१३ जानेवारी २०२१

महाराष्ट्रातील कोरीव लेण्या (ठिकाणे)



● औरंगाबाद :अजिंठा लेणी, बौध्द लेणी (सुंदर रंगीत चित्रे), वेरूळ लेणी (हिंदू लेणी)


● मुंबई : एलिफंटा लेणी - घारापुरी बेटावर शिवमंदिरे


● नाशिक :म्हसरूळ (जैन लेणी)


● नाशिक :पांडव लेणी (बौध्दाची 23 लेणी)


● पुणे :कार्ले भाजे लेणी , कान्हेरी (बौध्द लेणी 100 पेक्षा जास्त शिल्पे, चैत्य सभा मंडप )


● सातारा :आगाशिवाची लेणी (बौध्द लेणी)


● नाशिक :चांभार लेणी (जैन लेणी)


● परभणी :जिंतुर (जैन लेणी)


● रायगड :कुडे (माणगांव येथे बौध्द लेणी)


● लातूर :खरोसा लेणी (बौध्द, हिंदू लेणी)


● नाशिक :अंकाईची लेणी (जैन लेणी) 

जीवनसत्त्वे आणि रासायनिक नावे


● व्हिटॅमिन ए : रेटिनॉल


● व्हिटॅमिन बी 1 : थायमाइन


● व्हिटॅमिन बी 3 : नियासिन


● व्हिटॅमिन बी 5 : पॅन्टोथेनिक अ‍ॅसिड


● व्हिटॅमिन सी : एस्कॉर्बिक अ‍ॅसिड


● व्हिटॅमिन डी : कॅल्सीफेरॉल


● व्हिटॅमिन ई : टोकोफेरॉल


● व्हिटॅमिन के : फिलोक्विनॉन


● व्हिटॅमिन बी 2 : रीबॉफ्लेविन


● व्हिटॅमिन बी 7 : बायोटिन


● व्हिटॅमिन बी 9 : फॉलिक अ‍ॅसिड 


भारतातील प्रमुख शहरांचे संस्थापक



*◆ कोलकाता ➖   जॉब चारनाक

*◆ मुंबई ➖   ओनाल्ड ऑग्जिअ

*◆ भोपाल ➖   राजा भोज

*◆ नई दिल्ली ➖   एडविन लुट्यंस

*◆ आगरा ➖   सिकंदर लोदी

*◆ इंदौर ➖   अहिल्या बाई

*◆ धार ➖   राजा भोज

*◆ तुगलकाबाद ➖   मोहम्मद तुगलक

*◆ जयपुर ➖   सवाई राजा जयसिंह

*◆ लखनऊ ➖   आसफुद्दौला

*◆ इलाहाबाद ➖   अकबर

*◆ झांसी ➖   वीरसिंह जूदेव

*◆ अजमेर ➖   अजयराज सिंह

*◆ उदयपुर ➖   राणा उदयसिंह

*◆ टाटा नगर ➖   जमशेदजी टाटा

*◆ भरतपुर ➖   राजा सूरजमल

*◆ कुम्भलगढ़ ➖   राजा कुम्भा

*◆ पटना ➖   उदयन

*◆ मुंगेर ➖   चद्रगुप्त मौर्य

*◆ नालंदा ➖   राजा धर्मपाल

*◆ रायपुर ➖   बरम्हदेव

*◆ दुर्ग ➖   जगतपाल

*◆ देहरादून ➖   राजा जोनसार बाबर

*◆ पुरी ➖   गग चोल

*◆ द्वारका ➖   शकराचार्य

*◆ जम्मू ➖   राजा जम्मू लोचन

*◆ पूना ➖   शाहजी भोसले

*◆ हैदराबाद ➖   कली कुतुब शाह

*◆ अमृतसर ➖   गरु रामदास

*◆ दिल्ली ➖   अन्नंतपाल तोमर

Online Test Series

महाराष्ट्र पोलीस दल विशेष


🔰 महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्या कोण आहेत? - अनिल देशमुख


🔰 पोलीस खाते कोणत्या मंत्रालयांतर्गत येते?

 - गृहमंत्रालय


🔰 पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो?

