Friday, 22 January 2021

पाबना शेतकरी विद्रोह 1873-76


★ 1850/1859 च्या कायद्याने शेतकर्यांंना संरक्षण दिले मात्र कंपनी सरकारने अन्याय करण्यास सुरुवात केली


★ 1873 च्या दरम्यान या अन्यायाविरुद्ध "युसूफ सराय" च्या शेतकर्यांनी "क्रुषक संघ" स्थापन केला 


🔸परमुख नेता:- ईशान चन्द्र राय, शंभुपाल


★ कालांतराने हा विद्रोह ढाका, त्रिपूरा, बेकरगंज, फरिदपूर, बोगरा, मेमनसिंह येथे झाले


★ दरम्यान पबनाच्या नागरिकांनी घोषणा केली, " आम्ही फक्त महाराणीची जनता होऊ इच्छितो"



★ समर्थन:- बंकिमचन्द्र चट्टोपाध्याय,  आर.सी. दत्त,  सुरेन्द्रनाथ बनर्जी, आनंद मोहन बोस, द्वारका नाथ गांगुली यांनी पुढील काळात समर्थन केले


महाराष्ट्रातील विद्युत प्रकल्प आणि जिल्हे



महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प  


▪️ तर्भ-मुंबई, खापरखेडा : नागपूर.

▪️बल्लारपूर : चंद्रपूर.

▪️ चोला : ठाणे.

▪️ परळी बैजनाथ : बीड.

▪️ पारस : अकोला.

▪️ एकलहरे : नाशिक.

▪️ फकरी : जळगाव.


महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प


▪️ खोपोली : रायगड.

▪️ भिरा अवजल प्रवाह : रायगड.

▪️ कोयना : सातारा.

▪️ तिल्लारी : कोल्हापूर.

▪️ पच : नागपूर.

▪️ जायकवाडी . औरंगाबाद.


महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प 


▪️ तारापुर : ठाणे.

▪️ जतापुर : रत्नागिरी.

▪️ उमरेड : नागपूर.


महाराष्ट्रातील पवनविद्युत प्रकल्प 


▪️ जमसांडे : सिंधुदुर्ग.

▪️ चाळकेवाडी : सातारा.

▪️ ठोसेघर : सातारा.

▪️ वनकुसवडे : सातारा.

▪️ बरह्मनवेल : धुळे.

▪️ शाहजापूर : अहमदनगर.

Current affairs 2020



 वन संशोधन संस्था कोठे आहे?

(अ) लखनऊ

(ब) नवी दिल्ली 

(क) देहरादून ✔️✔️

(ड) भोपाळ


:केंद्रीय भूकंपीय वेधशाळा कोठे आहे?

(अ) पुणे

 (ब) सिलीगुडी

(क) कोडाईकनाल ✔️✔️

(ड) शिलाँग


शुष्क प्रादेशिक वनीकरण संशोधन संस्था आहे?


(अ) आसाम 

(ब) महाराष्ट्र 

(क) जोधपूर ✔️✔️

(ड) जैसलमेर


राष्ट्रीय संग्रहालय कोठे आहे?

(अ) नवी दिल्ली

(ब) मदुरै 

(क) मुंबई 

(ड) कोलकाता✔️✔️


कमी तापमानात औष्णिक पृथक्करण करण्याच्या तत्त्वावर आधारित, दररोज एक लाख लिटर गोड्या पाण्याचे उत्पादन करणार्‍या प्रथम डिझलिनेशन प्लांटची सुरूवात कोठे झाली?

(अ) कवारत्ती✔️✔️

(ब) पोर्ट ब्लेअर

(क) मंगलोर 

(ड) वलसाड


वाणिज्य विभागांतर्गत खालीलपैकी कोणते सर्वात जुने बोर्ड आहे?

(अ) रबर बोर्ड 

(ब) चहा बोर्ड 

(क) कॉफी बोर्ड ✔️✔️

(ड) तंबाखू बोर्ड


भारतातील उच्च शिक्षणाच्या प्रगतीसाठी 'UGC' ची स्थापना कधी करण्यात आली?

