Monday, 4 January 2021

स्वाऱ्या चंद्रावरच्या


◾️गल्या ६० वर्षांत आतापर्यंत १०९ चांद्रमोहिमा आखल्या गेल्या आहेत. त्यापैकी ६१ यशस्वी, तर ४८ मोहिमा अयशस्वी झाल्या आहेत. 


◾️यातही सर्वात महत्त्वाचं म्हणजे, अंतराळात माणसानं प्रवेश करण्यापूर्वी एका प्राण्यानं प्रवेश करून माणसांचा मार्ग मोकळा केला होता.


◾️ हा प्राणी कोण होता माहीत आहे, ती होती रशियाच्या रस्त्यांवर फिरणारी एक भटकी कुत्री. तिचं नाव होतं लायका. 


◾️रशियानं ३ नोव्हेंबर १९५७मध्ये आपल्या स्फुटनिक-२ यानातून तिला अंतराळात पाठवलं होतं.


◾️ तयानंतर साधारण १९५०च्या दशकात पहिल्यांदा चंद्रावर स्वारी करायचं, असं माणसानं ठरवलं. 


◾️तया काळात अमेरिका आणि रशिया हीच बलाढ्य आणि पुढारलेली राष्ट्रं होती. साहजिकच त्यांनी चंद्रावर स्वाऱ्या करायला सुरुवात केली.


◾️ तयानंतर आतापर्यंत १०९ मोहिमा झाल्या आहेत.


    💢 अमेरिका : १९६६ ते १९७२ दरम्यान 💢


◾️नासा ही अमेरिकेची अवकाश संस्था. अपोलो मोहिमेत फेब्रुवारी १९६६ ते डिसेंबर १९७२ या काळात तिनं १९ मोहिमा केल्या.


◾️ तयापैकी १६ यशस्वी झाल्या. 


◾️या मोहिमांमधून नील आर्मस्ट्राँग एल्विन ऑल्ड्रिनसह २४ अंतराळवीरही चंद्रावर जाऊन आले.


  💢 रशिया : १९५९ ते १९७६ दरम्यान💢


◾️रशियानं या १७ वर्षांत २४ चांद्रमोहिमा केल्या. 


◾️यातील १५ यशस्वी झाल्या. 


◾️लना-१ ही पहिली मोहीम अयशस्वी झाल्यानंतर १३ सप्टेंबर १९५९ रोजी रशियाने लुना-२ मोहीम आखली. ती यशस्वी झाली. या मोहिमेत रशियानं चंद्रावरून नमुने आणले. 


◾️तर नंतरच्या लुना-१७ आणि लुना-२१ मोहिमेत चंद्रावर रोव्हर उतरवण्यात रशियानं यश मिळवलं.


      💢 जपान : १९९० पासून 💢


◾️जपाननं २४ जानेवारी १९९० रोजी 'हितेन' ही पहिली चंद्रस्वारी केली. 


◾️चद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर काही काळात ऑर्बिटरचा जमिनीपासूनचा संपर्क तुटला. 


◾️जपाननं आपली दुसरी मोहीम सेलेन १४ सप्टेंबर २००७ रोजी आखली.


◾️ या अवकाश यानाचे ऑर्बिटर, रिले उपग्रह आणि व्हीएलबीआय उपग्रह असे तीन भाग होते.


        💢 चीन : २००७ पासून 💢


◾️चीननं त्यांच्या चंद्र देवीच्या नावानं म्हणजेच, चँग नावानं चार टप्प्यांमध्ये रोबोटिक चांद्रमोहिमा आखल्या. त्या सर्व यशस्वी ठरल्या आहेत. 


◾️चग-१ आणि चँग-२ या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये ऑर्बिटर पाठवण्यात आले आणि चँग-३ आणि चँग-४ मध्ये लँडर होते. 


◾️यात युतू १ आणि युतू २ नावाचे रोव्हरही होते.


💢भारत : २२ ऑक्टोबर २००८ पासून💢


◾️खरंतर २००८च्या आधीपासून भारताचा अंतराळ कार्यक्रम सुरू होता. 


◾️भारताचे अंतराळवीर राकेश शर्मा १९८४मध्ये अंतराळात जाऊन आले होते. पण चंद्रावर स्वारी २२ ऑक्टोबर २००८ रोजी झाली. 


◾️शरीहरीकोटा येथील पीएसएलव्ही सी-११ भारताचे चांद्रयान घेऊन उडाले. 


◾️चद्राच्या रासायनिक, खनिज आणि प्रकाश-भौमिकी मानचित्रणासाठी चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० किमी उंचीवरून चांद्रयान-१ परिभ्रमण करीत होते.


◾️ याच्या अवकाशयानात भारतासह संयुक्त राष्ट्रे, अमेरिका, ब्रिटन, जर्मनी, स्वीडन आणि बल्गेरियाची ११ उपकरणे होती.

भारतातील उच्चपदस्थ


💢लोकसभा अध्यक्ष:- ओम बिर्ला


💢लोकसभेचे हंगामी अध्यक्ष:- वीरेंद्र कुमार


💢सरन्यायाधीश:- रंजन गोगोई (४६ वे)


💢राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार:- श्री अजित दोवाल 


💢पतप्रधानांचे प्रधान सचिव:- श्री नृपेंद्र मिश्रा


💢पंतप्रधानांचे अतिरिक्त प्रधान सचिव:-डॉ.पी.के.मिश्र


💢महान्यायवादी :- के. के. वेणुगोपाल


💢महालेखापाल:- राजीव महर्षी


💢मुख्य निवडणूक आयुक्त :-सुनील अरोरा ( २३ वे)


💢निवडणूक आयुक्त :- अशोक लवासा, सुशिल चंद्रा


💢पंतप्रधानांचे मुख्य आर्थिक सल्लागार:- कृष्णमुर्ती सुब्रमण्यम


💢केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष :- अरविंद सक्सेना


💢केंद्रीय दक्षता आयोगाचे अध्यक्ष :-शरद कुमार (हंगामी)


💢मुख्य माहिती आयुक्त :- सुधीर भार्गव


💢रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष:- शक्तीकांत दास( २५ वे)


💢नीती आयोगाचे उपाध्यक्ष:- डॉ. राजीव महर्षी


💢सेबी अध्यक्ष :- अजय त्यागी


💢भारतीय विमा नियामक

 अध्यक्ष:-सुभाषचंद्र खुंटीया


💢१५ व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष:- एन. के सिंग


💢केंद्रीय जल आयोगाचे अध्यक्ष :_ नरेंद्र कुमार


💢राष्ट्रीय वन आयोगाचे अध्यक्ष:- न्या. बी. एन. कीरपाल


💢सातव्या आयोगाचे अध्यक्ष:- अशोक के. माथुर


💢आयबी अध्यक्ष:- राजीव जैन


💢राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष:- भगवान लाल सहाय


💢राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष:- रामशंकर कथरिया


💢राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे अध्यक्ष:- नंद कुमार साई


