Wednesday, 3 February 2021

महत्वाचे घाट व जोडणारी शहरे



थळघाट  ➖  मबई  _  नाशिक


बोरघाट   ➖ पणे _ मुंबई


कुंभार्ली ➖ कराड  _ चिपळूण


आंबा ➖ मलकापूर _ रत्नागिरी


फोंडा ➖ कोल्हापूर  _ मालवण, वेगुर्ला


आंबोली ➖ कोल्हापूर  _ गोवा


माळशेज ➖ मबई  _ अहमदनगर


कसारा ➖ मबई  _ नाशिक


पसरणी ➖ वाई  _ पांचगणी

लोकसंख्या वाढीचे टप्पे:-



1.1901-21 :- स्थिर वाढीचा टप्पा .


2.1921-51 :- मंद  वाढीचा  टप्पा .


3. 1951-81 :- वेगवान उच्च वाढीचा टप्पा .


4. 1981-2011:- उच्च वाढ मात्र घसरता दर  .


📌 लोकसंख्या संक्रमण सिद्धांत :-

 

1ला टप्पा :- जन्मदर आणि मृत्युदर जास्त


2रा टप्पा  :- वाढीचा वार्षिक दर 2.0%


3रा टप्पा :- जन्मदर सातत्याने कमी आणि लोकसंख्या वृध्दी कमी

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना


◾️भारतात रेलवे सुरु करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली?

- लॉर्ड हार्डींग्ज पहिला


◾️इंग्रजी भाषेत सुरु करण्यात आलेले मुंबईतिल प्रथम वृत्तपत्र कोणते?

- बॉम्बे हेराॅल्ड.


◾️भारतातील पहिली जातीय संघटना कोणती?

- मुस्लिम लीग


◾️ टिपू सुलतानाने कोणत्या लढाईत इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम रॉकेट चा वापर केला?

- 1780 ची पाल्लुतुरची लढाई 


◾️भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी?

- लॉर्ड कॅनिंग 


◾️ निळीचा उठाव हा सर्वप्रथम कोठे घडून आला?

- बंगाल प्रांतात


◾️1858च्या कायद्यान्वये नियुक्त झालेला पहिला भारतमंत्री?

- लॉर्ड स्टैनले


◾️1857च्या उठावाची पहिली ठिणगी ही सर्वप्रथम कोणत्या रेजिमेंटमध्ये पेटली?

- 34वी एन. आय. रजिमेंट 


◾️इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करुन देणारे प्रथम कॉलेज कोणते?

- कलकत्ता विद्यालय

पाबना शेतकरी विद्रोह 1873-76


★ 1850/1859 च्या कायद्याने शेतकर्यांंना संरक्षण दिले मात्र कंपनी सरकारने अन्याय करण्यास सुरुवात केली


★ 1873 च्या दरम्यान या अन्यायाविरुद्ध "युसूफ सराय" च्या शेतकर्यांनी "क्रुषक संघ" स्थापन केला 


🔸परमुख नेता:- ईशान चन्द्र राय, शंभुपाल


★ कालांतराने हा विद्रोह ढाका, त्रिपूरा, बेकरगंज, फरिदपूर, बोगरा, मेमनसिंह येथे झाले


★ दरम्यान पबनाच्या नागरिकांनी घोषणा केली, " आम्ही फक्त महाराणीची जनता होऊ इच्छितो"



★ समर्थन:- बंकिमचन्द्र चट्टोपाध्याय,  आर.सी. दत्त,  सुरेन्द्रनाथ बनर्जी, आनंद मोहन बोस, द्वारका नाथ गांगुली यांनी पुढील काळात समर्थन केले


RRB NTPC Exams -2021 (अति संभाव्य प्रश्नोत्तरे )



#1. भारतात सापडलेले सर्वात मोठे जुने शहर कोणते आहे? - हडप्पा


#2."स्वराज हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे" असे कोणी म्हटले? - बाळ गंगाधर टिळक

    

#3. महात्मा गांधींचे राजकीय गुरू कोण होते? - गोपाळ कृष्ण गोखले


#4. दिल्लीवर राज्य करणारी पहिली मुस्लिम महिला शासक / सर्वप्रथम महिला शासक कोण होती? - रझिया सुल्तान