(अ)  1953 ✔️✔️

 (ब) 1954 

(क) 1951 

 (ड) 1967


 ● कोणती लेणी महाराष्ट्र राज्यातल्या उस्मानाबाद शहरापासून 7 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या 7 लेण्यांचा समूह आहे.

 : धाराशिव लेणी


● तमिळनाडूमध्ये साजरा होणार्‍या कोणत्या सणाच्या कालावधीत जल्लीकट्टू हा पारंपरिक खेळ खेळण्याची प्रथा सहस्रो वर्षांपासून चालू आहे.

 : पोंगल


● विजेरी मोटार वाहन निर्मिती करणाऱ्या ‘टेस्ला’ कंपनीचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?

 : कॅलिफोर्निया


● ‘सेमेरू ज्वालामुखी’ कोणत्या देशात आहे?

*उत्तर* : इंडोनेशिया


● बसवाकल्याण येथे ‘न्यू अनुभवा मंतपा’ कोणत्या कवीच्या स्मृतीत उभारले जात आहे?

 : बसवेश्वरा उर्फ बसवा


● ‘नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन’ नामक संकेतस्थळ-आधारित व्यासपीठ कोणत्या संस्थेने तयार केले?

: नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन-इंडिया


● ‘हरिके आर्द्रभूमी’ हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

 : पंजाब


● ‘फुरफुरा’ तीर्थक्षेत्र कोणत्या राज्यात आहे?

 : पश्चिम बंगाल

राष्ट्र आणि राज्य या भिन्न संकल्पना :-



🏅राज्यराष्ट्र आणि सांस्कृतिक राष्ट्र या संकल्पनांच्या दृष्टीने या पुस्तकात भारताच्या स्वातंत्र्योत्तर पन्नास वर्षांचा आढावा घेतला आहे.


🏅 तयामुळे राज्य, राष्ट्र, राज्यराष्ट्र व सांस्कृतिक राष्ट्र या संकल्पनांचा नेमका अर्थ काय आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. राज्य आणि राष्ट्र या दोन शब्दांच्या अर्थांमध्ये अनेकवेळा गल्लत होते.


🏅 पाश्चिमात्य विचारवंतांनी या विषयावर बरीच चर्चा करूनही बहुतांश वेळा या शब्दांना समान अर्थाने मानले गेले. 



🏅राज्य म्हणजे असे प्रदेश किंवा देश ज्यांच्यावर एक शासनव्यवस्था आहे. वेगवेगळे देश, वसाहती किंवा प्रदेशांमध्ये एक समान शासनव्यवस्था असेल तर ते सर्व मिळून एक राज्य बनेल. 


🏅जथील लोक काही समान ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक वैशिष्ट्यांनी एकत्र आलेले असतात व त्यांच्यामध्ये एक बांधिलकीची भावना असते. त्यास राष्ट्र म्हणतात.



🏅जव्हा आपण पाश्चिमात्य राष्ट्रे (Western Nations), किंवा आफ्रिकन राष्ट्रे (African Nations) म्हणतो, तेव्हा ते राष्ट्र नसून राज्य असते. 


🏅सयुक्त राष्ट्रे (United Nations) ही संघटना राष्ट्रांची नाही तर ‘राष्ट्रराज्यांची' (Nation States) संघटना आहे. 

इराण सहीत इतर सहा राष्ट्रांनी UNGA मधला मतदानाचा हक्क गमावला.


☑️इराण सहीत इतर सहा राष्ट्रांनी त्यांच्या जबाबदाऱ्यांची काळजी न घेतल्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघ महासभेतला (UNGA) त्यांचा मतदानाचा हक्क गमावला आहे.


☑️इतर सह देशांमध्ये नायजर, दक्षिण सुदान, झिम्बाब्वे, कांगो ब्राझाव्हिल, मध्य आफ्रिला प्रजासत्ताक आणि लिबिया यांचा समावेश आहे. या देशांना दोन वर्षाची अतिरिक्त मुदत दिली गेली आहे.


