०१ जानेवारी २०२१

मॅग्नेटिक महाराष्ट्र’मध्ये विदर्भातील १० जिल्ह्य़ांकडे पाठ.


🔰‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’मध्ये विदर्भातील जिल्ह्य़ांकडे पाठ फिरवण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत तिसऱ्या टप्प्यात अमरावती वगळता इतर १० जिल्ह्य़ांमध्ये उद्योग उभारण्याच्या दृष्टीने एकही करार करण्यात आलेला नाही. विदर्भात गुंतवणूक करण्यात मोठे उद्योजक अनुत्सुक असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. मूलभूत सोयीसुविधांचा अभाव व राजकीय उदासीनतेमुळे विदर्भात नवीन उद्योग येत नसल्याचे चित्र आहे.


🔰राज्यात गुंतवणूक वाढून उद्योजकांना प्रोत्साहित करण्यासाठी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र २.०’ उपक्रम राबविण्यात येत आहे. रोजगारनिर्मिती होण्यासोबतच अर्थव्यवस्थेला चालना देणे हा त्यामागचा उद्देश. या माध्यमातून औद्योगिकदृष्टय़ा मागास व अप्रगत भागात नवे उद्योग येणे अपेक्षित असताना समृद्ध भागातच नव्या उद्योगांसाठी करार करण्यात आले आहेत.


🔰वर्षभरात परदेशी कंपन्या आणि देशातील आघाडीच्या विविध कंपन्यांशी सामंजस्य करारांद्वारे राज्यात २ लाख कोटींची गुंतवणूक केली. गेल्या आठवडय़ात तिसऱ्या टप्प्यामध्ये २५ भारतीय कंपन्यांशी ६१ हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार झाले. त्यातून २ लाख ५३ हजार ८८० लोकांना रोजगार उपलब्ध होईल. यामध्ये पुणे, ठाणे आदी भागांमध्येच गुंतवणूक करण्यात उद्योजकांचा कल आहे. विदर्भ, मराठवाडय़ात गुंतवणूक करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.


🔰विदर्भातील ११ जिल्ह्य़ांपैकी केवळ अमरावती जिल्ह्य़ात २ उद्योगांचे करार झाले. उर्वरित १० जिल्ह्य़ांची पाटी कोरीच राहिली. अमरावती जिल्ह्य़ात वस्त्रोद्योग व रसायने उद्योगाचे करार झाले. त्यातून सुमारे ९०० कोटींची गुंतवणूक होऊन दोन हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल.

वाणिज्यिक बँकात ‘पॉझिटिव्ह पे सिस्टिम’लागू.


🍀रिझव्‍‌र्ह बँकेच्या निर्देशानुसार वाणिज्यिक बँका  ‘पॉझिटिव्ह पे सिस्टिम’ लागू करत आहेत.


🍀तर 50,000 रुपयांवरील व्यवहारासाठी धनादेशाबरोबर संबंधितांनी खाते क्रमांक, आयएफसी कोड, खातेदाराचे नाव व संपर्क क्रमांक देणे बंधनकारक करण्यात आले आहे.


🍀तसेच‘इन्सर्ट’नंतर ‘स्वाईप’ पद्धतीद्वारे व्यवहार करण्यासाठी एटीएम कार्डना चुंबकीय पट्टीची अनिवार्यता 2020 मध्ये अंमलात आली.


🍀सरक्षिततेच्या दृष्टीने यापुढचे पाऊल म्हणून संपर्करहित एटीएम कार्ड संबंधित ‘पीओएस’च्या एक इंच अंतरावरून कार्यान्वित करून व्यवहार करता येणार आहे.


🍀एटीएम कार्ड तसेच यूपीआयद्वारे सध्या असलेली  2,000 रुपयांची मर्यादा 5,000 रुपयांपर्यंत  वाढविण्यात आली आहे.

‘सहायक-एनजी’: विमानातून सोडता येऊ शकणारी मालवाहू पेटी



भारतीय नौदलाने संरक्षण संशोधन व विकास संस्थेच्या सहकार्याने तयार केलेल्या ‘सहायक-एनजी’ या विमानातून खाली सोडता येऊ शकणाऱ्या स्वदेशी मालवाहू पेटीची (container) पहिली चाचणी यशस्वीपणे पार पाडली.


ठळक बाबी


भारतीय नौदलाची रसद आणि इतर सामुग्री वाहून नेण्याची क्षमता वाढविण्यासाठी अश्या पेट्या तयार करण्यात आलेल्या आहेत. पेट्यांमधून संकटकाळात गरजेच्या अभियांत्रिकी सामानाचे वहन कशा पद्धतीने करता येणार, याबाबत संशोधन करण्यात आले आहे.


भारतीय नौदलाच्या विमानातून गोव्याच्या सागरी प्रदेशात पेट्या खाली सोडण्यात आल्या होत्या. गोव्यापासून 2000 किलोमीटर अंतरावर तैनात जहाजांना काही अभियांत्रिकी साधनसामुग्री पुरविण्याचा प्रयोग करण्यात आला.


अश्या सुविधेमुळे आवश्यकतेच्यावेळी जहाजांना सामुग्री, सामानाचे सुटे भाग घेण्यासाठी किनाऱ्यापर्यंत यावे लागणार नाही.


‘सहायक-एनजी’ची आधुनिक आवृत्ती ‘सहायक एमके 1’ तयार करण्यात आली आहे. या नवीन आवृत्तीमध्ये GPS म्हणजेच वैश्विक स्थान प्रणालीच्या मदतीने हवेतून पेटी खाली सोडण्यात येतात. या पेटीची वहन क्षमता 50 किलो वजन एवढी आहे. विमानातून ही पेटी नियोजित स्थानी खाली सोडता येते.

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...