Monday, 20 December 2021

राज्यसेवा पुर्व Paper 1 आणि Paper 2 च्या वेळी Exam Hall Management आणि मानसिकता कशी असावी??

🟣 यणारी राज्यसेवा पुर्व ही अनेकार्थाने वेगळी असणार आहे. आयोगाने प्रश्न विचारण्याची बदललेली पद्धती,कधी नव्हे ते Class 1 चे सर्व पद समाविष्ट असलेली जाहिरात, नवीन विद्यार्थ्यांनादेखील सम पातळीत मिळत असलेली संधी या सर्व प्रश्वभूमीवर ही 2 जानेवारीची परीक्षा होत आहे.

आपण परीक्षेसाठी अभ्यास तर करणारच आहोत. त्याबद्दल काहीच शंका नाही. पण कितीही अभ्यास झाला तरी परीक्षा Hall मधील दडपण सहन करण्याची ताकद आपल्यात जोपर्यत येत नाही तोपर्यत Exam Clear होणं थोडं अवघड आहे. त्यामुळेच म्हणतात MPSC ही अभ्यासाइतकीच तुमच्या Temperament ची देखील परीक्षा आहे. Exam Hall मध्ये नक्की कशा पद्धतीने आपल्याला या गोष्टी Manage करता येतील याविषयीं आपण सविस्तर बोलू.

                        

❇️ 1. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे अभ्यासाचं दडपण परीक्षा Hall मध्ये Manage व्हायला हवं. नाहीतर माझा अभ्यास झाला नाही, माझ्या एवढ्या Facts लक्षात राहतील का ,माझा अमुक विषयाचा अभ्यास पुर्ण झाला नाही, मला इतिहास जमतच नाही यासारखे प्रश्न मनात गोंधळ घालायला सुरुवात करतात. पण एक लक्षात घ्या अभ्यासाची वेळ आता निघून गेली आहे. आता जे आहे ते आपल आणि जे नाही तेदेखील आपलंच असं म्हणण्याची वेळ असते.मग आपण इतक्या दिवस काय करत होतो हा प्रश्नादेखील शिल्लक राहतोच असो.जेवढी शिदोरी आपल्या हातात आहे त्यावरच आपल्याला आता परीक्षा द्यायची आहे So no Excuse.


❇️ 2. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मी जेवढं वाचलंय ते सगळं माझ्या लक्षात राहायला हवं. हा, एक Limit पर्यत Facts लक्षात ठेवाव्याच लागतात त्याबद्दल दुमत नाही. पण एक लक्षात घ्या आपली परीक्षा ही बहुपर्यायी स्वरूपाची आहे. Answers आपल्या समोर आहेत. त्यामुळे सर्व काही लक्षातच असलं पाहिजे असं काही नाही. प्रश्न आणि त्याचे पर्याय दोन्ही गोष्टी आपल्या समोर आहेत. So dont worry आता Study आठवण्याचा मुळीच प्रयत्न करू नका. Option समोर आल्यावर सर्व गोष्टी बरोबर आठवतात. पण त्यासाठी तुमची अभ्यासाची Revision मात्र खूप Strong हवी.


❇️ 3. आपल्या डोक्यातील Prejudices ( पूर्वग्रदूषिते )-


उदा.2020 चा Csat चा Paper Logical आणि थोडा Tough होता आता पण तसाच Paper येणार. आणि मी त्याच पद्धतीने सोडवणार. मित्रांनो हे जर इतकं सोपं असत तर आपण सगळेच परीक्षा पास झालो असतो. आयोगाने Paper कसा Set करावा हे आपण सांगू शकत नाही. पण एवढं मात्र नक्की की ज्याप्रमाणे आयोगाने Paper Set केलाय त्यानुसार आपल्याला Exam Hall मध्ये बदलावं लागेल.


❇️ 4. 390 Magic Figure - यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे जास्त जागा असल्यावर येणारे Unnecessary दडपण. एवढ्या जागा आहेत, त्यामध्ये पण Class 1 च्या सर्वात जास्त जागा इ. प्रकारचे प्रश्न मनात घोळायला लागतात. ज्यांचे 2-3 attempt झाले आहेत किंवा ज्यांचा पहिला Serious attempt आहे या लोकांच्या बाबतीत असं होऊ शकत. त्यामुळे जागांच burden न घेता आपल्या Natural form वरती Concentrate करा. Outout नक्की भेटेल.  


❇️ 5. शेवटचा आणि सर्वात महत्वाचा मुद्दा ही परीक्षा तुमच्या अभ्यासासोबतच तुमच्या मानसिकतेची आहे, तुमच्या Confidence ची आहे. आपण शांत राहून प्रत्येक प्रश्नाला कस समोर जातो याची आहे. अभ्यासाला तर पर्याय नाहीच. पण त्यासोबतच वरती सांगितलेल्या गोष्टी अभ्यासातक्याचं किंबहुना अभ्यासापेक्षा जास्त महत्वाच्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या परीक्षेसाठी आपण या बाबींचा विचार करू आणि सर्वजण छान तयारी करून परीक्षेला सामोरे जाऊ.                     


2 जानेवारीसाठी सर्वाना खूप खूप शुभेच्छा 💐💐.


No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 डिसेंबर 2024

🔖 प्रश्न.1) नुकतेच महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ? उत्तर - राम शिंदे  🔖 प्रश्न.2) महाराष्ट्र विधानसभेचे...