💢राष्ट्रीय महिला आयोग:- रेखा शर्मा


💢राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष:- सईद हायरुल हसन रिझवी


💢राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष:- न्या. एच. एल. दत्तू


💢राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष:- वालजीभाई वाला


💢राष्ट्रीय बालअधिकार व सरक्षण आयोग:- प्रियांक कानुंगो


💢कायदा आयोगाचे अध्यक्ष ( २१ व्या ) :- न्या. बलवीर सिंह चौहान


💢राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष:- रेखा शर्मा


💢बँक बोर्ड ब्युरोचे अध्यक्ष:- भानू प्रताप शर्मा


💢सीबीआय अध्यक्ष:- ऋषीकुमार शुक्ला


💢भूदल प्रमुख:- बिपीन रावत


💢नौदल प्रमुख: करमवीर सिंह


💢हवाईदल प्रमुख:- बी. एम. धनोआ


💢इस्रो अध्यक्ष:- के. सिवन


💢डीआरडीओ प्रमुख: जी. सतीश रेड्डी


💢भारतीय अणुउर्जा आयोगाचे अध्यक्ष:- के. एन. व्यास


💢टेलीकाॅम रेग्युलेटरी अॅथरिटीचे (ट्राय) अध्यक्ष:- राम सेवक शर्मा


💢कृष्णा जलवादाचे प्रमुख:- न्या. ब्रिजेश कुमार


💢भारताचे पहिले लोकपाल:- पिनाकी घोष


💢युजीसी चे अध्यक्ष:- डि. पी सिंग


💢भारतीय लोकसभेचे महासचिव:- स्नेहलता श्रीवास्तव


💢भारतीय राज्यसभेचे महासचिव :- देशदीपक वर्मा


💢NCC (राष्ट्रीय विद्यार्थी सेना) महासंचालक:- लेफ्टनंट जनरल राजीव चोप्रा


💢भाभा अणू संशोधन केंद्राचे नवे संचालक:- डॉ. ए. के. मोहंती


💢BCCI चे पहिले लोकपाल:- न्या. डी. के. जैन


💢केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष:- प्रमोचंद्र मोदी


💢रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष:- व्ही. के यादव


💢परराष्ट्र सचिव :- विजय गोखले.


या धाडसी निर्णयामुळे जेटली राहतील कायम स्मरणात


🌀 देशाचे माजी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांचे ६६ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. भारतीय राजकारणामध्ये जेटली यांना अभ्यासू नेता म्हणून ओळखले जात होते. 


🌀पशाने वकील असणाऱ्या जेटली यांनी मंत्रीपदावर असताना अनेक महत्वाचे आणि कठोर निर्णय घेतले. या निर्णयामुळे ते नेहमीच स्मरणात राहतील.जाणून घेऊयात जेटलींच्या महत्वाच्या आणि धाडसी निर्णयाबद्दल….


             🎇 नोटबंदी 🎇

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🌀आठ नोव्हेंबर २०१६ रोजी देशाच्या अर्थव्यवस्थेत एका रात्रीतून मोठा बदल घडला तो म्हणजे नोटबंदीने. 


🌀पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार आणि ५००  रुपयाच्या जुन्या नोटा रद्द करण्याची घोषणा केली. त्यावेळी अरुण जेटली अर्थमंत्री म्हणून काम करत होते. या निर्णयामध्ये जेटलींची भूमिका महत्वाची होती.


             🎇जीएसटी 🎇

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🌀अरूण जेटली यांनी भारतीय अर्थव्यस्थेला बळकटी देण्यासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) प्रणालीचा निर्णय देखील त्यांच्याच काळात घेण्यात आला. 


🌀या निर्णयामुळे देशातील अर्थव्यवस्थेत मोठे बदल झालेले पहायला मिळाले. अनेक राज्यांनी जीएसटीला विरोध दर्शवला होता. 


🌀पण जेटली यांनी सर्व राज्यांची मनभरणी करत हा निर्णय घेतला. जुलै २०१७ मध्ये जीएसटी लागू केल्यानंतर अनेक अडचणी आल्या. विरोधकांसह व्यापारी वर्गाने याचा तीव्र विरोध केला. मात्र, अर्थमंत्री असताना जेटली यांनी संयम आणि धैर्याने या सर्वांचा सामना केला.


🎇एन्सॉल्वेंसी अॅण्ड बैंकरप्सी कोड (IBC) 🎇

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🌀जीएसटी व्यतिरिक्त एन्सॉल्वेंसी अॅण्ड बैंकरप्सी कोड (IBC)चा महत्वपूर्ण निर्णय जेटली यांनी घेतला. बँकींग व्यवस्थेत त्यांनी अनेक बदल केले. 


🌀तयामुळे बँकेतून कर्ज घेऊन फरार होणाऱ्यांना चाप बसला. २८ मे २०१६ रोजी या निर्णयाची अंमलबजावणी झाली होती. तर २०१९ च्या फेब्रुवारी पर्यंत १.४२ लाख कोटी इतकी मोठी रक्कम सरकारने फ्रॉड कंपन्यांकडून वसूल केली होती.


🎇मुद्राधोरण समितीची स्थापना 🎇

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🌀२०१६ मध्ये जेटली यांनी मुद्राधोरण आखण्याकरिता समितीची स्थापना केली होती. यामध्ये सहा सदस्यांचा समावेश करण्यात आला. 


🌀यात तीन आरबीआय आणि तीन सरकारचे सदस्य आहेत. पूर्वीप्रमाणे सारे अधिकार केवळ रिझव्‍‌र्ह बँकेच्या गव्हर्नरसाहेबांच्या हातात न ठेवता सहा शहाण्या मंडळींच्या हातात देशाच्या मुद्राधोरणाचं सुकाणू सोपवण्यात आलं. वर्षभरात चार बैठका या समितीच्या होतात.


          🎇बँकांचे विलीनीकरण🎇 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🌀बँकिंग व्यवसायाच्या व्यवहारांची वैशिष्ट्ये व त्यांचे राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर होणारे दूरगामी परिणाम विचारात घेऊन जनतेच्या हिताचे संरक्षण व्हावे म्हणून बँकांचे नियमन किंवा त्यांवर राष्ट्रीय विकासाच्या दृष्टीने बँकाचे एकीकरण करण्यात आले.


🌀 हा निर्णय अर्थमंत्री अरूण जेटलींच्या नेतृत्वात घेण्यात आला होता. देना आणि विजया बँकेचे ‘बँक ऑफ बडोदा’ मध्ये विलीनीकरण करण्यात आले.


              🎇अर्थसंकल्प 🎇

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🌀देशाचे अर्थमंत्री असताना जेटली यांनी देशाचा अर्थसंकल्प आणि रेल्वेचा अर्थसंकल्प असे वेगळे असणारे दोन संकल्पाची संकल्पना रद्द करत देशाच्या सर्वसाधारण अर्थसंकल्पात रेल्वेचा समावेश केला. 


