Monday, 1 February 2021

भारतात मनुष्यबळाची अफाट क्षमता- बिल गेट्स


🔰‘‘भारतामध्ये मनुष्यबळाची अफाट  शक्ती आहे, त्याचा योग्य वापर केला तर अविश्वसनीय अशा गोष्टी आपण घडवू शकतो’’, असे मत बिल व मेलिंडा गेट्स फाउंडेशनचे प्रमुख बिल गेट्स यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना व्यक्त केले.


🔰करोना साथीने मानव जातीला किती हादरा दिला, असे विचारले असता ते म्हणाले, की करोना साथ हा मोठा धक्काच होता. त्याचा मूल्यमापनात्मक स्पष्ट परिणाम अजून समजलेला नाही, पण मानसिक आरोग्याचे, शैक्षणिक व आर्थिक नुकसानीचे प्रमाण जास्त आहे. येत्या दोन ते पाच वर्षांत ही परिस्थिती पूर्वपदावर येईल. त्यामुळे आताची हानी ही कायमची आहे अशी निराशा बाळगण्याचे कारण नाही.


🔰पढील दोन ते पाच वर्षांत पुन्हा करोनासारखी महासाथ येण्याची शक्यता वर्षांत २ टक्के आहे. त्यामुळे अजून दहा वर्षे तरी अशी साथ पुन्हा येणार नाही.  औषधे व लशी येत आहेत, त्यामुळे यापुढील काळात दुर्दैवाने अशी साथ आली तरी ती किरकोळ असेल कारण आपली सज्जता मोठी असणार आहे. आताच्या साथीतही आपण ऑस्ट्रेलिया व दक्षिण कोरिया यांनी किती तत्परतेने या साथीला प्रतिसाद दिला हे पाहिले आहे. त्यामुळे त्या देशांना कमी फटका बसला. आरोग्य व शिक्षण या दोन गोष्टींवर भर द्यायला हवा कारण त्यात असमानता आहे.

ताजमहालच्या संरक्षित क्षेत्रातील चार हजार झाड कापण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची परवानगी


🔰सर्वोच्च न्यायालयाने रेल्वे विकास महामंडळाला मथुरा ते झाशीदरम्यान रेल्वे ट्रॅकचं काम करण्यासाठी चार हजार १०८ झाडं कापण्याची परवानगी दिली आहे. सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही परवानगी दिली आहे.


🔰विशेष म्हणजे जी झाडं पाडण्यासाठी न्यायलयाने परवानगी दिली आहे ती सर्व झाडं ताज ट्रॅपिझियम झोन (टीटीझेड) म्हणजेच संरक्षित क्षेत्रातील आहे. देशाचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी रेल्वे विकास महामंडळाने या दोन स्थानकांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गाचं काम करण्यासाठी परवानगी घेतल्याची माहिती न्यायालयाला दिली.


🔰ताज ट्रॅपिझियम झोन (टीटीझेड) हा १० हजार ४०० स्वेअर किलोमीटरचा परिसर आहे. अर्थात नावाप्रमाणे हा परिसर ताजमहालच्या आजूबाजूचा परिसर आहे. ताजमहाल ज्या ठिकाणी आहे तेथील प्रदुषण नियंत्रणात रहावे म्हणून या भागातील वन क्षेत्र संरक्षित करण्यात आलेलं आहे.


🔰सर्वोच्च न्यायालयाने टीटीझेडसंदर्भात उद्योग व्यवसायांना निर्देश देणारे आणि हे क्षेत्र संरक्षित करणारा आदेश ३० डिसेंबर १९९६ रोजी दिला होता. सर्वोच्च न्यायालयामध्ये ताजमहालच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रदुषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी दाखल करण्यात आलेल्या जनहितयाचिकेमध्ये हे क्षेत्र संरक्षित करण्याची मागणी करण्यात आलेली. ही मागणी मान्य करत न्यायालयाने या भागातील जमीन संरक्षित घोषित केलेली

राज्यात २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन वाढवला


🔰करोनाच्या प्रसाराला प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. त्यानंतर ठराविक कालावधीनंतर लॉकडाऊनला मुदतवाढ दिली जात असून, राज्य सरकारने पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवला आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे.


🔰करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनला सातत्यानं मुदतवाढ दिली जात आहे. राज्य सरकारनं पुन्हा एकदा लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला असून, तसे आदेश आज काढण्यात आले आहेत. २८ फेब्रुवारीपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला असून, आतापर्यंत परवानगी देण्यात आलेल्या सेवा आणि गोष्टींवर सुरू राहणार आहेत. तर ज्या सेवांना परवानगी देण्यात आलेली नाही. त्या पूर्वीप्रमाणेच बंद असणार आहेत.


