार्फत केली जात असून यापुढे ही भरती निवड मंडळांऐवजी  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्याचा सरकाराच प्रस्ताव विचाराधीन असून कोणत्या संवर्गांची नोकरभरती आयोगामार्फत करता येईल, याची चाचपणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना दिले असून त्या अनुषंगानेच फेब्रुवारी महिन्यातच मुख्य सचिव सदरील बैठक घेणार आहेत.


यापूर्वी दुय्यम सेवा निवड मंडळाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी वा विभागीय आयुक्त हे असतात आणि या दुय्यम निवड मंडळाला भरती प्रक्रियेत साहाय्य करण्यासाठी अलीकडेच तीन कंपन्यांची नव्याने नियुक्ती सामान्य प्रशासन विभागाने केली असली तरी मात्र विश्वासार्हता आणि पारदर्शकतेसाठी दुय्यम सेवा मंडळाच्या अखत्यारीतील निवड प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे देण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचे समजते.

वन सर्वेक्षण अहवालातील महत्वाच्या बाबी



सर्वाधिक बांबू क्षेत्र असलेली पहिली चार राज्ये

             

               1. मध्य प्रदेश

               2.महाराष्ट्र

               3.अरुणाचल प्रदेश

               4. ओडिसा


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


कांदळवन क्षेत्र (mangrove cover) सर्वाधिक असलेली राज्ये


              1.पश्चिम बंगाल

              2.गुजरात

              3.अंदमान व निकोबार बेटे

              4.आंध्र प्रदेश

              5.महाराष्ट्र


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


कार्बन साठा सर्वाधिक असलेली राज्ये


               1. अरुणाचल प्रदेश

               2. मध्य प्रदेश

               3. छत्तीसगड

               4.महाराष्ट्र


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


सर्वाधिक वनक्षेत्र (क्षेत्रफळानुसार) असलेली राज्ये


              1. मध्य प्रदेश

              2.आंध्र प्रदेश

              3. छत्तीसगड

              4.ओडिसा

              5.महाराष्ट्र


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


सर्वाधिक वनक्षेत्र ( टक्केवारी नुसार) असलेली राज्ये


             1.मिझोराम

             2.अरुणाचल प्रदेश

             3.मेघालय




🔥 सर्वाधिक वेळा मिझोराम राज्यात वणवे निदर्शनास आले.(forest fire alert)

राज्य आणि राज्यसभा सदस्य संख्या


𝟏. अरूणाचल प्रदेश(𝐀𝐑 ) 𝟏              


 𝟐. आसाम (𝐀𝐒 ) 𝟕                             


 𝟑. आंध्र प्रदेश(𝐀𝐏 ) 𝟏𝟏                     


 𝟒. उत्तर प्रदेश(𝐔𝐏 ) 𝟑𝟏                     


 𝟓. उत्तराखंड(𝐔𝐓𝐊 ) 𝟑                     


 𝟔. ओडिशा(𝐎𝐑 ) 𝟏𝟎                        


 𝟕. कर्नाटक(𝐊𝐀𝐑 ) 𝟏𝟐                     


 𝟖. केरल(𝐊𝐑 ) 𝟗                              


 𝟗. गुजरात(𝐆𝐉 ) 𝟏𝟏                        


 𝟏𝟎. गोवा(𝐆𝐎𝐀 ) 𝟏                        


 𝟏𝟏. छत्तीसगढ़(𝐂𝐇𝐓 ) 𝟓                 


 𝟏𝟐. जम्मू-कश्मीर(𝐉 & 𝐊 ) 𝟒            


 𝟏𝟑. झारखंड(𝐉𝐇𝐊 ) 𝟔                   


 𝟏𝟒. तमिलनाडु(𝐓𝐍 ) 𝟏𝟖                 


 𝟏𝟓. त्रिपुरा(𝐓𝐑 ) 𝟏                         


 𝟏𝟔. तेलंगाना(𝐓𝐆 ) 𝟕                      


 𝟏𝟕. नागालैंड(𝐍𝐆 ) 𝟏                     


 𝟏𝟖. निर्वाचित सदस्य (𝐍𝐎𝐌. ) 𝟏𝟐               


💥 𝙎𝙃𝘼𝙍𝙀 & 𝙎𝙐𝙋𝙋𝙊𝙍𝙏 💥


 𝟏𝟗. पंजाब(𝐏𝐁 ) 𝟕                         


 𝟐𝟎. पुडुचेरी(𝐏𝐔𝐃 ) 𝟏                     


 𝟐𝟏. पश्चिमी बंगाल(𝐖𝐁 ) 𝟏𝟔            


 𝟐𝟐. बिहार(𝐁𝐑 ) 𝟏𝟔                       


 𝟐𝟑. मेघालय(𝐌𝐆𝐇 ) 𝟏                  


 𝟐𝟒. मणिपुर(𝐌𝐍 ) 𝟏                      


 𝟐𝟓. मध्य प्रदेश(𝐌𝐏 ) 𝟏𝟏                


 𝟐𝟔. महाराष्ट्र(𝐌𝐇 ) 𝟏𝟗                   


 𝟐𝟕. मिज़ोरम(𝐌𝐙 ) 𝟏                     


 𝟐𝟖. राजस्थान(𝐑𝐉 ) 𝟏𝟎                   


 𝟐𝟗. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र,दिल्ली(𝐃𝐋 ) 𝟑

 

𝟑𝟎. सिक्किम(𝐒𝐊 ) 𝟏                     


 𝟑𝟏. हरियाणा(𝐇𝐑 ) 𝟓                     


 𝟑𝟐. हिमाचल प्रदेश(𝐇𝐏 ) 𝟑


Total - 245 ✔️

चंद्रशेखर आझाद उर्फ चंद्रशेखर सीताराम तिवारी



◾️23 जुलै 1906 ते  27 फेब्रुवारी 1931


 ◾️ राम प्रसाद बिस्मिल च्या मृत्यूनंतर त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन (HRA) या क्रांतिकारी संघटनेची हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HSRA) या नवीन नावाखाली पुनर्बांधणी केली.


◾️ तयांना भगत सिंग यांचे गुरू मानले जाते व ते HSRA चे प्रमुख होते.


◾️सघटना:- कीर्ति किसान पार्टी, नवजवान किसान सभा


◾️1921 मध्ये म. गांधींच्या असहकार आंदोलनात 15 व्या वर्षी चंद्रशेखरने सहभाग घेतला होता. 