🌀तसेच देशाचा अर्थसंकल्प दरवर्षी एक फेब्रुवारीलाच सादर करण्यात येणार असल्याचा महत्वपूर्ण आणि धाडसी निर्णय त्यांनी घेतला


🎇एफडीआय नियमात सुधारणा 🎇

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🌀विदेशी कंपन्यांना देशात अधिकाधिक गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन मिळावे, तसेच उद्योग करण्यास वाव मिळावा, यासाठी गुंतवणुकीचे नियम आणखी सोपे करण्यात आले. हा निर्णय जेटलींच्या नेतृत्वात घेण्यात आला होता. 


🌀या निर्णयामुळे आशिया खंडातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असणाऱ्या भारतात जागतिक भांडवलाचा ओघ वाढण्यास सुरुवात झाली. 


🌀अमेरिका, युरोपीय राष्ट्रांतून भारतात होणाऱ्या गुंतवणुकीचा ओघ वाढला.


           🎇जनधन योजना 🎇

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🌀मोदी सरकारच्या महत्वाकांक्षी जनधन योजनेच्या यशामागे अरूण जेटलींचा हात आहे. जनधन योजनेमुळे आज देशातील तब्बल 36.06 कोटी भारतीयांचे बँकेत खाती आहेत. 


🌀सर्वसामान्य नागरिकांच्या या बँक खाते उघडण्याचा निर्णयदेखील अरूण जेटली यांच्याच काळात घेण्यात आला.

माजी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांचा अल्प परिचय


१) अरुण जेटली यांचा जन्म २८ डिसेंबर १९५२ रोजी झाला.


२) त्यांचे वडील महाराज किशन जेटली हे प्रसिद्ध वकील होते. त्यांच्या आईचे नाव रतन प्रभा जेटली होते.


३) अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री आणि जलवाहतूकमंत्री होते.


४) २००० पासून ते राज्यसभेचे सदस्य होते.


५) ३ जून २००९ रोजी त्यांची राज्यसभेतील विरोधीपक्षनेतेपदी नियुक्ती झाली होती.


६) १९६०-६९ दरम्यान सेंट झेवियर्स स्कूल, नवी दिल्ली येथे त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले.


७) १९७३ मध्ये श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्स, कॉमर्स विषयाची पदवी संपादन केली.


८) १९७७ मध्ये दिल्ली विद्यापीठातून त्यांनी कायदा पदवी पास केली.


९) सत्तरच्या दशकात ते दिल्ली विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) विद्यार्थी कार्यकर्ते होते.


१०) १९७४ मध्ये विद्यापीठ विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष झाले.


११) १९८२ साली त्यांनी संगीता जेटली यांच्याशी विवाह केला. त्यांना दोन मुले आहेत. मुलाचं नाव रोहन तर मुलीचं नाव सोनाली आहे.


१२) १९८९ मध्ये त्यांची अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती झाली.


१३) जानेवारी १९९० मध्ये त्यांना दिल्ली उच्च न्यायालयाने वरिष्ठ अधिवक्ता म्हणून नियुक्त केले.


१४) जेटली १९९१ पासून भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत.


१५) १९९९ च्या लोकसभा निवडणुकींच्या काळात ते भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते होते.


१६) १३ ऑक्टोबर १९९९ रोजी अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये जेटली यांनी ‘माहिती आणि प्रसारण’ राज्य मंत्रीपदी नियुक्ती झाली.


१७) मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळामध्ये अरुण जेटली हे केंद्रीय मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते.


१८) मागील अनेक दिवसांपासून अरूण जेटलींची तब्येत खराब असल्याने, त्यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील कॅबिनेट मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला होता. त्यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून आपला निर्णय कळवला होता.


१९) ट्विटरवर देखील त्यांनी माहिती दिली होती की, मागील १८ महिन्यांपासून मी आजारी आहे. माझी प्रकृती खराब आहे. यामुळे माझा मंत्रीपदासाठी विचार केला जाऊ नये.


२०) २४ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांचं निधन झालं.

भारत हा सल्फर डायऑक्साइड उत्सर्जन करणारा सर्वात मोठा देश



● कोळसा जाळून सल्फर डायऑक्साइडचे (SO2) उत्सर्जन करणारा भारत हा जगातील सर्वांत मोठा देश असल्याचा दावा 'ग्रीनपीस' या स्वयंसेवी संस्थेने 'नासा'च्या पाहणीचा हवाला देऊन केला आहे.

● 'नासा'ने ही पाहणी केली असून, त्यासाठी ओझोन मॉनिटरिंग इन्स्ट्रुमेंट (ओएमआय)चा वापर करण्यात आला.

● त्यात 'SO2'चे सर्वाधिक उत्सर्जन करणारी जगातील प्रमुख ठिकाणांची पाहणी करण्यात आली. त्यापैकी भारत हा सर्वाधिक 15 टक्के 'SO2'चे उत्सर्जन करत असल्याचे म्हटले असल्याचे 'ग्रीनपीस'ने म्हटले आहे.


अहवालाची ठळक वैशिष्ट्ये

● भारताच्या संदर्भातः भारत जगातील सल्फर डाय ऑक्साईडचा सर्वात मोठा उत्सर्जक आहे.

● नासाच्या ओएमआय उपग्रहाच्या आकडेवारीनुसार, भारतामध्ये मोठ्या प्रमाणात सल्फर डायऑक्साइड हॉटस्पॉट आहेत, ज्याचे मुख्य कारण कोळसा वापर आहे.

● भारतात मध्य प्रदेशातील सिंगरौली, तमिळनाडूतील नेवेली आणि चेन्नई, ओडिशातील तल्चेर आणि झारसुगुडा, छत्तीसगडमधील कोरबा, गुजरातेतील कच्छ, तेलंगणातील रामागुंडम आणि महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि कोराडी येथे सर्वाधिक उत्सर्जन होत असल्याचे या पाहणीत आढळले. 

● हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी भारतातील बहुतेक प्रकल्पांमध्ये तंत्रज्ञानाचा अभाव असल्याचेही या पाहणीच्या विश्लेषणात आढळले. 

● जगातील सर्वाधिक 'SO2'चे उत्सर्जन रशियातील नोरिल्सक स्मेल्टर कॉम्प्लेक्स येथे होते. त्या पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेतील क्रील आणि इराणमधील झाग्रोझ या ठिकाणांचा समावेश आहे. मात्र 'एसओ२'चे उत्सर्जन करणारी अधिक ठिकाणे भारतात असल्याने भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे.


● भारतातील बहुतेक कोळशावर चालणार्यात उर्जा प्रकल्पांमध्ये वायू प्रदूषण कमी करण्यासाठी डीसल्फराईजेशन तंत्रज्ञानाचा वापर केला जात नाही. 

