🔰ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. देशात आतापर्यंत २३६ हून अधिक ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली असून यामधील १०४ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत.
🔰महाराष्ट्रात आतापर्यंत आढळलेल्या ओमायक्रॉनबाधितांची एकूण संख्या ८८ झाली आहे. यानंतर दिल्ली, तेलंगण, कर्नाटक, राजस्थान आणि केरळ या राज्यांचा क्रमांक आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध लावण्याची तयारी सुरु झाली असताना केंद्राकडूनही कठोर निर्णयाची शक्यता आहे. भाजपा खासदार सुब्रहमण्यम स्वामी यांनी ट्वीट करत तसे संकेत दिले आहेत.
🔰करोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूच्या वेगवान प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी बैठक घेऊन करोनास्थितीचा आढावा घेतला. सर्व लसपात्र नागरिकांचे लवकरात लवकर संपूर्ण लसीकरण करून घ्यावे, अशी सूचना मोदींनी राज्यांना केली. आपण सतर्क आणि सावध राहायला हवे, असे नमूद करत मोदी यांनी करोनाप्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत सूचना केल्या.
🔴“देशात लॉकडाउन जाहीर झाला तर आश्चर्य वाटू देऊ नका”🔴
🔰भाजपाचे खासदार सुब्रहमण्यम स्वामी यांनी ट्वीट केलं असून लॉकडाउन जाहीर झाला तर आश्चर्यचकित होऊ नका असं म्हटलं आहे. तसंच उत्तर प्रदेश निवडणुकाही पुढे ढकलल्या जाऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली आहे.
🔰“ओमायक्रॉनमुळे लॉकडाउन जाहीर झाल्यास आणि उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवटीखाली निवडणुका सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलल्यास आश्चर्य वाटू देऊ नका. यावर्षाच्या सुरुवातीला ज्या गोष्टी प्रत्यक्षपणे करु शकले नाहीत त्या पुढील वर्षी अप्रत्यक्षपणे केल्या जातील,” असं ते म्हणाले आहेत.
No comments:
Post a Comment