 - राज्यसूची


🔰 राष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते?

- दक्षता


🔰 भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे?

- तेलंगणा


🔰 सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोठे आहे?

 - हैदराबाद


🔰 महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?

 - सुबोध जयस्वाल


🔰 महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे?

- सदरक्षणाय खलनिग्रहणाय


🔰 महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते?

 - पोलीस महासंचालक


🔰 महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे?

 - मुंबई


🔰 सदरक्षणाय खलनिग्रहणाय या वाक्याचा अर्थ काय होतो?

  - सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नायनाट

 

🔰 महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताऱ्याचे चिन्ह आहे?

 - पंचकोणी तारा_


🔰 पोलीस स्मृती दिवस कधी साजरा केला जातो?

 - 21 ऑक्टोबर


🔰 *सीआरपीएफचे पूर्ण नाव काय?

सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स


🔰 *महाराष्ट्रात गुप्तचर अकादमी प्रशिक्षण केंद्र कोठे आहे?

 - पुणे


🔰 *पोलीस दलातील शेवटचे पद कोणते?

शिपाई


🔰 महाराष्ट्र राज्यातील पहिल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला  बटालियनची स्थापना कोठे होणार आहे

काटोल, जि. नागपूर


🔰 महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभयनिदर्शक असे कोणते चिन्ह आहे?

हाताचा पंजा


🔰 जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो?

पोलीस अधीक्षक


🔰 महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वजाचा रंग कोणता आहे

गडद निळा


🔰 श्री. सुबोध जयस्वाल महाराष्ट्र राज्याचे कितवे पोलीस महासंचालक आहेत ?

42 वे


🔰 मुंबई पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत ?

परमबिरसिंह


🔰 राज्याच्या पोलीस महासंचालकांची नेमणूक कोण करते ?

राज्यशासन


🔰 पोलीस विभागात परिक्षेत्राच्या प्रमुखास काय म्हणतात ?

 - महानिरीक्षक


🔰 FIR चा फुल फॉर्म काय ?first information report


🔰 महाराष्ट्र राज्याच्या एटीएस विभागाचे प्रमुख कोण आहेत ? - देवेन भारती


🔰 गृह विभागाच्या नियंत्रणाखाली कोणते विभाग येतात ?

- गृहरक्षक दल , तुरुंग


🔰 महाराष्ट्र राज्याचे गुन्हे अन्वेषण विभागचे मुख्यालय कुठे आहे ?

- पुणे


🔰 भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचे नाव काय ?

 - केपी-बोट


🔰 राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली ?

 - 1948


🔰 भारताच्या पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी कोणाची निवड करण्यात आली ?* - _जनरल बिपिन रावत_


🔰 देशाचे संरक्षण मंत्री कोण आहेत ?

 - राजनाथ सिंह_

विज्ञान महत्वपूर्ण प्रश्नोत्तरी


1. शरीर का तापमान : → 37 डीग्री 98.4 फ़ारेनहाइट


2. वस्यक व्यक्तियों में अस्थियों की संख्या : → 206


3. खोपड़ी में अस्थियां : → 28


4. कशेरुकाओ की संख्या :  →33


5. पसलियों की संख्या : →24


6. गर्दन में कशेरुकाएं : →7


7. लाल रक्त कणिकाओं की आयु : → 120 दिन


8. श्वेत रक्त कणिकाओ की आयु : →1 से 3 दिन


9. श्वसन गति : →16 बार प्रति मिनिट


10. हृदय गति : →72 बार प्रति मिनिट


11. दंत सूत्र : → 2:1:2:3


12. रक्तदाव : →120/80


13. मष्तिष्क का भार → 1380 ग्राम


14. महिलाओं के मष्तिष्क का भार → 1250 ग्राम


15. गुणसूत्रों की संख्या → 23 जोड़े

चालू घडामोडी चे १० प्रश्न व उत्तरे


प्रश्न८१) खालीलपैकी कोणते शहर ‘सुवर्ण चतुर्भुज’ प्रकल्पाद्वारे जोडले जाणार नाही?