● शासनाने उचललेली पावले: केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने डिसेंबर 2015 मध्ये कोळशाच्या उर्जा प्रकल्पांमधून सल्फर डायऑक्साइड उत्सर्जन कमी करण्यासाठी मर्यादा निश्चित केली. परंतु डेसल्फ्युरायझेशन तंत्राची अंतिम मुदत 2017 ते 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

● रशिया, दक्षिण आफ्रिका, इराण, सौदी अरेबिया, भारत, मेक्सिको, संयुक्त अरब अमिराती, तुर्की आणि सर्बिया या जगात सल्फर डायऑक्साइड उत्सर्जनाचे प्रमुख आकर्षण केंद्र सापडले आहेत. 

● चीन आणि अमेरिकेने स्वच्छ उर्जा स्त्रोतांचा वापर करून सल्फर डायऑक्साइड उत्सर्जन कमी करण्यात यश मिळविले आहे.

● विश्लेषणानुसार, वायू प्रदूषण ही सार्वजनिक आरोग्यासाठी मोठी चिंता आहे, जगातील 91 टक्के लोकसंख्या जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) बाह्य प्रदूषणाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या मर्यादा ओलांडणार्याए भागात राहते आणि परिणामी,प्रत्येक वर्षी 4.2 दशलक्ष लोक अकाली मृत्यूमुखी पडतात..

आधुनिक भारताचे जनक विषयी माहिती


📒 आधुनिक भारताचे जनक 

    - राजा राममोहन रॉय


📕 आधुनिक भारताचे शिल्पकार 

   - पंडित जवाहरलाल नेहरू.


📗 भारतीय अर्थशास्त्राचे जनक 

   - दादाभाई नौरोजी.


📒 भारतीय राष्ट्रवादाचे जनक

   - सुरेंद्रनाथ चटर्जी


📕 भारतीय असंतोषाचे जनक

   - लोकमान्य टिळक


📗 भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार 

   – सरदार वल्लभभाई पटेल.


📒 मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक

   - आचार्य बाळशास्त्री जांभेकर.


📕 भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक

   - दादासाहेब फाळके.


📗 भारताच्या अनुविज्ञानाचे जनक

   - डॉ.होमी भाभा.


📒 आधुनिक मराठी कादंबरीचे जनक 

   - ह.ना.आपटे.


 📕 आधुनिक मराठी कवितेचे जनक 

   - केशवसुत.


📗 सथानिक स्वराज्य संस्थेचे जनक

   - लॉर्ड रिपन.


📒 भारताच्या हरितक्रांतीचे जनक 

   - डॉ.एम.एस.स्वामिनाथन.


📕 भारताच्या धवलक्रांतीचे जनक

   - डॉ.व्हार्गीस कुरियन.


📗 भारतीय भूदान चळवळीचे जनक

   - आचार्य विनोबा भावे.


📒 भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार

   - विक्रम साराभाई.


📕 भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक

   - सॅम पित्रोदा.

भारताच्या इतिहासातील काही अभिमानास्पद गोष्टी.


🌸 भारतात पहिल्यांदा 1951मध्ये निवडणूक घेतली गेली. यामध्ये 45.7 टक्के मतदान झालं होतं.


🌸1966मध्ये रेटीया फरिया पॉवेलने ही मिस वर्ल्ड किताब मिळवणारी पहिली आशियाई महिला ठरली.


🌸1974मध्ये भारताने पोखरण चाचणी करुन आण्विक शस्त्रांनी सज्ज असलेल्या देशांच्या यादीत जागा मिळवली.


🌸आर्यभट्ट हा पहिला सॅटेलाइट भारताने १९७५ मध्ये अवकाशात सोडला.


🌸1983 मध्ये टीम इंडियाने पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं.


🌸राकेश शर्मा हे अंतरिक्षात जाणारे पाहिले भारतीय आहेत. त्यांनी हे 1984 मध्ये केले होते.


🌸1999मध्ये झालेल्या कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानला धुळ चारत टायगर हिल पुन्हा ताब्यात घेतले.


🌸 2005 भारताने माहिती अधिकार अमलात आणला. हा अधिकार जगातील मोजक्याच देशांमध्ये आहे.


🌸 पहिल्यांदाच प्रतिभाताई पाटील यांच्या रुपाने एक महिला देशाच्या राष्ट्रपतीपदावर विराजमान झाल्या होत्या.


🌸 टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरत, क्रिकेटमध्ये आपला दबदबा पुन्हा सिद्ध केला.


🌸 अभिनव बिंद्रा याने 2008 बिजिंग ऑलंम्पिकमध्ये १०एम एअर रायफल स्पर्धेत वैयक्तीत सुवर्ण पदक जिंकले. हे भारताचे पहिले सुवर्ण पदक आहे.


🌸 संगीतकार ए.आर.रहमान याला 2009 मध्ये 'स्लमडॉग मिलेनिअर' सिनेमासाठी मानाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला.


🌸2011 मध्ये टीम इंडियाने क्रिकेट वर्ल्ड कप ट्रॉफीवर पुन्हा एकदा नाव कोरले.


🌸अग्नि-5 क्षेपणास्त्र हे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने भारतीय सेनादलाकरिता 2012 मध्ये विकसित केलेले क्षेपणास्त्र आहे.


🌸मंगळयान ही भारताची पहिली मंगळ मोहीम असून हे यान आंध्रप्रदेश राज्यातील श्रीहरिकोटा येथून 2013 रोजी प्रक्षेपित केले गेले.


🌸कैलाश सत्यार्थी यांना शांततेच्या नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले.


🌸देशातील व्यवस्थेला हादरा देण्यासाठी व भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ तरूणाई अण्णा हजारेंच्या समर्थनार्थ 2011 ला उपोषणात सहभागी झाली.


🌸2008 मध्ये भारताने चांद्रयान-1 ही मोहीम आखली होती. या यानाने 10 महिने चंद्राभोवती प्रदक्षिणा घातली. चंद्रावर पाणी असल्याचा शोध याच मोहिमेमध्ये लागला होता. यानंतर 2019मध्ये इस्रोचे चांद्रयान-2 अवकाशात झेपावलं...


🌸 तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाले आहे...


🌸 जम्मू काश्मीरातून कलम 370 हटविण्यात आलं. तसेच जम्मू काश्मीर आणि लडाख यांची केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषणा करण्यात आली

विक्रम अंबालाल साराभाई


🚀 विक्रम अंबालाल साराभाई (१२ ऑगस्ट, इ.स. १९१९ - ३० डिसेंबर, इ.स. १९७१) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते.


🚀 त भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह .


🚀 विक्रम अंबालाल साराभाई यांचा जन्म अमदाबाद येथील एका संपन्न कुटूंबात ऑगस्ट १२ १९१९ ला झाला.

 

🚀 १९३७ साली पुढील शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठात शिकायला गेले. 


