Saturday, 6 February 2021

नागरी सेवा परीक्षेसाठी उमेदवारांना आणखी एक संधी.


🔰 कोरोना साथीच्या काळात ज्या उमेदवारांनी, केंद्रीय नागरी सेवा आयोगाची परीक्षा दिल्या आहेत, आणि ज्यांच्या प्रयत्नांची संख्या संपली आहे, अशा इच्छुक उमेदवारांना आणखी एक संधी देण्याचं केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं आहे.


🔰 मात्र ज्या उमेदवारांनी या परीक्षेसाठी आवश्यक असलेली न वयोमार्यादा ओलांडली आहे, अशांना ही सुविधा लागू होणार नाही, असे देखील सरकारनं न्यायालयात स्पष्टं केलं आहे. 


🔰 कोरोना साथीच्या काळात, परीक्षेची पुरेशी तयारी झालीसल्याने, परीक्षा पुढं ढकलण्याची मागणी सरकारने अमान्य केली होती, त्यामुळे परीक्षा देणं भाग पडलं. त्यामुळेच, आणखी  एक संधी मिळावी अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.


🔰 आकडेवारीनुसार, ३ हजार ८६३ उमेदवारांची परीक्षा देण्याची संधी संख्या संपली असून, २ हजार २३६ उमेदवार वयोमार्यादेमुळे बाद झाले आहेत.

जागतिक लोकशाही निर्देशांकात भारत ५१व्या स्थानांवरून घसरून ५३व्या स्थानी गेला आहे


🔰 २०१९ मध्ये भारताचे गुण ६.९० होते तर २०२० मध्ये भारताचे गुण ६.६१ आहेत 


🔰 जागतिक लोकशाही निर्देशांकात नॉर्वे प्रथम क्रमांकावर , आइसलँड दुसऱ्या क्रमांकावर आहे 


🔰 सवीडन तिसऱ्या , न्युझीलंड चौथ्या तर कॅनडा पाचव्या क्रमांकावर आहे 


🔰 " द इकनॉमिस्ट इंटेलिजन्टस यूनिट " ने २०२० साठीचा हा अहवाल जारी केला आहे


🔰 " द इकॉनॉमिस्ट यूनिट " ने २००६ मध्ये हा निर्देशांक जाहीर करण्यास सुरवात केली


🔰 १६५ देशांमधील लोकशाहीची सद्यस्थिती पाहून करून अहवाल जारी करण्यात येतो


✅ दशांचे वर्गीकरण 


🔰 ८ पेक्षा जास्त गुण : संपूर्ण लोकशाही

🔰 ६ ते ८ दरम्यान गुण : सदोष लोकशाही

🔰 ४ ते ६ दरम्यान गुण : संमिश्र लोकशाही

🔰 ४ पेक्षा कमी गुण : हुकुमशाही

भारताचे नवीन अस्त्र -‘वॉरियर ड्रोन’.


🔰 भारताच्या पहिल्या सेमी-स्टेल्थ ड्रोनची प्रतिकृती बनवण्याचे काम सुरु आहे. बंगळुरुमध्ये पुढच्या आठवडयात होणाऱ्या मेगा एअर-शो मध्ये सेमी-स्टेल्थ ड्रोनचे मॉडेल प्रदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. ‘वॉरियर’ असे या ड्रोनचे नाव आहे. 


🔰 CATS किंवा कॉमबॅट एअर टीमिंग सिस्टिम या स्वदेशी कार्यक्रमातंर्गत हे ड्रोन विकसित करण्यात येत आहे. 


🔰 ‘वॉरियर’ ड्रोन हे मानव आणि मानवरहीत प्लॅटफॉर्मचं असं मिश्रण आहे, जे शत्रूचे हवाई सुरक्षा कवच भेदण्यास सक्षम आहे.


🔰 भारतीय बनावटीच्या ‘तेजस’ फायटर विमानासोबत संचालन करण्याच्या दृष्टीने ‘वॉरियर’ ड्रोन बनवण्यात येत आहे. युद्धभूमीमध्ये दोन्ही विमानं एकत्र असताना ‘वॉरियर’ ड्रोन ‘तेजस’चे रक्षणही करेल आणि शत्रूवर हल्लाही करेल, तीच वॉरियर ड्रोनच्या निर्मिती मागची संकल्पना आहे. 


🔰 पढच्या तीन ते पाच वर्षात ‘वॉरियर’ ड्रोनचे पहिले प्रोटोटाइप हवेत झेपावेल, अशी अपेक्षा आहे. एचएएलकडून यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जात आहे.


🔰 परत्येक हवाई मोहिम यशस्वी करणे आणि वैमानिकाच्या जीवाला असणारा धोका कमी करणे, ही या वॉरियर ड्रोनच्या निर्मितीमागची कल्पना आहे. हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर डागल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्रांनी वॉरियर ड्रोन सुसज्ज असेल.


🔰 वॉरियर ड्रोन पूर्णपणे स्टेल्थ नाहीय. स्टेल्थ विमान रडारला चकवा देण्यास सक्षम असते. हे सेमी स्टेल्थ प्रकारातील विमान आहे. त्यामुळे सहजासहजी शत्रूच्या रडारला सापडणार नाही. युद्धात उपयोगी पडणारे ड्रोन विमान विकसित करण्यासाठी एचएएल मागच्या पाचवर्षापासून काम करत आहे. 


🔰 भारताकडे सध्या असलेल्या ड्रोन विमानांमधून टेहळणी करता येते. पण शत्रूच्या प्रदेशात हवाई हल्ला करु शकणारे ड्रोन विमान नाहीय. भारताने सध्या टेहळणी बरोबरच युद्ध लढू शकणाऱ्या ड्रोन तंत्रज्ञानावर भर दिला आहे.

जागतिक कर्करोग दिन: 4 फेब्रुवारी


🔰दरवर्षी 4 फेब्रुवारी या दिवशी जगभरात ‘जागतिक कर्करोग दिन’ जागतिक आरोग्य संस्था (WHO) आणि आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघ (UICC) या संस्थांच्या नेतृत्वात पाळला जातो.


