🎯पुर्ण नाव (Name) मंगल पांडे
🎯जन्म (Birthday) 19 जुलै 1827, नगवा, बलिया, उत्तर प्रदेश,
🎯वडिल (Father Name) दिवाकर पांडेय
🎯आई (Mother Name) अभय रानी पांडेय
🎯कार्य (Work) 1857 साली स्वातंत्र्य संग्रामाची ज्योत चेतवणारे पहिले भारतिय
🎯मंगल पांडे यांच्यावर आधारीत चित्रपट (Movie) मंगल पांडे: दि राइजिंग
🎯मृत्यु (Death) 8 एप्रील 1857 ( वयाच्या 29 व्या वर्षी) बैरकपुर, पश्चिम बंगाल, भारत
🎯इंग्रजांविरूध्द विद्रोहाची ज्वाला भडकविणारे मंगल पांडे हे भारतातील पहिले कांतिकारी होते ज्यांनी केवळ 1857 च्या उठावाची सुरूवात केली असे नाही तर प्रत्येक भारतियाच्या मनात इंग्रजांच्या गुलामगिरीतुन सुटका व्हावी या हेतुने पेटुन उठण्याची ज्योत देखील जागविली.
🎯त्यांनी सुरूवात केलेली स्वातंत्र्याची ही लढाई पुढे कित्येक वर्श चालली आणि बराच संघर्श व बलिदाना नंतर आपला भारत देश 15 आगस्ट 1947 ला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतुन मुक्त होऊ शकला.
🎯मंगल पांडे यांचा जन्म उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्यातील नगवा या गावात १९ जुलै १८२७ रोजी एका ब्राम्हण परिवारात झाला. त्यांना लहानपणापासूनच धाडसी कृत्यांची आवड होती. नेमबाजी, तलवारयुध्द इत्यादी कलांमध्ये ते पारंगत होते. मंगल पांडे त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्माबद्दल अत्यंत संवेदनशील आणि अभिमानी होते.
🎯1849 साली ते ईस्ट इंडिया कंपनीच्या (East India Company) सैन्यात भरती झाले. ब्रिटिश शासनाने 1856 मध्ये *एनफिल्ड नावाच्या रायफलसोबत* नवी काडतुसं आणली होती. या काडतुसांचं आवरण दातांनी तोडून ती बंदुकीत भरावी लागत. या काडतुसांमध्ये गाय आणि डुकरांच्या चरबीचा वापर करण्यात आला होता.त्यामुळे अनेक जवानांच्या धार्मिक भावना दुखावल्या होत्या. म्हणून त्यांनीही काडतुसं वापरण्यास नकार दिला होता. त्यामुळे फेब्रुवारी 1857 मध्ये या मुद्द्यावरून सैन्यात रोष पसरला.
🎯29 मार्च 1857 रोजी मंगल पांडे यांनी ब्रिटिशांच्या या नव्या काडतुसांना खुलेपणाने विरोध केला. इंग्रज अधिकाऱ्यांनी जेव्हा दबाव आणायचा प्रयत्न केला, तेव्हा मंगल पांडे यांनी त्यांना ठार केलं. ब्रिटिशांनी हे बंड मोडून काढलं आणि त्यांना फाशी देण्याचे आदेश *6 एप्रिल 1857* रोजी दिले. पांडे यांच्या हौतात्म्यामुळे अन्य जवान आणि देशवासीयांमध्ये ब्रिटिशांविरोधात बंड करून पेटून उठण्याची चेतना जागृत झाली.
No comments:
Post a Comment