🚀पण दुसरे महायुद्ध सुरु झाल्याने ते भारतात परत आले त्यांनी बंगलोरमधील

इंडियन इंस्टीट्यूट ऑफ सायन्स मध्ये 

नोबेल पारितोषिक विजेते सर सी. व्ही. रामन यांच्या मार्गदर्शनाखाली वैश्विक किरणावर संशोधन केले. 


🚀१९४२ साली त्यांनी भरतनाट्यम, 

कुचिपुडी या नृत्यकलेत पारंगत असलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना मृणालिनी साराभाई यांच्याशी विवाह केला. 


🚀 १९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम साराभाई ब्रिटनला गेले. १९४७ साली त्यानी ‘कास्मिक रे इंवेस्टिगेशन इन ट्रापिकल लैटीट्यूड्स’ वर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि त्याचवर्षी ते आपल्या मायदेशी परत आले. 


🚀 भारतात परत येउन त्यांनी नोव्हेंबर ११ १९४७लाअहमदाबाद येथे भौतिकी संशोधन कार्यशाळा ची स्थापना केली. 


🚀हे त्यांचे पहिले पाउल होते, पुढे जाऊन अवकाश संशोधनात विक्रम साराभाई यांनी भरीव कामगिरी केली. 


🚀 विक्रम साराभाई यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 


🚀 १९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली होती.


🚀 आर्यभट्टच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर भारताने अनेक उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले. या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे.


🚀 विक्रम साराभाई यांनी जागतिक किर्ती असलेल्या अनेक सस्थांची सुरवात केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट(IIM) ही भारतातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन शिक्षण संस्था डाॅ. साराभाई यांच्या प्रयत्नातुनच उभी राहिली. 


🚀 भौतिकशास्त्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध असलेल्या राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळा (PRL) देखिल डाॅ. साराभाई यांनीच सुरू केली. 


🚀 अहमदाबाद येथे वस्त्रोद्योग निर्मितीस चालना देणारे अहमदाबाद टेक्स्टाईल इंडस्ट्रीयल रिसर्च असोसिएशन(ATIRA) या संस्थेची उभारणी त्यांनी केली.


🚀 पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असलेली सेंटर फॅार इन्व्हीरॅान्मेंटल प्लॅनिंग ॲन्ड टेक्नॅालॅाजी (CEPT) ही संस्था देखिल त्यांनी उभारली.


🚀 डॉ. विक्रम साराभाई यांना सन १९६६ साली पद्मभूषण आणि १९७२ साली मरणोत्तर पद्मविभूषण हे पुरस्कार भारत सरकारतर्फे देण्यात आले. 


🚀 ३० डिसेंबर १९७१ साली

 केरळ राज्यातील कोवालम येथे रात्री झोपेतच ह्रदयविकाराच्या झटक्याने विक्रम साराभाई यांचे निधन झाले.

पहिली अंडरवॉटर ट्रेन


🚇 कोलकात्यात हुगळी नदीखालून धावणार देशातली पहिली अंडरवॉटर ट्रेन

 

🚇 भारतात पहिली अंडरवॉटर ट्रेन म्हणजेच पाण्याखालून जाणारी रेलगाडी लवकरच धावणार आहे. 


🚇 पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये हुगळी नदीखालून ही ट्रेन धावणार आहे. 


🚇 रेल्वे लाईन टाकण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे.


🚇 देशातली पहिली पाण्याखालून धावणारी ट्रेन सॉल्टलेक सेक्‍टर 5 ते हावडा मैदानापर्यंत धावण्यासाठी जवळपास तयार झाली आहे. 


🚇 तसेच हा रेल्वेमार्ग दोन टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. त्यातला पहिला टप्पा लवकरच प्रवाशांसाठी खुला केला जाणार. 


🚇 या ट्रेनला पाण्यापासून वाचवण्यासाठी उच्चस्तरीय सुरक्षा कवच देण्यात आले आहे.


🚇 तसेच नदीच्या मधून जाणारा हा मार्ग 520 मीटर लांब आणि 30 मीटर खोल आहे.


🚇 नदीखालून ट्रेनला हे अंतर पार करण्यासाठी 60 सेकंदाचा वेळ लागणार आहे.


🚇 या प्रकल्पासाठी हावडा ते कोलकाता दरम्यानच्या मेट्रो मार्गाला जोडणाऱ्या हुगळी नदीखाली दुहेरी बोगद्याचे बांधकाम केले गेले. 


🚇 देशातला हा पहिलाच नदीखालचा बोगदा ठरला. 


🚇 कोलकातामधील रेल्वेच्या 16.6 किमी लांबीच्या पूर्व-पश्चिम मेट्रो प्रकल्पाच्या अंतर्गत 520 मीटर लांबीचा हा बोगदा तयार करण्यात आला आहे.

कारगिल युद्ध

🔥 कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेली घुसखोरी रोकण्यासाठी आणि त्यांनी काबीज केलेला प्रदेश पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भारताने 🇮🇳ऑप्रेशन विजयचीसुरुवात केली.


  🎇 १९९९च्या  युद्धाचा घटनाक्रम 🎇


🔥 मे ४: कारगिलमधील उंच ठिकाणांवर पाकिस्तानी सैन्याने ताबा मिळवल्याची बातमी हाती आली. 


🔥 मे ५ ते मे १५: या दहा दिवसांमध्ये भारतीय लष्कराच्या तुकड्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सर्वेक्षण केले. यामध्ये कॅप्टन सौरभ कालिया बेपत्ता झाले. त्यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेऊन छळ करुन ठार केल्याचे बोलले जाते.


🔥 मे २६: भारतीय हवाई दलाने कारगिलमधील पाकिस्तानी सैन्याच्या छावण्यांवर हवाई हल्ले सुरु केले. श्रीनगर, अवंतीपूर आणि आदमपूर एअरबेसवरून मीग २१, मीग २३, मीग २७, जॅग्वार, मीरेज २००० या लडाकू विमानांनी पाकिस्तानी तळांवर बॉम्ब हल्ले केले.


🔥 मे २७: भारतीय हवाई दलाचे मीग २७ विमानाला अपघात होऊन ते कारगिलमध्ये पडले. विमान कोसळण्याआधी पॅरेशूटच्या सहाय्याने विमानाबाहेर आलेल्या वैमानिकाला पाकिस्तानी सैन्याने युद्ध कैदी म्हणून ताब्यात घेतले. त्यानंतर आठ दिवसांनी या वैमानिकाला पाकिस्तानी सैन्याने भारताच्या ताब्यात दिले. 


🔥मे ३१: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कारगिलमध्ये ‘युद्धसदृश्य परिस्थिती’ असल्याची माहिती दिली.


🔥 जून १०: पाकिस्तानने छिन्नविछिन्न अवस्थेतील विटंबना केलेल्या सहा भारतीय जवानांचे मृतदेह भारताच्या ताब्यात दिले. हे मृतदेह कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्या टीममधील सैनिकांचे होते. ही टीम पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी केल्याचे वृत्त हाती आल्यानंतर सर्वेक्षणासाठी गेली होती. 