🔰सन 2019, सन 2020, सन 2021 या तीन वर्षांसाठी 'आय एम अँड आय वील' या संकल्पनेखाली एक जागतिक मोहीम चालवली जात आहे. याबाबत जगभरात कर्करोगाविषयी जनजागृती फैलावण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.


🔴कर्करोग.....


🔰कर्करोग हा असा आजार आहे, ज्यामध्ये जेव्हा शरीरातल्या सामान्य पेशींच्या गटामध्ये बदल होतो तेव्हा त्या पेशींची अनियंत्रित, असामान्य वाढ होते आणि शरीरात गाठी तयार होतात. ल्युकेमिया (रक्ताचा कर्करोग) वगळता इतर सर्व कर्करोगाबाबत हे सत्य आहे.


🔰कर्करोगामुळे पेशी अनियंत्रितपणे विभाजित होतात. त्यामुळे गाठी (ट्यूमर) तयार होतात, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते आणि इतर दुर्बलता देखील येऊ शकतात जी प्राणघातक असू शकते.


🔴कर्करोगासंबंधी जागतिक दृष्य.....


🔰दरवर्षी जगभरात जवळपास 9.6 दशलक्ष लोकांचा कर्करोगाने मृत्यू होतो.

सामान्य कर्करोगांमध्ये आढळून येणारे किमान एक तृतीयांश प्रकार प्रतिबंधित केले जाऊ शकते.कर्करोग हा जगभरात होणार्‍या मृत्यूसाठी दुसरा अग्रगण्य कारक आहे.70 टक्के कर्करोगासंबंधी मृत्यू कमी-ते-मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात.कर्करोगाचा एकूण वार्षिक आर्थिक खर्च अंदाजे 1.16 लक्ष कोटी (ट्रिलियन) डॉलर एवढा आहे.


🔰कर्करोगाशी लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघ (UICC) ही संस्था निरंतर कार्यरत आहे. त्यांच्या सूचनेनुसार, सर्वप्रकारच्या कर्करोगामध्ये सुमारे एक तृतीयांश प्रकार आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करून अधिकाधिक शारीरिक कामे करून आणि बैठे काम कमीतकमी करून रोखले जाऊ शकतात. मोठ्या संख्येने असेही दिसून आले आहे की उपचारादरम्यान किंवा त्यानंतर व्यायामामुळे चांगले परिणाम दिसून येतात.


🔴दिनाचा इतिहास.....


🔰4 फेब्रुवारी 2000 रोजी पॅरिस (फ्रान्स) येथे झालेल्या ‘वर्ल्ड कॅन्सर समिट अगेन्स्ट कॅन्सर फॉर द न्यू मिलेनियम’ या कार्यक्रमात ‘मुस्तफा जागतिक कर्करोग दिन’ची स्थापना केली गेली. तेव्हापासून हा दिन 4 फेब्रुवारीला साजरा करतात.


🔰जागतिक कर्करोग दिन दरवर्षी 4 फेब्रुवारीला कर्करोगाबद्दल जागरुकता वाढविण्याकरिता आणि प्रतिबंध, शोध आणि उपचारांना प्रोत्साहन देण्याकरिता आयोजित केला जातो. हा दिन आंतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघ (UICC) यांनी वर्ष 2008 मध्ये लिहिलेल्या ‘जागतिक कर्करोग घोषणापत्र’चे समर्थन करण्यासंदर्भात पाळला जातो.


🔴आतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघ (UICC)....


🔰आतरराष्ट्रीय कर्करोग नियंत्रण संघ (Union for International Cancer Control -UICC) ही कर्करोगाविरुद्धच्या लढ्यातील सर्वात मोठी आणि जगभरात जवळपास 155 देशांमध्ये 800 हून अधिक सदस्य संस्थांची एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे. 1933 साली या संघटनेची स्थापना झाली आणि त्याचे मुख्यालय जिनेव्हा (स्वित्झर्लंड) येथे आहे.


🔰ही संघटना जागतिक आरोग्य आणि विकास उद्दिष्टे यामध्ये जागतिक कर्करोगाचा भार कमी करण्यासाठी, अधिकाधीक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कर्करोग नियंत्रण एकाग्रीत करण्यासाठी कर्करोग समुदायांना एकत्र आणण्यासाठी क्षमता बांधणी करण्यासाठी आणि पुढाकारामध्ये आघाडी घेण्यासाठी समर्पित आहे. UICC आणि त्याचे बहू-क्षेत्रातील भागीदार हे जगातील सरकारांना यादृष्टीने गुणवत्तापूर्ण आणि शाश्वत कार्यक्रम चालवण्यासाठी उत्तेजन देण्यास बांधील आहेत.

पंतप्रधानांच्या हस्ते ‘चौरी चौरा’ शताब्दी समारंभांचे उद्घाटन.


🔰पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 4 फेब्रुवारी 2021 रोजी उत्तरप्रदेशातील गोरखपूर शहरातल्या चौरी चौरा या ठिकाणी ‘चौरी चौरा’ शताब्दी समारंभाचे व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून उद्घाटन झाले.


🔰आजच्या दिवशी ‘चौरी चौरा’ घटनेला 100 वर्षे झाली आहेत,  देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईतील ही ऐतिहासिक घटना आहे. याप्रसंगी चौरी चौरा शताब्दी कार्यक्रमाला समर्पित टपाल तिकीटही प्रकाशित केले गेले.


🔰उत्तरप्रदेश सरकारद्वारा आयोजित शताब्दी समारंभ आणि विविध कार्यक्रम राज्यातील सर्व 75 जिल्ह्यात 4 फेब्रुवारी 2021 पासून सुरू होतील आणि ते 4 फेब्रुवारी 2022 पर्यंत चालू राहतील.


🥏‘चौरी चौरा’ घटना.....


