Friday, 15 January 2021

मार्गदर्शक तत्वबाबत मते


🟡एन एम सिंघवी:-

🌀घटनेला जीवन प्रदान करणारी तरतुदी


🟡छागला:-

🌀तत्वाची पूर्ण अंमलबजावणी झाल्यास देश पृथ्वीवरील स्वर्ग बनेल


🟡बी एन राव:-

🌀ही तत्वे राज्यसंस्था च्या प्राधिकारासाठी नैतिक तत्वे आहेत.त्यांच्यात किमान शैक्षणिक मूल्य आहे


🟡क टी शहा:-

🌀ह कोऱ्या चेकप्रमाणे आहेत ज्यांची वटवणे बँकेवर अवलंबून आहे


🟡क सी व्हिएर:-

🌀धयेय आणि आकांक्षा चे घोषणापत्र आहे


🟡अनंत नारायण:-

🌀अवादयोग्य आणि अमूर्त आहेत


🟡क व्ही राव:-

🌀हतू भारताला पोलीस राज्य न्हवे तर कल्याणकारी राज्य बनवण्याचा आहे


🟡क संथानाम:-

🌀कद्र राज्य राष्ट्रपती पंतप्रधान यामध्ये घटनात्मक विरोध तत्वामुळे होऊ शकतो.


🟡नासिरुद्दीन:-

🌀ही तत्वे म्हणजे नववर्षाच्या निश्चयपेक्षा अधिक काही नाहीत.


🟡आयव्हर जेंनीग्स:-

🌀ही तत्वे म्हणजे केवळ पवित्र आकांक्षा होय.


🟡गरॅंव्हील ऑस्टिन:-

🌀यांचे उद्दिष्ट सामाजिक क्रांती करणे किंवा त्यासाठी आवश्यक परिस्थिती निर्माण करणे आहे.

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला परदेशी प्रमुख पाहुण्यांना न बोलवण्याचा निर्णय.



🔰यंदाचा प्रजासत्ताक दिन सोहळा परदेशी प्रमुख पाहुण्याविना पार पडणार आहे. करोना व्हायरसमुळे सध्या संपूर्ण जगात चिंताजनक स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर अन्य देशाच्या किंवा सरकारच्या प्रमुखाला निमंत्रित न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली.


🔰यापूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना प्रजासत्ताक दिनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी निमंत्रण स्वीकारले सुद्धा होते. पण ब्रिटनमध्ये करोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली. त्यांना मायदेशात थांबणे आवश्यक होते. त्यामुळे बोरिस जॉन्सन यांनी त्यांचा भारत दौरा रद्द केला.


🔰तयानंतर प्रजासत्ताक दिन सोहळयासाठी कोणाला निमंत्रित करणार अशी चर्चा सुरु झाली होती. पण आता करोना स्थितीमुळे कुठल्याही परदेशी प्रमुखाला निमंत्रित न करण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्यापासून लसीकरण.


देशात बहुप्रतीक्षित करोना प्रतिबंधक लसीकरण उद्या, शनिवारपासून सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जाहीर केले.


करोनायोद्धय़ांना सर्वात आधी लशीचा लाभ मिळणार असून, त्यापैकी काही जणांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे संवादही साधणार आहेत. लसीकरण मोहिमेच्या प्रारंभावेळी लशींचा पुरवठा आणि वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘को-विन’ अ‍ॅपचे लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.


देशातील एकूण २९३४ लसीकरण केंद्रांपैकी काही ठरावीक केंद्रांतील लाभार्थ्यांना पंतप्रधानांशी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी या केंद्रावरील अधिकाऱ्यांना तंत्रज्ञानविषयक आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास सांगण्यात आले आहे. दिल्लीतील एम्स आणि सफदरजंग रुग्णालयांचा या केंद्रांमध्ये समावेश आहे.


आरोग्य क्षेत्रातील जवळपास तीन कोटी कर्मचाऱ्यांना २९३४ केंद्रांवर लस टोचण्यात येणार आहे. एका केंद्रावर दररोज एका सत्रात १०० जणांचे लसीकरण करण्याची सूचना राज्यांना देण्यात आली आहे. लसीकरणादरम्यान काही मात्रा वाया जाण्याची शक्यता गृहीत धरून प्रति १०० कुप्यांमागे दहा कुप्या राखीव ठेवण्यात येणार आहेत.

आत्मनिर्भर भारत! ‘स्वदेशी शस्त्रांनी भविष्यातील युद्ध जिंकण्याचं लक्ष्य’.



🔰भविष्यातील कुठलेही युद्ध स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांनी जिंकण्याच्या टप्प्प्यापर्यंत पोहोचण्याचे भारताचे लक्ष्य आहे असे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांनी गुरुवारी सांगितले.


🔰इडियन एअर फोर्ससाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून ८३ मार्क-१ ए तेजस फायटर विमाने विकत घेण्याच्या व्यवहाराला मंत्रिमंडळ समितीने काल मंजुरी दिली. हा सर्व व्यवहार ४८ हजार कोटी रुपयांचा आहे.


🔰हा निर्णय केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला बळकटी देणारा आहे. त्यानंतर आज बिपिन रावत यांनी हे विधान केले. “स्वदेशीकरण आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेला पाठिंबा देण्यावर आमचा भर असेल” असे रावत यांनी सांगितले. “मेड इन इंडिया इंजिनसह विमानातील सर्व महत्त्वाचे भाग स्वदेशी असतील आणि अशा विमानाने आमची एअर फोर्स गगनाला स्पर्श करताना आम्हाला पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे” असे बिपिन रावत म्हणाले

हेनले अँन्ड पार्टनर्सने जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्टची यादी जाहीर केली



🇯🇵 ०१) जपान

🇸🇬 ०२) सिंगापूर 

🏳️ ०३) दक्षिण कोरिया व जर्मनी 

🏳️ ०४) इटली , स्पेन , फिनलंड व लक्झेंबर्ग

🏳️ ०५) डेन्मार्क , ऑस्ट्रीया 

🏳️ ०६) स्वीडन , फ्रांस , पोर्तुगाल , नेदरलँड व आयर्लंड

🏳️ ०७) स्वित्झर्लंड , अमेरिका , ब्रिटन , नॉर्वे , बेल्जियम , न्युझीलंड 

🏳️ ०८) ग्रीस , माल्टा , झेक गणराज्य , ऑस्ट्रेलिया 

🇨🇦 ०९) कँनडा 

🇭🇺 १०) हंगरी 

🇦🇪 १६) युएई 

🏳️ १९) ब्राझील , हाँगकाँग 

🇮🇱 २३) इस्त्रायल

🇷🇺 ५०) रशिया 

🏳️ ७०) चीन , कझाकस्तान , बेलारुस 

🇮🇳 ८५) भारत , ताजिकिस्तान 


भारताचे शेजारील देश व त्यांचे स्थान


🇧🇹 ९०) भुटान 

🇲🇲 ९६) म्यानमार 

🇱🇰 १००) श्रीलंका 

🇧🇩 १०१) बांग्लादेश

🇳🇵 १०४) नेपाळ 

🇵🇰 १०७) पाकिस्तान 

🇦🇫 ११०) अफगाणिस्तान (शेवटचा क्रमांक) .

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...