Saturday, 30 January 2021

Online Test Series

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना



◾️भारतात रेलवे सुरु करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली?

- लॉर्ड हार्डींग्ज पहिला


◾️इग्रजी भाषेत सुरु करण्यात आलेले मुंबईतिल प्रथम वृत्तपत्र कोणते?

- बॉम्बे हेराॅल्ड.


◾️भारतातील पहिली जातीय संघटना कोणती?

- मुस्लिम लीग


◾️ टिपू सुलतानाने कोणत्या लढाईत इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम रॉकेट चा वापर केला?

- 1780 ची पाल्लुतुरची लढाई 


◾️भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी?

- लॉर्ड कॅनिंग 


◾️ निळीचा उठाव हा सर्वप्रथम कोठे घडून आला?

- बंगाल प्रांतात


◾️1858च्या कायद्यान्वये नियुक्त झालेला पहिला भारतमंत्री?

- लॉर्ड स्टैनले


◾️1857च्या उठावाची पहिली ठिणगी ही सर्वप्रथम कोणत्या रेजिमेंटमध्ये पेटली?

- 34वी एन. आय. रजिमेंट 


◾️इग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करुन देणारे प्रथम कॉलेज कोणते?

- कलकत्ता विद्यालय

भारत आणि शाश्वत विकास उद्दिष्टे



🌻सर्वेक्षणात नमूद केले आहे की एसडीजींना सरकारच्या धोरण, योजना आणि कार्यक्रमांमध्ये मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भारताने अनेक सक्रिय पावले उचलली आहेत.


🌻कोविड -19 महामारीच्या अभूतपूर्व संकटामुळे उद्भवलेल्या आव्हानांचा उल्लेख या सर्वेक्षणात आहे. तसेच  शाश्वत विकास हा भारतीय विकास रणनीतीमधील गाभा असल्याचे यात म्हटले आहे.


🌷हवामान बदल🌷


🌻आर्थिक सर्वेक्षणानुसार भारत हा अनेक सक्रिय हवामानविषयक उपक्रम राबवित आहे.


🌻 तयात हवामान बदलावरील राष्ट्रीय कृती योजना (एनएपीसीसी), जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय सौर अभियान (जेएनएनएसएम), हवामान बदल कृती योजना (सीसीएपी), हवामान बदलावरील राष्ट्रीय अनुकूलन निधी तसेच भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर आणि उत्पादनासाठी त्वरित अंमलबजावणी यासारख्या सरकारच्या महत्वाकांक्षी उपक्रमांचा उल्लेख करण्यात आला आहे. 


🌹शाश्वत हवामान वित्तपुरवठा


🌻समाज कल्याणकारी उद्दीष्ट साकार करण्यासाठी कार्यरत असलेल्या सामाजिक उपक्रमांद्वारे भांडवल उभारण्यासाठी सेबीच्या नियामक तत्वाखाली भारत एक सामाजिक शेअर बाजार (एसएसई) उभारण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.


🌻या सर्वेक्षणात चीननंतर उभरत्या बाजारात भारत दुसर्‍या क्रमांकाचा हरित बॉन्ड मार्केट असल्याचे नमूद केले आहे. 2017 मध्ये, भारतातील ग्रीन बॉन्ड्सच्या चलनास पाठबळ देण्यासाठी सेबीने भारतीय शेअर बाजारात हरित बॉन्डच्या यादीसह हरित बाँडसंदर्भातील मार्गदर्शक सूचना जारी केली. 24 डिसेंबर 2020 पर्यंत भारतात आठ ईएसजी म्युच्युअल फंड सुरू झाले आहेत.


🌷आतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा पुढाकार


🌻विकासाचे शाश्वत मॉडेल विकसित करण्यासाठी आणि आपत्ती निवारक पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जागतिक स्तरावर भारताने घेतलेल्या पुढाकारांचा सर्वेक्षणात उल्लेख आहे.


🌻1. आंतरराष्ट्रीय सौर युती (आयएसए) ने नुकतीच जागतिक स्तरावर सौर ऊर्जा क्रांती घडवून आणण्यासाठी ‘वर्ल्ड सोलर बँक’ आणि ‘वन सन वन वर्ल्ड वन ग्रिड इनिशिएटिव्ह’ या दोन नवीन उपक्रमांची सुरूवात केली आहे. 


🌻आयएसए सचिवालयानं नुकतीच जागतिक सार्वजनिक आणि खासगी कंपन्यांचा समावेश असलेल्या ‘शाश्वत हवामान उपक्रमांसाठी युती’ सुरू केली आहे.


🌻 सदर देशांना कला आणि अद्ययावत सौर तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करण्याच्या उद्देशाने सप्टेंबर 2020 मध्ये त्यांनी प्रथम जागतिक सौर तंत्रज्ञान परिषदेचे (डब्ल्यूएसटीएस) आयोजन केले होते.


🌻2. आपत्ती निवारण पायाभूत सुविधांसाठी युती: राष्ट्रीय सरकारद्वारे सर्वसमावेशक बहु-भागधारक व्यासपीठ म्हणून युती कार्य करते, जिथे आपत्ती निवारणाच्या पायाभूत सुविधांचे विविध पैलू जाणून घेऊन त्यांची देवाणघेवाण केली जाते.


🌷 सीडीआरआय ऊर्जा आणि वाहतूक क्षेत्राची लवचीकता वाढविण्यावर काम करीत असून सर्व खंडातील देश आणि विविध स्तरातील विकास आणि जोखीम यात या देशांना समाविष्ट करण्यासाठी आपली सदस्यता वाढविण्याच्या विचारात आहे.


महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट



१) पहिली 

- 17 फेब्रुवारी ते 8 जून 1980 

- राज्यपाल -: सादिक अली 

- राष्ट्रपती -: नीलम संजीव रेड्डी 


२) दुसरी 

- 28 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर 2014

- राज्यपाल -: सी विद्यासागर राव 

- राष्ट्रपती -: प्रणव मुखर्जी 

- एकूण 32 दिवस राजवट लागू होती


3) तिसरी 

- 12 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर 2019 

- राज्यपाल -: भगतसिंग कोशारी 

- राष्ट्रपती -: रामनाथ कोविंद 

- एकूण 12 दिवस राजवट लागू होती 


🔰 सर्वाधिक वेळा मणिपूर मध्ये राजवट लागू 

🔰 छत्तीसगड व तेलंगणा मध्ये एकदाही लागू नाही . 


15 वा वित्त आयोग



अध्यक्ष:एन के सिंग, =  सचिव: अरविंद मेहता 

स्थापना:नोव्हेंबर 2017 =अहवाल : नोव्हेंबर 19

 


» मुख्य शिफारस - राज्यांचा वाटा 42% वरून 41 % करावा


» करातील वाट्यानुसार राज्ये 

१. उत्तरप्रदेश - 17.9%

२. बिहार 10%

३. मध्यप्रदेश 7.9

४. पश्चिम बंगाल 7.5

५. महाराष्ट्र - 6.1( 5.5 वरून 6.1) (0.6 ची वाढ झाली )


» सर्वात शेवटचे राज्य - सिक्कीम - 0.388


» करातील वाटा ठरवण्यासाठी खालील आधार ठरवण्यात आले

१. लोकसंख्या : 15%

२. क्षेत्रफळ     : 15%

३. वने आणि पर्यावरण : 10%

४. उत्पन्न तफावत : 45 %

५. लोकसंख्या कामगिरी : 12.5%

६. कर प्रयत्न : 2.5 %

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...