🔥 जून १२: दिल्लीमध्ये दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक निष्फळ ठरली. भारताचे परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग आणि पाकिस्तानचे परराष्ट मंत्री सरताज अजीज यांची भेट दिल्लीत झाली. मात्र चर्चेनंतर पाकिस्तानने आडमुठी भूमिका घेत भारतालाच घुसखोरांनी परत जायला हवे असे सांगितले.


🔥 जून १५: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना कारगिलमधून सैन्य मागे घेण्याची विनंती केली 


🔥 जून २९: भारतीय लष्कराने टायगर हिल्स प्रदेशातील दोन महत्वाच्या चौक्या ताब्यात घेतल्या.


🔥 जुलै ४: संपूर्ण टायगर हिल्स प्रदेशावर भारतीय लष्कराने ताबा मिळवला. भारतीय लष्कराच्या तीन तुकड्यांनी १८ ग्रेनेडियर्स, २ नागा आणि ८ शिख बटालियनने या प्रदेशात जोरदार गोळीबार करुन हा प्रदेश ताब्यात घेतला. अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची भेट घेतली 


🔥 जुलै ५: शरीफ यांनी पाकिस्तान कारगिलमधून सैन्य मागे घेत असल्याची घोषणा केली


🔥जुलै १४: भारताने ऑप्रेशन विजय यशस्वी झाल्याची घोषणा केला


🔥 जुलै २६: कारगिल युद्धाच्या संपल्याची औपचारिक घोषणा केली.


    🇮🇳😔 मृतांची आकडेवारी 😔🇮🇳


🔥 या युद्धामध्ये ५२७ भारतीयांना प्राण गमवावे लागले तर पाकिस्तानमधील मृतांचा आकडा ४५० इतका होते

आंतरराष्ट्रीय विमानतळे.


🛫 छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ (मुंबई) 


🛫 इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (नवी दिल्ली)


🛫 नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोलकाता) 


🛫 के. कामराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (चेन्नई)


🛫 डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानतळ (नागपूर) 


🛫 राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (हैदराबाद)


🛫 गोपीनाथ बारडोलाई आंतरराष्ट्रीय विमानतळ (गुवाहाटी) 


🛫 दबोलीन आंतरराष्ट्रीय विमानतळ (गोवा)


🛫 सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळ (अहमदाबाद) 


🛫 श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळ (श्रीनगर)


🛫 बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ (बंगळूर)


🛫 मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ (मंगळूर)


🛫 कलिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ (कलिकत)


🛫 कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ : कोची)


🛫 त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ (तिरूअनंतपुरम) 


🛫 देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ (इंदौर)


🛫 श्री गुरु रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळ (अमृतसर)


🛫 जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ (जयपूर)


🛫 वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ (पोर्टब्लेअर) 


🛫 कोइंबतूर आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोइंबतूर)


🛫 तिरूचिरापल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ (तिरूचिरापल्ली) 


🛫 चौधरी चरणसिंग आंतरराष्ट्रीय विमानतळ (लखनौ)


🛫 लालबहादुर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळ (वाराणसी) 

भारत सरकार की योजनाएं(हिंदी)


🎇  नीति आयोग - 1 जनवरी 2015


🎇  ह्रदय योजना -21 जनवरी 2015


🎇 बेटी बचाओ बेटी पढ़ाओं -22 जनवरी 2015


🎇 सुकन्या समृद्धि योजना -22 जनवरी 2015


🎇 मुद्रा बैंक योजना -8 अप्रैल 2015


🎇 प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना -9 मई 2015


🎇 अटल पेंशन योजना -9 मई 2015


🎇 प्रधानमंत्री जीवन ज्योति योजना -9 मई 2015


🎇 उस्ताद योजना (USTAD) -14 मई 2015


🎇 प्रधानमंत्री आवास योजना -25 जून 2015


🎇 अमरुत योजना(AMRUT) -25 जून 2015


🎇 स्मार्ट सिटी योजना -25 जून 2015


🎇 डिजिटल इंडिया मिशन -1 जुलाई 2015


🎇 स्किल इंडिया मिशन -15 जुलाई 2015


🎇 दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योति योजना -25 जुलाई 2015


🎇 नई मंजिल -8 अगस्त 2015


🎇 सहज योजना -30 अगस्त 2015


🎇 स्वावलंबन स्वास्थ्य योजना - 21 सितंबर 2015


🎇 मेक इन इंडिया -25 सितंबर


🎇. इमप्रिण्ट इंडिया योजना - 5 नवंबर 2015


🎇. स्वर्ण मौद्रीकरण योजना -5 नवंबर 2015


🎇. उदय योजना (UDAY) -5 नवंबर 2015


🎇 वन रैंक वन पेंशन योजना -7 नवंबर 2015


🎇 ज्ञान योजना -30 नवंबर 2015


🎇 किलकारी योजना -25 दिसंबर 2015


🎇 नगामि गंगे, अभियान का पहला चरण आरंभ -5जनवरी 2016


🎇 स्टार्ट अप इंडिया -16 जनवरी 2016


🎇 प्रधानमंत्री फसल बीमा योजना -18 फरवरी 2016


🎇 सेतु भारतम परियोजना -4 मार्च 2016


🎇 स्टैंड अप इंडिया योजना - 5 अप्रैल 2016


🎇. ग्रामोदय से भारत उदय अभियान -14अप्रैल 2016


🎇 प्रधानमंत्री अज्वला योजना - 1 मई 2016


🎇 प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना - 31 मई 2016


🎇 राष्ट्रीय आपदा प्रबंधन योजना -1 जून 2016


🎇 नगामी गंगे कार्यक्रम -7 जुलाई 2016


🎇 गैस फॉर इंडिया -6 सितंबर 2016


🎇 उड़ान योजना -21 अक्टूबर 2016


🎇 सौर सुजला योजना -1 नवंबर 2016


🎇 प्रधानमंत्री युवा योजना -9 नवंबर 2016


🎇 भीम एप - 30 दिसंबर 2016


🎇 भारतनेट परियोजना फेज - 2 -19 जुलाई 2017


🎇 प्रधानमंत्री वय वंदना योजना -21 जुलाई 2017


🎇आजीविका ग्रामीण एक्सप्रेस योजना -21 अगस्त 2017


🎇 प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना- सौभाग्य -25 सितंबर 2017


🎇 साथी अभियान -24 अक्टूबर 2017


🎇 दीनदयाल स्पर्श योजना- 3 नवंबर 2017

रोगांचे वर्गीकरण


❗️🦠🦠संसर्गजन्य🦠🦠❗️


💉 इन्फ्लुएंजा,

💉 कषय, 

💉 नायटा, 

💉 अमांश,

 💉 घटसर्प,

💉 पोलियो. 