◾️तयासाठी त्याला अटक झाली होती. तेव्हा न्यायालयात चंद्रशेखरने आपले आडनाव 'आझाद' असल्याचे नोंदवले


◾️सायमन कमिनला विरोधादरम्यान लाठीहल्यात लाला लजपतराय यांचे निधन


◾️बदला म्हणुन लाहोर चा SP जेम्स स्कॉट ला मारण्याचा कट रचला


◾️या कटात भगतसिंग, जय गोपाल, राजगुरु, आझात होते


◾️जम्स स्कॉट एेवजी सॉंडर्स हा

 अधिकारी मारला गेला


◾️वशांतर करुन राजकोट मार्गे इलाहाबाद येथे दाखल झाले


◾️27 फेब 1931 रोजी अलाहाबादच्या अल्फ्रेड पार्क येथे चंद्रशेखर आझाद व पोलिसांमध्ये गोळीबार झाला.

शेवटी स्वत:वर गोळी मारुन घेतली

२७ फेब्रुवारी - कविवर्य कुसुमाग्रज यांची जयंती


जन्म - २७ फेब्रुवारी १९१२ (पुणे)

स्मृती - १० मार्च १९९९ (नाशिक)


"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन्‌ आशा किनारा तुला पामराला' असे स्पष्टपणे सांगणारी अजरामर कविता लिहिणाऱ्या कविवर्य कुसुमाग्रजांची आज जयंती.


वि.वा.शिरवाडकर हे कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन करत. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्नवं असे त्यांचे वर्णन करतात. वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. 


कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस हा "मराठी भाषा दिवस" म्हणून साजरा केला जातो. मराठी साहित्यातील काव्य, कथा, नाटक या सर्व प्रकारात वैपुल्याने भर घालणाऱ्या आणि आपला ठसा उमटविणाऱ्या कुसुमाग्रजांचे मराठी कवितेत एक अढळ स्थान आहे. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर असे होते. त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचे नाव विष्णु वामन शिरवाडकर असे बदलले गेले. 


कुसुमाग्रज यांचे वडील शेतकरी होते. नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. यानंतर सोबत, स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. 


कुसुमाग्रजांनी उठा उठा चिऊताई सारख्या किलबिल कविता लिहिल्या तशाच पृथ्वीचे प्रेमगीत सारख्या गहन कविताही लिहिल्या. ’काढ सखे गळ्यातले’ सारखे लडिवाळ शब्दही त्यांचे आणि ’जे भुक्त त्यांची राहते पोटात सारी संस्कृती’ हे स्पष्टोक्तीचे परखड बोलही त्यांचेच. 


या महान साहित्यिकाचा काव्यव्यासंग अथांग असला तरीही कुसुमाग्रजांचे नाव घेताच डोळ्यापुढे उभा राहतो तो एक ओजस्वी क्रांतिकवी आणि कानी ऐकू येतो गगनभेदी जयघोष, ’गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार’. कवी कुसुमाग्रज हे खऱ्या अर्थाने ’क्रांतिकवी’. वयाच्या अवघ्या विशीत कुसुमाग्रजांनी अनेक तेजस्वी क्रांतिकाव्ये लिहिली. 


हुतात्मा चंद्रशेखर आझाद, हुतात्मा भगतसिंह, हुतात्मा राजगुरू, हुतात्मा सुखदेव,  हुतात्मा महावीरसिंह या सारखे महात्मे आपले दिव्य करून गेले. क्रांतिकारकारकांच्या बलिदानाची महती गाणारी क्रांतिगीते कुसुमाग्रजांनी लिहिली आणि त्या महात्म्यांची ध्येयगाथा जगाला सांगितली. जे काही ते क्रांतिकारक स्वतः सांगू शकले नव्हते मात्र करून गेले होते ते महान कार्य या क्रांतिकवीने घराघरात व मुखामुखात पोचवले. 


कुसुमाग्रजांचे विशाखा, समिधा, किनारा, हिमरेषा, मराठी माती, वादळवेल, रसयात्रा, छंदोमयी यासारखे कवितासंग्रह आणि नटसम्राट, वीज म्हणाली धरतीला, कौतेंय या सारख्या नाट्यकृतींचा अभ्यास अजूनही होत आहे. 


‘गर्जा जयजयकार’ सारखी कविता लिहून क्रांतिवीरांना स्फुरण देणाऱ्या कुसुमाग्रजांनी ‘काढ सखे गळ्यातले, चांदण्याचे तुझे हात’ सारखी कविताही लिहिली. ‘नटसम्राट’ मधून नाट्यरसिकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या आणि ‘कल्पनेच्या तीरावर’ सारख्या कादबंरीतून त्यांना खळखळून हसायलाही लावले. 


मा.कुसुमाग्रज यांचे १० मार्च १९९९ रोजी निधन झाले. 


मा.कुसुमाग्रज यांना आदरांजली !

बरिक्स देशांच्या गटाचे नेतृत्व या वर्षी भारताकडे.



🌞 ब्रिक्स देशांच्या गटाचे नेतृत्व या वर्षी भारताकडे असून तीन दिवसांच्या शेरपा बैठ्कीद्वारे भारताच्या अध्यक्षपदाचा कार्यकाळ आज सुरू झाला. 


🌞 पारपत्र आणि व्हिसा विभागाच्या सचिवांनी बैठकीचे अध्यक्षपद भूषवताना आगामी वर्षासाठीच्या कामांचा आराखडा सादर केला.


🌞 पढच्या दोन दिवसांमध्येही या बैठकीत सदस्य देशांबरोबर उपयुक्त चर्चा होईल, असं विश्वास परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले. 


🌞 बरिक्स हा गट जगभरात प्रभावी ठरत असून तो आणखी वाढवण्यासाठी यजमान असलेला भारत करणार असलेल्या प्रयत्नांना चीनचा पाठींबा असेल, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वँग वेनबिन यांनी म्हटलं आहे. 