(A) दिल्ली

(B) अहमदाबाद✅

(C) मुंबई

(D) चेन्नई


प्रश्न८२) कोणत्या देशाला 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘कंट्री इन फोकस’ म्हणून घोषित केले गेले आहे?

(A) बांगलादेश✅

(B) म्यानमार

(C) इंडोनेशिया

(D) नेपाळ


प्रश्न८३) कोणत्या संस्थेने इब्रमपूर, वेलिंग आणि पर्रा या गावांमध्ये ‘मेरा गांव मेरा गौरव’ उपक्रमाच्या अंतर्गत स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ केला?

(A) केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्था

(B) राष्ट्रीय अॅटलस संघटना

(C) भारतीय कृषी संशोधन परिषद✅

(D) विज्ञान प्रसार


प्रश्न८४) कोणत्या संवर्गात जम्मू व काश्मिर अधिकाऱ्यांचा संवर्ग विलीन झाला आहे?

(A) झारखंड

(B) उत्तरप्रदेश

(C) गुजरात

(D) AGMUT✅


प्रश्न८५) कोणत्या व्यक्तींचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा करतात?

(A) स्वामी विवेकानंद✅

(B) महात्मा गांधी

(C) सारडा देवी

(D) अरबिंदो घोष


प्रश्न८६) अमेरिकेकडून दिला जाणारा H-1B व्हिसा ____ याच्याशी संबंधित आहे.

(A) प्रवेश व्हिसा

(B) विशिष्ट व्यवसायात पदवीधर कामगारांची नोकरी✅

(C) इतर राष्ट्रांच्या राजदूतांना दिला जाणारा व्हिसा

(D) यापैकी नाही


प्रश्न८७) आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या कृष्णविवराचे नाव काय आहे?

(A) मेसियर 87

(B) मिल्की वे

(C) सेगीटेरियस ए*✅

(D) एस2


प्रश्न८८) कोणता भारताचा राष्ट्रीय जलचर प्राणी आहे?

(A) दुगोंग

(B) घडियाल

(C) ब्लूफिन ट्यूना

(D) गंगा नदी डॉल्फिन✅


प्रश्न८९) केन-बेटवा जोड प्रकल्प कशाशी संबंधित आहे?

(A) नदी जोड प्रकल्प✅

(B) स्वदेश दर्शन

(C) उडान योजना

(D) प्रधानमंत्री वंदना योजना


प्रश्न९०) कोणत्या राज्यात ‘कलरीपयट्टू’ हा युद्धकलेचा प्रकार प्रसिद्ध आहे?

(A) आंध्रप्रदेश

(B) कर्नाटक

(C) तामिळनाडू

(D) केरळ✅

पंतप्रधान बनलेले मुख्यमंत्री


❇️मोरारजी देसाई:-


🔳राज्य:-मुंबई


🔳कालावधी:-1952-1956


🔳पतप्रधान:-1977


❇️चरणसिंग:-


🔳राज्य:-उत्तर प्रदेश


🔳कालावधी:-1967-68 व 1970


🔳पतप्रधान:-1979-1980


❇️वही पी सिंग:-


🔳राज्य:-उत्तर प्रदेश


🔳कालावधी:-


🔳पतप्रधान:-1989 - 90


❇️पी व्ही नरसिंह राव:-


🔳राज्य:-आंध्र प्रदेश


🔳कालावधी:-1971-73


🔳पतप्रधान:-1991-96


❇️एच डी देवेगौडा:-


🔳राज्य:-कर्नाटक


🔳कालावधी:-1996


🔳पतप्रधान:-1996


❇️नरेंद्र मोदी:-


🔳राज्य:-गुजरात


🔳कालावधी:-2001-2014


🔳पतप्रधान:-2014 पासून


✍️वरील 6 व्यक्ती मुख्यमंत्री व नंतर पंतप्रधान बनल्या.