❗️🦠🦠असंसर्गजन्य🦠🦠❗️

   

💉 मधुमेह (डायबिटीस),

💉  कर्करोग. 


❗️🦠🦠विषाणूंपासून होणारे🦠🦠❗️


💉 देवी, 

💉 इन्फ्ल्युएंझा, 

💉 पोलिओ, 

💉 कांजिण्या,

💉  काला आजार, 

💉 जपनीज एन्सेफेलाइटिस 


❗️🦠🦠जिवाणूंपासून होणारे 🦠🦠❗️


💉 कुष्ठरोग, 

💉 कॉलरा (पटकी),

💉  नयूमोनिया, 

💉 कषय (टी. बी.)


❗️🦠🦠दुषित पाण्यापासून 🦠🦠 ❗️


💉 कॉलरा, 

💉 विषमज्वर, 

💉 अतिसार, 

💉 कावीळ,

💉  जत इत्यादी.


❗️🦠🦠हवेतून पसरणारे🦠🦠❗️


💉 सर्दी, 

💉इन्फ्ल्यूएंझा, 

💉घटसर्प, 

💉कषय.


❗️🦠🦠कीटकांमार्फत पसणारे 🦠🦠❗️


💉अतिसार

💉अमांश, 

💉पटकी

💉 मलेरिया,

💉 हत्तीरोग,

 💉 नारू,

💉 पलेग


❗️🦠🦠कवकांपासून होणारे🦠🦠 ❗️


💉गजकर्ण, 

💉चिखल्या. 

नृत्य कला


👑 महाराष्ट्र --- लावणी, कोळी नृत्य


👑 तामिळनाडू --- भरतनाट्यम


👑 केरळ --- कथकली


👑 आंध्र प्रदेश --- कुचीपुडी, कोल्लतम


👑 पंजाब --- भांगडा, गिद्धा


👑 गुजरात --- गरबा, रास


👑 ओरिसा --- ओडिसी


👑 जम्मू आणी काश्मीर --- रौफ


👑 आसाम --- बिहू, जुमर नाच


👑 उत्तरखंड --- गर्वाली


👑 मध्य प्रदेश --- कर्मा, चार्कुला


👑 मेघालय --- लाहो


👑 कर्नाटका --- यक्षगान, हत्तारी


👑 मिझोरम --- खान्तुंम


👑 गोवा --- मंडो


👑 मणिपूर --- मणिपुरी


👑 अरुणाचल प्रदेश --- बार्दो छम


👑 झारखंड- कर्मा


👑 छत्तीसगढ --- पंथी


👑 राजस्थान --- घूमर


👑 उत्तर प्रदेश --- कथक


भारतातली जागतिक वारसा स्थळे

🍀 आता भारतात एकूण 38 जागतिक वारसा स्थळे आहेत,


 🍀 तयात 30 (जयपूर सहित) सांस्कृतिक स्थळे, 


🍀 7 नैसर्गिक ठिकाणे


 🍀 एक मिश्रित ठिकाण आहे.

 


             🎇 ♻️सांस्कृतिक♻️ 🎇


💐आग्रा किल्ला 🏰, आग्रा( उत्तरप्रदेश)


💐अजिंठा लेणी, महाराष्ट्र


💐 नालंदा विद्यापीठ 🏢 , बिहार


💐 बौद्ध स्मारक , सांची, मध्यप्रदेश (1989)


💐 चंपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान, गुजरात


💐 छत्रपती शिवाजी टर्मिनस

🚂🚃🚃, मुंबई, महाराष्ट्र


💐 गोव्याचे चर्च 🏥आणि कॉन्व्हेंट


💐 एलिफंटा लेणी/ 🗿 घारापुरीची लेणी, मुंबई, महाराष्ट्र


💐 वल्लोर/ 🗿वरूळ लेणी, महाराष्ट्र


💐 फत्तेपूर सिक्री, उत्तरप्रदेश


💐 चोला राजांची मंदिरे, तमिळनाडू


💐 हंपीमधील मंदिरे, कर्नाटक


💐 महाबलीपुरममधील मंदिरे, तामिळनाडू


💐 पट्टदकलमधील मंदिरे, कर्नाटक


💐राजस्थानामधील 🏔पर्वतीय किल्ले


💐 अहमदाबाद 🛣ह ऐतिहासिक शहर


💐 हुमायूनची कबर, दिल्ली


💐 खजुराहो, मध्यप्रदेश


💐महाबोधी मंदिर, बोध गया, बिहार


💐 भारतातली पर्वतीय रेल्वे🚂🚃 (दार्जिलिंग रेल्वे, कालका-शिमला रेल्वे व नीलगिरी पर्वतीय रेल्वे)


💐 कुतुब मिनार🕌, दिल्ली


💐 राणी की वाव🏟, पटना, गुजरात


💐 लाल किल्ला 🏰🗼, दिल्ली


💐 दगडी निवारे, भिमबेतका, मध्यप्रदेश


💐 कोणार्क सूर्य मंदिर, कोणार्क, ओडिशा


💐 ताज महाल, आग्रा, उत्तरप्रदेश


💐 ले कोर्बुझियरचे वास्तू कलाकृती, चंदीगड


💐 जंतर मंतर, जयपूर


💐 मबईची व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट डेको एन्सेम्बल ही इमारत

       

         🎇♻️ नैसर्गिक ♻️🎇


💐 ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान 🦌🐕 , कुल्लू, हिमाचल प्रदेश


💐 काझीरंगा राष्ट्रीय उद्यान🦏🦏, आसाम


💐 मानस राष्ट्रीय उद्यान 🐘 , आसाम


💐 केवलदेव राष्ट्रीय उद्यान 🦢🦌, राजस्थान


💐 सुंदरबन राष्ट्रीय उद्यान 🐅🏝, पश्चिम बंगाल


💐 नंदादेवी राष्ट्रीय उद्यान व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान🌻, उत्तराखंड


💐 पश्चिम घाट⛰⛰  (सह्याद्री पर्वतरांगा)



               🎇♻️   मिश्र  ♻️🎇


💐 खांगचेंडझोंगा 🐼 🐆राष्ट्रीय उद्यान, सिक्किम


PINK CITY

☣️ भारतातील PINK CITY जयपूर World Heritage Sites मध्ये निवड करण्यात आली


☣️ UNSCO चे मुख्यालय पॅरिस(फ्रांस ची राजधानी) ला आहे


☣️  युनेस्को वारसा समितीही

 21 सदस्यांची असून त्यांची बैठक दरवर्षी होते.


☣️ आतापर्यंत 167 देशांतील 1092 ठिकाणांची निवड युनेस्को जागतिक वारसा स्थळांमध्ये झाली आहे..


☣️ UNSCO ची 43 वी बैठक 6 जुलै ला अझरबैजान देशाची राजधानी 'बाकु' येथे पार पडली


☣️ भारतात आता 38 world heritage sites झाली आहेत.


☣️ सर्वात जास्त WHS चीन मध्ये आहेत.