🌞 चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे भारतात वर्षाच्या अखेरीस आयोजित होणाऱ्या ब्रिक्स परिषदेला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

भारतीय निवडणूक आयोग



● स्थापना :- २५ जानेवारी १९५०

● मुख्यालय :- नवी दिल्ली

● मुख्यनिवडणूक आयुक्तांची निवड :- 

    राष्ट्रपती - सूनिल अरोरा

● हेल्पलाईन क्रमांक :- १९५०

● स्लोग्न :- देश का महा त्योहार

● पोर्टल :- eci.gov.in

● राज्यघटना भाग :- १५

● कलम :- 324

● आयोग संबधित कलम :- 

   ३२४ - ३२९

● ७३ वी घटना दुरुस्ती :- राज्य निवडणूक 

   आयोगाची स्थापना

● निवडणूक आयोगाची कामे :-

०१) मतदारसंघ आखणे

०२) मतदारयादी तयार करणे

०३) राजकीय पक्षांना मान्यता देणे 

       निवडणूक चिन्हे ठरवणे

०४) उमेदवारपत्रिका तपासणे

०५) निवडणुका पार पाडणे

०६) उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा 

       ताळमेळ लावणे

◆ ६१ वी घटना दुरुस्ती :- १९८८ , 

    मतदार वय २१ वरून १८ करण्यात 

   आले.

◆ अन्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक - 

     राष्ट्रपती - ३२४ (२) - या दोन 

     निवडणूक आयुक्तांना पदावरून 

     काढण्या साठी महाभियोग 

     चालवण्यात येत नाही.

◆ आयोग घटनात्मक, स्थायी, स्वायत्व

नोबेल पुरस्कार २०१९ विजेते



🏆 वद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार २०१९

👤 १) विलियम कैलीन (अमेरिका)

👤 २) ग्रेग सीमेंजा (अमेरिका)

👤 ३) पीटर रैटक्लिफ (ब्रिटन)


🏆 भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार २०१९

👤 १) जेम्स पीबल्स (अमेरिका)

👤 २) माइकल मेयर (स्वित्झर्लंड)

👤 ३) डिडियर क्वेलोज (स्वित्झर्लंड)


🏆 रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०१९ 

👤 १) जॉन बी गुडइनफ (अमेरिका)

👤 २) एम स्टेनली व्हिटिंगम (ब्रिटन)

👤 ३) अकीरा योशिनो (जपान)


🏆 साहित्यातील नोबेल पुरस्कार २०१९

🙎‍♀ १) ओल्गा टोकार्चुक (२०१८) : पोलंड

👤 २) पीटर हैंडका (२०१९) : ऑस्ट्रीया


🏆 शांततेतील नोबेल पुरस्कार २०१९

👤 १) एबे अहमद अली (प्रधानमंत्री : इथिओपिया)


🏆 अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०१९

👤 १) अभिजीत बैनर्जी (अमेरिका)

👤 २) माइकल क्रेमर (अमेरिका)

🙎‍♀ ३) एस्थर डुफ्लो (अमेरिका) .



 नोबेल पुरस्कार २०२० विजेते 👇


🏆 वद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार २०२० 

👤 १) हार्वे अल्टर (अमेरिका)

👤 २) मायकल होउगटन (ब्रिटन)

👤 ३) चार्ल्स राइस (अमेरिका)


🏆 भौतिक शास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०

👤 १) रॉजर पेनरोज (ब्रिटन)

👤 २) रेनहार्ड गेंजेल (जर्मनी)

🙎‍♀ ३) अॅण्ड्रीया गेज (अमेरिका)


🏆 रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२० 

🙎‍♀ १) इमॅन्यूअल शार्पेंची (जर्मनी)

🙎‍♀ २) जेनफिर डाउडना (अमेरिका)


🏆 साहित्यातील नोबेल पुरस्कार २०२० 

🙎‍♀ १) लुईस ग्लुक ( अमेरिका )


🏆 शांततेतील नोबेल पुरस्कार २०२० 

🌾 १) संयुक्त राष्ट्र अन्न सुरक्षा कार्यक्रम


🏆 अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार २०२०

👤 १) पॉल आर. मिलग्रोम (अमेरिका)

👤 २) रॉबर्ट बी. विल्सन (अमेरिका)

जगातील महत्त्वाचे वाळवंट


👉 वाळवंट: वाळवंट म्हणजे लँडस्केपचा एक वांझ प्रदेश आहे जेथे पाऊस कमी पडतो आणि यामुळे, वनस्पती आणि प्राणी जीवनासाठी जगण्याची परिस्थिती प्रतिकूल असते.


🌐 1. खंड: अंटार्क्टिका


वाळवंट नाव: अंटार्टिक


🌐 2. खंड: आशिया, युरोप, उत्तर अमेरिका


वाळवंट नाव: आर्क्टिक वाळवंट


🌐 3. खंड: आशिया


वाळवंट नाव: कराकुम, थर वाळवंट, किझिलकुम, तकलामकण, अरबी, दष्ट-ए-कावीर, दशात-ए लुत, गोबी वाळवंट


🌐  4. खंड: आफ्रिका


वाळवंट नाव: कलहरी, नामिब, सहारा,


🌐 5. खंड: ऑस्ट्रेलिया


वाळवंट नाव: गिब्सन, ग्रेट सॅंडी, ग्रेट व्हिक्टोरिया, सिम्पसन, तनामी


🌐 6. खंड: युरोप


वाळवंट नाव: टॅबर्नस वाळवंट


🌐  7. खंड: उत्तर अमेरिका


वाळवंट नाव: ग्रेट बेसिन, मोजावे, सोनोरन


🌐  8. खंड: दक्षिण अमेरिका


वाळवंट नाव: एटाकामा, पॅटागोनियन

पहिल्या ४० तेजसमध्ये इस्रायली बनावटीचे रडार आहेत



🎓वल डन DRDO! ‘तेजस’ फायटर जेटमध्ये देशी ‘उत्तम’ रडार


स्वदेशी संरक्षण तंत्रज्ञानाला बळकटी देणारी एक चांगली बातमी आहे. पुढच्या काही काळात इंडियन एअर फोर्समध्ये *१२३ 'तेजस' फायटर _विमानांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यातील ५_१ _टक्के 'तेजस'मध्ये स्वदेशी बनावटीची 'उत्तम' रडार यंत्रणा असेल. आधी निर्मिती करण्यात आलेल्या काही_ '_तेजस'मधील इस्रायली रडारच्या जागी, ही_ '_उत्तम' रडार यंत्रणा बसवण्यात येई_ल.