#5. सिंधू सभ्यतेचे पट्टानगर (बंदर) कोणते होते? - लोथल


#6. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे संस्थापक कोण होते? - ए.ओ. ह्यूम


#7. कोणते वेद गद्य आणि श्लोक या दोन्ही मध्ये रचले गेले आहेत? - यजुर्वेद


#8. भारतातील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? - सय्यद अहमद खान


#9. बौद्ध धर्म कोणाच्या शासनकाळात हीनयान आणि महायान या दोन भागात विभागला गेला होता? - कनिष्क


#10. लोदी घराण्याचा शेवटचा शासक कोण होता? - इब्राहिम लोदी


#11. प्रथम जैन संगीत कोठे आयोजित केले गेले होते? - पाटलिपुत्र (आताचे पटना)


#12. ऋग्वैदिक समाजातील सर्वात लहान घटक कोणते होते? - कुल किंवा कुटुंब


#13. कोणत्या शासकाकडे शक्तिशाली नौसेना होती? - चोल


#14. संकीर्तन प्रणालीचे जनक कोण होते? - चैतन्य


#15. कोणत्या मुगल शासकास 'आलमगीर' म्हटले जाते? - औरंगजेब


#16.  'शहीद आजम' ही पदवी कोणाला दिली गेली? - भगतसिंग


#17. सायमन कमिशनच्या निषेधाच्या वेळी लाठीचार्जात कोणत्या राजकारण्यांचा मृत्यू झाला? - लाला लाजपत राय


#18. वहाबी चळवळीचे प्रवर्तक कोण होते? - सय्यद अहमद


#19. बुद्धांनी महापरिनिर्वाण कोणत्या ठिकाणी केले? - कुशीनारा / कुशीनगरमध्ये


#20. कॉंग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? - व्योमेश चंद्र बॅनर्जी

महाराष्ट्र भुषण पुरस्काराचे आतापर्यंतचे विजेते



👤 १९९६ : पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे

🙎‍♀️ १९९७ : लता मंगेशकर 

👤 १९९९ : विजय भटकर 

👤 २००१ : सचिन तेंडुलकर

👤 २००२ : भिमसेन जोशी 

👤 २००३ : अभय बंग व राणी बंग 🙎‍♀️

👤 २००४ : बाबा आमटे 

👤 २००५ : रघुनाथ माशेलकर

👤 २००६ : रतन टाटा 

👤 २००७ : आर के पाटील

👤 २००८ : नाना धर्माधिकारी 

👤 २००८ : मंगेश पाडगावकर

🙎‍♀️ २००९ : सुलोचना लाटकर 

👤 २०१० : जयंत नारळीकर

👤 २०११ : डॉ. अनिल काकोडकर 

👤 २०१५ : बाबासाहेब पुरंदरे .

चालू घडामोडी



१. शांघाई सहयोग संघटन (SCO) - २०२० चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे ?

 A) किर्गिजस्तान 

 B) रशिया 

 C) चीन 

 D) भारत

Correct Answer D 

भारत 


२. शांघाई सहयोग संघटन मध्ये भारताने पूर्ण सदस्यत्व कधी स्वीकारले ? 

  A) ९ जून २०१६ 

 B) ९ जून २०१९ 

 C) ९ जून २०१७ 

 D) ९ जून २०१८

Correct Answer C

९ जून २०१७ 


३.सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस हा म्हणून ______साजरा केला जातो?

  A) भारतीय प्रवासी दिन 

 B) राष्ट्रीय एकता दिन 

 C) राष्ट्रीय युवा दिन 

 D) राष्ट्रीय शांतता दिन

Correct Answer B 

राष्ट्रीय एकता दिन


४. " DPD" चे संक्षिप्त रुप काय आहे ?

  A) डायरेक्ट पोर्ट डिलीव्हरी 

 B) डूअर पोर्ट डिलीव्हरी 

 C) डायरेक्ट पार्सल डिलीव्हरी 

 D) डायरेक्ट पार्टी डिलीव्हरी

Correct Answer A 

डायरेक्ट पोर्ट डिलीव्हरी 


५. अमेरिकेच्या "स्टॅच्यू ऑफ लिबर्टी" ची उंची ९३ मीटर आहे तर, भारतातील स्टैच्यू ऑफ़ यूनिटी ची उंची किती मीटर आहे ? 

