Monday, 20 December 2021

लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या सभागृहात आपण अनेक वेळा पाहतो की प्रत्येकाच्या टेबलावर headphones असतात.


जे सदस्य त्याचा वापर करत नाहीत….त्यांच्या सुद्धा टेबलावर ते तुम्हाला दिसतील… तर याच्या मागच नेमकं कारण काय आहे ?


हे headphones सभागृहात गोंधळ असतो म्हणून नसतात. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात देशाच्या वेगवेगळ्या राज्यातून अनेक सदस्य आलेले असतात. प्रत्येकाची भाषा वेगळी असते काहींची हिंदी, इंग्रजी भाषेवरती चांगलं प्रभुत्व असत.


तर काहींना आपापल्या राज्यातील बोली भाषाच व्यवस्थित समजतात जस की….कन्नड, तमिळ, मराठी, तेलगू इ. 


हे जे headphones आपण पाहतो हे काही साधेसुधे headphones नसतात या headphones च्या माध्यमातून भाषेच अनेक भाषेत भाषांतर होत असत.


जो सदस्य जी भाषा त्यावर सेट करेल त्या भाषेत त्याला समोरच्या सदस्याचे प्रश्न, उत्तर, किंवा भाषण ऐकू येत असतात.


ही सुविधा 7 सप्टेंबर 1964 मध्ये भारताचे पाहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केली त्यावेळी फक्त हिंदीच इंग्रजीमध्ये आणि इंग्रजीच हिंदीमध्ये भाषांतर होत असे नंतर काही वर्षांनी यात मराठी, कन्नड, तमिळ, तेलगू, पंजाबी, नेपाळी अशा अनेक भाषांचा समावेश करण्यात आला.


हे सगळं सांगण्याच निम्मित इतकंच आहे की जेव्हा एका खासदाराने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना इंग्रजीत प्रश्न विचारला तेव्हा नारायण राणे यांनी ते विशेष सुविधा असणारे headphones घातलेले होते याचा अर्थ त्याना तो प्रश्न मराठीत ही ऐकु आला असेल. 


No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...