प्रमुख जमाती, त्यांची वस्ती, व्यवसाय व वैशिष्टे याबद्दल माहिती



जमाती:-प्रदेश:-व्यवसाय:-वैशिष्ट्ये


लॅपलॅडर:-सूचीपर्णी अरण्याचा प्रदेश:-लाकूडतोडे व शिकार:-फासेपारधी


एस्कीमो:-टंड्रा प्रदेश:-शिकार करणे:-कच्चे मांस खातात


पिग्मी:-कांगो खोरे:-फळे, कंदमुळे गोळा करणे:-स्थलांतरित शेती


रेड इंडियन:-उ.व.द.अमेरिका:-शिकार, मासेमारी:-फळे गोळा करणे


झुलू:-सुदानी गवताळ प्रदेश:-शिकार करणे:-स्थलांतरित शेती


बडाऊन(अरब):-सहारा वाळवंट:-ओअॅसिस शेती व व्यापार:-खगोलशास्त्रात प्रवीण आहे.


किरगीज:-आशियातील स्टेप/गवताळ प्रदेश:-पशूपालन:-युर्ट नावाच्या तंबूत राहतात/कुमीस नावाचे आवडते पेय


कोझक:-रशियातील गवताळ:-पशुपालन:-घोड्यावर बसण्यात पटाईत


गाऊची:-द.अमेरिकेतील/पंपासचा गवताळ प्रदेश:-पशुपालन:-मस्त व दांडग्या जनावरांना/वठणीवर आणण्यात वाकबगार


सॅमाइड:-सूचीपर्णी अरण्याचे प्रदेश:-फासेपारधी:-लाकूडतोड व शेती करणे


ओस्टयाक:-सूचीपर्णी अरण्याचे प्रदेश:-फासेपारधी:-लाकूडतोड व शेती करणे


बुशमे:-नकलाहारी वाळवंट:-शिकार, फळे:-शिकार करण्यात पटाईत


ब्लॅक फेलोज:-ऑस्ट्रेलिया:-शिकार, फळे गोळा:-शिकारीचा माग काढण्यात पटाईत


मावरी:-न्यूझीलंड:-शेती व मासेमारी:-उत्तम योद्धे

जगातील औद्योगिक उत्पादने व देशांच्या नावांबद्दल माहिती



औद्योगिक उत्पादने:देशाची नावे


इलेक्ट्रॉनिक वस्तु:-जपान, अमेरिका, तैवान, कोरिया, चीन.


कागद(वर्तमानपत्राचा):-कॅनडा, अमेरिका, जपान, रशिया.


कागद (लगदा):-अमेरिका, कॅनडा, स्वीडन, ब्रिटन, रशिया, नॉर्वे.


जहाज बांधणी:-जपान, द.कोरिया, ब्रिटन.


मोटारी:-अमेरिका, जपान, प.जर्मनी, कोरिया.


लोह-पोलाद:-रशिया, चीन, जपान, अमेरिका, फ्रांस, ब्रिटन, जर्मनी.


साखर:-क्युबा, ब्राझिल, भारत, रशिया व अमेरिका.


सीमेंट:-रशिया, चीन, अमेरिका.


खते:-अमेरिका, रशिया, जर्मनी.


विमाने:-अमेरिका, ब्रिटन.


यंत्र सामुग्री:-अमेरिका, जर्मनी.


रसायने:-अमेरिका, जर्मनी, ब्रिटन, भारत, कॅनडा.

इतिहासातील महत्वाचे क्रांतिकारी कट खटले


1) अलीपूर कट:- 1908

➡️ बारिंद्रकुमार घोष, भूपेंद्रनाथ दत्त, खुदिराम बोस, अरविंद घोष


2) नाशिक कट:- 1910

➡️ वि दा सावरकर, अनंत कन्हेरे, बाबाराव सावरकर


3) दिल्ली कट:- 1912

➡️ रासबिहारी बोस


4) लाहोर कट:- 1915

➡️ विष्णू गणेश पिंगले, रासबिहारी बोस


5) काकोरी कट:- 1925

➡️ सच्छिन्द्र सन्याल, चंद्रशेखर आझाद, अशफाक उल्ला खान, राजेंद्र लाहिरी, राकेश रोशन


6) मीरत/मेरठ कट:- 1928

➡️ मिरजकर, जोगळेकर, श्रीपाद अमृत डांगे


7) लाहोर कट:- 1928

➡️ भगतसिंग, राजगुरु, जयगोपाल, चंद्रशेखर आझाद


8) चितगाव कट:- 1930

➡️ सर्यसेन, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार, अजय घोष


🔴 टीप:- इतिहासात कटावर प्रश्न आला तर या बाहेरचा प्रश्नच बनू शकत नाही.