🔰महात्मा गांधीजींच्या नेतृत्वात चालविण्यात आलेल्या असहकार चळवळीला असस्मात थांबवण्यात आले होते. याला चौरी चौरा गावात चळवळीला मिळालेले हिंसक वळण हे कारण ठरले. 4 फेब्रुवारी 1922 रोजी पोलीसांनी जमावावर केलेल्या गोळीबाराने संतप्त होऊन आंदोलकांनी पोलीसांवर हल्ला केला व नंतर पोलीस ठाण्याला आग लावली. या हिंसक घटनेच्या पार्श्वभूमीवर गांधीजींनी चळवळ स्थगित केली.

मलेरिया मोहिमेसाठी भारतीय वंशाचे डॉक्टर जागतिक समन्वयक


🔰अमेरिकेतील जो बायडेन प्रशासनाने डॉ. राज पंजाबी यांची नेमणूक मलेरिया नियंत्रण मोहिमेचे समन्वयक म्हणून केली असून ते भारतीय वंशाचे आहेत.


🔰आफ्रिका व आशियायी देशातून मलेरियाचे उच्चाटन करण्याचा उद्देश या मोहिमेत आहे. लायबेरियात जन्मलेले पंजाबी व त्यांचे कुटुंबीय तेथील यादवी युद्धानंतर अमेरिकेत पळून आले होते व १९९० मध्ये शरणार्थी म्हणून आयुष्य जगत होते. पंजाबी (वय ३९) यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, आज सकाळी मलेरिया विरोधी मोहिमेच्या समन्वयकपदी शपथविधी झाला. बायडेन प्रशासनाने माझी जी नेमणूक केली त्याचा अभिमानाच वाटतो. या सेवेची संधी मिळाली याबद्दल मी ऋणी आहे. माझे कुटुंब व मी तीस वर्षांपूर्वी अमेरिकेत आलो.


🔰लायबेरियात त्यावेळी यादवी युद्ध सुरू होते. अमेरिकी समुदायाने त्यावेळी आमच्या कुटुंबाला आधार दिला त्यामुळे आमचे आयुष्य पूर्वपदावर आले. त्यामुळे या देशाची सेवा करण्यात आनंदच आहे. बायडेन-हॅरीस प्रशासनाने आपल्यावर जो विश्वास टाकला तो आपण सार्थ ठरवू. पंजाबी यांनी सांगितले की, अमेरिकेपुढे सध्या अनेक आव्हाने आहेत. त्यातून लवकर बाहेर पडणे गरजेचे आहे.


🔰माझे शिक्षण अमेरिकेत झाले असून परिस्थितीला आम्ही कधी शरण गेलो नाही तर तिचा स्वीकार करीत नवे भवितव्य घडवले. पंजाबी हे पेशाने डॉक्टर असून सार्वजनिक आरोग्य व्यावसायिक आहेत. मलेरिया निर्मूलनाच्या लक्ष्यात ते युनाटेड स्टेटस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट व सेंटर फॉर डिसीज कंट्रोल या संस्थेच्या वतीने समन्वयाचे काम करतील.

ऑपरेशन ब्ल्यू स्टार’चा उल्लेख करत पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी मोदी सरकारला दिला इशारा


🔰कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं दिल्लीत आंदोलन सुरू आहे. भारताबरोबरच परदेशातही याचे पडसाद उमटताना दिसत आहे. केंद्र सरकारकडून मागण्यांची दखल घेतली जात नसल्यानं आंदोलन आणखी तीव्र होऊ लागलं आहे. कायदे रद्द केल्याशिवाय घरी जाणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला असून, पंजाबजचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी यावरून केंद्राला गंभीर इशारा दिला आहे. अमरिंदर सिंह यांनी १९८४ च्या ऑपरेशन ब्लू स्टारचं उदाहरण देत लवकर तोडगा काढण्याचं आवाहन केलं आहे.


🔰मख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी सर्वपक्षीय बैठकीत शेतकरी आंदोलनाबाबत चिंता व्यक्त केली आहे. शेतकरी आंदोलकांच्या मागण्यावर तोडगा काढण्यास होणारा विलंब १९८४ ऑपरेशन ब्लू स्टारच्या दिशेनं राज्याला ढकलून शकतो, असं ते बैठकीत म्हणाले. शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत तातडीने तोडगा काढण्याची गरज असल्याच्या विधानावर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी बैठकीत जोर दिला.


🔰बठकीत मुख्यमंत्री काय म्हणाले याबद्दलची माहिती पत्रकातून देण्यात आली. “मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला आणि सांगितलं की, पाकिस्तानाकडून असलेल्या धोक्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सर्व गोष्टी हाताबाहेर जाण्याआधी आपल्याला हा मुद्दा सोडवण्यासाठी काम करावं लागणार आहे. सीमेपलीकडून (पाकिस्तानातून) किती ड्रोन्स, शस्त्रास्त्र आणि स्फोटक तस्करीच्या मार्गानं पंजाबमध्ये आणण्यात आले आहेत, याची आपल्याला माहिती असल्याचं मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितलं.”

जल जीवन मिशन(शहरी) पाणी पुरवठा विस्तृतपणे सार्वत्रिक करण्याची योजना


🔰2021-22 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी ‘शाश्वत विकासाचे ध्येय-6’ (SDG Goal-6) याच्याअंतर्गत जल जीवन मिशन (शहरी) योजना जाहीर केली.


🅾️ठळक बाबी


🔰जल जीवन मिशन (शहरी) योजना याची रचना सर्व 4378 वैधानिक छोट्या शहरांमधील सर्व घरांना क्रियाशील नळांद्वारे पाणी पुरवठा विस्तृतपणे सार्वत्रिक करण्यासाठी केली आहे.


🔰शहरी घरगुती नळ जोडणीमधील अंदाजे तफावत सुमारे दोन कोटी 68 लक्ष आहे, ज्यांचा जल जीवन मिशन अंतर्गत समावेश करण्याचा प्रस्ताव आहे.


🔰अभियान सांडपाण्याचा पुनर्वापर, जलसंपत्तीचे पुनरुज्जीवन आणि जलसंधारणावर लक्ष केंद्रित असेल.