  A) १७२ 

 B) १९८ 

 C) १९० 

 D) १८२

Correct Answer D 

१८२ 


६. १९६२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाला सुवर्णपदक जिंकून देणारे महान फुटबॉल पटू यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय टपाल विभागाने तिकीट जारी केले? 

  A) चुनी गोस्वामी 

 B) गोशतो पॉल 

 C) तालिमेरेन आओ 

 D) वरीलपैकी सर्व

Correct Answer A 

चुनी गोस्वामी 


७. 'आयसीसी ' युवा (१९ वर्षाखालील ) विश्व चषक क्रिकेट-२०२० स्पर्धा कोठे होणार आहे ?

  A) इंग्लंड 

 B) द. आफ्रिका 

 C) ऑस्ट्रेलिया 

 D) वेस्ट इंडिज

Correct Answer B 

द. आफ्रिका 


८. " रायसीना डायलॉग " हा दोन दिवसीय कार्यक्रम कोठे आयोजित करण्यात आला?

  A) मध्य प्रदेश 

 B) दिल्ली 

 C) हरियाणा 

 D) मुंबई

Correct Answer B 

दिल्ली 


९. शांघाई सहयोग संघटनेच्या आठ आश्चर्यमध्ये भारतातील कोणत्या स्थळांचा समावेश करण्यात आला?

  A) सुवर्ण मंदिर 

 B) नालंदा विद्यापीठ 

 C) ताज महाल 

 D) स्टैच्यू ऑफ़ यूनिटी

Correct Answer D 

स्टैच्यू ऑफ़ यूनिटी 


१०. शांघाई सहयोग संघटन चे मुख्यालय कोठे आहे ?

  A) इस्लामाबाद (पाकिस्तान) 

 B) मास्कोव (रशिया) 

 C) बीजिंग (चीन) 

 D) दिल्ली (भारत) 

Correct Answer C 

बीजिंग (चीन)


काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ


🌷अकबर : श्रेष्ठ किंवा मोठा


🌷अकदस : पुण्यवान,धर्मात्मा


🌷अखई : अखंड


🌷अगेल : पहिला


🌷अगाब : मजबूत, श्रेष्ठ


🌷अधा : धनी,यजमान


🌷अजा : शेळी, बकरी


🌷आदोली  :  हेलकावा, झोका


🌷आदिष्ट  :  आज्ञा , हुकूम केलेला


🌷आपगा  :  नदी


🌷आभु  :  ब्रम्हा


🌷आमण  :  आवण, चाकाचा आस ज्यात फिरतो ते


🌷आयतन  :  जागा ,स्थळ


🌷आलक  :  कपटी, लबाड, गुन्हेगार


🌷आली  :  सखी, मैत्रीण,रांग,ओळ


तैनाती फौज

 ◾️ या पध्दतीमध्ये इंग्रज फौजेचा सर्व खर्च हा ती फ़ौज ज्यांच्याकडे आहे ( राजाने ) त्यांनी करावयाचा   


◾️ लॉर्ड वेलस्लिने 1798 मध्ये सर्वप्रथम निजामावर 'तैनाती फौजेचा' अवलंब केला.


🔹 निजामाने या तैनाती फौज चा खर्च द्यायचा

🔹 निजामाचे परराष्ट्र धोण मात्र इंग्रज ठरवू लागले. 


⚔️ निजाम 1798

⚔️ टिपू सुलतान  1799

⚔️ अयोध्येचा नवाब 1801

⚔️  दुसरा बाजीराव पेशवा 1802


 यांच्यावर तैनाती फौजेची सक्ती करण्यात आली.


मराठी व्याकरण - भाषेतील रस



रसाचा शब्दश: अर्थ ‘चव’ किंवा ‘रुची’ असा आहे. व्यवहारात गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट व कडू असे सहा रस आहेत. या सहा रसांमुळेच आपणास पदार्थांची गोडी किंवा चव कळते. यालाच आपण रसास्वाद म्हणतो.


साहित्य वाचल्याने, ऐकल्याने किंवा पाहिल्याने मानवी अंत:करणातील भावना उद्दीपित होतात व रसानिर्मिती होते.