🌞इडियन एअर फोर्सला १२३ 'तेजस' फायटर जेट मिळणार आहे. त्यात ४० विमाने फायनल ऑपरेशनल क्लियरन्समध्ये आहेत. ८३ तेजस मार्क-१ए साठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडयात ऑर्डर देण्यात आली आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमानांचे उत्पादन करत आहे. पहिल्या ४० तेजसमध्ये इस्रायली बनावटीचे रडार आहेत तर, ८३ तेजस मार्क-१ए AESA रडार यंत्रणा असेल.

"तेजस मार्क-१ए मध्ये उत्तम रडार यंत्रणा असेल. आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये उत्तमने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. HAL बरोबर आम्ही सामंजस्य करार केला आहे" असे डीआरडीओचे अध्यक्ष सतीश रेड्डी यांनी सांगतिले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. ८३ पैकी ६३ तेजस विमानात उत्तम रडार यंत्रणा असेल.


🌞डीआरडीओच्या बंगळुरुमधील LRDE प्रयोगशाळेने हे रडा*र विकसित केलेय. मोदी सरकार संरक्षण क्षेत्रात स्वदेशी तंत्रज्ञान निर्मितीवर भर देत आहे. उत्तम रडारमुळे तेजसमध्ये स्वदेशी घटकांचे प्रमाण वाढणार आहे. तेजसच्या निर्मितीमध्ये ६२ ते ६५ टक्के स्वदेशी घटक वापरण्याचा HAL चा प्रयत्न आहे. उत्तम रडारमुळे HAL ला त्यांच्या उद्दिष्टात मदत होणार आहे. उत्तम रडारमध्ये एकाचवेळी वेगवेगळया लक्ष्यांना शोधण्याची तसेच उच्चप्रतीचे फोटो काढण्याची क्षमता आहे.

अवकाशात चीनशी ‘सामना’, भारताच्या DSA ने सुरु केलं ‘स्टार वॉर्स’ टेक्नोलॉजीवर काम.



👉सरक्षण क्षेत्रातील तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. दिवसेंदिवस डिफेन्स टेक्नोलॉजी अत्याधुनिक बनत चालली आहे. भविष्यात पारंपारिक युद्धाचे स्वरुप बदलणार असून अवकाशातून हे युद्ध लढले जाईल. त्या दृष्टीने भारताने आता स्वत:ला समर्थ बनवण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरु केली आहे.


👉दोन वर्षांपूर्वी भारताने ‘मिशन शक्ती’च्या माध्यमातून जगाला आपल्याकडे असलेल्या उपग्रह विरोधी टेक्नोलॉजीची चुणूक दाखवली. वातावरणाच्या पलीकडे अवकाशातील उपग्रह सुद्धा आम्ही पाडू शकतो, हे भारताने या चाचणीतून दाखवून दिले. त्यापुढे जात आता भारताने डिफेन्स स्पेस एजन्सी स्थापन केली आहे. अवकाशातून धोका निर्माण झाल्यास, त्याचा सामना कसा करायचा, त्यासाठी नवीन टेक्नोलॉजीचा शोध घेण्यास डिफेन्स स्पेस एजन्सीने सुरुवात केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.


👉शत्रूपासून अवकाशातील आपली संपत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी स्वत:ला समर्थ बनवणे, हे DSA चे मुख्य लक्ष्य असणार आहे. प्रामुख्याने ही संस्था त्यासाठीच काम करेल. डीएसएने स्पेस सिच्युएशनल अवरेनेस म्हणजेच SSA च्या टेक्नोलॉजीसाठी वेगवेगळया कंपन्यांकडून प्रस्ताव मागवले आहेत. यात अवकाशात आपल्यावर होणाऱ्या हल्ल्याची आगाऊ कल्पना देण्याबरोबरच शत्रुची अवकाशातील संपत्ती शोधून त्याचा माग काढण्याची टेक्नोलॉजी या SSA मध्ये असेल.

ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले उठाव



संन्याशाचा उठाव :  1765-1800 - बंगाल शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक

 

चुआरांचा उठाव : 1768 - बंगाल-मिजापूर जिल्हा जगन्नाथ घाला

 

हो जमातीचे बंड : 1820 - छोटा नागपूर व सिंगभूम

 

जमिनदारांचा उठाव : 1803 - ओडिशा जगबंधू

 

खोंडांचा उठाव : 1836 - पर्वतीय प्रदेश दोरा बिसाई

 

संथाळांचा उठाव : 1855 - कान्हू व सिंधू

 

खासींचा उठाव : 1824 - आसाम निरतसिंग

 

कुंकिंचा उठाव : 1826 - मणिपूर

 

🔹दक्षिण भारतातील उठाव  -


पाळेगारांचा उठाव : 1790 - मद्रास

 

म्हैसूरमधील शेतकर्‍यांचा उठाव : 1830 - म्हैसूर

 

विजयनगरचा उठाव : 1765 - विजयनगर

 

गोरखपूरच्या जमिनदारांचा उठाव : 1870 - गोरखपूर

 

रोहिलखंडातील उठाव : 1801 - रोहिलखंड

 

रामोश्यांचा उठाव : 1826 - महाराष्ट्र उमाजी नाईक व बापू त्र्यंबकजी सावंत

 

भिल्ल व कोळ्यांचा उठाव : 1824

 

केतूरच्या देसाईचा उठाव : 1824 - केतूर

 

फोंडा सावंतचा उठाव : 1838


भिल्लाचा उठाव : 1825- खानदेश

 

दख्खनचे दंगे : 1875- पुणे,सातारा,महाराष्ट्र शेतकरी

भारतातील पहिला समुद्राखालून बोगदा मुंबईत तयार केला जाणार.


🔥मबई महापालिकेच्या सागरी किनारा मार्गासाठी दोन महाबोगदे खणले जात आहे. अरबी समुद्राखालून 400 मीटरचे बोगदे तयार करण्यात येणार आहेत. हे बोगदे देशातील सर्वाधिक रुंदीचे बोगदे ठरणार आहेत.


🦋ठळक बाबी...


🔥कोस्टल रोडचा मार्ग गिरगाव चौपाटीखालून म्हणजे समुद्राखालून जाणार आहे. चौपाटीखाली दोन महाबोगदे तयार करण्यात येणार आहे.


