२० जानेवारी २०२१

Online Test Series

'पट्टचित्र' ही ओडिशाची सर्वात जुनी कला रघुराजपूरात जपली जात आहे


🔶ओडिशाची सर्वात जुन्या कलाप्रकारांपैकी एक असलेली 'पट्टचित्र' ही चित्रकला रघुराजपूरा या खेड्यात जपण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. या प्रयत्नांमुळे, रघुराजपूरा भारतातले पहिले वारसा गाव ठरते.


🔴'पट्टचित्र' कलेविषयी


🔶‘पट्टचित्र’ ही चित्रकला शैली ओडिशाच्या सर्वात जुन्या आणि लोकप्रिय कला प्रकारांपैकी एक आहे.


🔶‘पट्ट’ हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ ‘तैलचित्र तयार करण्यासाठी चित्रकार वापरतात ते कापड’ (कॅनव्हास) असा होतो.


🔶कापडावर चित्र तयार करण्यासाठी अनेक रंगांचा वापर केला जातो, ज्यात सामान्यत: पांढरा, लाल, पिवळा आणि काळा ही रंग असतात.


🔶चित्र काढण्यापूर्वी कापड एका प्रक्रियेमधून जाते, त्यासाठी पारंपारिक प्रक्रियेचा अवलंब केला जातो. प्रथम, चुन्याची बारीक भुकटी आणि चिंचेच्या बियापासून बनवलेला गोंद यांचा लेप कापडावर लावून चित्रासाठी पृष्ठभुमी तयार केली जाते. चित्राची सीमा प्रथम पूर्ण करण्याची परंपरा आहे. त्यानंतर कलाकार हलका लाल आणि पिवळा रंग वापरुन थेट ब्रशने एक खडबडीत रेखाकृती तयार करण्यास सुरवात करतो.

आदर्शगाव संकल्प व प्रकल्प


✍️“लोकसहभागातून ग्रामविकास व लोक कार्यक्रमांत शासनाचा सहभाग” या संकल्पनेवर आधारित असलेली आदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना कार्यक्रम हा एक गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आदर्शवत उपक्रम आहे.

ही योजना ऑगस्ट क्रांती दिनाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सन 1992 पासून कृषि विभागामार्फत सुरु करण्यात आलेली आहे.


🌸योजनेचा उद्देश👇👇



✍️गाभा व बिगरगाभा क्षेत्राचा विकास आणि चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, नसबंदी, नशाबंदी, निर्मलग्राम, (लोटाबंदी) बोअरवेल बंदी व श्रमदान या सप्तसुत्रीचे पालन गावाने व ग्रामसभेने निवडलेल्या स्वंयसेवी संस्थेच्या माध्यमातून करणे हा योजनेचा उददेश आहे.


🌸गाव निवडीचे निकष👇👇



✍️गावाच्या एकूण क्षेत्रापैकी सर्व प्रकारे मिळून 30 टक्कयांहून अधिक सिंचन क्षेत्र नसावे. गावाची लोकसंख्या 4,000 च्या आत असावी. गावाचे महसुली क्षेत्र 1,500 हेक्टरपर्यंत असावे. गट ग्रामपंचायतीअंतर्गत स्वतंत्र वाडी/ वस्तीस सहभागी होता येते. ग्रामविकास निधी उभारुन तो चालविण्यासाठी ग्रामस्थांची तयारी असणे आवश्यक आहे. सप्तसुत्रीचे पालन करण्याची ग्रामस्थांची तयारी हवी. विविध ग्राम अभियानांत ( उदा.संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता, निर्मलग्राम, तंटामुक्ती आदी.) पुरस्कार प्राप्त गावे.