🔰लॉकडाऊन वाढवताना राज्य सरकारनं यापूर्वी वेळोवेळी जारी केलेले आदेश लागू असतील. गेल्या ३० सप्टेंबर आणि १४ ऑक्टोबरला मिशन बिगीन अगेन अंतर्गत काही निर्बंध शिथील करण्यात आले होते. यात परवानगी देण्यात आलेल्या सर्व गोष्टी नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहेत. मात्र, कंटेन्मेंट झोनमधील लॉकडाऊन कायम ठेवला जाणार आहे.

हुकूमशहा किम जोंग उनच्या भावाच्या हत्येची नवी कथा आली समोर, वाचा काय आहे 'Assassins'


🔰२०१७ साली नॉर्थ कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उनचा सावत्र भाऊ किम जोंग नाम याची मेलशियाची राजधानी क्वाललंपूरच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर नर्व एजंटने हत्या केली होती. या प्रकरणाबाबत अमेरिकन सिने दिग्दर्शक आणि डॉक्युमेंट्री मेकर रेयान व्हॉइन यांनी 'असासिन्स' नावाने एक डॉक्युमेंट्री तयार केली आहे.


🔰जयात किम जोंग नामच्या हत्येशी संबंधित गोष्टींची चौकशी करण्यात आली आहे. या डॉक्टुमेंट्रीमध्ये अनेक धक्कादायक खुलासेही करण्यात आले आहेत. कारण रेयान या डॉक्टमेंट्रीमध्ये त्या महिलांनाही दाखवलं आहे ज्या हत्येच्या आरोपात पकडल्या गेल्या होत्या आणि नंतर त्यांची सुटका झाली होती.


🔰किम जोंग नामवर मलेशियाची राजधानी क्वाललंपूरच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर VX नर्व एजंटकडून हल्ला करवण्यात आला होता. काही सेकंदातच त्याचा मृत्यू झाला होता. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ह कॅमेरात कैद झाली होती. यात दोन महिला इंडोनेशियाची सिती ऐस्याह आणि व्हिएतनामची दोअन थि हुंओंग यांची नावे समोर आली होती.


🔰दोन्ही महिलांना ताब्यात घेण्यात आलं होतं. पण त्यांना मलेशिया कायद्यानुसार शिक्षा मिळणार होती. मात्र त्यांनी जे सांगितलं त्यानंतर त्यांना २०१९ मध्ये सोडण्यात आलं. मुळात दोघींना माहितीच नव्हतं की, त्या काय करत आहेत. कारण दोघींना या गोष्टीचा विश्वास देण्यात आला होता की, दोघी एका टीव्ही शो च्या भाग आहेत.

पुण्यतिथी विशेष : तेव्हा देशाच्या चलनी नोटांवर पहिल्यांदाच गांधींजींचा फोटो छापला.



🔰राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 73 वी पुण्यतिथी साजरी होत असून जगभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या राष्ट्रपित्याच्या आठवणी आज जागवल्या जात आहेत.


🔰राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 73 वी पुण्यतिथी साजरी होत असून जगभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या राष्ट्रपित्याच्या आठवणी आज जागवल्या जात आहेत.


🔰दशाच्या चलनी नोटांवर फोटो असण्याचा मान स्वातंत्र्य संग्रामातील एकमेव नेत्याला मिळाला आहे. तो म्हणजे महात्मा गांधी यांना. सर्वप्रथम 1969 मध्ये देशाच्या चलनी नोटांवर गांधींजींचा फोटो दिसून आला.


🔰भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं, पण देश 26 जानेवारी 1950 ला प्रजासत्ताक झाला. या दरम्यान भारतीय रिझर्व्ह बँकेने सध्या प्रचलित असणाऱ्या नोटा प्रसिद्ध करायला सुरुवात केली


🔰महात्मा गांधींच्या 100 व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने 1969 मध्ये पहिल्यांदा चलनी नोटेवर महात्मा गांधीजींचा फोटो छापण्यात आला. यामधले गांधीजी बसलेले होते आणि मागे सेवाग्राम आश्रम होता.


🔰दशाच्या अर्थव्यवस्थेचा झपाट्याने विस्तार होत होता आणि लोकांची खरेदी क्षमता वाढत होती. म्हणून रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबर 1987 मध्ये पहिल्यांदाच 500 च्या नोटा चलनात आणल्या आणि यावरही महात्मा गांधींचं छायाचित्र होतं. अशोक स्तंभ वॉटरमार्कमध्ये होता.

चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे


प्रश्न२०१) कोणत्या नदीवर पहिल्यांदाच ‘यंग रीडर्स बोट लायब्ररी’ नावाचे तरंगते ग्रंथालय उभारले गेले आहे?

उत्तर :-  हुगळी नदी


प्रश्न२०२) कोणती आकाशगंगा “लॉस्ट गॅलक्सी” म्हणून ओळखली जाते?

उत्तर :- एनजीसी 4535


प्रश्न२०३) कोणत्या संस्थेने अंदमानमध्ये सेवेत आणलेली विजेरी बस विकसित केली आहे?

उत्तर :- NTPC विद्युत व्यापार निगम लिमिटेड


प्रश्न२०४) कोणते देशातच विकसित करण्यात आलेले भारताचे पहिले लढाऊ-बॉम्बर विमान आहे?

उत्तर :- HAL HF-24 मारुत


प्रश्न२०५) कोणत्या संस्थेने “बर्ड्स ऑफ द सुंदरबन बायोस्फीअर रिझर्व” या शीर्षकाखाली एक पुस्तिका प्रसिद्ध केली?

उत्तर :- भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण विभाग


प्रश्न२०६) कोणत्या व्यक्तीला विशिष्ट सेवेसाठी ‘राष्ट्रपती तटरक्षक पदक 2021’ देण्यात आले?

उत्तर :- IG देव राज शर्मा


प्रश्न२०७) कोणत्या मंत्रालयाने ‘राष्ट्रीय खाद्यतेल अभियान’ आखण्याचा प्रस्ताव दिला आहे?

उत्तर :- कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय


प्रश्न२०८) कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय मतदार दिन’ साजरा करतात?

उत्तर :- 25 जानेवारी


प्रश्न२०९) कोणत्या मंत्रालयाने ‘भारत पर्व’ कार्यक्रमाचे आयोजन केले?

उत्तर :-  पर्यटन मंत्रालय


प्रश्न२१०) कोणत्या व्यक्तीला 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘इंडियन पर्सनॅलिटी ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?

उत्तर :- बिश्वजित चटर्जी

महत्त्वाच्या म्हणी व अर्थ



चढेल तो पडेल------

उत्कर्षासाठी धडपडणाऱ्या माणसाला अपयश आले तरी त्यात कमीपणा नाही



चमत्काराशिवाय नमस्कार नाही आणि पराक्रमाशिवाय पोवाडा नाही------

काही विशेष कार्य केल्याशिवाय लोक मान देत नाहीत



चांभाराच्या देवाला खेटराची पूजा------

जशास तसे या न्यायाने वागणे चांगले



चार आण्याची कोंबडी अन् बाराण्याचा मसाला------

क्षुल्लक गोष्टीला अधिक खर्च



चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे------

प्रत्येकाला अधिकार गाजविण्याची संधी आयुष्यात मिळतेच



चालत्या गाडीला खीळ घालणे------

व्यवस्थित चालणाऱ्या कार्यात अडचणी निर्माण करणे



चिंती परा ते ये‌ई घरा------

दुसर्‍याचे वाईट चिंतीत राहिले की ते आपल्यावरच उलटते



चोर तो चोर वर शिरजोर------

गुन्हा करुन वर मुजोरी



चोर सोडून संन्याशाला फाशी------

खरा गुन्हेगार न पकडता आणि त्याला शिक्षा न देता निरपराध माणसाला शिक्षा होणे



चोराच्या उलट्या बोंबा------

स्वतःच गुन्हा करुन दुसर्‍याच्या नावाने ओरडणे



चोराच्या मनात चांदणे------

वाईट कृत्य करणाऱ्याला ते उघडकीस येईल की काय याची सतत भीती वाटणे



चोराच्या वाटा चोरालाच ठाऊक------

वाईट माणसांनाच वाईट माणसाची लक्षणे कळतात



चोराच्या हातची लंगोटी------

ज्यांच्याकडून काही मिळायची आशा नाही त्याच्याकडून थोडेसे मिळणे हेच नशीब



चोराला सुटका आणि गावाला फटका------

चोर सोडून निरपराधी माणसाला पकडणे



चोरावर मोर------

एकापेक्षा एक सवाई



चोरीचा मामला हळू हळू बोंबला------

पापकर्म केल्यामुळे आपत्ती आली किंवा हानी झाली तरी न ओरडता निपटून घ्यायचे असते.

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...