Sunday 26 December 2021

WHO म्हणतंय, “Omicron वेगाने पसरतोय, लसीकरण पूर्ण झालेल्यांबरोबरच करोना होऊन गेलेल्यांना.

🔰करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव डेल्टापेक्षा अधिक वेगाने होत असल्याची माहिती सोमवारी जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी दिली आहे. इतकच नाही तर लसीकरण पूर्ण झालेल्या किंवा यापूर्वी करोना होऊन गेलेल्यांनाही ओमायक्रॉनचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.


🔰डब्ल्यूएओचे महानिर्देशक ट्रेडोस अधनोम घेब्रेसस यांनी जिनेवामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सध्याच्या करोना परिस्थितीसंदर्भात सविस्तर माहिती दिली. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ट्रेडोस यांनी, “आता समोर आलेल्या पुराव्यांनुसार करोनाचा ओमायक्रॉन व्हेरिएंट हा डेल्टाच्या तुलनेत फारच वेगाने पसरत आहे,” असं म्हटलंय.


🔰टरेडोस यांनी करोना प्रतिबंधक लसीचे सर्व डोस घेतलेल्यांना किंवा यापूर्वी करोनावर मात केलेल्यांमध्येही या नवीन विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता व्यक्त केलीय. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार जगामधील ८९ देशांमध्ये करोनाच्या या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटने शिरकाव केलाय.


🔰कम्युनिटी ट्रान्समिशनचा धोका असणाऱ्या भागांमध्ये रुग्णसंख्या दीड ते तीन दिवसांमध्ये दुप्पटीने वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार अधिक लोकसंख्या असणाऱ्या देशांमध्ये मोठ्याप्रमाणात ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव होत आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...