🔰20 टक्के पाण्याची मागणी संस्थात्मक यंत्रणेच्या विकासासह पुनर्वापर केलेल्या पाण्याद्वारे पूर्ण करण्याचा प्रस्ताव आहे.


🔰अभियानासाठी प्रस्तावित एकूण खर्च 2 लक्ष 87 हजार कोटी रुपये एवढा आहे.


🔰अभियानाच्या अंतर्गत 4,378 शहरी स्थानिक मंडळ पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यात येईल. 500 अमृत (AMRIT) शहरांमध्ये लिक्विड बेस्ड व्यवस्थापन करणे नियोजित आहे.


🔰योजनेत आगामी काही वर्षांत 3.60 लक्ष कोटी रुपये खर्च करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. 2019-20 मध्ये निर्मला सीतारमन यांनी घरापर्यंत नळ योजनेची घोषणा केली होती. ही योजना जल जीवन मिशनचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.

जल जीवन मिशन


🔰जल जीवन मिशनचा शुभारंभ 2019 साली करण्यात आला होता. केंद्र सरकार या मोहिमेच्या अंतर्गत देशातील सर्व भागात स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचा उद्देश आहे.


🔰2024 सालापर्यंत सर्व घरांना नळाने पाणी देणे हे योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. योजनेमार्फत प्रत्येक कुटुंबाला नळाने पाणी पुरविणे, दरडोई 55 लिटर पाणीपुरवठा, शुद्ध पाणी देण्याचा संकल्प, सार्वजनिक नळाद्वारे कुटुंबांना पाणीपुरवठा ही योजनेची वैशिष्ट्ये आहेत.

देशातील 'हे' ५६ कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करा ; संरक्षण विभागाचे आदेश.


🔰पुणे (लष्कर) : पुणे ,खडकी, देहूरोड सहित राज्यातील ७ व देशभरातील ५६  कॅन्टोन्मेंट बोर्ड बरखास्त करण्याचा निर्णय संरक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या ११ तारखेपासून होईल. या आदेशाला पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार यांनी दुजोरा दिला आहे.


🔰सरक्षण विभागाच्या प्रधान निर्देशकांनी याबाबतचे पत्र देशभरातील सर्व कॅन्टोन्मेंटच्या मुख्यकार्यकरी अधिकाऱ्यांना पाठवले आहे. हे सर्व कॅन्टोन्मेंट बोर्ड १० फेब्रुवारी २०१५ ला अस्तित्वात आले होते. १० फेब्रुवारी २०२९ला त्यांचा कार्यकाळ संपला. परंतु, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कायद्यात ६ महिन्यांचा कार्यकाळ वाढवून देण्याची तरतूद आहे, त्यामुळे  सहा -सहा महिन्यांचा दोन  मुदतवाढ मिळाल्या होत्या. ही मुदत येत्या १० तारखेला संपत असून बोर्ड बरखास्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्याने  आता अधिकृत पत्र रक्षा संपदा विभागाकडून प्राप्त झाल्याने येत्या ११ फेब्रुवारीपासून बोर्ड बरखास्त होणार आहे.


🔰कन्टोन्मेंट बोर्डाच्या कायद्यातील तरतुदीनुसार जेव्हा बोर्ड बरखास्त होतो तेव्हा पुढील निवडणूक जाहीर होईपर्यंत बोर्डाचा कारभार बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर व मुख्यकार्यकारी अधिकारी या द्विसदस्यीय समितीमार्फत चालतो किंवा बोर्डावर प्रशासक म्हणून लोकांचा प्रतिनिधी  म्हणून सुद्धा संरक्षण मंत्रालय नेमु शकते. अश्यावेळी अध्यक्ष , उपाध्यक्ष लोकप्रतिनिधी व मुख्यकार्यकारी अधिकारी अशा त्रिसदस्यीय समिती मार्फत बोर्डाचा कारभार चालतो.

सीमावादामुळे आपत्कालीन संरक्षण साहित्य खरेदीवर भारताने खर्च केले २०,७७६ कोटी.


🔰पूर्व लडाखमध्ये चीन बरोबर सीमावाद सुरु झाल्यानंतर लष्करी क्षमता वाढवण्यासाठी भारताने शस्त्रास्त्रांच्या आपत्कालीन खरेदीवर २०,७७६ कोटी रुपये खर्च केले. लडाखमध्ये दोन्ही देशांचे मिळून एक लाख सैनिक तैनात आहेत. रणनितीक दृष्टीने महत्त्वाच्या फॉरवर्ड भागांमध्ये भारताने अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची तैनाती केली आहे. अर्थसंकल्पातील कागदपत्रांमधून ही बाब स्पष्ट झाली.


🔰मागच्यावर्षी सैन्याच्या अत्याधुनिकीकरणासाठी ज्या निधीची तरतूद करण्यात आली होती, त्यापेक्षा जास्त खर्च सैन्य क्षमता वाढवण्यावर करण्यात आला. २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात भांडवली खर्चासाठी १.१३ लाख रुपये राखून ठेवण्यात आले होते.


🔰चीन बरोबर सीमावादामुळे भारताला हवेतून जमिनीवर मारा करणारी शस्त्रास्त्रे, क्षेपणास्त्र, रॉकेटस, हवाई सुरक्षा सिस्टिम, जीपीएस गाइडेड दारुगोळा, रणागाडयाची युद्धसामग्री आणि असॉल्ट रायफल्स खरेदी कराव्या लागल्या. अमेरिका, रशिया. फ्रान्स आणि इस्रायल या देशांकडून भारताने शस्त्रास्त्रांची खरेदी केली.


🔰यदा २०२१-२२ साठी १.३५ लाख कोटी रुपये भांडवली खर्च म्हणजे अत्याधुनिकी करणासाठी राखून ठेवण्यात आले आहेत. भारताची वायूदलासाठी नवीन फायटर विमाने, मध्यम वाहतूक विमाने, बेसिक ट्रेनर विमाने, हलकी लढाऊ हेलिकॉप्टर्स, जमिनीवरुन हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे खरेदीसाठी ऑर्डर देण्याची योजना आहे.