🌸सस्था निवडीचे निकष👇👇


✍️गावातील संस्थेला प्रथम प्राधान्य देण्यात यावे. गावात संस्था नसेल, तर त्या तालुक्यातील 25 किलोमीटरच्या आतील गावातील जवळच्या संस्थेला प्राधान्य देण्यात यावे. ही संस्था शक्यतो जिल्हयातील असावी. या संस्थेची नोंदणी धर्मादाय आयुक्तांकडे केलेली असावी. संस्थेची वार्षिक उलाढाल रु. 3 लाखांपेक्षा कमी असू नये. संस्थेचा तीन वर्षाचा लेखापरीक्षण अहवाल सादर करणे आवश्यक. संस्था फॅमिली ट्रस्ट नसावी. तसेच घटना सादर करणे आवश्यक.


🌸लाभार्थी निवड प्रक्रिया👇👇



✍️योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय तसेच जिल्हा, तालुका व ग्रामस्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या आहेत. राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष मा.मंत्री, जलसंधारण असून सदस्य सचिव संचालक (मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन ) हे आहेत. राज्यस्तरीय कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा कार्यध्यक्ष श्री. पोपटराव पवार असून, सदस्य सचिव संचालक मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन हे आहेत. जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी असून, सदस्य सचिव म्हणून जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हे आहेत. तालुका स्तरीय समितीचे अध्यक्ष गटविकास अधिकारी असून, सदस्य सचिव तालुका कृषि अधिकारी आहेत. ग्रामस्तरीय समितीचे अध्यक्ष ग्रामसभेने निवडलेली व्यक्ती असते व त्याचे सदस्य सचिव कृषि सहायक आहेत.


✍️वर नमूद केलेल्या संस्थेच्या तपशिलासह ग्रामसभेने शिफारस केलेल्या गावांची निकषांनुसार छाननी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे अध्यक्ष असलेल्या जिल्हा समितीमार्फत करण्यात येईल. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी हे या समितीचे सदस्य सचिव आहेत. जिल्हा समिती छाननीनंतर सहभागी होणाऱ्या प्रत्येक गावाचा वस्तुनिष्ठ अहवाल शिफारशीसह राज्यस्तरीय कार्यकारी समितीला सादर करेल.


✍️ही समिती संबंधीत गावांची प्रत्यक्ष तपासणी करुन गावे व प्रकल्प कार्यान्वयीन संस्थेची प्राथमिक निवड करेल. योजनेमध्ये गावाची प्राथमिक निवड झाल्यावर पहिले सहा महिने पूर्वतयारी कालावधी राहील. या कालावधीत गावाने काही कामे पूर्ण करायची आहेत. 

मृद संधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापनाचे काम गाभा क्षेत्र विकासाचे काम म्हणून संबोधण्यात येते. यात मृद संधारण, सामाजिक वनीकरण,वन खाते, भूजल सर्वेक्षण व लघुपाटबंधारे या विभागांच्या कामांचा समावेश आहे.


🌸अर्थसाहाय्य व समाविष्ट जिल्हे👇👇


निवड होणाऱ्या गावांसाठी पाणलोट विकास कामे, सामूहिक संघटन, प्रशिक्षण, प्रशासकीय खर्च इ. अनुज्ञेय बाबींसाठी केंद्र शासनाच्या समाईक मार्गदर्शक सूचना 2008 नुसार हेक्टरी रु. 12 हजार प्रमाणे निधी मंजूर करण्यात येईल.

WTC : ऑस्ट्रेलियाला खाली खेचत भारत अव्वल स्थानावर



🔶World Test Championship : ब्रिस्बेन कसोटी सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा तीन गड्यांनी पराभव करत बॉर्डर गावसकर कसोटी मालिका २-१ नं खिशात घातली आहे. या ऐतिहासिक विजयासह भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. कसोटी मालिकाते पराभव स्विकारावा लागल्यानंतर गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाची घसरण झाली आहे.


🔶बरिस्बेन कसोटी सामन्यानंतर आयसीसीनं कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचं गुण आणि क्रमवारी जारी केली आहे. त्यानुसार भारतीय संघ अव्वल स्थानावर पोहचला आहे. तर पहिल्या क्रमांकावर असणारा ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.