मानवी मनात काही भावना कायमच्या वास करीत असतात उदा. प्रेम करण्याची, रागावण्याची, हसण्याची, दु:खाची, पराक्रमांची इ. या मनातील ‘स्थिर’ व ‘शाश्वत’ भावनांनाच काव्यशास्त्रात ‘स्थायीभाव’ असे म्हणतात.


साहित्य कृतीच्या वाचनाने ‘स्थायी भाव’ जागृत होतात व रसनिर्मिती होते.


१) स्थायीभाव - रती


रसनिर्मिती – शृंगार


हा रस कुठे आढळतो - स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून किंवा आकर्षणाच्या वर्ननातुन


उदा – डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहु नका.


२) स्थायीभाव – उत्साह


रसनिर्मिती - वीर


हा रस कुळे आढळतो - पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनात


उदा. ‘शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’


३) स्थायीभाव –शोक


रसनिर्मिती – करुण


हा रस कुठे आढळतो - दुख, वियोग, संकट यांच्या वर्णनात


उदा – आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी, मज होय शोककारी!


४) स्थायीभाव – क्रोध


रसनिर्मिती – रौद्र


हा रस कुळे आढळतो – क्रोध, चीड किंवा रागाचे वर्णन


उदा – मनिषाच्या त्या वर्तनाकडे आई डोळे वटारून पाहत होती.


५) स्थायीभाव – हास


रसनिर्मिती – हास्य


हा रस कुठे आढळतो - विसंगती, असंबध्द भाषण, विडंबन,चेष्टा यांच्या वर्णनात.


उदा – मानसीच पेपर लिहिताना लक्ष विचलित होऊ नये म्हणून रश्मी बरोबर अडीच तास आठ दिवस भजी तळत बसायची.


६) स्थायीभाव – भय


रसनिर्मिती- भयानक


हा रस कुळे आढळतो - युद्ध, मृत्यु, खून, सूड, राक्षस, स्मशान इ. च्या वर्णनात.


उदा. तो गुरासारखा ओरडला त्याचे सारे रक्त उलथे पालथे झाले व त्याने जोरात किंकाळी फोडली.


७) स्थायीभाव – जुगुप्सा


रसनिर्मिती – बीभत्स


हा रस कुठे आढळतो - किळस, वीट, तिटकारा इ. च्या वर्णनात.


उदा – मुंबईचा कामगार चाळीतल्या दहा बाय बाराच्या घरात, कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी, ओकारी आणणाऱ्या दुर्गधीत आयुष्यभर खितपत पडलेला असतो.


८) स्थायीभाव – विस्मय


रसनिर्मिती- अदभुत


हा रस कुठे आढळतो - आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनात


उदा – असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.


९) स्थायीभाव – शम (शांती)


रसनिर्मिती – शांत


हा रस कुळे आढळतो - परमेश्वर विषयक भक्ती भाव असलेली गांणी किंवा वातावरणात.


उदा – सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनि तेजाकंडे प्रभू आमच्या ने जीवंना !

एक काल बाह्यतरतूद.(विधानपरिषद)....



♦️ पदवीधर व शिक्षक यांना प्रतिनिधित्व का देण्यात आले ....

          राज्यघटना तयार झाली, त्यावेळी साक्षरतेचे प्रमाण अत्यल्प होते, तरीही दूरदृष्टीने विचार करून घटना समितीने मतदानाचा हक्क सर्वांना दिला. त्यावेळी हा निर्णय कसा चुकीचा आहे, असा युक्तिवाद करणारा मोठा वर्ग होता. कायदेमंडळातील अशिक्षित व कमी शिकलेले सभासद सरकारच्या कामावर देखरेख करू शकतील का आणि कायदे करताना त्याचा बारकाईने विचार करू शकतील का, याबाबत त्यांना संदेह होता. घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांचेही असे मत होते; त्यामुळेच विधान परिषदेत पदवीधर व शिक्षक यांचे प्रतिनिधित्व असावे, अशी मागणी पुढे आली आणि त्यानुसार कलम १७१ अन्वये ही तरतूद करण्यात आली.


♦️विधानपरिषद रचनेबद्दल चर्चा..