संपूर्ण देशात लागू होणार धर्मांतर विरोधी कायदा?; केंद्रानं दिलं उत्तर



🔸धर्मांतर तसंच आंतरजातीय विवाहावर बंदी आणणारा कायदा आणण्यासंबंधी केंद्राने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपाशासित अनेक राज्यांमध्ये धर्मांतर विरोधी कायदा लागू करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर लोकसभेत काँग्रेसच्या खासदारांनी आंतरजातीय विवाहामुळे धर्मांतर होत असल्याचा केंद्राचा दावा असून हे रोखण्यासाठी सरकार कायदा आणणार आहे का? अशी विचारणा करण्यात आली. यावर केंद्राने उत्तर दिलं आहे.


🔸हा विषय राज्यांच्या अख्त्यारित येत असल्याने धर्मांतर तसंच आंतरजातीय विवाहावर बंदी आणणारा कोणताही कायदा आणण्याचा विचार नसल्याची माहिती केंद्र सरकारकडून मंगळवारी संसदेत देण्यात आली. 


🔸“कायदा-सुव्यवस्था, पोलीस हे राज्यांचे विषय आहेत. यामुळेच धर्मांतराशी संबंधित गुन्ह्यांचा प्रतिबंध, शोध, नोंदणी, तपास आणि खटला ही मुख्यतः राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांच्या चिंतेची बाब आहे. कायद्याची अमलबजावणी करणार्‍या संस्था नियमांचं उल्लंघन केल्याचं लक्षात येतं तेव्हा कायद्यानुसार कारवाई केली जाते,” अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री जी किशन रेड्डी यांनी दिली आहे.


🔸करळमधील काँग्रेसच्या पाच खासदारांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना जी किशन रेड्डी यांनी ही माहिती दिली. आंतरजातीय विवाहामुळे जबरदस्तीने धर्मांतर होत असल्याचं केंद्र सरकारला वाटत असून हे रोखण्यासाठी कोणता कायदा केला जात आहे का ? अशी विचारणा खासदारांकडून करण्यात आली होती. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश सरकारने धर्मांतर विरोधी कायदा केले आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये भाजपाची सत्ता आहे. तर दुसरीकडे हरियाणा, आसाम आणि कर्नाटकातही अशा प्रकारचा कायदा आणला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

वाचा इतिहास :- अकबराचे साम्राज्य



अकबरने राज्यावर आले  की ठरवले की शेरशाह सुरीच्या, ज्याने हुमायूॅला दिल्लीतून हाकलुन देउन दिल्लीचे तख्त काबीज केले होते, वंशाचा नायनाट करायचा.


 शेरशाहची तीन मुले वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र राज्ये चालवित होती. अकबरने त्यातील सगळ्या बलाढ्य अशा सिकंदरशाह सुरी वर चाल केली. दिल्लीची सल्तनत तर्दी बेग खानच्या हातात सोपवून अकबर स्वतः पंजाबकडे चालून गेला.


सिकंदरशाहने अकबरचा सामना न करता त्याला हुलकावण्या देणे पसंत केले. 


अकबर त्याचा पाठलाग करीत असताना दिल्लीवर सिकंदरशाहचा भाऊ आदिलशाह सुरीच्या हेमचंद्र विक्रमादित्य नावाच्या हिंदू सेनापतीने चाल केली. तर्दी खानने दिल्लीची तटबंदी केलेली नव्हती व हेमूचा हल्ला होताच तो शहर सोडून पळून गेला.


 हेमूने दिल्ली जिंकल्यावर आदिलशाहची सत्ता झुगारून दिली व स्वतःला राजा विक्रमादित्य या नावाने राज्याभिषेक करून घेतला. अशा प्रकारे हेमू दिल्लीवर राज्य करणारा शेवटचा हिंदू सम्राट झाला.


दिल्लीने अशाप्रकारे नांगी टाकल्याची खबर अकबरला मिळाल्यावर त्याच्या सल्लागारांनी त्याला आल्यावाटेने काबूलला पळ काढण्याचा सल्ला दिला.


 राजधानी गमावलेली असताना व सम्राट होउन अवघे काही महिने झालेले असताना राज्य परत मिळवण्याऐवजी काबूलमधील आपल्या नातेवाईकांचा आसरा घेणे जास्त हितावह असल्याचा तो सल्ला होता.


 अकबरच्या सेनानींपैकी एक बयराम खानने याचा विरोध केला व दिल्लीतून घूसखोरांना हाकलून देउन आपले राज्य परत घेण्यास अकबरला उद्युक्त केले.


 अकबरने आपले असलेले सगळे सैन्य घेउन दिल्लीवर चाल केली. दिल्लीतून पळालेला तर्दी बेग खान आता परत अकबरला येउन मिळाला व त्यानेही दिल्लीकडे न जाता परस्पर काबूलला जाण्याचा सल्ला दिला. 


काही काळानंतर बयरामखानने तर्दी बेग खानवर पळपुटेपणाचा आरोप ठेवून त्याला मृत्यूदंड दिला. अबुल फझल व जहांगीरच्या मते बयरामखानने हे निमित्त काढून आपल्या प्रतिस्पर्ध्याचा निकाल लावला.


डेन्मार्क देशात जगातील प्रथम ऊर्जा बेट उभारला जाणार



🔶डन्मार्क सरकारने उत्तर समुद्रात जगातील पहिले ऊर्जा बेट उभारण्यासंबंधीच्या प्रकल्पाला परवानगी दिली आहे.


🔶या प्रकल्पामुळे युरोपीय देशांमधील 3 दशलक्ष कुटुंबांच्या विजेची गरज भागविण्यापुरती पुरेशी हरित ऊर्जा उपलब्ध होणार आणि ती तिथे साठवून ठेवली जाऊ शकते.