यदा प्रजासत्ताक दिनी सुरीनामचे राष्ट्रपती चंद्रिका प्रसाद संतोखी प्रमुख पाहुणे!



🔥 परजासत्ताक दिनी सुरीनामचे राष्ट्रपती

चंद्रिका प्रसाद संतोखी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 जानेवारी 2021 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या समारंभासाठी प्रमुख पाहुणे आमंत्रित केले आहे.


🔥 पतप्रधान मोदी यांनी 27 नोव्हेंबरला फोनवर झालेल्या संभाषणादरम्यान जॉन्सन यांना हे आमंत्रण दिले होते. पण कोरोना च्या पार्श्वभूमीवर त्यांचा नियोजित दौरा रद्द झाला आहे त्यांच्या जागी सुरीनामचे राष्ट्रपती चंद्रिका प्रसाद संतोखी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत

राष्ट्रीय युवा दिन: 12 जानेवारी


🔰12 जानेवारी 2021 रोजी देशभरात ‘युवाः – उत्साह नये भारत का’ या संकल्पनेखाली ‘राष्ट्रीय युवा दिन’ साजरा करण्यात आला आहे.


🔰सवामी विवेकानंद यांच्या 158 व्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे नेहरू युवा केंद्र संघटनेच्यावतीने आयोजन करण्यात आले.


🔴पार्श्वभूमी.


🔰सयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्णयानुसार, स्वामी विवेकानंद यांच्या स्मृतीत वर्ष 1984 याला ‘आंतरराष्ट्रीय युवा वर्ष’ घोषित करण्यात आले होते. 


🔰तयापाठोपाठ, भारत सरकारने 1984 सालापासून दरवर्षी 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त ‘राष्ट्रीय युवा दिन’ साजरा करण्याची घोषणा केली.


🔰सवामी विवेकानंद (12 जानेवारी 1863 – 4 जुलै 1902)


🔰सवामी विवेकानंद यांचे मूळ नाव वीरेश्वर तर रूढ झालेले नरेंद्रनाथ ही नाव होते. ते एकोणिसाव्या शतकात बंगालमध्ये होऊन गेलेले एक जगद्विख्यात संन्यासी होते.


🔰अमेरिकेत जाऊन शिकागो येथे भरलेल्या सर्वधर्मपरिषदेस हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित राहिले. 


🔰11 सप्टेंबर 1893 रोजी त्यांनी केलेल्या पाच मिनिटांच्या पहिल्या भाषणाने सारी सभा मंत्रमुग्ध झाली आणि सतरा दिवस चाललेल्या त्या परिषदेवर सर्वांत अधिक प्रभाव त्यांचा पडला.


🔰1 मे 1897 रोजी ‘रामकृष्ण मिशन’ या नावाची संन्याशांची संस्था त्यांनी स्थापन केली. कलकत्त्यातील बेलूर मठ हे तिचे केंद्र-कार्यालय आहे.

पहिल्या टप्प्यात ५,२९७ पदांसाठी पोलीस भरती



पहिल्या टप्प्यात राज्यात ५,२९७ पोलिसांची भरती प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात ७,५०० जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येईल तसेच अतिरिक्त काही जागांना मंजुरी प्राप्त झाली आहे. ही पदभरती तिसऱ्या टप्प्यात केली जाईल. अशी एकूण १२,५०० पदांवर पोलीस भरती होईल, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नागपुरात दिली.

बेरोजगारी वाढत असताना राज्य सरकार पोलीस भरती पुढे ढकलत आहे. याच्या निषेधार्थ राष्ट्रीय ओबीसी महासंघाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात नागपुरातील आकाशवाणी चौकात सोमवारी निदर्शने केली.