☑️सयुक्त राष्ट्रसंघ (UN) संहिता यामधील ‘कलम 19’ अन्वये सदस्याला मतदानाचा हक्क असू शकत नाही जर त्याने संयुक्त राष्ट्रसंघाला करावयाच्या त्याच्या आर्थिक वचनबद्धतेची पूर्तता केली नसणार.


🔳सयुक्त राष्ट्रसंघ (UN) विषयी....


☑️आतरराष्ट्रीय सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) या आंतरसरकारी संघटनेची स्थापना दुसर्‍या महायुद्धानंतर 24 ऑक्टोबर 1945 रोजी करण्यात आली. त्याचे मुख्यालय मॅनहॅटन (न्यूयॉर्क शहर, अमेरिका) येथे आहे.


☑️1945 साली UN सनद (UNO च्या स्थापनेचे दस्तऐवज) प्रभावी येऊन दिनांक 24 ऑक्टोबर 1945 रोजी संयुक्त राष्ट्रसंघ (UN) अस्तित्वात आले. त्याला संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे (UNSC) पाच कायमस्वरूपी सदस्य - चीन, फ्रान्स, रशिया, ब्रिटन आणि अमेरिका - आणि इतर सदस्यांनी मान्यता दिली. आज संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य राष्ट्रांची संख्या 193 एवढी आहे.


☑️सघटनेच्या उद्दिष्टांमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखणे, मानवी हक्कांना प्रोत्साहन देणे, सामाजिक आणि आर्थिक विकासाचे वृद्धीकरण, पर्यावरणाचे संरक्षण आणि दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, आणि सशस्त्र संघर्ष अश्या घटनांमध्ये मानवतावादी मदत प्रदान करणे या बाबींचा समावेश आहे.


☑️सयुक्त राष्ट्रसंघ महासभा (UNGA) हे संयुक्त राष्ट्रसंघामधील सहा प्रमुख अंगांपैकी एक आहे, ज्यामध्ये सर्व सदस्य राष्ट्रांना समान प्रतिनिधित्व बहाल केले गेले आहे आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्य धोरणात्मक, धोरणनिर्धारक आणि प्रतिनिधींचे अंग आहे.


☑️UN च्या सनदने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेला (UNSC) आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता राखण्यासाठी सामूहिक कृती करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे आणि अधिकार दिला आहे.


☑️सयुक्त राष्ट्रसंघाच्या 5 अधिकृत भाषा आहेत, त्या म्हणजे - अरबी, चीनी, इंग्रजी, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश.


☑️सयुक्त राष्ट्रसंघाचे सर्वात प्रमुख अधिकारी पद‘सरचिटणीस’ (Secretary‑General) हे असून वर्तमानात हे पद पोर्तुगालचे अँटोनियो गुटेरेस यांच्याकडे आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाचे सहा प्रमुख स्तंभ पुढीलप्रमाणे आहेत -


◾️UN महासभा (General Assembly)


◾️UN सुरक्षा परिषद (Security Council)


◾️UN आर्थिक आणि सामाजिक परिषद (Economic and Social Council ­ECOSOC)


◾️UN सचिवालय


◾️UN आंतरराष्ट्रीय न्यायालय (International Court of Justice) आणि


◾️UN विश्वस्त परिषद (United Nations Trusteeship Council) (1994 सालापासून निष्क्रिय आहे).


🟥सयुक्त राष्ट्रसंघाच्या प्रणालीमध्ये समाविष्ट असलेल्या संस्था पुढीलप्रमाणे आहेत -


◾️जागतिक बँक समूह

जागतिक आरोग्य संघटना (WHO)

जागतिक अन्न कार्यक्रम (World Food Program)


◾️सयुक्त राष्ट्रसंघ शिक्षण, वैज्ञानिक आणि सांस्कृतीक संघटना (United Nations Educational, Scientific and Cultural Organization –UNESCO)


◾️सयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (United Nations Children's Fund –UNICEF)

पर्यावरण जागरूकता-महत्वपूर्ण प्रश्नोत्तरे

  (Environment Awareness- Important questions)



१) भोपाळ येथील युनियन कार्बाईड कारखान्यातून------ वायूची गळती झाली होती

अ)  क्लोरीन                                

ब) कार्बन मोनॉक्साईड

क) मिथाईल आयसोसायनेट √                           

ड) नायट्रोजन ऑक्साईड


२) नर्मदा नदीवरील सरदार सरोवर प्रकल्प -----------राज्यात आहे .