▪️प्रकल्पाविषयी 


🔶हा प्रकल्प जवळपास 120,000 चौ. मीटर एवढ्या क्षेत्रात उभारला जाणार आहे.हा प्रकल्प समुद्रातील शेकडो पवन चक्क्याच्या जाळ्याला जोडले जाणार आहे.


🔶हा प्रकल्प जलवाहतुक, विमानचालन, उद्योग आणि अवजड वाहतुकीसाठी हरित हायड्रोजन तसेच घरांना वीज या दोन्ही गोष्टी पुरविणार.

डेन्मार्क हा उत्तर युरोप व स्कॅंडिनेव्हिया प्रदेशातील एक देश आहे. कोपनहेगन ही देशाची राजधानी आहे. डॅनिश क्रोन हे राष्ट्रीय चलन आहे.


🔶उत्तर समुद्र हा अटलांटिक महासागराचा एक भाग आहे. हा समुद्र उत्तर युरोपात ग्रेट ब्रिटन, स्कॅंडिनेव्हिया, बेल्जियम व नेदरलँड या देशांच्यामध्ये स्थित आहे. उत्तर समुद्र अटलांटिक महासागरासोबत दक्षिणेला इंग्लिश खाडी तर उत्तरेला नॉर्वेजियन समुद्राद्वारे जोडला गेला आहे.

लसीकरणानंतरही रुग्ण वाढले, सौदी अरेबियात भारतासह २० देशातील विमानांना प्रवेशबंदी




🔶भारत, अमेरिकेसह जगातील २० देशांच्या प्रवासी विमानांना सौदी अरेबियाने प्रवेशबंदी जाहीर केली आहे. सौदी अरेबियात करोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारपासून २० देशातील प्रवासी विमानांना प्रवेशबंदी लागू करत असल्याचे सौदी अरेबियाच्या अंतर्गत मंत्र्यांनी जाहीर केले.


🔶भारताशिवाय पाकिस्तान, अमेरिका, ब्राझील, जपान आणि अन्य देशाच्या प्रवासी विमानांना प्रवेशबंदी लागू करण्यात आली आहे. ब्रिटन, इटली, पोर्तुगाल, फ्रान्स, स्वीडन, जर्मनी, आयर्लंड आणि स्वित्झर्लंड या देशांचा सुद्धा यामध्ये समावेश आहे.


🔶प्रवेशबंदीच्या या नियमातून राजनैतिक अधिकारी, सौदीचे नागरिक, डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबीयांना सवलत देण्यात आली आहे. सौदीच्या सरकारी वृत्तसंस्थेने ही माहिती दिली. सौदी अरेबियात आतापर्यंत ३ लाख ६८ हजार नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. ६,४०० नागरिकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यभरात 20 ठिकाणी (कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, आणि नागपूर विभागात) लवकरच पर्यटन महोत्सवांचे आयोजन होणार आहे



▪️नाशिक - द्राक्ष महोत्सव, नांदूर माध्यमेश्वर महोत्सव.

▪️ अहमदनगर - भंडारदरा भागात काजवे महोत्सव.

▪️ धुळे - कळींग किल्ला महोत्सव

▪️ पुणे - जुन्नर द्राक्ष महोत्सव

▪️ सातारा - वाई महोत्सव

▪️ कोल्हापूर - पन्हाळा महोत्सव

▪️ सिंधुदुर्ग - वेंगुर्ला (सागरेश्वर) महोत्सव

▪️रायगड - श्रीवर्धन महोत्सव

▪️रत्नागिरी - कातळशिल्प महोत्सव, वेळास/आंजर्ले महोत्सव

▪️ उस्मानाबाद - तेर महोत्सव

▪️ बीड - कपिलधारा महोत्सव

▪️ नांदेड - होट्टल महोत्सव

▪️ बुलढाणा - सिंदखेड राजा महोत्सव

▪️ अकोला - नरनाळा किल्ला महोत्सव

▪️यवतमाळ - टिपेश्वर अभयारण्य महोत्सव 

▪️ नागपूर - रामटेक महोत्सव, बोर धरण आणि वन्यजीव महोत्सव

▪️ गोंदिया - बोधलकसा पक्षी महोत्सव. 

  

जल जीवन मिशन(शहरी) पाणी पुरवठा विस्तृतपणे सार्वत्रिक करण्याची योजना.


🔶2021-22 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी ‘शाश्वत विकासाचे ध्येय-6’ (SDG Goal-6) याच्याअंतर्गत जल जीवन मिशन (शहरी) योजना जाहीर केली.


🛑 ठळक बाबी..........


🔶जल जीवन मिशन (शहरी) योजना याची रचना सर्व 4378 वैधानिक छोट्या शहरांमधील सर्व घरांना क्रियाशील नळांद्वारे पाणी पुरवठा विस्तृतपणे सार्वत्रिक करण्यासाठी केली आहे.शहरी घरगुती नळ जोडणीमधील अंदाजे तफावत सुमारे दोन कोटी 68 लक्ष आहे, ज्यांचा जल जीवन मिशन अंतर्गत समावेश करण्याचा प्रस्ताव आहे.


🔶अभियान सांडपाण्याचा पुनर्वापर, जलसंपत्तीचे पुनरुज्जीवन आणि जलसंधारणावर लक्ष केंद्रित असेल.20 टक्के पाण्याची मागणी संस्थात्मक यंत्रणेच्या विकासासह पुनर्वापर केलेल्या पाण्याद्वारे पूर्ण करण्याचा प्रस्ताव आहे.अभियानासाठी प्रस्तावित एकूण खर्च 2 लक्ष 87 हजार कोटी रुपये एवढा आहे.

अभियानाच्या अंतर्गत 4,378 शहरी स्थानिक मंडळ पाणी पुरवठा सुनिश्चित करण्यात येईल. 500 अमृत (AMRIT) शहरांमध्ये लिक्विड बेस्ड व्यवस्थापन करणे नियोजित आहे.


🔶योजनेत आगामी काही वर्षांत 3.60 लक्ष कोटी रुपये खर्च करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. 2019-20 मध्ये निर्मला सीतारमन यांनी घरापर्यंत नळ योजनेची घोषणा केली होती. ही योजना जल जीवन मिशनचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.