पोलीस दलातील १२ हजार पदांची भरतीप्रक्रिया सुरू करावी, या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे कार्यकर्ते सोमवारी सकाळी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन करण्यास निघाले. ही माहिती कळताच गृहमंत्र्यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या निवासस्थानी आमंत्रित केले. या चर्चेत त्यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना भरतीबाबत माहिती दिली. गृहमंत्र्यांनी हीच माहिती संध्याकाळी व्टिटरवर जाहीर केली.

राज्यावर ‘बर्ड फ्लू’चे सावट



लातूर, बीडमध्ये पक्षी-कोंबडय़ांचा मृत्यू; सात राज्यांमध्ये फैलाव

नवी दिल्ली, लातूर, बीड, नगर :  केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि उत्तर प्रदेश या सात राज्यांत ‘बर्ड फ्लू’चा फैलाव झाल्याचे केंद्र सरकारने रविवारी जाहीर केले. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये कोंबडय़ा आणि कावळे दगावल्याने राज्यावर या रोगाच्या साथीचे सावट आहे.

महाराष्ट्र आणि दिल्लीत मृतावस्थेत आढळलेल्या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचे रविवारी केंद्रीय पशुपालन मंत्रालयाने स्पष्ट केले.

महाराष्ट्रात ‘बर्ड फ्लू’चा फैलाव झाल्याचे अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले नसले तरी लातूर जिल्ह्य़ाच्या अहमदपूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथे ३५० कोंबडय़ा दगावल्याने भीतीचे वातावरण आहे. कोंबडय़ांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

बीड जिल्ह्य़ाच्या पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे रविवारी २६ कावळे मृतावस्थेत आढळले. तीन कावळ्यांचे अवशेष भोपाळला तर अन्य काही नमुने पुण्याला पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, नगर जिल्ह्य़ातील तीन हजार ३२१ कुक्कुटपालन केंद्रांचे सर्वेक्षण जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने सुरू केले आहे.

सात राज्यांमधील स्थिती

हरियाणाच्या पंचकुला जिल्ह्य़ातील दोन कुक्कुटपालन केंद्रांतून संकलित केलेल्या नमुन्यांच्या अहवालातून कोंबडय़ांना ‘बर्ड फ्लू’चा संसर्ग झाल्याचे राज्य सरकारने जाहीर केले. त्यामुळे तेथे नऊ शीघ्र प्रतिसाद दले तैनात करण्यात आली असून, साथ प्रतिबंधात्मक उपाययोजनाही केल्या जात असल्याचे केंद्रीय पशूपालन मंत्रालयातर्फे सांगण्यात आले.

गुजरात आणि राजस्थानमध्येही ‘बर्ड फ्लू’ची साथ पसरल्याचे निष्पन्न झाले. गुजरातमधील सूरत जिल्ह्य़ातून आणि राजस्थानच्या सिरोही जिल्ह्य़ातून संकलित केलेल्या पक्ष्यांच्या नमुन्यांमध्ये ‘बर्ड फ्लू’चा विषाणू आढळला.

हिमाचल प्रदेशातील कांग्रा जिल्ह्य़ातही ८६ कावळे आणि दोन बगळे मृतावस्थेत आढळले. नहान, बिलासपूर आणि मंडी जिल्ह्य़ातूनही मृतावस्थेत आढळलेल्या पक्ष्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याचे पशुपालन विभागाच्या निवेदनात म्हटले आहे.

छत्तीसगडमधील बालोद जिल्ह्य़ातून घेतलेले पक्ष्यांच्या नमुन्यांचा अहवाल आला असून तेथे बर्ड फ्लूची साथ नसल्याचे पशूपालन आणि दुग्धविकास मंत्रालयाने निवेदनाद्वारे स्पष्ट केले.

मार्गदर्शक सूचना 

‘बर्ड फ्लू’ साथीचा फैलाव झालेल्या सातही राज्यांना साथप्रतिबंध आणि नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्याची माहिती केंद्रीय पशूपालन मंत्रालयाने रविवारी दिली.

केंद्राच्या राज्यांना सूचना

’‘बर्ड फ्लू’बाधित भागांतील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय पथके स्थापन करण्यात आली असून ती त्या त्या भागांची पाहणी करीत आहेत, असे केंद्राने सांगितले.