अ) महाराष्ट्र                              

ब) आंध्र प्रदेश

क)  कर्नाटक                               

 ड) गुजरात   √


३) हवेत नायट्रोजनचे प्रमाण -------आहे.

 अ) 20•99%                                           

ब) 78•03%   √

क) 0•94%                                               

ड) 0•03℅


४) मानवाच्या शरीरामध्ये----- चे प्रमाण अधिक असते.

अ) ऑक्सिजन                     

ब) नायट्रोजन

क)  हायड्रोजन    √                  

क) कार्बन


५) नवेगाव राष्ट्रीय उद्यान------- ठिकाणी आहे .

अ) नागपूर                                      

ब) चंद्रपूर

क)भंडारा      √                                 

ड) कोल्हापूर


६). भारतामध्ये-------- ही नैसर्गिक आपत्ती अधिक येते .

अ ) चक्रीवादळ                        

 ब) भूकंप

क)   पूर          √             

 ड) वनवा


७) जागतिक वन दिन केव्हा साजरा केला जातो?

अ) 16 सप्टेंबर                                         

ब) 22 एप्रिल

क) 21 मार्च       √                                   

ड) 7 एप्रिल


८) भारतामध्ये ऊर्जेच्या आवश्यकतेसाठी जीवाष्म इंधन नंतर योगदान देणारा महत्त्वपूर्ण स्त्रोत कोणता ?

अ) सौर ऊर्जा          √                                

ब) आण्विक उर्जा

क)  जल विद्युत ऊर्जा                                  

ड) पवन ऊर्जा


९)----- हा वन्य प्राणी विसाव्या शतकाच्या मध्यात भारतातून नामशेष झाला. 

अ)  गंगेतील डॉल्फिन                                           

ब) महाकाय पांडा

क) दोन शिंगी भारतीय गेंडा     √                                  

ड) चित्ता


१०) जैविक कचऱ्यापासून होणारी गांडूळ खताची निर्मिती प्रामुख्याने यांच्यामुळे होते-

अ) कवके                                 

ब) कीटक

क) कृमी          √                               

ड) बॅक्टेरिया


नीति आयोगाने दुसरा इंडिया इनोव्हेशन अहवाल २०२० प्रसिद्ध केला



🔝 २०२० इंडिया इनोव्हेशन अहवालात मोठ्या राज्यात कर्नाटकने सलग दुसऱ्या वर्षी अव्वल क्रमांक पटकावला


 ०१) कर्नाटक : ४२.५० गुण 

 ०२) महाराष्ट्र : ३८.०३ गुण

 ०३) तमिळनाडू : ३७.९१ गुण 

 ०४) तेलंगणा : ३३.२३ गुण 

 ०५) केरळ : ३०.५८ गुण

 ०६) हरयाणा : २५.८१ गुण 

 ०७) आंध्रप्रदेश : २४.९१ गुण

 ०८) गुजरात : २३.६३ गुण 

 ०९) उत्तर प्रदेश : २२.८५ गुण

 १०) पंजाब : २२.५४ गुण 

 ११) पश्चिम बंगाल : २१.६९ गुण 

 १२) राजस्थान : २०.८३ गुण 

 १३) मध्य प्रदेश : २०.८३ गुण  

 १४) ओडिशा : १८.९४ गुण 

 १५) झारखंड : १७.१२ गुण

 १६) छत्तीसगड : १५.७७ गुण 

 १७) बिहार : १४.४८ गुण .


 ▪️२०२० इंडिया इनोव्हेशन अहवालात मोठ्या राज्यात बिहार १४.४८ गुणासह शेवटच्या क्रमांकावर आहे .

बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच पंतप्रधान मोदींनी केलं ट्विट; म्हणाले.