🛑 जल जीवन मिशन...


🔶जल जीवन मिशनचा शुभारंभ 2019 साली करण्यात आला होता. केंद्र सरकार या मोहिमेच्या अंतर्गत देशातील सर्व भागात स्वच्छ पाणी पुरवठा करण्याचा उद्देश आहे.


🔶2024 सालापर्यंत सर्व घरांना नळाने पाणी देणे हे योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. योजनेमार्फत प्रत्येक कुटुंबाला नळाने पाणी पुरविणे, दरडोई 55 लिटर पाणीपुरवठा, शुद्ध पाणी देण्याचा संकल्प, सार्वजनिक नळाद्वारे कुटुंबांना पाणीपुरवठा ही योजनेची वैशिष्ट्ये आहेत.

"मनुष्यबळ भांडवलाचे पुनरूज्जीवन"



▪️राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व घटकांचा समावेश करून 15,000 शाळांना बळकट करणार; स्वयंसेवी संस्था, खाजगी शाळा आणि राज्ये यांच्याबरोबर भागीदारी करून नवीन 100 सैनिकी शाळांची स्थापना करणार.


▪️उच्च शिक्षण आयोगाच्या स्थापनेसाठी कायदा आणणार. यामध्ये सर्व गोष्टी एकाच छताखाली करणे शक्य व्हावे यासाठी स्थापना, मान्यता, नियमन आणि निधी यांच्यासाठी मानके निश्चित करणार; सर्व शासकीय महाविद्यालये, विद्यापीठे, संशोधन संस्था यांना एकाच छताखाली आणून एक महारचना तयार करणार; लडाखमध्ये उच्च शिक्षणाच्या सुविधेसाठी लेह येथे केंद्रीय विद्यापीठाची स्थापना करणार.


▪️आदिवासी क्षेत्रामध्ये 750 एकलव्य निवासी शाळा स्थापन करणार; आदिवासी विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधा देण्यावर भर देणार; अनुसूचित जाती कल्याण अंतर्गत मॅट्रिक/दहावी नंतर देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेत सुधारणा; केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या 35,219 कोटी रुपयांच्या मदतीमध्ये सहा वर्षासाठी म्हणजे 2025-26 पर्यंत वाढपदव्युत्तर शिक्षण उमेदवारी, पदवी प्रशिक्षण आणि अभियांत्रिकी पदविकाधारक यांच्यासाठी विद्यमान राष्ट्रीय उमेदवारी प्रशिक्षण योजनेच्या पुनर्गठनासाठी 3000 कोटी रुपयांची तरतूद; संयुक्त अरब अमिरात कौशल्य पात्रता, मूल्यांकन, प्रमाणपत्र आणि प्रमाणित कर्मचारी नियुक्त करण्यास मान्यता.


▪️डिजिटल माध्यमातून पेमेंट करण्यासाठी 1,500 कोटी रुपयांची योजना प्रस्तावितराष्ट्रीय भाषा अनुवाद मिशन (NTLM) याचे कार्य करणार. त्यामध्ये सरकारी योजना आणि त्यासंबंधित धोरणात्मक माहिती प्रमुख भारतीय भाषांमध्ये उपलब्ध करून देणार.


▪️न्यू स्पेस इंडिया लिमिटेडच्यावतीने PSLV-CS51 याचे प्रक्षेपण करणार यामध्ये ब्राझिलच्या अॅमेझोनिया उपगृहाचे आणि काही भारतीया उपग्रहांचे प्रक्षेपण करणार.


▪️गगनयान मोहिमेअंतर्गत, भारतीय 4 अंतराळवीरांचे रशियातल्या जेनेरिक स्पेस फ्लाईटव्दारे प्रशिक्षण सुरू आहे; पहिल्या मानवविरहित यानाचे डिसेंबर 2021 मध्ये प्रक्षेपण केले जेल.


▪️अतिखोल सागरात जलसंपत्तीच्या आणि सागरी जैवविविधता संवर्धन मोहिमेसाठी पाच वर्षात 4000 कोटी रुपये खर्च करणार.

अभिमानास्पद! ‘नासा’च्या कार्यकारी प्रमुख पदावर भारतीय वंशाची महिला.



🔰भारतीय वंशाच्या भाव्या लाल यांना अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासाच्या कार्यकारी प्रमुख पदावर नियुक्त करण्यात आलं आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भाव्या यांचं नाव नासाच्या परिक्षम मसितीच्या सदस्य म्हणून निवडलं आहे. यासंदर्भात नासानेही एक पत्रक जारी करत भाव्या यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा केली आहे. भाव्या यांची नियुक्ती ही भारतीयांसाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. व्हाइट हाऊसकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये भाव्या यांच्याबरोबरच नासामधील इतर प्रमुख पदांवरील नियुक्त्यांचीही घोषणा करण्यात आली आहे.


🔰भाव्या यांना अभियांत्रिकी आणि अवकाश संशोधन या दोन्ही क्षेत्रातील तंत्रज्ञानाचा दांडगा अनुभव आहे. मात्र भाव्या यांच्यावर अशी महत्वाची जबाबदारी टाकण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी भाव्या नाच्या इनोव्हेटिव्ह अ‍ॅडव्हान्स कॉन्सेप्ट्स प्रोग्रॅम म्हणजेच नवीन संकल्पनांवर काम करण्यासंर्भातील उपक्रम आणि अ‍ॅडव्हायझरी काऊन्सीलसाठी तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण संकल्पा आणि अभियांत्रिकी सल्लागार समितीच्या सदस्य देखील होत्या.


🔰भाव्या यांनी स्पेस टेक्नोलॉजी क्षेत्रामध्ये मागील दीड दशकांहून अधिक काळ काम केलं आङे. तसेच त्या इन्स्टीट्यूट ऑफ डिफेन्स अ‍ॅनालिसिस सायन्स अ‍ॅण्ड टेक्नोलॉजी पॉलिसी इंन्स्टीट्यूटमध्ये (एसटीपीआय) रिसर्च स्टाफ म्हणून २००५ ते २०२० दरम्यान कार्यरत होत्या.