🔶 आतापर्यंत भारतीय संघानं पाच कसोटी मालिकेत ९ विजय आणि तीन पराभव स्वीकारलं आहेत. तर एक सामना अनिर्णित राखला आहे. त्यामळे भारतीय संघाच्या नावावर ४३० गुण असून विजयाची टक्केवारी ७१.७ इतकी आहे.


🔶दसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यूझीलंड संघानेही पाच कसोटी मालिका खेळल्या आहेत. न्यूझीलंडला सात सामन्यात विजय तर चार सामन्यात पराभव स्वीकारावा लागाल आहे.


🔶 नयूझीलंडच्या विजयाची टक्केवारी ७० इतकी आहे. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियानं ८ सामन्यात विजय तर ४ सामन्यात पराभव स्विकारावा लागाला आहे. ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी ६९ इतकी आहे.


🔶जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये या तीन संघामध्ये पहिल्या दोन संघामध्ये स्थान मिळवण्याची टक्कर आहे.

भारतीय कुशल कामगारांना जपानमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी जपान सरकार सोबत करार

 

🔶भारतीय कुशल कामगारांना जपानमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी भारत सरकारचा जपान सरकार सोबत सहकार करार झाला आहे.


🔶कराराच्या अंतर्गत कामगारांच्या संबंधित यंत्रणेच्या योग्य संचालनासाठी भागीदारीकरिता एक मूलभूत कार्यचौकट तयार केली जात आहे.हा करार भारतामधून जपानमध्ये कुशल कामगारांच्या चळवळीला चालना देण्यास मदत करणार आहे.


🔶कराराच्या अंतर्गत आवश्यक कौशल्य व जपानी भाषेची पात्रता चाचणी यांची पूर्तता करणारे कुशल कामगार कंत्राटी आधारावर जपानमध्ये रोजगारासाठी पात्र ठरणार. जपान अश्या कामगारांना ‘विशिष्ट कुशल कामगार’ हा दर्जा प्रदान करणार.


🔶कराराच्या अंतर्गत एकूण 14 उद्योग क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे, ज्यात परिचर्या सेवा, इमारतीची साफसफाई, सामग्री प्रक्रिया, औद्योगिक यंत्रनिर्मिती, विद्युत व इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान, बांधकाम, जहाज बांधणी व जहाज-संबंधित उद्योग, वाहन देखरेख, विमानचालन, लॉजिंग, कृषी, मत्स्यपालन, अन्न व पेय पदार्थांची निर्मिती आणि अन्नपदार्थ सेवा उद्योग समाविष्ट आहेत.


🔶जपान हा पूर्व आशियामधला एक द्वीप-देश आहे. जपानच्या पश्चिमेला जपानचा समुद्र, चीन, उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया व रशिया, उत्तरेला ओखोत्स्कचा समुद्र व दक्षिणेला पूर्व चीन समुद्र व तैवान आहेत. टोकिओ हे देशाचे राजधानी शहर आहे आणि जपानी येन हे राष्ट्रीय चलन आहे.


🔶आशिया खंडाच्या पूर्व किनाऱ्यालगत, तैवान बेट आणि कूरील बेटे यांच्या दरम्यान लहानमोठ्या बेटाच्या तीन चंद्रकोरी मालिका तयार झाल्या आहेत. 


🔶यांनाच पुष्कळ वेळा ‘तोरण बेटे’ म्हणून संबोधण्यात येते. या तोरण बेटांत चार मोठ्या व इतर 3400 बेटांचा समावेश होतो. ही सर्व बेटे मिळूनच जपान देश झाला आहे. जपानच्या अतिपूर्वेकडील स्थानामुळे जपानला “उगवत्या सूर्याचा देश” असे संबोधण्यात येते.

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...