🔥वांद्रे-वरळी सी-लिंकलाच पुढे जोडणारा हा मार्ग असेल, अशी संकल्पना होती. परंतु मुंबईत क्षितीज म्हणजे सी-लिंक अशी ओळख भविष्यात होऊ नये यासाठी हा मार्ग भुयारी पद्धतीने तयार करण्याचा निर्णय घेतला.


🔥दक्षिण मुंबईतील मरिन ड्राइव्ह ते उत्तर मुंबईत बोरीवलीपर्यंत कोस्टल रोडचा संपूर्ण प्रकल्प आहे. संपूर्ण प्रकल्प जुलै 2023 पर्यंत पूर्णत्वास येईल असा अंदाज आहे.


🔥बोगदा तयार करणाऱ्या यंत्राला 'मावळा' असे नाव देण्यात आले आहे. मरीन लाइन्स ते प्रियदर्शनी पार्कपर्यंत 1920 मीटर लांबीचे दोन बोगदे 'मावळा' यंत्रामधून तयार केले जाणार आहेत.

कोस्टल रोडची वैशिष्ट्य


🔥साडे सहा किलोमीटरचे बोगदे

आठ पदरी मार्ग, मार्गावर 4 इंटरचेंज

सिग्नल फ्री मार्ग.34 टक्के इंधनाची बचत होणार.L1650 वाहन पार्किंगची सोय.

माल आणण्यासाठी दोन जेट्टी उभारणार.

पुरपरिस्थितीमध्ये देखील हा मार्ग वापरता येणार.

पुद्दुचेरीत राष्ट्रपती राजवट लागू; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी:-



📚पद्दुचेरीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पुद्दुचेरीमधील काँग्रेस सरकार  विश्वासदर्शक ठरावाला सामोरं जाण्यापूर्वीच कोसळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.


📚 विश्वासदर्शक ठराव मांडण्यासाठी एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. मात्र अल्पमतात असणारं मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी सरकार ठरावला सामोरं जाण्याआधीच कोसळलं.


📚काँग्रेस आणि द्रमुकच्या प्रत्येकी एक आमदाराच्या राजीनाम्याने ३३ सदस्य असलेल्या विधानसभेत सत्तारुढ काँग्रेस आघाडीचं संख्याबळ ११ पर्यंत घसरलं होतं. विरोधी आघाडीकडे १४ सदस्य, तर सात जागा रिक्त आहेत. यामुळे नारायणस्वामी यांच्या सरकारवर बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली होती. पण विश्वासदर्शक ठरावात बहुमत सिद्द न करता आल्याने काँग्रेसचं सरकार कोसळलं.


📚नारायणसामी सरकारचा ११ विरुद्ध ११ अशा मतांनी पराभव झाला. बहुमत ठराव सादर करण्यासाठी एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. अधिवेशन सुरु होताच नारायणसामी यांनी बहुमतासाठी प्रस्ताव मांडला होता. पण काही वेळातच त्यांच्यासहित सत्ताधारी आमदारांनी सभात्याग केला.


📚 यानंतर अध्यक्षांनी काँग्रेस सरकार अल्पमतात असल्याचं जाहीर केलं. यानंतर मुख्यमंत्री नारायणसामी यांनी राज्यपालांची भेट घेऊन राजीनामा सोपवला

सरदार पटेल स्टेडियमचं नामकरण नरेंद्र मोदी स्टेडियम



◾️ जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असे अशी ओळख असलेल्या गुजरातच्या मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावं देण्यात आलं आहे. 


◾️ सटेडियमचं नामकरणं नरेंद्र मोदी स्टेडियम असं करण्यात आलं आहे. 


◾️ अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना खेळला जात आहे. 


◾️सामना खेळवण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं. 


◾️24 फेब्रुवारी 2020 रोजी याच स्टेडियममध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यानिमित्ताने नमस्ते ट्रम्प कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. होतं. 


◾️मोटेरा स्टेडियमध्ये सर्व अत्याधुनिक प्रकारच्या सेवा उपलब्ध असून, 


◾️ या स्टेडियम आसन क्षमता 1 लाख 32 हजार इतकी झाली आहे.


गोंडी भाषेतून शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा गडचिरोलीत



 शाळेत रूक्ता उसेंडी ही विज्ञान, राजकुमारी कोराम ही कला शाखेतील पदवीधर तथा रिना आतला ही  विद्यार्थ्यांना गोंडी भाषेचे धडे जिल्ह्यतील शिक्षण क्षेत्रात एक ऐतिहासिक गोष्ट घडून आली आहे.


धानोरा तालुक्यातील मोहगाव येथे ग्रामसभेला प्राप्त अधिकारांचा वापर करून गोंडी भाषेतून शिक्षण देणारी राज्यातील पहिली शाळा सुरू करण्यात आली आहे.


अंगणवाडी स्तरावरील १५ विद्यार्थ्यांची ही शाळा गोंडी बोलीतून आदिवासी विद्यार्थ्यांना गोटूलचे पारंपरिक संस्कार व शिक्षण देणारे केंद्र ठरणार आहे. शाळेत रूक्ता उसेंडी ही विज्ञान, राजकुमारी कोराम ही कला शाखेतील पदवीधर तथा रिना आतला ही विद्यार्थ्यांना गोंडी भाषेचे धडे देणार आहे. ‘पारंपरिक कोया ज्ञानबोध संस्कार गोटुल’ या नावाने धानोरा तालुक्यातील मोहगाव येथे संविधानाच्या पाचव्या अनुसूचीतील २४४ (१), ३५० (क) आणि १३ (३) (क) या कलमांमधील तरतुदीनुसार ग्रामसभेला प्राप्त अधिकारान्वये ही शाळा सुरू करण्यात आली.

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम: जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान



राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते अहमदाबाद येथील मोटेरातल्या “नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम”चे उद्घाटन करण्यात आले. ते जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान आहे.


अहमदाबादचे मैदान आधी ‘मोटेरा स्टेडियम’ या नावाने ओळखले जात होते. संपूर्ण नूतनीकरणानंतर त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्याचा निर्णय गुजरात क्रिकेट असोसिएशनने घेतला.


▪️ठळक वैशिष्ट्ये


या मैदानामध्ये 1 लक्ष 32 हजार प्रेक्षकांच्या बसण्याची व्यवस्था आहे.

या मैदानामध्ये सहा लाल मातीच्या आणि पाच काळ्या मातीच्या अशा अकरा खेळपट्ट्या आहेत. 