☣️ राजस्थान चे सध्या चे मुख्यमंत्री अशोक गेलोत आहेत


☣️ याच्यामुळे पर्यटन ला खूप फायदा होतो.


☣️ याआधी जयपूरच्या

  'आमेर किल्ला' 🏯आणि

 'जंतरमंतर' ⛩चा वारसा य केलेला आहे


         🌸PINK CITY🌸


☣️ 1876 इंग्लंड राजा आणि राणी व्हिक्टोरिया या भारत भेटीला आल्या त्या वेळचे राजा राम सिंग यांनी पूर्ण शहर गुलाबी रंगाने रंगवले होते.तेव्हा पासुन गुलाबी शहर नावाने ओळखले जात आहे.


  💐Most World Heritage Sites💐


🇨🇳 China: 55

🇮🇹 taly: 54

🇩🇪 Germany: 47

🇪🇸 Spain: 47

🇫🇷 France: 45

🇮🇳 India: 38

🇲🇽 Mexico: 35

🇬🇧 UK: 31

🇷🇺 Russia: 28

🇮🇷 Iran: 24

🇺🇸 US: 23

🇯🇵 Japan: 23

🇧🇷 Brazil: 22

🇦🇺 Australia: 20

🇨🇦 Canada: 20

🇬🇷 Greece: 18

🇹🇷 Turkey: 18

🇵🇱 Poland: 16

🇸🇪 Sweden: 15

SEBC आरक्षण चा दावा केलेल्या उमदेवार च्या बाबतीत सूचना..

 




⚠️SEBC मधून ज्यांनी अर्ज केला आहे त्यांना EWS किंवा खुल्या गटात पुन्हा प्रवर्ग निवडण्याची संधी आयोगाने दिली आहे


🔴 MPSC 2020 परीक्षा मध्ये SEBC विद्यार्थ्याना EWS प्रवर्ग बदलण्याची संधी 👆👆

🔴 5 जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान राहणार लिंक खुली  

यनेस्को जागतिक वारसा स्थळे



🔰 २०१९ मध्ये राजस्थानातील जयपूर शहराचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत केला आहे


🔰 जयपूर हे राजस्थानातील ऐतिहासिक शहर असून त्याची स्थापना सवाई जयसिंग द्वितीय यांनी इ.स १७२७ मध्ये केली


🔰 आता भारतात एकूण ३८ जागतिक वारसा स्थळे आहेत , त्यात ३० सांस्कृतिक स्थळे , ७ नैसर्गिक ठिकाणे आणि १ मिश्रित ठिकाण आहे


🔰 सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असण्यामध्ये भारत हा जगात सहाव्या क्रमांकाचा देश आहे


✅ सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असणारे देश 


🇮🇹 इटली (५५) 

🇨🇳 चीन (५५)

🇪🇸 सपेन (४८)

🇩🇪 जर्मनी (४६)

🇫🇷 फरान्स (४५)

🇮🇳 भारत (३८)

🇲🇽 मक्सिको (३५) 

🇬🇧 यनायटेड किंगडम (३२) 

🇷🇺 रशिया (२९)

🇺🇲 अमेरिका (२४) .

राष्ट्रीय महिला आयोगाकडे गत वर्षभरात सर्वाधिक तक्रारी



राष्ट्रीय महिला आयोगाकडे गतवर्षी सहा वर्षांतील उच्चांकी म्हणजे २३,७२२ तक्रारींची नोंद झाली आहे. त्यातील एक चतुर्थाश तक्रारी या घरातील हिंसाचाराशी संबंधित होत्या, असे दिसून आले आहे.


✍🏻 _ उत्तर प्रदेशातून ११,८७२, दिल्लीतून २,६३५, हरियाणा १,२६६, महाराष्ट्र १,२८८ या प्रमाणे तक्रारींची संख्या आहे. एकूण २३,७२२ तक्रारींपैकी ७,७०८ तक्रारी या सन्मानाने जगण्याचा अधिकार या मुद्दय़ांवर आहेत. सन्मानाने जगण्याचा अधिकार याचा अर्थ महिलांच्या भावनांचा आदर करून केलेली वर्तणूक असा आहे. अनेक प्रकरणात महिलांच्या भावनांची कदर केलेली दिसत नाही.


एकूण ५२९४ तक्रारी या घरातील हिंसाचाराच्या आहेत. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी सांगितले, की आर्थिक असुरक्षितता, वाढता ताण, नैराश्य, आर्थिक चिंता, भावनिक आधार नसणे, आईवडील किंवा कुटुंबाने काळजी न घेणे यातून घरगुती हिंसाचाराची प्रकरणे घडतात. शाळा, महाविद्यालये व काही प्रमाणात कार्यालये बंद असल्याने सर्व जण घरातच असल्याने महिलांना अनेक कामे करावी लागत आहेत. तसेच त्या कुटुंबाला आधार देत आहेत. या कठीण परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी महिलांना बरेच कष्ट पडत आहेत. २०२० मध्ये सहा वर्षांतील सर्वाधिक तक्रारी आल्या असून २०१४ मध्ये ३३,९०६ तक्रारी आल्या होत्या. जुलै व त्याआधीच्या काही महिन्यांत घरगुती हिंसाचाराच्या घटना वाढल्या असून त्याबाबत एकूण ६६० तक्रारी आल्या आहेत. या प्रकारचा हिंसाचार हा वर्षभर चिंतेचा विषय होता, असे शर्मा यांनी सांगितले.


टाळेबंदीमुळे कोंडी


घरातील हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांना आधार देणारी घरातील यंत्रणा निरुपयोगी ठरली. त्यांना बाहेरूनही मदत घेता आली नाही. कोविड १९ टाळेबंदीमुळे घरगुती हिंसाचाराच्या तक्रारी करण्याची संधी त्यांना फार कमी मिळाली, असेही त्या म्हणाल्या. हुंडय़ासाठी छळवणुकीच्या ३,७८४ आणि विनयभंगाच्या १,६७९ तक्रारी आल्या आहेत. १,२७६ तक्रारी या पोलिसांनी दुर्लक्ष केल्याच्या असून ७०४ तक्रारी या सायबर गुन्ह्य़ांबाबत आहेत. बलात्काराच्या १,२३४ तर लैंगिक छळवणुकीच्या ३७६ तक्रारी आहेत.


वाढती जागरूकता


अलीकडे बलात्काराच्या घटनांबाबत महिला बोलू लागल्या आहेत. त्यामुळे तक्रारींची संख्या वाढली आहे, असे मत महिला हक्क कार्यकर्त्यां योगिता भयाना यांनी व्यक्त केले. समाज माध्यमांमुळेही घरगुती हिंसाचाराच्या घटना समोर येण्यास मदत होत आहे. घरगुती हिंसाचाराविरोधात सरकारने खंबीर भूमिका घ्यावी, असे महिला कार्यकर्त्यां शमिना शफीक यांनी म्हटले आहे.