🔰एसटीपीआय मध्ये सहभागी होण्याअगोदर त्या सी-सटीपीएस एलएलसीच्या अध्यक्षा राहिलेल्या आहेत. त्यापूर्वी भाव्या यांनी केंब्रिजमधल्या मैसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान धोरण अभ्यास केंद्राचे संचालक पद भूषवलं आहे. अमेरिकेच्या न्यूक्लिअर सोसायटीच्या अण्वस्त्रविषयक वार्षिक परिषदेच्या अध्यक्षस्थानीही भाव्या यांची नियुक्ती करण्यात आली होती.

चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे


प्रश्न२२१) कोणत्या मंत्रालयाने ‘राष्ट्रीय सागरी कासव कृती योजना’ जाहीर केली आहे?

उत्तर :- पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालय


प्रश्न२२२) गेल्या वर्षभरात भारताच्या अर्थव्यवस्थेमधील पुनर्प्राप्तीचे स्वरूप कसे होते?

उत्तर :-  V-आकार


प्रश्न२२३) कोणत्या व्यक्तीने संसदेत ‘आर्थिक सर्वेक्षण 2020-21’ सादर केले?

उत्तर :-  अर्थ मंत्री निर्मला सीतारमण


प्रश्न२२४) कोणता खेळाडू प्रथम आशियाई ऑनलाईन नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल गटात विजेता ठरला?

उत्तर :-  सौरभ चौधरी


प्रश्न२२५) कोणत्या वर्षी ‘तेजस मार्क II’ या लढाऊ विमानाची प्रथम अति-गती चाचणी घेतली जाणार?

उत्तर :- २०२३


प्रश्न२२६) कोणत्या देशाने बासमती तांदळासाठी GI टॅग प्राप्त केला?

उत्तर :- पाकिस्तान


प्रश्न२२७) कोणत्या दिवशी ‘जागतिक दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग (NTD) दिन’ साजरा करतात?

उत्तर :- ३० जानेवारी


प्रश्न२२८) केरळ राज्याच्या कोणत्या शहरात ‘जेंडर पार्क’ उभारण्यात आले आहे?

उत्तर :- कोझिकोडे


प्रश्न२२९) कोणत्या शहरात जागतिक सुवर्ण परिषदेचे मुख्यालय आहे?

उत्तर :- लंडन


प्रश्न२३०) कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाने “तुरुंग पर्यटन” नामक उपक्रमाचा प्रारंभ केला?

उत्तर :- महाराष्ट्र


१. शांघाई सहयोग संघटन (SCO) - २०२० चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे ?

 A) किर्गिजस्तान 

 B) रशिया 

 C) चीन 

 D) भारत

Correct Answer D 

भारत 


२. शांघाई सहयोग संघटन मध्ये भारताने पूर्ण सदस्यत्व कधी स्वीकारले ? 

  A) ९ जून २०१६ 

 B) ९ जून २०१९ 

 C) ९ जून २०१७ 

 D) ९ जून २०१८

Correct Answer C

९ जून २०१७ 


३.सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस हा म्हणून __साजरा केला जातो?

  A) भारतीय प्रवासी दिन 

 B) राष्ट्रीय एकता दिन 

 C) राष्ट्रीय युवा दिन 

 D) राष्ट्रीय शांतता दिन

Correct Answer B 

राष्ट्रीय एकता दिन


४. " DPD" चे संक्षिप्त रुप काय आहे ?

  A) डायरेक्ट पोर्ट डिलीव्हरी 

 B) डूअर पोर्ट डिलीव्हरी 

 C) डायरेक्ट पार्सल डिलीव्हरी 

 D) डायरेक्ट पार्टी डिलीव्हरी

Correct Answer A 

डायरेक्ट पोर्ट डिलीव्हरी 


५. अमेरिकेच्या "स्टॅच्यू ऑफ लिबर्टी" ची उंची ९३ मीटर आहे तर, भारतातील स्टैच्यू ऑफ़ यूनिटी ची उंची किती मीटर आहे ? 

  A) १७२ 

 B) १९८ 

 C) १९० 

 D) १८२

Correct Answer D 

१८२ 


६. १९६२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाला सुवर्णपदक जिंकून देणारे महान फुटबॉल पटू यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय टपाल विभागाने तिकीट जारी केले? 

  A) चुनी गोस्वामी 

 B) गोशतो पॉल 

 C) तालिमेरेन आओ 

 D) वरीलपैकी सर्व

Correct Answer A 

चुनी गोस्वामी 


७. 'आयसीसी ' युवा (१९ वर्षाखालील ) विश्व चषक क्रिकेट-२०२० स्पर्धा कोठे होणार आहे ?

  A) इंग्लंड 

 B) द. आफ्रिका 

 C) ऑस्ट्रेलिया 

 D) वेस्ट इंडिज

Correct Answer B 

द. आफ्रिका 


८. " रायसीना डायलॉग " हा दोन दिवसीय कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला?

  A) मध्य प्रदेश 

 B) दिल्ली 

 C) हरियाणा 

 D) मुंबई

Correct Answer B 

दिल्ली 


९. शांघाई सहयोग संघटनेच्या आठ आश्चर्यमध्ये भारतातील कोणत्या स्थळांचा समावेश करण्यात आला?

  A) सुवर्ण मंदिर 

 B) नालंदा विद्यापीठ 

 C) ताज महाल 

 D) स्टैच्यू ऑफ़ यूनिटी

Correct Answer D 

स्टैच्यू ऑफ़ यूनिटी 


१०. शांघाई सहयोग संघटन चे मुख्यालय कोठे आहे ?

  A) इस्लामाबाद (पाकिस्तान) 

 B) मास्कोव (रशिया) 

 C) बीजिंग (चीन) 

 D) दिल्ली (भारत) 

Correct Answer C 

बीजिंग (चीन)

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...