🎲जो बायडेन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची बुधवारी सूत्रं स्वीकारली. अमेरिकेत झालेल्या सत्तांतराचं देशभरातून स्वागत करण्यात आलं. विविध देशांच्या प्रमुखांनी बायडेन यांचं अभिनंदन केलं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही बायडेन यांनी शपथ घेतल्यानंतर ट्विट करत त्यांचं अभिनंदन केलं.


🎲बायडेन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी ट्विट केलं. बायडेन यांचं अभिनंदन करतानाच मोदी म्हणाले,”भारत-अमेरिकेतील संबंध समान मूल्यांवर आधारित आहे. आपल्याकडे भरीव असा बहुअंगी द्विपक्षीय अजेंडा आहे. जो आर्थिक गुंतवणुकीबरोबरच उत्साही लोकांसोबतचे संबंध वृद्धिंगत करत आहे. भारत-अमेरिकेतील भागीदारी नव्या उंचीवर नेण्यासाठी बायडेन यांच्यासोबत काम करण्यास कटिबद्ध आहे,” असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.


🎲“अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारल्याबद्दल मी जो बायडेन यांचं अभिनंदन करतो. भारत-अमेरिका यांच्यातील राजनैतिक संबंध अधिक मजबूत करण्यासाठी मी बायडेन यांच्यासोबत काम करण्याची प्रतीक्षा करत आहे. अमेरिकेचं यशस्वी नेतृत्व करण्यासाठी माझ्या शुभेच्छा कारण, आपल्याला जागतिक शांतता आणि सुरक्षा पुढे नेण्यासाठी समान आव्हानांचा सामना करावा लागत आहे,” असंही मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

केंद्राचे एक पाऊल मागे.



🌇वया कृषी कायद्यांविरोधात जवळपास दोन महिन्यांपासून दिल्लीच्या वेशींवर ठाण मांडलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकारने अखेर एक पाऊल मागे घेतले. याबाबत स्वतंत्र समिती नेमून तोडगा निघेपर्यंत तिन्ही कायद्यांना दीड वर्षांसाठी स्थगिती देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने बुधवारी शेतकरी संघटनांसमोर ठेवला. तसे प्रतिज्ञापत्रही सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याची तयारी केंद्राने दर्शवली. या प्रस्तावावर गांभीर्याने विचार करणार असल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले.


🌇कद्र सरकार आणि आंदोलक शेतकरी संघटना यांच्यात बुधवारी विज्ञान भवन येथे झालेली दहावी बैठकही तोडग्याविना संपली. मात्र, केंद्राच्या नव्या प्रस्तावावर शुक्रवारी २२ जानेवारी रोजी दुपारी बारा वाजता पुन्हा बैठक होणार आहे. ‘शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या समितीचा प्रस्ताव मान्य केला तर दीड वर्षांसाठी कायद्यांना स्थगिती दिली जाऊ  शकते’, अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी बैठकीनंतर पत्रकारांना दिली.


🌇दिल्लीच्या वेशीवर सुरू असलेल्या आंदोलनाला ५६ दिवस झाले असून, केंद्राने पहिल्यांदाच कृषी कायद्यांना स्थगिती देण्याची तयारी शेतकऱ्यांच्या बैठकीत दर्शवली. ‘शेतकरी नेत्यांशी सकारात्मक आणि योग्य दिशेने चर्चा झाली असून, शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत कदाचित तोडगा निघू शकेल’, असा आशावादही तोमर यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र : पंचायत राज आणि महत्वाचे प्रश्न



1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?

*उत्तर* : स्थानिक स्वराज्य संस्था


2.  राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती?

*उत्तर* : 2 ऑक्टोबर 1953


3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली?

*उत्तर* : 16 जानेवारी 1957


4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती?

*उत्तर* : वसंतराव नाईक समिती


5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती?

*उत्तर* : 27 जून 1960


6.  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते?

*उत्तर* : महसूल मंत्री


7.  वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या?

*उत्तर* : 226


8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली?

*उत्तर* : जिल्हा परिषद


9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत?

*उत्तर* : तीन (ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद)


10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला?

*उत्तर* : 1  मे 1962