मैदानामध्ये सॉइल ड्रेनेज सिस्टिम आहे. त्यामुळे पाऊस पडल्यास 30 मिनिटांच्या आत पाणी सुकून जाईल. त्यामुळे सामना रद्द करण्याची वेळ नव्या व्यवस्थेमुळे येणार नाही.


मैदानामध्ये 55 खोल्यांचा एक क्लब आहे. तसेच स्टेडियममध्ये 75 वातानुकूलित कॉर्पोरेट बॉक्स आहेत.


मैदानाच्या परिसरात तीन हजार कार आणि दहा हजार दुचाकीच्या पार्किंगसाठी विशेष व्यवस्था आहे.


नवे मैदान 800 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आले आहे. हे स्टेडियम सरदार वल्लभभाई पटेल क्रिडा संकुलाचा एक भाग आहे. सरदार वल्लभभाई पटेल क्रिडा संकुलात जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदाना आहे.संपूर्ण क्रिडा संकुल 63 एकरपेक्षा जास्त भूखंडावर पसरले आहे.


मैदानाच्या जवळ फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, कबड्डी, बॉक्सिंग, लॉन टेनिस, रनिंग ट्रॅक, ऑलिंपकच्या दर्जाचा मोठा स्वीमिंग पूल तयार करण्यात आले आहे.

मुंबई सीमाशुल्क विभागाने 15 कोटी रुपयांच्या तस्करीच्या वस्तू जप्त केल्या


 

◻️मबईच्या सीमाशुल्क विभाग-III, ने  टपालमार्गे तस्करी केलेल्या आय-फोन, ड्रोन, ऍपल  घड्याळे आणि सिगारेटचा लक्षणीय  वाणिज्यिक  साठा जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई करताना, बॅलर्ड इस्टेट मुंबईच्या (प्रतिबंधात्मक) आयुक्तालयाच्या शोध आणि गुप्तवार्ता विभागाने  खालील ठिकाणी एकत्रितपणे तस्करीविरोधी कारवाई केली.


1) एमआयडीसी पोस्ट ऑफिस, चकाला, अंधेरी, फॉरेन पोस्ट ऑफिस

2) विदेश डाक भवन, बॅलार्ड इस्टेट मुंबई

3) एअर पार्सल सॉर्टींग ऑफिस, विलेपार्ले (पू ), मुंबई.


◻️कार्यालयाने चकाला एमआयडीसी पोस्ट ऑफिस, चकाला, अंधेरी येथून 12 , विदेश डाक कार्यालय ,  बल्लार्ड इस्टेट मुंबई येथून  26 आणि  मुंबईतील एअर पार्सल सॉर्टिंग ऑफिस, विलेपार्ले (पू ), इथून 5 कन्साईनमेंट ताब्यात घेतल्या.  एकूण 1470 आय.फोन, 322 ऍपल  घड्याळे,  64 ड्रोन्स,  41 एअर पॉड्स , 1 391 सिगारेट स्लीव्ह आणि 36 ऑटो पार्ट्स यांचा समावेश आहे , ज्यांचे अंदाजे स्थानिक बाजार मूल्य  15 कोटी रुपये आहे.


◻️या वस्तूवर लागू होणारे सीमाशुल्क आणि आयजीएसटी कर टाळण्यासाठी  वस्तूंची माहिती  मूल्य आणि प्रमाण याबाबत  चुकीची माहिती देऊन टपालाद्वारे या वस्तू  तस्करीमुक्त करण्याचा  प्रयत्न केला गेला. तपासा दरम्यान, वरील कन्साईन्मेंटची  नावे व पत्ते  बनावट / डमी असल्याचे आढळले.

चंदीगडचे ‘कार्बन वॉच’ अॅप



चंदीगड केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने व्यक्तीकडून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचे मूल्यांकन करण्यासाठी एक यंत्रणा तयार केली आहे. असे करणारे ते भारतातील पहिले राज्य ठरले आहे.


▪️ठळक बाबी.


चंदीगड सरकारने ‘कार्बन वॉच’ नामक एक मोबाइल अॅप तयार केले आहे.

या अ‍ॅपच्या माध्यमातून चंडीगडच्या रहिवाशांना माहिती दिली जाणार आणि त्यांना कार्बन उत्सर्जनाबाबत जागरूक केले जाणार.


अ‍ॅप वेगवेगळ्या स्त्रोतांच्या वापराविषयी विस्तृत माहिती एकत्रित करतो आणि माहितीच्या आधारे कार्बन उत्सर्जनाची गणना करतो.

भारत आणि मॉरिशस यांनी व्यापक आर्थिक सहकार्य आणि भागीदारी करारावर स्वाक्षरी केली.



 मॉरीशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाठ, आणि भारत सरकारचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर  यांच्या उपस्थितीत काल, भारत सरकारचे वाणिज्य सचिव डॉ. अनुप वाधवान आणि मॉरिशस सरकारचे राजदूत हॅमंडोयल दिल्लम यांनी पोर्ट लुईस येथे भारत-मॉरिशस व्यापक आर्थिक सहकार्य आणि भागीदारी करारावर (सीईसीपीए) स्वाक्षरी केली.


 सीईसीपीए हा आफ्रिकेमधील देशासोबत भारताने केलेला पहिला व्यापार करार आहे. हा करार  मर्यादित स्वरूपाचा असून यामध्ये वस्तूंचा व्यापार, वस्तूंच्या उगमाविषयीचे नियम, सेवांचा व्यापार, व्यापारातील तांत्रिक अडथळे (टीबीटी), सॅनिटरी आणि फायटोसॅनेटरी (एसपीएस) उपाय, तंटा निवारण, दूरसंचार, वित्तीय सेवा, सीमाशुल्क कार्यपद्धती आणि इतर क्षेत्रात सहकार्य यांचा समावेश असेल. 