मुंबईतील चेंबूर परिसरातील टाटा कॉलनीजवळ नऊ कावळे रविवारी मृतावस्थेत आढळले. त्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी मृत कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले. तपासणी अहवाल आल्यानंतर या कावळ्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

भारतीय महिला वैमानिकांचा विक्रम.


🔶सर्व महिला वैमानिकांनी सारथ्य केलेले एअर इंडियाचे सॅन फ्रान्सिस्को- बंगळूरु हे विमान सोमवारी बंगळूरुला येऊन पोहचले आणि भारतीय विमानाने विना थांबा सर्वाधिक अंतर पार करण्याच्या या विक्रमाची देशाच्या हवाई वाहतुकीच्या इतिहासात नोंद झाली.


🔶सथानिक वेळेनुसार शनिवारी रात्री साडेआठ वाजता सॅन फ्रान्सिस्कोहून निघालेले एआय-१७६ हे विमान सोमवारी पहाटे ३.४५ वाजता बंगळूरुच्या केंपेगौडा विमानतळावर उतरल्यानंतर त्यातील कर्मचारी विमानतळाच्या लाऊंजकडे आले, तेव्हा मोठय़ा संख्येत जमलेल्या लोकांनी आनंदाने घोषणा देत त्यांचे स्वागत केले. सर्व महिला वैमानिकांचा समावेश असलेल्या या चमूने उत्तर ध्रुवावरून सर्वाधिक अंतराचे उड्डाण करण्याचा विक्रम केला आहे.


🔶एअर इंडिया किंवा इतर कुठल्या भारतीय विमान कंपनीतर्फे संचालित हे सर्वात लांब अंतराचे व्यावसायिक विमान उड्डाण असेल, असे एअर इंडियाने यापूर्वी सांगितले होते. जगाच्या दोन विरुद्ध टोकांवर असलेल्या या दोन शहरांतील थेट अंतर १३,९९३ किलोमीटर असून, त्यात सुमारे १३.५ तासांचा ‘टाइम झोन’ बदल होतो.


🔶लोकांने हर्षोल्लास व्यक्त करत टाळ्या वाजवत असताना कॅप्टन झोया अगरवाल, कॅ. पापागरी तन्मयी, कॅ. आकांक्षा सोनावणे व कॅ. शिवानी मन्हास यांनी हाताचे अंगठे उंचावून त्यांना प्रतिसाद दिला.  ‘भारतीय हवाई वाहतुकीतील महिला वैमानिकांनी इतिहास निर्माण केला असून हा मनात जतन करण्याचा आणि साजरा करण्याचा क्षण आहे. या चारही वैमानिकांचे हार्दिक अभिनंदन!’, असे ट्वीट केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने व त्यांचे अध्यक्ष (२००६ ते २०२१)


🔰 ७९वे : २००६ : सोलापूर : मारुती चितमपल्ली

🔰 ८०वे : २००७ : नागपूर : अरुण साधू

🔰 ८१वे : २००८ : सांगली : म.द. हातकणंगलेकर

🔰 ८२वे : २००९ : महाबळेश्वर : आनंद यादव

🔰 ८३वे : २०१० : पुणे : द.भि.कुलकर्णी

🔰 ८४वे : २०११ : ठाणे : उत्तम कांबळे

🔰 ८५वे : २०१२ : चंद्रपूर : व.आ. डहाके

🔰 ८६वे : २०१३ : चिपळूण : ना कोत्तापल्ले

🔰 ८७वे : २०१४ : सासवड : फ. मुं. शिंदे

🔰 ८८वे : २०१५ : घुमान (पंजाब) : स मोरे

🔰 ८९वे : २०१६ : पिंपरी-चिंचवड : श्री. सबनीस

🔰 ९०वे : २०१७ : डोंबिवली : अ. काळे

🔰 ९१वे : २०१८ : बडोदे : लक्ष्मीकांत देशमुख

🔰 ९२वे : २०१९ : यवतमाळ : अरुणा ढेरे

🔰 ९३वे : २०२० : उ.बाद : फादर फ्रा. दिब्रिटो

🔰 ९४वे : २०२१ : नाशिक : अध्यक्ष निश्चित नाही .

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...