  घटनेच्या 171 कलमाच्या पहिल्या प्रारूपात विधान परिषदेत किती सभासद असावेत याची फक्त तरतूद होते आणि बाकीचा सर्व तपशील.कायद्यान्वये निर्धारित करावा, असे अपेक्षित होते; पण घटना समितीत असा आग्रह धरण्यात आला, की हे योग्य होणार नाही व घटनेतच विधान परिषदेत काय प्रतिनिधित्व असावे, याची तरतूद केली जावी. त्यानुसार विधानसभेने आणि पदवीधर, शिक्षक व स्थानिक स्वराज्य संस्था यांनी निवडून द्यावयाचे सभासद; तसेच राज्यपाल नियुक्त सभासद यांची तरतूद करण्यात आली. त्यावेळी कदाचित ही पुरेशीही होती; पण आता झालेल्या विविध बदलांचे प्रतिनिधित्व विधान परिषदेत हवे.


♦️ नामनिर्देशित सदस्यांची तरतूद रद्द करता करावी का ?

राज्यपालांनी नेमावयाच्या सभासदांचा प्रश्न नेहमीच विवाद्य झाला आहे. समाजातील ज्या क्षेत्रातील व्यक्तींना निवडणुकांच्या धामधुमीत पडता येणे शक्य नाही, त्यांचे विचार विधान परिषदेत मांडले जावेत व ते लक्षात घेतले जावेत, या दृष्टीने राज्यघटनेत केलेली ही तरतूद योग्य म्हणता येईल. प्रत्यक्षात मात्र त्याचे वेगळेच स्वरूप दिसते. या जागांवर नेमणूक करणे, हा प्रत्यक्षात सत्ताधारी पक्षाच्या हातातील अधिकार होतो; त्यामुळे अनेकदा राजकारणी मंडळीच या पदावर नेमण्यासाठी आग्रह धरला जातो. शिवाय, आता अनेक प्रकारच्या माध्यमांतर्फे विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्तींना आपले विचार लोकांसमोर ठेवण्याच्या असंख्य संधी आहेत; त्यामुळे आता राज्यपालांनी नियुक्त करावयाचे सभासद ही तरतूद आवश्यक नाही.


♦️विधान परिषदेची आवश्यकता आहे का? 

महात्मा गांधींना ही चैन भारताला परवडणारी नाही, असे वाटे. हा प्रश्न घटना समितीत आला, तेव्हा डॉ. आंबेडकरांनी या संस्थांचे काम पाहून मग त्या चालू ठेवाव्यात किंवा कसे त्याबाबत निर्णय घ्यावा, असे म्हटले होते. गेल्या सात दशकांत अनेक राज्यांनी विधान परिषदा रद्द केल्या. बाकीच्या विधान परिषदांनी केलेल्या कामाचा सखोल आढावा घेऊन, त्यांची आवश्यकता आहे किंवा कसे, याचा विचारच झालेला नाही. आता केवळ सहा राज्यांमध्ये परिषदा आहेत, हे पाहता असा आढावा अगत्याचा आहे. महाराष्ट्राने असा आढावा लवकर घ्यावा. राज्यघटनेतील तरतुदी काळानुसार बदलू शकतात. म्हणूनच घटनेत बदल करण्याच्या तरतुदी सहजसाध्य ठेवल्या आहेत. राज्यघटना बदलली नाही, तर काय होऊ शकते, याचे विधान परिषदांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुका हे एक ज्वलंत उदाहरण आहे. म्हणूनच या तरतुदीचा नव्याने विचार होणे आवश्यक आहे.


♦️विधानपरिषद नष्ट/निर्माण करणे.. (कलम 169)

- अधिकार विधानसभा..

👉 विधानपरिषदेचे अस्तित्व विधानसभेच्या मर्जीवर अवलंबून असते..

- अंतिम अधिकार संसद..

👉सबंधित राज्याच्या विधानसभेने विशेष बहुमताने ठराव पारित केल्यासच संसद विधानपरिषद नष्ट /निर्माण करू शकते.

(विधानसभेचा ठराव संसदेवर बंधनकारक नसतो पण ठरावाविना संसद पुढील कोणतीच कार्यवाही करू शकत नाही)