 प्रभाव/फायदा: सीईसीपीएने उभय देशांमधील व्यापार प्रोत्साहित आणि सुधारित करण्यासाठी संस्थात्मक यंत्रणेची तरतूद केली आहे. भारत आणि मॉरिशस यांच्यातील सीईसीपीएमध्ये भारतासाठी 310 वस्तूंची निर्यात करण्याची परवानगी देण्यात आली आहे, यामध्ये अन्नपदार्थ व पेये (80 लाईन), कृषी उत्पादने (25 लाईन ), वस्त्रोद्योग व कपडे (27 लाईन ),  धातू व धातूचे सामान (32 लाईन), इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू (13लाईन), प्लास्टिक आणि रसायने (20 लाईन), लाकूड आणि लाकडी वस्तू (15 लाईन) आणि इतर यांचा समावेश आहे. गोठविलेले मासे, विशिष्ठ साखर, बिस्किटे, ताजी फळे, फळांचा रस, बाटलीबंद पाणी, बिअर, अल्कोहोलिक पेय, साबण, पिशव्या, वैद्यकीय व शस्त्रक्रिया उपकरणे आणि कपड्यांसह मॉरिशसला आपल्या 615 उत्पादनांसाठी भारतीय बाजारपेठेत प्रवेश मिळणार असून याचा फयदा मॉरिशसला होईल.

जेवर विमानतळ आशियातलं सर्वात मोठं विमानतळ म्हणून विकसित करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारचा प्रयत्न.


उत्तर प्रदेशातलं जेवर विमानतळ आशियातलं सर्वात मोठं विमानतळ म्हणून विकसित करण्यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करत असून काल विधासभेत सादर झालेल्या २०२१-२२ या वर्षासाठीच्या अंदाज पत्रकात या विमानतळासाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.


या विमानतळावर एकंदर ६ धावपट्ट्या असणार आहेत. त्याचबरोबर अयोध्येमध्ये उभारल्या जात असलेल्या आंतर राष्ट्रीय विमानतळाला मर्यादा पुरूषोत्तम श्रीराम असं नाव दिलं जाणार आहे. त्यासाठी अंदाजपत्रकात एकशे एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ


अलीगड, मुरादाबाद, मेरठ या सारख्या शहरांनाही लवकरच विमान सेवेद्वारा जोडण्यात येईल असं यांनी काल वार्ताहरांना सांगितलं. (http://www.simplifiedcart.com/)

करोनाच्या उद्रेकानंतर केंद्र सावध! महाराष्ट्रासह सहा राज्यात केंद्रीय पथकं.



तब्बल आठ ते दहा महिन्यानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच करोनाचं संकट पुन्हा उभं राहताना दिसत आहे. महाराष्ट्रासह देशातील सहा राज्यांमध्ये करोना बळावताना दिसत आहे. दररोज येणाऱ्या करोना रुग्णांच्या आकडेवारीत वाढ होत असल्याचं समोर आल्यानंतर केंद्र सरकारही सावध झालं आहे. करोना उद्रेक रोखण्यासाठी आणि उपाययोजनासाठी केंद्रानं पथकं नियुक्त केली असून, ही पथकं राज्यांना मदत करणार आहे.


महाराष्ट्रासह करोनाचं संक्रमण वाढलेल्या राज्यांमध्ये तातडीने उपाययोजना करण्यासाठी केंद्रानं तीन सदस्यीय पथकं नियुक्त केली आहेत. या पथकांमध्ये विविध तज्ज्ञांचा समावेश केलेला असून, ही पथकं राज्यांना करोना प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत करणार आहे.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सहसचिव पदावरील अधिकारी या पथकांचं नेतृत्व करणार असून, महाराष्ट्र, केरळ, गुजरात, पंजाब, कर्नाटक आणि जम्मू व काश्मीरमध्ये विशेष लक्ष देणार आहेत, आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे.

सीमावाद मागे सोडून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता


पूर्व लडाख सीमेवरुन भारत-चीन संबंधात निर्माण झालेला तणाव आता हळूहळू कमी होत आहे. लडाखच्या अतिक्रमण केलेल्या काही भागांमधून चिनी सैन्याने माघार घेतली असली, तरी अजूनही हा वाद पूर्णपणे मिटलेला नाही. तणाव कमी झाला असला, तरी वाद अजून पूर्णपणे मिटलेला नाही. एकूणच या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चीनने ब्रिक्स परिषद भारतात आयोजित करण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे.


वेगवेगळया क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी भारत आणि ब्रिक्सच्या अन्य सदस्यांसह काम करण्याची इच्छा असल्याचे चीनने म्हटले आहे. पुढच्या काही महिन्यात करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती सुधारली, तर यावर्षात ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग भारत दौऱ्यावर येऊ शकतात.


चीनने नेहमीच ब्रिक्स परिषदेला महत्त्व दिले आहे. या माध्यमातून सहकार्य, संबंध दृढ करण्याचा प्रयत्न राहिला आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. “भारतात होणाऱ्या ब्रिक्स परिषदेच्या आयोजनाला आमचा पाठिंबा आहे. भारत आणि अन्य देशांसोबत विविध क्षेत्रात संपर्क आणि सहकार्य बळकट करण्यासाठी काम करण्याची आमची इच्छा आहे” असे प्रवक्ते वँग वेनबिन म्हणाले. सीमेवरील परिस्थितीचा ब्रिक्स परिषदेवर परिणाम होणार का ? या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले.

हिटलर सत्तेत आल्यावर त्यानेही मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते”



जगातील सर्वात मोठं क्रिकेट स्टेडियम ठरलेल्या अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव दिल्यानंतर राजकारण तापायला सुरूवात झाली असून विरोधकांकडून भाजपाला आणि पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं जात आहे.


‘सरदार पटेल स्टेडियम’चे ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ असे नामकरण केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मोदींवर जोरदार टीका केली आहे. आव्हाड यांनी तर थेट जर्मनीचा हुकूमशाह हिटलरचा दाखला देत, “हिटलर सत्तेत आल्यानंतर त्यानेही मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते” अशा शब्दात हल्लाबोल केलाय.


“स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते व गुजरातचे सुपुत्र सरदार पटेल यांच्या नावाने मते मागून थकल्यावर त्यांच्या नावे असलेले गुजरातमधील स्टेडियम स्वतःच्या नावावर करून घेतले…हिटलर सत्तेत आल्यानंतर त्याने देखील मोठे स्टेडियम बनवून त्याला स्वतःचे नाव दिले होते”, असं ट्विट करत आव्हाड यांनी मोदींचं नाव न घेता त्यांची हिटलरसोबत तुलना केलीये.


दुसरीकडे, ‘सरदार पटेल यांच्या नावे असलेल्या स्टेडियमचं नाव बदलून ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ करण्यात आलं. हा सरदार पटेलांचा अपमान नाही का? सरदार पटेल यांच्या नावानं मतं मागणारी भाजप आता पटेल यांचा अपमान करत आहे. गुजराजची जनता सरदार पटेल यांचा अपमान सहन करणार नाही.


सरदार पटेलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर प्रतिबंध घातले होते म्हणून त्यांचा नाव हटवण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी केली आहे. तर, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही, ‘नरेंद्र मोदींना मृत्यूनंतर आपल्याला कोणी लक्षात ठेवणार की नाही याबद्दल खात्री नसल्यानेच स्टेडियमला आपलं नाव दिलं, अशी खरमरीत टीका केली आहे.

आयुर्वेदाचे डॉक्टर शस्त्रक्रिया करण्याइतपत प्रशिक्षित



अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांनी दावा केल्याप्रमाणे मिक्सोपॅथी अशी कुठलीही संकल्पना अस्तित्वात नाही, पण आयुर्वेदाचे डॉक्टर्स शस्त्रक्रिया करण्याइतके प्रशिक्षित आहेत, असे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.


आयुर्वेद डॉक्टरांना वैद्यकीय शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्यामागची भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, की आयुर्वेदाचे डॉक्टर्स शस्त्रक्रिया करण्याइतके प्रशिक्षित आहेत. ते अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांना मदत करू शकतात. नाईक यांना अपघातानंतर गोवा मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तेथून सोडण्यात आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.


आयुर्वेदाच्या डॉक्टरांना शस्त्रक्रियेस परवानगी देण्याच्या सरकारच्या निर्णयावर इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए)  केलेल्या टीकेवर त्यांनी सांगितले, की भारतीय वैद्यकीय उपचार पद्धती ही अ‍ॅलोपथीच्या मदतीसाठी वापरली जात आहे. दोन्ही पद्धतीत स्पर्धा निर्माण करण्याचा सरकारचा हेतू नाही. या दोन्ही उपचार पद्धती एकमेकांना पूरक आहेत.


आयुर्वेदाचे डॉक्टरही शिकलेले आहेत. त्यांना शाल्यक शाखेत शस्त्रक्रियेचे प्रशिक्षण दिलेले असते. अभ्यास पूर्ण केल्यानंतर आयुर्वेदाचे डॉक्टर एक वर्ष आंतरवासीयता करतील व त्यांना शस्त्रक्रिया करण्यातील आणखी सखोल बाबी समजतील. भारतीय उपचार पद्धती अनेक शतकांपासून लोकांपुढे आहे. त्याचे सूत्र तेव्हापासून बदललेले नाही, असेही त्यांनी सांगितले. (http://www.simplifiedcart.com/)

पतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली ‘प्रगती’ ही 36 वी पायाभूत सुविधाविषयक बैठक संपन्न.


 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज ‘प्रगती’ बैठकीचे 36 वे सत्र संपन्न झाले.


बैठकीत, आठ प्रकल्प, एक योजना व एका कार्यक्रमासंदर्भातील तक्रारी यासह दहा विषयांचा आढावा घेण्यात आला. 


आठ प्रकल्पांपैकी तीन प्रकल्प रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे, दोन रेल्वे मंत्रालयाचे, प्रत्येकी एक ऊर्जा मंत्रालय, पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालय आणि गृह मंत्रालयाचे होते. या आठ प्रकल्पांची एकूण किंमत 44,545 कोटी रुपये असून हे प्रकल्प पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, ओदिशा, झारखंड, सिक्कीम, उत्तरप्रदेश, मिझोराम, गुजरात, मध्यप्रदेश, बिहार आणि मेघालय  या राज्यांशी संबंधित आहेत.


पंतप्रधानांनी यावेळी काही प्रकल्पांच्या अंमलबजावणीमध्ये होणाऱ्या विलंबाबाबत  चिंता व्यक्त केली आणि संबंधित अधिकाऱ्यांना सर्व प्रलंबित प्रश्न त्वरित निकाली काढण्याचे निर्देश दिले.बैठकी दरम्यान पंतप्रधानांनी सिंगल यूज प्लास्टिक निर्मूलनाच्या कार्यक्रमाचा आढावा घेतला. 


तसेच पंतप्रधान ग्राम सडक योजनेशी संबंधित तक्रारींचा आढावाही घेण्यात आला. योग्य जागरूकता मोहिमेद्वारे लोकांना आणि विशेषत: तरुणांना सहभागी करून घेण्याच्या आवश्यकतेवर  पंतप्रधानांनी जोर दिला. 


पंतप्रधान ग्राम सडक योजने अंतर्गत बांधल्या जाणाऱ्या रस्त्यांच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी सर्व अधिकाऱ्यांना केले.प्रगती बैठकीच्या 35 व्या सत्रापर्यंत एकूण 13.60 लाख कोटी रुपये खर्चाच्या 290 प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला आहे. 

पिकांच्या आधारभूत किमतीत ऐतिहासिक वाढ



पिकांच्या किमान आधारभूत किमतीत सरकारने ऐतिहासिक वाढ केली असून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त सांगितले.


ते म्हणाले, की गेल्या सात वर्षांत शेतीमधील बदलांसाठी सरकारने अनेक निर्णय घेतले. त्यात, चांगल्या पाटबंधारे सुविधा, प्रगत तंत्रज्ञान, पीक विमा योजना, मृदा आरोग्यपत्रिका यांचा समावेश आहे. कृषी क्षेत्रातील मध्यस्थांची भूमिका दूर करण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे.


आपल्या शेतकऱ्यांची जिद्द व कष्टाची ताकद मोठी आहे. आमच्या सरकारने पिकांच्या किमान आधारभूत भावात ऐतिहासिक वाढ केली असून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत, असे मोदी म्हणाले. नमो अ‍ॅपवर या योजनेतील काही ऐतिहासिक क्षणांची झलक पाहायला मिळणार आहे.


पंतप्रधान मोदी यांनी किसान सम्मान योजना दोन वर्षांपूर्वी जाहीर केली होती, त्यात शेतकऱ्यांना वर्षांला सहा हजार रुपये मदत ही तीन हप्त्यांत देण्यात आली. ही मदत छोटय़ा व मध्यम शेतकऱ्यांसाठी होती. त्यातील रक्कम लाभार्थीच्या खात्यावर थेट जमा करण्यात आली.

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...